काव्यशिल्प Digital Media: विकास

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu
Showing posts with label विकास. Show all posts
Showing posts with label विकास. Show all posts

Wednesday, June 20, 2018

रस्ते विकास कामांचा मार्ग मोकळा

रस्ते विकास कामांचा मार्ग मोकळा

Road development works | रस्ते विकास कामांचा मार्ग मोकळाचंद्रपू/प्रतिनिधी:
 नक्षलग्रस्त व शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील महामार्गासह सहा हजार कोटींच्या रस्ते विकास कामांना उच्चस्तरीय बैठकीत विविध मंजुरी देण्यात आली आहे. यात चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक रस्त्यांचा समावेश आहे. या कामांना गती येणार असल्याची माहिती केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिली.
केंद्रिय भूपृष्ठ वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी परिवहन भवन येथे केंद्रिय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर, महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री मदन येरावार, गडचिरोलीचे खासदार अशोक नेते, आ. नाना श्यामकुळे, आ. अ‍ॅड. संजय धोटे, वणीचे आ. रेड्डी तसेच केंद्र व राज्य शासनाचे वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ जिल्ह्यातील रस्ते विकास कामांची आढावा बैठक झाली.
तीनही जिल्ह्यांतील ‘भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणांतर्गत’ बांधण्यात येणारे आठ महामार्ग, ‘अभियांत्रिकी, खरेदी व बांधकाम(ईपिसी) कार्यक्रमांतर्गत’ बांधण्यात येणारे नऊ रस्ते आणि ‘केंद्रिय रस्ते निधीतून’ करण्यात येणाऱ्या २२ कामांचा आढावा घेण्यात आला. रस्ते विकास कामांसंदर्भातील विविध मंजुरी देण्यात आल्या. तसेच या कामांसाठी आवश्यक असणारी वन विभागाची मंजुरी व रस्ते बांधकामांचे सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे निर्देशही देण्यात आल्याचे ना. अहीर यांनी यावेळी सांगितले.
तीनही जिल्ह्यांतील रस्त्यांचे विकास कामे अंतिम टप्प्यात असून येत्या तीन महिन्यात विविध कामांचे उद्घाटनही होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
बंधारा व पुलाचा प्रायोगिक प्रकल्प
केंद्रिय भूपृष्ठ वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्या वतीने ‘वणी ते वरोरा’ महामार्गादरम्यान वर्धा नदीवर ‘बंधारा व पूल’ बांधण्याचा प्रायोगिक प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या संदर्भातही मंगळवारी चर्चा झाली. या पुलाच्या माध्यमातून वाहतूक व जलसंधारणाचे उत्तम कार्य होऊ शकते व हा प्रयोग यशस्वी झाल्यास इतर भागांमध्ये याचे अनुकरण करण्यात येईल, असा चर्चेचा सूर होता.
बाबुपेठ उड्डाणपुलाबाबत चर्चा
चंद्रपूर शहारात ३५० कोटी रुपये खर्चून बाबुपेठ रेल्वे क्रासींगवर उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. या बांधकामाबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली. याशिवाय अन्य १० कामांचाही आढावा घेण्यात आला.
महामार्गांचा घेतला आढावा
मंगळवारी झालेल्या बैठकीत वणी ते वरोरा या ९३० क्रमांकाच्या १८ कि.मी., ब्राह्मणी-राजुरा-वरुड- देवरापूर या ३० कि.मी व राजुरा-कोरपना-आदिलाबाद या ५७ कि.मी. लांबीच्या महामार्गांचा आढावा घेण्यात आला.

Wednesday, November 08, 2017

  मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने कटेझरी पोलीस मदत केंद्राच्या बांधकामासाठी २ हेक्टर वनजमीन वळती

मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने कटेझरी पोलीस मदत केंद्राच्या बांधकामासाठी २ हेक्टर वनजमीन वळती

Sudhir Mungantiwar


गडचिरोली/प्रतिनिधी:
गडचिरोली जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील कटझेरी  येथे पोलीस मदत केंद्राच्या बांधकामासाठी २ हेक्टरची संरक्षित वनजमीन वळती करण्यास मान्यता देण्यात  आली असून  वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने  कायदा व सुव्यवस्थेशी संबंधित महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

या पोलीस मदत केंद्रामुळे परिसरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यास तसेच अवैध वृक्षतोड रोखण्यास मदत होणार आहे. पर्यावरण, वन व जलवायू परिवर्तन मंत्रालयाने सार्वजनिक हिताच्यादृष्टीने  उपयुक्त पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी ५ हेक्टरपर्यंतची वन जमीन वळती करण्याच्या प्रस्तावांना मान्यता देण्याचे अधिकार राज्य शासनाला सुपुर्त केले आहेत.  या अधिकाराचा वापर करून वनमंत्री म्हणून यासंबंधीच्या अटी आणि शर्तींचे पालन करत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
गडचिरोली हा केंद्र शासनाने देशातील ६० नक्षलग्रस्त प्रभावित जिल्ह्यांच्या यादीत समाविष्ट केलेला जिल्हा आहे. वळती करण्यात आलेली वनजमीन  ही या नक्षलग्रस्त भागातील जनतेच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने महत्वाच्या कामासाठी वापरण्यात येणार असल्याने त्यास मान्यता देण्यात आली आहे 

Sunday, November 05, 2017

सांस्कृतिक सभागृहाचा लोकार्पण सोहळा

सांस्कृतिक सभागृहाचा लोकार्पण सोहळा

कलाकारांनी सांस्कृतिक क्षेत्रात चंद्रपूरचे नाव उंचवावे
आमदार नानाजी शामकुळे :
चंद्रपूर  : चंद्रपुरात सांस्कृतिक चळवळ अधिक प्रभावशाली बनावी, कलाकाराला आपली कला सादर करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्द्य व्हावे, त्यामधून स्थानिक कलाकारांनी सांस्कृतिक क्षेत्रात चंद्रपूरचे नाव उंचवावे असे मत आमदार नानाजी शामकुळे यांनी व्यक्त केले. ते  तुकूम येथील दुर्गामाता देवस्थान येथे स्थानिक आमदार निधीतून  बांधण्यात आलेल्या सांस्कृतिक सभामंडपाच्या लोकार्पण सोहळ्याचेवेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर अंजलीताई घोटेकर या होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक सुभाष कसनगोट्टूवार, नगरसेवक मायाताई उईके, नगरसेवक शिलाताई चौहान, देवस्थानचे अध्यक्ष मनोहरराव बोक्कावार होते. प्रस्थाविक मनोहर बोक्कावार यांनी केले.
पुढे बोलताना नगरसेवक सुभाष कसनगोट्टूवार म्हणाले कि, आमदार नानाजी शामकुळे यांनी तुकूम येथील विकासासाठी कधीही निधीची कमी पडू दिला  नाही. या प्रभागाच्या विकास साधण्यासाठी आमदार शामकुळे यांनी मदत केली आहे. हे सांस्कृतिक सभागृह देखील आमदार निधीतून बांधून दिले. यामुळे या भागातील कलाकारांना हक्काचे व्यासपीठ उपलब्द्य झाले आहे.
यावेळी अनेक मान्यवरांची भाषणे झालीत. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीत सुरेश देशपांडे, शैलेश जुमडे, उशाल घटे, निळकंठराव डांगरे, रमेश मूलकालवार, विलास माहूरवार, भाऊराव साठोने, वसंतराव येरने, वाय. आर. रेड्डी यांनी सहकार्य केले.