काव्यशिल्प Digital Media: खाजगी

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu
Showing posts with label खाजगी. Show all posts
Showing posts with label खाजगी. Show all posts

Thursday, May 10, 2018

खाजगी बसधारकांनी वाजवी भाडे घेण्याचे चंद्रपूर RTOचे निर्देश

खाजगी बसधारकांनी वाजवी भाडे घेण्याचे चंद्रपूर RTOचे निर्देश

इमेज परिणामचंद्रपूर/प्रतिनिधी:
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील त्या त्या संवर्गातील टप्प्याच्या वाहतूकीच्या भाडयाचे दर विचारात घेवून खाजगी कंत्राटी परवानाधारक वाहनाचे त्या संवर्गासाठी येणा-या भाडेदराच्या 50 टक्के पेक्षा अधिक राहणार नाही, असे कमाल भाडेदर शासनाच्या शासन निर्णय क्र.एमव्हीआर-0412/प्र.क्र.378 दिनांक 27 एप्रिल 2018 नुसार निश्चित केलेले आहेत. त्यामुळे खाजगी बस वाहतूकदारांनी वाजवी भाडे आकारुनच प्रवाशांना वाहतूक सुविधा उपलब्ध करुन देण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत.

त्यामुळे कंत्राटी बस परवाना धारकांकडून जर विहित दरापेक्षा अधिक दराने आकारणी करण्यात येत असेल तर याविषयी मोटर वाहन विभागाच्या 02262426666 या निशुल्क तक्रार नोंदणी क्रमांकावर तक्रार नोंदवावी किंवा www.transportcomplaints.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर सुध्दा तक्रारी दाखल करता येणार आहेत.
सद्या मोठया प्रमाणात विवाह समारंभ सुरु असल्याने वाहनांची मागणी मोठया प्रमाणात होत आहे. त्यामुळे या गर्दीच्या हंगामात मागणी व पुरवठा यामधील संधीचा गैरफायदा घेवून खाजगी वाहतूकदार मोठया प्रमाणात भाडे वाढ करुन प्रवाशांची आर्थिक पिळवणूक करीत असतात. त्यामुळे प्रवाशांची पिळवणूक होवू नये या उद्देशाने शासनाने दिनांक 27 एप्रिल 2018 च्या शासन निर्णयात कमाल भाडे दर निश्चित केलेले आहेत. तेव्हा या कमाल भाडेदरापेक्षा अधिक भाडे बसधारक आकारत असल्याचे निदर्शनास आल्यास सदर परवाना धारकाविरुध्द मोटर वाहन कायदा, नियमाप्रमाणे कार्यवाही करण्यात येणार आहे. तेव्हा सर्व खाजगी बसधारकांनी शासनाने निचित केलेल्या दराप्रमाणेच भाडे घेण्यात यावे, अशा सूचना उपप्रादेशिक परिवहन अधिकारी चंद्रपूर यांनी केल्या आहेत.
सध्या २ दिवसांपासुन विनापरवाना प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी वाहतूकदारांवर चंद्रपूर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाने फास आवळला आहे व जवळपास २५ हून अधिक ट्रॅव्हल्स विरुद्ध कारवाई करण्यात आली,RTO विभागाला खाजगी ट्रॅव्हल्स विनापरवाना प्रवासी वाहतूक करीत असल्याची तक्रार वाढल्यामुळे आरटीओने ही कारवाई सुरू केली होती या कारवाई नंतर कमाल भाडेदर शासनाच्या शासन निर्णय क्र.एमव्हीआर-0412/प्र.क्र.378 दिनांक 27 एप्रिल 2018 नुसार निश्चित केलेले आहेत. त्यामुळे खाजगी बस वाहतूकदारांनी वाजवी भाडे आकारुनच प्रवाशांना वाहतूक सुविधा उपलब्ध करुन देण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत.तेव्हा या कमाल भाडेदरापेक्षा अधिक भाडे बसधारक आकारत असल्याचे निदर्शनास आल्यास सदर परवाना धारकाविरुध्द मोटर वाहन कायदा, नियमाप्रमाणे कार्यवाही करण्यात येणार आहे.
--------------------------------------------------------------------------------------
जाहिरातीसाठी राखीव...
भारतात पहिल्यांदा जागतिक पातळीवरील एक अग्रगण्य कंपनी घेऊन आली, कुक्कुट पालन ,मत्स्य पालन,शेळी पालन,दुध डेअरी यासारख्या संपूर्ण व्यवसायासाठी लागणारे संपूर्ण प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळणार अगदी निशुल्क, याच सोबत पशुखाद्य,पिल्ले,औषधी, या सारख्या संपूर्ण goods अतिशय अल्प दरात उपलब्ध ...त्यासाठी संपर्क करा:९१७५९३७९२५ या क्रमांकावर (घरपोच सेवा उपलब्ध)