সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Monday, December 28, 2015

वाघाच्या हल्ल्यात महिला ठार

वाघाच्या हल्ल्यात महिला ठार

मेहा जंगलातील घटना

सावली ः सरपण गोळा करण्यासाठी जंगलात गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला करून ठार केले. ही घटना सोमवारी (दि. 28) दुपारी एकच्या सुमारास पाथरी उपक्षेत्रातील मेहा बुजरुक बिटात घडली. मृताचे नाव शांताबाई गिरिधर भोयर (वय 40) असे आहे.
गावातील 10 ते 12 जण सकाळी गावालगतच्या जंगलात सरपण गोळा करण्यासाठी गेले होते. मेहा बिटातील कक्ष क्रमांक 159 येथे सरपण सरपण गोळा करीत असतानाच वाघाने हल्ला चढविला. यात शांताबाई भोयर यांना प्रथम लक्ष्य केले. घटनास्थळापासून जवळपास पाचशे मीटर त्यांना ओढत नेले. यावेळी सोबत असलेल्या आत्राम नामक एका महिलेवर हल्ला केला. यात ती जखमी झाली. घाबरलेल्या अन्य सहकाऱ्यांनी गावात पळ काढून घटनेची माहिती दिली. गावातील नागरिकांनी वन कर्मचाऱ्यांना कळवून शोध घेतला. तेव्हा शांताबाई ही मृतावस्थेत, तर आत्राम जखमी होती. येथील जंगलात पाच ते सात वाघांचे वास्तव्य आहे. गेल्या 10 वर्षात गावातील शेकडो जनावरे वाघाने मारली. मानवावर हल्ला करण्याची ही पहिलीच घटना आहे. यापूर्वी वाघाने गावात येवून जनावरांची शिकार केली होती. शिवाय शेतशिवारात वाघाच्या एका बछड्याचा मृत्यूही झाला होता.

थंडी आणि दूध न मिळाल्याने चंद्रपुरातील बछड्यांचा मृत्यू

थंडी आणि दूध न मिळाल्याने चंद्रपुरातील बछड्यांचा मृत्यू

चंद्रपूर : चंद्रपुरातल्या सावली तालुक्यात वाघाच्या चार बछड्यांचा मृत्यू थंडी आणि दूध न मिळाल्याने झाल्याचं समोर आलं आहे. चारपैकी दोन बछड्यांच्या पोस्टमॉर्टेम अहवालातून हे निष्पन्न झालं आहे. त्यामुळे इतर दोन बछड्यांचा अंतही आईची ऊब आणि उपासमारीमुळे झाल्याचं म्हटलं जात आहे.
 सावलीतल्या नवेगाव मार्गावर फिरायला गेलेल्या लोकांना शनिवारी ही चार वाघांची पिल्लं मृतावस्थेत आढळून आली. याची माहिती वनविभागाला दिल्यानंतर सुरुवातीला हद्दीवरुन वनविभाग कर्मचाऱ्यांनी हात झटकण्याचेही प्रयत्न केले. परंतु मोठा गाजावाजा करुन सुरु झालेल्या व्याघ्र मोहीमेला या घटनेने धक्का बसला आहे.
तालुक्यात झालेल्या वाघाच्या 4 बछड्यांच्या मृत्यूचं गूढ कायम आहे. वन अधिकाऱ्यांच्या मते भुकेपोटी या चारही बछड्यांचा अंत झाला आहे, तर वाघिणीची शिकार होऊन आईपासून ताटातूट झाल्यानं या पिल्लांचा मृत्यू झाल्याचा दावा प्राणीप्रेमी करत आहेत.  
मात्र या प्रकारामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या बछड्यांची आई म्हणजेच वाघिण कुठे आहे? तिची शिकार झाली का? या भागात चार बछड्यांना जन्म दिलेली वाघिण आहे, याची माहिती वनखात्याला नव्हती का?
दरम्यान या मृत्यूप्रकरणी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

Saturday, December 19, 2015

सेंद्रिय शेतीसाठी 65 कोटी रुपयांची तरतूद

सेंद्रिय शेतीसाठी 65 कोटी रुपयांची तरतूद


नागपूर, दि. 18 डिसेंबर :-राज्यात सेंद्रिय शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या हेतुने राज्य शासनाने 65 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. पन्नास शेतकरी एकत्र येऊन समुहाने सेंद्रिय शेती करणार असल्यास त्यांना शासनाचे प्रोत्साहन राहील. आवश्यकता भासल्यास या 65 कोटी रुपयांच्या तरतुदीमध्ये आणखी वाढ करण्याचा शासनाचा प्रयत्न राहील, असे कृषी मंत्री एकनाथराव खडसे यांनी आज विधान परिषदेत सांगितले. ‍
नझुल भूखंड धारकांना मालकी हक्क

