সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Sunday, June 30, 2013

पुरस्कारांसाठी पत्रकारांकडून प्रवेशिका आमंत्रित

पुरस्कारांसाठी पत्रकारांकडून प्रवेशिका आमंत्रित

श्रमिक पत्रकार संघातर्फे स्पर्धा : एक ऑगस्ट रोजी पुरस्कार वितरण

चंद्रपूर  : चंद्रपूर-गडचिरोली श्रमिक पत्रकार संघातर्फे दरवर्षी दिल्या जाणाèया ग्रामीण वार्ता पुरस्कार, शुभवार्ता पुरस्कार, मानवी स्वारस्य अभिरुची वृत्तकथा आणि वृत्तछायाचित्र स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यासाठी १५ जुलैपर्यंत प्रवेशिका स्वीकारण्यात येणार आहेत.

दरवर्षी एक ऑगस्ट रोजी श्रमिक पत्रकार संघाच्या पुरस्कारांचे वितरण केले जाते. यात स्व. छगनलाल खजांची स्मृती ग्रामीण वार्ता पुरस्कार स्पर्धेत चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यातील ग्रामीण वार्ताहर भाग घेऊ शकतात. स्पर्धेसाठी प्रथम, व्दितीय आणि तृतीय अशा तीन पुरस्कारांसह दोन प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात येणार आहे. रोख पुरस्कार, स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. शुभवार्ता पुरस्कार केवळ चंद्रपूर शहरातील पत्रकारांसाठी असून, विधायक विषयावर झालेले लिखाण यासाठी पात्र समजण्यात येईल. लोकसेवा आणि विकास प्रतिष्ठा तर्फे प्रायोजित मानवी स्वारस्याच्या बातमीसाठी विशेष पुरस्कार देण्यात येणार असून पाच हजार रुपये रोख, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. ही स्पर्धा चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण पत्रकारांसाठी खुली राहील. इतिहास अभ्यासक अशोकसह ठाकूर प्रायोजित हौशी छायाचित्रकारांसाठी वृत्तछायाचित्र स्पर्धाही घेण्यात येणार असून, ज्यांचे छायाचित्र प्रादेशिक वर्तमानपत्रात प्रकाशित झाले आहे, असे छायाचित्रकार यात भाग घेऊ शकतात. रोख एक हजार रूपये, स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्कारासाठी एक एङ्क्रिल २०१२ ते ३१ मार्च २०१३ या कालावधीत प्रकाशित झालेले लिखाण आणि छायाचित्र ग्राह्य धरण्यात येईल, लिखाण मूळ स्वरूपात आवश्यक असून, भाषांतरित नसावे. स्पर्धा मराठी, qहद, इंग्रजी भाषेसाठी खुली आहे. स्पर्धेसाठी पाठविण्यात येणारे साहित्य मुळ प्रतीसह चार छायांकित प्रतीत असावे. मुळ साहित्यावर नाव नसल्यास त्या कालावधीत संबंधित वर्तमानपत्राचा प्रतिनिधी असल्याचा पुरावा प्रवेशिकेसोबत जोडावा. यापूर्वी दोनदा पुरस्कार मिळालेल्या विजेत्यांनी त्या पुरस्कारासाठी प्रवेशिका पाठवू नये. सर्व प्रवेशिका १५ जुलै पर्यंत स्पर्धा संयोजक, प्रेस क्लब जुना वरोरा नाका चंद्रपूर या पत्यावर पाठवाव्या, असे आवाहन स्पर्धा संयोजक जितेंद्र मशारकर, प्रशांत देवतळे, सुशील नगराळे यांनी केले आहे.

Friday, June 28, 2013

      सामाजिक न्याय विभागातर्फे 12 हजार लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ

सामाजिक न्याय विभागातर्फे 12 हजार लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ

  चंद्रपूर दि.28- सामाजिक न्याय विभागामार्फत अनुसूचित जातीतील लाभार्थ्यांसाठी कल्याणाच्या विविध योजना राबविण्यात येत असून चंद्रपूर जिल्हयातील 12 हजार 292 लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ देण्यात आला असून 42 हजार 512 विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले आहे.
    चंद्रपूर जिल्हयातील दारिद्रय रेषेखालील लोकांकरीता घरकुल योजना यशस्वीपणे राबविण्यात आली असून ग्रामीण क्षेत्राकरीता 11 हजार 422 व शहरी भागाकरीता 870 असे एकूण 12 हजार 292 घरकुलाचा लाभ दारिद्रय रेषेखालील लोकांना  देण्यात आला आहे.  सामाजिक न्याय विभागामार्फत चंद्रपूर जिल्हयात 8 वस्तिगृहे चालविले जात असून त्यामध्ये 225 विद्यार्थीनी व 450 विद्यार्थी असे एकूण 675 विद्यार्थी वस्तिगृहाचा लाभ घेत आहेत. 
    शिष्यवृत्ती थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याची महत्वाकांशी योजना सामाजिक न्याय विभागाने राबविली आहे.  चंद्रपूर जिल्हयात या योजनेअंतर्गत 42 हजार 512 विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले आहे.  शासनानी अनुसूचित जातीच्या महिला बचत गटांना मिनी ट्रॅक्टर देण्याची योजना राबविली असून या योजनेचे काम जिल्हयात प्रगतीपथावर आहे.
    सामाजिक न्याय विभाग चंद्रपूरला या वर्षी अनुसूचित जाती उपयोजनेअंतर्गत 42 कोटी 41 लाख 63 हजार इतक्या रुपयाचा निधी प्राप्त झाला होता.  या निधी मधून विविध विभागामार्फत योजना राबविल्या आहे.  यात प्रामुख्यांने अंपग कल्याणाचे खुप मोठे कार्य करण्यात आले.  अपंगाच्या संस्थेमध्ये जिल्हयात  एक हजार विद्यार्थी  शिक्षण घेत आहेत. 
    शैक्षणिक सत्र 2012-13 मध्ये 38 हजार 833 विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, 5 हजार 237 विद्यार्थींना सावित्रीबाई शिष्यवृत्ती, 1 हजार 209 विद्यार्थ्यांना शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, 3 हजार 563 विद्यार्थ्याना विद्यावेतन निर्वाह भत्ता, 3 हजार 679 विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क व परिक्षा शुल्क शिष्यवृत्ती व 111 विद्यार्थ्यांना सैनिक शाळा निर्वाह भत्ता वाटप करण्यात आला.  तसेच 36 युवक युवतींना सैन्य व पोलिस भरती पूर्व प्रशिक्षण देण्यात आले. 
    जिल्हयात विमुक्त जाती, भटक्या जमातीच्या विद्यार्थ्यांकरीता प्राथमिक व माध्यमिक तसेच कनिष्ठ महाविद्यालय असलेल्या एकूण 32 आश्रम शाळा असून यात 3 हजार 840 निवासी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.  सामाजिक न्याय विभागामार्फत 2 अनुसूचित जाती व नवबौध्द निवासी शाळा असून भिवकुंड येथे 60 मुले तर चिमूर येथे 50 मुली शिक्षणाचा लाभ घेत आहेत.
    शैक्षणिक सत्र 2013-14 पासून सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती, वस्तिगृह प्रवेश, विद्यावेतन, सैनिक शाळा शिष्यवृत्ती, छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती व इतर चार शैक्षणिक योजना ऑनलाईन करण्यात आल्या आहेत. 

