সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Tuesday, June 30, 2015

महिला पटवारीला अटक

महिला पटवारीला अटक

सहाशे रुपयाची लाच घेताना महिला पटवारीला अटक

सावनेर तहसील अंतर्गत येणा-या जटामखोरा सर्कलमधील महिला पटवारीला ६०० रुपयाची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली आहे. वैशाली पडोळे असे महिला पटवारीचे नाव आहे.

Thursday, June 25, 2015

चंद्रपुरात जाणारी पाच लाखांची दारु जप्त

चंद्रपुरात जाणारी पाच लाखांची दारु जप्त

नागपूर : मुंबईच्या विषारी दारु कांडानंतर राज्यभरात अवैध दारु विक्रेत्यांवर धाड सत्र सुरु करण्यात आले. धंतोली पोलसांनी रहाटे कॉलनी मार्गावर देशी विदेशी दारुचा साठा चंद्रपूर जिल्हात घेऊन जाणाछया मॅटॉडोर सापळा रचून पकडले. त्यात पाच लाखाचा यब्रॅंडेडठ कंपनीचा दारु साठा आढळून आला.
पोलिसांनी दारु साठा जप्त करुन दारु माफीयासह चालकास अटक केली. धंताली पोलिसांच्या आजच्या कारवाईने शहरातील दारु माफीयांचे धाबे दणाणले आहे. 

Wednesday, June 24, 2015

Tuesday, June 23, 2015

चंद्रपुरात विषारी दारूची भिती

चंद्रपुरात विषारी दारूची भिती

 - दारूबंदीनंतर दारू व्यवसायिकांकडुन पुरवठा होण्याची श्रमिक एल्गारला शंका 

मुंबई येथील मालवणी येथे 97 व्यक्ती  विषारी दारू पिऊन मरण पावले आहे.  चंद्रपूर जिल्हा दारू असोशिएशनचे सल्लागार दिपक जैस्वाल यांनी दिनांक 19 जून रोजी पत्रकार परीशद घेऊन मुंबई येथे  विषारी दारू पिऊन ज्या पध्दतीने लोक मेले तशीच परीस्थिती चंद्रपूर जिल्हयातही होणार आहे, असे भाकीत केले व तशा आशयांच्या बातम्या सर्व वर्तमानपत्रात प्रसिध्द झाल्या. चंद्रपूर जिल्हयात दारूबंदी होण्यापूर्वी व दारूबंदी झाल्यानंतरही शासनाने दारूबंदीचा निर्णय घेऊ नये यासाठी दिपक जैस्वालसह या व्यवसायातील व्यावसायीकांनी विविध स्तरावर प्रयत्न केले.  मात्र, त्यात त्यांना यश आले नाही व शासनाने जिल्हयातील सर्वसामान्य नागरीकांच्या हिताच्या दृश्टीने दारूबंदी जाहीर केली. चंद्रपूर जिल्हयातील दारूबंदी यषस्वी होण्याच्या दृश्टीने पोलीस प्रषासन प्रयत्न करीत आहे. षासनाकडे आणि न्यायालयात सुध्दा दारूची दुकाने पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न फसल्याने या दारूविक्रेत्यांनी पत्रकार परीशदेत जिल्हयात दारू पिऊन लोक मरतील असे सांगीतले आहे व दारूबंदी उठविण्याची मागणी केली आहे. 
दिपक जैस्वाल यांचे पत्रकार परिशदेनंतर लोकांमध्ये विषेशतः महीलांमध्ये प्रचंड भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. चंद्रपूर जिल्हयातील दारूवाले मुद्याम विशारी दारू पाजून लोकांचे बळी घेतील व स्वतःचे दुकाने पुनः सुरू करण्यासाठी सरकारकडे दारूबंदी उठविण्याची मागणी करतील. खुद्द दिपक जैस्वाल व त्यांचे व्यवसायीक मित्र यांनी पत्रकार परीशदेत असली व नकली दारू दाखवून जिल्हयात अवैदय दारू तस्करी करू षकतात हे दाखवून दिले आहे. वर्धा व गडचिरोली जिल्हयात षासनाने दारूबंदी केल्यानंतर विशारी दारू पिऊन मरण पावल्याची अजुनपर्यंत घटना घडली नाही. ही वस्तुस्थिती असतांना चंद्रपूर जिल्हयातील दारूविक्रेते ज्या आत्मविष्वासाने चंद्रपूर जिल्हयात मुंबई मालवणी सारखी  विषारी  दारू पिऊन मरण्याची घटना घडू षकते हे सांगत आहे त्यावरून दारू समर्थकच अषी घटना घडवून आणू षकतात याची आम्हाला भिती आहे. 
जिल्हयातील दारूविक्रेते  विषारी  दारू पुरवठा करण्याचे षडयंत्र करीत आहेत काय? याचा शोध आपण घ्यावा. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करावी तसेच त्यांचे घर व प्रतिश्ठानावर पोलीसांनी कडक निगराणी ठेवावी, चंद्रपूर जिल्हयात अवैदय दारूचा पुरवठा करणा-यांवर मोक्का अंतर्गत करवाई करावी व पोलीस तसेच नागरीकांना सतर्क राहण्याबाबत जनजागृती करावी. ही विनंती.


