সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Thursday, May 31, 2018

ताडोबात वाघाची पर्यटक जीप्सीवर झडप

ताडोबात वाघाची पर्यटक जीप्सीवर झडप

नागपूर/ललित लांजेवार 
व्याघ्र दर्शनासाठी पर्यटकात नेहमी उत्सुकता असते,त्यासाठीच व्याघ्र प्रकल्पात जंगल सफारी केली जाते. पण जंगल सफारी करतांना हि सफारी आपल्या जीवावर बेतणार नाही याची पूर्ण खबरदारी करूनच हि सफारी केली पाहिजे.सध्या सोशल मिडीयावर एक विडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. हा विडीओ आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वाघाच्या आक्रमक पवित्र्याचा, 
चिमूर तालुक्याच्या हद्दीतील मदनापुर बफर झोन येथे काही दिवसा अगोदर पर्यटक सफारीचा आनंद घेत असतांना पर्यटकांना व्याघ्र दर्शन झाले.या बफर झोनमध्ये सुख्या गवता लगत पर्यटकांना पट्टेदार वाघ दिसला वाघाला बघण्यासाठी जिप्सी थांबविण्यात आली. तितक्यात वाघाने धावत येत जीप्सीवर झडत घेण्याचा प्रयत्न केला मात्र जिप्सी चालकाच्या सतर्कतेने वाघाचा पर्यटक जीप्सिवरील हल्ला टळला.गेल्या काही दिवसांपासून हा विडीओ सोशल मिडीयावर वायरल होत होता.मात्र याला दुजोरा मिळू शकत नव्हता. आता ही घटना घडल्याची पुष्टी वनविभागाकडून करण्यात आली असून व्याघ्र प्रकल्प व्यवस्थापनाच्या बफर क्षेत्र कार्यालयाने या घटनेची गंभीर नोंद घेतली आहे. 
जंगल सफारी करतांना ज्या गेट वरून जंगल सफारी सुरु होते त्या ठीकानहून  पर्यटक,जिप्सी चालक व गाईड यांना विशेष सूचना केल्या जातात.मात्र या सूचनांचे पालन होत नसल्याचे या प्रकारावरून समोर आले आहे.नियमानुसार जंगल सफारी करतांना वाहन हे वन्य प्राण्यांपासून २० मीटर अंतरावर ठेवावे असा नियम आहे.मात्र या नियमाला राज्यातील व्याघ्र प्रकल्पात तिलांजली दिली जात आहे.
गेल्या काही दिवसा अगोदर असाच एक विडीओ वायरल झाला होता. ताडोबातील सेलिब्रिटी वाघीण असलेल्या माया वाघिणीने पर्यटकांना जवळून दर्शन दिले होते. मात्र तिच्या खुनखार नजरेसोबत तिची गाडीवर उडी घेण्याची तयारी बघून पर्यटकांची चांगलीच घाबरगुंडी उडाली होती. प्रसंगावधानाने जिप्सी चालकाने गाडी सुरु केली आणि समोर नेली. आणि जीव मुठीत घेऊन पर्यटनवारी करायला निघालेल्या पर्यटकांचा जीव भांड्यात पडला.
जैविक विविधता आणि नैसर्गिक वारसा लाभलेल्या तसेच घनदाट जंगलांनी व्याप्त असलेल्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्वाचे स्थान आहे. परिणामी या व्याघ्र प्रकल्पाला येणाऱ्या व्याघ्रप्रेमींची संख्या मोठी आहे. ताडोबा जंगलात सध्या उन्हाळयामुळे वाघोबांचे दर्शन सुलभ झाले आहे. त्यामुळे पर्यटकांची प्रकल्पात गर्दी दिसून येत आहे. पण अशातच ताडोबा वनपरिक्षेत्रातील अश्या घटनेने पर्यटक चांगलेच धास्तावले आहेत. 
या संपूर्ण प्रकारावरून व्याघ्र प्रकल्प व्यवस्थापनाच्या बफर क्षेत्र कार्यालयाने पर्यटकांना कोअर व बफर क्षेत्रात सावधगिरी बाळगण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
        -----------------------------------------------------------------------             
जाहिरात...
भारतात पहिल्यांदा जागतिक पातळीवरील एक अग्रगण्य कंपनी घेऊन आली, कुक्कुट पालन ,मत्स्य पालन,शेळी पालन,दुध डेअरी यासारख्या संपूर्ण व्यवसायासाठी लागणारे संपूर्ण प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळणार अगदी निशुल्क, याच सोबत पशुखाद्य,पिल्ले,औषधी, या सारख्या संपूर्ण goods अतिशय अल्प दरात उपलब्ध ...त्यासाठी संपर्क करा:9175937925 या क्रमांकावर (घरपोच सेवा उपलब्ध).

Gas safety device.
आपके एल.पी.जी गॅस सिलेंडर कि सुरक्षा अब आपके हात 
"सुरक्षित नारी सुरक्षित परिवार"
क्या आप अपने हि घर मे सुरक्षित है ?
दुर्घटना होणे से पहिले सावधानी बरते !
समय कभी बताकर नाही आता....तो इंतजार कीस बात का...
तुरंत मिलीये ..कही देर ना हो जाए !
*कल करेसो आज कर ,आज करे सो अब *
पल मे प्रलय हो जायेगा तो करेंगा कब !
जीवन अनमोल है!और आपका परिवार .........?
विशेषताए...
* सूक्ष्म गॅस लिकेज का परीक्षण.  
* गॅस का परिपूर्ण उपयोय एव गॅस के प्रमाण कि जानकारी गॅस कि बचत अर्थात पैसो की बचत
* किसी कारण होणे वाले गॅस लिकेजपर यह डीवाईस सप्लाई बंद कर देता है. 
आपकी सेफ्टी हि पुरे परीवार कि लाईफ सेफ्टी है..
जो अपने परीवारसे करते है प्यारवह गॅस सुरक्षा यंत्र से कैसे करेंगे इन्कार
तो फिर जल्दी ,आये जल्दी  पाये
संपर्क करे:9175937925,9021527117 

