काव्यशिल्प Digital Media: स्केटिंंग

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu
Showing posts with label स्केटिंंग. Show all posts
Showing posts with label स्केटिंंग. Show all posts

Thursday, November 09, 2017

शिशिर कामडी जगात टॉप 100मध्ये

शिशिर कामडी जगात टॉप 100मध्ये

 चंद्रपूर/प्रतिनिधी : अवघ्या साडेसहा वर्षांच्या वयात अनेक कीर्तिमान आपल्या नावे करणाऱ्या चंद्रपुरातील शिशिर ऊर्फ ध्रुव सुभाष कामडी या स्केटिंंगच्या चिमुकल्या बादशहाने आणखी एक गगनभरारी घेतली आहे. वर्ल्ड रेकॉर्ड युनियन बुकने त्याची दखल घेतली असून, जागतिक पातळीवरील पहिल्या १०० रेकॉर्डमध्ये ध्रुवची नोंद झाली आहे.

ध्रुवचा हा गौरव सहा देशांच्या रेकॉर्ड बुकच्या मुख्य संपादकांच्या हस्ते येत्या १२ नोव्हेंबरला दिल्लीतील सिरी फोर्ट आॅडिटोरियम येथे एका सोहळ्यात केला जाणार आहेत. याप्रसंगी जागतिक पातळीवरील शंभर रेकॉर्ड होल्डरला प्रमाणपत्र वितरीत करण्यात येणार आहेत. मास्टर शिशिर ऊर्फ ध्रुवची वर्ल्ड रेकॉर्ड युनियन बुकमध्ये नोंद झाली असून त्याचे नाव व रेकॉर्ड २०१८ च्या बुकमध्ये प्रकाशित होणार आहे. दरम्यान, त्याला मेडिकल ट्रेनिंगसुद्धा दिले जाणार आहे.