आपली विष्वासू
(अॅड. पारोमिता गोस्वामी)
संयोजिका
"हॉर्न ओके प्लीज'वर होणार कारवाई

"हॉर्न ओके प्लीज'वर होणार कारवाई

नागपूर - ट्रक, बस आणि अन्य मालवाहू वाहनांच्या मागच्या बाजूला अनेक संदेश लिहिलेले असतात. काही संदेशांतून जनजागृती होते, तर काहींतून विनोद. मात्र, "हॉर्न ओके प्लीज‘ असा संदेश लिहिलेल्या वाहनांवर कारवाईच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याबाबत पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी सर्व ठाणेदारांना तपासणीच्या सूचना दिल्या.

Monday, June 22, 2015

वैनगंगा नदीचे पात्र भरले

वैनगंगा नदीचे पात्र भरले

चंद्रपूर : मुसळधार पावसामुळे वैनगंगा नदीचे पात्र भरले
नागपूर  - गेल्या तीन पासून विदर्भात होत असलेल्या मुसळधार पाऊस अजूनही कायम आहे. मागील 24 तासात चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस होत आहे. दरम्यान हवामान खात्याने येत्या 24 तासात  विदर्भात  हा पाऊस असाच कायम राहण्याचा इशारा दिला आहे.

गडचिरोली - जिल्ह्यातील विज पुरवठीही खंडीत झाला आहे.  अहेरी तालुक्यातील देचलिपेठा गडअहेरी मार्ग बंद आहे. पर्लकोटा नदिला पुन्हा पुर येण्याचे संकेत असल्याने तेथील परिसरातील लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
जिल्ह्यात पुराच फटका अहेरी उपविभागत जास्त बसला असून शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहे.

^^^^^^^^^^^^^^^^^^
अजनी पुलाखाली आढळले दोन युवकांचे मृतदेह
नागपूर  - सोमवारी पहाटे शहराच्या अजनी रेल्वे पुलाच्या खाली दोन युवकांचे मृतदेह सापडले. या दोन्ही युवकांची ओळख पटली नसल्याने पोलिस आधी या मृतकांची ओळख पटविण्याच्या दृष्टीने तपास करत आहेत. 

Sunday, June 21, 2015

महावितरणची पोलखोल

महावितरणची पोलखोल

महावितरणची पोलखोल

मॉन्सूनपूर्व तयारीचा दावा करणाऱ्या मंडळाचे अकराशे वीजखांब जमीनदोस्त

महावितरणला तब्बल 62 लाखांचा फटका, शासनाकडून मिळालेला निधी गेला कुठे?


चार दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे महावितरणची पोलखोल झाली आहे. वादळामुळे पूर्व विदर्भातील उच्च आणि लघुदाबाचे तब्बल एक हजार 191 वीजखांब जमीनदोस्त झाल्याने महावितरणचे 62 लाखांचे नुकसान झाले. यावरून मॉन्सूनपूर्व तयारीसाठी मिळालेला लाखोंचा निधी पाण्यात गेल्याचे स्पष्ट दिसत आहे.
नागपूर जिल्ह्यासह चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वर्धा आणि भंडारा जिल्ह्यांत गेल्या दोन दिवसात वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू आहे. पूर्व विदर्भातील उच्चदाबाचे 255, तर लघुदाबाचे 936 वीजखांब जमीनदोस्त झाले. चंद्रपूर जिल्ह्यातील उच्चदाबाचे 65, तर लघुदाबाचे 128 वीजखांब कोसळले. गडचिरोली जिल्ह्यातील उच्चदाबाचे 108, तर लघुदाबाचे 309, गोंदिया जिल्ह्यातील उच्चदाबाचे 19, लघुदाबाचे 309, वर्धा जिल्ह्यात 34 उच्चदाबाचे, तर लघुदाबाचे 288 वीजखांब जमीनदोस्त झाले. भंडारा जिल्ह्यात 29 उच्चदाबाचे, तर 73 लघुदाबाचे खांब कोसळले. अनेक ठिकाणी वीजखांब कोसळून पडल्याने वीजपुरवठाही खंडित झाला आहे. यावरून मॉन्सूनपूर्व तयारी केल्याने उत्तम सेवा देण्याचा दावा करणा-या  महावितरणची चांगलीच पोलखोल झाली. अनेक गावात विजपुरवठा नाही. असे असतानाही अधिकारी मात्र विजेवर चालणा-या  उपकरणात मस्त झोपा काढत आहेत.

