वरोरा/प्रतिनिधी :
गेल्या सहा दिवसापासून साई वर्धा पॉवर जनरेशन कंपनी विरोधात पूर्व व्रत कामावर घेण्याच्या मागणी साठी ५० कामगार अन्नत्याग आंदोलनाला बसले होते . मात्र सहा दिवस लोटूनही कंपनी व्यवस्थापना पाझर न फुटल्याने आ .बाळू धानोरकर यांनी उपोषण स्थळ भेट कामगारांना उपोषण सोडण्यास सांगितले व कामगारांना न्याय मिळवून देण्याचे आश्वसन दिले त्या नंतर कामगारांनी उपोषण सोडले .