সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Saturday, July 28, 2018

पोर्णिमा दिवसानिमित्त मनपा-ग्रीन व्हिजील तर्फे विधान भवन परिसरात जनजागृती

*नागपूर,ता. २७ :*  नागपूर महानगरपालिका व ग्रीन व्हिजील फाऊंडेशनच्या वतीने पौर्णिमा दिवसानिमित्त विधान भवन चौक येथे जनजागृती अभियान राबविण्यात आले. अनावश्यक विद्युत दिवे बंद करण्याचे आवाहन ग्रीन व्हिजीलच्या स्वयंसेवकांनी परिसरातील व्यापाऱ्यांना केले.
या जनजागृती कार्यक्रमात आमदार प्रा. अनिल सोले सहभागी झाले. यावेळी त्यांनीही स्वयंसेवकांचा उत्साह वाढविला. स्वयंसेवकांसोबत त्यांनीही व्यापाऱ्यांना ऊर्जाबचतीचे महत्त्व समजावून सांगितले. नागपूर महानगर पालिका आणि ग्रीन व्हिजीलच्या संयुक्त विद्यमाने नागपुरात सुरू असलेल्या पौर्णिमा दिवस उपक्रमाची दखल राष्ट्रीय पातळीवर घेतली जाऊ लागल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे कौस्तभ चॅटर्जी याबाबत बोलताना म्हणाले,  आमदार अनिल सोले यांच्या मार्गदर्शनात हा उपक्रम गेल्या काही वर्षांपासून अविरत राबविण्यात येत आहे. दिवसेंदिवस या उपक्रमात नागरिकांचा सहभाग वाढत असून आता उत्स्फूर्तपणे अनावश्यक वीज दिवे पोर्णिमा दिवसाव्यतिरिक्त अन्य दिवशीही नागरिक बंद ठेवत असल्याचे ते म्हणाले.
यावेळी स्वयंसेवकांनी व्यापाऱ्यांसोबतच विधान भवन चौकातील सिग्नलवर थांबलेल्या वाहनचालकांना वीज बचतीचे महत्त्व सांगितले. या जनजागृती अभियानात नागपूर महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता संजय जयस्वाल, कनिष्ठ अभियंता सुनील नवघरे, गजेंद्र तारापुरे, ग्रीन व्हिजील फाऊंडेशनच्या टीम लीडर सुरभी जैस्वाल, मेहुल कोसरकर, कल्याणी वैद्य, विष्णूदेव यादव, कार्तिकी कावळे, दादाराव मोहोड, दिगंबर नागपुरे आदी सहभागी झाले होते.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.