काव्यशिल्प Digital Media: संपादकीय

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu
Showing posts with label संपादकीय. Show all posts
Showing posts with label संपादकीय. Show all posts

Monday, October 01, 2018

सावली खादी चळवळीची माऊली

सावली खादी चळवळीची माऊली

                                     इंग्रजांचा युनियन जॅक ज्या प्रदेशावर कधीच फडकला नाही, असा भाग म्हणजे दंडकारण्यातील चंद्रपूर-गडचिरोली जिल्हा जंगलव्याप्त भूभाग. हा गोंड राज्याच्या अधिपत्याखालील प्रदेश म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्याला स्वतःचा इतिहास आहे. स्वातंत्र्य लढयातील चिमूर - आष्टीचा क्रांतीकारी उठाव सर्वानाच स्मरणात आहे. मात्र खादीच्या स्वावलंबनाचा मूलमंत्र देणारा प्रदेश म्हणूनही या जिल्हयाचे नाव इतिहासात नमूद आहे. पूर्वीच्या मध्यप्रांतातील चांदा जिल्हातील सावली येथून महात्मा गांधींनी ग्रामोव्दाराचा संकल्प भारताला दिला आहे. चंद्रपूरपासून 45 किलोमिटर पूर्वेकडे असणारे सावली हे गाव स्वातंत्र्यपूर्व काळातील ग्रामोद्योग चळवळीचे केंद्र होते. या गावामध्ये 1936 मध्ये अखिल भारतीय गांधी सेवा संघाचे अधिवेशन घेण्यात आले होते. महात्मा गांधींनी स्वातंत्र्यपूर्व काळात दोन वेळा या गावाला भेट दिली. 
आपल्या व्यस्तेत सात दिवस मुक्काम केला. त्‍यांनी सात दिवस या छोटया गावात मुक्काम ठेवावा असे नेमके या गावात काय असेल असा प्रश्न नेहमी पडायचा ? सावलीत यासाठी भेट दिली आणि ‘ सावली खादी चळवळीची माऊली ’ ही नवी ओळख डोळ्यापुढे आली. ग्रामोद्योगाच्या चैतन्याचे अग्नीकुंड डोळ्यापुढे आले. चरख्याचा आवाज, खादी घातलेल्यांची गर्दी आणि अहिंसा व असहकाराच्या आयुधाने जग हलवणा-या महात्मा गांधींचा संयत स्वर मनात गुंजला.







सावलीच्या नाग विदर्भ चरखा संघाच्या आवारात या भारावलेल्या वातावरणाची कुणालाही अनुभूती येईल. सावलीच्या भूमीत ठिकठिकाणी समर्पण आणि त्यागाची उदाहरण बघायला मिळाली. 82 वर्षाच्या राजाबाळ संगडीवार यांच्या थरथरत्या हाताला हाती घेत येथील इतिहास जाणता आला. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार कार्यालयाच्या पुढ्यातच तेव्हा उभ्या असलेल्या आम्रवृक्षाखाली महात्माजींचे नातू कृष्णदास गांधी व मनोज्ञा यांचा विवाह झाल्याचीही माहिती त्यांनी दिली. 
गांधीजींच्या सोबत सरदार वल्लभ भाई पटेल, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, आचार्य विनोबा भावे, डॉक्टर करिअप्पा, जमनालाल बजाज, सरोजिनी नायडू, सुशीला नायर आदी नेतेही या काळात सावलीमध्ये मुक्कामी होते. येथील चरखा संघाच्या प्राचीन वास्तू मध्ये गांधीजी आणि त्यांच्या कार्याचा शोध घेताना या महात्म्याने आयुष्यभर "खेड्याकडे चला "असा नारा का दिला हे लक्षात आले. दीड-दोनशे चरख्यावर काम करणारे असंख्य हात आजही सावलीत सूत कताई करतात. सावलीच्या चरखा संघात अधिकही चरख्याची घरघर सुरू असून यावर महिला- पुरूष सूत काततात. या सुतापासून सावली मध्ये उत्तम प्रतीची खादी देखील तयार होते. अखिल भारतीय खादी ग्रामोद्योग कमिशनचा हा चरखा संघ ऐतिहासिक वास्तू आहे. 100 वर्षांपासून सावली मध्ये सूतकताई आणि खादी तयार करण्याचे कार्य चालू आहे.

1927 पासून चरख्याची घरघर
1927 मध्ये नर्मदा प्रसाद अवस्थी यांच्या पुढाकाराने खादी भंडाराची सुरुवात झाली. पुढे 1958 पासून खादी ग्रामोद्योग कमिशन अंतर्गत नाग विदर्भ चरखा संघातंर्गत हे कार्यालय आले. 100 वर्षांपासून चंद्रपूर जिल्ह्यातील हे तालुक्याचे गाव खादी परिवाराची जुळले असून या क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व नामवंत व्यक्तींनी या छोट्याशा गावाला भेट दिली आहे. मात्र हे गाव इतिहासात अजरामर झाले ते महात्माजींच्या दोन भेटीमुळेच. सावली या गावाला महात्मा गांधी यांनी दोन वेळा भेट दिली. त्यांची प्रथम भेट 14 नोव्हेंबर 1933 रोजी झाली. तर दुसरी भेट 27 फेब्रुवारी 1936 रोजी झाली. 27 फेब्रुवारी ते 5 मार्चपर्यंत महात्मा गांधी याठिकाणी मुक्कामी होते. थोडक्यात सात दिवस सावली ही देशाची राजकीय राजधानी झाले होते. सावली या गावांमध्ये आज असणाऱ्या चरखा संघातील इमारतीमध्ये या महामानवाचे वास्तव्य होते. आजही या इमारतीत महात्माजींच्या वास्तव्याच्या आठवणी अनेक वस्तू करून देतात. चरखा संघ उत्तम रितीने आजही कार्यरत आहे. जीर्ण झालेल्या, अर्धवट उभ्या असलेल्या आजूबाजूच्या अनेक इमारती आपल्या वैभवशाली इतिहासाच्या खाणाखुणा मात्र मूकपणे सांगत असतात. अडगळीत पडलेल्या जुन्या चरख्यांकडे बघितल्यानंतर शेकडो परिवाराला रोजगार देण्याची ऊर्मी, एकतेची कळकळ, अस्पृश्यता निवारणाची चळवळ आणि स्वावलंबत्वाची मशाल कधीकाळी या चरख्यामध्ये पेटत होती, जाणवते.

सावलीतच चरखा संघ का ?
सावली परिसरात पूर्वापार मोठ्या प्रमाणात सूतापासून विणकर खादीचे कपडे, पासोड्या आदी तयार करीत होते. या भागात त्या काळामध्ये उत्तम प्रतीच्या धानाचे उत्पन्न व्हायचे तर वणी पासून पुढे लागणाऱ्या वऱ्हाड प्रांतात मोठ्या प्रमाणात कापूस उत्पादित व्हायचा. त्यामुळे उच्च प्रतीचे तांदूळ वऱ्हाडात आणि व-हाडातला कापूस विणकरांच्या घरात, अशा पद्धतीची व्यापाराची रचना पूर्वापार होती. धानाचे पीक घेतल्यानंतर वर्षभर सूतकताईचे काम या परिसरात सुरू असायचे. तसेच या परिसरातील पद्मशाली समाज देखील लुगडे, धोतर तयार करण्याचे काम करत होते. येथील केवट समाजाने कोशाच्या किड्यांपासून कोशाच्या धाग्याची निर्मिती केली आहे. त्यापासून कोशाचे कापड, कोशाचे फेटे विणले जात होते या समाजाला को शाकारी म्हणत या समाजातील व्यापारी लोकांची भेट त्या काळातील प्रसिद्ध उद्योजक आणि महात्मा गांधींचे स्नेही जमनालाल बजाज यांच्याशी झाली. पुढे त्यांची भेट महात्मा गांधीजींची झाली. त्यावेळेस महात्मा गांधीची ग्रामस्वराज्य कल्पनेने भारलेले होते. सावली परिसरातील पूरक वातावरण बघता याठिकाणी खादी उद्योगाला बळकट करण्याचे जमनालाल बजाज यांच्या मनात आले. त्यांनी नर्मदा प्रसाद अवस्ती यांच्याकडे या भागाची जबाबदारी सोपवली. 1927 मध्ये खादी भांडार याची सावली येथे स्थापना झाली. नर्मदा प्रसाद हे या भंडाराचे चे पहिले व्यवस्थापक होय, आता बाळू पवार हे व्यवस्थापक म्हणून काम करतात. त्यापूर्वी जगजीवन बोरकर यांनी सुद्धा या ठिकाणी काम केले आहे.

सावली भारताच्या नकाशावर
सावली त्या काळात पूर्ण देशांमध्ये अतिशय प्रसिद्ध असेल खादी निर्माण करणारे गाव होते. खादीच्या स्वयंपूर्णतेने सावली या गावांमध्ये एकेकाळी 2700 चरख्यावर हजारोंच्या संख्येने हात सूतकताईचे काम करत होते. एव्हढेच नव्हे तर आसपासच्या जिबगाव, नांदगाव, बेंबाळ, भेंडाळा, व्याहाळ बुज, गडचिरोली या प्रमुख गावांमध्ये चरखा उपसंघ उभारण्यात आले होते. या ठिकाणावरून खादी बनवण्यासाठी सूत पुरवले जात होते... हे सारे ऐकूनच आज नवल वाटते. सावली खादी धोतर, टॉवेल, लुंगी, साड्या, कोसा धोतर, सूती पॅन्ट, कापड शुभ्र व रंगीत शर्टाचे कापड, मच्छरदाणी कापड इत्यादी ब्रांड सावलीने मध्य भारतामध्ये रुजवले होते. मुंबई पर्यंत सावली वरून तयार केलेले खादीचे कपडे विशेष करून वापरल्या जात होते. आजही या ठिकाणी सूतकताईचे काम चालते याठिकाणी हातमागाचे अद्याप अत्यंत सुद्धा आहे. गावातील अनेक महिला सध्या सूतकताईसाठी या ठिकाणी येतात. या ठिकाणच्या कार्यालयाला भेट दिल्यावर अनेक महिला या ठिकाणी काम करत असल्याचे दिसून आले. आजच्या काळातही परवडले इतका रोजगार सूतकताईतून दिल्या जातो. अनेक महिला फावल्या वेळात याठिकाणी न्यूज सूतकताईचे काम करतात. सावली सारख्या भागामध्ये अशा पद्धतीचे कामकाज गेल्या शंभर वर्षांपासून सुरू असल्याचे ऐकून आनंद वाटला.

चरख्याचा शोध आणि ग्रामोद्योग
चरख्याचा शोध 1915 मध्ये महात्मा गांधी भारतात परतले. त्यांनी कोचरब येथे सत्याग्रह आश्रमाची स्थापना केली. या काळात त्यांनी संपूर्ण वर्षभर भारतभ्रमण केले. ग्रामीण भारताला त्यांनी या काळात जवळून बघितले. गांधीजी ईश्वरवादी होते, परंतु त्यांचा मोक्ष हा सेवेमध्ये होता. त्यांचा ईश्वरप्राप्तीचा मार्ग जनतेची सेवा होते. चालत्या बोलत्या रूपात असणाऱ्या सामान्य माणसाला ते ईश्वर मानत भारताचे स्वातंत्र्य म्हणजे त्यातल्या सात लाख खेड्यांचे स्वातंत्र्य ही त्यांची धारणा होती. त्यामुळे खेडी अर्थात गाव आर्थिक दृष्ट्या सक्षम झाल्याशिवाय स्वातंत्र्याच्या नैतिक लढाईला बळ येणार नाही. याबाबत त्यांच्या मनात शंका नव्हती. त्यामुळेच शेती हा मुख्य व्यवसाय असणाऱ्या ग्रामीण जनतेला उद्योग व्यवसायासाठी दुसऱ्या एखाद्या सर्वमान्य पूरक धंद्याची आवश्यकता त्यांच्या मनात आली. या काळातच संपूर्ण भारत इंग्रजांनी तलम कपड्याची बाजारपेठ बनवली होती. दुसरीकडे स्वस्त कपडा नसल्याने लोकांच्या अंगावर पुरेसे कपडे देखील नव्हते. दारिद्र्यात खितपत पडलेल्या जनतेसाठी अशावेळी खादी सारखा पर्याय पुढे आणण्याचा गांधीजी विचार करत होते. त्यांच्या आश्रमात खादी तयार होत होती. मात्र सूत तयार होत नव्हते. अशावेळी त्यांना आठवला चरखा मात्र तोपर्यंत आपल्या गावागावातील चरखा अडगळीत पडला होता. गांधीजींनी चरख्याला जिवंत केले. बडोदा संस्थानमधील विजापूर या गावी 1915 साली गांधीजींनी अडगळीत पडलेला चरखा शोधून काढला. पुढे चरख्याने इतिहास घडवला. अडगळीत पडलेल्या चरखा बाहेर पडून थेट काँग्रेसच्या झेंड्यावर आला. सूतकताईला गांधीजींनी ग्रामीण भागातील आर्थिक स्वातंत्र्याचा दर्जा दिला. घराघरात चरखा फिरायला लागला. खादी घालेल तोच काँग्रेसचा कार्यकर्ता असा दंडक त्यांनी प्रसंगी घातला. महात्मा गांधींचे वलय त्यांच्या शब्दाला असणारा मान यामुळे संपूर्ण ग्रामीण भारतामध्ये मोठ्या प्रमाणात खादीची चळवळ सुरू झाली. देश कापडाच्या दृष्टीने स्वावलंबी झाला. एका महात्म्याने ग्रामीण भागातील जनतेच्या आर्थिक स्वावलंबिता व व संपन्नतेवर लक्ष केंद्रित केले. त्यामुळे देशातील हजारो खेडी कोणत्याही संपर्क व्यवस्थेशिवाय गांधीजींच्या पाठीशी उभी राहिली. सावली सारख्या चंद्रपूर जिल्हयातील छोटयाशा गावाने चरख्याच्या अग्नीकुंडातून देशाच्या स्वातंत्र्य लढयाला, ग्रामोध्दाराला अशी चालना दिली.

                                                                          प्रवीण टाके
                                                                     जिल्हा माहिती अधिकारी
                                                                        चंद्रपूर-9702858777

Thursday, September 27, 2018

आहारात फळांचे महत्व

आहारात फळांचे महत्व

    राष्ट्रीय पोषण महिना विशेष लेख      

दि. 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2018 या कालावधीत देशभर ‘राष्ट्रीय पोषण महिना’ साजरा करण्यात येत आहे. या कालावधीत कुपोषणमुक्तीसाठी मोहीम राबविण्यात येत असून पोषणाचे महत्व लोकांना पटवून देण्यात येत आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून आपल्या आहारात फळांचे महत्व सांगणारा लेख ...