कृपया दिये गये लिंक ओपन करे :  https://youtu.be/IaXlvfNtkpo

महावितरण कार्यालयात अहिल्याबाई होळकर जयंती साजरी

महावितरण कार्यालयात अहिल्याबाई होळकर जयंती साजरी

चंद्रपूर/प्रतिनिधी:
राजमाता अहिल्याबाई होळकर यांची २९३ वी जयंती महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळात साजरी करण्यात आली. राजमाता अहिल्याबाईंच्या प्रतिमेस मुख्य अभियंता श्री. अरविंद भादिकर यांनी माल्यार्पण करून आदरांजली अर्पण केली. याप्रसंगी श्री. अनिल घोघरे;अधिक्षक अभियंता, पायाभूत आराखडाद्ध,उपमुख्य औदयोगिक संबंध अधिकारी श्री. सुशील विखार, वरिष्ठ व्यवस्थापक श्री.विठ्ठल मडावी हे प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थित सर्व अभियंता, अधिकारी व कर्मचारी बांधवांनी राजमाता अहिल्याबाईंच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.
-----------------------------------------------------------------------             
जाहिरात...
भारतात पहिल्यांदा जागतिक पातळीवरील एक अग्रगण्य कंपनी घेऊन आली, कुक्कुट पालन ,मत्स्य पालन,शेळी पालन,दुध डेअरी यासारख्या संपूर्ण व्यवसायासाठी लागणारे संपूर्ण प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळणार अगदी निशुल्क, याच सोबत पशुखाद्य,पिल्ले,औषधी, या सारख्या संपूर्ण goods अतिशय अल्प दरात उपलब्ध ...त्यासाठी संपर्क करा:9175937925 या क्रमांकावर (घरपोच सेवा उपलब्ध).

Gas safety device.
आपके एल.पी.जी गॅस सिलेंडर कि सुरक्षा अब आपके हात 
"सुरक्षित नारी सुरक्षित परिवार"
क्या आप अपने हि घर मे सुरक्षित है ?
दुर्घटना होणे से पहिले सावधानी बरते !
समय कभी बताकर नाही आता....तो इंतजार कीस बात का...
तुरंत मिलीये ..कही देर ना हो जाए !
*कल करेसो आज कर ,आज करे सो अब *
पल मे प्रलय हो जायेगा तो करेंगा कब !
जीवन अनमोल है!और आपका परिवार .........?
विशेषताए...
* सूक्ष्म गॅस लिकेज का परीक्षण.  
* गॅस का परिपूर्ण उपयोय एव गॅस के प्रमाण कि जानकारी गॅस कि बचत अर्थात पैसो की बचत
* किसी कारण होणे वाले गॅस लिकेजपर यह डीवाईस सप्लाई बंद कर देता है. 
आपकी सेफ्टी हि पुरे परीवार कि लाईफ सेफ्टी है..
जो अपने परीवारसे करते है प्यारवह गॅस सुरक्षा यंत्र से कैसे करेंगे इन्कार
तो फिर जल्दी ,आये जल्दी  पाये
संपर्क करे:9175937925,9021527117 
कृपया दिये गये लिंक ओपन करे :  https://youtu.be/IaXlvfNtkpo

'अब भारत बोलेगा',पतंजलीने लॉन्च केलं Kimbho अॅप

'अब भारत बोलेगा',पतंजलीने लॉन्च केलं Kimbho अॅप

मुंबई/प्रतिनिधी:
रामदेव बाबा यांनी बुधवारी पतंजलीचं नवं मेसेजिंग अॅप लॉन्च केलं आहे. Kimbho (किंभो) असं या मेसेजिंग अॅपचं नाव आहे. पतंजलीचं हे अॅप व्हॉट्सअॅप मेसेजिंग अॅपला टक्कर देईल, असा पतंजली कंपनीला विश्वास आहे. Kimbho ची टॅगलाइन ‘अब भारत बोलेगा’ अशी ठेवण्यात आली आहे.दरम्यान याआधी योगगुरु बाबा रामदेव यांनी 'स्वदेशी समृद्धी सिम कार्ड' या नावाचे सिम कार्ड लाँच केले आहे.भारत संचार निगम लिमीटेड (बीएसएनएल) आणि पतंजली यांनी संयुक्तपणे हे कार्ड लाँच केले आहे. मात्र सध्या हे कार्ड फक्त पतंजली कर्मचाऱ्यांसाठी असेल सामान्य नागरिकांना यासाठी थोडी वाट पहावी लागणार आहे.
पतंजली सिमचे फायदे
* फक्त 144 रुपयांचे रिचार्ज केल्यानंतर देशभरात अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा आहे. त्यासोबतच 2GB डेटा आणि 100 एसएमएस सुविधाही देण्यात आली आहे.
*या सिमवरुन पतंजली उत्पादनांवर 10% सूट दिली जाणार आहे.
* एवढेच नाही तर या सिमच्या यूजरला 2.5 लाख रुपयांपर्यंतचे मेडिकल लाइफ इन्शुरन्स तसेच 5 लाख रुपयापर्यंतचे लाइफ इन्शुरन्स दिले जाणार आहे.
* विम्याची रक्कम फक्त रस्ता दुर्घटनेसाठी मिळणार आहे.
-----------------------------------------------------------------------             
जाहिरात...
भारतात पहिल्यांदा जागतिक पातळीवरील एक अग्रगण्य कंपनी घेऊन आली, कुक्कुट पालन ,मत्स्य पालन,शेळी पालन,दुध डेअरी यासारख्या संपूर्ण व्यवसायासाठी लागणारे संपूर्ण प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळणार अगदी निशुल्क, याच सोबत पशुखाद्य,पिल्ले,औषधी, या सारख्या संपूर्ण goods अतिशय अल्प दरात उपलब्ध ...त्यासाठी संपर्क करा:9175937925 या क्रमांकावर (घरपोच सेवा उपलब्ध).

