काव्यशिल्प Digital Media: घुग्गुस

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu
Showing posts with label घुग्गुस. Show all posts
Showing posts with label घुग्गुस. Show all posts

Saturday, July 21, 2018

कुऱ्हाडीने वार करून सख्या भावानेच केली भावाची हत्या

कुऱ्हाडीने वार करून सख्या भावानेच केली भावाची हत्या

 ललित लांजेवार:
वारंवार होणाऱ्या भांडणातून चिडलेल्या लहान भावानेच सख्या मोठ्या भावाची कुऱ्हाडीने सपासप वार करून हत्या केल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस येथील नकोडा येथे शुक्रवारी घडली. 
बिसु शिवानंद शर्मा असे मृत व्यक्तीचे नाव असून आरोपी लहान भाऊ दिपक शिवानंद शर्मा याला घुग्गुस पोलिसांनी अटक केली आहे. मोठा भाऊ हा तापट,उर्मट,व गुंड प्रवृत्तीचा असल्याने मोठा भाऊ बिसु व लहान भाऊ दीपक यांच्यात नेहमी वाद व्हायचे,हा वाद जास्तच विकोपाला जात असे,शुक्रवारी देखील बिसुने दिपकशी भांडण केले व झोपी गेला.अश्यातच राग धरून असलेल्या लहान भाऊ दीपकने त्याला जीवनेशी मारण्याचा मनात कट रचला व बिसू गाढ झोपेत असतांना घरातील कुऱ्हाडीने त्याच्या डोक्यावर व मानेवर सपासप वार केले.
या हल्ल्यात बिसुचा जागीच मृत्यू झाला व दिपकने घरातून पळ काढला.घरचे इतर व्यक्ती कामानिमित्य बाहेर गेले होते ते घरात येताच बिसू रक्ताने माखलेला दिसताच आरडा ओरड करण्यात आली व यांची माहिती घुग्गुस पोलिसांना देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सत्यजित आमले हे आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा केला. तसेच आरोपीवर गुन्हा दाखल करुन आरोपीच्या शोधात पथक रवाना करण्यात आले.शेवटी रात्री उशिरापरीयंत दिपकला नकोडा परिसरातुन अटक करण्यात आली.सदर घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सत्यजित आमले यांच्या नेतृत्वात PSI राहुल थांगणे,संतोष धांडेवार,गोपाल अतकुलवार,सचिन बोरकर,विनोद वनकर,सुधीर मत्ते करीत आहेत.





Friday, May 04, 2018

चंद्रपुरात मृत अर्भक सापडल्याने उडाली खळबळ

चंद्रपुरात मृत अर्भक सापडल्याने उडाली खळबळ

चंद्रपूर/विशेष प्रतिनिधी:
घुग्गुसच्या शास्त्रीनगर मार्गावर नाल्याच्या शेजारी शुक्रवारी सकाळी १० वाजता एका ५ ते ६ महिन्याच्या अविकसित मुलीचे अर्भक मृत अवस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली . मिळालेल्या माहितीवरून या नवजात मृत मुलीचे शरीर पूर्णता अविकसित होण्याच्या पाहिलेच तिला संपविण्यात आल्याची धक्कादायक माहिती आहे.एका प्लास्टिकच्या पिशवीत टाकून तिला नाल्याच्या शेजारी फेकून देण्यात आले होते ,या घटनेची माहिती नागरिकांना मिळताच परिसरात चांगलीच गर्दी जमली होती,लिंग परीक्षणा दरम्यान व तिचे अंग विकसित होण्या आधीच या नवजात अर्भकाला  डॉक्टरांच्या माध्यमातून संपविण्यात आल्याचे बोलल्या जात आहे. या मृत अर्भकाच्या अंगावर निळ्या शाईचा डाग देखील होता,अनैतिक संबंधातून जन्माला आलेल्या नवजात अर्भकामुळे समाजात आपली बदनामी होऊ नये, या उद्देशाने एखाद्या महिलेने हे अर्भक टाकले असण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.
या घटनेची माहिती मिळताच घुग्गुसचे ठाणेदार आमले व त्याचे कर्मचारी घटनास्थळावर पोहचून पुढील तपास करीत आहे,