आहारात विविध प्रकारच्या फळांच्या समावेशाला अनन्यसाधारण महत्व आहे. फळांमध्ये 90 ते 95 टक्के शुद्ध पाणी असते. त्याने रक्ताचे शुद्धीकरण होते. शरीराची अंतर्गत स्वच्छता करण्याचे महत्वपूर्ण कार्य फळातील पाणी करू शकते. फळांमध्ये मोठ्या प्रमाणात 'तंतुमय' म्हणजे चोथायुक्त पदार्थ असतात. तंतुमय पदार्थांनी आतड्यांच्या स्नायूंचे आकुंचन - प्रसरण चांगले झाल्याने मलप्रवृत्ती चांगली होऊन मलविसर्जन क्रिया सुलभ, सुकर होते. शौचास साफ होते. त्यायोगे अपचन होत नाही किंवा अपचनाने पोटात दुखणे, बद्धकोष्ठता,मलावरोध, आतड्यांना व्रण निर्माण होणे इत्यादी विकार जडत नाहीत.

आवळा, लिंबू, संत्री, मोसंबी आणि अन्य काही फळात 'क' जीवनसत्व मोठ्या प्रमाणात आढळते. सर्दी कमी करण्यास 'क' जीवनसत्व उपयुक्त ठरते. 'क' जीवनसत्वामुळे'स्कर्व्हो' सारखा रोग होत नाही.

फळात जीवनसत्वे, आम्ले आणि संप्लवनशील तेले (व्होलाटाईल ऑईल्स) असतात. संप्लवनशील तेलामुळे भूक चांगली लागण्यास मदत होते. आंबा, कलिंगड, चेरी आणि अन्य काही फळात 'बीटा कॅरॉटीन' नावाचे द्रव्य असते. आरोग्य तज्ञांच्या मतानुसार या द्रव्यामुळे कर्करोगापासून बचाव होऊ शकतो. फळात 10 ते 15 टक्के मिनरल्स म्हणजेच खजिनद्रव्ये म्हणजेच धातू, अधातू, क्षार असतात. या खजिनद्रव्यात सोडीयम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, गंधक, फॉस्फरस, लोह, तांबे या धातू मूलद्रव्याचा समावेश होतो. कॅल्शियममुळे हाडांना बळकटी येते. दातांचे आरोग्य चांगले राहते. रक्तात योग्य प्रमाणात कॅल्शियम नसल्यास माणसे चिडक्या स्वभावाची बनतात. मॅग्नेशियम मेंदूचे आरोग्य चांगले ठेवण्यास उपयुक्त ठरते. रक्तातील लोहाचे प्रमाण कमी झाल्यास व्यक्तीचा उत्साह मंदावतो. माणसास थकवा जाणवतो. रक्तातील सोडियम अन्नपचनाला मदत करते. पोटॅशियममुळे जखमांच्या वेळी रक्त थिजण्याच्या (क्लॉटिंग) क्रियेला मदत होते. थिजण्याच्या सक्षम क्रियेमुळे रक्तस्त्राव जास्त होत नाही. पोटॅशियम यकृताला उत्तेजीत करते. आयोडीनमुळे कंठस्थ ग्रंथीचे आरोग्य चांगले राहते. त्यायोगे थायरॉईड ग्रंथीच्या संबंधित विकार जडू शकत नाहीत. सर्वसमावेषक संतुलीत आहारामध्ये सर्व प्रकारच्या फळांचा, मोसमी किंवा बिगरमोसमी,त्याचबरोबर बदाम, पिस्ते, काजू, अक्रोड, चारोळी, इ. ड्रायफ्रुटसचा समावेश असणे आगत्याचे आहे.



विविध फळांमध्ये केळी, डाळिंब, अंजीर, करवंदे, जांभूळ, चिकू, सीताफळ, रामफळ, संत्री, मोसंबी, द्राक्षे, फणस, बोरे, अननस इत्यादी अनेक प्रकारची फळे समाविष्ट होतात. ज्या आहारात फळांचा समावेश अधिक त्या आहाराला संरक्षक आहार म्हणून संबोधले जाते.

महागडा आहार म्हणजे 'सत्वयुक्त' आहार किंवा सफरचंदसारख्या महागड्या फळांचे सेवन म्हणजेच अधिक सत्वयुक्त आहार हा आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या मनात खोलवर रुजलेला एक गैरसमज आहे. खरे पाहता सफरचंद, बदाम, आक्रोड हे फळांचे प्रकार सकृतदर्शनी महागडे वाटत असले तरी त्यांच्यातील पोषण मूल्यांचा विचार केला आणि त्यांच्यातील रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्याच्या शक्तीचा विचार केल्यास ती खऱ्या अर्थाने महागडी नाहीत. दुसरा मुद्दा हा की केळी, पेरू, पपई, चिकू, बोरे, संत्री, मोसंबी, सीताफळ,करवंदे, जांभळे ही उच्च दर्जाची पोषणमुल्ये असणारी, अत्यंत स्वस्त अशी फळे आहेत. नित्यनियमाने त्यांचे सेवन करण्यास काय हरकत आहे ?

नारळ :- कफ, वात, पित्त प्रकृतीच्या व्यक्तीसाठी नारळ व नारळपाणी हे वरदानच आहे. नारळातील खोबरे आणि नारळ पाणी या दोहोत प्रथिने आहेत, कार्बोहाड्रेट्स आहेत. तेलाच्या स्वरूपात स्निग्धांश आहे, क्षार आहेत, जीवनसत्वे आहेत, अनेक प्रकारची खनिजद्रव्ये आहेत. आजारपणात डॉक्टर नारळपाणी पिण्याचा सल्ला देतात. नारळ म्हणजे सर्व प्रकारच्या पोषकद्रव्यांनी परिपूर्ण असा समतोल आहार आहे.

सफरचंद :- सफरचंद संधिवातावर उत्तम आहे. सफरचंद सेवनाने डोकेदुखी कमी होते. नैराश्य आले असल्यास तेही कमी होते. सफरचंद शरीराची ताकद व रोगप्रतीकारक शक्ती वाढविण्यास उपयुक्त ठरते. सफरचंदामुळे शौचाच्या तक्रारी कमी होतात व पचनशक्ती सुधारते.

द्राक्षे :- आयुर्वेदात द्राक्ष फळाला उच्च स्थान आहे. पिकलेली द्राक्षे चवीला मधुर असतात. ती तहान भागवू शकतात. द्राक्षांमुळे पित्तदोष कमी होतो. द्राक्षे खाल्यानी थकवा कमी होतो. एक महत्वाचा सल्ला हा की द्राक्षावर कीटकनाशकांचा प्रभाव अधिक असतो. त्यामुळे द्राक्षे ही दोन - तीन वेळा स्वच्छ धुवून खावीत हे अधिक महत्वाचे.

केळी :- केळी सर्व ऋतूत उपलब्ध होतात. केळ्यामध्ये ७० टक्के पाणी, ०.८ टक्के खनिज द्रव्ये, ०.४ टक्के तंतुमय पदार्थ, प्रथिने आणि जीवनसत्त्वे असतात. केळात कॅल्शियम,लोह, फॉस्फरस असतात. कॅल्शियममुळे हाडे व स्नायू मजबूत होण्यास मदत होते. केळातील साखर पचनास सुलभ असल्याने थकलेल्या शरीराला चटकन शक्ती प्राप्त होऊन उत्साह वाढतो. पचनसंस्थेचे आरोग्य टिकविण्यासाठी, मलविसर्जनची क्रिया सुलभ होण्यासाठी केळी फारच मोलाची ठरतात. केळी शक्तिवर्धक असल्यामुळे बालकांना शक्ती वाढविण्यासाठी ती टॉनिकच्या स्वरूपात उपयोगी पडतात. अधिक वाढलेले पित्त केळाने कमी होते. मलावरोध, आतड्याची जळजळ, मूळव्याध, डायरीया, संधिवात इ. अनेक रोगांवर केळ्याचा आहार फायद्याचा ठरतो. केळात लोह असते.

डाळींब :- डाळिंबात ग्लुकोजसारखी चटकन पचणारी साखर असते. डाळिंब दाण्यातील रस रक्तवर्धक असून त्याचा लॅक्टींग एजंट म्हणून म्हणजेच मातेला दूध वाढविण्यासाठी उपयोग होतो. डाळींबाच्या सेवनाने हगवण आमांश, मुळव्याध, जठर विकार बरे होतात. डाळिंब सालीचा रसही औषधी गुणधर्माचा असून त्याचा जंतूनाशक म्हणून आणि त्वचारोगावर चांगला उपयोग होतो. डाळिंब जठराग्नी प्रदिप्त करते. त्यामुळे भूक चांगली लागते. डाळिंब पित्तनाशक असल्यामुळे पित्ताच्या तक्रारीवर उत्तम ठरते. डाळिंबाने वातदोषाचे शमन होते. हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते. डाळिंबाने मलप्रवृत्ती सुधारून शौचास साफ होण्यास मदत होते.

पपई :- पपई हे शरीराची ताकद वाढविणारे फळ आहे. पपई मूळव्याधीवर गुणकारी सिद्ध झाली आहे. मूत्रपिंडाचे विकार कमी करण्यासाठी पपई खाण्याचा सल्ला दिला जातो. पपईच्या रसामुळे आम्लपित्त कमी होते. जठराला आलेली सूज कमी होते. पपईच्या सेवनाने अन्नपचन सुलभ होते. पपईने मांसाहाराच्या पचनास सुलभता प्राप्त होते. पपईच्या बियांचे चूर्ण व मध यांचे मिश्रण जंतुनाशक आणि कृमिनाशक म्हणून उपयोगी पडते.

अन्य फळे:- पेरू कफवर्धक परंतु मलप्रवृत्ती साफ करण्यास उपयुक्त. अंजीर पित्तशामक असून रक्तातील हिमोग्लोबिन वाढविण्यास मदत करते. आंबा वीर्यवर्धक असून शक्ती वाढविण्यास उपयुक्त आहे. लिंबे, संत्री, मोसंबी या फळात 'क' जीवनसत्व मोठ्या प्रमाणात आढळते. 'क' जीवनसत्व अन्नपचन कार्यास प्रभावी ठरते. व्यायाम केल्यानंतर घाम येतो व शरीराचे निर्जलीकरण होते. या फळांनी म्हणजेच त्यांच्या रसांनी शरीरातील कमी झालेल्या जलाशयाची भरपाई होऊन शरीरातील 'जलसंतुलन' कायम राखले जाते. बदाम प्रथिनयुक्त असून बुद्धिवर्धक आहे. बदामामुळे अतिरिक्त कोलेस्टेरॉल कमी होऊ शकते.

जांभूळ कफ व पित्तनाशक आहे. हे फळ विशेष करून मधुमेही व्यक्तिंना अधिक पथ्यकारक आहे. कलिंगड उन्हाळ्यातील मोसमी फळ आहे. कलिंगड, टरबूज, खरबूज,काकडी ही उन्हाळ्यात उत्पादीत होणारी फळे आहेत. निसर्ग कल्पक आहे. उन्हाळ्यात उन्हामुळे आणि अधिक उष्णतेमुळे प्राणीमात्राच्या शरीरातील घामाच्या स्वरूपात मोठा जलक्षय होतो. या फळात पाण्याचे प्रमाण मोठे असल्याने शरीरातील पाण्याचे संतुलन राखण्याचे काम ही फळे करतात. या फळातील पाणी शुद्ध असून रक्त शुद्धीकरणाचे काम ती चांगल्या प्रकारे करतात. या फळातील साखर लवकर सहजरित्या पचणारी असल्यामुळे त्यांचा चांगला उपयोग होतो. कफ प्रकृतीच्या आणि ज्यांना वारंवार सर्दी, पडसे, खोकला होतो, त्यांनी शक्यतो ही फळी खाऊ नयेत.

फळे हि मानवी जीवनाला लाभलेले 'वरदान' आहे. 'फलाहार' हा उत्तम आहार आहे. निसर्ग फळांच्या माध्यमातून मानवी आरोग्याचे रक्षण करतो. फलाहाराकडे सकारात्मक दृष्टीने पाहून आपल्या आहारात योग्य ते बदल घडविण्याची जिद्द आपण सर्वानी का बरे बाळगू नये?

- प्रा. वसंतराव बंडोबा काळे
सेवानिवृत्त उपप्राचार्य
जयसिंगपूर, जि. कोल्हापूर

Friday, September 21, 2018

दैनंंदिन आध्यात्मिक साधनेमुळे झोपेशी संबंधित व्याधींवर मात शक्य !

दैनंंदिन आध्यात्मिक साधनेमुळे झोपेशी संबंधित व्याधींवर मात शक्य !

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने पोलंडमधील वैज्ञानिक परिषदेत ‘स्वप्ने आणि झोपेतील अर्धांगवायू (स्लीप पॅरालिसिस) या संदर्भातील आध्यात्मिक दृष्टीकोन’ हा शोधप्रबंध सादर !

बहुतांश झोपेशी संबंधित व्याधींचे मूलभूत कारण आध्यात्मिक असते. ज्या समस्यांचे मूलभूत कारण आध्यात्मिक असते,त्यांचे संपूर्ण आणि कायमस्वरूपी निवारण केवळ आध्यात्मिक उपायांनीच होऊ शकते. नामजपासारखी दैनंदिन आध्यात्मिक साधना जीवनातील समस्यांच्या मूलभूत आध्यात्मिक कारणांवर प्रतिबंधात्मक कार्य करते, तसेच समस्यांचे निवारणही करते.दैनंंदिन आध्यात्मिक साधनेमुळे झोपेशी संबंधित व्याधींवर मात शक्य होते. त्याचबरोबर साधना करणार्‍या व्यक्तीची आध्यात्मिक उन्नतीही होते, अशी महत्त्वपूर्ण माहिती महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या सौ. ड्रगाना किस्लौस्की यांनी सादर केलेल्या ‘स्वप्ने आणि झोपेतील अर्धांगवायू (स्लीप पॅरालिसिस) या संदर्भातील आध्यात्मिक दृष्टीकोन’, या शोधनिबंधात मांडली. या शोधनिबंधाचे लेखक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले, तर सौ. किस्लौस्की सहलेखिका आहेत. २० आणि २१ सप्टेंबर २०१८ या कालावधीत फोकस प्रिमियम हॉटेल, ग्डान्स्क, पोलंड येथे ग्डान्स्क विद्यापिठाने आयोजित केलेल्या द्वितीय आंतरराष्ट्रीय इंटरडिसिप्लिनरी कॉन्फरन्समध्ये हा शोधनिबंध मांडण्यात आला.