- देवनाथ गंडाटे 
पावसाने जनजीवन विस्कळित

पावसाने जनजीवन विस्कळित

पावसाने जनजीवन विस्कळित 
चंद्रपूर,  शनिवारी रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने चंद्रपूर, कोरपना आणि जिवती येथील जनजीवन विस्कळित झाले आहे. इरई, झरपट नदीकाठावरील वस्त्यांत पाणी शिरू लागल्याने तेथील नागरिकांनी पुराच्या भीतीने आपले सामान हलविणे सुरू केले आहे. कापनगाव नाल्याला पूर आल्याने राजुरा- आसिफाबाद मार्गही बंद झाला आहे. 

WCLचंद्रपूर क्षेत्र C.R.C.मे श्री सारनाथ ढोबले उम्र 55 साल साहायक अभीयंता आज 21 जून 2015 को खदान मे पानी मे डुबने से मौत हो गयी।

रेल्वेगाडीने कटून मायलेकींचा मृत्यू
चंद्रपूर- रेल्वेगाडीतून उतरण्याच्या प्रयत्नात कटून मायलेकींचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (ता. 21) दुपारी अडीचच्या सुमारास घडली. चंद्रकला प्रभाकर चेलजरकर (वय 45), श्रद्धा प्रभाकर चेलजरकर (वय 13) अशी मृतांची नावे आहेत.


साम्राज्य फेसबुकचे

साम्राज्य फेसबुकचे

नचिकेत प्रकाशन नागपुर ने “साम्राज्य फेसबुकचे” हे पुस्तक नुकतेच प्रकाशित केले, या पुस्तकाचे प्रकाशन प्रसिद्द अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. या पुस्तकातून लेखक सुनील पाठक, अमरावती यांनी एकून तेरा प्रकरणातुन फेसबुक या जगप्रसिद्ध वेबसाईटला मध्यवर्ती ठेउन सोशल मीडिया बद्दल उत्तम माहिती दिली आहे. 

