काव्यशिल्प Digital Media: OBC

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu
Showing posts with label OBC. Show all posts
Showing posts with label OBC. Show all posts

Saturday, June 09, 2018

ओ.बी.सी.युवक व युवती यांना स्वयंरोजगाराकरीता कर्ज योजना

ओ.बी.सी.युवक व युवती यांना स्वयंरोजगाराकरीता कर्ज योजना

मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ साठी इमेज परिणामचंद्रपूर/प्रतिनिधी:
 चंद्रपूर जिल्हयातील महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत ओ.बी.सी. प्रवर्गातील युवक व युवतीकरिता स्वयंरोजगाराच्या माध्यमातून कृषी व संलग्न व्यवसाय, लघु उद्योग, वाहतुक क्षेत्राशी संबधीत व्यवसाय,तांत्रिक व्यवसाय, अथवा सेवा उद्योग सुरु करण्यासाठी स्थानिक राष्ट्रीयकृत बॅक व महामंडळ यांच्या संयुक्त माध्यमातून 20 टक्के बिज भांडवल योजना सुरु केला आहे. 
तसेच किरकोळ व्यवसाय अथवा अन्य तांत्रिक लघु सेवा उद्योग सुरु करण्यासाठी महामंडळाची 25 हजार रुपयाची थेट कर्ज योजना सुरु केली आहे. त्या योजनामध्ये 20 टक्के व्याज दराने परतफेडीचा कालावधी 3 वर्षे आहे.तरी सर्व मागासवर्गीय (ओ.बी.सी.ना ) व इतर इच्छूकांनी सदर योजनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ,चंद्रपूर यांनी कळविले आहे.अधिक माहितीसाठी खालील पत्यावर संपर्क साधावा. महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन जलनगर चंद्रपूर येथे संपर्क साधावा असे,जिल्हा व्यवस्थापक यांनी कळविले आहे.

Friday, June 08, 2018

ओबीसींनी अधिकारासाठी सज्ज व्हावे

ओबीसींनी अधिकारासाठी सज्ज व्हावे

 OBCs should be ready for power | ओबीसींनी अधिकारासाठी सज्ज व्हावेचिमूर/प्रतिनिधी:
जात वैधता प्रमाणपत्राचा प्रश्न हा मोठा गंभीर स्वरूपाचा आहे़ त्यामुळे वंचित समाजातील विद्यार्थी व नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात घेत असताना अडचणी वाढल्या़ त्याकरीता हा प्रश्न लवकरच निकाली काढण्याकरिता प्रयत्न करीत आहोत. ओबीसींना आरक्षण व संविधानिक अधिकार मिळविण्यास आता सज्ज झाले पाहिजे, असे मत सामाजिक चळवळींचे अभ्यासक व आंबेडकराईट पार्टी आॅफ इंडियाचे अध्यक्ष विजय मानकर यांनी व्यक्त केले़स्थानिक आदर्श विद्यालयाच्या प्रांगणात झालेल्या जनसभा व मुलनिवासी आदिवासी संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
यावेळी प्रा. संजय पिठाडे, शोभा भोयर, अर्जुन कारमेंगे, डॉ. भगवान कारमेंगे, प्रा. नंदकिशोर रंगारी, अ‍ॅड. त्रिशिल खोब्रागडे, राजु वाघमारे, प्रा. आर. एम. पाटील उपस्थित होते.माजी आमदार वरखेडे यांनी गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी क्षेत्रात ५ वी अनुसूची, पेसा कायदा १९६५ व वनहक्क अधिनियम यावर सुरू असलेल्या कार्याची मांडणी केली़ प्रा. डॉ. नन्नावरे, भोयर, प्रा. पिठाडे यांनीही बहुजन समाजाच्या विविध प्रश्नांवर मार्गदर्शन केले़
संचालन डी. एम. नन्नावरे यांनी केले. आभार मोहन दोडके यांनी मानले. यावेळी प्रा. अनिल दडमल, प्रा. ज्ञानेश्वर जांभुळे, नथ्थू मानकर, धनंजय दडमल, आशिष नगराळे, पाटील, विद्या गणवीर, भारती दोडके, नागदेवते व तालुक्यातील नागरिक उपस्थित होते.