सौ. किस्लौस्की पुढे म्हणाल्या की, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाची स्थापना परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी त्यांच्या ३७ वर्षांच्या आध्यात्मिक संशोधनाच्या अनुभवाच्या पार्श्‍वभूमीवर केली आहे. या विश्‍वविद्यालयाच्या वतीने सूक्ष्म जगत आणि त्याचा मानवावर होणारा परिणाम यांबाबतही संशोधन केले जाते. अतिंद्रिय घटनांसंदर्भातील वस्तू आणि ध्वनिचित्रीकरण यांचा जगातील सर्वात मोठा साठा विश्‍वविद्यालयाकडे आहे.

त्यानंतर सौ. किस्लौस्की यांनी ‘अतिंद्रिय कारणांमुळे पडणारी स्वप्ने आणि स्वप्नावस्था किंवा जागेपणी भासमान होणारी दृश्ये (Phantasms)’ या संदर्भातील त्यांचे संशोधन मांडले. हे संशोधन प्रभावळ आणि ऊर्जा मापक यंत्रे, तसेच स्पंदनशास्त्राचा अभ्यास यांच्या साहाय्याने केले आहे. जीवनातील सर्व समस्यांची मूलभूत तीनच कारणे म्हणजेच शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक असतात, हे या संशोधनातील प्रमुख सूत्र आहे. प्रारब्ध हे आध्यात्मिक कारणांपैकी प्रथम कारण आहे. आपल्या जीवनातील आपल्या नियंत्रणाबाहेरच्या घटना म्हणजे प्रारब्ध. दुसरे आध्यात्मिक कारण म्हणजे सूक्ष्म जगतातील अनिष्ट शक्ती,तर अतृप्त मृत पूर्वजांचे लिंगदेह, हे तिसरे आध्यात्मिक कारण आहे. रात्री वाटणार्‍या अनामिक भीतीमागील (Night terrors)प्रमुख मूलभूत कारण मानसिक असते; मात्र भीतीदायक स्वप्ने, झोपेतील अर्धांगवायू (स्लीप पॅरालिसिस) आणि झोपेत चालणे,यांमागील मूलभूत कारण आध्यात्मिक असते. सूक्ष्म जगतातील अनिष्ट शक्ती आणि अतृप्त मृत पूर्वजांचे लिंगदेह ही या व्याधींची मूलभूत कारणे असतात.

एका आध्यात्मिक संशोधन केंद्रामध्ये ४४ जणांच्या केलेल्या सर्वेक्षणातील काही वैशिष्ट्यपूर्ण सूत्रेही त्यांनी मांडली. या सर्वेक्षणातील ८५ टक्के जणांनी सांगितले की, त्यांनी आध्यात्मिक साधना चालू केल्यानंतर त्यांच्या स्लीप पॅरालिसिसची वारंवारता आणि तीव्रता वाढली. सर्वेक्षणातील ६५ टक्के जणांनी सांगितले की, त्यांना हा त्रास साधना सुरू केल्यानंतर चालू झाला; मात्र ते जसजशी साधना करत गेले, तशी या त्रासाची वारंवारता आणि तीव्रता कमी होत गेली. जेव्हा एखादी व्यक्ती आध्यात्मिक उन्नती घडवून आणणारी योग्य साधना चालू करते, तेव्हा सूक्ष्म जगतातील अनिष्ट शक्ती त्या व्यक्तीला साधनेपासून परावृत्त करण्यासाठी झोपेशी संबंधित व्याधींसारख्या अडचणी निर्माण करतात. साधारणतः ५० टक्के स्वप्ने पडण्यामागे सूक्ष्म जगतातील अनिष्ट शक्तींचा हात असतो. भीतीदायक स्वप्नांच्या बाबतीत हा प्रभाव अजून अधिक असतो. उर्वरित ५० टक्के स्वप्नांवर आपल्या अंतर्मनाचा प्रभाव असतो.

शोधप्रबंधाच्या समारोपात सौ. किस्लौस्की यांनी झोपेशी संबंधित व्याधींवर केलेल्या त्यांच्या विस्तृत संशोधनावर आधारित काही उपाय सांगितले. सर्वेक्षणातील ८० टक्के व्यक्तींनी सांगितले की, स्लीप पॅरालिसिसची तीव्रता कितीही जास्त असली, तरी त्यातून बाहेर पडण्यात त्यांच्या दैनंदिन साधनेच्या प्रयत्नांची सर्वाधिक मदत झाली. नामजपामुळे स्लीप पॅरालिसिसमधून पटकन बाहेर येता आले, असे सर्वांनीच सांगितले. यासाठी दर दिवशी किमान २ घंटे नामजप करणे आवश्यक असते. समस्येची तीव्रता अधिक असल्यास नामजप अधिक कालावधी करायला हवा. प्रत्यक्ष स्लीप पॅरालिसिस झाले असतांना देवाला प्रार्थना करणे आणि नामजप यांमुळे त्यातून लवकर बाहेर पडता येते. स्लीप पॅरालिसिस होणार असल्याची चाहूल लागताच नामजप चालू करणे किंवा असल्यास नामजप वाढवणे याचा लाभ होतो.

आपला नम्र,
श्री. रूपेश रेडकर,
संशोधन विभाग, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, (संपर्क : 9561574972)

Tuesday, May 29, 2018

आपणच तपासा आपले वीज बील!

आपणच तपासा आपले वीज बील!

vij bill साठी इमेज परिणाम       प्रासंगिक          

वीजदेयकाचे करा स्वत:च ऑडीट

‘खर्च झाल्याचे दु:ख नाही, हिशेब लागला नाही की मग त्रास होतो’ हे श्री. व.पु.काळे यांचे ‘वपुर्झा’ पुस्तकामधील वाक्य आपल्याला व्यवहारीक जीवनात तंतोतंत लागू होते असे म्हटल्यास अतिशोक्ती होणार नाही.
अन्न, वस्त्र आणि निवारा या मानवाच्या प्राथमिक गरजा समजल्या जायच्या पण २१ व्या शतकात वीज ही प्रत्येकाची अत्यावश्यकच नव्हे तर मुलभूत गरज बनली आहे .पूर्वीच्या तुलनेत आज आपल्या अनेक गरजा व दैनंदिन कामे विजेच्या उपकरणावरच अवलंबून आहेत ही वस्तुस्थिती आहे. घर, कार्यालये,उद्योग,व्यवसाय, शेती, दुकाने वा कुठलेच ठिकाण याला अपवाद नाहीत. आजचे युग हे तांत्रिक युग आहे. त्यामुळे विजेवर चालणारी नवनवीन उपकरणे बाजारात येत आहे. त्यामुळे प्रत्येक घरी विद्युत उपकरणांची यादी वाढतच आहे व वाढतच जाणार आहे व त्यात रोज नवनवीन विद्युत उपकरणाची भर पडत आहे. मात्र हे उपकरणे वाढली व त्याचा वापर वाढला की,विजेचे बीलही वाढत जाणार हे वेगळे सागण्याची गरज नाही. यासोबतच दरवर्षी उन्हाळ्यात आपल्याकडे उन्हापासून बचाव करण्याकरिता घरी, दुकान, कार्यालये व जवळपास प्रत्येक ठिकाणी सातत्याने फॅन व कुलरचा व अनेक ठिकाणी एअर कंडीशनरचा वापर करण्यात येतो. तापमानापासून बचाव करण्यासाठी याचा वापर होत असल्यामुळे विजेचा वापर वाढणे सुद्धा साहजिकच आहे मात्र आपल्या हातात जून व जुलै महिन्याचे वीज देयक हाती आले की, अनेकांच्या भुवया उंचावतात. माझा वापर एवढा नसताना बील भरमसाठ आल्याचे त्यांना वाटत असते. एखाद्या प्रकरणात कर्मचार्याच्या दोषामुळे चुकीच्या मीटर वाचनामुळे किवा मीटर मधील तांत्रिक दोषामुळे हे होऊ शकते. मात्र हे सर्वच बाबतीत शक्य नाही. त्यासाठी आपण आपल्या घरामध्ये, दुकान व इतर ठिकाणी असलेली विजेची उपकरणे त्याचा वॅट व त्याचा दैनदिन वापर याची जर माहिती करून घेतली व अभ्यास केला तर आपल्यालाही सत्यता पडताळता येईल. त्यासाठी वीज देयक जाणून घेण्यासाठी अनेक संकेतस्थळे व अॅप आहेत त्यावर जाऊन आपण आपल्या घरात असणारी उपकरणे, त्याचा असलेला वँट व संख्या,आणि उपकरणाचा दिवसातील वापराचे तास ही माहिती टाकल्यास आपले महिन्याला होणारा एकूण युनिट वापर व वीज बिलाची अंदाजीत रक्कम याची माहिती आपण प्राप्त करू शकता.
त्याचबरोबर आपल्या वीज बिलाच्या मागे असलेल्या वर्गवारीनिहाय वीज देयकाचे प्रती युनिट दर दिलेले असतात त्यामध्ये ० ते १००, १०० ते ३०० व ३०० ते ५०० व ५०० ते १००० युनिट संदर्भातील दर छापलेले असतात.त्यामुळे एखाद्या महिन्यात जास्त वीज युनिट वापरल्यास त्याचे दरही त्या तुलनेत वाढत असतात. घरात विजेचा वापर करताना आयएसआय प्रमाणित तारांचा तसेच उर्जा बचतीचे प्रमाणपत्र लाभलेल्या व स्टार लेबल असलेल्या उपकरणांचा वापर करावा, जेवढे जास्त स्टार तेवढी जास्त उर्जा बचत होते. आपल्याला उपकरणांचे वॅट, त्याचा दैनदिन वापर याची माहिती झाल्यास वीज बिलाचे नियोजन करण्यासाठी विजेच्या वापरावर लक्ष ठेवून वीज बिल कमी करता येईल,व आलेले वीज बिल एवढे का? याचा उलगडा नक्की होईल.
१००० वॅटचे उपकरणाचा जर १ तास वापर केला तर १ युनिट साधारणतः वीज खर्च होते, त्यामुळे एकूण विजेचे वॅट व १ युनिट विजेसाठी लागणारा वेळ यासंदर्भातील तक्ता सोबत दिला आहे. त्यामुळे या सर्व बाबींची माहिती घेतल्यास व स्वत:च याचे ऑडिट केल्यास वीजबचत करणे सोपे होईल व वापरलेल्या वीजेचे बिल भरताना त्रास होणार नाही एवढे नक्की.
        


                                                                                                                      योगेश विटणकर,
                                                                                                           उपमुख्य जनसंपर्क अधिकारी,
                                                                                                  प्रादेशिक कार्यालय, महावितरण, नागपूर
    

Saturday, March 03, 2018

डावे गेले, भगवे आले

डावे गेले, भगवे आले

ईशान्य भारतामधील मेघालय, त्रिपुरा आणि नागालँड या तीन राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल शनिवारी(3 मार्च) जाहीर झाले. सुरुवातीचे कल पाहता त्रिपुरामध्ये भाजपाने ऐतिहासिक यश मिळवले आहे. याठिकाणी तब्बल 25 वर्षांची डाव्यांची सत्ता उलथवून भाजपचे सरकार येणार, हे आता जवळपास निश्चित झाले आहे. मेघालयात भाजपाला तितकेसे यश मिळालेले नाही. याठिकाणी काँग्रेस आपली सत्ता कायम राखणार असल्याचे चित्र आहे.
या दोन राज्यांबरोबर नागालँडमध्ये सत्ताधारी नागा पिपल्स फ्रंटने (एनपीएफ) भाजपासोबतची 15 वर्षांची युती तोडल्यामुळे तिथे काय होणार, याची उत्सुकता सगळ्यांनाच होती. एनपीएफमधून फुटून निघालेले माजी मुख्यमंत्री व विद्यमान खासदार नेपीयू रीयो यांच्या नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीशी (एनडीपीपी) भाजपाने युती केली होती. दुपारी 12 वाजेपर्यंतचे निकाल पाहता, नागालँडमध्येही भाजपने नव्या मित्रासोबत (एनडीपीपी) चांगले यश मिळवल्याचे चित्र आहे.
नागालँड विधानसभेची सदस्य संख्या ६० असून ५९ जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत. मावळत्या विधानसभेत एनपीएफचे ३८ , काँग्रेस-८, राष्ट्रवादी काँग्रेस-४, भाजप-१, जेडीयू-१ अपक्ष-८ असे पक्षीय बलाबल होते. मात्र, सध्याच्या परिस्थितीनुसार भाजपा-एनडीपीपी 32, एनपीएफ 26 आणि अपक्ष 4 जागांवर आघाडीवर आहेत. त्यामुळे तुर्तास तरी भाजप आपल्या नव्या मित्राच्या सहाय्याने नागालँडमध्ये पुन्हा सत्तेत येईल, असे चित्र दिसत आहे. नागा पिपल्स फ्रंट पक्ष या ठिकाणी 2003 पासून सत्तेत होता. परंतु, यंदाच्या निवडणुकीचे निकाल पाहता भाजपाने राज्यात स्वत:ची पाळेमुळे रोवण्यात यश मिळवल्याचे स्पष्ट झाले आहे.
गेली २५ वर्षं डाव्यांचा गड असलेल्या त्रिपुरात भाजपनं मुसंडी मारलीय. गेल्या निवडणुकीत एकही जागा जिंकू न शकलेल्या भाजपनं तिथे स्पष्ट बहुमत मिळवून माणिक सरकार यांचं सरकार खालसा केलंय, तर नागालँडमध्ये नव्या मित्राला सोबत घेऊन जुन्या मित्राला - नागा पीपल्स फ्रंटला धूळ चारली. त्यामुळे 'सेव्हन सिस्टर्स'पैकी पाच राज्यांत आता भाजपचा झेंडा फडकतोय. मेघालयमध्येही काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळालं नसल्यानं त्यांनी सत्तास्थापनेच्या हालचाली सुरू केल्यात, पण आत्तातरी ईशान्येतील पाच राज्यं धरून देशातील एकूण २० राज्यांमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सत्तेत आहे. काँग्रेसप्रणित यूपीएकडे फक्त पाच राज्य उरली आहेत. याचाच अर्थ, देशातील ६७.८५ टक्के जनतेवर एनडीएचं राज्य आहे. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, आंध्र प्रदेश, झारखंड, आसाम, हरियाणा, छत्तीसगड, जम्मू, काश्मीर, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, गोवा, मणिपूर, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, नागालँड आणि त्रिपुरा येथे भाजपची सत्ता आहे
कर्नाटक, पंजाब, मेघालय, मिझोरम, पाँडेचरी या पाच राज्यात काँगेसची सत्ता आहे. काँग्रेसची सत्ता ज्या राज्यांमध्ये आहे, तिथे देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी ७.७८ टक्के जनता राहते. एनडीएची सत्ता असलेल्या २० राज्यांमधील लोकसंख्येचा विचार केल्यास, ६७.८५ टक्के जनतेचे ते राजे आहेत. तर उर्वरित २४ टक्के जनतेवर तृणमूल, अण्णा द्रमुक, बीजू जनता दल, टीआरएस, डावे आणि आम आदमी पार्टी यांचं राज्य आहे.