पुस्तकाचा उद्देश या सर्व प्रकारच्या नव-माध्यमांशी अपरिचित असलेल्या कोणालाही सोशल नेटवर्क वा सोशल मीडिया म्हणजे काय व त्याचे जीवनाच्या विविध पैलूंवर कसे परिणाम होत आहेत या बद्दल रंजक माहिती दिली आहे. पुस्तकाच्या सुरवातीला सोशल नेटवर्क ची माहिती फेसबुक ची विकास वाटचाल व त्याच्या विकास मार्गातील गमती-जमती दिल्या आहेत. फेसबुककर्ता मार्क झकरबर्ग याच्याबद्दल विस्तृत प्रकरणात त्याच्या व्यक्तिमत्वा बद्दल व सम्पूर्ण जग खुले व् कनेक्टड करण्याच्या या मार्कच्या स्वप्नाबद्दल खुप माहिती दिली आहे. सोशल नेट्वर्किंग चा राजा असणाऱ्या फेसबुकच्यायशा मध्ये व कमीत कमी कर्मचारी संखे मध्ये प्रचंड मिळकत या बाबी मध्ये त्याच्या प्ल्याटफॉर्म या संकल्पनेचा कसा वाटा आहे वा फेसबुकने जगभरातील अब्जावधी लोकांना कामाला लाऊन स्वता कशी प्रचंड मिळकत मिळवली हे वाचून आश्चर्य वाटते. कोणतेही सोशल नेटवर्क वापरतांना ते कसे सुरक्षित नाही वा प्रत्येकाची माहिती कशी केव्हाही उघड होऊ शकते वा फेसबुक सारख्या वेबसाईट वरुन एखाद्या व्यक्तिमात्वाचे वा राष्ट्रातील स्थितीचे विश्लेषण-आकलन केले जाऊ शकते या बद्दल सोप्या उदाहरणावरुण माहिती दिली आहे. सुनील पाठक यानी प्रस्तावनेतच सोशल नेट्वर्किंग हे प्रकरण इतके वाढत जाइल व ते एक जीवनाचे साधन होइल असे म्हंटले आहे परन्तु याची व्याप्ति व् नाजुकता पाहता सोशल नेटवर्क चे राष्ट्रीयकरण करण्याची वेळ येऊ शकते असे सूतोवाच केले आहे. यूजर प्रायव्हसी व आजच्या पालकांसाठी असलेले विशेष प्रकरण हे या पुस्ताकास उपयुक्त बनवते. सामाजिक सम्पदा वृद्धिन्गत करण्यासाठी या मंचाचा वापर कसा होत आहे व खोडकर वापर कसा केला जातो याचे विवेचन जागोजागी केले आहे. शिक्षण क्षेत्रावर परिणाम या प्रकरणात सतत शोशल नेटवर्क च्या कट्ट्यावर पडीक असणारया तरुण पिढी मुळे शिक्षण क्षेत्रावर कसा परिणाम होत आहे याचा उहापोह केला आहे. शिक्षणात रचनात्मक उपयोग केल्यास सहाय्यभूत साधन वा शैक्षणिक साहित्य म्हणून केल्यास आजचे शिक्षण जास्त परस्पर संवादी करता येईल या बद्दल काही कल्पना मांडल्या आहेत. फेसबुक चे सामाजिक व राजकीय परिणाम कसे व का होत आहेत यावर दोन प्रकारणे आहेत. सोशल नेट्वर्किंग चा व्यावसायिक उपयोग सुद्धा होऊ शकतो या बद्दल एक प्रकरण छान आहे. भविष्यात कोणत्या योजनांकडे फेसबुकची वाटचाल आहे व ५ अब्ज लोकांना जोडणारे जाळे निर्माण करण्याचा मानस मार्क झकरबर्ग चा आहे व जग जिंकण्याचे स्वप्न अलेक्झांडर पूर्ण करू शकला नाही, मात्र कोणतेही शस्त्र न वापरता मार्क कसा जगजेता झाला आहे या बद्दल माहिती दिली आहे.

हे पुस्तक इ-बुक व छापील दोन्ही प्रकारात उपलब्ध आहे. या पुस्तकाच्या इ-बुक चे विमोचन महाराष्ट्र राज्याचे मुखमंत्री श्री देवेंद्र फडणवीस ( एक वर्षा पूर्वी- विरोधो पक्षात असताना) केले आहे. ए-बुक आवृत्ती बुकगंगा, न्यूजहंट, गुगल इत्यादी साईट वर उपलब्ध आहे तर छापील आवृत्ती शहरातील विविध पुस्तक भांडारात उपलब्ध आहे. छापील आवृत्ती लवकरच अमाझोन, फ्लिपकार्ट आदी वेब साईटवर लवकरच उपलब्ध होणार आहे. १८० पाने असणाऱ्या पुस्तकाचे मुखपृष्ठ श्री संजय अकोलीकर यांनी अत्यंत सुरेख व आशयपूर्ण असे तयार केले आहे. सदर पुस्तक नचिकेत प्रकाशन नागपूर याचे कडून nachiketprakashan.com या वेब साईट वरून मागविता येईल