Gas safety device.
आपके एल.पी.जी गॅस सिलेंडर कि सुरक्षा अब आपके हात 
"सुरक्षित नारी सुरक्षित परिवार"
क्या आप अपने हि घर मे सुरक्षित है ?
दुर्घटना होणे से पहिले सावधानी बरते !
समय कभी बताकर नाही आता....तो इंतजार कीस बात का...
तुरंत मिलीये ..कही देर ना हो जाए !
*कल करेसो आज कर ,आज करे सो अब *
पल मे प्रलय हो जायेगा तो करेंगा कब !
जीवन अनमोल है!और आपका परिवार .........?
विशेषताए...
* सूक्ष्म गॅस लिकेज का परीक्षण.  
* गॅस का परिपूर्ण उपयोय एव गॅस के प्रमाण कि जानकारी गॅस कि बचत अर्थात पैसो की बचत
* किसी कारण होणे वाले गॅस लिकेजपर यह डीवाईस सप्लाई बंद कर देता है. 
आपकी सेफ्टी हि पुरे परीवार कि लाईफ सेफ्टी है..
जो अपने परीवारसे करते है प्यारवह गॅस सुरक्षा यंत्र से कैसे करेंगे इन्कार
तो फिर जल्दी ,आये जल्दी  पाये
संपर्क करे:9175937925,9021527117 

कृपया दिये गये लिंक ओपन करे :  https://youtu.be/IaXlvfNtkpo
८१ टक्के वृक्ष जिवंत;मुनगंटीवार यांचा दावा

८१ टक्के वृक्ष जिवंत;मुनगंटीवार यांचा दावा

mungatiwar साठी इमेज परिणामनागपूर/प्रतिनिधी:
वृक्षारोपणासंदर्भातील संपूर्ण माहिती ऑनलाइन पद्धतीने सर्व जनतेसाठी उपलब्ध राहणार आहे. २ कोटी वृक्ष लागवड करताना विभागाला ६७.९० लाखांचे उद्दिष्ट दिले होते, प्रत्यक्ष ६८.३० लाख वृक्षलागवड यशस्वीपणे पूर्ण केली. त्यापैकी ८१ टक्के वृक्ष जिवंत असल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
वनामती येथे नागपूर विभागात राबविण्यात येत असलेल्या १३ कोटी वृक्षलागवड मोहीम तसेच पूर्वतयारीचा आढावा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला. नागपूर विभागाला २ कोटी ६२ लाख ६५ हजार वृक्षलागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. आढावा बैठकीत खासदार रामदास तडस, आमदार नाना शामकुळे, आशिष देशमुखसमीर कुणावार, कृष्णा गजबे, ॲड. संजय धोटे, गिरीश व्यास, प्रकाश गजभिये, महाराष्ट्र वन विकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, विभागीय आयुक्त अनुप कुमार आदी उपस्थित होते.
४ कोटी वृक्षलागवड मोहीम राबविताना नागपूर विभागाला १ कोटी ३६ लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्ट दिले होते. त्यापैकी ७० टक्के जिवंत वृक्षाचे प्रमाण आहे. वृक्षलागवड मोहीम राबविताना प्रत्येक वृक्षसंगोपन ही संबंधित विभागाची जबाबदारी आहे. जेथे जागा उपलब्ध असेल तेथे ही मोहीम यशस्वी करावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
नागपूर विभागातील प्रत्येक जिल्ह्याने अत्यंत कल्पकतेने १३ कोटी वृक्षलागवडीचे नियोजन केले आहे. त्यानुसार ही मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्व विभागाने एकत्र येऊन एक महिन्यात दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्याचे आदेश दिले. खड्डे खोदण्यापासून तर वृक्षांच्या उपलब्धतेपर्यंतची तयारी पूर्ण करावी, असे आवाहन यावेळी वनमंत्र्यांनी केले.
सॅटेलाइट सर्वेक्षणातून वॉच
नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणानुसार, महाराष्ट्राच्या गैरवनक्षेत्रात २७३ चौरस किलोमीटर क्षेत्रात, वृक्षाच्छादित पट्टा निर्माण झाला. देशात वृक्षाच्छादित पट्टा निर्माण करण्यात संपूर्ण देशात महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे. वृक्षलागवडीसाठी १९ हजार ७३१ जागा निवडण्यात आल्या असून, त्यावर १ कोटी ५४ लाख ८५ हजार खड्डे खोदण्यात आले आहे. वृक्षलागवड मोहिमेसाठी ३ कोटी ६२ लाख ७१ हजार वृक्ष उपलब्ध आहेत. वृक्षलागवड मोहिमेवर वॉच ठेवण्यासाठी सॅटेलाइट सर्वेक्षणाचा वापर करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे मुनगंटीवार म्हणाले.
वृक्षलागवडीचे उद्दिष्ट
जिल्हा : उद्दिष्ट
नागपूर : ४३ लाख ४४ हजार

वर्धा : ३३ लाख ७ हजार

भंडारा : २४ लाख ५९ हजार

गोंदिया : ३४ लाख ६० हजार

चंद्रपूर : ७७ लाख २१ हजार

गडचिरोली : ५० लाख ७४ हजार
-----------------------------------------------------------------------             
जाहिरात...
भारतात पहिल्यांदा जागतिक पातळीवरील एक अग्रगण्य कंपनी घेऊन आली, कुक्कुट पालन ,मत्स्य पालन,शेळी पालन,दुध डेअरी यासारख्या संपूर्ण व्यवसायासाठी लागणारे संपूर्ण प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळणार अगदी निशुल्क, याच सोबत पशुखाद्य,पिल्ले,औषधी, या सारख्या संपूर्ण goods अतिशय अल्प दरात उपलब्ध ...त्यासाठी संपर्क करा:9175937925 या क्रमांकावर (घरपोच सेवा उपलब्ध).

Gas safety device.
आपके एल.पी.जी गॅस सिलेंडर कि सुरक्षा अब आपके हात 
"सुरक्षित नारी सुरक्षित परिवार"
क्या आप अपने हि घर मे सुरक्षित है ?
दुर्घटना होणे से पहिले सावधानी बरते !
समय कभी बताकर नाही आता....तो इंतजार कीस बात का...
तुरंत मिलीये ..कही देर ना हो जाए !
*कल करेसो आज कर ,आज करे सो अब *
पल मे प्रलय हो जायेगा तो करेंगा कब !
जीवन अनमोल है!और आपका परिवार .........?
विशेषताए...
* सूक्ष्म गॅस लिकेज का परीक्षण.  
* गॅस का परिपूर्ण उपयोय एव गॅस के प्रमाण कि जानकारी गॅस कि बचत अर्थात पैसो की बचत
* किसी कारण होणे वाले गॅस लिकेजपर यह डीवाईस सप्लाई बंद कर देता है. 
आपकी सेफ्टी हि पुरे परीवार कि लाईफ सेफ्टी है..
जो अपने परीवारसे करते है प्यारवह गॅस सुरक्षा यंत्र से कैसे करेंगे इन्कार
तो फिर जल्दी ,आये जल्दी  पाये
संपर्क करे:9175937925,9021527117 

