काव्यशिल्प Digital Media: अहमदनगर

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu
Showing posts with label अहमदनगर. Show all posts
Showing posts with label अहमदनगर. Show all posts

Thursday, January 31, 2019

राहिबाई पोपेरेंना कृषीरत्न पुरस्कार प्रदान

राहिबाई पोपेरेंना कृषीरत्न पुरस्कार प्रदान

 विष्णू तळपाडे(अकोले-अहमदनगर):

बदलापुर येथील कोळी महादेव समाज संघटना,आदिवासी विचार मंच महाराष्ट्र राज्य,वधुवर परिचय मेळावा,गोतेभाऊ स्नेह संमेलन,आदिवासी संस्कृती मेळावा आणि आदिवासी संस्कृती सन्मान सोहळा पार पडला.यावेळी अकोले तालुक्यातील बीजमाता राहिबाई पोपेरे यांना कृषीरत्न पुरस्कार व निसर्गवासी किसन इष्टे यांना आदर्श शेतकरी पुरस्कार देण्यात आला.
कार्यक्रमाचे उद्घाटन भाऊसाहेब पारधी व सुरेश बांडे यांनी केले.अध्यक्ष स्थानी प्रकाश धिगे हे होते.या वेळी आदिवासी सेवक पुरस्कार प्राप्त शंकर अस्वले GSTचे सहाय्य आयुक्त मुरलीधर बांडे नगरसेवक संदिप लोटे,धर्मा लोखंडे आदी मान्यवर उपस्थित होते.मंडळाची भूमिका व कार्य शिवाजी सुरकुले यांनी सांगितले.प्रस्तावीक भारती उडे यांनी केले,तसेच सूञसंचालन सुधीर साबळे यांनी केले तर आभार किसन भारमल यांनी मानले.
सांगवी ग्रामपंचायत मध्ये गोंधळाचे वातावरण

सांगवी ग्रामपंचायत मध्ये गोंधळाचे वातावरण

अकोले(अहमदनगर)विष्णु तळपाडे:

सांगवी ग्रामसभा ताणतणावात पार पडली.सत्ताधारी प्रश्न सोडवत नाहीत,असे विरोधक व ग्रामस्थ यांचे म्हणणे आहे.सांगवी-दगडवाडी गावचा प्रश्न हा दिवसेंदिवस गंभीर होत चालला असून यावर ग्रामपंचायतीचे कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नसल्याचे आज पहावयास मिळते.ह्या ग्रामपंचायतीला आज मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध असून देखील विकास कामानकडे दुर्लक्ष केले जाते.ह्या ग्रामसभेत फक्त नि फक्त गडबड आणि गोंधळ होताना पहायला मिळत आहे.अनेक कामं ग्रामसभेत माडली जातात,परंतु विरोध, हमरी-तुमरी यामध्ये राहुन जातात.
मागे घरकुलाचा सव्हेॕ केला;त्यावेळी प्रत्येक सरव्हे मागे प्रतिव्यक्ती 100 रु.घेण्यात आले.याशिवाय नोंदणी होणार नाही,असे सांगून फक्त नि फक्त कमवण्याचे साधन म्हणून लक्ष दिले.हा सर्व्हे विनामुल्य होता.गावच्या विकासाच्या दृष्टीने ही ग्रामपंचायत अपयशी असल्याचे बोलले जाते.याठिकाणी कोणत्याच प्रश्नांनवर सविस्तर चर्चा होत नाही.
मासिक सभा महिला सभा ह्या आज पर्यत होतात हे कोणत्याही गावकर्याना माहित नाहीत याचे कारण ह्या सभा फक्त कागदोपत्री दाखवल्या जातात.त्यामुळे महिलाच्या समस्या पडून राहतात.
हलक्या प्रतिची कामे करून एक प्रकारे निधी लाटण्याचा प्रकार समोर येताना दिसतोय.
यावेळी या ठिकाणी ग्रामसेवक श्री साबळे ,सरपंच नंदु तळपाडे,जि.प.प्रा.शाळेचे शिक्षक,वायरमन,वाचमन,शिपाई ,अरोग्य सेविका,सदस्य आणि गावकरी मोठ्या संख्या नी उपस्थित होते.
सांगवी ग्रामपंचायत मध्ये गोंधळाचे वातावरण !

सांगवी ग्रामपंचायत मध्ये गोंधळाचे वातावरण !

