সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Tuesday, April 30, 2013

पुनर्वसित जामणी, नवेगांवला तात्काळ सुविधा पुरवा

पुनर्वसित जामणी, नवेगांवला तात्काळ सुविधा पुरवा


पालकमंत्री संजय देवतळे                   

     चंद्रपूर- ताडोबा कोअर झोन मध्ये येणा-या जामणी व नवेगांव या गावाचे पुनर्वसन   करतांना गाववासियांसाठी सर्व सोईसुविधा निर्माण कराव्यात असे निर्देश पालकमंत्री संजय देवतळे यांनी दिले.  जामणी व नवेगांव या दोन्ही गावांचे पुनर्वसन प्रत्येकी 250 हेक्टर जागेवर होत असून पालकमंत्री देवतळे यांनी जागेची पहाणी केल्यानंतर उपरोक्त निर्देश संबंधित अधिका-यांना दिले. ताडोबा बफर झोनचे उपवनसंरक्षक कल्याणकुमार, अतिरिक्त मुख्य कार्यपालन अधिकारी अंकुश केदार, चिमूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी एल.एम.बेलेकर,  इकोप्रोचे बंडू धोत्रे या दौ-यात उपस्थित होते.
 जामणी मधील 93 व  नवेगाव मधील 111 कुटूंबे आपले राहाते गांव सोडून नवीन जागेवर स्थलांतरीत होत असल्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारची अडचण व त्रास होवू  नये यासाठी शासनातर्फे संपूर्ण सहकार्य करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या. पुनर्वसित नवीन घरे बांधतांना  जुन्या घराचे लाकडी साहित्य आणण्यास वनविभागातर्फे मदत करावी  असेही त्यांनी सांगितले.
     पालकमंत्री म्हणाले की जामणी व नवेगांवाला प्रत्येकी  250 हेक्टर जमिन दिली असून  या जागेवर योग्य पूनर्वसन होत आहे.  250 हेक्टर जमिनी मधून 10 हेक्टर जागेवर प्रत्येक कुटूंबाला 2 हजार चौ.फूट. चे प्लॉट घरासाठी देण्यात आले असून 5 हेक्टर जागा गावठानसाठी राखून ठेवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे शाळा, आंगणवाडी, ग्राम पंचायत इमारतीचे काम प्रगतीपथावर असून मुलांना खेळण्यासाठी खाली जागा सोडण्यात आली आहे.  त्या जागेवर मुलांना खेळण्याचे क्रीडांगन तयार करुन साहित्य पुरविण्यात यावे असे पालकमंत्री यांनी सांगितले.  
उर्वरीत जागेवर प्रत्येक पात्र कुटूंबातील व्यक्तीला 5 एकर जमिन शेतीसाठी देण्यात आली असून त्या जागेवर त्या व्यक्तींनी सांगितल्या प्रमाणे  शेती तयार करुन देण्याचे काम सुरु आहे.  तसेच गावात गाव तलाव तयार करुन देण्यात आला असून पाण्याची टाकी व लाईटची सुविधा करण्यात आली आहे.   या दोन्ही गावातील नागरीकांनी आपले घरे प्रशासनाच्या मदतीने लवकरात लवकर तयार करुन घेवून नवीन गावात राहण्यासाठी  यावे असे आवाहन पालकमंत्री यांनी केले.
     या पहाणी दौ-यात पालकमंत्र्यासह विविध खात्याचे अधिकारी,  नवेगांव व जामणी पुनर्वसन समितीचे अध्यक्ष अजहर शेख, नानाजी उईके व दोन्ही गावातील नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.  
 ३६ सराफा बाजारामध्ये चोरी करणारी टोळी गजाआड

३६ सराफा बाजारामध्ये चोरी करणारी टोळी गजाआड


चंद्रपूर : स्थानिक किसन ज्वेलर्स, श्रीनाथ ज्वेलर्स येथे झालेल्या चोरीचा गुंता पोलिसांनी सोडविला आहे. सीसीटीव्ही कॅमेरा, मोबाईलच्या साहाय्याने आरोपीचा शोध लावला आहे. वेगवेगळ्या राज्यांतील ३६ सराफा बाजारामध्ये चोरी करणारी टोळी चंद्रपूर शहर पोलिसांच्या हाती लागली आहे.
या टोळीमध्ये रजियाबी शेख यासीन (वय ३४), सुङ्कियाबी शेख मुसीर (वय ३६), नाझिया शेख जावेद शेख (वय २२), अलिशानबी रउङ्क खान (वय ४५), मकसूद खान युसूङ्क खान (वय २८), जावेद मुसा गराणा (वय २३), इम्रान खान नूरखान (वय २६), दिगांबर अंबर गायकवाड (वय ३५) या आरोपींचा समावेश आहे. सर्व आरोपी जळगाव येथील रहिवासी आहेत.
 महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान या राज्यांमध्ये वेगवेगळ्या सराङ्का बाजारामध्ये ही टोळी सक्रिय होती. आरोपींकडून सहा मोबाईल, सोन्याच्या सहा बांगड्या, एक वाहन, असा पाच लाख सहा हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला. टोळीतील आठही आरोपी नातलग असल्याचे समजते. यामध्ये चार महिला आणि चार पुरुषांचा समावेश आहे. सराङ्का बाजारामध्ये उच्चभ्रू म्हणून दागिने खरेदीसाठी जायचे. दागिने खरेदी करण्याचा आव आणायचा आणि इतर सहकाèयांच्या मदतीने दागिने लंपास करायचे, अशी यांची कामाची पद्धत होती.
या टोळीतील महिला बुरखा बांधून येत असल्यामुळे सराङ्का व्यापाèयास त्यांचे चेहरे दिसून येत नव्हते. या टोळीचा शोध
अनेक राज्यांतील पोलिसांना होता. त्यातच चंद्रपुरात १४ ङ्केब्रुवारी २०१३ रोजी किसन ज्वेलर्स येथे व तीन ऑक्टोबर २०१२ रोजी श्रीनाथ ज्वेलर्स येथे या टोळीने हात साफ केला. घटनेची तक्रार शहर पोलिस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आली. पोलिसांनी या दरोडेखोरांचा पाठलाग सुरू केला. ता. २२ एप्रिलला औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड- चाळीसगाव हायवेवर या टोळीला चंद्रपूर पोलिसांनी अटक केली. हे आठही जण एका वाहनात जात होते. या सर्व आरोपींना न्यायालयाने दोन मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
 पोलिस तपासात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. हे आरोपी सराङ्का बाजारामधून सोने चोरत होते. चोरलेले सोने सराङ्का बाजारातच विकत होते. या टोळीचा शोध इतर राज्यांतील पोलिसांना आहे. या आरोपींना चौकशीसाठी गुजरात, मध्य प्रदेशात नेणार असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी राजू भुजबळ यांनी दिली. चंद्रपूरसह अमरावती, कारंजा, अंमळनेर, धोडाईचा, शहादा, नवापूर, मोतला, धामणगाव, नागपूर इतवारी, नागपूर मोमीनपुरा, qछदवाडा, खामगाव, नागपूर, वाकी, वडगाव, भिलाई, अकोला, भडगाव, इंदोर, रतलाम, आर्णी, पारशिवनी, शिवणी, ब्रह्मणपूर, रावेर, कजगार, बुरूड, मुक्ताईनगर, बैंतूल मोठा सराङ्का बाजार, रामपूर, दुर्ग, गडचिरोली, पुणे, अकोला, नाशिक, अहमदनगर या ठिकाणच्या सराङ्का बाजारामध्ये आठ लोकांच्या या टोळीने हात मारला
बाबूपेठ उड्डाणपुलाचा प्रश्न सुटणार

बाबूपेठ उड्डाणपुलाचा प्रश्न सुटणार

महापौरांची वर्षपूर्ती : स्व. राजाभाऊ खोब्रागडे यांच्या स्मारक उभारणीच्या कामाला प्रारंभ

