
चिमूर-वरोरा मार्ग ठरत आहे धोकादायक

गावापासून जगापर्यंतची खबरबात khabarbat.com

आजवर आपण मुलगा किंवा मुलगी पसंत न आल्याने किंवा अगदी फिल्मी स्टाइल वधू किंवा वर लग्नाच्या दिवशी पळून गेल्याने लग्न तुटल्याच्या ऐकले किव्हा वाचले असाल मात्र हिरव्या मंडपापाई लग्न तुटल्याचे तुम्ही पहिल्यांदाच ऐकत असाल.
चंद्रपुर जिल्ह्यातील पोंभूर्ण्यापासून सात किमी. अंतरावर असलेल्या चिंतलधाबा येथे चार दिवसांपूर्वी सोयाम आणि आत्राम कुटुंबाच्या लग्नाची बातमी देशभर चर्चेचा विषय ठरली.या कुटुंबियांच्या निर्णयाने अनेकांनी त्यांचे कौतुकही केले. नवरी ऑक्सिजनवर दवाखान्यात भरती असतांना दोन्ही पक्षाने एकमेकांना धीर देऊन मधला मार्ग काढत चक्क अॅम्ब्युलन्स मांडवात आणली आणि आलेल्या वऱ्हाडी परत जाऊ नये,व लग्नाला वेगळे वळण लागू नये म्हणून मुला-मुलीचा विवाह सोहळा पार पडला. मात्र त्याच चंद्रपुरातील वरोरा शहरात हिरव्या मंडपाच्या शुल्लक कारणावरून लग्न तुटल्याची संतापजनक घटना घडली. या घडलेल्या प्रकारामुळे दोन्ही परिवारांची चांगलीच बदनामी झाली.हे प्रकरण इथेच थांबले नाही तर थेट वरोरा पोलिसात पोहचले.पोलिसांनी व जेष्ठ मंडळींनी दोन्ही बाजू ऐकून घेतली व तोडगा काढायचा प्रयत्न केला. मात्र एक दिवस आधी आम्ही शहरात हिरव्या मंडळाची मागणी कशी पूर्ण करणार असे सांगत वधूने लग्नास नकार दिला. शिवाय हि अट पूर्ण केली असती तर अशीच मागण्यांची मालिका सुरू राहिली असती त्यामुळे आपण लग्नाला ठाम नकार दिल्याची प्रतिक्रिया वधुने दिली आहे. तर दुसरीकडे नवरदेवाने आपण कुठलीच डिमांड केले नसल्याने आणि फक्त आदिवासी प्रथेप्रमाणे हिरव्या मंडप घालण्यास सांगितले असल्याचे म्हटले आहे. हिरवा मंडप हा आदिवासी समाजात प्रतीकात्मक आहे मात्र मुलीकडच्या पक्षाने याचा बाहू केला आणि प्रकरण पोलिस स्टेशन पर्यंत नेले. असा आरोप नवरदेवाने केला या संपूर्ण प्रकारामुळे आमची बदनामी झाली असल्याचे त्यांनी बोलून दाखवले.

वरोरा/भद्रावती(प्रतिनिधी) वरोरा येथील
शहीद हुतात्मे योगेश वसंतराव डाहूले यांना दिनांक ३०/११/२००४ ला आपले कर्तव्य बजावत असताना वीरमरण प्राप्त झाले त्या प्रीत्यर्थ आज दिनांक ३०/११/२०१७ नगर परिषद वरोरा स्वच्छता विभाग व शहीद हुतात्मे योगेश डाहुले यांचा आई वडील , नातेवाईक व शहरातील सन्माननीय नागरिकांनी त्यांचा अदम्य साहसाबद्दल त्यांना श्रद्धांजली अर्पित केली. यावेळी शहीद योगेश डाहूले यांच्या आई ,वडील श्री वसंतराव डाहूले व सौ पार्वतीताई डाहुले , जेष्ठ कवी व साहित्यिक नागथुटे सर , श्री ठेंगणे सर ,व नगर परिषद च्या वतीने आरोग्य सभापती श्री छोटू भाई शेख , अभियंता संकेत नंदवंशी, स्वच्छता निरक्षक भूषण सालवटकर , तसेच कर्माचारी सुनील नकवे , भारत नकवे व शहरातील इतर नागरिकांच्या उपस्थितीत श्रद्धांजली अर्पित करण्यात आली.

