সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Sunday, April 28, 2013

वन्यजीव-मानव संघर्ष बिबट-मानव संघर्ष



मानव-वन्यजीव संघर्षात महत्त्वाचा प्राणी हा बिबटे आहे. बिबट हा कुठलाही परिस्थितीत स्वतःला जुळवून घेतो. अगदी मानवी वसाहतीसलगत असलेल्या जंगल सदृश अधिवासात तो राहतो. बिबट्याचे आवडते खाद्य कुत्रे व डुकरे आहेत. ज्या जंगलव्याप्त गावालगत अस्वच्छता, घाण व उकिरडे असेल, तिथे या प्राण्यांची संख्या अधिक असते. अशाप्रकारचे गावे म्हणजे बिबट्याच्या अधिवासाचे पोषक असे वातावरण आहे. यामुळे बिबट्यासारखा प्राणी गावालगत वावरतो.. या गावातील कुत्र्यांची संख्या रोडावली की, मोकाट व मध्यम आकाराच्या पाळीव जनावरांना बिबट शिकार बनवितो. अशा परिस्थिती बिबट गावात येणे व शिकार करणे, अशा घटनांत वाढ होते. गावात व गावालगत बिबट्याचा वावर असल्यावर अगदी पहाटे शौचास जाणा-या गावक-यांवर या बिबट्याच्या हल्ल्याची शक्यता वाढते. यातूनच बिबट्याचा गावातील वाढलेला वावर म्हणजेच मवन्यजीव-मानव संघर्ष qकवा मबिबट-मानव संघर्ष होय.

 मानव-वन्यजीव संघर्ष:                                  
 या प्रकारात गावक-यांचा गावालगतच्या जंगलात प्रवेश झाल्यानंतर वन्यप्राण्यांचे हल्ले होतात. जंगलात दैनंदिन गरज म्हणून सरपणासाठी जंगलात जाणे, रानमेवा-तेंदू संकलन करण्याकरिता, मोहा वेचण्याकरिता व बांबू तोडण्याकरीता जंगलात जाण्याचे प्रमुख कारणे आहेत. मोहा, तेंदू व रानमेवा संकलन करताना सदर गावकरी दाट जंगलात वन्यप्राण्यांच्या अधिवासात प्रवेश करतात. संकलनाचे सर्व कामे बसून करीत असताना मनुष्याच्या हालचाली या एखाद्या प्राण्यांसारख्या होत असल्याने जवळ असणारे वाघ-बिबट हल्ला चढवितो. हा हल्ला इतका जोरदार असतो की यात सदर मनुष्यप्राणी जागीच मृत्यू पावतो. या संघर्षास मानव-वन्यजीव संघर्ष म्हणतात. यात वाघ, बिबट, अस्वल व रानडुक्कर यांचा समावेश असतो.

जंगलात कशासाठी                                  
रानमेवा, मोहङ्कूल, तेंदूपाने संकलनासाठी नागरिक जंगलात जातात. शिवाय वर्षभर इंधनासाठी लागणा-या सरपण गोळा करण्याकरिता जंगलात ये-जा असते. अवैध शिकारीकरिता व बांबू तोडण्याकरिता मजुरांचा प्रवेश असतो.

२४ मार्च : पालेबारसा : सावली : अनसूया शेंडे
६ एप्रिल सादागडसावली : धृपदाबाई गजानन मडावी
१० एप्रिल : आगरझरी : मूल : तुकाराम धारणे आणि मालनबाई मुनघाटे
११ एप्रिल : पाथरी : सावली : ललिता आनंदराव पेंदाम
१२ एप्रिल : चारगाव : भद्रावती :निलिमा कोटरंगे 
१७ एप्रिल : पायली भटाळी गावातील प्रीती बंडू काटकर
17 एप्रिल किटली- गोपिका काळसर्पे