Wednesday, June 26, 2013

जेरबंद बिबट्यांना दररोज १५ किलो मटणाचा पाहुणचार

जेरबंद बिबट्यांना दररोज १५ किलो मटणाचा पाहुणचार


पाच बिबट्यांना निसर्गमुक्तीची प्रतीक्षा : आहारावर महिन्याला दीड लाखांचा खर्च

देवनाथ गंडाटे : सकाळ वृत्तसेवा
चंद्रपूर, ता. २४ : एप्रिल-मे महिन्यात धुमाकूळ घालणाèया चार बिबट्यांना मागील दीड महिन्यापासून निसर्गमुक्त करण्यात आले नाही. त्यामुळे प्रत्येक बिबट्याला दिवसाला तीन किलो मटणाचा पाहुणचार वनविभाग करीत आहे. वनविभागाकडे सध्या यंदाचे चार आणि वर्षभरापूर्वीचा एक, असे एकूण पाच बिबटे असून, दिवसाला १५ किलो मटणाचा खर्च वनविभाग सोसत आहे.
ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर शहर आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागात बिबट्याच्या हल्ल्यात दीड महिन्यात १२ जण ठार झाले. वनखात्याने अनुक्रमे १४ एप्रिल, २७ एप्रिल आणि २९ एप्रिल रोजी मोहुर्ली, आगरझरी व मामला, पालेबारसा, माना टेकडी परिसरात qपजरे लावून चार बिबटे जेरबंद केले. यातील तीन बिबट्यांना मोहुर्ली येथे तर, एक बिबट रामबाग नर्सरीत जेरबंद करून ठेवण्यात आला आहे. गेल्या एक ते दीड महिन्यापासून चार बिबटे जेरबंद असून, पाहुणे बनून वनखात्याचा पाहुणचार घेत आहेत. याशिवाय वर्षभरापूर्वी सोमनाथ येथून आणलेला एक बिबट वनविभागाच्या दावणीला बांधून आहे. यंदा जेरबंद झालेल्या चारपैकी नेमका कोणता बिबट हल्लेखोर आहे, याची शहानिशा न झाल्याने त्यांना निसर्गमुक्त करण्यात आले नाही. त्यासाठी उपमुख्य वनसंरक्षक वन्यजीव मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली होती. ही समिती चारही जेरबंद बिबट्यांचा अभ्यास करून यासंदर्भातील अहवाल प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) एस.डब्लू.एच. नकवी यांच्याकडे सादर करणार होती. मात्र, यासंदर्भातील अहवाल व निर्णय अजूनही झालेला नाही. त्यामुळे चार बिबटे qपजèयात अडकून पडले आहेत. या चारही बिबट्यांना जंगलात सोडण्यापूर्वी मायक्रोचिप व रेडिओ कॉलर लावण्याचा निर्णय घेण्यात आला होता. याचा प्रत्येकी खर्च तीन ते साडेतीन लाख असल्याने व कॉलर वनखात्याला मिळत नसल्याने बिबटे qपजèयात अडकून पडले आहेत. त्यामुळे वनखात्याला त्यांच्या पाहुणचाराचा खर्च पेलावा लागत आहे. एका बिबट्याला दिवसाला तीन किलो मटण लागते. एकूण पाच पाहुणे असल्याने पाच हजार रुपयांचे मटण दिवसाला पुरवावे लागत आहे. त्यासाठी प्रतिकिलो ३३८ रुपये दराने मटण खरेदी केले जात असून, पाच बिबट्यांसाठी दररोज पाच हजार ७० रुपयांचा खर्च मटणावर होत आहे. पशुवैद्यकीय अधिकाèयांच्या सूचनेनुसार बिबट्यांना केवळ बकèयाचे मटण पुरविण्यात येत असल्याचे वनाधिकारी राऊतकर यांनी सांगितले.

  • ५-एकूण जेरबंद बिबट
  • ३- किलो मटण एका बिबट्याला
  • ३३८- रुपये प्रतिकिलो मटण
  • १५-किलो मटण दिवसाला.....पाच बिबट्यांसाठी
  • ५ हजार ७० रुपये दिवसाचा मटणाचा खर्च
  • १ लाख ५२ हजार १०० रुपये- ३० दिवसांचा खर्च

----------------
बिबट्यांना निसर्गमुक्त करण्याचा निर्णय अजूनही झालेला नाही. त्यामुळे मोहुर्ली येथे चार बिबटे qपजèयात आहेत. त्यांना सोडण्याची प्रक्रिया प्रशासकीय स्तरावर सुरू आहे.

