वीज चोरीचा गुन्हा सिद्ध झाल्याने ३ आरोपींना दारव्हा न्यायालायने तीन महिने कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
दारव्हा तालुक्यातील उमरी इजरा गावात राहणारे धनु राठोड ,राजू राठोड, प्रह्लाद पवार अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. महावितरणचे शाखा अभियंता गौतम भागवत यांनी ३१ मे २०१८ रोजी यांनी वरील आरोपींना वीज चोरी करताना रंगेहाथ पकडले होते. आरोपींच्या विरोधात भारतीय विदुयत कायद्यानुसार गुन्हा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तपास करून सदर प्रकरण दारव्हा न्यायालयात न्यायप्रविष्ट करण्यात आले. सुनावणी दरम्यान न्यालयाने ५ साक्षीदार तपासले. साक्षीदारांची साक्ष ग्राह्य धरून न्यायाधीश अ. के. लाहोटी यांनी ३ महिने कारावास आणि ३ हजार रुपयाने दंडाची शिक्षा आरोपींना सुनावली. या खटल्यात सरकारकडून अंकुश देशमुख यांनी बाजू मांडली.