जागतिक व्याघ्र दिनानिम्त्ति चंद्रपूर-मूल मार्ग, महापालिका व वन नाक्याजवळ सामाजिक संस्थेंकडून ग्रीन प्लानेट सोसायटी व सार्ड संस्थेच्या वतीने ‘वाघ व वन्यजीव वाचवा’ असे संदेश देणारी पत्रके वाटण्यात आली. यावेळी संस्था अध्यक्ष प्रा. सुरेश चोपणे, सार्ड संस्थेचे अध्यक्ष प्रकाश कामडे, प्रा. डॉ.योगेश दुधपचारे, प्रा सचिन वझलवार,दिनेश खाटे,भाविक येरगुडे, विलास माथनकर, स्वप्नील राजूरकर,नितीन मत्ते, प्रवीण राळे,महेंद्र राळे, कमलेश व्यवहारे,संदीप वडते, संचिता मत्ते आदी उपस्थित होते. वनातून जाणाºया महामार्गावर उपाय योजना करण्याची कार्यकर्त्यांनी केली.जंगल मार्गावर अंडर पासेस व गतिरोधक नसल्याने वाघ आणि वन्यजीवांचे अपघाती मृत्यू होत आहेत.त्यामुळे जनजागृतीसाठी सामाजिक संस्थांनी हे पाउल उचलले आहे.
Showing posts with label ग्रीन. Show all posts
Showing posts with label ग्रीन. Show all posts