चंद्रपूर : पंचशताब्धी वर्षानिमित्त वर्षानिमित्त मिळालेल्या निधीसह विविध निधीतून शहराचा विकास साधला जात आहे. रस्ते, गटारलाईन, बाबूपेठ उड्डाणपूलबाबूपेठ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अर्धकृती पुतळा परिसरात राज्यसभेचे माजी सभापती स्व. राजाभाऊ खोब्रागडे यांच्या स्मारक उभारणीच्या कामाला प्रारंभ झाल्याची माहिती महापौर संगीता अमृतकर यांनी दिली.
चंद्रपूरच्या पहिल्या महापौर संगीता अमृतकर यांच्या कार्यकाळा मंगळवारी वर्ष पूर्ण झाला. या वर्षपूर्तीच्या पाश्र्वभूमीवर अमृतकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पंचशताब्धी वर्षानिमित्त २५० कोटी रुपये राज्य शासनाने मंजूर केले. त्यातील २५ कोटी प्राप्त झाले आहेत. या निधीतून शहरातील मुख्य रस्ते बांधकाम, नवीन भागात पिण्याच्या पाण्यासाठी पाइपलाइन टाकणे व शहरातील मुख्य मार्गावरील भूमिगत विद्युत वाहिनीचे काम हाती घेण्यात आले. त्याचे काम सुरू आहे. एकात्मिकगृह निर्माण व झोपडपट्टी विकास कार्यक्रमांतर्गत ५७० घरकुलांकरिता निविदा प्राप्त असून, २०३ लाभाथ्र्यांनी हिस्सा भरणा केलेला आहे. २०२ घरकुलांचे बांधकाम सुरू केलेले असून, १८७ घरकुलांचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित घरकुलांचे काम सुरू आहे, असे महापौर अमृतकर यांनी सांगितले. बाबूपेठ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अर्धकृती पुतळा परिसरात राज्यसभेचे माजी सभापती स्व. राजाभाऊ खोब्रागडे यांच्या स्मारक उभारणीच्या कामाला प्रारंभ झाला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मानसपुत्र आणि रिपब्लिकन पक्षाचे नेते बॅरि. राजाभाऊ खोब्रागडे हे मूळचे चंद्रपूरचे. दलित चळवळ उभारून त्यांनी आंबेडकरी विचार जनमानसात पोहोचविला होता. त्यांच्या या कार्याचा सन्मान करण्यासाठी ११ नोव्हेंबर २००९ रोजी त्यांच्यावर टपाल तिकीटही प्रकाशित करण्यात आले होते. बॅरि. खोब्रागडेंच्या कार्याची आठवण सदोदित राहावी म्हणून स्मारक उभारण्याची मागणी पुढे आली होती. त्या स्मारकाची जागा बाबूपेठ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अर्धकृती पुतळा परिसरात नियोजित करण्यात आली आहे. त्यासाठी दोन कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला. या निधीतून सभागृहाच्या पायव्याचे काम सुरू करण्यात आले आहे. शहरातील आपत्कालीन घटनांवर आळा घालण्यासाठी महानगरपालिकेकडे असलेली अग्निशमन यंत्रणा आता आधुनिक स्वरूपात सज्ज होत आहे. केंद्राचे बांधकाम, वाहन खरेदीसाठी १९० लाख ८२ हजारांच्या निधीला मंजुरी मिळाली आहे. सद्य:स्थितीत चंद्रपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन यंत्रणेकडे दोन ङ्कायर वॉटर टेन्डर आणि एक ङ्कोम टेन्डर ही वाहने आहेत. मात्र, शहराची वाढती लोकसंख्या, महाऔष्णिक वीजकेंद्र, कोळसा खाणी, इलेक्ट्रोस्मेंट, सिमेंट कारखाने, असल्याने केव्हाही दुर्घटना होऊ शकते. त्यामुळे अग्निशमन दलाचे बळकटीकरण, आधुनिकीकरण करण्यासाठी महाराष्ट्र सुरक्षा अभियानांतर्गत निधी प्राप्त झाला आहे. यातून अग्निशमन केंद्राचे बांधकाम करण्यासाठी एक कोटी ८२ हजार आणि तीन अग्निशमन वाहनांच्या खरेदीसाठी ९० लाखांचा निधी असा एकूण एक कोटी ९० लाख ८२ हजारांचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला होता. त्यास मंजुरी मिळाली असून, त्यापैकी अग्निशमन केंद्राच्या बांधकामासाठी ४७ लाख ५० हजार रुपये महानगरपालिकेला प्राप्त झाले आहेत. पत्ररिषदेला स्थायी समितीचे सभापती रामू तिवारी, उपमहापौर संदीप आवारी, संतोष लहामगे, प्रवीण पडवेकर, अशोक नागपुरे आदी उपस्थित होते.

Monday, April 29, 2013

चंद्रपुर -45.4

चंद्रपुर -45.4


विदर्भातील तापमान

आज दिनांक

सोमवार, 29th एप्रिल, 2013
चंद्रपुर -45.4
  • अकोला : 44.6        
  • अमरावती : 45.2          
  • ब्रह्मपुरी : 45.7          
  • गोंदिया : 42               
  • नागपूर : 44.7       
मित्रानीच केला मित्राचा खून

मित्रानीच केला मित्राचा खून


सिंदेवाही- सिंदेवाही पो. स्टे. अंतर्गत येणाÚया ठकाबाई तलावाजवळील पुलाखाली प्रेत लपवून ठेवल्याचे दि. 17 एप्रिल 2013 ला उघडकीस आले. सदर घटनेचा उलगडा सिंदेवाही पोलीसांनी केला असून सदर प्रकरणात  आरमोरी तालुक्यातील दोन आरोपीना अटक केली असून 4 मे पर्यंत पी सी आर घेण्यात आला आहे.
     सविस्तर वृत्त असे की दि. 17 एप्रिल 2013 ला सिंदेवाही-आरमोरी रोडवरील ठकाबाई तलावाजवळील पूलाखालील पाइपध्ये प्रेत लपवून ठेवल्याची माहीती सिंदेवाही पो. स्ट. ला देण्यात आली. अप. क्र. 32/ 13 भा. द. वी. क. 302, 201 नूसार गुन्हा दाखल करण्यात आला. मृताची ओळख न पटल्याने अप्पर पोलीस अघिक्षक सेजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सूरु केला. परीसरातील प्रत्येक गावातून हरविलेल्या व्यक्तीची माहीती घेण्यात आली. ही माहीती घेत असताना आरमोरी तालुक्यातील कुलकुली गावातील संतोष वासुदेव गेडाम वय 35 हा बेपत्ता असलाचे कळले. पो. नि. महिपाल सिंग चांदा स्टाफसह कुलकुली गावातील मयताची पत्नी सौ. शितल व त्याची आई यांना संतोषचे कपडे दाखवले असता त्यांनी कपडे ओळखले. घटना दि. 17 एप्रिलला दारु पिण्यासाठी सोबत घेवून जाणारे आरोपी निखील दिवाकर ठाकरे, रमेश परसराम तुलावी वय 35 रा. कुलकुली गावात नसल्याने त्यानीच घातपात केला असावा या संशयावरुन आरोपीना ताब्यात घेण्यात आले. दरम्यान मारहाणीत मृतकाच्या 3 फासळ्या तुटल्याचा रिपौर्ट प्राप्त झाला. आरोपीनी गुन्हा कबूल केला. परंतु असे करण्षचे कारण अजून स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणाचा उलगडा पो नि महिपालसिंह चांदा यांनी केला. यात हे. कॉं. हिरामण पराते, चांगदेव गिरडकर, ना. पो. का. सुरेश बोरकुट,े सतीश नेवारे, अरविंद गेडाम, ललीत धुंदे, चालक वसंता सिडाम, प्रदीप वडगावकर, यांनी सहकार्य केले.  आरोपी घटनेच्या दिवशी प्रेत लपवलेल्या ठिकाणी सायंकाळपर्यंत थांबले होते. प्रेत आणलेल्या गाडीतील डिझेल संपल्याने त्यांना पुढे जाता आले नाही. गाडी चालक दारु पिउन होता तर दुसरा घाबरलेला होता. गाडीच्या सिटवर रक्त सांडलेला होता. कारगाटा येथील नागरीकानी विचारले तर अपघातातील व्यक्तीला आणले, रक्त नाही गुळाचे डाग आहेत असे सांगितले. गाडी ट्रॅक्टरने ओढत कारगाटा पर्यंत आणले. गावात गाडीतील डेक विकून रॉकेल विकत घेतले. सायंकाळी  रवाना झाले. दरम्यान नागरिकांनी जागरुकता दाखवली असती तर आरोपी तेव्हाच जाळ्यात अडकले असते.
   
   