--------------------

25 दिवसांत 8 ठार

चंद्रपूर : जिल्ह्यातील जंगलग्रस्त भागात सध्या वाघ आणि बिबट्याच्या हल्ल्याच्या घटनांत वाढ झाली आहे. गेल्या २० दिवसांत एकापाठोपाठ एक अशा एकूण सहा जणांचा जीव गेला. या सर्व घटना गाववेशीवरच्या जंगलातच घडल्या आहेत.
२४ मार्च रोजी सावली तालुक्यातील उसरपारचक परिसरात मोहङ्कूल वेचणा-या अनसूया शेंडे या महिलेवर हल्ला झाला. या घटनेच्या दोन दिवसांपूर्वीच पालेबारसा येथील गोसेखुर्दच्या कालव्यावर मजूर म्हणून कामाला गेलेल्या पाच महिलांवर झाडावर बसलेल्या बिबट्याने झडप घेतली होती. यातील एक महिला जखमी झाली. या घटनेमुळे ग्रामस्थ भयभीत असताना अवघ्या चार-पाच किलोमीटर अंतरावरील उसरपारचक येथील अनसूयाबाई शेंडे या महिलेचा बळी गेला. घटनेनंतर ग्रामस्थांनी वनविभागावर रोष व्यक्त केल्याने बिबट्याला त्याच दिवशी जेरबंद करण्यात आले. बिबट नर असून, अडीच वर्ष वयोगटातील आहे. या परिसरात घनदाट जंगल आहे. आसोलामेंढा तलावाकडे जाणा-या कालव्यांमध्ये थोडेङ्कार पाणी असते. त्यामुळे वन्यप्राणी या परिसरात भटकंती करीत असतात. त्यानंतर याच तालुक्यातीलच सादागड येथे ध्रुपदाबाई गजानन मडावी या महिलेला बिबट्याने ठार केले. या दोन्ही घटनांचे अंतर सुमारे २५ किलोमीटर आहे. चार ते पाच वयोगटातील हा बिबट मादी असून, त्यालाही जेरबंद करण्यात आले आहे. त्यानंतर १० एप्रिल रोजी ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या बर झोनमध्ये असलेल्या आगरझरी येथे बिबट्याने दोन जणांना ठार केले. मृत तुकाराम धारणे (वय ७०) हे आपल्या नातेवाइकांना सोडून परत येत असताना मोहङ्कूल वेचण्यासाठी थांबले. त्याचवेळी त्यांच्यावर बिबट्याने हल्ला केला. या घटनेची माहिती कळताच मृतदेह पाहण्यासाठी आगरझरी आणि अडेगावच्या नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. यावेळी बिबट तिथेच कुठेतरी लपून बसला होता. मुख्य रस्त्याच्या वळणावर त्याने हा मृतदेह बघण्यासाठी जाणा-या मालाबाई मुनघाटे (वय ६५) हिच्यावर झडप घेतली. या दोन्ही घटना ५० मीटर अंतरावर घडल्या. घटनास्थळापासून अवघ्या काही अंतरावर ती असल्याने लोकांनी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत बिबट्याने तिचा बळी घेतला होता. त्यानंतर सलग तीन दिवस वाघ आणि बिबट्याचा संघर्ष सुरू राहिला. ११ एप्रिल रोजी सावली तालुक्यातील पाथरी वनविकास महामंडळाच्या पाथरी जंगलातील कक्ष क्रमांक १६२मध्ये मोहङ्कूल वेचणा-या ललिता आनंदराव पेंदाम या महिलेवर वाघाने हल्ला केला. त्यानंतर दुस-या दिवशी १२ एप्रिल रोजी चोरगाव जंगलात बिबट्याने  सोळा वर्षीय नीलिमा कोटरंगे हिला ठार केले. या घटनेत तिची आई qसधू कोटरंगे गंभीर जखमी झाली. एकूणच या घटनांमध्ये वाघ-बिबट्यांनी वयस्क आणि अल्पवयीन गटातीलच व्यक्तींना लक्ष्य केले. याचाच अर्थ असा की, हिस्त्रपशू कमजोर व्यक्तींचीच शिकार केलेली आहे.