- श्री. राऊतकर, वनपरिक्षेत्राधिकारी, मोहुर्ली.
कृषी पर्यटन

कृषी पर्यटन

चंद्रपूर, ता. २५ : पर्यटनासाठी येणाèया पर्यटकांना जिल्ह्यातील कृषी क्षेत्राची माहिती आणि शहरातील नागरिकांना मनोरंजनाच्या दृष्टीने कृषी विभागातङ्र्के कृषी पर्यटन साकारण्यात येत आहे. १० एकर जागेत भातशेती, गेमङ्किqशग, बांबू लागवड, ङ्कळांची झाडे, ऊस, qशगाडा शेती करण्यात येत आहे.
शेतीला पूरक जोडधंदे करून शेतकèयांची आर्थिक स्थिती मजबूत करण्याच्या दृष्टीने कृषी विभागातङ्र्के राबविण्यात येणाèया विविध योजना राबविल्या जातात. आधुनिक शेतीची माहिती शेतकèयांना मिळावी, यासाठी एकाच छताखाली मकृषी पर्यटनाङ्कच्या माध्यमातून कृषी विभागाची १० एकर पडीक जागा विकसित केली जात आहे. पोलिस मुख्यालयासमोरून वरोरा नाका चौकाकडे जाणाèया उड्डाणपुलाच्या शेजारी हा प्रकल्प साकारला जात आहे. एका बाजूने रेल्वेलाइन आणि दुसरीकडे उड्डाणपूल यामुळे हा प्रकल्प प्रवाशांना मोहित करेल. यात बांबू लागवड, qशगाडा शेती, भात शेती, करवंद, चिकूची झाडे लावण्यात येणार आहेत. हा प्रकल्प बगीचाच्या स्वरूपाने विकसित केला जात असल्याने तिथे पर्यटकांना भेट देता येईल. बसण्याची आसने, ङ्किरण्यासाठी पायवाटही तयार करण्यात येणार आहे. सध्या तयार करण्यात आलेल्या शेततळ्यावर विविध जातींचे पक्षी स्वछंद ङ्किरत असून, भविष्यात पक्ष्यांना पोषक वातावरण निर्मिती होऊन पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्रqबदू ठरेल. शेतीला पूरक व्यवसाय म्हणून कुक्कुटपालन, qशगाडा शेती, दुग्धोत्पादनही येथे केले जाईल. या माध्यमातून विक्री केंद्राची स्थापना करण्यात येणार असून, रोजगार निर्मिती होईल. हा प्रकल्प साकारण्यासाठी भद्रावती तालुक्यातील शेतकरी बंडू गोहत्रे आणि कृषी विभागाचे कर्मचारी ठवरे सहकार्य करीत आहेत.


२०० बाय १०० ङ्कुटांच्या शेततळ्यात गेमङ्किqशग सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी शुल्क आकारण्यात येणार असून, हौशींना मासे पकडण्याची संधी मिळेल. येथे विविध जातींचे मासे सोडण्यात येणार असून, प्रजननाची प्रक्रियासुद्धा केली जाईल. या माध्यमातूनही कृषी विभागाला अर्थार्जन होईल.

कृषी पर्यटनाची संकल्पना शेतकèयांना मार्गदर्शक आणि अभ्यासासाठी असली, तरी पर्यटकांनाही लाभ घेता येईल. पर्यावरणाचा समतोल राखून पक्ष्यांना मुक्तसंचार करण्यासाठी पोषक वातावरण निर्मिती केली जाईल.

- अशोक कुरील, कृषी अधीक्षक
      विद्यार्थ्यामध्ये शिक्षणाची गोडी निर्माण करा - पालकमंत्री संजय देवतळे

विद्यार्थ्यामध्ये शिक्षणाची गोडी निर्माण करा - पालकमंत्री संजय देवतळे

 पालकमंत्र्यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देवून विद्यार्थ्यांचे स्वागत
   चंद्रपूर दि.26- राज्य शंभर टक्के साक्षर व्हावे हे शासनाचे धोरण असून विद्यार्थ्यामध्ये अभ्यासाची आवड निर्माण करण्याची जबाबदारी शिक्षक व पालकांची असून एकही विद्यार्थी शाळाबाहय राहता कामा नये असे प्रतिपादन पालकमंत्री संजय देवतळे यांनी केले.  जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा लोहारा येथे शाळेच्या पहिल्या दिवशी आज पालकमंत्री संजय देवतळे  यांनी विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.
    प्रवेशोत्सव या कार्यक्रमाचे आयोजन लोहारा येथे करण्यात आले होते.  जिल्हाधिकारी सी.एस.डहाळकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.माधवी खोडे,  शिक्षण उपसभापती मनोज आत्राम, जिल्हा परिषद सदस्या मीरा खनके, पंचायत समिती सदस्य दयानंद बनकुवाले, सरपंच उज्वला वरखेडे, शिक्षणाधिकारी ओमप्रकाश गुडे, संवर्ग विकास अधिकारी माटे, गट शिक्षणाधिकारी रामटेके, सुभाष गौर व विनोद दत्तात्रय हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
    लोहारा येथील शाळेत आज पालकमंत्री संजय देवतळे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पाठयपुस्तक व पुष्पगुच्छ देवून शाळेचा पहिला दिवस प्रवेशोत्सव म्हणून साजरा करण्यात आला.  साक्षी गड्डमवार या विद्यार्थीचा आज वाढदिवस असल्याने पालकमंत्री देवतळे यांनी तिचे पुष्पगुच्छ देवून अभिनंदन केले.  वंश मेश्राम, शिल्पा येडके, नंदनी आत्राम व प्रिया मोरकुटे या विद्यार्थ्यांचे पहिल्या दिवशी शाळेत पालकमंत्र्यानी स्वागत केले. 
    शैक्षणिक गुणवत्ता विकास, शंभर टक्के पटनोंदणी  व शुन्य टक्के गळती यासाठी शासनाने राज्यभरात शाळेचा पहिला दिवस प्रवेशोत्सव म्हणून साजरा केला असून एकही विद्यार्थी शाळाबाहय राहू नये अशी प्रतिज्ञा पालकमंत्री संजय देवतळे यांनी पालकांना व नागरीकांना दिली.  विद्यार्थ्यांना नियमित शाळेत पाठवा, सुजान व सुदृढ नागरीक बनवा तसेच मुलांना कामावर पाठवू नका असे देवतळे यांनी यावेळी सांगितले.
    शिक्षण घेता घेता आनंद व आनंद घेता घेता शिक्षण ही बाब विद्यार्थ्यांच्या मनात रुजवा व विद्यार्थी शाळेत नियमित येवून चांगले नागरीक कशी बनतील यासाठी प्रयत्न करा असे आवाहन जिल्हाधिकारी सी.एस.डहाळकर यांनी याप्रसंगी केले.  आज सामाजिक न्याय दिवस असून मुलांना सामाजिक न्यायाचे महत्व पटवून देण्याबरोबरच त्यांच्यामध्ये देशाप्रती प्रेम निर्माण करण्याचे कार्य करा असे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.माधवी खोडे यांनी सांगितले.  मला काय बनायचे आहे ही बाब सुध्दा विद्यार्थ्यांच्या मनावर ठसवा आणि गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करा असा सल्ला त्यांनी दिला.  यावेळी सरपंच उज्वला वरखेडे यांचे भाषण झाले.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका श्रीमती खान यांनी केले.  तर श्रीमती लोखंडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.     