सांगाडा पाठविला नागपूरला

सांगाडा पाठविला नागपूरला


विद्यार्थिनीचे खून परकरण
मूल-ताडाळा येथील बपत्ता विद्यार्थिनीच्या खून प ्रकरणात दुस-या आरोपीस चामोर्षी  तालुक्यातील करकापल्ली यथून काल रात्री अडीच वाजताच्या सुमारास अटक करण्यात आली.आरोपीचे नाव नानाजी कुळसंग, वय 27 असे आहेताडाळा यथील वर्ग  नववीची अल्पवयीन विद्यार्थीनी क ु.षुभांगी भास्कर आडपवार हिचा काल चामोर्षी  घोट मार्गावरील बलघाटा षिवारात सांगाडा मिळाला हाता.आठ तारखेला नवभारत कन्या विद्यालय मूल वरून ती षालेय गणवेषातच बपत्ता झाली होतीत्याच सुमारास तिचा तिच्याच ओढणीन गळा आवळून खून करण्यात आला.अनैतिक संबधाम ुळे तिला गर्भधारणा झाली हाती.तीन महिने उलट ून गेल्यान गर्भपात करण्याच्या उददेषान बपत्ता करण्यात आले होत. आरोपीन दिलेल्या कब ुली नतर पोलिसानी तपासात गती वाढविल्याने षुभांगीचा सागाडाच पोलिसांना प ्राप्त झालाबपत्ता नतर षुभांगीला आरोपीन करकापल्ल्ी यथे मित्राच्या घरी ठवले हात.या प ्रकरणात सहभागी असल्याच्या कारणावरून नानाजी कुळसंग, वय 27 याला काल रात्री
अडीच वाच्या दरम्यात करकापल्ल्ी यथे अटक केली.पोलिसांना गुगारा तो देत असताना
दुस-याच्या घरी लप ून बसलेला असताना गावक-यांच्या मदतीन त्याला ताब्यात घेण्यात
आले.कुळसंग विरूदध भादंवी 304,364,201 कलमान्वय गुन्हा दाखल करण्यात आला
आह.याआधी म ुख्य सुत्रधार सचिन वामन लिंगोजवार अटकेत आह.त्याचा तीस
तारखेपर्यंत पोलिस कस्टडी रिमांड घेण्यात आला आह.या प ्रकरणातील आणखी काही
धागदोरे गवसण्याची षक्यता पोलिसांनी वर्त विली आहदरम्यान, पुढील तपास पोलिस निरीक्षक एस.बी. ताजन यांच्या मार्ग दर्षनाखाली सहा. पोलिस निरीक्षक सी. टी. मस्के हे करीत आहे.
षेजारी राहणा-या य ुवकान अत्याचारानतर केलेल्या या निर्घृण कृत्यामळ तालुक्यात खळबळ उडाली आह. सर्व च स्तरातून याचा निशेध व्यक्त होत असून आरोपीस फाषीची षिक्षा व्हावी अषी मागणी होत आहेसांगाडा पाठविला नागप ूरला अपहरणाच्या वीस दिवसानतर मिळालेला षुभांगीचा सागाडा नागप ूर यथे प ुढील
तपासासाठी पाठविण्यात आला आह.घटनास्थळी मिळालेले स ॅंडल,पाण्याची बाटल, षालेय
गणवशाचे त ुकड पोलिसानी ताब्यात घेतले आहे.
पाटण ग्रामपंचायतीने साकारले पहिले आदर्श क्रीडांगण

पाटण ग्रामपंचायतीने साकारले पहिले आदर्श क्रीडांगण

चंद्रपूर, दि. 29 : जिवती तालुक्यातील अतिशय दुर्गम भागात असलेल्या पाटण ग्रामपंचायतीने  पायका व लोक सहभागातून राज्यातील पहिले आदर्श क्रीडागंण साकारले असून या क्रीडांगणाचा लोकार्पण सोहळा नुकताच  जिल्हाधिकारी  विजय वाघमारे  यांच्या हस्ते पार पडला. विकासाच्या दृष्टीने अतिशय दुर्गम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिवती तालुक्यातील पाटण ग्रामपंचयातीने  राज्यात आदर्श ठरावा असे तीन स्वतंत्रा क्रीडागंण तयार केल्याचे वाघमारे यांनी यावेळी सांगितले.
    केंद्र पुरस्कृत  व राज्य शासनाच्या पायका योजनेअंतर्गत पाटण ग्रामपंचायतने जिल्हा परिषद शाळेच्या आवारात कबड्डी, हॉलीबॉल व खो-खो या खेळाचे तीन स्वतंत्र मैदानं तयार केले.  यासाठी ग्रामपंचायतला शासनाकडून 1 लाख रुपयाचे अनुदान  मिळाले असून लोक सहभागातून 30 हजार रुपये उभारण्यात आले. 1 लाख 30 हजार रुपये खर्चून तीन स्वतंत्र मैदानं ग्रामपंचायतने उभारुन गावातील युवक-युवतींच्या क्रीडा विकासाला चालना दिली.  एखाद्या ग्रामपंचायतीने खेळाची तीन स्वतंत्र मैदाने तयार करण्याचा राज्यातील हा पहिलाच प्रयोग असावा.
    पंचायत युवा क्रीडा व खेळ अभियान (पायका) कार्यक्रमाअंतर्गत सर्वांसाठी खेळ हे ध्येय साध्य करण्यासाठी भारतातील सर्व ग्रामपंचायतीला सन 2016-17 पर्यंत खेळाचे आदर्श मैदान, खेळ साहित्य, क्रीडा मार्गदर्शक  आदीसाठी 1 लाख विशेष निधी शासनाने उपलब्ध करुन  दिला आहे. या निधी अंतर्गत शिक्षण विभाग जिल्हा परिषद व युनिसेफ च्या सहाय्याने विकासासाठी खेळ हा कार्यक्रम जिल्हयातील राजुरा, जिवती, गोंडपिंपरी, पोंभुर्णा व चिमूर या पाच तालुक्यातील शाळेमधील मुलांचा व युवकांचा खेळाच्या माध्यमातून विकास हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
चंद्रपूर जिल्हयात सन 2008-9 व 2009-10 या वर्षात आदर्श क्रीडांगण निर्मितीसाठी  170 ग्रामपंचायतीची निवड करण्यात आली असून मैदान तयार करण्यासाठी 1 लाख रुपयाचा  निधी ग्रामपंचायतीला हस्तांतरीत करण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत जिवती तालुक्यातील  पाटण ग्रामपंचायतीने जिल्हयातील पहिले क्रीडागंण व राज्यातील आदर्श क्रीडागंण तयार करण्याचा मान पटकाविला आहे. इतर ग्रामपंचायतीमध्ये कामे प्रगतीपथावर आहे.
स्थानिक लोकांच्या सहभागातून व शासकीय निधीतून आदर्श मैदानाची निर्मिती करणे शक्य झाले अशी प्रतिक्रीया उपसरपंच भीमराव पवार यांनी व्यक्त केली. पाटण ग्रामपंचायत केवळ खेळातच नाही तर स्वच्छतेच्या बाबतीतही अग्रेसर असून गावातील 75 टक्के घरात नागरिकांनी स्वखर्चाने शौचालय उभारले आहे.
पाटण ग्रामपंचायतीने तयार केलेले  आदर्श क्रीडांगण जिल्हयातील ग्रामपंचायतीसाठी आदर्श असल्याचे जिल्हाधिकारी  विजय वाघमारे यांनी क्रीडांगणाचे लोकार्पण करतेवेळी  सांगितले. यावेळी आमदार सुभाष धोटे, जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत डहाळकर, उपविभागीय अधिकारी एम.एम.राऊत, तहसीलदार सूर्यकांत पाटील, युनिसेफचे मयूर पुजारी , जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड व गावकरी उपस्थित होते.

Sunday, April 28, 2013

ताडाळा येथील बेपत्ता विद्यार्थिनीचा मृतदेह सापडला

ताडाळा येथील बेपत्ता विद्यार्थिनीचा मृतदेह सापडला



मुख्य सूत्रधारास मंगळवारपर्यंत पोलिस कोठडी
मूल  मागील काही दिवसापासून बेपत्ता ताडाळा येथील नवभारत कन्या विद्यालयात नवव्या वर्गात शिकणारी विद्यार्थिनीचा मृतदेह आढळल्यची माहिती आहे. 
बेपत्ताप्रकरणी अटकेत असलेला मुख्य सूत्रधार सचिन वामन qलगोजवार या आरोपीस ३० एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
अनैतिक शारीरिक संबंधातून बेपत्ताप्रकरणाचे नाट्य घडल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. बेपत्ता विद्यार्थिनीच्या प्रकरणाचे धागेदोरे पोलिसांना गवसल्यानंतर मुख्य सूत्रधार असलेला आरोपी जाळ्यात सापडला. आठ तारखेला झालेल्या द्वितीय सत्र परीक्षेच्या पेपरनंतर अल्पवयीन विद्यार्थिनी बेपत्ता झाली. शाळेत मुलीची सायकल आढळून आली. बेपत्ता मुलगी आणि आरोपी सचिन ताडाळा येथील शेजारी-शेजारी राहात असून, प्रेमप्रकरणातून शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. त्यात तिला गर्भधारणा झाली. गर्भपात करण्याच्या उद्देशाने विद्यार्थिनीला बेपत्ता केल्याचे तपासात पुढे आले आहे. द्वितीय सत्र परीक्षेचा पेपर देण्याच्या उद्देशाने आलेली ही विद्यार्थिनी पेपर झाल्यानंतर नवभारत विद्यालयात सायकल ठेवून बेपत्ता झाली. दरम्यान, आरोपीने विद्यार्थिनीस चामोर्शी तालुक्यातील कडकापल्ली या गावामध्ये आपल्या एका मित्राच्या घरी नेऊन ठेवल्याचे माहित झाल्याने मूल पोलिसांनी त्या दिशेने तपासाची चक्रे फीरवली. त्यानंतर तिचा मृतदेह गडचिरोली जिल्ह्यात आढळून आला 



धरणात बुडून दोन तरुणाचा मृत्यू

धरणात बुडून दोन तरुणाचा मृत्यू

चंद्रपूर- येथून जवळच असलेल्या दुर्गापूर परिसरात इरई धरणात बुडून दोन तरुणाचा मृत्यू झाला. हि घटना दुपारी सहा वाजता घडली. मृत इंदिरानगर आणि कृष्णनगर येथील रहिवाशी आहेत  
चंद्रपूर @ ४७. ६

