সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Thursday, September 05, 2013

' एक नमन गोरा पार्वती, हर बोला हर-हर महादेव'

पोळ्याच्या दिनी 'झडत्या'ची लोकसंस्कृती

शेतकर्‍यांचे वैभव असलेला बैलांचा दिवस म्हणजे पोळा. वर्षभर राबणार्‍या बैलांची पिठोरी अमावश्येच्या दिवशी पूजा करून कृतज्ञता व्यक्त करणारा पोळा हा सण उत्साहाने साजरा केला जातो. पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांच्या खांदे शेकणीचा कार्यक्रम असतो. बैलांचे खांदे तूप किंवा तेल, हळद लावून शेकतात. 'आज आवतन घ्या अन् उद्या जेवायला या' या शब्दात बैलांना पोळ्याचे आमंत्रण दिले जाते. 'वाटी रे वाटी खोबर्‍याची वाटी, महादेव रडे दोन पैशासाठी, पारबतीच्या लुगड्याले छप्पन गाठी, देव कवा धावला गरिबांसाठी' एक नमन गोरा पार्वती, हर बोला हर-हर महादेव'.

एक नमन गोरा पार्वतीहर बोला हर-हर महादेव | Har Har Mahadev ... पोळ्याचा आनंद शेतकर्‍यांसाठी सुखदायक असतो. या पारंपरिक सणाचे स्वरूप ...

 
पोळ्याचा आनंद शेतकर्‍यांसाठी सुखदायक असतो. या पारंपरिक सणाचे स्वरूप बदलत चालले असले तरी ग्रामीण भागात पोळ्याच्या दिवशी झडत्यांची लोकसंस्कृती आजही कायम आहे. पोळ्यात 'झडत्या' आवर्जून म्हटल्या जातात. पोळ्यात म्हणण्यात येणार्‍या झडत्या हा लोकसाहित्यातील महत्वपूर्ण घटक आहे.
'गणा रे गणा, गण गेले वरच्या राणा, वरच्या राणातून आणली माती, ते दिली गुरूच्या हाती, गुरूनं घडविला महानंदी, तो नेला हो पोळ्यामंदी, एक नमन कावळा पारबती, हर बोला हर-हर महादेव' सुर्यास्ताच्यावेळी गावाबाहेरील मोकळ्या जागेवर आम्रपानांच्या तोरणाखाली बैलांना उभे केल्यावर गावातील मान्यवर व्यक्तींचा मानाचा बैल येईपर्यंत पोळा फुटत नाही. ढोल ताशांच्या गजरात शेतकर्‍यांनी सीमेवर बैल आणले की, झडत्यांचा दुय्यम सामना सुरू होतो. पोळ्याच्या दिवशी बैलांला बेगड, गेरू, गाठी, मटाक्या, घुंगरू, झूल आदी साहित्य बैलांसाठी वापरल्या जातो. ग्रामीण भागात पोळ्याच्या दिवशी झडत्यांची लोकसंस्कृती असली तरी त्यातून सर्व सामन्य शेतकर्‍यांनी परिस्थिती झडत्यातून विशद होते.



'वाटी रे वाटी खोबर्‍याची वाटी, महादेव रडे दोन पैशासाठी, पारबतीच्या लुगड्याले छप्पन गाठी, देव कवा धावला गरिबांसाठी' एक नमन गोरा पार्वती, हर बोला हर-हर महादेव'. नापिकीत ही झडती त्यातून महत्वाचे असे. त्यातूनही दुसर्‍यांवर मात करून झडतीद्वारे आनंद घेतला जात असे. पोळय़ाच्या अक्षता कपाळाला लावून एकमेकांना अलिंगण देऊन शेतकरी स्नेहभाव प्रकट करतात. पूर्वीच्या काळी गावातील पाटलांची बैलजोडी वाजत गाजत निघत होती. आता ही प्रथा काळाच्या ओघात लोप पावली.

'बळी रे बळी लिंब बनी, अशी कथा सांगेल कोणी', 'राम-लक्ष्मण गेले हो वनी, राम-लक्ष्मणाने आणली वनफुले', ते महादेव पारबतीच्या हाती, तिनशे साठ नंदी एक नमन.. याप्रकारे वर्णन करून अनेक पौराणिक दाखले झडत्यातून देत असत. झडती म्हणारा आपली झडती पूर्ण करीत आला की, लगेचच लोक 'एक नमन कवळा पारबती. हर.. हर.. बोला, हर-हर महादेव, असे जोराने ओरडतात. त्यानंतर 'मेंढी रे मेंढी शेंबडी मेंढी ते खाते आला-पाला तिचा गुरू माहा चेला लाथ मरून सरका केला.' एक नमन कवळा पारबती. हर बोला हरहर महादेव आदी झडत्या गायल्या जातात. विविध विषयांवर झडत्या होत असल्या तरी पोळा फोडण्यासाठी विशेष झडती म्हटली जाते.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.