 शिक्षणाच्या माध्यमातूनच सामाजिक न्यायाची क्रांती शक्य    -- पालकमंत्री संजय देवतळे

शिक्षणाच्या माध्यमातूनच सामाजिक न्यायाची क्रांती शक्य -- पालकमंत्री संजय देवतळे



    चंद्रपूर दि.26- शाहू फुले, आंबेडकर यांचा सामाजिक न्यायाचा वारसा चालविणारे महाराष्ट्र हे राज्य असून छत्रपती शाहू महाराज यांनी शिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक न्यायाची क्रांती घडवून आणली त्यांचे विचार जनसामान्यापर्यंत पोहचविण्याचे काम सामाजिक न्याय विभाग करत असून शिक्षणातूनच सामाजिक न्याय साधणे शक्य होणार आहे असे प्रतिपादन पालकमंत्री संजय देवतळे यांनी केले.
    बचत साफल्य भवन येथे आयोजित सामाजिक न्याय दिन कार्यक्रमात ते बोलत होते.  जिल्हाधिकारी सी.एस.डहाळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.माधवी खोडे, मनपा आयुक्त प्रकाश बोखड, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण मंगेश वानखेडे व जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी पेंदाम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
    कार्यक्रमाच्या सुरवातीला उत्तराखंड येथे मृत्यूमुखी पडलेल्या भाविकांना श्रदांजली अर्पण करण्यात आली.  यावेळी बोलतांना पालकमंत्री म्हणाले की, छत्रपती शाहू महाराज यांचा सामाजिक न्यायाचा विचार जनमाणसामध्ये रुजविण्याची गरज आहे. सामाजिक न्यायाच्या योजनांचा लाभ घेवून आपला विकास साधावा हीच खरी शाहू महाराजांना आदरांजली ठरेल.
     उत्तराखंड येथे आलेल्या आपत्तीग्रस्तांना हातभार लावण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात कक्ष स्थापन करण्यात येणार असून जिल्हयातील नागरीकांनी व स्वयंसेवी संस्थांनी पंतप्रधान सहायता निधीमध्ये आपले योगदान या कक्षात जमा करावे असे आवाहन देवतळे यांनी याप्रसंगी केले.
    दलितमित्र डि.के.आरीकर व बी.व्ही.पाटील यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भुषण पुरस्कार मिळाल्याबद्दल पालकमंत्री संजय देवतळे यांनी सत्कार केला. आंतरजातीय विवाह करणा-या दांपत्य, अपंग साहित्य वाटप, शैक्षणिक कर्ज वाटप, सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती धनादेश तसेच उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार पालकमंत्री संजय देवतळे यांचे हस्ते करण्यात आला.  संगीत क्षेत्रात जिल्हयाचा नावलौकिक करणा-या अनिरुध्द वनकर व ई शिष्यवृत्तीसाठी आयडीबीआय चे राहूल वानखेडे यांचा या कार्यक्रमात विशेष सत्कार करण्यात आला.
    यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी डहाळकर म्हणाले की, सामाजिक न्यायाच्या योजना राबविण्यात महाराष्ट्र अग्रेसर असून वंचित घटकाला न्याय देण्याचे काम या विभागाने केले आहे.  डॉ.माधवी खोडे यांनी आपल्या भाषणात स्त्री शिक्षणाचा पुरस्कार करुन आंतरजातीय विवाहामुळे सामाजिक न्यायाचा पाया भक्कम होत असल्याचे सांगितले. सहाय्यक आयुक्त मंगेश वानखेडे यांनी जिल्हयातील विविध विकास योजनांचा आढावा प्रास्ताविकातून घेतला.  कार्यक्रमाचे संचालन पाटील यांनी केले.  या कार्यक्रमास समाज सेवक, नागरीक व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
    

Sunday, June 23, 2013

महिला व बालकल्याण अधिकारी अद्यापही बेपत्ता

महिला व बालकल्याण अधिकारी अद्यापही बेपत्ता

चंद्रपूरच्या यात्रेकरूंपैकी १५ जण परतीच्या मार्गावर
 पौनीकरांचे सहकारी यात्रेकरूही बेपत्ता

चंद्रपूर : उत्तराखंड राज्यातील केदारनाथ येथे यात्रेसाठी गेलेल्या जिल्ह्यातील एकूण १६ यात्रेकरूंपैकी जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी स्मिता पौनीकर यांचा अद्यापही ठावठिकाणा लागलेला नाही. याशिवाय त्यांच्या सोबत गेलेले नागपूर येथील अन्य पाचजण संपर्काबाहेर आहेत. त्या १८ जून रोजी शेवटच्या आढळल्या होत्या, अशी प्रशासनाकडे माहिती आहे.


यात्रेला गेलेल्या जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी स्मिता पौनीकर यांचा अद्यापही ठावठिकाणा लागलेला नाही. प्रशासनाने केलेल्या मोबाईल टॉवर ट्रेसनुसार त्यांचा अखेरचा संपर्क सोनप्रयाग येथे झाला. १८ जून रोजी त्या जंगमच्चेटी येथे चहा घेताना दिसून आल्याची माहिती प्रशासनाकडे आहे. पौनीकर यांच्यासोबत गोंदिया येथील एकात्मिक बालप्रकल्प अधिकारी हेमलता बावणकरविनोद खुरसमकरआरती खुरसमकरप्रदीप गुल्हाणेक्रिष्णा गुल्हानेस्वरुपा गुल्हाने यांचाही संपर्कही झाला नाही.
जिल्ह्यातील एकूण १६ भाविक ११ जूनपासून केदारनाथ येथे नागपूरमार्गे यात्रेला गेले. १८ पासून मुसळधार पावसानंतर महाप्रलय आल्यानंतर भाविकांचा संपर्क तुटला. या भाविकांना शोधण्यासाठी प्रशासनाने हालचाली सुरू केल्यानंतर काहींचा संपर्क झाला आहे. जिल्हा प्रशासनाकडे असलेल्या नोंदीनुसार ११ जून रोजी रेल्वेने यात्रेला गेलेले करुणा शोभावत (वय ५२), सुरेंद्र शोभावत (वय ५४), मनाली शोभावत (वय २३) या २३ रोजी ङ्करिदाबाद येथे थांबले आहेत. पियुष वैष्णव (वय २४) हा २३ रोजी सायंकाळपर्यंत चंद्रपूरला पोचणार होता. कमल अटल (वय ५१) व अक्षय अटल (वय ४५) हे वैष्णव देवी थांबलेले असून, परतीच्या मार्गावर होते. रमेश ठवकर आणि त्यांची पत्नी २० जून रोजी नागपूर येथे पोचले. हेमंत बुटन हे शनिवारी ब्रदीनाथ येथे होते. त्यांच्यासोबत कविता हेमंत बुटन (३८), खुशबू हेमंत बुटन (वय १५), खूशी हेमंत बुटन (वय १२), गणेश हेमंत बुटन (वय ८) आणि धनराज सोनी (वय ५० ) हेसुद्धा असून, रविवारी (ता. २३) त्यांना हेलीकॅप्टरद्वारे जोशीमठ येथे आणण्यात आले असून, ते सोमवारी हरिद्वारमार्गे चंद्रपूरला पोचत आहेत.
-------------------