चंद्रपूर @ ४७. ६


चंद्रपूर- विदर्भात गेल्या पाच-सहा दिवसांपासून उन्हाचे तीव्र चटके जाणवायला लागले आहेत. दिवसेंदिवस तापमान वाढत आहे. विदर्भात आज सर्वाधिक तापमान चंद्रपूरला ४७ .६ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. विविध जिल्ह्य़ात सरासरीच्या तुलनेत जास्त तापमान नोंदवले गेले. होळीनंतर तापमानाने चाळीशी गाठल्यावर तापमानात वाढ होत आहे.
चंद्रपुरात उन्हाचा पारा हळूहळू वाढायला सुरुवात झाली असून शहरात आज  ४७ .६  अंश सेल्सिअस तापमानाची नोंद घेण्यात आली आहे. या संपूर्ण आठवडाभरात विदर्भात चंद्रपूर सर्वाधिक उष्ण शहर ठरले आहे. चंद्रपूरचा उन्हाळा दरवर्षीच चर्चेत असतो. त्यानुसार यंदाही उन्हाळा तीव्र उन्हामुळे चर्चेत आहे. एप्रिल महिन्याला सुरुवात होताच सूर्याने आग ओकणे सुरू केले आहे.
गेल्या आठवडय़ाभरात उन्हाने उष्णतेचा उच्चांक गाठला असून  शनिवार, रविवार, असे सलग दोन दिवस तापमान अधिक होते. एप्रिलच्या पहिल्या आठवडय़ापासूनच उन्हाळ्यानेने उष्णतेचे रंग दाखविण्यास सुरुवात केली होती. १ एप्रिलला जेथे ४०.८ अंश तापमानाची नोंद घेतली तेथे ८ एप्रिलला ४३.२ अंशावर पारा पोहोचल्याने लोकांना उष्णतेचा त्रास सहन करावा लागत आहे. वाढत्या उन्हामुळे दुपारी बारा वाजतापासूनच शहरातील मुख्य रस्ते ओस पडत आहेत. निर्मनुष्य रस्त्यांवर केवळ ऑटो व बसेस धावतांना दिसतात. उष्णतेचा सर्वाधिक परिणाम शहरातील बाजारपेठेवर झालेला आहे. गोल बाजार, भाजी बाजार दुपारी पूर्णपणे शांत होतो. लग्नसराई असतांनाही दुपारी कपडा बाजार व इतर दुकानातही गर्दी दिसत नाही. याउलट, शीतपेयाची दुकाने, आईस्क्रीम पार्लर्स, कुल्फी सेंटरवर गर्दी बघायला मिळत आहे. दुपारी निर्मनुष्य असलेले रस्ते सायंकाळी ७ वाजतानंतर पुन्हा फुलू लागतात. हा उन्हाळा मे महिन्यात अधिक तीव्र राहील, असे हवामान खात्याच्या वतीने सांगण्यात येत आहे. साधारणत: ७ जूनपर्यंत तरी कडक उन्हाळा तापणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
एकीकडे उष्णतामानात वाढ होत असताना दुसरीकडे ग्रामीण भागात आणि शहरातील काही भागात वारंवार वीज खंडित होण्याचे प्रमाण वाढल्याने नागरिक या भारनियममनामुळे त्रस्त झाले आहे. प्रखर उन्हामुळे चाकरमाने सोडले तर अनेक लोक सकाळी अकरानंतर घराबाहेर न पडता घरीच राहून एकदम सायंकाळी ५.३० नंतरच घराबाहेर पडतात. वाढते तापमान बघता जिल्हा परिषदेने जिल्ह्य़ातील शाळांच्या वेळेत बदल करून त्या सकाळी ७ ते १० अशा ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थी अकराच्या आत घरात असतात. रणरणत्या उन्हामुळे शहरातील विविध भागातील रस्ते दुपारी सूनसान दिसतात. एकीकडे प्रखर उन्हाळा असताना अजूनही ग्रामीण आणि शहरातील काही भागात वीज जाण्याचे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे अनेकांना असह्य़ उकाडय़ाचा त्रास सहन करावा लागतो. शहरातील शीतपेयांच्या गाडय़ांभोवती लोकांची गर्दी दिसून येत आहे.



  •  मे-2004 रोजी चंद्रपूरचे तापमान 48.6 डिग्री 

  •  2007 मध्ये 49.2007 डिग्री नोंदविल्या गेले.

  • 18 मे 2012 – चंद्रपूरचे तापमान 45 अंश सेल्सियस नोंदविल्या गेले. 

  • 22 मे 2012 – राज्यात सर्वाधिक तापमान चंद्रपूर येथे 47 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले ... 

  • 11 एप्रि 2013 – चंद्रपूर येथे ४३.४ अंश सेल्सिअस हे सर्वाधिक तापमान नोंदविण्यात आले. 



  • विदर्भातील तापमान
  • अकोला : ४४.५        
  • अमरावती : ४४.८          
  • ब्रह्मपुरी : ४४.२          
  • गोंदिया : ४१.१               
  • नागपूर : ४४.४                
  • वाशि‘ : ४२.०                  
  • वर्धा : ४३.२                     
  • यवतमाळ : ४२.२             



वन्यजीव-मानव संघर्ष बिबट-मानव संघर्ष

वन्यजीव-मानव संघर्ष बिबट-मानव संघर्ष



मानव-वन्यजीव संघर्षात महत्त्वाचा प्राणी हा बिबटे आहे. बिबट हा कुठलाही परिस्थितीत स्वतःला जुळवून घेतो. अगदी मानवी वसाहतीसलगत असलेल्या जंगल सदृश अधिवासात तो राहतो. बिबट्याचे आवडते खाद्य कुत्रे व डुकरे आहेत. ज्या जंगलव्याप्त गावालगत अस्वच्छता, घाण व उकिरडे असेल, तिथे या प्राण्यांची संख्या अधिक असते. अशाप्रकारचे गावे म्हणजे बिबट्याच्या अधिवासाचे पोषक असे वातावरण आहे. यामुळे बिबट्यासारखा प्राणी गावालगत वावरतो.. या गावातील कुत्र्यांची संख्या रोडावली की, मोकाट व मध्यम आकाराच्या पाळीव जनावरांना बिबट शिकार बनवितो. अशा परिस्थिती बिबट गावात येणे व शिकार करणे, अशा घटनांत वाढ होते. गावात व गावालगत बिबट्याचा वावर असल्यावर अगदी पहाटे शौचास जाणा-या गावक-यांवर या बिबट्याच्या हल्ल्याची शक्यता वाढते. यातूनच बिबट्याचा गावातील वाढलेला वावर म्हणजेच मवन्यजीव-मानव संघर्ष qकवा मबिबट-मानव संघर्ष होय.

 मानव-वन्यजीव संघर्ष:                                  
 या प्रकारात गावक-यांचा गावालगतच्या जंगलात प्रवेश झाल्यानंतर वन्यप्राण्यांचे हल्ले होतात. जंगलात दैनंदिन गरज म्हणून सरपणासाठी जंगलात जाणे, रानमेवा-तेंदू संकलन करण्याकरिता, मोहा वेचण्याकरिता व बांबू तोडण्याकरीता जंगलात जाण्याचे प्रमुख कारणे आहेत. मोहा, तेंदू व रानमेवा संकलन करताना सदर गावकरी दाट जंगलात वन्यप्राण्यांच्या अधिवासात प्रवेश करतात. संकलनाचे सर्व कामे बसून करीत असताना मनुष्याच्या हालचाली या एखाद्या प्राण्यांसारख्या होत असल्याने जवळ असणारे वाघ-बिबट हल्ला चढवितो. हा हल्ला इतका जोरदार असतो की यात सदर मनुष्यप्राणी जागीच मृत्यू पावतो. या संघर्षास मानव-वन्यजीव संघर्ष म्हणतात. यात वाघ, बिबट, अस्वल व रानडुक्कर यांचा समावेश असतो.

जंगलात कशासाठी                                  
रानमेवा, मोहङ्कूल, तेंदूपाने संकलनासाठी नागरिक जंगलात जातात. शिवाय वर्षभर इंधनासाठी लागणा-या सरपण गोळा करण्याकरिता जंगलात ये-जा असते. अवैध शिकारीकरिता व बांबू तोडण्याकरिता मजुरांचा प्रवेश असतो.