Saturday, February 10, 2018

पकोडा आंदोलन

पकोडा आंदोलन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील तरुणांना रोजगारासंदर्भात भजी (पकोडा) तळण्याचा सल्ला दिल्यावरुन केलेल्या वक्तव्यावर देशभरातून टीका करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर मुंबईत गिरगाव चौपाटीवर काँग्रेसच्यावतीने काढण्यात आलेल्या पकोडा निषेध आंदोलन करण्यात आले. पोलीस भरतीत होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी चंद्रपुरातील बेरोजगार तरुणतरुणींनी चक्क रस्त्यावर पकोडे तळून व फुकट वाटून सरकारला हाक दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणात पकोड्याचा (भजी) ठेला सुरू करून बेरोजगारांनी रोजगार मिळवावा, असा सल्ला दिला होता. या विधानावरुन विरोधकांनी मोदींची खिल्ली उडवली होती. दरम्यान, अमित शहा यांनी राज्यसभेत विरोधकांचा समाचार घेतला होता. मोदींनी भजी विकून पैसे कमावण्याचा सल्ला दिला यावरुन काही लोकं टीका करतायंत. पण भजी विकणे ही लाजिरवाणी गोष्ट नाही. चहा विकणारा मुलगा देशाचा पंतप्रधान होऊ शकतो तर भजी विकणाराही मोठी व्यक्ती होऊ शकते. भविष्यात भजी विकणाऱ्याची तिसरी पिढी या देशातील सर्वात मोठे उद्योजकही असू शकतात, असे त्यांनी सांगितले होते. भजी तळण्यात गैर काही नाही. पण मेहनतीने पैसे कमावणाऱ्यांची तुलना भिकाऱ्यांशी करणे गैर आहे, असे सांगत त्यांनी काँग्रेस खासदार पी. चिदंबरम यांना चिमटा काढला होता.
दरम्यान, रोजगार देण्यात अपयशी ठरलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचा निषेध करण्यासाठी औरंगाबादचे तरुण गेल्या आठवड्यात रस्त्यावर उतरले होते. रस्त्यावर चक्क भजी तळून या तरुणांनी मोदींचा निषेध केला होता. त्यांच्या हातातील ‘नो जॉब नो जॉब, पकोडा शॉप पकोडा शॉप’ हा फलक सर्वांचेच लक्ष वेधून घेत होता.
वर्षाला दोन कोटी रोजगार देण्याचं स्वप्न मोदी यांनी तरुणांना दाखवलं होतं. मात्र प्रत्यक्षात जेव्हा नोकरी देण्याची वेळ आली तेव्हा मोदी पकोडा स्टॉल लावण्याचा सल्ला देतात. पकोडा स्टॉल लावणे हे काम करणं चूकीचे नाही. मात्र विद्यार्थ्यांनी मोठ्या परिश्रमाने अभ्यास करून वडिलांचा आर्थिक ताण सहन करत डिग्री मिळवली. त्यांची खिल्ली उडवण्याचे काम अशा वक्तव्यातून केलं जात असल्याची भावना या तरुणांनी व्यक्त केली. मोदींनी माफी मागावी किंवा आयटी कंपनीत रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यावी. तसेच सरकारी कार्यालयाच्या आवारात तरुणांना पकोडा सटॉल लावण्याची परवानगी देणारा आदेश काढावा अशी मागणीही या बेरोजगार तरुणांनी केली होती.
इकडे चंद्रपुरात सध्या पोलीस भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. येथे केवळ ५१ जागांसाठी भरती होत आहे. त्याकरिता राज्यभरातून तब्बल १७ हजारांहून अधिक उमेदवार या प्रक्रियेत समाविष्ट आहेत. यात स्थानिक युवकांवर अन्याय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भरतीच्या जागा वाढविण्यात याव्या, या मागणीसाठी शिवसेनेचे सुरेश पचारे यांच्या नेतृत्वात पोलीस भरतीसाठी आलेल्या युवक-युवतींनी चंद्रपुरात पकोडा आंदोलन केले. त्यांनी तुकूम परिसरात ताडोबा मार्गावर पकोडे तळून नागरिकांना वाटत प्रशासनाचे लक्ष वेधले. या आंदोलनात सुमारे १०० ते १५० युवक युवती सहभागी झाले होते. त्यांच्या या अनोख्या आंदोलनाची चर्चा चंद्रपुरात दिवसभर होती. तसेही सध्या देशात पकोडा हा शब्दश: व खाद्यश: अशा दोन्ही अर्थांनी बहुचर्चित बनला आहे.



Saturday, December 09, 2017

प्रगत तंत्रज्ञान, एक वरदान

प्रगत तंत्रज्ञान, एक वरदान

 


 
 
 
आज शैक्षणिक तंत्रज्ञान म्हणजे अध्ययन अध्यापन प्रभावी करण्यासाठी माहिती व संप्रेषण तंत्रज्ञानाचा वापर विविधतेने करण्यात येत असलेला आढळू6 येतो. आजच्या काळात मुले सहज तंत्रज्ञानाचा वापर करत असलेले आढळून येत आहेत. तंत्रज्ञानात जसजशी प्रगती होत आहे, तसतसे त्याच्या अध्यापन वापराबाबत विचारमंथन घडून येत आहे. आज नवनवीन संकल्पना शिक्षण क्षेत्रात वापरल्या जात आहेत.
    महाराष्ट्रात शिक्षकांनी स्वतः तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे ठरविले. यातच संतोष भोबळे या ध्येयवेड्या शिक्षकाने शेगाव येथे उन्हाळा सुट्टीत पहिले तंत्रस्नेही संमेलन घेतले व महाराष्ट्रात खरी तंत्रस्नेही चळवळ सुरु झाली. महाराष्ट्र राज्याचे प्रधान सचिव मा. नंदकुमार साहेब यांच्या मार्गदर्शनाने व प्रेरणेने अनेक शिक्षक झपाट्याने काम करू लागले. यात कोणी ऑफलाईन अप्स, ऑनलाइन व ऑफलाईन टेस्ट, बारकोड पद्धतीचा अवलंब, व्हिडिओ निर्मिती, ब्लॉग, वेबसाईट, सॉफ्टवेअर इ. साहित्य शिक्षक कसल्याही प्रशिक्षणाशिवाय केवळ मुले शिकवीत या हेतूने तयार करू लागली व आजही ते चालू आहे. 
    मुळात हे तंत्रज्ञान वापरण्याची का गरज भासली. याबद्दल माझा अनुभव सांगतो, मी जि. प.प्रा.शाळा लमाण तांडा बेळंब ता.उमरगा जि. उस्मानाबाद येथे कार्यरत आहे. सुरवातीला जेंव्हा शाळेत रुजू झालो तेंव्हा शाळेत उपस्थिती व गुणवत्ता या मोठ्या समस्या होत्या. कारण मुलांना शाळेत येण्यापेक्षा खेळण्यात व टी. व्ही. पाहण्यात खूप मजा वाटायची. याला कारण होते ते आपली पारंपरिक शिक्षण पद्धती. जेंव्हा मी लोकांना शिक्षणाचे मी महत्व पटवून दिलें व शाळा लोकवाट्यातून शाळा ई-लर्निंग व डिजिटल केली तेंव्हा शाळेचे रुपडच बदलेले.
       आज मुलांना शाळेतच मोबाईल, संगणक, टॅब, प्रोजेक्टर, व्ही.आर बॉक्स,एल. ई. डी. डी.व्ही.डी.इ. साहित्य पहावयास व हाताळवयास मिळत आहे. यामुळे शाळेत 100% उपस्थिती राहत आहे.  तसेच शाळा 100% प्रगत आहे. यासाठी मोलाची साथ लाभली ती उस्मानाबाद जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष शिक्षणाधिकारी सचिनजी जगताप साहेब यांचे.
    आज मोबाईल हि माणसाची गरज बनली आहे. तेंव्हा त्याचा वापर शिक्षण क्षेत्रात न होईल तर नवलच. आज 4G तंत्रज्ञानामुळे मोबाईलचा वापर अध्ययनात सहजतेने कल्पकतेने करता येतो. 'M' लर्निंग हा शिक्षणाचा आमूलाग्र भाग बनू पाहतोय. इंटरनेटच्या सहज उपलब्धतेमुळे YOUTUBE वरून स्वयं अध्ययन व दूर शिक्षणात याचा सहज वापर होत आहे.
            ई-शिक्षणच्या माध्यमातून शिक्षण घेणे सोपे होते. विध्यार्थ्यांना खेळकर पद्धतीने शिकविले जाऊ शकते. संगणक शिक्षणाच्या माध्यमातूनही आपण विध्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देऊ शकतो. स्मार्ट बोर्ड हा प्रोजेक्टरच्या पुढचा टप्पा आहे. अध्ययन प्रक्रिया अधिकाधिक आनंददायी व कृतीयुक्त बनली आहे. वर्गाध्ययनाचा चेहराच पूर्णतः बदललेला आहे. टॅॅब स्कूल, डिजीटल स्कूलच्या माध्यमातून शाळांचा दर्जा उंचावत आहे.  
        आता या स्पर्धात्मक जगात आम्ही शिक्षण आणि तंञज्ञान यात फरक करु शकत नाही. आजकाल तंञज्ञान शिक्षण ही व्यापक संकल्पना बनत आहे. शिक्षणाचा दर्जा वाढत आहे. यात नवनवीन ट्रेड येत आहेत. या आणि अशा नवनवीन संकल्पना शिक्षण क्षेञात वापरण्यावर भर दिला जात आहे .ज्यामुळे शिक्षणाची गुणवत्ता वाढण्यास हातभार लागत आहे. तंञज्ञानाच्या साह्याने शिक्षक शिक्षण प्रक्रिया प्रभावी व उत्साही करत आहेत , त्यामुळे महाराष्ट्र  100% प्रगत झाल्याशिवाय राहणार नाही .त्यामुळेच प्रगत तंञज्ञान शाळांसाठी एक वरदान ठरत आहे.  
 
 श्री.खोसे उमेश रघुनाथ 
            प्राथमिक शिक्षक 
      जि.प.प्रा.शा.ल.तां.बेळंब
     ता.उमरगा जि.उस्मानाबाद
     Mo.No.9764412501
 
 

Friday, December 08, 2017

"मानवी हक्कांच्या संरक्षणाची गरज"

"मानवी हक्कांच्या संरक्षणाची गरज"

10 डिसेंबर जागतिक मानवी हक्क दिना निमित्त माझा लेख....!
------------------------------------------------