नझुल भूखंड धारकांना मालकी हक्क

नागपूर, दि. 18 डिसेंबर :- विदर्भातील नझुल भूखंड धारकांना त्यांच्या भूखंडाचेसंपूर्ण मालकी हक्क देण्याबाबत या भूखंड धारकांकडून शासनाससातत्याने विनंती करण्यात येत होती. त्यामुळे आतालिलावाव्दारे किंवा अन्य प्रकारे भाडेतत्वावर दिलेल्या नझुलजमिनी फ्री होल्ड (भोगवटादार वर्ग-1) करण्यासंदर्भात सर्वंकषअभ्यास करुन शासनास शिफारस करण्यासाठी प्रधान सचिव(महसूल) यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात येतआहे. या समितीमध्ये वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्यसचिवांनी नामनिर्देशित केलेले प्रधान सचिव अथवा सचिवदर्जाचे अधिकारी, नागपूर व अमरावतीचे विभागीय आयुक्त हेसदस्य असतील. तर महसूल व वन विभागाचे उप सचिव हेसदस्य सचिव असतील.

ही समिती लिलावाव्दारे किंवा अन्य प्रकारे भाडेतत्वावरदिलेल्या नझुल जमिनी फ्री होल्ड (भोगवटादार वर्ग-1) केल्यानेत्याचे राज्याच्या आर्थिक हितावर तसेच अन्य क्षेत्रात कोणतेदुर्गामी परिणाम होतील आणि या जमिनी फ्री होल्डकरण्यासंदर्भात सर्वंकष अभ्यास करील. या समितीने तीनमहिन्यात आपला अहवाल सादर करणे अपेक्षित आहे. येत्यामार्च अखेरपर्यंत समितीच्या अहवालावर निर्णय घेतला जाईल.

विदर्भातील नझुल जमिनीच्या भाडेपट्टयाचे दर
विद्यमान दराच्या एक पंचमांश होणार

Tuesday, December 08, 2015

आदिवासी अधिकाऱ्‍याला मिळाला न्याय.

आदिवासी अधिकाऱ्‍याला मिळाला न्याय.

एकनाथराव खडसे यांचेकडून
10 वर्षाची ससेहोलपट संपली

नागपूर, दि.8 डिसेंबर : स्वत:ची काही चूक नसतांना शासकीय अधिकाऱ्याच्या हलगर्जीपणामुळे अन्याय सहन करणाऱ्या राज्य शासनाच्या सेवेतील वरिष्ठ पदावरून सेवानिवृत्त झालेल्या बा.गो.तिरानकर या आदिवासी अधिकाऱ्याला मा.राज्यपाल सी.विद्यासागर राव आणि कृषी व महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांनी नुकताच न्याय मिळवून दिला.

Friday, December 04, 2015

आयुक्तांच्या ‘हजेरी’साठी CCTV

आयुक्तांच्या ‘हजेरी’साठी CCTV

चंद्रपूरच्या नगरसेवकांची अनोखी शक्कल

चंद्रपूर : चंद्रपूर महापालिकेच्या आयुक्तांवर नजर ठेवण्यासाठी नगरसेवकांनी आयुक्तांच्या केबिनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा बसवला आहे. गेल्या काही दिवसांपासून चंद्रपूर महापालिकेचे आयुक्त सुधीर शंभरकर आणि पदाधिकारी यांच्यातला वाद विकोपाला गेला आहे.
आयुक्त गैरहजर राहतात, फाईल्स क्लिअर होत नाहीत, आयुक्त नगरसेवकांना भेटत नाहीत, असे आरोप करण्यात येत आहेत. यावरुन सर्वसाधारण सभेत गदारोळही माजला होता. यावेळी मी गैरहजर राहतो याचा तुमच्याकडे काय पुरावा आहे, असा प्रतिप्रश्न आयुक्तांनी नगरसेवकांना केला आहे. त्यावर उपाय म्हणून पालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी चक्क आयुक्तांच्या केबिनमध्येच सीसीटीव्ही कॅमेरा बसवला आहे विशेष म्हणजे सीसीटीव्हीचा सर्व खर्च नगरसेवकांनी स्वत:च्या खिशातून केला आहे.