Saturday, June 20, 2015

खुले पत्र

खुले पत्र

    दिनांक 20 जून 2015 चे विविध वर्तमान पत्रातील बातम्यावरून चंद्रपूर जिल्हा वाईन शाॅप असोशिएशनचे सल्लागार दिपक जैस्वाल यांनी आयोजीत केलेल्या पत्रकार परीषदेची माहीती समजली. सदर पत्रकार परीषदेत मुंबई येथील मालाडच्या मालवण परीसरात दारूबंदी असल्याचा दावा श्री. दिपक जैस्वाल यांनी केल्याचे समजते. एवढे मोठे लिकर असोशिएशनचे सल्लागार असुनही मुंबईत कोठेही दारूबंदी नाही याची साधी माहीती नसल्याचे दिसून आले. सदर पत्रकार परीषदेत चंद्रपूर जिल्हयातील दारूवाल्यांनी मालाड- मालवणीच्या परीसरात विषारी दारू पिऊन मृत्यमुखी पडलेल्या 53 लोकांचे मृत्युचे भांडवल करून चंद्रपूर जिल्हयातील दारूबंदीच्या निर्णयावर पुनर्विचार करण्याची मागणी करीत आहे ही बाब अत्यंत निषेधार्ह आहे. जे मुंबईत कुठेही दारूबंदी नाही. याउलट या महानगरीत सगळीकडे परवानाधारक बियरबार, वाईन शाॅप, दशी दारू दुकाने आहेत. परवानाधारक दुकानासोबतच अवैदय दारूचे पण मुबलक विक्री होते हे या घटनेतुन पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. 
     1 एप्रिल 2015 च्या आधी चंद्रपूर जिल्हयात सुध्दा हीच परीस्थिती सगळीकडे होती हे विसरता कामा नये. चंद्रपूर जिल्हयात 550चे वर परवानाधारक दारूचे व जिल्हाभर हजारोच्या संख्येनी अवैद्य दारूविक्री करणारे धंदेवाले असेच चित्र होते. 1 एप्रिल नंतर या जिल्हयातील सर्व परवानाधारक दुकाने बंद झाले व अवैदय दारूविक्री करणारे बोटावर मोजण्या इतपत राहीले आणि कधी नव्हे एवढे धाडसत्र पोलीसंानी अवैदय दारूविक्रेत्यांच्या विरोधात सुरू केले आहे. उदा. मागील 20-30 वर्षापासुन चंद्रपूरातील खंजर मोहल्यात सर्रास अवैदय दारू मिळते हे सर्वसामान्य जनतेला माहीत असुनही त्याठिकाणी पोलीसांनी कारवाई केली नव्हती. 1 एप्रिल 2015 अर्थात दारूबंदी लागू झाल्यानंतर खंजर मोहल्ला पोलीसंाचे रडारवर आला व सगळीकडे छापे, रेड तसेच कोंबिग आॅपरेशन करून अवैदय धंदयावर मात करण्याचा ठोस प्रयत्न केला. तसेच भद्रावतीच्या चकबरांज तांडा येथे मागील 25-30 वर्षापासुन अवैदय दारूची विक्री होती परंतू तिथेसुध्दा यापूर्वी ठोस पावले उचलले गेले नव्हते आता मात्र पोलीसांनी महीलांच्या मागणीला प्रतिसाद देत भद्रावती पोलीसांनी कडक कारवाईचा पवित्रा घेतला आहे. दारूबंदीपूर्वीचे चित्र म्हणजे अवैदय धंदयावर आळा बसविण्याची संपूर्ण जबाबदारी महीला व नागरीकांवर होती. महीला अवैदय दारू पकडुन पोलीसांना फोन करायचे व माल त्यांच्या स्वाधीन करायचे आज तसे चित्र बदलले आहे. अवैदय दारू रोखण्याची संपूर्ण जबाबदारी पोलीस प्रशासनाने स्विकारली असुन बरेच ठिकाणी महीला व युवकांचे सहकार्याने जबाबदारी पार पाडीत आहे. ग्रामिण भागात मोठया प्रमाणावर महिला व युवक अवैदय दारूच्या विरोधात कार्य करीत असुन काही अपवाद वगळता सगळीकडे पोलीसांचा सहकार्य मिळत आहे.
    दारूबंदीमुळे ‘दारू’ हा विषय जनता, मिडीया व पशासनासाठी महत्वाचा बनला आहे. मुंबईमध्ये दारूबंदी नसल्यामुळे विषारी दारू हा पोलीस पशासनासमोर महत्वाचा व तातडीचा विषय नव्हता आणि म्हणुन तिथे 53 लोकांचा जीव गमवावा लागला. मुंबईत दारूबंदी राहीली असती तर अवैदय दारूच्या विषयाकडे पोलीस अधिक सतर्कता बाळगली असती आणि कदाचित मालवड - मालवण सारखी घटना घडली नसती.
चंद्रपूर जिल्हा दारूबंदीनंतर सकारात्मक बदल दारू विके्रत्यांना दिसत नसला तरी असा बदल दारूने पिढीत राहीलेल्या महिला, युवक, नागरीक, कामगार अनुभवत आहेत.
चंद्रपूरच्या दारूबंदीवर पूनर्विचार करण्यापेक्षा मुंबईतील घटना विचारात घेता मुंबईसह संपूर्ण राज्यात दारूबंदीचा विचार करावा.


