काव्यशिल्प Digital Media: टाळे

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu
Showing posts with label टाळे. Show all posts
Showing posts with label टाळे. Show all posts

Thursday, February 22, 2018

शासनाने टाळे ठोकलेल्या जिल्हा परीषद शाळाचे कुलूप गावकऱ्यानी तोडले;अन् केली शाळा सुरु

शासनाने टाळे ठोकलेल्या जिल्हा परीषद शाळाचे कुलूप गावकऱ्यानी तोडले;अन् केली शाळा सुरु

शासनाने बंद केलेल्या शाळेचे कुलूप तोडतांना गावकरी व विध्यार्थी
ब्रम्हपुरी /प्रतिनिधी:  शासनाने राज्यभरातील जिल्हा परिषदेच्या १३१४ शाळा गुणवत्ता व कमी पटसंख्येच्या कारणाने बंद करण्याचा निर्णय घेतला होता , या निर्णयाला विविध स्तरातून विरोध होत असतांना मात्र दुसरीकडे शासनाचे अश्या शाळांना टाळे ठोकण्याचे काम केले ब्रम्हपुरी तालुक्यातील झिलबोडी - परसोडी या गटग्राम पंचायत अंतर्गत परसोडी गावातील हि  शाळा देखील  शासनाने बंद केली ,शासन व अधिकाऱ्यांच्या या अफलातून निर्णयाने शाळा बंद झाली तेव्हा पासून गावकऱ्यांत मोठा रोष निर्माण झाला होता.मात्र या शाळेचे कुलूप आता गावकर्यांनीच तोडून गावातील विध्यार्थ्यांना हि शाळा सुरु करून देण्यात आली आहे. शाळा बंदल्यानंतर शाळेतील मुलांना झिलबोडीला येथे जाऊन शिक्षण घ्यावे,असे सांगण्यात आले होते.शाळा बंद होणार हे माहित होताच गावातील सुजन शिक्षित नागरिक व विद्यार्थ्यांनी शासन दरबारी निवेदने देण्यात आली, पञकार परिषद घेण्यात आली, विविध शिक्षणप्रेमींनी आंदोलने केली परंतु शासनाला जाग आली नाही.
प्रत्येक बालकाला प्राथमिक शिक्षण सक्तीचे करण्यात असतांना देखील शासनाने हि शाळा बंद केली मात्र 
खेड्यात आजही शिक्षणासाठी लागणाऱ्या परिपूर्ण सोयी नसल्याने आमचे चिमुकली दुस-या गावी शिकणार तरी कशी? असा प्रश्न गावकर्यांनी उपस्थित केला. आंम्ही दुसरीकडे जाणार नाही, असा सूर देत ग्रामवासियांचा उद्रेक झाला अन् गावक-यांनीच शाळेचे  कुलूप तोडले. ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रातील फक्त परसोडी या गावातिलच शाळा हि शासनाने बंद केली होती. ता यावेळी शिक्षणप्रेमी अॅड.गोविंदराव भेंडारकर,विनोद झोडगे,मंदा तुपट, देवकन्याताई लांडेकर ग्रा. प.सदस्या,नामदेव दमके,प्रेमलाल मेश्राम,वामन मंडपे,नारायण खरकाटे,भिवाजी खरकाटे, हिरालाल तुपट,लक्ष्मण तुपट,दिलीप कार,मधुकर लांडेकर,किशोर खरकाटे,आशा गाडगे,वच्छला तुपट,शामलाल लोखंडे,रघुनाथ लांडेकर,आशा कार आदी गावकरी मंडळींनी सहकार्य केले.