-----------------
मोह वेचणा-यांवरच हल्ले का?                       
झाडीपट्टीत मोहङ्कुलांची झाडे मोठ्या संख्येने आहेत. सावली, मूल, qसदेवाही, नागभीड आणि चंद्रपूर तालुक्याच्या काही भागात मोहङ्कूल संकलनाचे काम मोठ्या प्रमाणात चालते. साधारणतः मार्च-एप्रिलपासून मोहङ्कूल संकलनाचे काम सुरू होते. मोहङ्कूल वेचण्याकरिता पहाटे चारपासून जाणे सुरू होते. पहाटेला निघणारा शुक्राचा तारा वाटसरूंना मार्ग दाखवितो. मोहङ्कूल पडण्याची वेळ वेगळी असते. यात काही मोहवृक्ष पहाटे चार ते सकाळी १० वाजेपर्यंत ङ्कुले पडतात. काही मोहवृक्ष मध्यरात्री पडतात. त्यामुळे जास्तीत-जास्त मोह वेचण्यासाठी ग्रामीण महिलांमध्ये स्पर्धा होते. पहाटेच्या अंधारात मोहङ्कूल योग्यपद्धतीने वेचता यावे,यासाठी झाडाखालचा पालापाचोळा जाळण्यात येतो. जी व्यक्ती सर्वप्रथम आग लावून सासङ्काई करेल, त्याचे ते झाड ठरले असते. मोहङ्कूल वेचणा-या सर्व महिला qकवा पुरुष खाली वाकतात. कुणी शौचास बसल्यासारख्या स्थितीत असतात. मोहङ्कूल वेचताना एकाग्रता असते. अशावेळी एखादा प्राणी जवळून गेलातरी कुणी लक्ष देत नाहीत. दुसरीकडे मोहङ्कूल वेचताना बसण्याची स्थिती बघून वन्यप्राण्यांना तृणभक्षक प्राणी असल्याचे प्रारंभी जाणवते. त्यामुळे शिकारीच्या दृष्टीने हल्ला होतो. गेल्या १५ दिवसांत जिल्ह्यात झालेले सर्व हल्ले मोहङ्कूल संकलन करीत असतानाच झाले आहेत. बिबट्याने केलेले हल्ले पहाटे qकवा सकाळच्या सुमारास झालेले आहेत. त्यातही शौचास बसलेल्यांवरच हल्ले झालेले सर्वेक्षणातून दिसून येते. गेल्या १५ दिवसांपासून उन्ह तापत असल्याने मोहङ्कूल मोठ्या प्रमाणात पडत आहे. त्यामुळे मोहङ्कूल संकलनासाठी ग्रामस्थांमध्ये स्पर्धाच लागली आहे. आता तेंदूपाने तोडणीची कामेही सुरू होतील. वाघ-बिबट्यांच्या अधिवासाच्या भागात लोकांची गर्दी झाल्याने हल्ल्याची शक्यता वाढली आहे.
-----------------------
मार्च २००९ पूर्वीच्याच्या साडेतीन वर्षांत वाघ व बिबट्याच्या हल्ल्यात ४५ लोकांचे बळी गेले. २०१० या वर्षात जिल्ह्यात वन्यप्राण्यांच्या हल्यात १५ ठार, तर १९७ जखमी झालेत. त्यातही एक हजार ३७९ पाळीवप्राणी ठार झाले. यातील १३ मृतांचे वारस, १३४ जखमी व ७९० पशुधन हानीच्या प्रकरणात ७३ लाख ३६ हजार रुपयांच्या मदतीचे वाटप वनखात्याने केले आहे. २००८-०९ मध्ये सर्वाधिक ५२०० पाळीव प्राणी वन्यजीवांच्या हल्ल्यात ठार झालेत. सर्वांत कमी २००९-१० या वर्षात १८४३ पाळीव प्राण्यांना जीव गमवाला लागला. २०१२- २०१३ पर्यंत ही संख्या दोन हजारावर गेली आहे.
--------------------------------