आपली विश्वासू
अॅड. पारोमिता गोस्वामी
संयोजिका, वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चंद्रपूर जिल्हा दारूमुक्ती अभियान

Thursday, June 18, 2015

Tuesday, June 16, 2015

वाडी

वाडी

वाडीत केव्हा धावणार विकासगाडी 

उपराजधानीतून राजधानीकडे जाणाऱ्या महामार्गावर येणारे पहिले गाव म्हणजे वाडी. पूर्वीच्या शेतमळ्यांमुळे या गावाला वाडी असे नाव पडले. 1 मार्च 1958 रोजी येथे ग्रामपंचायतीची स्थापना झाली. दिवसेंदिवस वाढणारी लोकसंख्या आणि सीमा विस्तारामुळे 25 ऑगस्ट 2014 रोजी वाडीला नगर परिषदेचा दर्जा मिळाला. ट्रान्सपोर्टिंगमुळे येथे वाहन, चालकाची मोठी संख्या अधिक आहे. या गावाने अनेक बदल अनुभवले. मात्र, विकासाची गाडी अद्याप पोहोचली नाही. नव्या नगरपरिषदेच्या माध्यमातून विकासगाडी धावेल, अशी अपेक्षा आहे. 

दोन बालकांचा पाण्यात बुडून मृत्यू

दोन बालकांचा पाण्यात बुडून मृत्यू

नागपूर - नरखेड तालुक्‍यातील खंडाळा येथे जलशिवार योजनेंतर्गत नुकतेच खोलीकरण करण्यात आलेल्या डोहामध्ये साचलेल्या पाण्यात पाय घसरून दोन बालकांचा मृत्यू झाला. प्रज्वल महल्ले (वय12), यश बंडू क्षीरसागर (वय 11)
दुर्मिळ "ग्रासिली" पालीची नोंद

दुर्मिळ "ग्रासिली" पालीची नोंद

चंद्रपूर- शहरापासून लगतच असलेल्या तिरवंजा गावाजवळ असलेल्या माळरानात दुर्मिळ "ग्रासिली" जातीची पाल वन्यजीव अभ्यासक दिनेश खाटे यांना आढळली असून,सरपटनाऱ्या प्राण्यांमध्ये आणखी एका दुर्मिळ पालीची नोंद झाली आहे. मागील ७ वर्षापासून सरपटनाऱ्या प्राण्यांचे अध्ययन सुरु असून त्यांच्या प्रयत्नांना या कार्यामुळे यश मिळाले आहे. भारतातील सर्वात लहान पालींमध्ये "ग्रासिली " ह्या पालीचा समावेश होतो,पाल खूप छोटी असल्याने नजरेस दिसून पडत नसल्याने दुर्मिळ मानण्यात येते.

Thursday, June 11, 2015

वीज पडून सहा  ठार , चार गंभीर

वीज पडून सहा ठार , चार गंभीर

चंद्रपूर-  वीज कोसळूनसहा जणांचा  मृत्यू  तर, चार जण गंभीर जखमी झाले. ही  घटना गुरुवारी 11 सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास कोरपना तालुक्‍यातील रामपूरात घडली.  राजू गेडाम (वय 35, रा. वडगाव), केशव चव्हाण (वय 55, रा. वडगाव), भाऊराव पेंदोर (वय 43, रा. वडगाव), बाबूराव पेंदोर (वय 53, रा. वडगाव), चंदू आस्वले (रा. सोनुर्ली) आणि परशुराम हरणे (वय 22, रा. वडगाव) यांचा मृतांत,. प्राप्ती पहानपटे (वय 27), स्नेहल खारकर (वय 17), राधिका चव्हाण (वय 17) आणि जैतू मेश्राम (वय 35) अशी गंभीर जखमींची नावे आहेत. 