२४ मार्च : पालेबारसा : सावली : अनसूया शेंडे
६ एप्रिल सादागडसावली : धृपदाबाई गजानन मडावी
१० एप्रिल : आगरझरी : मूल : तुकाराम धारणे आणि मालनबाई मुनघाटे
११ एप्रिल : पाथरी : सावली : ललिता आनंदराव पेंदाम
१२ एप्रिल : चारगाव : भद्रावती :निलिमा कोटरंगे 
१७ एप्रिल : पायली भटाळी गावातील प्रीती बंडू काटकर
17 एप्रिल किटली- गोपिका काळसर्पे

--------------------

25 दिवसांत 8 ठार

चंद्रपूर : जिल्ह्यातील जंगलग्रस्त भागात सध्या वाघ आणि बिबट्याच्या हल्ल्याच्या घटनांत वाढ झाली आहे. गेल्या २० दिवसांत एकापाठोपाठ एक अशा एकूण सहा जणांचा जीव गेला. या सर्व घटना गाववेशीवरच्या जंगलातच घडल्या आहेत.
२४ मार्च रोजी सावली तालुक्यातील उसरपारचक परिसरात मोहङ्कूल वेचणा-या अनसूया शेंडे या महिलेवर हल्ला झाला. या घटनेच्या दोन दिवसांपूर्वीच पालेबारसा येथील गोसेखुर्दच्या कालव्यावर मजूर म्हणून कामाला गेलेल्या पाच महिलांवर झाडावर बसलेल्या बिबट्याने झडप घेतली होती. यातील एक महिला जखमी झाली. या घटनेमुळे ग्रामस्थ भयभीत असताना अवघ्या चार-पाच किलोमीटर अंतरावरील उसरपारचक येथील अनसूयाबाई शेंडे या महिलेचा बळी गेला. घटनेनंतर ग्रामस्थांनी वनविभागावर रोष व्यक्त केल्याने बिबट्याला त्याच दिवशी जेरबंद करण्यात आले. बिबट नर असून, अडीच वर्ष वयोगटातील आहे. या परिसरात घनदाट जंगल आहे. आसोलामेंढा तलावाकडे जाणा-या कालव्यांमध्ये थोडेङ्कार पाणी असते. त्यामुळे वन्यप्राणी या परिसरात भटकंती करीत असतात. त्यानंतर याच तालुक्यातीलच सादागड येथे ध्रुपदाबाई गजानन मडावी या महिलेला बिबट्याने ठार केले. या दोन्ही घटनांचे अंतर सुमारे २५ किलोमीटर आहे. चार ते पाच वयोगटातील हा बिबट मादी असून, त्यालाही जेरबंद करण्यात आले आहे. त्यानंतर १० एप्रिल रोजी ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या बर झोनमध्ये असलेल्या आगरझरी येथे बिबट्याने दोन जणांना ठार केले. मृत तुकाराम धारणे (वय ७०) हे आपल्या नातेवाइकांना सोडून परत येत असताना मोहङ्कूल वेचण्यासाठी थांबले. त्याचवेळी त्यांच्यावर बिबट्याने हल्ला केला. या घटनेची माहिती कळताच मृतदेह पाहण्यासाठी आगरझरी आणि अडेगावच्या नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. यावेळी बिबट तिथेच कुठेतरी लपून बसला होता. मुख्य रस्त्याच्या वळणावर त्याने हा मृतदेह बघण्यासाठी जाणा-या मालाबाई मुनघाटे (वय ६५) हिच्यावर झडप घेतली. या दोन्ही घटना ५० मीटर अंतरावर घडल्या. घटनास्थळापासून अवघ्या काही अंतरावर ती असल्याने लोकांनी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत बिबट्याने तिचा बळी घेतला होता. त्यानंतर सलग तीन दिवस वाघ आणि बिबट्याचा संघर्ष सुरू राहिला. ११ एप्रिल रोजी सावली तालुक्यातील पाथरी वनविकास महामंडळाच्या पाथरी जंगलातील कक्ष क्रमांक १६२मध्ये मोहङ्कूल वेचणा-या ललिता आनंदराव पेंदाम या महिलेवर वाघाने हल्ला केला. त्यानंतर दुस-या दिवशी १२ एप्रिल रोजी चोरगाव जंगलात बिबट्याने  सोळा वर्षीय नीलिमा कोटरंगे हिला ठार केले. या घटनेत तिची आई qसधू कोटरंगे गंभीर जखमी झाली. एकूणच या घटनांमध्ये वाघ-बिबट्यांनी वयस्क आणि अल्पवयीन गटातीलच व्यक्तींना लक्ष्य केले. याचाच अर्थ असा की, हिस्त्रपशू कमजोर व्यक्तींचीच शिकार केलेली आहे.
-----------------
मोह वेचणा-यांवरच हल्ले का?                       
झाडीपट्टीत मोहङ्कुलांची झाडे मोठ्या संख्येने आहेत. सावली, मूल, qसदेवाही, नागभीड आणि चंद्रपूर तालुक्याच्या काही भागात मोहङ्कूल संकलनाचे काम मोठ्या प्रमाणात चालते. साधारणतः मार्च-एप्रिलपासून मोहङ्कूल संकलनाचे काम सुरू होते. मोहङ्कूल वेचण्याकरिता पहाटे चारपासून जाणे सुरू होते. पहाटेला निघणारा शुक्राचा तारा वाटसरूंना मार्ग दाखवितो. मोहङ्कूल पडण्याची वेळ वेगळी असते. यात काही मोहवृक्ष पहाटे चार ते सकाळी १० वाजेपर्यंत ङ्कुले पडतात. काही मोहवृक्ष मध्यरात्री पडतात. त्यामुळे जास्तीत-जास्त मोह वेचण्यासाठी ग्रामीण महिलांमध्ये स्पर्धा होते. पहाटेच्या अंधारात मोहङ्कूल योग्यपद्धतीने वेचता यावे,यासाठी झाडाखालचा पालापाचोळा जाळण्यात येतो. जी व्यक्ती सर्वप्रथम आग लावून सासङ्काई करेल, त्याचे ते झाड ठरले असते. मोहङ्कूल वेचणा-या सर्व महिला qकवा पुरुष खाली वाकतात. कुणी शौचास बसल्यासारख्या स्थितीत असतात. मोहङ्कूल वेचताना एकाग्रता असते. अशावेळी एखादा प्राणी जवळून गेलातरी कुणी लक्ष देत नाहीत. दुसरीकडे मोहङ्कूल वेचताना बसण्याची स्थिती बघून वन्यप्राण्यांना तृणभक्षक प्राणी असल्याचे प्रारंभी जाणवते. त्यामुळे शिकारीच्या दृष्टीने हल्ला होतो. गेल्या १५ दिवसांत जिल्ह्यात झालेले सर्व हल्ले मोहङ्कूल संकलन करीत असतानाच झाले आहेत. बिबट्याने केलेले हल्ले पहाटे qकवा सकाळच्या सुमारास झालेले आहेत. त्यातही शौचास बसलेल्यांवरच हल्ले झालेले सर्वेक्षणातून दिसून येते. गेल्या १५ दिवसांपासून उन्ह तापत असल्याने मोहङ्कूल मोठ्या प्रमाणात पडत आहे. त्यामुळे मोहङ्कूल संकलनासाठी ग्रामस्थांमध्ये स्पर्धाच लागली आहे. आता तेंदूपाने तोडणीची कामेही सुरू होतील. वाघ-बिबट्यांच्या अधिवासाच्या भागात लोकांची गर्दी झाल्याने हल्ल्याची शक्यता वाढली आहे.
-----------------------
मार्च २००९ पूर्वीच्याच्या साडेतीन वर्षांत वाघ व बिबट्याच्या हल्ल्यात ४५ लोकांचे बळी गेले. २०१० या वर्षात जिल्ह्यात वन्यप्राण्यांच्या हल्यात १५ ठार, तर १९७ जखमी झालेत. त्यातही एक हजार ३७९ पाळीवप्राणी ठार झाले. यातील १३ मृतांचे वारस, १३४ जखमी व ७९० पशुधन हानीच्या प्रकरणात ७३ लाख ३६ हजार रुपयांच्या मदतीचे वाटप वनखात्याने केले आहे. २००८-०९ मध्ये सर्वाधिक ५२०० पाळीव प्राणी वन्यजीवांच्या हल्ल्यात ठार झालेत. सर्वांत कमी २००९-१० या वर्षात १८४३ पाळीव प्राण्यांना जीव गमवाला लागला. २०१२- २०१३ पर्यंत ही संख्या दोन हजारावर गेली आहे.
--------------------------------
राज्यात सर्वाधिक जंगल असलेल्या या जिल्ह्यात ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प आणि वाघांच्या अस्तित्वामुळे व्याघ्र जिल्हा म्हणून घोषित होईल. मात्र, गेल्या पाच वर्षांपासून वाघ व इतर वन्यप्राण्यांचा धुमाकूळ हाच विषय चर्चेत आहे. जिल्ह्यात शंभरावर पट्टेदार वाघांची नोंद घेण्यात आली आहे.
------------------------
मानवाने आपल्या स्वयंविकासासाठी निसर्गावर अतिक्रमण केले आहे. शहरी भागातील जंगल उद्योगांनी बळकावले. हरिण, चितळ, रानडुक्कराची शिकार होऊ लागल्याने वाघ, बिबट्याला जंगलात खाद्य मिळत नाही. यामुळेच ते खाद्याच्या शोधात गावाजवळ येऊ लागले आहेत. पाळीव प्राण्यांच्या शिकारीचे प्रमाण वाढले. जंगलात पाळीव प्राण्यांची चराई होते. त्यामुळे पाळीव प्राणी वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात ठार होण्याचे प्रमाण वाढलेले आहे. जलस्रोत आटत असल्याने पाण्याच्या शोधार्थ वन्यप्राणी गावकुसाकडे धाव घेऊ लागले आहेत. गेल्या एक दशकात हा संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. त्यामागे वेगवेगळी कारणे असली तरीही, उन्हाळ्यात उन्हाच्या झळांसोबत या संघर्षाच्या झळादेखील तीव्र होऊ लागल्या आहेत. वन्यप्राण्यांच्या मकॉरिडॉरवर झालेल्या अतिक्रमणामुळे जंगल आणि गाव सीमा आता नष्ट होऊन मानव आणि प्राणी संघर्ष सुरू झाला आहे. मुख्य अधिवास असलेल्या जंगलातील भक्ष्य कमी झाल्यामुळे, पाणवठे कोरडी झाल्यामुळे qकवा नैसर्गिक स्त्रोत संपल्यामुळे एका जंगलातून दुस-या जंगलात त्यांचे स्थलांतर होत असताना त्याचा कॉरिडॉर सुरक्षित राखणे गरजेचे आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत हे स्थलांतर मोठ्या प्रमाणावर होते. त्यामुळे अशा परिस्थितीतसुद्धा मानव-वन्यजीव संघर्षाची ठिणगी उडण्याची दाट शक्यता असते.
राना-वनात वास्तव्य करणा-या वन्य प्राण्यांचे जीवन धोक्यात आल्याने त्यांनी मानवी वस्तीत निवारा शोधण्याकडे आपला मोर्चा वळविला आहे. हा प्रकार गेल्या पन्नास वर्षांपूर्वीपासून नव्हता. गेल्या दशकापासून हा प्रकार वाढलेला असून, गेल्या चार-पाच वर्षांत वन्य प्राण्यांचे मानवी वस्तीवर हल्ला वाढलेले आहेत. ही समस्या गंभीर का बनत आहे, याचा विचार वेळीच व्हायला हवा. त्यावर प्रभावी विचार झाला नाही तर, वन्य प्राण्यांबरोबरच मानवी जीवन आणखी धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
-------------
                                                 उपाय             
  • पहाटे, सकाळी qकवा सायंकाळी जंगलात प्रवेश करू नये.
  • जंगलात दुपारच्याच सुमारास जावे.
  • जाताना एकटे न जाता गटाने प्रवेश करावा.
  • जंगलात वन्यप्राण्यांचे आवाज ऐकूनच पुढे पाऊल टाकावे.
  • शारीरिकरित्या अशक्त व्यक्तींनी जंगलात जावू नये.
  • जंगलात असताना हातात काठी ठेवून आवाज करावा.