अकोले (अहमदनगर) खबरबात/प्रतिनिधी

-विष्णु तळपाडे

सांगवी ग्रामसभा ताणतणावात पार पडली.सत्ताधारी प्रश्न सोडवत नाहीत,असे विरोधक व ग्रामस्थ यांचे म्हणणे आहे.सांगवी-दगडवाडी गावचा प्रश्न हा दिवसेंदिवस गंभीर होत चालला असून यावर ग्रामपंचायतीचे कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नसल्याचे आज पहावयास मिळते.ह्या ग्रामपंचायतीला आज मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध असून देखील विकास कामानकडे दुर्लक्ष केले जाते.ह्या ग्रामसभेत फक्त नि फक्त गडबड आणि गोंधळ होताना पहायला मिळत आहे.अनेक कामं ग्रामसभेत माडली जातात,परंतु  विरोध, हमरी-तुमरी यामध्ये राहुन जातात.

       मागे घरकुलाचा सव्हे केला;त्यावेळी प्रत्येक सरव्हे मागे प्रतिव्यक्ती 100 रु.घेण्यात आले.याशिवाय नोंदणी होणार नाही,असे सांगून फक्त नि फक्त कमवण्याचे साधन म्हणून लक्ष दिले.हा सर्व्हे विनामुल्य होता.गावच्या विकासाच्या दृष्टीने ही ग्रामपंचायत अपयशी असल्याचे बोलले जाते.याठिकाणी कोणत्याच प्रश्नांनवर सविस्तर चर्चा होत नाही.

     मासिक सभा महिला सभा ह्या आज पर्यत होतात हे कोणत्याही गावकर्याना माहित नाहीत याचे कारण ह्या सभा फक्त कागदोपत्री दाखवल्या जातात.त्यामुळे महिलाच्या समस्या पडून राहतात. हलक्या प्रतिची कामे करून एक प्रकारे निधी लाटण्याचा प्रकार समोर येताना दिसतोय. यावेळी या ठिकाणी ग्रामसेवक श्री साबळे ,सरपंच नंदु तळपाडे,जि.प.प्रा. शाळेचे शिक्षक,वायरमन,वाचमन, शिपाई , अरोग्य सेविका, सदस्य आणि गावकरी मोठ्या संख्या नी उपस्थित होते.

Friday, January 25, 2019

#krushimahotsav प्रारंभ

#krushimahotsav प्रारंभ

khabarbat.in

खबरबात प्रतिनिधी-विष्णु तळपाडे अकोले (अहमदनगर)

-८व्या कृषीमहोत्सवाचे जानेवारी २०१९चे आयोजन श्री स्वामी समर्थ कृषीविकास विरुध्द संधदान धर्मादाय ट्रस्ट,नाशिक येथे २५-२९जानेवारी रोजी ग्लोबल अँग्रीकल्चर एक्झिबिशन२०१९अंतर्गतआयोजित केले जात आहे.तरीही या कार्यक्रमाचे ठिकाण-डोगरे वस्तिगृह मैदान,गंगापुर रोड,नाशिक( महाराष्ट्र )या ठिकाणी आयोजित केलेला आहे.तरीही याठिकाणी खालील कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहेत,राष्ट्रीय कृषी प्रदर्शन,शेतीची चांगली निर्मिती,आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती,नवीकरणीय आणि निरनिराळ्या प्रकारच्या निर्यातीसाठी आपण कंपोस्ट ,साधने,शेतीविषयक औषधे,यंत्रसामग्री,जैवतंत्रज्ञान,विविध शेती विज्ञान आणि आधुनिक कृषि विज्ञान यांच्या  विविध उपयोगांचे प्रदर्शन करणाऱ्या भारतीय व विदेशी कंपन्या यांच्या भेटी संपूर्ण ऊर्जा वैविध्यपुर्ण प्रदर्शन आणि शेतीचा वारसा,कृषीपर्यटन आशा निरनिराळ्या उत्सवांचे साप्ताहिक आधारित पशुधन व पशुजन्य उपचारांनविषयी मार्गदर्शन,दुर्मिळ वनस्पती व आरोग्य संगोपन या विषयी माहिती प्रदान करण्यात येणार आहे.
            शेती पर्यटन या प्रदर्शनात अँग्रो टुरिझम असे विशेष वैशिष्ट्ये समाविष्ट आहेत.हा शेतकऱ्यांना पर्यायी दुय्यम पर्याय आहे,म्हणूनच रोजगार निर्मिती भारतीय संस्कृतीचा प्रचार,पर्यावरणाची स्थिरता आणि उपनिषद माहिती ही कृषी महोत्सवाचे वैशिष्ट्ये आहेत .
अधिक माहितीसाठी www.krushimahotsav.org या वेबसाईटला भेट देऊ शकता..krushimahotsav