        आज १० डिसेंबर,म्हणजेच जागतिक मानवी हक्क दिवस,देशभरात आजचा दिवस म्हणजे भारतीय संविधानाने दिलेल्या मानवी हक्कांची उलगडा करून,मानवाधिकारांच्या सर्व प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी या दिवसांमध्ये राजकीय परिषदा, बैठका, प्रदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रम, वादविवाद आणि अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. बर्याचशा सरकारी नागरी आणि बिगर सरकारी संस्था मानवी हक्क कार्यक्रमांत सक्रियपणे सहभागी होतात.
देशातील नागरीकांना हक्काची जनिव करून देणारा दिवस,आज देशात मानवी हक्कांचा पाडा वाचल्या जात तर कुठे अमलबजावणी च्या नावाने डंका ठोकवल्या जाते.
      मानवी हक्क मग नागरी हक्क असोत की राजकीय हक्क,  अथवा कायद्यासमोर समानतेचा हक्क, सन्मानपूर्वक जीवन जगण्याचा हक्क, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, शिक्षण, स्व-विकास हे सारे हक्क एकमेकांना पूरक आहेत. यातील एका हक्काची गुणवत्ता वाढते तेव्हा पर्यायाने इतर हक्कांचीही गुणवत्ता आणि दर्जा वृद्धिंगत होतो. तद्वतच एखाद्या हक्काची पायम्मली होत असेल तर स्वाभाविकपणे विपरीत परिणाम दुसऱ्या हक्कांवर होतो. त्यामुळेच मानवी हक्काविषयी विविध संस्था, संघटना जागरूक बनल्या आहेत. समाजातील वेगवेगळ्या उपेक्षित गटांना आणि घटकांना त्यांचे कायदेशीर हक्क मिळण्यासाठी अनेक संस्था कार्यरत आहेत. संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवी हक्क उच्चायुक्त कार्यालय व मानवी हक्क समिती ह्या दोन संस्था जागतिक स्तरावर मानवी हक्कांच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्न करतात. 
   नागरिकत्वाला मिळालेला संवैधानिक हक्क म्हणजे त्या व्यक्तीचा,त्या समाजाचा अस्तित्व आहे,म्हणून सर्वसाधारण मानवी हक्काची जाणीव तमाम नागरिकांना असणे आवश्यक आहे,देशात नागरिकांना मिळालेल्या समानतेचा हक्क,अभिव्यक्ती स्वातंत्रांचा हक्क,शोषणापासून संरक्षणाचा हक्क,धार्मिक निवडीचे स्वतंत्र,सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क,भाषा स्वतंत्र,जीवणाधिकार,गुलामीपासून मुक्ती अश्या समानतेच्या अनेक हक्क या सामान्य नागरिकांना मिळालेली एक सविधानाची देणगी होय,अनेक वर्षे वरील हक्कापासून हा मानव वंचित होता,जणू मानवी जीवन त्या चार वर्णव्यवस्थेशी जुळुनच आमचं जीवन आहे असं समजणाऱ्या या मानवांच्या प्रतिकारासाठी या देश्यात अनेक महापुरुषांनी समतेच्या, स्वातंत्रेच्या हक्कासाठी मानवी जीवनाला या गुलामीच्या वेतने पासून मोकळा स्वास देण्यास रक्त सांडले,तेव्हा कुठे हा स्वतंत्र आम्हला मिळाले,शिक्षणाचा स्वतंत्र, अभिव्यक्ती स्वातंत्र्य अश्या अनेक हक्काने या मानवी जीवनाला उज्जवल करणारे महापुरुष म्हणजे,फुले,शाहू,आंबेडकरच.
  अस्पृश्यता, गुलामी,लिंग भेद,वर्णभेद,जातीभेद, धर्मभेद अश्या अवस्थेवर अवलंबून असलेल्या या देशाला एक समान नागरिकत्वाचा अधिकार मिळाला खरे,पण या अधिकारावर,मानवी हक्कावर गधा आखल्या जात असल्याचे अनेक उद्धहरण देता येतात,दहशतवाद, युद्ध, विविध प्रकारचे भयंकर गुन्हे, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणते,अशा अनेक मार्गांनी जगभरातील नागरिकांमध्ये असंतोष पसरला असून आजही मानवी हक्कांची पायमल्ली सुरूच असल्याचे विदारक चित्र आज दिसत आहेत,ऍम्नेस्टी इंटरनॅशनलद्वारे १६० देशांमध्ये गेल्या वर्षभरातील विविध घटनांमध्ये मानवी हक्कांची पायमल्ली झाल्याची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली. त्यानुसार २०१४ मध्ये जगात सुमारे १८ लहान-मोठी युद्धे झाली. ३५ हून अधिक देशांमध्ये विविध घटनांमध्ये लष्करी कारवाई करण्यात आली. युरोपात पोचण्याचा प्रयत्न करणारे तब्बल ३४०० निर्वासित भूमध्य समुद्रात बुडाल्याचे मानले जात आहे. तर सीरियामधील चार दशलक्ष निर्वासितांपैकी ९५ टक्के नागरिक शेजारील देशांमध्ये पळून गेले. १६० देशांपैकी ११९ देशांच्या सरकारने अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणली, अनेक ठिकाणी वर्तमानपत्रे बंद पाडण्यात आली तर अनेक पत्रकारांना धमकावण्याच्या घटना घडल्या,महाराष्ट्रात देखील अनेक वृत्तपत्र बंद पाडून,लोकशाहीच्या चौथ्या आधार स्थंभाला घात पोहचला आहे, असे नागरिकत्व हिरकावून घेण्याचे कटकारस्थानही या महाराष्ट्रात घडत आहेत,स्त्री स्वातंत्र्यावर देखील या देश्यात सर्वात मोठा गधा आखल्या जात आहेत.
        देशात राजकीय व सामजिक क्षेत्रात आपलं वर्चस्व साधणाऱ्या,सविधानाच्या,व्यक्ती स्वतातंत्र्याच्या ,अभिव्यक्तीच्या बळावर आवाज उठवणाऱ्यांचेही आवाज दाबण्याचे कटकारस्थान या देश्यात आपल्याला पाहायला मिळत आहेत,अनेकांच्या मुसक्या आवळलेलीही उधाहारण देता येतील,समाजामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सहाय्याने,अंधश्रद्धा मुक्त भारत च्या स्वप्नांत असलेले डॉ.नरेंद्र दाभोळकर,कॉ.गोविंद पानसरे,डॉ.एम.एम.कलबुर्गी सारख्या विचारवंतांचेही हत्या करून मानवी हक्काचे मुसक्या अवळलेली ही घटना या मानवी हृदयाला यातना पोहचंवणाऱ्या आहेत,ह्याच नसून देश्यात कित्येक व्यक्ती आपल्या स्वातंत्र्यापासून वंचित आहेत यांचे बेतच नाही,शासकीय सेवेत उच्च निच्छता,समाजात स्त्री पुरुष भेद,धर्मीक दंगली,विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्काचे व्यासपीठ नमिळणे,युवकांचा आवाज दाबणे,अश्या एक ना अनेक क्षेत्रात मानवी हक्कांची भंग होत आहेत,यासाठी या देशात मानवी हक्काची ओळख प्रत्येक तळागाळातील नागरिकांना करून देण्याची काळाची गरज आहे,संघटित पणे आवाज उठवुन अभिव्यक्ती च्या खिलाफ,स्वतंत्र हिरावून घेणाऱ्या,आणि लोकशाहीच्या या स्वतंत्र राष्ट्रात आम्हाला गुलामीत राबवणाऱ्यांची वेळीच ठेचून मानवी हक्कांच्या संरक्षण करणे काळाची गरज वाटते.
 


लेखक :- श्रीपाद नागनाथ राऊतवाड
              मो.८००७८७००२६
              नांदेड.
 

Tuesday, December 05, 2017

बाबासाहेबांच्या चळवळीचे वारस कोण..?

बाबासाहेबांच्या चळवळीचे वारस कोण..?

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त लेख...


     आज ६ डिसेंबर,विश्वरत्न भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच महापरिनिर्वाण दिन,त्यांनी ६ डिसेंबर १९५६ ला वयाच्या ६५ व्या वर्षी आपला अखेरचा स्वास घेऊन समस्थ भारतवासींना पोरकं करून गेले,त्यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्ताने त्यांच्या नावाने मिरवणारे अनुयायी त्यांच्या विचारणाचे पालन करून,चळवळ चा वारस होत आहेत का, का बाबासाहेब आंबेडकरांनी उभारलेली चळवळ मंद पडली? असा प्रश्न माझ्या सारख्या सामन्य कार्यकर्त्यांना पडणे साहजिकच आहे.
     भारताच्या घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जातिभेदाच्या दाहकतेचे चटके सहन करून जातिनिर्मूलनासाठी लढा दिला. मात्र, अजूनही मनातून जात जात नाही हे प्रत्ययाला येत आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते, ‘परिवर्तनाची प्रक्रिया गतीमान होण्यासाठी समाजमनात परिवर्तनवादी विचार रूजणे आवश्यक आहे’ हे डॉ. बाबासाहेबांचे मौलिक विचार प्रत्येक कार्यकर्त्यांनी आत्मसाथ केले पाहिजे,समाज परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल करत असलेल्या थोतांड गप्पा आजचे राजकीय पुढारी करतांना दिसतात,मात्र परिवर्तन म्हणजे काय.?हा प्रश्न या पुढाऱ्यांना विचारल्यास दोनाचे चार होतात,म्हणजे समाजाला दिशाभूल करून,बाबासाहेब आबेडकरांनी उभारलेली राज्यघटनेच्या बळावर तुम्ही नेते लोक आम्हा सामान्य जनतेस अजूनही गुलामीत ठेवण्याचं षडयंत्र रचता हे पाहून मला वाटते बाबासाहेब तुमचा अनुयायी अत्ता चळवळीचा वारस राहिला नाही ,तुम्ही दिलेल्या शिका संघटित व्हा! आणि संघर्ष करा! असा मोलाचा संदेश. मात्र या संदेशाचे पालन न करता आजही स्वत:ला आंबेडकरी अनुयायी म्हणून मिरवत असतात. त्यामुळे समाजामध्ये राडा करून पुढे काय करणार? असा माझ्यासारख्या अनेक सर्वसाधारण आंबेडकरी कार्यकर्त्यांमध्ये ‘आंबेडकरी चळवळ कुठे निघाली?’ हा प्रश्न निर्माण झाला आहे.
     आम्ही शिक्षण घेतलोत,कुठलाही कुटुंब अशिक्षित च्या दारात राहिले नाहीत,सर्व सामान्य जनता देखील शिक्षणाचा घोट घेत आहेत,समाजासाठी एकवटत आहेत, मात्र संघटित होतांना एक अहंकार आमच्या मनामनात भरलेला दिसतोय म्हणून संघटित होतो खरे,पण संघर्षच्या नावाने बोबाबोंब आहे,आम्हाला चळवळीचा वारस नाही तर त्या चळवळीचा पुढारी होण्याचे स्वप्न आम्ही उरावर्ती बाळगत आहोत,म्हणूनच आज कित्येक समाज अन्याय अत्याचारांना सामना करतानाचे चित्र दिसत आहेत,आमच्या समाजावर अन्याय होतोय, मग समाजातला एखादा पुढारी समोर होतो आणि एखाद संघटन स्थापित करतो,संघटनेत अध्यक्ष,उपाध्यक्ष, सचिव सदस्य सारख्या पदभरती होते आणि संघर्षाला सुरवात केल्यास कालांतराने आमच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांना पदाची लालूच लागते अन तो दुसरा संघटन स्थापित करून,त्यांच्या पदाचा राजा होतो आणि करतो संघर्ष,केवळ स्वार्थासाठी हा क्रम आज देश्यातल्या प्रत्येक समाजात चालू आहे, बाबासाहेबांनी संघटित व्हा म्हटलेत,असे स्वतंत्र संघटित व्हा असे नाही,अश्याने समाजाचे प्रश्न सुटत नसून उलट वाढत चालले आहेत,शिक्षण घेतलोत आकडेवारीची ओळख व्हावी म्हणून..?,संघर्ष करतोय,स्वार्थ निर्माण करून या देशातल्या नागरिकांना लुबाडण्यासाठी,ही कसली मनोवृत्ती नेता होतो समाज हिताच्या गोष्टी फक्त भाषणा पुरतेच,जात धर्म वंश अश्या बुरसटलेल्या विचारांनी एखादा नेता जर आम्हला समाज कार्य शिकवीत असतील तर ते देश्याच्या सविधानाचे पाईक नाहीत, बाबासाहेब तुमच्या अनुयायांकडे आज ना तुमच्या विचारांचा घर आहे न तुमच्या अस्तिवाची त्यांना जाणीव..
   बाबासाहेबांच्या जिवनातील एक प्रसंग,बाबासाहेब शांतपणे एक कोपऱ्यात बसून समाजाच्या पुढील भवितव्याचा चिंतन करत होता,तेव्हा त्यांच्या डोळ्यात पाणी पाहून एका अनुयायांनी त्यांना विचार बाबासाहेब आम्ही काय पाहत आहोत,तुमच्या डोळ्यात पाणी?,तेव्हा बाबासाहेब उत्तर देत म्हटले, "गड्या मी दूर दूर पाहत आहे माझ्या चळवळीचा वारस मला कोणी दिसत नाही,हे सर्व उभारलेली चळवळ अत्ता माझ्या नंतर नामशेष होणार का? ही भीती वाटत आहे," हे त्यांचे शब्द आहेत,हे नानक चंद रत्तू यांनी हे शब्दबद्ध केलेत,ह्यावरुन बाबासाहेबांची दूरदृष्टीची जाणीव होते,बाबासाहेब गेले याचा अर्थ त्यांची चळवळ संपली असे नाही,त्यानी उभारलेली अस्पर्शता, जाती भेद,धर्म भेद अश्या बुसरलेल्या विचारावरील चळवळ आज मंद पडली आणि अश्या विचारांचा जागर आज या देश्यात झपाट्याने वाढत चालली आहे, अनेक ठिकाणी जातीय दंगली होतांना दिसत आहेत,अनेक ठिकाणी धर्म द्वेष,प्रांत द्वेष या माध्यमातून हा मानव एकमेकांना संपवित निघाला आहे,आजही ते अस्पर्शता संपली नाही,आजही वर्णव्यवस्था आहे, या वर कुठे तरी आपण चिंतन केले पाहिजे,आणि समस्थ समाजांनी बाबासाहेबांच्या चळवळीचा पाईक होऊन अन्यायावर लढा उभारला पाहिजे तरच खऱ्या अर्थाने भारतरत्न विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवान ठरेल.
 
लेखक :- श्रीपाद नागनाथ राऊतवाड
             मो.८००७८७००२६
             नांदेड.
 