-------------------
बेसुमार भूउत्खनन, बेकायदेशीर व्यवसाय थांबायलाच हवेत. नैसर्गिक संपत्तीचे संवर्धन व्हायलाच हवे. रानडुक्करांची शिकार करण्याची चटक लागलेले लोक ङ्कासे लावतात. त्या ङ्काशात रानडुक्कराऐवजी बिबटे अडकून पडल्याचे काही प्रकार उघडकीस आले आहेत. ही बेकायदेशीर हत्या थांबवणे गरजेचे आहे.

वन्यप्राणी व मानव यामधील वाढता संघर्ष दोन्ही घटकांना हानिकारक आहे. दोन्ही घटकांचे जीवन धोक्यात आणणारा आहे. म्हणून वरकरणी क्षुल्लक वाटणा-या या विषयावर सकारात्मक दृष्टीकोन ठेवून विचारमंथन व्हायला हवे. हे विचारमंथन वन्य प्राणी करू  शकत नाहीत. ते सामाजिक प्राणी असलेल्या मनुष्यानेच करायला हवे.
---------------------
मानव-वन्यप्राणी संघर्षाच्या सर्वाधिक घटना विदर्भात घडलेल्या आहेत. २००७ मध्ये तळोधीला नरभक्षक वाघिणीने धुमाकूळ घातला होता. तेव्हापासून नरभक्षकांना गोळ्या घालण्याचे प्रसंग उद्भवत आहेत. वाघाला ठार मारल्यामुळे नागभीड qकवा लगतच्या तालुक्यातील ग्रामस्थांच्या समस्या सुटलेल्या नाहीत. एखादी घटना घडल्यानंतर गावकरी बिबट-वाघाच्या बंदोबस्ताची मागणी करतात. त्यामुळे रोष शांत करण्यासाठी वनविभागाला qपजरा लावून जेरबंद करण्याची कारवाई करावी लागते. या प्रकारामुळेही हल्ल्याची समस्या सुटलेली नाही. उलट जेरबंद झालेला वाघ-बिबट qपज-यातून सुटल्यानंतर अधिक तीव्र होऊन हल्ले करू लागला आहे.
------------------

प्राण्यांवर दया करा
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील आष्टा गावाजवळून इरई धरणाचा कालवा वाहतो. तिथे काही दिवसांपूर्वी गर्भवती वाघिणीवर गावक-यांनी दगडङ्केक केली. गर्भवती असल्यामुळे तिच्या हालचाली संथ होत्या. जिवाच्या आकांताने वाट ङ्कुटेल तिकडे पळत वाघीण बचावासाठी मार्ग शोधू लागली. धिप्पाड वाघिणीच्या करुण धावपळीकडे गावक-यांनी करमणुकीच्या नजरेने बघितले. आष्टा येथील एका गावक-यांच्या घरात तिने ठिय्या मांडला. सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास तिचे दर्शन झाल्यामुळे हलकल्लोळ माजला. वाघिणीने गावालगतच्या एका शेतातील धानाच्या ढिगा-याजवळ ठाण मांडले होते. अशावेळी मनुष्यानेही सावधगिरी बाळगून वन्यजीवांचे रक्षण केले पाहिजे.
----------------
उन्हाळ्यात आटणारे पाणवठे आणि पर्यटकांचा अतिरेक यामुळे वन्यप्राण्यांच्या एकूणच दिनचर्येवर परिणाम झाला आहे. एरवी निशाचर समजले जाणारे वाघ दिवसाढवळ्या गावाकडे वळू लागले आहेत. जंगल आणि गाव यांच्यातील सीमा दिवसेंदिवस पुसट होऊ लागल्या आहे. त्यामुळे आपला नेमका अधिवास कोणता, हे वन्यप्राण्यांनाही कळेनासे झाले आहे. वन्यप्राण्यांचे स्वतःच्या बचावासाठी माणसांवर आणि माणसांचे स्वतःच्या संरक्षणासाठी वन्यप्राण्यांवर हल्ले सुरू  आहेत. येत्या काळात हा संघर्ष वाढणार आहे.
------------
वाघाच्या शिकारीचे वैशिष्ट
वाघ मार्जार कुळातील प्राणी आहे. अन्न साखळीतील सर्वांत टोकाचे स्थान वाघ भूषवतो. वाघ हा पूर्णत: मासांहारी प्राणी आहे. हत्ती वगळता कोणत्याही प्राण्याची शिकार करण्यास समर्थ आहे. सांबर हे वाघाचे सर्वांत आवडते खाद्य आहे. याशिवाय रानगवा, चितळ, भेकर, हरण, रानडुक्कर, नीलगाय, रानम्हैस आदी प्राण्यांच्याही शिकारी करतो. अल्पवयीन वाघ आईच्या मार्गदर्शनाखाली एकत्रित शिकार करतो. वाघ हा दबा धरून सावजाला न कळता शिकार करतो. पूर्ण वाढलेला वाघ साधारणपणे ६५ किमी/तास इतक्या वेगाने चाल करून जाऊ शकतो. तसेच वाघाची एक ढांग ५ते ६ मीटर पर्यंत जाऊ शकते. अतिवेगाने आणि भारदस्त वजनाच्या भरवशावर सावजाला खाली पाडतो. मोठ्या सावजासाठी गळ्याचा चावा घेण्याचा प्रयत्न करतो व श्वसननलिका ङ्कोडतो. सावज हलू नये यासाठी आपल्या नख्यांनी व ताकदवान पंज्यानी सावजाचा जीव जाईपर्यंत धरून ठेवतो. छोट्या प्राण्यांसाठी सरळ मानेचा लचका तोडतो. छोट्या सावजाची कवटी एका दणक्यात ङ्कोडतो. शिकार साधल्यावर ती कुणी नेवू नये म्हणून लपवून ठेवतो. एकदा शिकार केल्यानंतर भक्ष्याच्या आकारानुसार ती शिकार तीन ते सात दिवसांपर्यंत पुरते. वाघ महिन्यातून सरासरी तीन ते चार वेळा शिकार साधतात. शिकार खाण्याच्या आगोदर पोट चिरून आतडी पूर्णपणे बाहेर काढतो व लांबवर ङ्केकतो. त्यानंतरच शिकार खाण्यास सुरू करतो. भक्ष्यातील मांसल भाग खाण्यास वाघाची जास्त पसंती असते.
----------------
नरभक्षक वाघ
जो वाघ माणसांनाच नेहमीच भक्ष्य बनवतो, त्याला नरभक्षक वाघ असे म्हणतात. माणूस हा वाघांचे नैसर्गिक भक्ष्य नाही. वाघ माणसांशी संपर्क टाळतो. जर चुकून एखादा माणूस स्वरक्षणार्थ वाघाकडून मारला गेला, तर त्याला नरभक्षक म्हणणे चुकीचे आहे. जो वारंवार माणसांवर हल्ले करून माणसांनाच आपले भक्ष्य बनवतो, असाच वाघ नरभक्षक होय.
---------
बिबट
बिबट हा चपळ प्राणी आहे. बिबट्याच्या खाद्यामधे जास्त वैविध्य आहे. प्रांतानुसार बिबट्याच्या खाद्यात बदल होतो. बिबट खूर असलेल्या प्राण्यांची शिकार करतो. कधीकधी तो कोल्ह्यासारखे इतर लहान शिकारी प्राणीसुद्धा खातो. चितळ, सांबर, भेकर, चौqशगा व वानर यांची शिकार करतो. मात्र त्याला त्याच्या लहान आकारमानामुळे ङ्कार मोठी शिकार करणे शक्य होत नाही. उदा. मोठे सांबर qकवा नर नीलगाय, अशा भक्ष्यांची तो सहजासहजी शिकार करत नाही. सध्यास्थितीत जंगलात शिकार मिळत नसल्याने त्याला बक-या, गुरे व कुत्र्यांवर हल्ले करावे लागतात. हे प्राणी गाववेशीवरच सापडतात. त्यामुळे बिबट गावाशेजारच्या झुडपी जंगलात दबा धरून असतो. अशावेळी प्राण्यांऐवजी त्याचे हल्ले मानवांवर वाढलेले आहेत.
........................
  • भौगोलिक क्षेत्रळ- ११४४३ चौरस किलोमीटर
  • एकूण वनक्षेत्र ५००४ चौरस किलोमीटर
  • वनविभाग क्षेत्र- ३९६२ चौरस किलोमीटर
  • वन व महसूल क्षेत्र- १०२ चौरस किलोमीटर
  • वनविकास महामंडळ क्षेत्र - ९३९चौरस किलोमीटर
  • वनविभाग : मध्य चांदा, ब्रह्मपुरी आणि चंद्रपूर
  • अभयारण्य - ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्प