Wednesday, June 10, 2015

मनसेचे उपाध्यक्ष सह तिघे ठार

मनसेचे उपाध्यक्ष सह तिघे ठार


चंद्रपूर-नागपूर मार्गावरील बोरखेडीजवळ ट्रकची कारला धडक 

बुटीबोरी : चंद्रपूरहून नागपूरला येणाऱ्या महिंद्रा कारला ट्रकने धडक दिल्याने तिघेजण जागीच ठार झाले. ही घटना बोरखेडीजवळ घडली. मृतात चंद्रपूर जिल्हा मनसेचे उपाध्यक्ष सुधाकर राठोड, शिवसेनेचे कैलास संगमवार, बाबाराव उलमाले यांचा समावेश आहे. यात चालक सूरज गणवीर जखमी झाला. त्याला नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी हलविण्यात आले.
राजुरा विधानसभा क्षेत्राचे मनसे जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर राठोड (वय 49) हे काही कामानिमित्त स्वमालकीच्या महिंद्रा कार (क्र. एम.एच. 34-एएम 6044)ने नागपूरला जात होते. ही कार चालक सूरज गणवीर चालवित होता. त्यांच्यासोबत चंद्रपूर येथील शिवसेनेचे कार्यकर्ते कैलास संगमवार आणि बाबाराव उलमाले होते. बोरखेडी टोलनाका ओलांडल्यानंतर विरुद्ध दिशेने भरधाव आलेल्या ट्रक (क्र. एम.एच.34 एबी-2651)ने कारला धडक दिली. अपघात एवढा भिषण होता की, कारचा दर्शनी भाग चेंदामेंदा झाला. घटनेत सुधाकर राठोड, शिवसेनेचे कैलास संगमवार, बाबाराव उलमाले हे तिघेही जागीच ठार झाले. चालक सूरज गणवीर हे गंभीररित्या जखमी झाले.

Saturday, June 06, 2015

पर्जन्यमानाची माहिती एसएमएसद्वारे

पर्जन्यमानाची माहिती एसएमएसद्वारे

चंद्रपूर : जिल्हा प्रशासन यंदापासून जनतेला पर्जन्यमानाची माहिती एसएमएसद्वारे देणार आहे. यंदाचा मान्सून थोडा विलंबाने दाखल होणार असल्याने शेतकर्‍यांना शेती हंगामाचे नियोजन करता यावे, यासाठी जिल्हा प्रशासन हा उपक्रम राबविणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली आहे.
खरीप हंगामाची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. म्हैसेकर यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम.पी. कल्याणकर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय दैने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. अण्णासाहेब हसनाबादे, जिल्हा उपनिबंधक कौशडीकर व कृषी विकास अधिकारी देशमुख यावेळी उपस्थित होते.

Friday, June 05, 2015

आमदाराचा  दारुबंदीला विरोध

आमदाराचा दारुबंदीला विरोध

चंद्रपूर जिल्ह्यातील दारु बंदी करण्याचा निर्णय मागील दोन महिन्यापूर्वी फडणवीस सरकारने घेतला मात्र सत्ताधारी पक्षातील शिवसेनेचे आ.सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांनी दारु बंदीला विरोध केला आहे.

‘’चंद्रपूर जिल्हयाचा जवळपास 356 कोटींचे नुकसान त्याचप्रमाणे ह़ॉटेल उद्योगांवर काम करणारे जवळपास 10 हजार कर्मचारी व त्यावर अवलंबून असलेले त्यांची मुले, पत्नी, आईवडील अशा 40 ते 50 हजार लोकांवर उपासमारीची पाळी निर्माण झाली आहे, करिता आपणासं या पत्राव्दारे नम्र विंनती आहे की चंद्रपूर जिल्हयात झालेल्या दारुबंदीचा पुनविचार करणे गरजेचे असल्याने माझ्या चंद्रपूर जिल्हयाच्या दौ-यादरम्यान निदर्शनास आले असून यावर गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे असे या पत्रात म्हटले आहे.‘

साभार - मी मराठी -

शिवसेनेचे आ.सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांनी मुख्यमंत्र्यांना दारु बंदीचा फेरविचार करावा या संदर्भात लिहलेले पत्र- 

Thursday, June 04, 2015

बाबा आमटे यांच्या टपाल तिकीटाचे विमाेचन

बाबा आमटे यांच्या टपाल तिकीटाचे विमाेचन

चंद्रपुर – समाजसेवक बाबा आमटे यांच्या वर आज टपाल तिकीटाचे प्रकाशन आज राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले,चंद्रपुरात बाबांच्या स्मृतीत दोन कोटी खर्चुन अभ्यासिका उभारणार या अभ्यासिकेच्या माध्यमातून युपीएससी एमपीएससी अशा अनेक स्पर्धा परीक्षा मध्ये भाग घेण्यासाठी आणि स्पर्धेत टिकण्यासाठी या अभ्यासिकेचा वापर होईल अशी घोषणा आज राज्याचे अर्थ व् नियोजन व् वने मंत्री तथा चंद्रपुर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यानी केली ते आज कै. बाबा आमटे यांच्‍या स्‍मृतिप्रित्‍यर्थ प्रकाशीत टपाल तिकीटांचा सादरीकरण समारंभा प्रसंगी बोलत होते आज चंद्रपुर येथील प्रियदर्शीनी नाटयगृह, येथे हां कार्यक्रम पार पडला या वेळी राज्याचे अर्थ नियोजन व् वने मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते या टपाल टिकिटाचे प्रकाशन करण्यात आले.