राज्यात सर्वाधिक जंगल असलेल्या या जिल्ह्यात ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प आणि वाघांच्या अस्तित्वामुळे व्याघ्र जिल्हा म्हणून घोषित होईल. मात्र, गेल्या पाच वर्षांपासून वाघ व इतर वन्यप्राण्यांचा धुमाकूळ हाच विषय चर्चेत आहे. जिल्ह्यात शंभरावर पट्टेदार वाघांची नोंद घेण्यात आली आहे.
------------------------
मानवाने आपल्या स्वयंविकासासाठी निसर्गावर अतिक्रमण केले आहे. शहरी भागातील जंगल उद्योगांनी बळकावले. हरिण, चितळ, रानडुक्कराची शिकार होऊ लागल्याने वाघ, बिबट्याला जंगलात खाद्य मिळत नाही. यामुळेच ते खाद्याच्या शोधात गावाजवळ येऊ लागले आहेत. पाळीव प्राण्यांच्या शिकारीचे प्रमाण वाढले. जंगलात पाळीव प्राण्यांची चराई होते. त्यामुळे पाळीव प्राणी वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात ठार होण्याचे प्रमाण वाढलेले आहे. जलस्रोत आटत असल्याने पाण्याच्या शोधार्थ वन्यप्राणी गावकुसाकडे धाव घेऊ लागले आहेत. गेल्या एक दशकात हा संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. त्यामागे वेगवेगळी कारणे असली तरीही, उन्हाळ्यात उन्हाच्या झळांसोबत या संघर्षाच्या झळादेखील तीव्र होऊ लागल्या आहेत. वन्यप्राण्यांच्या मकॉरिडॉरवर झालेल्या अतिक्रमणामुळे जंगल आणि गाव सीमा आता नष्ट होऊन मानव आणि प्राणी संघर्ष सुरू झाला आहे. मुख्य अधिवास असलेल्या जंगलातील भक्ष्य कमी झाल्यामुळे, पाणवठे कोरडी झाल्यामुळे qकवा नैसर्गिक स्त्रोत संपल्यामुळे एका जंगलातून दुस-या जंगलात त्यांचे स्थलांतर होत असताना त्याचा कॉरिडॉर सुरक्षित राखणे गरजेचे आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत हे स्थलांतर मोठ्या प्रमाणावर होते. त्यामुळे अशा परिस्थितीतसुद्धा मानव-वन्यजीव संघर्षाची ठिणगी उडण्याची दाट शक्यता असते.
राना-वनात वास्तव्य करणा-या वन्य प्राण्यांचे जीवन धोक्यात आल्याने त्यांनी मानवी वस्तीत निवारा शोधण्याकडे आपला मोर्चा वळविला आहे. हा प्रकार गेल्या पन्नास वर्षांपूर्वीपासून नव्हता. गेल्या दशकापासून हा प्रकार वाढलेला असून, गेल्या चार-पाच वर्षांत वन्य प्राण्यांचे मानवी वस्तीवर हल्ला वाढलेले आहेत. ही समस्या गंभीर का बनत आहे, याचा विचार वेळीच व्हायला हवा. त्यावर प्रभावी विचार झाला नाही तर, वन्य प्राण्यांबरोबरच मानवी जीवन आणखी धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
-------------
                                                 उपाय             
  • पहाटे, सकाळी qकवा सायंकाळी जंगलात प्रवेश करू नये.
  • जंगलात दुपारच्याच सुमारास जावे.
  • जाताना एकटे न जाता गटाने प्रवेश करावा.
  • जंगलात वन्यप्राण्यांचे आवाज ऐकूनच पुढे पाऊल टाकावे.
  • शारीरिकरित्या अशक्त व्यक्तींनी जंगलात जावू नये.
  • जंगलात असताना हातात काठी ठेवून आवाज करावा.