-------------
रस्त्याने वाहने चालविताना मनुष्य वाहतुकीचे नियम पाळतो, नाहीतर अपघात होते. अपघात होऊनही मनुष्य वाहने चालविणे सोडत नाही. त्यामुळे जंगलात जातानाही नियमांचे पालन केले पाहिजे. वाघ-बिबट्यांचे हल्ले कुणाला सांगून होत नाहीत. त्यामुळे असे हल्ले म्हणजे वन्यजीव सृष्टीतील अपघात होय.
- पी. कल्याणकुमारउपसंचालक, बझर झोन
-------
गेल्या १५ दिवसांतील सहा घटनांतील हल्ले जंगलाच्या आतील भागात झालेले आहेत. त्यामुळे या बिबट qकवा वाघाला नरभक्षक म्हणणे योग्य नाही. वाघ qकवा बिबट्याने गावात येवून हल्ला केला नाहीत. मानवाने स्वत:च्या स्वार्थासाठी जंगलात प्रवेश केलेला आहे. जंगल आमचे म्हणणा-या गावक-यांनी वन्यप्राणी वनविभागाचे म्हणू नये. गाव गावक-यांचे आहे, तर वन वन्यप्राण्यांचे आहे.- विनय ठाकरेविभागीय वनाधिकारी, चंद्रपूर
---------------
चंद्रपूर जिल्हा व्याघ्र जिल्हा म्हणून आपली स्वतंत्र ओळख निर्माण करीत आहे. या जिल्ह्यातील वनक्षेत्र ५० टक्के असून, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प याच जिल्ह्यात आहे. या वनक्षेत्रास जुडलेले इतर वनक्षेत्र या वन्यप्राण्यांचे भ्रमणमार्ग चांगल्या स्थितीत असल्यामुळे तसेच वन्यप्राणी संरक्षणाचा दर्जासुध्दा दिवसागणिक सुधारत आहे. आजघडीस जिल्ह्यात १०० पेक्षा अधिक वाघांची संख्या आहे. वाघापेक्षा अधिक बिबट्याची संख्या अधिक आहे. या वन्यप्राण्यांच्या सान्निध्यात असणा-या जंगलव्याप्त गावातील नागरिकांनी जंगलात जाताना नियम पाळणे गरजेचे आहे. या नियमांचे काटेकोरपणे आपण पालन केले तरच मवन्यजिव-मानव संघर्ष व ममानव-वन्यजिव संघर्ष आपण टाळु शकतो.- बंडू धोतरे, मानद वन्यजीव रक्षक
मोखाळा दारूबंदी समितीने दारू पकडली

मोखाळा दारूबंदी समितीने दारू पकडली


सावली- तालुक्यातील मोखाळा येथील महीला दारूबंदी समितीने दारूविक्री करणाÚया व्यक्तीस दारूसह पकडुन पोलीसाचे हवाली केले.
मोखाळा येथे अनेक वर्षापासुन खुलेआम अवैदय दारूविक्री सुरू आहे. यामुळे येथील अनेक महीलांचे संसार उध्वस्त होत आहेत. यामुळे येथील दारूबंदी समिती दारूबंदीची मोहीम राबवित आहे. शनीवारचे रात्रो महीलांनी गस्त घालुन सुरेश गोडसेलवार यास या अवैदय दारूविक्रेत्यास 1575 रूपये मालासह पकडुन पोलीसाचे हवाली केले. सदर विक्रेत्याकडे पिण्याचा परवाना असल्याने त्याचा विक्रीसाठी वापर करीत आहे त्यामुळे त्याचा पिण्याचा परवाना रद्द करण्याची मागणीही समितीने केली आहे. आठवडाभरापुर्वी हयाच समितीने तीन पेटी दारू पकडुन दिली होती. सदर दारू ही व्याहाड खुर्द येथील पटेल वाईन शाॅप व केरोडा येथील चिटनुरवार यांचे परवाना दुकानातुन पुरवठा होत आहे. गावात दोन तेलगु भाषीक व एक गावातील व्यक्ती अवैदय दारूविक्री करीत असतो. समितीच्या दारूबंदी मोहीमेमुळे दारूविक्रेते धास्तावले आहेत. सदर कारवाईत किरण शेंडे, सुशिला मशाखेत्री, मिराबाई मशाखेत्री, लिला उपासे, गयाबाई आजबले, मनुकाबाई मंगर, निर्मला भोयर, निंबुनाबाई मशाखेत्री, कासुबाई नागापुरे, उमेश आजबले, महादेंव कलसार सहभागी होते.  

Saturday, April 27, 2013

बिबट पिंज-यात सापडला

बिबट पिंज-यात सापडला

चंद्रपूर- ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पासह जिल्ह्यात बिबट आणि वाघाचा धुमाकूळ सुरु असून, वन विभागाने लावलेल्या पिंज-यात एक पूर्ण वाढीचा नर बिबट्या सापडला.
जंगलात सध्या नरभक्षक बिबट्याचा धुमाकूळ सुरु आहे. एकाच बिबट्याने आता पर्यंत ७ जणांचे बळी घेतले आहेत. या बिबट्याला गोळी घालून ठार करण्यासाठी ६ शूटर्स तैनात करण्यात आले आहेत. गेले ५ दिवस बिबट्याने कुठलाही बळी घेतलेला नाही. हि समस्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पा भोवतालच्या बफर क्षेत्रात मुख्यत्वे आढळून आली होती. या बफर क्षेत्रातील अनेक गावात बिबट्या पकडण्यासाठी पिंजरे लावण्यत आले आहेत. यातील एक पिंजरा बोर्डा गावातील जंगलात लावण्यात आला होता. या पिंज-यात एक पूर्ण वाढीचा नर बिबट्या सापडला आहे. हा बिबट्या अडकल्यावर या बिबट्याला  तातडीने चंद्रपूर शहरातील रामबाग वन वाटिकेत आणण्यात आले. हा बिबट्या व ७ जणांचे बळी  घेणारा बिबट्या एकच आहे किंवा काय याबाबत वरिष्ठ अधिकारी काहीही बोलण्यास तयार नाहीत. हा बिबट्या व कथित नरभक्षक  बिबट्याच्या अंगावरील पट्टे व ठिपके यांचा मेळ जुळून आल्यास वन विभागाच्या पिंज-यात योग्य बिबट्या आल्याची पुष्टी होऊ शकते. मात्र अधिकारी सध्या मौन बाळगून असल्याने याबाबत संभ्रमावस्था आहे.
बिबट जेरबंद करण्यासाठी दहा पिंजरे