Wednesday, November 29, 2017

भाजपचे पंच बंडखोर

भाजपचे पंच बंडखोर

केंद्र व राज्यातील सत्ताधारी भाजप सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांविरुद्ध आंदोलनाचे दंड थोपटणारे माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा, खासदार राजू शेट्टी, खासदार नाना पटोले, आमदार बच्चू कडू आणि माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे हे येत्या रविवारी (3 डिसेंबर) रोजी अकोल्यात एकत्र येत आहेत.
अकोल्यात कापूस-सोयाबीन-धान (कासोधा) परिषद होत असून या निमित्याने हे दिग्गज एकाच व्यासपीठावर येणार आहेत. या परिषदेच्या माध्यमातून हे शेतकरी नेते केंद्र व राज्य सरकारवर हल्लाबोल करणार असल्याने या परिषदेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
भारतीय जनता पार्टीच्या कुंडलीत दोष निर्माण झाला आहे. सामान्यत: राहू-केतू संबंधित व्यक्‍तीला जाचदायक ठरत असतात, असे जाणकार सांगतात. या राहू आणि केतू यांचे नाव प्रत्येकाने वर्षानुवर्षे अशा वाईट संदर्भातच ऐकले असल्यामुळे ते दोघे बिचारे चांगलेच बदनाम झाले आहेत.
नोटाबंदीमुळे देशाची अर्थव्यवस्था कशी ढासळली, महागाई कशी वाढली येथपासून जीएसटीची अंमलबजावणी कशी चुकीची, याचे सध्या भारतात लागू असलेली जीएसटी हे उत्तम उदाहरण ठरावे, असेही यशवंत सिन्हा यांनी  सांगितले. दुसऱ्या “शॉटगन सिन्हा’नीही बिहारमध्ये भोजपुरी भाषेत “गएली सरकार तोहरी’ असे नागरिक आता म्हणू लागले असल्याचे त्यांच्याच भाषेत सांगितले.
वास्तविक दोन्ही नेते पक्षात ज्येष्ठ आहेत.
स्वकियांविराेधातच बंडाचा झेंडा फडकविणारे भाजपचे खासदार नाना पटाेले व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्यात झालेल्या गुप्त बैठकीमुळे विदर्भात लवकरच नव्या समीकरणांची नांदी हाेणार असल्याचे संकेत अाहेत. सत्ताधारी भाजपविरुद्ध अांदाेलनाचे रान पेटविणाऱ्या ‘स्वाभिमानी’ च्या खांद्याला खांदा लावत साेयाबीन, कापूस व धान उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी विदर्भात लवकरच माेठे अांदाेलने उभे करण्याची रणनिती उभय नेत्यांमध्ये जवळपास एक तास झालेल्या बंदव्दार चर्चेत घडल्याची माहिती सुत्रांनी दिली.
पूर्व विदर्भात खासदार पटाेले हे धान उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अाक्रमक भूमिका घेऊन लढणारे नेते म्हणून अाेळखले जातात. तर पश्‍चिम विदर्भात सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अाक्रमक अांदाेलने करणारा नेता अशी रविकांत तुपकर यांची ओळख आहे.
 भाजपच्या अटलबिहारी वाजपेयी सरकारात त्यांनी मंत्रिपद भूषविले आहे. तांत्रिकदृष्ट्या ते अद्यापही भाजपमध्ये आहेत. त्यामुळे सरकार व पक्षाच्या नीती आणि धोरणांसदर्भात काही तक्रार असेल तर पक्षाचे व्यासपीठ त्यांना उपलब्ध आहे. ते आपला मुद्दा मांडू शकतात, चुका दुरूस्त करू शकतात. पण तसे सोडून ते जाहीरपणे सरकारचे वाभाडे काढत आहेत व तेही विरोधी पक्षांच्या व्यासपीठावरून! महागाई, भ्रष्टाचार, नागरिकांना नोटाबंदीमुळे झालेला त्रास आणि आता जीएसटी यावरून आम्हाला त्यांची काळजी आहे, हे भासविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. कोणतेही सरकार सत्तेवर असले तर त्यावेळचे विरोधक हे सरकारच्या विरोधात अशीच शाब्दिक आतषबाजी करत असतात आणि जनतेच्या हिताची त्यांनाच चाड असल्याचा आव आणत असतात. कॉंग्रेसने जेव्हा जीएसटीच्या दिशेने पावले उचलण्याचा प्रयत्न केला तेव्हा खुद्द भाजपनेही अशीच आगपाखड करत कुभांड रचले होते. आज मात्र त्याच पक्षाने जीएसटी आणली व आता त्याची वकिलीही करत आहे. याउलट कॉंग्रेसने विश्‍वामित्री पवित्रा घेतला आहे. जीएसटीच्या अंमलबजावणीपूर्वी सरकारने सर्व पक्षांशी चर्चा केली होती. सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली होती. आताही जीएसटीबाबत निर्णय घेण्यासाठी जी प्रमुख समिती आहे, त्यातही सगळ्याच प्रमुख पक्षांचे नेते आहेत. राजकीय पक्षांनी त्यांना काही अयोग्य वाटत असेल तर किंवा काही बदल आणि सुधारणा हवी असेल तर आपल्या नेत्यांच्यामार्फत ते तसे सूचवू शकतात आणि बदल करून घेऊ शकतात. सव्वाशे कोटी लोकसंख्या असलेल्या देशात एखादी बाब सरसकट लागू करायची असेल तर काही चुका आणि दुरुस्ती होणारच. ते समजले पाहिजे. मात्र, राजकारणच करायचे ठरवले तर केवळ बोंब मारण्याशिवाय अन्य पर्याय नसतो. तोच प्रकार सध्या सुरू आहे. सर्व सहमतीने काही करायचेच नाही, हा स्थायीभाव झाला असल्यामुळे आणि काही करत असताना पहिले माझे काय ही वृत्ती असल्यामुळे कोणताही निर्णय खुल्या मनाने स्वीकारला जात नाही. दोन्ही सिन्हांना मोदी सरकारच्या नव्या निकषांनुसार लाल दिवा मिळाला नाही, हे खरे आहे. किंबहुना लाल दिवा तर दूरच अशा तापदायक मंडळींना संसदेतच येऊ द्यायची नाही, अशी चोख व्यवस्थाही त्यांचे तिकीट कापून करण्यात आली होती. मात्र, नंतर दबाव किंवा थोडी सामंजस्याची भूमिका घेत मोदी व शहांनी पडती बाजू घेतली. त्याचा त्यांना जाच होतो आहे. कॉंग्रेस पक्ष असो अथवा अन्य विरोधक आपला वापर करून सोडतील, याची या नेत्यांना कल्पना नाही, अशातला भाग नाही किंवा जनतेला आपली सुप्त इच्छा समजत नसेल असे मानून ते चालले आहेत, अशातलाही भाग नाही. पण बऱ्याचवेळा स्वार्थामुळे अथवा कोणाच्या प्रती द्वेषभावनेमुळे डोळ्यावर जी पट्टी बांधली जाते ती महाभारत सुरू झाल्याशिवाय काही उतरत नाही. सिन्हा मंडळींची ही खदखद भविष्यात भाजपला किती नुकसानदायक ठरते ते पाहावे लागेल.

२९/११/२०१७
"समाजकारण,राजकारण आणि मानव"

"समाजकारण,राजकारण आणि मानव"

या पृथ्वी तलावर अनेक सजीवांपैकी बुद्धिवान प्राणी म्हणून या मानव जातीस ओळखतात,अनेक वर्षांपासून हा मानव स्वतःच्या अस्तित्वासाठी लढत आहे,जीवन एक संघर्ष म्हणून सकाळ पासून रात्री उशिरा पर्यंत धावपळीत जीवन जगत आहे,हा मानव सध्यस्थीतीला मी आणि माझं या दोनच गोष्टींसाठी अतूट प्रयत्न करतांना दिसत आहे.
    समाजासाठी लढणारे,स्वतःच्या अस्तित्वासाठी नाहीतर या समाजासाठी वेळ देणारे लाखतले एक असतात,समाजावर संकट उभारलं तर धाव अनेक घेतील पण त्या धाव घेण्यात वर्चस्व साधणारे,स्वार्थ साधणारे समाजसेवक आज घडीला निमार्ण झाले आहेत,अश्या समाजसेवकांना कोणत्या अंगाने समाजकार्य करतो म्हणावं,एखाद संघटना,संस्था उभारली की त्या संस्थानाच्या छताखाली आपले अनुयायी लादून घेणारं अन आपल्या परीने आपलं बळ निर्माण करणार,वर्चस्व निर्माण करणार,आणि पुढील भविष्यासाठी (स्वतःच्या) लढा देणार हे निर्माण झालेली समाजातील व्यथा,खरतर ही व्यथा "नवऱ्याने मारल अन पावसाने झोडपले, दाद कुणाकडे मागायचं.?"अशीच आहे.

    गावपातळीवर एकदा कार्यकर्ता उभारतो,आपल्या गावासाठी झगडतो, अन वरील पुढारीच्या दावणीला बांधलं जात याला काय अर्थ ?,एक छोटंसं उधाहरण,एका गावात गणपत पाटील आमदार साहेबांचा सच्चा कार्यकर्ता,साहेबांसाठी तळमळीने कार्य करतो,गावात एकही मत दुसरी कडे जाता कामा नेये यासाठी तुटून कार्य करतो,मग आमदार साहेब अश्या छोट्या छोट्या कार्यकर्त्यांकडून आपलं मोठं स्वप्न उभारत,पाच वर्षांनंतर गणपत पाटील पंचायत समितीची निवडणूक लढवाव या साठी आमदाराला भेटतो, आमदार म्हणतो तुझं जागा फिक्स,फॉर्म च्या शेवटच्या दिवशी गणपत पाटलाला वाड्यावर बोलावून डाव खेळतो अन गणपत पाटलांचा अर्ज भरणे थांबतो,स्वतःच्या नातेवाईकांतील एकाला उमेदवारी  देऊन पुन्हा गणपत पटलांसारख्या कार्यकर्त्यांना उभारून तेही निवडणूक जिंकतो, असेच क्रम चालू असते, गणपत पाटील पुन्हा पुढच्या पाच वर्षांनी तिकिट विचारतो पुन्हा नातेवाईक येतो पून्हा पक्षासाठी काम करतो,अस चालत चालत गणपत पाटील शेवटी संपला मात्र त्याला न कुठली निवणूक लढवता आलं नाही ना कुशल अस्तित्व,ही परिस्थिती अजचीच आहे, प्रत्येक नेता प्रत्येक पुढारी आमचा वापर करत आहे हे आजचे तरुण वर्ग विसरून चालणार नाही,साहेब साहेब म्हणून आपण आजही या पांढऱ्या पुढाऱ्यांच्या चपला सांभाळत गुलामीत जीवन जगत आहोत,एखाद्या भाकरीच्या तुकड्याची आश्या बाळगून कुत्रा सारख मागे फिरत आहोत,साहेब बी चालाक कुत्रांना कधी उपाशी ठेवत नाही,उपाशी ठेवलं तर दुसरा काही बदल पडणार नाही केवळ झेंडा बदलतो,माणसे तीच विचारसरणी तीच,आश्या तीच.ही मानसिकता कुठून निर्माण झाली या मानव जातीला, का असा स्वार्थपणाला कवटाळून बसलाय हा समाज,कोणी वाली नसेल का याला,मग अस म्हणावं लागेल या देशात माणुसकी नावाचा शब्द कोलमडून गेला,नामशेष झाला,असे म्हणायला काही वावग ठरणार नाही.

    या बुरसटलेल्या विचारसरणीतुन हा माझा समाज(मानव जात) किती दिवस प्रवास करणार अन यात त्यांचं काय साध्य होणार,खायचे आणि दाखवायचे दात वेगळे का असतात,अश्वासनांनी लोकांचे बुद्धी भ्रूष्ट करणारे हे लोक कोण? हा सर्वसामान्य नगरिकांचा प्रश्न आहेत,निःस्वार्थ जीवनाचा स्वास कधी कोणाला मिळाला नाही,ना कधी कोणाला देऊ इच्छितात,हा माझा समाज,हा आपला समाज म्हणत केवळ मिरवून चालत नाही तर त्यास आपलेपणाची उब देणे त्या नेत्यांच, त्या पुढार्यांचं काम नव्हे का..?,खरतर या मानव जातीला पैश्याच वेड ग्रासले आहे,या नोटा साठी आज हा असा जीवन जगत सुटलाय,त्या तुपड्या रुपया साठी हा मानव स्वतःच्या भावाला देखील गजाआड करतोय,मायेचं ममतेच हात म्हणून कधी कुणाच्या खांद्यावर ठेवत नाही,याला कसे म्हणावं माणूस..? बहिणाबाई चौधरी म्हणतात, "माणूस रे माणूस तुझी नियत बेकर,तुझ्या विना बरा गोठ्यातला जनावर",बहिणाबाईंने या माणसांच्या हावेला गोट्यातल्या जनावरांपेक्षा पलीकडची उपमा दिली,जनावरांना दिलेल्या चाऱ्यात गुरे समाधान तर व्यक्त करतात,मात्र हा माणूस कितीही मिळालं तरी आपली झोळी मात्र अजूनही समोरच असते,हीच मानसिकतेतून या देश्यात राजकीय पुढाऱ्यांचा जन्म होत आहेत.

   मग अश्या अवस्थेत या तरुण वर्गाचं कार्य काय, तर तरुणांनी अश्या भ्रष्ट राजकीय व सामाजिक कार्यांच्या नावावर लुबाडणाऱ्या दृष्ट राजकारणी माणसापासून दुरच राहिलेलं बर, दूर म्हणण्यापेक्षा अश्या नेत्यांना वेळीच ठेचून काढणे काळाची गरज आहे,ठेचून म्हणजे वैचारिक दृष्टीने,समाज संघर्षाने आणि युवा शक्तीने,आपल्याला मिळालेल्या अधिकाराणे,आपला लढा केवळ सत्याच्या दिशेने,अहिंसेचा मार्गाने व सामाजिक दृष्टीने एक पाऊल स्वतःपासून सुरवात करु आणि अश्या दृष्ट नेत्यांकडून होणाऱ्या संविधानाचा,अभिव्यक्तीचा ऱ्यास थांबवण्यासाठी लढा देऊ,हेच लढा शाहिद भगतसिंग यांनी दिल होता ,हाच लढा भगवान बिरसा मुंडानी प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात उभारला होता,याच मार्गाने आपलाही लढा असला पाहिजे,समाज कार्य म्हणजे,महापुरुषांच्या झीजलेल्या आयुष्यातून दिसते, स्वतः अस्तित्व मिटवून हा प्रख्यात समाज स्थापने म्हणजे समाजकार्य होय,याच पार्श्वभूमीवर महात्मा फुलेंनी आपल्या पत्नी सावित्रीमाईंना एक सांख्यिक उधाहरण देऊन समाज कार्याची ओळख पटवून दिले,सावित्रीमाई कडून एका ज्वारीचे दाण मातीत रुजवण्यास लावले व त्यास खतपाणी घालून तब्बल सहा महिन्यांनी त्या बियाणाचे रोपट्यात व रोपटीचे झाडात निर्माण होऊन,त्यास एक कनस उगवले ,सावित्रीबाई फुलेंना ज्योतिबांनी ते कणस आणण्यास सांगून त्या कनसात सुरवातीचा पेरलेला बियाणे शोधण्यास लावले,यावरून ज्योतिबा म्हणतात सावित्रीमाईंना की जो माणूस या बियांना सारख स्वतः झीजतो आणि कनसरुपी समाजाला उभा करतो न तोच खरा समाजसेवक आणि तोच कार्य मला अपेक्षित आहे,यावरून त्यांनी केलेल्या कार्याची,व उभारलेल्या चळवळीची शोभित चित्र दिसते...
 