Wednesday, December 02, 2015

 'इ-इंडिया' पुरस्काराने गौरव

'इ-इंडिया' पुरस्काराने गौरव

  • महापालिकेच्या 'स्मार्टभरती प्रक्रियेचा राष्ट्रीय स्तरावर गौरव
  • ऑनलाईन परीक्षेद्वारे ७१,८१६ उमेदवारांमधून करण्यात आली होती ९४२ कर्मचा-यांची निवड
  • राज्यातील १४ केंद्रांवर एकाच वेळी घेण्यात आली होती ऑनलाईन परीक्षा

बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे संपूर्णपणे ऑनलाईन पध्दतींचा वापर करीत राबविण्यात आलेल्या 'स्मार्ट'भरती प्रक्रियेला 'इ – इंडिया' या राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठेच्या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. कर्मचारी निवड प्रक्रियेसाठी संपूर्णपणे ऑनलाईन पध्दतीचा वापर करुन राबविण्यात आलेली 'स्मार्ट' भरती प्रक्रिया ही केवळ ०७ महिन्यात यशस्वीरीत्या व पारदर्शकपणे पूर्ण करणारी बृहन्मुंबई महानगरपालिका ही देशातील पहिलीच महापालिका ठरली आहे. याच वैशिष्टयपूर्ण बाबीची दखल आता राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली आहे. मुंबईतील ताज प्रेसिडेंट (विवांता) या तारांकित हॉटेलमध्ये नुकत्याच संपन्न झालेल्या 'इ – इंडिया' शिखर परिषदेच्या दिमाखदार सोहळ्यादरम्यान 'इ – इंडिया' या पुरस्काराने गौरविण्यात आल्याने महापालिकेच्या शिरपेचात मानाचा आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