-------------------
बेसुमार भूउत्खनन, बेकायदेशीर व्यवसाय थांबायलाच हवेत. नैसर्गिक संपत्तीचे संवर्धन व्हायलाच हवे. रानडुक्करांची शिकार करण्याची चटक लागलेले लोक ङ्कासे लावतात. त्या ङ्काशात रानडुक्कराऐवजी बिबटे अडकून पडल्याचे काही प्रकार उघडकीस आले आहेत. ही बेकायदेशीर हत्या थांबवणे गरजेचे आहे.

वन्यप्राणी व मानव यामधील वाढता संघर्ष दोन्ही घटकांना हानिकारक आहे. दोन्ही घटकांचे जीवन धोक्यात आणणारा आहे. म्हणून वरकरणी क्षुल्लक वाटणा-या या विषयावर सकारात्मक दृष्टीकोन ठेवून विचारमंथन व्हायला हवे. हे विचारमंथन वन्य प्राणी करू  शकत नाहीत. ते सामाजिक प्राणी असलेल्या मनुष्यानेच करायला हवे.
---------------------
मानव-वन्यप्राणी संघर्षाच्या सर्वाधिक घटना विदर्भात घडलेल्या आहेत. २००७ मध्ये तळोधीला नरभक्षक वाघिणीने धुमाकूळ घातला होता. तेव्हापासून नरभक्षकांना गोळ्या घालण्याचे प्रसंग उद्भवत आहेत. वाघाला ठार मारल्यामुळे नागभीड qकवा लगतच्या तालुक्यातील ग्रामस्थांच्या समस्या सुटलेल्या नाहीत. एखादी घटना घडल्यानंतर गावकरी बिबट-वाघाच्या बंदोबस्ताची मागणी करतात. त्यामुळे रोष शांत करण्यासाठी वनविभागाला qपजरा लावून जेरबंद करण्याची कारवाई करावी लागते. या प्रकारामुळेही हल्ल्याची समस्या सुटलेली नाही. उलट जेरबंद झालेला वाघ-बिबट qपज-यातून सुटल्यानंतर अधिक तीव्र होऊन हल्ले करू लागला आहे.
------------------