Saturday, January 19, 2019

संगमनेर;भीषण अपघातात दोघाचा जागीच मृत्यू

संगमनेर;भीषण अपघातात दोघाचा जागीच मृत्यू

विष्णू तळपाडे:अकोले(अहमदनगर):
दि.१८जाने२०१९ लग्नासाठी पुण्याला जाणाऱ्या नाशिक येथील संत्रास व वाळेकर कुंटुंबीयांच्या कारला संगमनेर नजीक मालपाणी पार्किग गेट जवळ स्विफ्ट कारचा सकाळी ७:५७वाजता भीषण अपघात झाला.महामार्गावर मालट्रकला कार धडकल्याने दोन जण जागीच ठार झाले,तर४जण गंभीर जखमी झाले आहेत.मृतांनमध्ये पिंपळगाव बसवंत येथील तरुण व नाशिक येथील मुलाचा तर जखमीन मध्ये ३महिलाचा समावेश आहे.अपघात इतका भीषण होता की,कारचालकास पत्रा कापून बाहेर काढावे लागले.
नाशिक-पुणे महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू 4 गंभीर
                            अधिक माहिती अशी की,नाशिक येथील जयंतराव श्यामसुंदर सांत्रास हे नाशिक महापालिकेच्या अग्नीशमन विभागात सेवेत आहेत.त्याची  बहिण उर्मिला सरडे ह्या पुण्यात राहतात,त्याच्या मुलीचे शनिवार दि.१९ रोजी लग्न असल्याने जयंतराव सांत्रास त्यांच्या पत्नी मोहिनी,मुलगा आर्यन तिघेही राहणार नाशिक शिंगाडा तलाव सारडा सर्कल-नाशिक येथील असून मुलगी देवयानी वाळेकर,जावाई भुषण वाळेकर रा.पिंपळगाव बसवंत आणि सासू उषा शरद लोहारकर हे सर्व स्विफ्ट कारने(MH15-DS-7665)शुक्रवारी सकाळी नाशिकहुन पुण्याकडे निघाले होते.संगमनेर शहराजवळ मालपाणी स्कवेअर जवळ मालट्रक GJ06Y8386 ही वळण घेत असताना कारने जोराची धडक देत धक्कादायक अपघात घडला.

Monday, January 14, 2019

 अकोले तालुक्यात दुष्काळ जाहीर करा:आदिवासी बांधवांची मागणी

अकोले तालुक्यात दुष्काळ जाहीर करा:आदिवासी बांधवांची मागणी

विष्णू तळपाडे/अकोले(अहमदनगर):
दुष्काळ साठी इमेज परिणाम
राज्यातील पाणी टंचाई लक्षात घेऊन शेकडो गावांमध्ये दुष्काळ जाहिर करण्यात आला.मंत्री मंडळाच्या दुष्काळ निवारण समिती च्या बैठकीत याविषयी निर्णय घेण्यात आला.मात्र वर्षानुवर्षे दुष्काळी असलेल्या आदिवासी तालुक्यांविषयी कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही .याबाबत मुख्यमंत्री यांनी तात्काळ आदेश देऊनही आदिवासी भागात अद्याप कोणत्याही प्रकारची कार्येवाही झालेली दिसत नाही .तेव्हा आदिवासी भागात तत्काळ दुष्काळ जाहिर करावा,आशा प्रकार ची मागणी आज अकोले तालुक्यातील आदिवासी बांधव करताना दिसतात .

आदिवासी भागात पाऊस सर्वाधिक असतो.बहुतेक धरणे ही आदिवासी भागात येतात .धरणांनसाठी आदिवासींच्या जमिनी गेल्या मात्र पाणी धोरणात धरणांमधुन पाणी उचलण्याचा अधिकार आदिवासींना नाही,त्यामुळेच त्यांना पाणी घेता येत नाही .आदिवासी भागात पावसाळ्यानंतर पुढचे आठ महिने नेहमीच पाण्याची समस्या असते .

हि वस्तुस्थिती लक्ष्यात न घेता नेहमीच आदिवासी भागावर अन्याय होत असल्याची जनतेची भावना आहे.राज्यात इतर ठिकाणी दुष्काळ घोषित करते;परंतु आदिवासी भागात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.रोजगाराचा प्रश्न ही निर्माण झाला आहे .

राज्यकर्तेच्या उदासीन धोरणामुळे आदिवासींना दरवर्षी रोजगारासाठी स्थलांतर करावे लागते.तरी आदिवासी भागातील या समस्या लक्षात घेऊन तात्काळ दुष्काळ जाहीर करण्यात यावा आणि सर्व दुष्काळी सवलती लागु कराव्यात.दरम्यान आदिवासी भागात दुष्काळ जाहिर करण्याबाबत राज्य शासन लवकरच निर्णय घेईल,आशी अपेक्षा आदिवासी बांधवाच्या मनात आहे.
जिल्हा परिषद मराठी शाळांचा दर्जा उचावला:अशोकराव भांगरे

जिल्हा परिषद मराठी शाळांचा दर्जा उचावला:अशोकराव भांगरे

विष्णु तळपाडे(अकोले/अहमदनगर):

भाजप सरकारच्या काळात महाराष्ट्रातील जि.प.मराठी शाळांचा दर्जा उंचावला गेला असून इंग्रजी माध्यमांपेक्षा मराठी शाळांकडे विद्यार्थ्यांचा ओंघ वाढत आहे.त्यामध्ये शिक्षकाचे मोलाचे योगदान महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन जि.प.सदस्या सौ.सुनिता भांगरे यांनी जिल्हा परिषद अहमदनगर व पंचायत समिती अकोले(शिक्षिण विभाग)आयोजित बालआनंद मेळावा रणद बु.येथे उद्घाघाटन प्रसंगी केले.