१४ जिल्ह्यांमध्ये तात्काळ दारूबंदी जाहीर करा

१४ जिल्ह्यांमध्ये तात्काळ दारूबंदी जाहीर करा

यवतमाळ, १ डिसेंबर- बिहार सरकारने एप्रिल १६ पासून बिहारमध्ये संपूर्ण दारूबंदीची केलेली घोषणा हा एक क्रांतिकारी निर्णय ठरला आहे. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यानेही कोणतीही आर्थिक वा महसुली तुटीची चिंता न करता शेतकरी आत्महत्याग्रस्त विदर्भ व मराठवाड्याच्या १४ जिल्ह्यांमध्ये तात्काळ दारूबंदी जाहीर करावी, अशी मागणी शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी मुख्यमंत्री व कृषी मंत्री यांना एका निवेदनाद्वारे केली आहे.
महाराष्ट्र सरकारने शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी स्थापन केलेल्या वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष व यवतमाळ जिल्ह्यात दारूबंदी करण्यात यावी, यासाठी २०१० पासून सतत जनआंदोलन करणारे किशोर तिवारी यांनी ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय आणि राणी बंग यांच्या जाहीर मागणीचा दाखला दिला आहे. आपण मागील दोन वर्षांत ग्रामीण भागात जनतेच्या भावनांचा अभ्यास केल्यावर अडचणीत असलेल्या शेतकर्‍यांना समाज व सरकारशी संवाद न होण्यासाठी दारू हेच प्रमुख असल्याचे सत्य समोर आले आहे, असे तिवारी यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.
शेतकरी आत्महत्याग्रस्त विदर्भ व मराठवाड्याचा १४ जिल्ह्यातील महिलांनी आपल्या बळावर काही खेड्यांमध्ये दारूबंदी केली आहे. मात्र तालुक्याच्या ठिकाणी व लगतच्या मोठ्या गावात सरकारी दारूच्या दुकानामुळे ही खेड्यातील दारूबंदी कुचकामी ठरली आहे. या दारूच्या महापुराला सरकारी अधिकारी, पोलिस व अबकारी विभागाचे ‘जास्तीत जास्त दारू विका आणि सरकारला महसूल द्या’ हे धोरणच जबाबदार असल्याची टीकासुद्धा त्यांनी केली आहे.
सरकारच्या तिजोरीला जर या दारूबंदीमुळे तोटा होत असेल तर सरकारने दारूमुक्ती कर सुरू करावा, अशी सूचनाही किशोर तिवारी यांनी केली आहे. महाराष्ट्राच्या समतोल प्रादेशिक विकासाच्या प्रश्‍नांवरील अभ्यासासाठी नेमलेल्या डॉ. विजय केळकर उच्चस्तर समितीच्या अहवालातसुद्धा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये तात्काळ दारूबंदीची शिफारस केली आहे. ग्रामीण भागातील प्रचंड अडचणी, आर्थिक संकट व अभूतपूर्व कृषी संकट यावर केळकर समितीने दारूबंदीचा प्रस्ताव सरकारला दिला असल्याची आठवणही त्यांनी करून दिली आहे.
३० जानेवारी २०११ ला यवतमाळ जिल्ह्यातील हजारो महिलांनी जिल्ह्यात संपूर्ण दारूबंदीसाठी पांढरकवडा येथे मेळावा आणि २०१२ मध्ये मार्च महिन्यात यवतमाळ येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देऊन आपली मागणी रेटून धरली होती. तत्कालीन जिल्हाधिकारी संजय देशमुख यांनीही यवतमाळ जिल्ह्यात दारूबंदीची शिफारस केली होती. त्यामुळे शासनाने यवतमाळ जिल्ह्यात मद्यविक्री व मद्यपान यावर बंदी घालण्याचे धोरण स्वीकारले पाहिजे, अशी अपेक्षा तिवारी यांनी व्यक्त केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विरोधी पक्षात असताना जिल्ह्यात संपूर्ण दारूबंदीच्या मागणीला पाठिंबा दिला होता. आता तात्काळ संपूर्ण दारूबंदी लागू करावी, अशी विनंती किशोर तिवारी यांनी केली आहे.
यवतमाळ जिल्ह्यात महिलांनी संपूर्ण दारूबंदीसाठी आंदोलन सुरू केले आहे. महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनीदेखील यवतमाळ व बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये दारूबंदी करण्याचे सूतोवाच केले आहे. त्यामुळे सरकारने वर्धा, चंद्रपूर व गडचिरोली येथील दारूबंदीच्या धर्तीवर दारूबंदी करणे गरजेचे झाले आहे.
तरुण पिढीत व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढत आहे. मुले दारूच्या आहारी जात आहेत. दारूमुळे सुखी संसाराची राखरांगोळी होत आहे. सहज उपलब्ध होणारी कमी पैशातील दारू हे यामागील प्रमुख कारण आहे. लगतच्या दारूबंदी असलेल्या जिल्ह्यांमध्ये सरकारी यंत्रणेच्या आशीर्वादाने वाहात असलेल्या दारूच्या महापुराचा अनुभव लक्षात घेता, केरळप्रमाणे सर्व पक्ष, सर्व धर्म व सरकार यांच्या सहकार्याने संपूर्ण राज्यात दारूबंदी करणे काळाची गरज झाली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
पोलिस व प्रशासनाने संरक्षण दिल्याने गावागावात दारूच्या भट्ट्या पेटविल्या जात आहेत. या दारूच्या विरोधात गावागावातील महिलांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. परंतु ज्यांनी कारवाई करायची त्यांचेच छुपे पाठबळ असल्याने न्याय कुणाकडे मागावा, असा प्रश्‍न महिलांपुढे निर्माण झाला आहे. अखेर या महिला रस्त्यावर उतरल्या आहेत. त्यांनी जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक कार्यालयावर मोर्चे काढले आहेत. काही ठिकाणी तर महिलांनी स्वत:च दारूच्या भट्‌ट्या नेस्तनाबूत केल्या आहेत. दारूचे हे साहित्य ट्रॅक्टरमध्ये टाकून जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयावर धडकही दिली आहे.
दारूविरुद्ध आंदोलन करणार्‍या या महिलांना दारू माफियांकडून धमक्याही दिल्या जात आहेत. काही ठिकाणी तर महिलांवर हल्लेही केले गेले आहेत. ही शोकांतिका किशोर तिवारी यांनी आपल्या निवेदनातून मुख्यमंत्र्यांसमोर मांडली आहे.
५ हजार पोलिसांचा ताफा