प्राण्यांवर दया करा
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील आष्टा गावाजवळून इरई धरणाचा कालवा वाहतो. तिथे काही दिवसांपूर्वी गर्भवती वाघिणीवर गावक-यांनी दगडङ्केक केली. गर्भवती असल्यामुळे तिच्या हालचाली संथ होत्या. जिवाच्या आकांताने वाट ङ्कुटेल तिकडे पळत वाघीण बचावासाठी मार्ग शोधू लागली. धिप्पाड वाघिणीच्या करुण धावपळीकडे गावक-यांनी करमणुकीच्या नजरेने बघितले. आष्टा येथील एका गावक-यांच्या घरात तिने ठिय्या मांडला. सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास तिचे दर्शन झाल्यामुळे हलकल्लोळ माजला. वाघिणीने गावालगतच्या एका शेतातील धानाच्या ढिगा-याजवळ ठाण मांडले होते. अशावेळी मनुष्यानेही सावधगिरी बाळगून वन्यजीवांचे रक्षण केले पाहिजे.
----------------
उन्हाळ्यात आटणारे पाणवठे आणि पर्यटकांचा अतिरेक यामुळे वन्यप्राण्यांच्या एकूणच दिनचर्येवर परिणाम झाला आहे. एरवी निशाचर समजले जाणारे वाघ दिवसाढवळ्या गावाकडे वळू लागले आहेत. जंगल आणि गाव यांच्यातील सीमा दिवसेंदिवस पुसट होऊ लागल्या आहे. त्यामुळे आपला नेमका अधिवास कोणता, हे वन्यप्राण्यांनाही कळेनासे झाले आहे. वन्यप्राण्यांचे स्वतःच्या बचावासाठी माणसांवर आणि माणसांचे स्वतःच्या संरक्षणासाठी वन्यप्राण्यांवर हल्ले सुरू  आहेत. येत्या काळात हा संघर्ष वाढणार आहे.
------------
वाघाच्या शिकारीचे वैशिष्ट
वाघ मार्जार कुळातील प्राणी आहे. अन्न साखळीतील सर्वांत टोकाचे स्थान वाघ भूषवतो. वाघ हा पूर्णत: मासांहारी प्राणी आहे. हत्ती वगळता कोणत्याही प्राण्याची शिकार करण्यास समर्थ आहे. सांबर हे वाघाचे सर्वांत आवडते खाद्य आहे. याशिवाय रानगवा, चितळ, भेकर, हरण, रानडुक्कर, नीलगाय, रानम्हैस आदी प्राण्यांच्याही शिकारी करतो. अल्पवयीन वाघ आईच्या मार्गदर्शनाखाली एकत्रित शिकार करतो. वाघ हा दबा धरून सावजाला न कळता शिकार करतो. पूर्ण वाढलेला वाघ साधारणपणे ६५ किमी/तास इतक्या वेगाने चाल करून जाऊ शकतो. तसेच वाघाची एक ढांग ५ते ६ मीटर पर्यंत जाऊ शकते. अतिवेगाने आणि भारदस्त वजनाच्या भरवशावर सावजाला खाली पाडतो. मोठ्या सावजासाठी गळ्याचा चावा घेण्याचा प्रयत्न करतो व श्वसननलिका ङ्कोडतो. सावज हलू नये यासाठी आपल्या नख्यांनी व ताकदवान पंज्यानी सावजाचा जीव जाईपर्यंत धरून ठेवतो. छोट्या प्राण्यांसाठी सरळ मानेचा लचका तोडतो. छोट्या सावजाची कवटी एका दणक्यात ङ्कोडतो. शिकार साधल्यावर ती कुणी नेवू नये म्हणून लपवून ठेवतो. एकदा शिकार केल्यानंतर भक्ष्याच्या आकारानुसार ती शिकार तीन ते सात दिवसांपर्यंत पुरते. वाघ महिन्यातून सरासरी तीन ते चार वेळा शिकार साधतात. शिकार खाण्याच्या आगोदर पोट चिरून आतडी पूर्णपणे बाहेर काढतो व लांबवर ङ्केकतो. त्यानंतरच शिकार खाण्यास सुरू करतो. भक्ष्यातील मांसल भाग खाण्यास वाघाची जास्त पसंती असते.
----------------
नरभक्षक वाघ
जो वाघ माणसांनाच नेहमीच भक्ष्य बनवतो, त्याला नरभक्षक वाघ असे म्हणतात. माणूस हा वाघांचे नैसर्गिक भक्ष्य नाही. वाघ माणसांशी संपर्क टाळतो. जर चुकून एखादा माणूस स्वरक्षणार्थ वाघाकडून मारला गेला, तर त्याला नरभक्षक म्हणणे चुकीचे आहे. जो वारंवार माणसांवर हल्ले करून माणसांनाच आपले भक्ष्य बनवतो, असाच वाघ नरभक्षक होय.
---------
बिबट
बिबट हा चपळ प्राणी आहे. बिबट्याच्या खाद्यामधे जास्त वैविध्य आहे. प्रांतानुसार बिबट्याच्या खाद्यात बदल होतो. बिबट खूर असलेल्या प्राण्यांची शिकार करतो. कधीकधी तो कोल्ह्यासारखे इतर लहान शिकारी प्राणीसुद्धा खातो. चितळ, सांबर, भेकर, चौqशगा व वानर यांची शिकार करतो. मात्र त्याला त्याच्या लहान आकारमानामुळे ङ्कार मोठी शिकार करणे शक्य होत नाही. उदा. मोठे सांबर qकवा नर नीलगाय, अशा भक्ष्यांची तो सहजासहजी शिकार करत नाही. सध्यास्थितीत जंगलात शिकार मिळत नसल्याने त्याला बक-या, गुरे व कुत्र्यांवर हल्ले करावे लागतात. हे प्राणी गाववेशीवरच सापडतात. त्यामुळे बिबट गावाशेजारच्या झुडपी जंगलात दबा धरून असतो. अशावेळी प्राण्यांऐवजी त्याचे हल्ले मानवांवर वाढलेले आहेत.
........................
  • भौगोलिक क्षेत्रळ- ११४४३ चौरस किलोमीटर
  • एकूण वनक्षेत्र ५००४ चौरस किलोमीटर
  • वनविभाग क्षेत्र- ३९६२ चौरस किलोमीटर
  • वन व महसूल क्षेत्र- १०२ चौरस किलोमीटर
  • वनविकास महामंडळ क्षेत्र - ९३९चौरस किलोमीटर
  • वनविभाग : मध्य चांदा, ब्रह्मपुरी आणि चंद्रपूर
  • अभयारण्य - ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्प