कार्यक्रम अध्यक्षस्थानी जि.प.चे माजी अध्यक्ष अशोकराव भांगरे हे होते.व्यासपिठावर पंचायत समिती सदस्या अलका अवसरकर ,शिक्षण विस्तार अधिकारी शंकर गाडेकर,सरपंच अंजना कोरडे व ग्रामस्त ,शिक्षक व कर्मचारी ,विद्यार्थी मोठ्या संख्यानी उपस्थित होते.

आधुनिक युगा सोबत शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बद्दल घडतोय,जिल्हा परिषदेच्या गुणवत्तेमुळे मराठी शाळेकडे विद्यार्थ्यांचा ओघ वाढत आहे .यावेळी अशोक भांगरे म्हणाले आनंद मेळाव्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षणा सोबत व्यवहारीक ज्ञानातही वाढ होते .आणि त्यांच्या कलागुणांना वावही मिळतो.सांस्कृतिक ,शैक्षणिक ,सामाजिक प्रगति घडुन बुद्धीला चालना मिळते .यावेळी रणद बु.च्या विद्यार्थ्यांनी मोठा बाजार भरविला होता.विक्रीसाठी रानभाज्या,वडापाव,इडली,आईस्क्रिम,भाजी-भाकरीचे स्टाँल उभारण्यात आले होते.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व केंद्र प्रमुख मुख्याध्यापक,शिक्षक ,शाळाव्यवस्थापन समिती आणि जिल्हा. प.राजुर गट यांनी विशेष परिस्ञम घेतले .

Thursday, December 27, 2018

बिबट्या गायीच्या आस-याला !

बिबट्या गायीच्या आस-याला !


विष्णू तळपाडे/अहमदनगर(अकोले) -खबरबात प्रतिनिधी अलिकडच्या काळात जंगल ,वनिकरण यांचे दिवसेंदिवस कमी होताना दिसते.आज प्राण्यांना आपला बचाव करण्यासाठी थेट गावांचा आस्रा घेवा लागत आहे.
काल पासून अहमदनगर जिल्ह्यात थंडीने उच्चांक गाठला असला तरी प्रचंड प्रमाणात थंडीची लाट निर्माण झाली आहे.पशु ,पक्षी ,प्राणी कुठे तरी आपलाआस्रा शोधताना दिसतात .

अशाच प्रकारची घटना आश्वी ता.संगमनेर या ठिकाणी घडताना आपल्याला पहावयास मिळते. हा अदभुत क्षण थंडी पासून बचाव करण्यासाठी थेट बिबट्या गाईच्या गोठ्यातच गाईच्या आसर्याला बसलेला आपणांस पहावयास मिळतो.

Sunday, December 23, 2018

अंखड हरिनाम त्रीदिनी सप्ताहाची सांगता !

अंखड हरिनाम त्रीदिनी सप्ताहाची सांगता !


खबरबात प्रतिनिधी/विष्णु तळपाडे.अकोले (अहमदनगर) 
ह्या तीन दिवसांपासून क्षेत्र दत्त आस्रम,सागवी धरणा जवळ,घाटाखालचीवाडी.याठिकाणी सालाबाद प्रमाणे ह्याही वर्षी अंखड हरिनाम ञिदिनी सप्ताह ह.भ.प.देवराम महाराज तळपाडे ह्याच्या पुढारकाराने व भाविक भक्तांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला होता.तरी त्याठिकाणी पहाटे४-६काकडा सायंकाळी ५-७हरिपाठ रात्री ७-९किर्तन आणि ९:30-१०.००पर्यत भोजन असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
    याठिकाणी पंचकुर्शितील अनेकांनी ह्याचा लाभ घेतला ,तसेच काहीनी मोलाचे सहकार्यही केले.
                            या ठिकाणी महांळुगी,केळी,टाहाकरी, कोभांळणे,पाचपट्टा,पट्टेवाडी,ठाणगाव इत्यादी ठिकाण च्या ग्रामस्तानी आपल्या  उपस्थितीनी शोभा वाढविली. आज दि.२३डिंसे रोजी ९-११ या वेळेत ह.भ.प.देवराम महाराज तळपाडे यांच्या काल्याच्या किर्तनानी अंखड हरिनाम सप्ताहाची सांगता करण्यात आली आणि त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम झाला