कृपया दिये गये लिंक ओपन करे :  https://youtu.be/IaXlvfNtkpo

ताडोबाच्या ‘ब्लॅक पँथर’चा शास्त्रीय अभ्यासातून शोध

ताडोबाच्या ‘ब्लॅक पँथर’चा शास्त्रीय अभ्यासातून शोध

नागपूर/प्रतिनिधी:
ताडोबा जंगलात ब्लॅक पँथरदिसल्याचे वृत्त सध्या सोशल मीडियावर चांगलेच गाजत आहे. या ब्लँक पँथरचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने वनविभागानेही आता या ब्लॅक पँथरचा शोध सुरू केला आहे. शास्त्रीय पद्धतीने हा शोध सुरू असल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. 
वनामती येथे आयोजित पत्रकार परिषदेत मुनगंटीवार यांनी ही माहिती दिली. दोन वर्षांपूर्वीही रत्नागिरीच्या परिसरात हा ब्लॅक पँथर दिसला होता. आता ताडोबात दिसून आल्याची माहिती आहे. कॅमेरा ट्रॅपिंगच्या माध्यमातून त्यावर लक्ष ठेवले जात आहे. काळा देह, मांजरीसारख्या मिशा आणि धीरगंभीर आवाज असलेला ब्लॅक पँथर ताडोबात खऱ्या रूपात आला आहे. ही एक बिबट्याचीच जात आहे. शरीरातील काही हार्मोन्सच्या बदलांमुळे त्याच्या अंगावर काळे ठिपके उठतात. म्हणूनच याला काळा बिबट्या किंवा ब्लॅक पँथर म्हटले जाते, अशी माहितीही सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. 
सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झाल्या आहेत. त्यामुळे जंगल सफारीसाठी जगभरातून पर्यटक ताडोबाच्या अभयारण्याला भेट देतात. बेल्जियमचे पर्यटक जेन फ्रॅकोइस आपल्या कुटुंबासहित जंगल सफारीला गेले असता ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात शिवणझरी परिसरात त्यांना याचे दर्शन झाले. पर्यटकांनी त्याला आपल्या कॅमेऱ्यात कैद केले असून त्यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने कळवले आहे. २०१४ मध्ये ताडोबात काळा बिबट आढळून आल्याचीही नोंद आहे. मात्र, यानंतर ही दुसरीच नोंद असल्याचेही बोलले जात आहे. सातारा शहराच्या पश्‍चिमेकडील परिसरात कास परिसरात अतिदुर्मिळ अशा काळ्या बिबट्याने दर्शन दिल्याची माहितीही सोशल मीडियावर यापूर्वी फिरली. उपलब्ध माहितीच्या आधारावर ब्लॅक पँथरचा शोध घेतला जात असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले.
-----------------------------------------------------------------------             
जाहिरात...
भारतात पहिल्यांदा जागतिक पातळीवरील एक अग्रगण्य कंपनी घेऊन आली, कुक्कुट पालन ,मत्स्य पालन,शेळी पालन,दुध डेअरी यासारख्या संपूर्ण व्यवसायासाठी लागणारे संपूर्ण प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळणार अगदी निशुल्क, याच सोबत पशुखाद्य,पिल्ले,औषधी, या सारख्या संपूर्ण goods अतिशय अल्प दरात उपलब्ध ...त्यासाठी संपर्क करा:9175937925 या क्रमांकावर (घरपोच सेवा उपलब्ध).

Gas safety device.
आपके एल.पी.जी गॅस सिलेंडर कि सुरक्षा अब आपके हात 
"सुरक्षित नारी सुरक्षित परिवार"
क्या आप अपने हि घर मे सुरक्षित है ?
दुर्घटना होणे से पहिले सावधानी बरते !
समय कभी बताकर नाही आता....तो इंतजार कीस बात का...
तुरंत मिलीये ..कही देर ना हो जाए !
*कल करेसो आज कर ,आज करे सो अब *
पल मे प्रलय हो जायेगा तो करेंगा कब !
जीवन अनमोल है!और आपका परिवार .........?
विशेषताए...
* सूक्ष्म गॅस लिकेज का परीक्षण.  
* गॅस का परिपूर्ण उपयोय एव गॅस के प्रमाण कि जानकारी गॅस कि बचत अर्थात पैसो की बचत
* किसी कारण होणे वाले गॅस लिकेजपर यह डीवाईस सप्लाई बंद कर देता है. 
आपकी सेफ्टी हि पुरे परीवार कि लाईफ सेफ्टी है..
जो अपने परीवारसे करते है प्यारवह गॅस सुरक्षा यंत्र से कैसे करेंगे इन्कार
तो फिर जल्दी ,आये जल्दी  पाये
संपर्क करे:9175937925,9021527117 

कृपया दिये गये लिंक ओपन करे :  https://youtu.be/IaXlvfNtkpo

Wednesday, May 30, 2018

 MPSC मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर

MPSC मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर

MPSC exam 2018 results announced | एमपीएससीच्या मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर; पुण्याचा रोहितकुमार राजपूत पहिलामुंबई/प्रतिनिधी:
 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) गेल्यावर्षी घेण्यात आलेल्या मुख्य परीक्षेचा निकाल गुरुवारी जाहीर झाला. उपजिल्हाधिकारी, उपविभागीय पोलिस अधिकारी, सेल्स टॅक्स आणि इतर पदासाठी परीक्षा झाल्या होत्या. या परीक्षेत पुण्याचा रोहितकुमार राजपूतने प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. तर सुधीर पाटील व सोपान टोपे यांना अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळवला आहे. तर महिलांमधून श्रीमती रोहिणी नऱ्हे यांनी राज्यातून प्रथम येण्याचा मान मिळवला. मुंबईसह 37 जिल्हा केंद्रांवर पूर्व परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेमधून 4839 उमेदवार अर्हताप्राप्त ठरले होते. लेखी परीक्षेच्या आधारे 1194 उमेदवार अर्हताप्राप्त ठरले होते.  विद्यार्थ्यांना हा निकाल एमपीएससीच्या https://www.mpsc.gov.in या वेबसाइटवर पाहता येईल. 
 गडचांदूरच्या सावित्रीबाई फुले विद्यालययाचा उत्कृष्ट  निकाल