काँग्रेसच्या नेत्याने नक्षलवाद्यांना पुरवली शस्त्रे

काँग्रेसच्या नेत्याने नक्षलवाद्यांना पुरवली शस्त्रे

गडचिरोली- सरकारी रुग्णवाहिकेतून नक्षलवाद्यांना शस्त्रास्त्र पुरवली जात असल्याचा धक्कादायक प्रकार गडचिरोलीमध्ये उघडकीस आलाय. तसंच यामागे एका बड्या काँग्रेस नेत्याचा हात असल्याचंही आरोपींच्या जबाबातून स्पष्ट झालंय.
काँग्रेसच्या नेत्याने नक्षलिंना शस्त्रास्त्र पुरविल्याचे पुढे आले. गडचिरोली लगत पोर्ला गावातल्या सरकारी रूग्णालयाची ही रुग्णवाहिका होती. भामरागड परिसरात पोलिसांनी सापळा रचून ही शस्त्रास्त्र हस्तगत केलीत. यात १० डिटोनेटर , AK 47 बंदुकीचे १० राउंड्स, १ किलो जिलेटीन काही जीवनावश्यक औषधी , पावसाळ्यात कामात येणारी ताडपत्री आदी साहित्य सापडलंय.


याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आलीये. छन्नुलाल शेंडे, जीवनलाल बोपचे, चालक संजीव चंद्रदास आणि मल्लेलवार यांचा चालक विवेक धाईत अशी त्यांची नावं आहेत. 

आरोपींनी काँग्रेसचे बडे स्थानिक नेते आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बंडोपंत मल्लेलवार यांच्या सांगण्यावरून ही शस्त्रास्त्र पुरवली जात असल्याची कबुली दिली आहे. यामुळे आता मल्लेलवार तसंच पोर्लाच्या आरोग्य केंद्राचे डॉक्टर रवींद्र करपे पोलिसांच्या रडारवर आलेत.

Friday, June 21, 2013

चंद्रपूरच्या गोंड साम्राज्याचे खरे  वारसदार

चंद्रपूरच्या गोंड साम्राज्याचे खरे वारसदार


चंद्रपूरच्या गोंड साम्राज्याच्या राणीला सध्या दोन वेळच्या जेवणाची भ्रांत पडलीय. गोंड साम्राज्याचे खरे वारस राजे दिनकरशाह आत्राम यांच्या अकाली मृत्युनंतर खोट्या वारसांनी अंथरुणाला खिळलेल्या राणीकडे दुर्लक्ष केले अन राजवाडा बळकावून त्यांना हाकलून लावलंय. सध्या राणी त्यांच्या परिचितांकडे राहून आयुष्याचे उरलले दिवस इतिहासाच्या वैभवशाली आठवणीत कंठत आहे.

राजे दिनकरशाह आत्राम... चंद्रपूरच्या गोंड साम्राज्याचे खरे वारसदार. दिनकरशाह आत्राम यांचा विवाह वयाच्या पन्नाशीत मध्यप्रदेशातील नरसिंगपूर येथील दिवाण राजघराण्यातील राजकुमारी दिवाण यांच्याशी ७ जुलै २००७ ला संपन्न झाला. चंद्रपुरात हे कुटुंब सुखाने नांदत होते. मात्र, दिनकरशाह यांचे २००९ साली निधन झाले आणि त्यांच्या निधनाबरोबरच राणी राजकुमारी आत्राम यांचा कठिण काळ सुरु झाला. राजांचे चुलत घराण्याचे वंशज वीरेंद्र शाह यांनी राजवाड्यात राहायला सुरुवात केली आणि राणी आत्राम यांना प्रत्येक निर्णयात, संपत्तीत आणि समाजात बेदखल करण्याचा सपाटा लावला. हे सारं काही गोंड साम्राज्याच्या सुमारे २० कोटी रुपयांच्या संपत्तीसाठी होत असल्याचं उघड झालं. राणी आत्राम यांना अतिशय हालाखीत दिवस काढावे लागले. आजारी पडलेल्या राणींकडे कुणीही लक्ष दिलं नाही. अखेर त्यांच्या एका मैत्रिणीने रुग्णालयात दाखल केलं. स्वतःच्याच राजवाड्यातून हकालपट्टी झालेल्या राणी आत्राम यांनी न्यायाची मागणी केलीय. 

राणी आत्राम यांच्यावर झालेल्या अन्यायाच्या विरुद्ध लढण्यासाठी त्यांना सर्वतोपरी मदत करणार असल्याचं त्यांच्या आप्तेष्टांनी सांगितलंय. चंद्रपूरचा गोंड राजपरिवार आजपर्यंत फारसा लोकांपुढे आला नाही. मात्र, या परिवारातील सत्तासंघर्ष धुमसत राहिला. एकीकडे संपन्नता व सुख पाहिलेल्या राणी आत्राम यांना कापड दुकानात नोकरी करण्याची वेळ आली होती यावरून त्यांच्या विपन्नावस्थेची कल्पना यावी. सध्याच्या राजांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला असला तरी राणी आत्राम मात्र न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत.
आनंदवन @६२ वर्षे