५ हजार पोलिसांचा ताफा

हिवाळी अधिवेेशन

नागपूर, - ७ डिसेंबरपासून सुरू होणार्‍या हिवाळी अधिवेशनासाठी संपूर्ण राज्यातून पोलिस बोलविण्यात आले असून ५ हजार पोलिस अधिकारी आणि शिपायांचा ताफा तैनात करण्यात येणार आहे.
या बंदोबस्तासाठी बाहेरून २ अप्पर पोलिस आयुक्त, १५ पोलिस अधीक्षक, २९ सहायक पोलिस आयुक्त, ७५ पुरुष पोलिस निरीक्षक, १० महिला पोलिस निरीक्षक, ३०० फौजदार, ७० महिला फौजदार, २७०० पुरुष शिपाई आणि ५०० महिला शिपाई येणार आहेत. यांच्या मदतीला गृहरक्षक दलाचे १२०० जवान, राज्य राखीव बलाच्या ६ कंपन्या, फोर्स वनची तुकडी राहणार आहे. याशिवाय शहरातील २ ते २५०० अधिकारी आणि शिपायांना तैनात करण्यात येणार आहे.
वरिष्ठ अधिकार्‍यांची वीज मंडळ, केंद्रीय राखीव पोलिस बल, कृषिकुंज येथील विश्रामगृहात राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सहायक पोलिस आयुक्तांची अमरावती मार्गावरील निंबूवर्गीय वसतिगृह, सातपुडा, वेणा, ओराई प्रशिक्षण केंद्र येथे व्यवस्था करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षकांची राष्ट्रीय अग्निशमन दलाच्या वसतिगृहात व्यवस्था केली आहे. बंदोबस्ताला आलेल्या महिलांना मानकापूर येथील क्रीडा संकुलात थांबविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे शिपायांसाठी २७ मंगल कार्यालये बुक करण्यात आली आहेत. प्रत्येक मंगल कार्यालयात ५० ते ७५ शिपायांना थांबविण्यात येणार आहे. बंदोबस्ताला येणार्‍या पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांच्या मूलभूत गरजा लक्षात घेता ही व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे ४५० वाहनांची मागणी करण्यात आली असून अजूनपर्यंत वाहने मिळाली नाहीत. परंतु, दोन-तीन दिवसात ही वाहने मिळतील अशी आशा आहे.
पोलिस कर्मचार्‍यांना ४० रुपयात जेवण मिळावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी काही कंत्राटदारांशी बोलणी करून त्यांना जेवणाचे कंत्राट दिले आहेत. बंदोबस्ताला जाणार्‍या आणि बंदोबस्ताहून येणार्‍या कर्मचार्‍यांना हे कंत्राटदार जेवणाचे पाकिटे देणार आहेत. त्याचप्रमाणे त्यांना आंघोळीसाठी गरम पाणी आणि शौचालयाची देखील व्यवस्था करण्यात आली आहे. थंडीचे दिवस असल्याने कर्मचार्‍यांना गादी, उशी, चादरी आणि ब्लँकेट देण्यात येणार आहेत. बंदोबस्ताला येणार्‍या कुणाही कर्मचार्‍यांची गैरसोय होऊ नये यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.
दरवर्षीप्रमाणेच यंदाही शहरातील ५ मोर्चे पॉईंट ठेवण्यात आले आहेत. मोर्चेकर्‍यांनी काही गडबड करू नये यासाठी खाजगी गणवेशात पोलिसांना तैनात करून मोर्चेकर्‍यांवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. याशिवाय मोर्चास्थळी सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा बसविण्यात येणार आहेत.
मागील वर्षी शेवटच्या दिवसापर्यंत ९९ मोर्चे विधानभवनावर काढण्यात आले होते. आतापर्यंत १८ संघटनांनी मोर्चाची परवानगी मागितली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी कॉंग्रेस आणि आदिवासींचे मोर्चे विधानभवनावर धडकणार आहेत. याशिवाय अपंग, अंगणवाडी, विना अनुदानित शाळा, शिक्षक, मजदूर, झोपडपट्टीधारक, रॉकेल विक्रेते यांचेही मोर्चे विधानभवनावर धडकणार आहेत.

Tuesday, December 01, 2015

 सावलीत काँग्रेस, चिमूर, पोंभुर्ण्यात भाजपचे नगराध्यक्ष

सावलीत काँग्रेस, चिमूर, पोंभुर्ण्यात भाजपचे नगराध्यक्ष




चंद्रपूर, ता.३०: जिल्हयातील तीन नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी आज पार पडलेल्या निवडणुकीत काँग्रेसला एक, तर भाजपला दोन ठिकाणी सत्ता मिळाली.
सावली नगरपंचायतीच्या निवडणुकीत १० जागा जिंकून काँग्रेस सर्वांत मोठा पक्ष ठरला होता. तेथे राष्ट्रवादीला ५, तर बसपा व अपक्षास प्रत्येकी एक जागा मिळाली होती. पोंभुर्ण्यात भाजपने १० जागा जिंकून सर्वांना चीत केले होते.चिमूर नगरपंचायतीत भाजपला ६ जागेवर विजय संपादन करता आला होता. काँग्रेसला ५ , शिवसेना २ तर अपक्षांना ४ जागा मिळाल्या होत्या.
भारतीय क्रिकेटर चेतेश्वर पुजारा व अजिंक्य रहाणे यांनी आपल्या परिवारासह नुकतीच ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला भेट देऊन जंगल सफारीचा आनंद लुटला, तो क्षण