बिबट जेरबंद करण्यासाठी दहा पिंजरे

अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक एस. एस. मिश्रा
    चंद्रपूर दि २७ : वन्यप्राणी मानव संघर्षाला कारणीभुत ठरणाऱ्या बिबटास जेरबंद अथवा ठार मारण्याच्या वन विभागाच्या कार्यवाहीचा अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक एस. एस. मिश्रा यांनी आढावा घेतला. बिबट जेरबंद अथवा ठार केले जाणार नाही तोपर्यंत याप्रकरणी केलेल्या कार्यवाहीचा दररोज आढावा घेण्यात यावा असे निर्देश त्यांनी दिले. दोन र्शाप शुटर, एक पुशुवैद्यकीय अधिकारी, टड्ढक्युलाईज साठी वनविभागचे एक तज्ञ, स्थानिक अशासकीय संस्था ग्रामस्‍थ यांचा समावेश आहे. त्यांना नेमून दिलेल्या १ गावात चोवीस तास गस्ती सुरू आहे. या व्यतीरिक्त पद्यमापुर व मामला येथे रॅपिड रिस्पॉन्स टीम तैनात करण्यात आली आहे. संबंधीत‍ टिम कडुन दर तासात बिबट चे हालचालीवर कंटड्ढोल रूमला माहिती देण्यात येत आहे. या व्यतिरीक्त बिबट्यास जरेबंद करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी १० पिंजरे लावण्यात आलेले आहे.
    वनविश्रामगृह चंद्रपूर येथे झालेल्या या आढावा बैठकीस मुख्य वनसंरक्षक बी. एस. के. रेड्डी, मुख्य वनसंरक्षक व संचालक (ताडोबा) विरेंद्र तिवारी, एफडीसीएम चे महाव्यवस्थापक संजय ठाकरे, उपसंचालक कल्याणकुमार, उपसंचालक दोडल, विभागीय वनअधिकारी विनय ठाकरे, वशिष्ट, तिखे व बंडु धोत्रे उपस्थित होते.
    सद्यस्थितीत बिबट्याचे बंदोबस्त करणेसाठी दिवस व रात्री प्रत्येकी तीन पथक कार्यरत असून चंद्रपूर येथे एक नियंत्रक कक्ष स्थापित करण्यात आले आहे. गठीत करण्यात आलेल्या प्रत्येक पथक सहाय्यक वनसंरक्षक यांचे अधिनस्त असून यात दोन र्शाप शुटर, एक पुशुवैद्यकीय अधिकारी, टड्ढक्युलाईज साठी वनविभागचे एक तज्ञ, स्थानिक अशासकीय संस्था ग्रामस्‍थ यांचा समावेश आहे. त्यांना नेमून दिलेल्या १ गावात चोवीस तास गस्ती सुरू आहे. या व्यतीरिक्त पद्यमापुर व मामला येथे रॅपिड रिस्पॉन्स टीम तैनात करण्यात आली आहे. संबंधीत‍ टिम कडुन दर तासात बिबट चे हालचालीवर कंटड्ढोल रूमला माहिती देण्यात येत आहे. या व्यतिरीक्त बिबट्यास जरेबंद करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी १० पिंजरे लावण्यात आलेले आहे.
    प्रभावित क्षेत्रात गावकऱ्यांमध्ये वन्यप्राण्यापासून सतर्कतेबाबत अशासकीय संस्था व स्थानिक गावकऱ्यांच्या मदतीने जनजागृती करण्यात येत आहे. बिबट्यास जेरबंद करण्यासाठी वनविभाग, पोलीस विभाग, स्थानिक अशासकीय संस्थेचे समन्वय व सहकार्याने कार्य करण्यात येत आहे. प्रभावित क्षेत्रातील ग्रामस्थांनी जंगलात एकटे जाण्याचे टाळण्याचे आवाहन करण्यात आले या सभेस प्रादेशिक वन्यजीव व वनविकास महामंडळाचे वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते. जोपर्यंत बिबट जेरबंद अथवा ठार केले जाणार तोपर्यंत दररोज या प्रकरणी केलेल्या कार्यवाहीचा आढावा घेतला जावा व आवश्यकतेनुसार रणनीतीत बदल करण्यात यावा असे निर्देश अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक एस. एस. मिश्रा यांनी दिले.

Friday, April 26, 2013

ठाणेदार प्रतापसिंग परदेशी निलंबित

ठाणेदार प्रतापसिंग परदेशी निलंबित

चंद्रपूर- वाहतूकदाराकडून दोन हजारांची लाच घेणारे चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी पोलिस ठाण्याचे ठाणेदार प्रतापसिंग परदेशी यांना पोलिस प्रशासनाने निलंबित केले. 
प्रतापसिंग परदेशी यांच्यासह दोघांना दोन हजारांची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली. त्यांचा रायटर व पोलिस शिपाई देवानंद अलोणे , असे अटकेतील अन्य आरोपीचेनाव आहे . त्यांच्या अटकेनंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने परभणी व धुळे जिल्ह्यातीलजिलानी येथील परदेशी यांच्या घराची झडती चालू केली आहे . १४ ऑगस्ट २०१२ पासून ते गोंडपिपरी येथे तैनात आहे . ट्रॉन् ‍ स्पोर्ट व्यावसायिक मनोज वनकरयांना परदेशी यांनी लग्नसराईदरम्यान कार चालविण्यासाठी दहा हजारांची मागणी केली होती. अलोणे यांच्यामार्फत ही मागणी करण्यात आली होती. २० एप्रिलला वनकर यांनी परदेशी यांना आठ हजार रुपये दिले. त्यानंतर उर्वरित दोन हजार रुपयांसाठी परदेशी यांनी वनकर यांचा छळ चालू केला. वनकर यांनी लाच लचुपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली. गोंडपिपरी येथे तैनातीपूर्वी परदेशी ब्रह्मपुरी येथे कार्यरत होते . त्यांचा कार्यकाळ वादग्रस्त ठरला होता, अशीही चर्चा आहे

Thursday, April 25, 2013

धानोरकर यांच्यावरील तडीपारी स्थगित

धानोरकर यांच्यावरील तडीपारी स्थगित

शिवसेना जिल्हाप्रमुख बाळू धानोरकर यांच्यावरील तडीपारी स्थगित

जिल्ह्याचे शिवसेना जिल्हा प्रमुख बाळू उर्फ सुरेश धानोरकर यांना चंद्रपुरसह ६ जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले होते  या तडीपारीने चंद्रपुर जिल्हयातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता असताना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कारवाईला स्थगिती दिली
सप्टेंबर २०१२ मध्ये हा आदेश जारी करण्यात आला होता मात्र त्याला धानोरकर यांनी गृहविभाग स्तरावर आव्हान दिले होते. अंतिम निर्णय नुकताच जाहीर झाला असून धानोर्कारांच्या तडीपारीवर गृह विभागाने शिक्कामोर्तब केले आहे.
बाळू धानोरकर यांचेवर दाखल असलेले २००६ पासूनचे अनेक गुन्हे यासाठी गृहीत धरण्यात आले आहेत. ही कारवाई २ वर्षांसाठी करण्यात आली आहे. बाळू धानोरकर यांच्याविरोधात एकूण २३ गुन्हे न्याय प्रविष्ट असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून यात दरोडा, सरकारी कामात अडथळे, हल्ला, मारहाण , जीवे मारण्याच्या धमक्या, दारुंबंदी , सरकारी मालमत्तेचे नुकसान यासारखे गुन्हे समाविष्ट आहेत. वर्धा, यवतमाळ, गडचिरोली, भंडारा, नागपूर व चंद्रपुर या ६ जिल्ह्यात हा मनाई आदेश लागू करण्यात आला आहे. चंद्रपुर जिल्ह्यात गेले १० वर्षे भद्रावती ही एकमेव नगर परिषद शिवसेनेच्या ताब्यात आहे.

Sunday, April 21, 2013

सुप्रिया सुळे ताडोबात

सुप्रिया सुळे ताडोबात


चंद्रपूर- राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा येथे भ्रमतीसाठी आल्याची जोरदार चर्चा सध्या आहे. दोन दिवसांपासून धनवटे फार्म हाऊसमध्ये मुक्काम ठोकल्याचे कळते . मात्र हा दौरा अत्यंत गोपनीय ठेवण्यात आला आहे . 

सुळे यांच्यासह १५ जण जंगल सफारीवर आले आहेत . गत दोन दिवसांपासून सुळे या ताडोबातमुक्कामी आहेत . शनिवारी त्यांनी तेलियाच्या जंगलात सफारी केली . या भागात त्यांना वाघिणींसहपाच बछड्याचे दर्शन झाले . भामदेही भागातही त्यांनी सफारी केली आहे . विशेष खबरदारीचा उपायम्हणून त्यांच्यासोबत असलेले चालक  गाईडचा मोबाइल बंद ठेवण्यास सांगण्यात आले आहे .सुरक्षेसाठी त्यांच्यासोबत पोलिसही तैनात करण्यात आले आहेत . परंतु त्यांचेही मोबाइल ऑऊटऑफ कव्हरेज आहेत . राज्यातील जंगलामध्ये कॅन्टरची सुविधा उपलब्ध नाही . ते वापरण्यातहीयेत नाही . परंतु सुळे यांच्या जंगल सफारीसाठी विशेष सोय करण्यात आली आहे . मध्य प्रदेशातूनएक नव्हे तब्बल चार ' कॅन्टर ' मागविण्यात आले आहेत . यामध्ये १७ जण एकाच वेळी जंगलसफारीचा आनंद घेऊ शकतात . याशिवाय पर्यटकांसाठी बंद करण्यात आलेल्या स्थळांवरही त्यांनीजंगल सफारीचा आनंद घेतला. २२ तारखेलात्या नागपुरात येणार असल्याचे समजते. सध्या अधिकारी वाघ आणि बिबट्याच्या हल्ल्ल्याच्या घटनेत व्यस्त असल्याने अधिक माहिती कळू शकली नाही 
--