काव्यशिल्प Digital Media: कोरेगाव

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu
Showing posts with label कोरेगाव. Show all posts
Showing posts with label कोरेगाव. Show all posts

Saturday, January 13, 2018

भीमा कोरेगाव प्रकरणाचा सावलीत पडसाद

भीमा कोरेगाव प्रकरणाचा सावलीत पडसाद

प्रतिनिधी / सावली:

महाराष्ट्रातील भीमा कोरेगाव येथील शौर्यस्तंभाला मानवंदना देण्यासाठीगेलेल्या लोकांवर अचानक काही सजाजकंटकाव्दारे हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात अनेकांचा जीव गेला. हजारों लोक जखमी झाले. त्यामुळे बौध्द बांधवांच्या भावना दुखावल्या. हल्लोखरांवर कारवाईकरा अशी ठिणगी महाराष्ट्रभर पसरली. अनेक ठिकाणी निषेध मोर्चे काढण्यात आले.याचाच एक भाग म्हणून सावलीत सुध्दा महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. हा महामोर्चा खादी कार्यालयापासून सुरूवात होऊन गावाला वळसा देत चंद्रपूर -गडचिरोली या राष्ट्रीय महामार्गाने तहसील कार्यालयावर पोहचला.
                                                    महामोर्चाचे रूपांतर निषेध सभेत करण्यात आले.  त्यानंतर शिष्टमंडळाच्या माध्यमातून तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.   भिमा कोरेगांव येथे १ जानेवारी १८१८ ला पेशवाईच्या होणार्‍या अन्यायाला कंटाळून पेशवाईविरूध्द बंड पुकारला. त्या वेळी महारांनी पेशव्यांना हरविले. त्यामुळे भिमा कोरेगांव येथे या स्मरणार्थ ब्रिटीशांनी शौर्यस्तंभ उभारला. महाराष्ट्र हा इतिहास लक्षात घेता भिमा कोरेगांवयेथे दरवर्षी महाराष्ट्रातील बौध्द अनुयायी लाखोंच्या संख्येने मानवंदना देण्यासाठी जात असतात. यंदाचे हे व्दिशतकीय वर्ष असल्याने लाखोंच्या संख्येने भिमा कोरेगांव येथे बौध्द अनुयायी गेले असता प्रस्थपितांनी या कार्यक्रमात हल्ला चढविला होता. त्यामुळे अनेकांचा बळी गेला.तर हजारो जखमी झाले. या हल्ल्याचा निषेध सर्वत्र करण्यात आला. सावली महामोर्चाचे आयोजन निषेध नोंदविण्यासाठी करण्यात आले होते. मोर्चाचा समारोप तहसीलदारांना निवेदन देवून करण्यात आला.यावेळी हजारोच्या संख्याने बौध्द बांधव उपस्थित होते.

Tuesday, January 02, 2018

भिमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ सर्वपक्षीयांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने - जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर

भिमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ सर्वपक्षीयांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने - जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर

चंद्रपूर/प्रतिनिधी:
भिमा कोरेगाव मध्ये झालेल्या घटनेच्या निषेधार्थ आज चंद्रपूर येथे सर्वपक्षीयांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. तसेच दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी असे निवेदन हि जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
भिमा कोरेगांव येथील विजयी स्तंभाला आणि वढू बुद्रुक येथील गोविंद गायकवाड यांच्या स्मारकास अभिवादन करण्यासाठी गेलेल्या दलितांवरील समाजकंटकांकडून करण्यात येत असलेली दगडफेक झाल्याने भिमा कोरेगाव गेलेले अनेक कार्यकर्ते जखमी झाले असून जवळपास १५० हून अधिक वाहनांची नासधूस झाली आहे. मागील अनेक वर्षापासून दरवर्षी १ जानेवारीला भिमा कोरेगांव येथील विजयी स्तंभास आणि छत्रपती संभाजी महाराजांचा अंत्यविधी केलेल्या गोविंद गायकवाड यांच्या स्मारकाला अभिवादन करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर दलित समाज जातो. मात्र या कालावधीत दलित समाजातील बांधवांवर कधीच हल्ला कोणी केला नाही की त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला नाही. मात्र डिसेंबर २०१७ मध्ये एका परदेशी प्रसार माध्यमातील वेबसाईटने भिमा कोरेगांवच्या इतिहासाची मोडतोड करून चुकीच्या पध्दतीने बातमी प्रसिध्द केली. ही बातमी मोठ्या प्रमाणावर सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याने पहिल्यांदाच समाजकंटकांकडून दलितांवर दगडफेक करत पळवून लावण्याचा प्रयत्न केला.
      अचानक दुपारी एकच्या दरम्यान भिमा कोरेगाव जवळच्या पार्किंग भागात दगडफेकीला सुरूवात झाली. इमारतीच्या गच्चीवरून समाजकंटक दगडफेक करून पळून जात होते त्यांना काही महिलाही अटकाव करण्यात पुढे आल्या की ते लोक लपुन पळून जात हीच स्थिती वढू गावातही होती. या घटनेत अनेक निष्पापांचा बळी गेला तसेच समाजकंटकांकडून दलितांवर दगडफेक करत पळवून लावण्याचा प्रयत्न केला.असे कृत्य करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी या करिता सर्वपक्षीयांनी  जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. तसेच दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी असे निवेदन हि जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.