आनंदवन @६२ वर्षे

चंद्रपूर-ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांनी उभारलेल्या आनंदवनाला शुक्रवारी ६२ वर्षे पूर्ण होत आहेत .बाबांनी उभ्या केलेल्या या सामा ‌ जिक संस्थेचीजबाबदारी आता आमटे कुटुंबाच्या तिसऱ्या पिढीकडेआहे त्यामुळे आनंदवन आता केवळ आश्रम नव्हेतर श्रमतीर्थ ठरत आहे 
महारोगी सेवा समितीची स्थापना झाल्यानंतर राज्यसरकारने वरोराजवळील ५० एकर जागा आनंदवनआश्रमासाठी दिली दत्तपूरच्या कुष्ठधामातूनकुष्ठरोगांच्या सेवेच्या कार्याला सुरुवात झाली .साधनाताई आमटे डॉ विकास आमटे डॉ .प्रकाश यांच्यासह बाबांनी या कामाला सुरुवात केली .२१ जून १९५१ रोजी आचार्य विनोबा भावे तेलंगणाकडेभूदान पदयात्रेसाठी रवाना झालेत त्याआधीआनंदवनाचे उद्घाटन आचार्यांच्या हस्ते पार पडले पूर्वी काटेरी वनात असलेली ही संस्था आताकुष्ठरूग्णांसाठी कार्य करणारे वटवृक्ष ठरली आहे 
बाबा आमटे यांच्या कार्यातून आम्हाला प्रेरणा मिळत असते बाबांनी श्रमगीताच लिहिली आणिप्रत्यक्षात कृतीत आणली आनंदवनसाठी कार्य करतानाचा अनुभव वेगळाच होता असे ज्येष्ठकार्यकर्ते तथा महारोगी सेवा समितीचे विश्वस्त सुधाकर कडू यांनी मटा शी बोलताना सांगितले . ' तुमच्यातील ताकद समाजाला दाखवा ', असा संदेश बाबांनी कुष्ठरोगी अपंगांना दिल्याचेही कडूयांनी सांगितले 
पूर्वी अत्यंत छोट्या वास्तुत कार्यरत असलेल्या आनंदवनाला आता पक्की इमारत वीज जोडणी ,बँक पोस् ‍ ट ऑफीस शाळा कॉलेज दवाखाने अशा विस्ताराचर साथ लाभली आहे .आतापर्यंत आनंदवनातून २४ लाख विविध पातळीवरील लोकांना सहाय्य मिळाले आहे 
केवळ कुष्ठरुग्णांपुरते आनंदवन मर्यादीत नाही अंध अपंग मूकबधीर महिलांच्या कल्याणाचेकार्यही येथे केले जाते 

आनंदवनाच्या ध्येय दृष्टी व उद्द ‌ िष्टांना नवा आयाम देण्याची गरज आहे कुठल्याही नैतिकमूल्यांशी तडजोड न करता भविष्यात आनंदवनाचे कार्य आणखी व्यापक केले जाईल 
       कौस्तुभ आमटे सहाय्यक सचिव महारोगी सेवा समिती 
विष तस्करांची टोळीतील एकास वरो-यात अटक

विष तस्करांची टोळीतील एकास वरो-यात अटक

चंद्रपूर : सापाच्या विषाची तस्करी करणारी टोळी वन विभागाच्या अधिकार्‍यांनी गुरुवारी अकोल्यात जेरबंद केली. वन अधिकार्‍यांनी सापळा रचून वरोरा येथे सुशील सिरसाट यास अटक करण्यात आली. त्याच्याकडून 
१५  मीलि विष आणि साहित्य जप्त करण्यात आले आहे   
गुरुवारी सकाळी १0 वाजताच्या दरम्यान अकोला  शहरातील शिवाजी हायस्कूल जवळील संगम फोटो स्टुडिओमध्ये ही कारवाई करण्यात आली. सापाच्या विष तस्करीचे जाळे विदर्भात पसरले असल्याची वस्तुस्थिती यानिमित्ताने समोर आली. सापाच्या विषाची तस्करी अकोल्यातून होत असल्याची माहिती वन विभागाचे वार्डन देवेंद्र तेलकर यांना काही दिवसांपूर्वी मिळाली होती. त्यांनी याबाबत वन विभाग आणि वन्यजीव विभागास कळविले. या माहितीच्या आधारे कारवाई करण्यासाठी जाळे विणण्याचे काम मागील तीन महिन्यांपासून सुरू होते. विष तस्करांची टोळीतील एक जन वरोरा येथे असल्याची माहिती वन विभागास मिळाली आणि त्यानुसार सापळा रचून  सुशील सिरसाट यास अटक करण्यात आली.

Thursday, June 20, 2013

रिक्षांना इलेक्ट्रानिक्स मिटर बंधनकारक

रिक्षांना इलेक्ट्रानिक्स मिटर बंधनकारक

चंद्रपूर दि.20- राज्य शासनाच्या अधिसूचनेनुसार राज्याच्या शहरी भागातील ॲटो रिक्षांना इलेक्ट्रानिक्स मिटर बसविणे बंधनकारक करण्यात आले असून चंद्रपूर जिल्हयातील ॲटो रिक्षांनी 30 जून 2013 पूर्वी इलेक्ट्रानिक्स मिटर बसविणे अनिवार्य आहे असे निर्देश उपप्रोदशिक परिवहन अधिकारी प्रकाश गुंडावार यांनी दिले आहे.
     राज्य शासनाची ही अधिसूचना सर्वोच्च न्यायालयाने कायम केली असून सर्व ॲटोरिक्षा चालक व मालक यांनी दिलेल्या मुदतीच्या आत ॲटोरिक्षांना इलेक्ट्रानिक्स डिजीटल मिटर लावूनच आपले वाहन रस्त्यावर चालवावे अन्यथा मोटर वाहन कायदयातील तरतूदीनुसार कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी असे आवाहन प्रकाश गुंडावार यांनी केले आहे. 
अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी मोफत शिकवणी वर्ग

अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी मोफत शिकवणी वर्ग

 मानव विकास मिशनचा उपक्रम

      चंद्रपूर दि.20- नुकताच 10 वी व 12 वीचा निकाल लागला असून यात अनुत्तीर्ण झालेल्‍या विद्यार्थ्यासाठी मानव विकास कार्यक्रमांतर्गत मोफत शिकवणी वर्ग घेण्यात येणार असून या शिकवणी वर्गात प्रवेश मिळविण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी व मोठया गावात माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापकांशी संपर्क साधावा असे आवाहन मानव विकास कार्यक्रमाअंतर्गत करण्यात आले.
      ज्या तालुक्याचा मानव विकास निर्देशांक कमी आहे अशा तालुक्यातील मानवी जिवनांचा निर्देशांक उंचविण्यासाठी मानव विकास कार्यक्रमांतर्गत राजूरा, जिवती, गोंडपिपरी, पोंभूर्णा, मूल, सावली, सिंदेवाही, नागभिड, ब्रम्हपूरी, चिंमूर व वरोरा या तालुक्यात शिक्षण आरोग्य व उत्पन्न वाढीच्या योजना राबविण्यात येणार आहेत.  या कार्यक्रमाची यशस्वी अंमलबजावणी करण्याकरीता जिल्हया ऐवजी तालुकास्तरावर गट विकास अधिका-यांना अधिकार प्रदान केले आहेत. 
      या कार्यक्रमांतर्गत तालुक्याच्या मोठया गावात अभ्यासिका सुरु करणे, ग्रामीण भागातील सर्वच मुलींना इयत्ता 12 वी पर्यंत शिक्षण घेता यावे याकरीता गाव ते शाळा एस.टी.बसची सुविधा पुरविणे, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेला प्रयोग साहित्य देणे, तालुक्याच्या ठिकाणी विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान विषयक आवड निर्माण करण्यासाठी विज्ञान केंद्र स्थापन करणे, ग्रामीण भागातील युवकांना स्वयंरोजगाराकरीता व्यवसाय कौशल्य प्रशिक्षण देणे, 12 ते 18 वयोगटातील मुलींना आरोग्य विषयक समस्यांबाबत प्रशिक्षण देणे व दरडोई उत्पन्न वाढविण्यासाठी मदत करणे इत्यादी योजना या कार्यक्रमात राबविण्यात येणार आहेत. 
     या योजनांचा ग्रामीण भागातील विद्यार्थी, तरुण तरुणी व रोजगार करु इच्छिणा-या युवकांनी मोठया प्रमाणात घ्यावा असे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी सी.एस.डहाळकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.माधवी खोडे व जिल्हा नियोजन अधिकारी एम.एम.सोनकुसरे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर अथवा जिल्हा नियोजन अधिकारी नवीन प्रशासकीय इमारत चंद्रपूर येथे संपर्क साधावा.         

Thursday, June 13, 2013

युवकाचा बुडून मृत्यू

युवकाचा बुडून मृत्यू

चंद्रपूर : लोहारा येथील वनविभागाच्या विहिरीत एका युवकाचा बुडून मृत्यू झाला. मृत युवकाचे नाव राहुल सुभाष डोर्लीकर (वय १८, रा. क्रिष्णानगर) असे आहे. मंगळवारपासून राहुल बेपत्ता होता. गुरुवारी (ता.१३) सकाळी सातच्या सुमारास राहुलचा मृतदेह विहिरीत तरंगत असल्याचे दिसून आले. या घटनेची तक्रार रामनगर पोलिस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आली आहे.
गळफास लाऊन आत्महत्या

गळफास लाऊन आत्महत्या


घुग्घुस - आज सायंकाळी  ४ वाजता १९ वर्षीय मुलीने गळफास लाऊन आत्महत्या केली. रोसेलिना अशोक  कल्लापेल्ली असे या मृत तरुणीचे नाव असून, ती इंदिरानगर घुग्घुस येथील रहिवासी आहे. 
 इंटरसिटी एक्‍स्‍प्रेसवर बेछूट गोळीबार

इंटरसिटी एक्‍स्‍प्रेसवर बेछूट गोळीबार

पाटणा- नक्षलवाद्यांनी बिहारमध्‍ये भीषण नक्षलवादी हल्‍ला केला. नक्षलवाद्यांनी रेल्‍वेला लक्ष्‍य केले. नक्षलवाद्यांनी जमुई आणि लखीसराय या स्‍थानकांदरम्‍यान इंटरसिटी एक्‍स्‍प्रेसवर बेछूट गोळीबार केला. ही गाडी धनबाद येथून पाटण्‍याला जात होती. दुपारी 1.20 वाजताच्‍या सुमारास हल्‍ला झाल्‍याची माहिती आहे. हल्‍ला करण्‍यात आला ते ठिकाण पाटण्‍यापासून 150 किलोमीटर अंतरावर आहे. हल्‍ल्‍यामध्‍ये आरपीएफचा एक जवान शहिद झाला. तसेच ट्रेनचा चालक आणि दोन प्रवाशांचाही मृत्‍यू झाल्‍याची माहिती आहे. दोन प्रवासी पश्चिम बंगालचे रहिवासी होते. याशिवाय काही प्रवासी जखमी झाल्‍याचेही वृत्त आहे.  गाडीतील आरपीएफच्‍या एस्‍कॉर्ट पार्टीला नक्षलवाद्यांनी लक्ष्‍य केले. त्‍यांच्‍याकडील शस्‍त्रसाठा लुटण्‍याचा नक्षलवाद्यांचा हेतू होता. त्‍यात ते यशस्‍वीही झाले.

हल्‍ल्‍याची माहिती मिळताच सुरक्षा दलांना घटनास्‍थळी पाचारण करण्‍यात आले आहे. सीआरपीएफच्‍या दोन कंपन्‍या पाठविण्‍यात आल्‍याची माहिती अधिका-यांनी दिली. जीआरपीचा एक जवान गंभीर जखमी झाल्‍याचे वृत्त आहे.
नक्षलवाद्यांनी केली तीन जणांची हत्या

नक्षलवाद्यांनी केली तीन जणांची हत्या

गडचिरोली- एटापल्ली जंगलातील खनीज उत्खनन करणा-या कंपनीचा व्यवस्थापक आणि धातु उत्पादक कंपनीच्या उपाध्यक्षांसह तीन जणांची नक्षलवाद्यांनी हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. हत्या करण्यात आलेल्यांमध्ये स्थानिक पोलीस पाटलांचाही समावेश असल्याने परिसरात दहशत पसरली आहे.

येतापल्ली येथील सुळजागड जंगलात लोहखनिज उत्खननाला नक्षलवाद्यांचा विरोध आहे. यासंदर्भात अनेकदा नक्षलवाद्यांनी धमक्याही दिल्या होत्या. मात्र नक्षलवाद्यांचा विरोध झुगारुन काल हैद्राबादमधील हेमलता मिनरल कंपनीचे व्यवस्थापकीय संस्थापक मल्लीकार्जून रेड्डी आणि लॉयड मेटल कंपनीचे उपाध्यक्ष जसपालसिंग ढिल्लोण यांनी या भागात प्रवेश केला. काल सायंकाळी ६ ते ७ वाजण्याच्या सुमारास या दोहांसह त्यांना सोबत करणा-या संजीव सडमेक या स्थानिक पोलीस पाटलालाही नक्षलवाद्यांनी गोळ्या घालून ठार केले.

अतीशय दूर्गम भागात ही घटना घडल्याने या हत्याकांडाची माहिती आज सकाळी कळली. आज सकाळी सुरजागडाजवळील नमनेर गावातील एका लग्नाच्या ठीकाणी येऊन नक्षलवाद्याने आम्ही त्यांना ठार मारले आहे. त्यांच्या मृतदेहाला हात लावू नका, अशी धमकी देऊन तेथून पळ काढला. पोलीस या प्रकरणाची चौकशी करीत आहेत.