गडचांदूरच्या सावित्रीबाई फुले विद्यालययाचा उत्कृष्ट निकाल

निकिता कदम महाविद्यालयातुन प्रथम
गडचांदूर/प्रतिनिधी:
गडचांदूर शहरातील नामांकित सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ गडचांदूर द्वारा संचालित सावित्रीबाई फुले कनिष्ठ महाविद्यालय गडचांदूर  च्या विध्यार्थानी यंदा इयत्ता बारावीच्या परीक्षेत बाजी मारली असून, महाविद्यालयाचा  निकाल 79.73 टक्के निकाल लागला आहे 
   कला शाखेतुन निकिता श्रीराम  कदम हिने 80.30% गुण मिळवून महाविद्यालयातून प्रथम क्रमांक पटकवला आहे. प्रशांत भाऊराव करदोळे या विद्यार्थ्याने 78.46% गन मिळवून  महाविद्यालयातून द्वितीय येण्याचा मान मिळविला.तर रामचंद्र मधुकर काकडे याने 74.92% गुण मिळविले व तो महाविद्यालयातून तृतीय आला आहे.
या विध्यार्थीनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ.आनंदराव अडबाले,संस्थेचे उपाध्यक्ष तुळशीराम पुंजेकर,संस्थेचे सचिव नामदेवराव बोबडे, सर्व संचालक मंडळातील सदस्यांनी तसेच  महाविद्यालयाचे प्राचार्य सुधाकर मोहारे व सर्व शिक्षक तथा शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विध्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील भविष्याच्या शुभेच्छा दिल्या.
-------------------------------------------------------------
जाहिरात...
भारतात पहिल्यांदा जागतिक पातळीवरील एक अग्रगण्य कंपनी
 घेऊन आली, कुक्कुट पालन ,मत्स्य पालन,शेळी पालन,दुध डेअरी यासारख्या संपूर्ण व्यवसायासाठी लागणारे संपूर्ण प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळणार अगदी निशुल्क, याच सोबत पशुखाद्य,पिल्ले,औषधी, या सारख्या संपूर्ण goods अतिशय अल्प दरात उपलब्ध ...त्यासाठी संपर्क करा:9175937925 या क्रमांकावर (घरपोच सेवा उपलब्ध).
Gas safety device.
आपके एल.पी.जी गॅस सिलेंडर कि सुरक्षा अब आपके हात 
"सुरक्षित नारी सुरक्षित परिवार"
क्या आप अपने हि घर मे सुरक्षित है ?
दुर्घटना होणे से पहिले सावधानी बरते !
समय कभी बताकर नाही आता....तो इंतजार कीस बात का...
तुरंत मिलीये ..कही देर ना हो जाए !
*कल करेसो आज कर ,आज करे सो अब *
पल मे प्रलय हो जायेगा तो करेंगा कब !
जीवन अनमोल है!और आपका परिवार .........?
विशेषताए...
* सूक्ष्म गॅस लिकेज का परीक्षण.  
* गॅस का परिपूर्ण उपयोय एव गॅस के प्रमाण कि जानकारी गॅस कि बचत अर्थात पैसो की बचत
* किसी कारण होणे वाले गॅस लिकेजपर यह डीवाईस सप्लाई बंद कर देता है. 
आपकी सेफ्टी हि पुरे परीवार कि लाईफ सेफ्टी है..
जो अपने परीवारसे करते है प्यारवह गॅस सुरक्षा यंत्र से कैसे करेंगे इन्कार
तो फिर जल्दी ,आये जल्दी  पाये
संपर्क करे:9175937925,9021527117 
कृपया दिये गये लिंक ओपन करे :  https://youtu.be/IaXlvfNtkpo

लक्ष्मीनगर झोनच्या अधिकाऱ्याला ‘कारणे दाखवा’नोटीस

लक्ष्मीनगर झोनच्या अधिकाऱ्याला ‘कारणे दाखवा’नोटीस

विधी समिती सभापतींचे निर्देश 
एमआरटीपी ॲक्टअंतर्गत कारवाईची माहिती १५ दिवसांत द्या

नागपूर/प्रतिनिधी:

 महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना कायद्यान्वये करण्यात येणाऱ्या कारवाईसंदर्भातील झोननिहाय सविस्तर माहितीचा तुलनात्मक तक्ता तयार करून १५ दिवसांच्या आत विधी विभागाकडे सादर करण्याचे निर्देश विधी समितीचे सभापती ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी दिले. महत्त्वपूर्ण बैठकीत अनुपस्थित असणाऱ्या लक्ष्मीनगर झोनच्या संबंधित अधिकाऱ्याला ‘कारणे दाखवा’ नोटीस देण्यात यावी, असे निर्देशही त्यांनी दिले. 
नागपूर महानगरपालिका सिव्हील लाईन मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती सभागृहात बुधवारी (ता. ३०) विधी समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सभापती धर्मपाल मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला समितीच्या उपसभापती संगीता गिऱ्हे, सदस्य जयश्री वाडीभस्मे, अमर बागडे, समिता चकोले, जुल्फेकार अहमद भुट्टो, शेख मोहम्मद जमाल, सहायक आयुक्त (सामान्य प्रशासन) महेश धामेचा, विधी अधिकारी व्ही.डी. कपले उपस्थित होते. 
सदर बैठकीत महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना नियोजन कायद्यातील तरतुदीनुसार करण्यात आलेल्या कारवाईची झोननिहाय माहिती सभापतींनी घेतली. यात जी प्रकरणे शासनाकडे अपीलमध्ये आहेत, जी प्रकरणे न्यायालयात आहेत, त्याचा पाठपुरावा कोण करतो, याबाबत सभापतींनी माहिती विचारली. मात्र, झोनस्तरावर वकील किंवा विधी सहायक उपलब्ध नसल्याने या प्रकरणांच्या पाठपुराव्यास विलंब होतो, अशी माहिती सहायक आयुक्तांनी दिली. समितीचे सभापती धर्मपाल मेश्राम यांनी सदर कार्यात विधी विभागाशी समन्वय साधून त्यांची मदत घेण्याचे निर्देश दिले. झोनकडून मागणी आल्यास कायदेशीर बाबींच्या कार्यासाठी झोनस्तरावर विधी सहायक नेमण्याचे आश्वासन दिले. एमआरटीपी कायद्याअंतर्गत प्रकरणातील माहितीसाठी एक तुलनात्मक तक्ता तयार करण्यात यावा. ३१ मार्च २०१८ पर्यंतची प्रलंबित प्रकरणे, त्याची सद्यस्थिती, ठोकताळे तपासले अथवा नाही, कोणता वकील प्रकरण हाताळीत आहे अशी माहिती अंतर्भूत करून १५ दिवसांच्या आत विभागाकडे सादर करण्याचे निर्देश दिले. 
नागपूर महानगरपालिकेच्या विविध विभागांकडे येणाऱ्या आणि तद्‌नंतर अनादरित होणाऱ्या धनादेशांबद्दलच्या प्रकरणांचा आढावा सभापतींनी घेतला. नागपूर महानगरपालिकेने सन २००६-०७ मध्ये अनादरित धनादेशाची सर्वाधिक ४९ प्रकरणे न्यायालयात दाखल केली होती. त्यापैकी ४८ प्रकरणे निकाली निघाली आहे. त्यानंतर मात्र कुठलेही प्रकरणे न्यायालयात प्रविष्ठ करण्यात आली नाही, अशी माहिती विधी अधिकारी कपले यांनी दिली. याबाबत सभापतींनी माहिती विचारली असता, बहुतांश धनादेश ही कर विभागातील असतात. अनादरित धनादेशप्रकरणी १३८ ची नोटीस दिल्यानंतर बहुतांश धनादेशाची रक्कम वसूल होते. काही प्रकरणात रक्कम अतिशय कमी असल्याने न्यायप्रविष्ठ करणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नसल्याची माहिती झोन सहायक आयुक्तांनी दिली. यापुढे विधी विभागाने कर विभागाशी संपर्क साधून झोननिहाय अनादरित धनादेशाची माहिती घ्यावी आणि कायद्याच्या चौकटीत राहून नियमानुसार कारवाई करावी, असे निर्देश दिले. 
मनपामध्ये आयुक्त, सत्तापक्ष नेते, माजी महापौर, विधी समिती सभापती, कायदा सल्लागार, अपर आयुक्त यांचा समावेश असलेली एक विधी समीक्षा समिती नेमण्यात आली आहे. या समितीने मनपाची न्यायालयातील प्रकरणे बघणाऱ्या आठ वकिलांचे काम थांबविले होते. आता नवीन वकिलांची नियुक्ती करताना वकिलांचा अनुभवाच्या आधारे नियुक्त करावयाच्या संख्येत तिपटीने अर्ज मागवा. त्याची छानणी करून विधी समितीच्या माध्यमातून समीक्षा समितीकडे ठेवण्याचे निर्देश सभापती धर्मपाल मेश्राम यांनी दिले. 
मनपात असलेल्या दहाही विषय समित्यांसाठी एक निश्चित धोरण विधी समितीने तयार करावे या महापौरांच्या सूचनेनुसार सदर धोरणाचे प्रारूप आजच्या बैठकीत समितीने मांडले. काही दिवसांपूर्वी समितीने मुंबई आणि पुणे महानगरपालिकेचा दौरा केला. या दौऱ्यानंतरचा अहवाला विधी अधिकारी कपले यांनी समितीसमोर मांडला. मुंबई, पुणे महानगरपालिकेप्रमाणे नागपूर महानगरपालिकेत राजशिष्टाचार अधिकारी असावा, महानगरपालिकेच्या प्रकरणाकरिता स्वतंत्र न्यायालयाची स्थापना करावी, महत्त्वाच्या प्रकरणात ज्येष्ठ कायदेतज्ज्ञांचे मत घेण्यासाठी पॅनल तयार करण्यात यावे, अशा शिफारशी करण्यात आल्या आहेत. 
बैठकीला झोन सहायक आयुक्त सर्वश्री गणेश राठोड, राजू भिवगडे, सुभाष जयदेव, राजेश कराडे, प्रकाश वऱ्हाडे, विजय हुमणे, अशोक पाटील, हरिश राऊत उपस्थित होते.
-------------------------------------------------------------
जाहिरात...
भारतात पहिल्यांदा जागतिक पातळीवरील एक अग्रगण्य कंपनी
 घेऊन आली, कुक्कुट पालन ,मत्स्य पालन,शेळी पालन,दुध डेअरी यासारख्या संपूर्ण व्यवसायासाठी लागणारे संपूर्ण प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळणार अगदी निशुल्क, याच सोबत पशुखाद्य,पिल्ले,औषधी, या सारख्या संपूर्ण goods अतिशय अल्प दरात उपलब्ध ...त्यासाठी संपर्क करा:9175937925 या क्रमांकावर (घरपोच सेवा उपलब्ध).
Gas safety device.
आपके एल.पी.जी गॅस सिलेंडर कि सुरक्षा अब आपके हात 
"सुरक्षित नारी सुरक्षित परिवार"
क्या आप अपने हि घर मे सुरक्षित है ?
दुर्घटना होणे से पहिले सावधानी बरते !
समय कभी बताकर नाही आता....तो इंतजार कीस बात का...
तुरंत मिलीये ..कही देर ना हो जाए !
*कल करेसो आज कर ,आज करे सो अब *
पल मे प्रलय हो जायेगा तो करेंगा कब !
जीवन अनमोल है!और आपका परिवार .........?
विशेषताए...
* सूक्ष्म गॅस लिकेज का परीक्षण.  
* गॅस का परिपूर्ण उपयोय एव गॅस के प्रमाण कि जानकारी गॅस कि बचत अर्थात पैसो की बचत
* किसी कारण होणे वाले गॅस लिकेजपर यह डीवाईस सप्लाई बंद कर देता है. 
आपकी सेफ्टी हि पुरे परीवार कि लाईफ सेफ्टी है..
जो अपने परीवारसे करते है प्यारवह गॅस सुरक्षा यंत्र से कैसे करेंगे इन्कार
तो फिर जल्दी ,आये जल्दी  पाये
संपर्क करे:9175937925,9021527117 
कृपया दिये गये लिंक ओपन करे :  https://youtu.be/IaXlvfNtkpo