लेखक :- श्रीपाद नागनाथ राऊतवाड
              मदनूर जि. कामारेड्डी
              मो.८००७८७००२६

 

Monday, November 20, 2017

मरावे परी किर्ती रूपे उरावे

मरावे परी किर्ती रूपे उरावे


      
मानव जन्म हा एकच वेळा मिळत असतो. त्यासाठी मानव जन्म हा सार्थकी कसा लावावा हे आपनच ठरवायच असत. पुन्हा मनुष्य जन्म नाही, म्हणूनच असे जगावे की,सु-किर्ती राहीली पाहिजे पृथ्वीवर.
      निसर्गाला बोलता येत नसल तरी देखिल आपले अमुल्य जीवन परोपकार करण्यात मग्न असतात,आणि मनुष्य निसर्गाचे उदाहरण वांरवांर देत असतो पण त्यांच्या सारख आपन वागलो तर आपली ही किर्ती चोहिकडे पसरेल आणि हे ब्रीद वाक्य सार्थकी लागेल. *मरावे परी किर्ती रूपे उरावे*
तसेच आपन मानव असुन आपनास दया,ममता, वात्सल्य,प्रेम अनेक प्रकारच्या वेदना अन संवेदना असतात. हे अगदी सत्य असुन निसर्गाला त्या नसतात. पण निसर्ग हा मनुष्यापेक्षा जास्त देतो,तो विशाल हृदय असनारा असा दोन्ही हाताने पृथ्वीवासींना देतच असतोय. ...
        त्यांच्यापेक्षा आपनास खुप काही जास्त मिळाले असुन आपन परोपकारी वृत्तीने जर कार्य केले तर या विश्वात किर्ती रुपाने जीवंत राहू शकतो. जन्मोजन्मी,पिढ्यांपिढ्या मरावे परी किर्ती रूपे उरावे ही म्हण योग्यच आहे. विशाल हृदयाने समाजहितार्थ कल्यानकारी मोठी कार्य नाही केली तरी आपल्या संसारात सहिष्णूता,अंगी सहनशिलता राखून आपल्या परीसरात तरी आपली किर्ती अबाधित रहावी यासाठी प्रयत्नशिल राहून छोट्या मोठ्या गोष्टीतुन आपन आनंद मिळवु शकतो.
      दीन दुबळानां साहाय्य करुन,अनाथांचे अश्रू पुसून,भुकेल्यांना अन्न देउन मानव सेवा हिच सर्वात खरी सेवा करुन मानवांनी आपल्या जीवनाचे सार्थक केले पाहिजे.जीवन हे सुंदर गीत आहे.सुंदरतेने आपन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे,आणि दुसऱ्यांना ही आनंदात ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
    आपल्या शब्दांनी कोणाचेही मन दुखावणार तर नाही ना याची काळजी घेतली पाहिजे.प्रत्येकांच्या विचारांचा आदर करता आला पाहिजे.प्रत्येक
मानवांनी आपल्या जीवनाचे सार्थक केले पाहिजे.
  प्रत्येकांच्या हृदयात आपले स्थान निर्माण करता आले पाहिजे.जगायचे तर सारे जगतात दुसऱ्यांचा सुखात दुःखात सहभागी होता आले पाहिजे,त्यांच्या दुःखात आपणही दुःखी झालेतर, त्यांच्या सुखात आपण ही आनंदी झालो पाहिजे,कोणत्याही प्रकारचे लोभ,द्वेष,मत्सर करु नये,हे आपल्या पासून दूर ठेवने अत्यंत गरजेचे आहे.आपले मन विशाल व हृदयपण विशाल असले पाहिजे आहे.ही सर्व गुणे आपल्यात सामावून घेता आले पाहिजे.
         आपल्या विचारांच्या माध्यमांतून लेखणीच्या शस्त्रांनी समाजाला दिशा देण्याच कार्य ही महान अमुल्य सेवा आहे. साहित्यिक केव्हांच मरत नाहीत त्यांच्या विचारातून तो सदैव जीवंत राहुन जनसेवा करीत असतो.आपल्या विचारांच्या माध्यमांतून  लेखणीच्या जोरावर महान राष्ट्रसंत,लेखक,महाकवी,मुनी झालेले आहेत.जग जिंकण्याचे सामर्थ्य ही आपल्या मनुष्य जातीनेच केले असुन इच्छा शक्तिच्या जोरावर मोठे एव्हरेस्ट सारखे पर्वत सर केले आहे.मोठमोठे लढवय्ये, पंतप्रधान, राष्ट्रपती,राजे,महाराजे होवून गेले आहेत आपन आजही त्यांच्या कार्याचे बखान करतोय. आयुष्यात कधी पण सकारात्मक विचार असावे,नकारात्मक विचार करु नये.मरावे परी किर्ती रूपे उरावे,यासाठी मनुष्याला खुप मेहनत घ्यावी लागत असते,त्याग करावा लागतो,कष्ट करावे लागत असतात.
          प्रतिभा प्रत्येकात एकसारखी नसते, प्रत्येकात कमी जास्त प्रमानात असते.त्याला दिशा देण्याचे किंवा वाट दाखवण्याचे कार्य प्रतिभा संपन्न सत्तगुरु करतात,ते आपल्या शाळेचे गुरु,आईवडिल, भाऊबहिन,नातेवाईक किंवा अनेक प्रकारे गुरु पासुन जीवनात विद्या घेवून देवून मार्ग प्रशस्थ करु शकतोय.
    कोणत्याही परिस्थितीत मानवाला जगता आल पाहिजे.कुरघोडी करुन कूणाशी स्पर्धा करुन,चोरी करुन जगणाऱ्यांना ध्येय नसतं.नजरेसमोर काही मेहनत केली तर यश आपल्या जवळ चालत येतं.
त्यात ही चांगले आणि वाईट गुणांची निवड करुन अंगी बाळगुन समाजात वावरल्यास आपणास  हमखास किर्ती मिळेलच. किर्ती पाहिजे की अपकिर्ती पाहिजे,हे आपणच ठरवायच असते.जिथे सुमती असते तिथे अनिती नसते.जिथे सुसंस्कार असते तिथे कुसंस्कार नसते.ज्याच्या मनी चांगुलपणा असतो.तो कुणाच वाईट करु शकत नाही.आणि या प्रामाणिक संस्कारी लोकांची किर्ती अबाधित असते.    विशालकाय वृक्षांचीपन किर्ती आहे. चंदन वृक्षांचीपन किर्ती आहे. अश्या वेगवेगळया प्रकारच्या वृक्षापासुन खुप काही शिकायला मिळत असते. पानाफुला कडून
चंद्रसुर्या कडून,समुद्रा कडुन,पशुपक्ष्यां कडून शिकवन घेतली पाहिजे.

श्रीमती मिनाक्षी किलावत,                   मु.पो.ता.वणी,जिल्हा
  यवतमाळ  मो.नं.8888029763
   meenakilawat 2153@gmail.com
संस्कृती

संस्कृती

संस्कृती आहे तर संस्कार आहे.प्रकृतिचे देने अमुल्य आहे.देव असेल नसेल पन श्रद्धा आहे.या श्रद्धेपाई अनेक जन जगत आहेत.असंख्य जन रोजी रोटी कमवून आपला संसार निटनेटका करुन
भरन पोषन करतांना दिसतात......
देव पुजा करायला कुनाची सक्ती नाहीच मुळी,पन हिंदु करतात अन मानतात,त्यांची प्रगाढ श्रद्धा, आशारुप घेवून त्यांची दु:ख जर कमी करत असेल तर त्या भोळ्या जनांना करु द्या की भक्ती. ज्या श्रद्धेपाई अनेक साहित्यीक अमर संत झालेले आहेत,त्यांनी आपली प्रगल्भ बुद्धी खर्च करुन जनास योग्यच मार्ग दाखविला आहे. त्यात आग ओकण्या सारख काय आहे.त्यांच्या श्रद्धेवर ताशेरे उडवण्याचा कुणालाच अधिकार नाही. असे मला वाटते. मी मानते त्यांच्या भक्तीत स्वर्ग नाही नर्क नाही,पन जर नरकात जाण्याच्या भितीमुळे घाबरुन जर चांगुलपणा येत असेल तर ? श्रद्धा कां ठेवू नये?
   हे संस्कार घेवून कित्येक महापुरुष जगात झालेले आहेत,त्यांची नावे सुवर्णक्षरात लिहिली गेलेली आहेत.त्यांचे अतुलनिय कार्य,त्यांचे पिढ्यांन पिढ्या गुणगाण आपन गात आहोत,तर ते काय खोटे होते वाईट होते तर आपन त्यांना कां मानत असतो ?कसे काय  का ते माननिय ठरले? सुसंस्कांरी लोकांची कधीच अधोगती होत नसते,त्यांची आस्था                   वेल पावरच त्यांना उच्चपदावर नेवून ठेवत असते. ज्यांच्या जवळ आस्था नाही ते कधी ही नाव लौकीकास पात्र होत नाही.जसे डॉक्टरवर श्रद्धा ठेवली तर मनुष्य रोगमुक्त होतो.गुरूवर श्रद्धा ठेवली विद्या येत असते.आईवर,वडीलावर,कुणी नातेवाईक,परीवार,आप्त प्रत्येकाची कुणावर तरी श्रद्धा असतेच.तशीच देवावर श्रद्धा ठेवने वाईट नाही ,अस मला वाटते.अनेक प्रश्न आपल्या मनात घोंगावत असतात. त्याचे क्षालन कुनीच करु शकत नाही.                                                              
आस्था शरीरात संवेदना निर्मान करत असते.
त्यामुळे जन जाती सर्व इलाज करुनही
जेंव्हा रोगमुक्त होत नाही तेंव्हा देवाचा
धावा करुन बरे झालेली लोक आपल्याला दिसतात.
डॉक्टर सुद्धा जेंव्हा हात टेकतात आनी
वरती बोट दाखवतात सर्व उपरवाले के हात मे है
अस कां बर म्हणतात?
छोट्या मुलांना चांगले संस्कार मिळावे त्यासाठी आई बाबा भिती दाखवतात.हे केल्याने पुण्य मिळते, हे केल्याने पाप होते.हे सर्व त्या बालमनावर वरचेवर बिंबवल जाते,आनी बालक वाईट कृत्य करायला भित असतो.चांगले काम केले तर आपल चांगल होईल ही भावना ९९ टक्के लोकांच्या मनात असते,व त्यातून
काय बोध मिळतो ,हे सर्वांना ठावूकच आहे.
                                 
संस्कृती आहे म्हणुनच सर्व आहे. प्रत्येक धारणे मागे काही कारणे असतात.सणवार आले की नविन कपडे मिळते,गोडधोड पदार्थ खायला मिळतात. घरात कसा आंनद दरवळतोय. दुरुन दुरुन नातेवाईक येतात.संमारभ होतो.त्या एका नवसामुळे,किती लोकांना आंनद मिळतो.आता नवयुगात पार्टीच रुप त्याला मिळाले आहे.

श्रीमती मिनाक्षी किलावत , यवतमाळ                                                            मो.नं.8888029763
   meenakilawat 2153@gmail.com

Friday, November 17, 2017

‘पद्मावती’चा वाद

‘पद्मावती’चा वाद

संजय लीला भंसाळी दिग्दर्शित पद्‍मावती सिनेमा येत्या 1 डिसेंबर रोजी प्रदर्शित होत आहे. अभिनेत्री दीपिका पदुकोण ही पद्मावतीच्या भूमिकेत तर रणवीर सिंह अलाउद्दीन खिलजीच्या तर शाहिद कपूर राजा रावल रतन सिंह यांच्या भूमिकेत दिसणार आहे.

‘पद्मावती’चा वाद काही मिटण्याचे  नाव घेत नाहीये. करणी सेनेनंतर ब्राह्मण समाजाने या चित्रपटाच्या प्रदर्शनला विरोध केला आहे. इतकेच नाही तर जयपूरची रॉयल फॅमिलीनेही  सिनेमाच्या विरोधात दंड थोपटले असून  जयपूरच्या पूर्वाश्रमीच्या राजकुमारी आणि सध्या भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) आमदार दीया कुमारी यांनी राजस्थानमध्ये चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध केला आहे. दुसरीकडे, पद्‍मावती वादात आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील उडी घेतली असून  गडकरी यांनी चित्रपट निर्मात्यांना कठोर निर्देश दिले आहेत.
अभिव्यक्तीच्या नावावर  निर्मात्यांनी इतिहासासोबत छेडछाड करू नये, असे गडकरी यांनी सांगितले ते एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलत होते. इतिहास रुपेरी  पडद्यावर दाखवताना निर्मात्यांनी सांस्कृतिक संवेदना लक्षात ठेवणे गरजेचे असून पद्‍मावतीच्या इतिहासासोबत छेडछाड करण्यात आली आहे यामुळे लोकांमध्ये रोष आहे. सिनेमाला विरोध करणे हा लोकांचा अधिकार असल्याचे गडकरी यांनी सांगितले. दरम्यान, कोणत्या संविधानाने संजय लीला भंसाळी यांना इतिहासासोबत छेडछाड करण्याचा अधिकार दिला, असा सवाल करणी सेनेने केला आहे.

संजय लिला भन्साळीच्या 'पद्मावती'वरून सुरू झालेल्या वादाला आता राजकीय रंग चढू लागला आहे. काँग्रेस नेते शशी थरूर यांनी या चित्रपटावरून केलेल्या टिप्पणीनंतर केंद्रीय मंत्री आणि भाजप नेत्या स्मृती इराणींनी त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

सर्व महाराजांनी ब्रिटीशांसमोर गुडघे टेकले होते का? या थरूर यांच्या टिप्पणीवर ज्योतिरादित्य शिंदे, दिग्विजय सिंह आणि अमरिंदर सिंह यांचे काय म्हणणे आहे, असा सवाल त्यांनी केला. विशेष म्हणजे राजपूत राजांच्या घराण्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नेत्यांची नावे घेऊन त्यांनी थरुर यांना लक्ष्य केले आहे.

'पद्मावती' चित्रपटावरून सुरू झालेल्या वादात शशी थरूर यांनी उडी घेतली होती. मान-सन्मानाला धक्का बसत असल्याचा दावा करत काही तथाकथित शूर महाराजे एका चित्रपट निर्मात्याच्या मागे लागले आहेत. पण त्याच महाराजांनी ब्रिटीशांनी आदर-सन्मान पायदळी तुडवल्यानंतर तेथून पळ काढला होता, अशी टिप्पणी केली होती. त्यावर टीका झाल्यानंतर त्यांनी स्पष्टीकरणही दिले होते. मी राजपूत समाजाविरोधात टिप्पणी केल्याचा खोटा प्रचार भाजपच्या काही अंधभक्तांनी केला आहे. राजपूत समाजाच्या भावनांचा आदर करणे सर्वांचेच कर्तव्य आहे. भाजप आणि सेन्सॉर बोर्डाने त्याची काळजी घेतली पाहिजे, असे थरूर यांनी स्पष्ट केले.

