इको-प्रो, संयुक्त वनव्यवस्थापन समीती चा उपक्रम
चंद्रपूर/प्रतिनिधी:
आज जागतीक व्याघ्र दिनानिमीत्त जंगलव्याप्त जुनोना गावात इको-प्रो व संयुक्त वनव्यवस्थापन समीती, जुनोना च्या माध्यमाने गावात रॅली काढुन जनजागृती करण्यात आली.
इको-प्रो वन्यजीव विभाग, इको-प्रो जुनोना शाखा व संयुक्त वनव्यवस्थापन समीती च्या वतीने आज जागतीक व्याघ्र दिनाचे औचित्य साधुन शाळकरी विदयाथ्र्यासोबत गावातुन जनजागृती रॅली काढण्यात आली. तसेच ग्रामंपयाच भवन येथे कार्यक्रमातुन उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी जुनोना ग्रामपंचायतीच्या संरपचा मालतीताई कुळमेथे, बंडु धोतरे, इको-प्रो चे अध्यक्ष तथा मानद वन्यजीव रक्षक शाम पेटकुले, अध्यक्ष संयुक्त वनव्यवस्थापन समीती, विजय विमलवार, वनरक्षक प्रामुख्याने उपस्थित होते.
गावातील शाळकरी विदयार्थी यांना सोबत घेऊन इको-प्रो संस्थेचे कार्यकर्ते व जुनोना संयुक्त वनव्यवस्थापन समीतीचे सदस्य यांनी गावातुन जनजागृती रॅली काढली. विदयाथ्र्याच्या ‘वाघ वाचवा, जंगल वाचवा’ च्या घोषणा आणी वाघाचे ड्रेस परिधान केल्याने गावातील नागरीकांचे लक्ष वेधुन घेत होते. हे पाहुन बरेच छोटे मुले-विदयार्थी सुध्दा या रॅलीत सहभागी झाले. रॅली नंतर जुनोना ग्रामपंचायत मध्ये छोटेखाणी कार्यक्रमातुन जनजागृती बाबत बंडु धोतरे, मानद वन्यजीव रक्षक यांनी आजच्या दिवसाचे महत्व सांगत जिल्हयातील वाघ-मानव संघर्षाची कारणे व उपाययोजना म्हणुन आपण काय करावे, काय करू नये याबाबत माहीती दिली. तसेच पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने वाघाचे महत्व विषद करीत वाघ-मानव संघर्ष टाळण्याच्या दृष्टीने सर्व पातळीवरून कार्य करण्याची गरज विषद केली. सोबतच भविष्यात ग्रामपंचायत, संयुक्त वनव्यवस्थापन समीती व इको-प्रो जुनोना शाखा मिळुन गांव विकासासाठी, वन-वन्यजीव संरक्षणसाठी, गांव स्वच्छतेसाठी, निसर्ग पर्यटन विकास या दृष्टीने काम करण्याची संधी असुन सर्वानी एकत्रीत येत कशा पध्दतीने गावासाठी कार्य करता येईल याची माहीती दिली.
यावेळी संयुक्त वनव्यवस्थापन समीतीचे सदस्य सुभाष टिकेदार, सविता वेलादी, मायाबाई बोरूले, मीनाताई मुदद्लकर. इको-प्रो जुनोना शाखाचे सदस्य किशोर पेटकुले, गुरूदास भोयर, शैलेश मुडपल्लीवार, अनिकेत जेगठें, प्रशांत मांढरे, सोनाली पेंदाम, दिनेश कन्नाके, संजय वाढई तसेच चंद्रपूर इको-प्रो पदाधिकारी बिमल शहा, राजु काहीलकर, हरीश मेश्राम, सुधीर देव, सुनिल लिपटे, वैभव मडावी, आशिष मस्के, अतुल राखंुडे, आयुषी मुल्लेवार, सारीका वाकुडकर उपस्थित होते.