सामाजिक न्याय विभागाच्या भिवकुंड व चिमूर शाळेसाठी प्रचंड स्पर्धा

सामाजिक न्याय विभागाच्या भिवकुंड व चिमूर शाळेसाठी प्रचंड स्पर्धा

शंभर टक्के निकाल देणाऱ्या शासकीय निवासी शाळेतील
प्रवेशासाठी अर्ज मिळविण्याची आजची शेवटची तारीख 
वसतिगृह साठी इमेज परिणामचंद्रपूर/प्रतिनिधी:
खाजगी शाळांचे पेव फुटले असताना शासकीय शाळांकडे दुर्लक्ष करणाऱ्या पालकांसाठी व प्रशासनासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील भिवकुंड व चिमूर येतील अनुसूचित जाती व नवबौद्ध मुला-मुलींकरिता सुरू करण्यात आलेल्या दोन शाळा अपवाद ठरल्या आहेत. पब्लिक स्कूल सारख्या सर्व सुविधा असणाऱ्या या शाळांचे निकाल गेल्या पाच वर्षात शंभर टक्के असून याठिकाणी पालकांनी गर्दी केली आहे. या शाळेमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी अर्ज करण्याची 31 मे शेवटची तारीख आहे.
         राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्यामार्फत संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात दोन याप्रमाणे 84 शाळा उघडण्यात आल्या होत्या. या शाळांमधील शैक्षणिक दर्जा विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणाऱ्या सुविधा याबाबत सामाजिक न्याय विभागाने काही मापदंड ठरविले आहे.  त्यामुळे एखाद्या खाजगी पब्लिक स्कूलला लाजवेल अशा अद्यावत सोयीसुविधांच्या या शाळांमुळे अनेक मुलांच्या आयुष्यात बदल घडला आहे. विशेष म्हणजे 2012 पासून सुरू झालेल्या शाळांमध्ये दहावीचा निकाल शंभर टक्के लागलेला आहे. या शाळांमध्ये अनुसूचित जातींच्याच मुला-मुलींना प्रवेश मिळतो. याठिकाणी वर्ग 6 ते 10 सेमी इंग्रजी माध्यमाची मुलांचे प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली जाते. गुणवत्तेवर आधारित ही प्रवेश प्रक्रिया असून भिवकुंड येथील शाळा मुलांसाठी आहे.
 तर चिमूर येथील शाळा फक्त मुलींसाठी आहे. शाळेमध्येच वस्तीगृह असून वसतिगृहातील विद्यार्थ्यांना सकाळचा नाश्ता दोन वेळचे जेवण निवासी व्यवस्था तसेच इतर शैक्षणिक सुविधा मोफत पुरविण्यात येते. अनुसूचित जातीतील जिल्हाभरातील नागरिकांनी त्यांच्या गुणवंत पालकांना याठिकाणी प्रवेश देण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आव्हान समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रसाद कुलकर्णी यांनी केले आहे. या शाळांमध्ये प्रवेशासाठी 31 मे पर्यंत अर्ज वाटप करण्यात येणार होते. 10 जून ही अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख आहे. यासंदर्भात संबंधित शाळा प्रशासन संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
-------------------------------------------------------------
जाहिरात...
भारतात पहिल्यांदा जागतिक पातळीवरील एक अग्रगण्य कंपनी
 घेऊन आली, कुक्कुट पालन ,मत्स्य पालन,शेळी पालन,दुध डेअरी यासारख्या संपूर्ण व्यवसायासाठी लागणारे संपूर्ण प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळणार अगदी निशुल्क, याच सोबत पशुखाद्य,पिल्ले,औषधी, या सारख्या संपूर्ण goods अतिशय अल्प दरात उपलब्ध ...त्यासाठी संपर्क करा:9175937925 या क्रमांकावर (घरपोच सेवा उपलब्ध).
Gas safety device.
आपके एल.पी.जी गॅस सिलेंडर कि सुरक्षा अब आपके हात 
"सुरक्षित नारी सुरक्षित परिवार"
क्या आप अपने हि घर मे सुरक्षित है ?
दुर्घटना होणे से पहिले सावधानी बरते !
समय कभी बताकर नाही आता....तो इंतजार कीस बात का...
तुरंत मिलीये ..कही देर ना हो जाए !
*कल करेसो आज कर ,आज करे सो अब *
पल मे प्रलय हो जायेगा तो करेंगा कब !
जीवन अनमोल है!और आपका परिवार .........?
विशेषताए...
* सूक्ष्म गॅस लिकेज का परीक्षण.  
* गॅस का परिपूर्ण उपयोय एव गॅस के प्रमाण कि जानकारी गॅस कि बचत अर्थात पैसो की बचत
* किसी कारण होणे वाले गॅस लिकेजपर यह डीवाईस सप्लाई बंद कर देता है. 
आपकी सेफ्टी हि पुरे परीवार कि लाईफ सेफ्टी है..
जो अपने परीवारसे करते है प्यारवह गॅस सुरक्षा यंत्र से कैसे करेंगे इन्कार
तो फिर जल्दी ,आये जल्दी  पाये
संपर्क करे:9175937925,9021527117 
कृपया दिये गये लिंक ओपन करे :  https://youtu.be/IaXlvfNtkpo

चंद्रपूरच्या खोज अर्थात शोध नाविन्याच्या स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद

चंद्रपूरच्या खोज अर्थात शोध नाविन्याच्या स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद

अभिनव आयडिया देणाऱ्या स्पर्धकांना सादरीकरणासाठी बोलावणार

चंद्रपूर/प्रातिनिधी:
खोज या स्पर्धेला जिल्ह्यासह देशभरातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला असून आता या स्पर्धेतील पहिल्या पाच अभिनव प्रवेशिका पाठवणाऱ्या स्पर्धकांना आपला प्रस्ताव सादर करण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे लवकरच आमंत्रित केले जाणार आहे. महाराष्ट्रात एखाद्या जिल्हा प्रशासनाने आपल्या कामकाजात नाविन्य आणण्यासाठी थेट जनतेतून आयडिया मागण्याची ही पहिलीच वेळ होती. चंद्रपूर जिल्हा प्रशासनाच्या या अभिनव उपक्रमाला भक्कम प्रतिसाद मिळाला असून आता या आयडिया प्रशासनात आणण्याबाबत आखणी केली जाणार आहे.
एप्रिल महिन्यात खोज स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी जिल्हा प्रशासनाने एक प्रसिद्धी मोहीम आखली होती. चंद्रपूर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील व देशातील अन्य भागातूनही चार गटांमध्ये प्रवेशिका आमंत्रित करण्यात आल्या होत्या. जिल्हा प्रशासनाच्या या पुढाकाराला प्रचंड प्रतिसाद मिळाला असून अनेकांनी अतिशय कल्पक अशा आयडिया मांडल्या आहेत. यामध्ये राज्याबाहेरील अनेकांचा समावेश आहे. ही स्पर्धा चार भागात घेण्यात आली. यामध्ये कृषी, पर्यटन, प्रशासन व मानव जीवन विकास या चार गटांचा समावेश होता. मानव जीवन विकास घटकात चंद्रपूर जिल्ह्यातील डॉ बालमुकुंद पालीवाल यांच्या चमूने कल्पना पाठविली आहे. याशिवाय चंद्रपूर जिल्ह्यातील प्रकृती महिला विकास केंद्र यांच्या चमूने भारती विनायकराव रामटेके यांच्या नेतृत्वात सामान्य माणसाच्या जीवनात आर्थिक सुबत्ता आणण्याची कल्पना पाठविली आहे. 
बल्लारपूर येथील प्रवीण प्रदीप निखारे याचीही कल्पना पहिल्या पाच मध्ये आली असून त्यांनी कुक्कुटपालनाच्या संदर्भातील अभिनव कल्पना सुचवली आहे. अहमदाबाद गुजरात येथून अलजुबेर सय्यद यांनी गरिबांना शक्य होईल अशाच सोलर कुकरची कल्पना सुचवली आहे. सामान्यांच्या आयुष्यात आर्थिक उत्थान आणण्यासाठी जिल्ह्यातील प्रतिष्ठित अशा अंबुजा सिमेंट फाउंडेशननेही आपले कर्तव्य बजावले असून प-हाटी (कापूस) पासून इंधन निर्मितीचा प्रस्ताव सुचविला आहे. या सर्व कल्पना संबंधित संस्था आणि व्यक्तींनी प्रत्यक्षात अंमलात आणल्या असून त्यांना याचा चांगला फायदा झाला आहे. याशिवाय याच गटांमध्ये ज्यांनी केवळ अभिनव आयडिया सुचविल्या आहेत. त्यामध्ये नागभीडचे उमाजी खोब्रागडे, चंद्रपूरच्या सुचिता संतोष जीरकुटवार, प्रवीण कुमार चादर, अभिषेक गादिया यांचा समावेश आहे. वेगवस मंजुषा या नागपूरच्या ग्रुपने देखील आपली कल्पना पाठविली आहे. पर्यटन विभागातील प्रत्यक्ष अंमलबजावणी न झालेल्या अभिनव सूचना देणाऱ्यांमध्ये योगेश्वर यशवंतराव दुधपचारे, प्रियंका इन्‍द्रपाल भालवे, चिमूर तालुक्यातील मुग्धायी मंडळाचे गोवर्धन नन्नावरे, सुरेश गायकवाड, रामराव नन्नावरे, सदानंद ढोक आदींनी आपल्या कल्पना सुचवले आहेत. याशिवाय राजुरा येथील आशिष चांदेकर, चंद्रपूर येथील राजेंद्र सिंग हरिसिंग गौतम, वरोरा येथील नितीन नारायणराव बारेकर, चंद्रपूर येथील प्रवीण कावेरी, भद्रावती येथील रवींद्र रत्नपारखी, वरोरा येथील पियुष कांबडी, चंद्रपूर येथील नीरज तन्नीरवार यांचा समावेश आहे.
कृषी क्षेत्रात ज्यांनी आपल्या कल्पना स्वतः राबवून नवे प्रयोग केले आहेत. अशामध्ये चारगांवचे मधुकर चिंधुजी भलमे, सावली येथील सविता गड्डमवार, वरोरा येथील विठ्ठल हटवार, राजूरा येथील सुहास आसेकर यांच्या नेतृत्वातील चमने कृषी पर्यटनाचा प्रस्ताव दिला आहे. सिंदेवाहीच्या दादाजी जोगू भेंडाळे यांच्या चमूने कृषी गटाचा पर्याय सुचविला आहे. नाशिक जिल्हयातील श्रध्दा बागवे यांनी मृद चाचणीचा पर्याय दिला आहे. चंद्रपूरचे हबीब मेहबुब शेख यांनी आर्थिक सबलतेचा पर्याय सूचविला आहे. तर मुलचे काशिनाथ बोरकर यांनी रेशीम उद्योगाचा पर्याय सुचविला आहे. विशेष म्हणजे या पर्यायाची अंमलबजावणी झाली आहे. मारुती बाबाराव डोंगे, पुनम कपीलदास बाम्बोळे, मारुती नारायण मदनेलवार, प्रशांत विजय तावडे, विजय देविदास मेश्राम, विलास लक्ष्मणराव मालधारी, बिपिन सुरेश मुध्दा यांचा समावेश आहे. 
प्रशासकीय सुधारणा संदर्भात विवेक मोरेश्वर गरफाडे, रुपेश विनोद दुबे यांच्या नेतृत्वातील विनोद विठ्ठलराव कडुकर, सतीश हरिदास भोयर, सारंग उमाटे यांनी आपल्या कल्पना सुचवल्या आहेत. याशिवाय अक्षय कुमार पुरुषोत्तम गांधी, नम्रता देशमुख, डॉ भाईदास ढोले यांनी देखील आपल्या कल्पना सूचवल्या आहे, या कल्पनाचे लवकरच सादरीकरण एका कार्यक्रमात केले जाणार आहे. याबाबत स्पर्धकांना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कळविण्यात येणार आहे. प्रत्यक्ष सादरीकरण बघितल्यानंतर या कल्पनांचा प्रशासनामध्ये अंमल करण्यावर विचार केला जाणार आहे. शासनाच्या विविध योजना राबवताना त्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचाव्यात व त्यातून जनकल्याण साधले जावे हा उद्देश ठेवून ही योजना आखण्यात आली होती. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये हा पहिला अभिनव प्रयोग असून राज्यभर या प्रयोगाची चर्चा झाली होती.