Wednesday, June 12, 2013

35 जिल्ह्यांतील आपत्ती व्यवस्थापन संकटात

35 जिल्ह्यांतील आपत्ती व्यवस्थापन संकटात

गोंदिया - मॉन्सूनला सुरुवात झाली. पावसाने आलेल्या पुराच्या पाण्याचा धोका अनेक गावांना बसतो. कमालीची जीवित व आर्थिक हानीही होते. या आपत्तीचे निराकरण करण्याकरिता राज्यभरातील जिल्हाधिकारी कार्यालयात "विशेष नियंत्रण कक्षा'ची स्थापना करण्यात आली.
या कक्षाचा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी हा प्रमुख असतो. हे पद मार्च महिन्यापासून रिक्‍त असल्याने आपत्ती व्यवस्थापन धोक्‍यात आले आहे. यामुळे राज्यातील 35 जिल्हे यामुळे प्रभावित आहेत. आपत्ती व्यवस्थापन अधिकारी जिल्हा प्रशासन आणि शासनातील दुवा असतो. परंतु, इतक्‍या महत्त्वपूर्ण पदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. नागपूरसह गोंदिया, भंडारा येथील नियंत्रण कक्षाचा कार्यभार स्वत: जिल्हाधिकाऱ्यांना सांभाळण्याची वेळ आहे. त्यामुळे आपत्तीपासून बचावासाठी नदीकाठच्या गावातील नागरिकांना धडे देण्याचेही काम ढेपाळले. संपूर्ण जिल्ह्याच्या आपत्तीचे तातडीने व्यवस्थापन लावण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी पद कंत्राटी तत्त्वावर भरण्यात येते. शासनाचा महसूल व वनविभागाअंतर्गत राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यंत्रणा राज्यभरातील नियंत्रण कक्षाचे संचालन करते. जिल्ह्यात उद्‌भवलेल्या आपत्तीची अपडेट माहिती मंत्रालयाला "टाईम टू टाईम' पुरविणे, वरिष्ठांच्या सूचनांचे पालन करणे, आपत्तीशी दोन हात करण्याचे प्रात्यक्षिक संवेदनशील गावातील नागरिकांना समजावून सांगण्याचे काम या अधिकाऱ्यांकडे आहे. हे पद एका वर्षांसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार भरण्यात येते. सध्या या पदाचा कंत्राटी कालावधी मार्च महिन्यातच समाप्त झाला. तीन महिन्यांचा कालावधी उलटला तरी हे पद भरलेच गेले नाही. कंत्राटबाह्य झालेल्या जिल्हा व्यवस्थापन अधिकाऱ्यांना शासनाकडून आदेश येऊन आपण पूर्ववत होऊ, अशी आशा लागून आहे. या पदाला कायमस्वरूपी करण्यासाठी माजी मुख्य सचिव जे. पी. डांगे यांनी पुढाकार घेतला होता. मात्र, या प्रस्तावाचे नेमके काय झाले, ते कळायला मार्ग नसल्याचे मत गोंदिया, भंडाराच्या व्यवस्थापन अधिकाऱ्यांचे आहे. पावसाचे संकट तोंडावर असताना नागरिकांना पूरस्थितीपासून वाचविण्याचे प्रशिक्षण, त्यांच्यात जाणीव जागृती, स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने पथनाट्याद्वारे जागृती आदी कार्यक्रमही या प्रकाराने थंडबस्त्यात पडलेत. गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्याची स्थिती अतिशय नाजूक आहे. पूर्वीच महसुली कर्मचाऱ्यांची संख्या येथे कमी आहे. याशिवाय, प्रत्येक जिल्ह्याला 40 लाखांचा निधी पूरस्थितीपासून बचाव करण्याकरिता आला होता. तोही पुरेशा मनुष्यबळाअभावी खर्चच झाला नसल्याची ओरड आहे....
पदे भरण्यासाठी आदेशच नाहीत
डॉ. अमित सैनी, जिल्हाधिकारी, गोंदिया जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांचे पद हे कंत्राटी आहे. 31 मार्चलाच त्यांचा कालावधी संपला. हे पद भरण्यासाठी शासनाचे ठोस आदेशच आले नाही. पावसाळा समोर असल्याने तात्पुरता भार व जिल्ह्याचे नियोजन म्हणून काम निवासी जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आले. आदेशानंतर संपूर्ण प्रक्रिया करण्यात येईल.
जेडीयु-भाजप युती तुटणार?

जेडीयु-भाजप युती तुटणार?


 पाटणा (बिहार)
लोकसभेची निवडणूक होण्याआधीच पंतप्रधान पदाचे स्वप्न पाहणारे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी भाजपशी युती तोडण्याची तयारी सुरू केली आहे. भाजपने नरेंद्र मोदी यांना लोकसभेसाठी निवडणूक प्रचार समितीचे प्रमुख केल्यामुळे नितीशकुमार भाजपवर नाराज झाले आहेत.
मोदींना राजकीय स्पर्धक मानणा-या नितीशकुमार यांनी मोदींच्या हाती महत्त्वाची जबाबदारी येताच भाजपशी असलेली युती तोडण्याचे संकेत दिले आहेत. आजपासून (बुधवार) संयुक्त जनता दल (जेडीयु) पक्षाचे दोन दिवसांचे अधिवेशन कटिहार येथे सुरू झाले आहे. या अधिवेशनादरम्यान जेडीयु-भाजप युतीचे भवितव्य निश्चित होईल, असे नितीश समर्थक सांगत आहेत. मात्र संयुक्त जनता दल (जेडीयु) पक्षाचे अध्यक्ष शरद यादव यांनी अद्याप युती तोडण्याबाबतचा निर्णय घेतलेला नाही. पक्षातील सर्व प्रमुख नेते आणि पदाधिकारी यांच्याशी चर्चा करुन निर्णय घेतला जाईल असे शरद यादव यांनी सांगितले. नितीशकुमार समर्थक मात्र नरेंद्र मोदी यांच्याशी नेत्याशी जुळवून घेणे अवघड असल्याचे बोलत आहेत.
दरम्यान, नितीशकुमार यांच्या हालचाली भाजपमध्येही नाराजी पसरली आहे. भाजपशी असलेली युती तोडायचीच असेल तर नितीशकुमार यांनी आधी बिहारच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा; अशी मागणी भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सी. पी. ठाकूर यांनी केली आहे.