Tuesday, June 02, 2015

मोनिका किरणापुरे हत्याकांड, चारही मारेकऱ्यांना जन्मठेप

मोनिका किरणापुरे हत्याकांड, चारही मारेकऱ्यांना जन्मठेप

नागपूर- नंदनवनच्या केडीके अभियांत्रिकी महाविद्यालयाची विद्यार्थिनी मोनिका किरणापुरे हत्याकांड खटल्याचा बहुप्रतीक्षित निकाल अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. डब्लू. चांदवानी यांच्या न्यायालयाने सहा पैकी चार आरोपींना न्यालायालयाने दोषी मानले आहे. मोनिका किरणापुरेच्या चारही मारेकऱ्यांना जन्मठेप सुनावली.
न्यायालयाने कुणाल अनिल जयस्वाल, प्रदीप महादेव सहारे, श्रीकांत सारकर, उमेश मराठे या चौघांनाही दोषी ठरवले असून रामेश्वर सोनेकर आणि गीता मालधुरे यांना निर्दोष ठरवले आहे. दरम्यान या सर्व दोषींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अश मागणी मोनिकाच्या आई-वडिलांनी केली आहे. या खटल्यात एकूण ३१ साक्षीदार तपासण्यात आले.

नंदनवनच्या केडीके अभियांत्रिकी महाविद्यालयाची विद्यार्थिनी असणा-या मोनिकाची ११ मार्च २०११ हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार असलेला कुणाल जयस्वाल सावरगावचा रहिवासी असून घटनेच्या वेळी तो काटोलच्या सेंट पॉल हायस्कूलचा शिक्षक होता. कुणालचे केडीकेमध्ये शिकणाऱ्या आणि नंदनवनच्याच वसतिगृहात राहणाऱ्या मुलीसोबत प्रेमसंबंध होते. दोघांमध्ये बेबनाव निर्माण झाल्याने कुणाल हा आपला मित्र प्रदीप महादेव सहारे याला सोबत घेऊन २२ फेब्रुवारी २०११ रोजी केडीके कॉलेज येथे प्रेयसीला समजावण्यासाठी गेला होता. दोघे समोरासमोर येऊनही ती काहीही न बोलता निघून गेली होती. त्यामुळे चिडून कुणालने आपल्या प्रेयसीला कायमचे संपविण्याचे ठरवले होते. याच वसतिगृहात राहणारी अन्य एक मुलगी कुणालच्या ओळखीची होती. दोघीही एकमेकींच्या जीवलग मैत्रिणी होत्या. मात्र ती कुणालच्या प्रेयसीच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवून कुणालला मोबाईलवर कळवायची. दरम्यान कुणालने आपला मित्र प्रदीप याची माहिती देणाऱ्या मैत्रिणीसोबत ओळख करून दिली होती.
कुणालने प्रदीपला भाडोत्री गुंडांकडून आपल्या या प्रेयसीचा खून करण्यास सांगितले होते. मोमीनपुऱ्याच्या एका हॉटेलमध्ये खुनाचा कट रचण्यात आला होता. खुनासाठी एक लाखाची सुपारी देऊ करण्यात आली होती.
प्रत्यक्ष खुनाच्या एक दिवसाअगोदर कुणाल आणि प्रदीप हे नंदनवन येथील वसतिगृहानजीकच्या एका कॅफेत थांबले होते. मारेकऱ्यांना कुणालच्या प्रेयसीला तिच्याच मैत्रिणीच्या मार्फत दाखवण्यात आले होते. 
घटनेच्या दिवशी कुणालची प्रेयसी वसतिगृहातून बाहेर पडल्याची माहिती तिच्या मैत्रिणीने कुणालला दिली. लागलीच मारेकऱ्यांनी मोटरसायकलींनी पाठलाग सुरू केला होता. ती कुणालची प्रेयसी नव्हती तर तिच्यासारखी दिसणारी निष्पाप मोनिका किरणापुरे होती. कॉलेजचा गणवेश घालून आणि स्कार्फने चेहरा झाकून होती. तिच्यावर तीक्ष्ण व धारदार शस्त्रांचे दहा घाव घालण्यात आले होते. त्यापैकी तीक्ष्ण व धारदार जांबिया तिच्या पाठीत भोसकण्यात आला होता. खून केल्यानंतर लागलीच सर्व आरोपी काटोल येथे पळून गेले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मोनिकाचा मृत्यू झाला.