*चंद्रपूर-नागपूर महामार्गा बाजूचे सर्विस रोडवरील अतिक्रमण हटविण्याच्या नगरपरिषदेच्या निर्णयाचे सर्वत्र स्वागत.
*लवकरच कारवाईला सुरूवात
वरोरा/भद्रावती (प्रतिनिधी) :भद्रावती
नगरपरिषद क्षेत्रातील चंद्रपूर-नागपूर महामार्गाच्या बाजूला असलेल्या ले-आऊट मधील सर्विस रोडवर केलेले अतिक्रमण काढून टाकण्यासाठी मुख्याधिका-यांनी अतिक्रमणधारकांना नोटिस बजावल्या आहेत. नगरपरिषदेच्या या निर्णयाचे शहरात सर्वत्र स्वागत होत आहे.
महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम 1966 अन्वये तथा महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1966 अन्वये सदर नोटिसा बजावल्या गेल्या आहेत.
सदर नोटिस प्राप्त होताच सात दिवसाचे आंत कच्चे-पक्के अतिक्रमण काढुन सर्व्हिस रोड मोकळा करुन दयावा, अन्यथा कुठलीही पूर्वसूचना न देता, नगरपरिषदद्वारा अतिक्रमण काढुन घेण्यात येईल. या कार्यवाहीत झालेल्या नुकसानीची व तुटफुटीची जवाबदारी अतिक्रमणधारकांची असेल, व कारवाईसाठी लागणारा सर्व खर्च अतिक्रमणधारकांकडुन वसुल करण्यात येईल, असे नोटिसमधे नमूद केलेले आहे.
नागपूर-चंद्रपूर महामार्गाच्या दोन्ही बाजूचे अतिक्रमण फार जुने आहे. सदर अतिक्रमण कायमस्वरुपी हटल्यास शहराचा चेहरामोहरा बदलेल. अपघातांची शक्यता कमी होणार आहे. महामार्गाच्या बाजुच्या संताजी नगर, गुरुनगर, कुणबी सोसायटी, गौतमनगर ही ले-आऊट अतिक्रमणापासून मोकळी होतील. अतिक्रमणामुळे होणारे उपद्रव कमी होतील. पानठेले, खर्रा विक्री केन्द्र, बंद होतील. अवैध दारुविक्रीला आळा बसेल. रोडरोमीओंची संख्या कमी होईल. पैदल चालणा-यांना सुरक्षा मिळेल. महामार्गाशेजारची गर्दी व वर्दळ कमी होईल. शहर महामार्गाला लागुन असल्यामुळे शहराची ओळख बदलून महामार्गाने जाणा-यांचा शहराकडे पाहण्याचा द्रुष्टिकोण बदलेल.
प्रभु गॅरेज ते पंचशील नगर, वांढरे फ्रुट्स स्टॉल ते होटल पैराडाईज, कोंबे यांचे घर ते बस स्टॉप पर्यंत महामार्गाच्या दोन्ही बाजुचा सर्व्हिस रोड मोकळा होण्यासाठी भद्रावतीकर वाट बघत आहे व नगरपरिषदेकडुन मोठी अपेक्षा लावुन बसले आहे. आता नगरपरिषदेच्या या निर्णयात कोणता अडथळा येवुन, अतिक्रमण हटविण्याचे काम थांबू नये, असे नागरीकांचे म्हणने आहे.
----------------------------------------
नगरपरिषदेने कोणतेही हितसंबंध न जोपासता, लहान-मोठे व्यवसायिक न बघता सगड्या अतिक्रमणधारकांना नोटिस पाठवुन न.प. निवडणुकीची आचारसंहिता लागण्याअगोदर अतिक्रमण हटवून सर्व्हिस रोड मोकळे करावे. -
मुश्ताक अली, व्यवसायिक, भद्रावती।
वरोरा - येथे सेंटअनिस स्कुल येथे आयोजित तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनी आयोजित केली असून या प्रदर्शनी बघण्यासाठी विध्यार्थी व पालकांनी प्रतिसात घेत आहे. या विज्ञान प्रदर्शनीत तालुक्यातील विविध विद्यालयातील विध्यार्थीनि स्पर्धेत सहभाग घेतला. यामध्ये कोणत्या विद्यालय प्रथम क्रमांक पटकावेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे
छायाचित्र : शिरीष उगे, वरोरा

आज दि. २०नोव्हेंबर सायं. ८:30 वाजता वरोरा वणी मार्गावर झालेल्या दुचाकी अपघातात एक ठार तर एक गंभीर जखमी आहे. 