जर तुम्ही चंद्रपुरात राहत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे.कारण चंद्रपूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत नागरिकांच्या जीवाशी खेळ-करण्यात येत असल्याचा विडीओतून समोर आला आहे. चंद्रपूर येथील दाताळा रोडवर कृषी उत्पन्न बाजार समिती(भाजीपाला मार्केट)म्हणून ओळखल्या जातो. येथे जिल्हाभरातून व जिल्ह्याच्या बाहेरून भाजीपाला विक्रीसाठी उपलब्ध होतो.अश्यातच मंगळवारी बाजार सामितीतला एक विडीओ सोशल मिडीयावर चांगलाच गाजला. ज्यात भाजीपाला विक्रेता साचलेल्या सांड पाण्यात सांबार धुत असल्याचे दिसत आहे. हे भाजी विक्रेता १ नव्हे २ नव्हे तर ५ व्यक्ती हे या दुषित पाण्यात हा सांबार धुतांना दिसले.यात एकाने तर चक्क पत्नीला आज भाजीत सांबार न टाकण्याचे सूचना देणार असल्याचे म्हटले आहे.
विशेष म्हणजे हा सर्व प्रकार बाजार समितीत असलेल्या शौचालयासमोर साठलेल्या दुषित गडूळ पाण्यात भाजीपाला धुतला जात असून तो नागरिकांना जेवणात वापरण्या करिता विकला जात असल्याचे निदर्शनात आले.
बाजार समितीत भाजीपाला स्वच्छ करण्याकरिता टाके देण्यात आले आहे.मात्र काही भाजीपाला विक्रेत्यांच्या कामगारांनी त्या ठिकाणी भाजी न धुता साचलेल्या सांड पाण्यात भाजीपाला धुतला. या गंभीर प्रकाराबाबद बाजार समितीचे सभापती दिनेश चोखारे यांना विचारणा केली असता दोषींवर संपूर्ण चौकशी करून त्या व्यापाऱ्याचा परवाना काही दिवसांकरिता रद्द करण्यात येणार असल्याची माहिती चोखारे यांनी काव्यशिल्पशी बोलतांना दिली. विक्रेत्यांच्या अश्या या व्यवहारामुळे चंद्रपूरकरांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.