-------------
रस्त्याने वाहने चालविताना मनुष्य वाहतुकीचे नियम पाळतो, नाहीतर अपघात होते. अपघात होऊनही मनुष्य वाहने चालविणे सोडत नाही. त्यामुळे जंगलात जातानाही नियमांचे पालन केले पाहिजे. वाघ-बिबट्यांचे हल्ले कुणाला सांगून होत नाहीत. त्यामुळे असे हल्ले म्हणजे वन्यजीव सृष्टीतील अपघात होय.
- पी. कल्याणकुमारउपसंचालक, बझर झोन
-------
गेल्या १५ दिवसांतील सहा घटनांतील हल्ले जंगलाच्या आतील भागात झालेले आहेत. त्यामुळे या बिबट qकवा वाघाला नरभक्षक म्हणणे योग्य नाही. वाघ qकवा बिबट्याने गावात येवून हल्ला केला नाहीत. मानवाने स्वत:च्या स्वार्थासाठी जंगलात प्रवेश केलेला आहे. जंगल आमचे म्हणणा-या गावक-यांनी वन्यप्राणी वनविभागाचे म्हणू नये. गाव गावक-यांचे आहे, तर वन वन्यप्राण्यांचे आहे.- विनय ठाकरेविभागीय वनाधिकारी, चंद्रपूर
---------------
चंद्रपूर जिल्हा व्याघ्र जिल्हा म्हणून आपली स्वतंत्र ओळख निर्माण करीत आहे. या जिल्ह्यातील वनक्षेत्र ५० टक्के असून, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प याच जिल्ह्यात आहे. या वनक्षेत्रास जुडलेले इतर वनक्षेत्र या वन्यप्राण्यांचे भ्रमणमार्ग चांगल्या स्थितीत असल्यामुळे तसेच वन्यप्राणी संरक्षणाचा दर्जासुध्दा दिवसागणिक सुधारत आहे. आजघडीस जिल्ह्यात १०० पेक्षा अधिक वाघांची संख्या आहे. वाघापेक्षा अधिक बिबट्याची संख्या अधिक आहे. या वन्यप्राण्यांच्या सान्निध्यात असणा-या जंगलव्याप्त गावातील नागरिकांनी जंगलात जाताना नियम पाळणे गरजेचे आहे. या नियमांचे काटेकोरपणे आपण पालन केले तरच मवन्यजिव-मानव संघर्ष व ममानव-वन्यजिव संघर्ष आपण टाळु शकतो.- बंडू धोतरे, मानद वन्यजीव रक्षक

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.