येथील वेकोलिच्या ब्लॉक क्र. ३ मधील क्वार्टर नं. ६३/१ ची मागची बाजू शुक्रवारी अचानक कोसळली. सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास सुदैवाने क्वाटर्रमध्ये कुणीच नसल्यामुळे मोठी जीवित हाणी टळली. ब्लॉक ६३ मधील केशव सातपुते हे या क्वार्टरमध्ये राहतात. मात्र घटनेच्या दिवशी घरातील सर्व जण बाहेर होते. यापूर्वीही १३ जुलैच्या रात्री ब्लॉक ७१ मधील क्वार्टर नं.७१/१ अशाच पद्धतीने कोसळले.मायनर्स क्वाटर्सची वस्ती ही खूप जुनी असून याकडे व्यवस्थापनाचे दुर्लक्ष होत असल्ल्याने क्वार्टर कोसळण्याच्या घटना घडत आहेत.मायनर्स क्वाटर्स मधील ब्लॉक ५५ सोबतच इतरही ब्लॉक जीर्ण अवस्थेत आहेत. त्यामुळे मोठी जीवित हाणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे क्वाटर्सच्या दुरूस्तीचे काम त्वरीत सुरू करण्याची मागणी अलर्टनेट वेलफेअर बोर्डाचे सदस्य लोमेश लाडे व कल्याण समिती सदस्य रामचंद्र यादव यांनी केली आहे.
Showing posts with label कोसळले. Show all posts
Showing posts with label कोसळले. Show all posts