Tuesday, November 14, 2017

कट्टा

कट्टा

सकाळची कामाची घाई, मुलीचा डबा यामुळे मॉर्नींग वॉकला वेळ मिळत नव्हता तेव्हा सायंकाळी रोज फिरायला जायचे ठरविले. कारण, आता दार, खिडक्‍या बंद असलेल्या घराला ऑक्‍सीजन मिळणेही कठीण झाले आहे. शिवाय दिवसभरात वाचलेल्या पुस्तकांचा आढावा घेण्यासाठी सांयकाळचा गार वारा खूप साथ देतो. विचारांच ओरलिंग केलं जात, शंकाच रिपेरींग केलं जात. ऐकू येणारे आवाज, डोळषानी दिसणाद्यया घटना, गर्दीतून स्वतःला सावरत-सावरत पुढे जातांना एका घरासमोरचा रोज भेटणारा प्राजक्ताचा सडा, अगदी पाऊस येण्याआधी जसं सुखद वाटतं... तशी सायंकाळची छटा. पण चांगल्या सवयीची लगेच लत लागते तसचं सायंकाळचे साडेपाच वाजले की पाय आपोआपच घराबाहेर पडू लागते. त्या रस्त्यावर रोज वेगवेगळया लोकांचे चेहरे दिसत होते. घराशेजारीच एक विष्ठलाचे मंदीर होते. सहाच्या ठोक्‍याला बरोबर आरती व्हायची. कॉलनीतल्या सर्व वयस्कर मंडळींना जसा घंटानाद आवर्जून बोलावतो आणि ते लगबगीने हातातली काम टाकून मंदिरात धावत येतात. काठी सांभाळत... चष्मा लावत... धोतराचा टोक मोठया तावातावात हलवत मंदीराची पायरी चढायचे.

Tuesday, July 12, 2011

लेख

लेख

    संपादकीय     

ध्यक्रांतिकारक भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंती विशेष लेख...

"आदिवासींचा उलगुलान - भगवान बिरसा मुंडा"

आदिवसी जननायक,अध्यक्रांतिकारक भगवान बिरसा मुंडा,आदिवासी समाजासाठी वयाच्या तारुण्यातील केवळ २५व्या वर्षी प्रस्थापित व्यवस्थेशी लढा देऊन,आज या आदिवासी जण जमातींच्या अस्तित्वाची ज्योत पेठवून,"विद्रोही उलगुलान" चा संघर्षाचा आवाज उठवणारे भगवान बिरसा मुंडा यांची आज जयंती त्या निमित्त,त्यांच्या विषयी दोन शब्द....
    आदिवासी,जे या मातृभूमीच्या खुशीत जन्म घेऊन,मूलनिवासी असून सुद्धा,ज्या बाहेरून आलेल्या धूर्त मनुवाद्यांनी धर्म,कर्मकांड, ईश्वर,आत्मा,परमात्मा आणि भाग्य असा डोस देऊन सदैव आपल्या गुलामीत ठेऊन,आक्रमनाणे शोषण,आदिवासी स्त्रियांवरील अत्याचार करणाऱ्या या आक्रमक पुढाऱ्यांनी आपल्या शस्त्राचा वापर करून आम्हा आदिवासींना आमच्या मालकीच्या वस्तीतून हुसकावून डोंगरी,दऱ्या खोऱ्याच्या अरण्यात वास कराया लावला,आमच्या पूर्वजांच्या शेतजमिनी लुटल्या,आणि पूर्ण पने आदिवासींना आपले गुलाम केले,या आदिवसींना कुठलाच वाली नव्हता,पुढे चालून आदिवासी प्रांतात ब्रिटिशांनी राजवट निर्माण केली,पुन्हा जंगलखोऱ्यात राहणाऱ्या आदिवासींना या ब्रिटिशांनी "तूट पाडा व राज्य जोडा",ह्या समीकरनाणे आपलं अस्तित्व टिकवले, मात्र आदिवासी वरील अन्याय अत्याचार काही थांबले नाही,बंडखोर व दरोडेखोर असा शिका या आदिवासी जमातीवर पडला होता, अश्या अवस्थेत या आदिवासी जमातीला कोणी वाली नव्हता,कुठल्याही कारणास्थव स्वतःवरील अन्याय अत्याचारास दैवी कोप आणि स्वतःच्या भाग्याला दोष देत हा समाज जगत असे...
      इंग्रजांच्या अगमनानंतर त्यांनी अतिदुर्गम दऱ्यांखोऱ्यातून मार्ग काढीत आदिवासी इलाख्यात गेले, तिथे प्रामाणिक व इमानदारीने छोटा नागपूर भागातील मुंडा,उरॉव,हो इत्यादी तरुणांना शिक्षण दिले,त्या मनुस्मृती ने तर त्यांना मनुष्यसुद्धा समजत नाही,आजही काही मानिवृत्तीचे शिक्षक आपला द्वेष दाखवत आदिवासी विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर बसवितात,असो,तर शिक्षणाचा खरा इमानदार प्रयत्न या इंग्रज मंडळानी केला,म्हणून आज आपण शिक्षित आहोत,एव्हढेच नव्हे तर इस्ट इंडिया कंपनीने आपल्या शूद्र तरुणांना आपल्या सैन्यात भरती केले व त्यांच्या मुलांना शिक्षण दिले,परंतु अमानुषपणे छोटा नागपूर भागातील आदिवासी जमातीवर लूटमार,अत्याचार चालूच होते,अनेक मुंडारी जमातीने विद्रोह केला,आपल्या अस्तित्वासाठी शत्रुत्वावर वार करण्यास पुढाकार घेतले, अनेक प्रसंगांना सामोरे गेले परंतु असा एकही पुढारी या आदिवासींना मिळाला नाही,गुलामीला मुखणाऱ्या समाजात हिंदू धर्माने शिक्षणापासून दूर केले,अश्या अवस्थेत १५ नव्हेंबर १८७५ साली उलिहातू या गावी कर्मीला सुगना मुंडा यांच्या पोटी बिरसाचा जन्म झाला,त्या वेळी छोटा नागपूर भागात घनदाट अरण्यातील गावात धर्मप्रचारार्थ जर्मन मिशनरीज पोहचले होते, आणि प्रचार सुरू केला होता,बिरसा मुंडा यांच कुटुंब अत्यंत हालाकीची होती,आपल्याला लागणारे अन्न पूर्वठा जर्मन मशनरीज धर्मस्थालांतराणी पूरवीत असे त्यामुळेे, त्यात सुगना मुंडाने इसाई धर्म स्वीकारला होता,आणि आपल्या बिरसा चे नामकरण "दाऊद बिरसा" असे ठेवण्यात आले,बिरसा सालगा गावांतील एक शाळेत शिक्षण घेत होता,बिरसा मुंडा यांच वर्णन म्हणजे त्यांच्या जन्मापासून तो वैचारिक दृष्टीकोनीक होता,इतर मुलांसारखे तो त्यांच्या आई वडिलांना कधी वाटलं नाही,आपल्या समाजावरील होणाऱ्या अन्यायावर वेळोवेळी प्रश्न चिन्ह निर्माण करायचा,संघर्षची,स्वातंत्र्याची भाषा बोलत असत...
     बिरसा मुंडा जर्मन मशनरीज शाळेत शिक्षण घेऊन,तेथून प्रायमरी पास झाला आणि बिरसा मुंडानी पुन्हा आपल्या मुंडारी संस्कृतीत प्रवेश घेतला,आदिवासी मुंडा हा स्वतंत्र धर्माचा तो प्रचारक बनला,आपल्या नितीमुल्य,बुद्धिवान विचारांनी तो आपल्या आदिवासी समाजावरील अन्याय अत्याचारास समाना करण्यास तयार झाला त्यावेळी त्यांचं वय होत २१ वर्षे,इसाई,ख्रिस्ती, व अनेक धर्म मार्तंडांनी मुंडारी समाजाला अधिक अधिक आपल्या धर्मात ओढवून घेण्यास नवनव्हे उपक्रम राबवत असे,त्यांनी अशी ऑफर दिली की,मुंडाणी जर धर्म प्रवेश केल्यास त्यांचे जमिनी त्यांना परत मिळतील,परंतु इंग्रज प्रशासनावरील विश्वास या समाजाचा राहिला नव्हता अश्या अवस्थेत बिरसा मुंडाणी आपल्या समाजातील इसाई धर्म,ख्रिश्चन धर्म स्वीकारून त्यांचे गुलाम झालेल्या सर्व आदिवासींना आपल्या अस्तित्वासाठी लढा उभारण्यासाठी परत आणले,व त्या व्यवस्थेविरुद्ध बंढ करून उठले,विद्रोह आवाज प्रत्येकांच्या कानात घुमत होता,मुंडारी भाषेत याला,"उलगुलान" असे म्हणतात,बिरसा च्या अश्या वागण्याने मशनरीज,ख्रिस्ती,धर्ममार्तंड बिरसा वेडा झाला असे अफवा पसरवले, शेजारील काही वस्तीत काही आजाराने मृत्यूच्या संख्येत वाढ होत असताना,हे सर्व बिरसा मुंडाच्या ह्या निच्छ वृत्तीच्या वागणुकीने ग्रामदेवतेचा कोप आहे,बिरसा ला गावा बाहेर हाकला नाहीतर सर्वनाश होईल असे धास्ती या लोकांमध्ये भरवून,मुंडाला गाव सोडून जाण्यास प्रवृत्त केले, पुन्हा यांच्या कढून  वाढत जाणाऱ्या अन्यायावरून मुंडारी जमातींनी बिरसा मुंडा च्या प्रतीक्षेत,त्यांच्या येण्याची वाट पाहत,त्यांना दऱ्या खोऱ्यातून शोधून आपल्या अस्तिवासाठी पुन्हा उभा केले, वयाच्या २३ व्या वर्षी बिरसा मुंडा आपल्या प्रत्येक कुटुंबाला जोडत सुटला होता,प्रोबोधनीत करत होता,कुठलाही धर्म आपल्यासाठी नाही,उलट आपल्याला गुलामीत राबवून आपल्याच मालकीच्या जमिनी हडप करून आपल्यावर राज्य करत सुटलेल्या या मनुविकृतांचे पडदा फाश करण्यासाठी प्रत्येकांनी उभारलं पाहिजे,तळागाळातील प्रत्येकाला बिरसा आपला अनुयायी बनवत सुटला, त्यांच्या प्रत्येक अडचणी दूर करत होता,बिरसा मुंडाच्या या वागण्याला त्यांना भगवान समबोधित केले,बिरसा मुंडानी स्वतंत्र धर्म स्थापन केला आणि आदिवासी धर्मातील प्रत्येकांना प्रचारार्थ काही प्रतिज्ञा दिले खलील प्रमाणे.
१) चोरी करणे,खोटे बोलणे ,हत्या करणे अन्याय आहे.
२) भिक्षा कोणीहि मागू नये.
३)आपला सर्व समाज गरीब आहे,पुरोहित आणि इतरांच्या आज्ञेवर विश्वास ठेवून बळी देणे,पूजा करणे बंध करा.
४) अनेक देवी देवतांची पूजा करू नका
५) भूतप्रेत हडळ पिशाच्च इत्यादिवर विश्वास ठेवू नका.
६) ताडी, हंडीया,महुआ हे सर्व मादक पदार्थ सैतानाचे घर आहे,या मादक प्राशनामुळे बुद्धि जड होते.
७) मुंग्या सारख सतत परिश्रम करत रहा.
८) पशुपक्षा प्रमाणे एकजुटीने जीवन जगणे शिका.
९) सर्वांवर प्रेम करा...
असे उपदेश भगवान बिरसा मुंडा नी आपल्या समाजावर केला,आणि नव्या पर्वला सुरवात केला...आज आदिवासी समाजाला या प्रतिज्ञेची गरज आहे,आजही हा समाज शैक्षणिक प्रवाहापासून वंचित आहे,धर्म,कर्मकांड,गंडा दोरे,भूतप्रेत या थोतांड कथेत आजही हा समाज गुरफटला आहे,आदिवासींना पौराणिक शस्त्राने "राक्षस"ही उपाधी दिली,साधा उद्धहरण रामायणातील 'तडका राक्षस"ही एक आदिवासी.. 
     बिरसा मुंडा आत्ता या आदिवासींचे भगवान झाले,हा अध्यक्रांतिकारक,आदिवासी जननायक आजही आमच्या अस्तिवाची जाणीव करून देतात, आज हा आदिवासी समाज स्मपुष्टात आहे यास एकमेव कारणीभूत असलेले ,हे भगवान बिरसा मुंडा ,आपल्या वयाच्या २५ व्या वर्षी रांचीच्या कारागृहात आपल्या समाजासाठी अखेरचा स्वास घेतला,आम्हाला इतिहास सांगतो बिरसा मुंडाचा पटकी या रोगाणे मृत्यू झाला,मात्र खरे आजही लपतात, भगवान बिरसा मुंडा यांच मृत्यू नव्हे तर हत्या झाली मित्रानो,त्यांचा अस्तित्व संपवू शकले,मात्र त्यांच्या मुळे मिळालेल्या या "उलगुलान"चा अस्तित्व मात्र आजही कायमस्वरूपी ठिकून आहे.
लेखक ;- श्रीपाद नागनाथ राऊतवाड
             मदनूर जि.कामारेड्डी
             मो.९९७००५२८३७

१४/११/२०१७
 ------------------------- -------------------------
आई बाबा निसर्गाची अनमोल भेट...

मुलांनो तुम्ही देशाचे भविष्य आहात. आई बाबांच्या कष्टाचे मोल आहात. आई बाबांचे सुख, शांती, आनंद, कौतूक, आणि स्वप्न सुद्धा तुम्हीच आहात. मुलांनो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची या जगात तुम्हांला स्वकष्टाने सर्व प्राप्त होऊ शकेल, पण आई आणि बाबांच निःस्वार्थ प्रेम कुठेही आणि कितीही मूल्य देऊन तुम्ही प्राप्त करू शकणार नाही.

मुलांनो जगात केवळ आई आणि बाबाच एक असे दैवत आहे ज्यांना अंत:करणातून नेहमी असे वाटत असते की आपली मुलं आपल्या पेक्षा फार यशस्वी झाली पाहिजे. त्यांना जीवनातील सर्व सुखसोयी मिळाल्या पाहिजे, मुलं नेहमी खुश आणि आनंदी राहीली पाहिजे. मुलांना जीवनात यशस्वी करण्यासाठी केवळ आई वडील आपल्या स्वप्नांचा सुखाचा त्याग करतात. वेळप्रसंगी उपाशी राहतात. अनवाणी पायाने आणि स्वतःहा फाटक्या कपड्यात राहून सुद्धा तुम्हांस अगदी राज्या सारखे ठेवतात. तुम्हांला साधी ठोकर जरी लागली तरी त्यांच काळीज लगेच दुःखाने पाझरायला लागतं. कितीतरी रात्र जागून आणि पोटाला चिमटा देऊन ते तुम्हांला स्वतःची जगात एक ओळख घडवायला सुसज्ज करतात. या पृथ्वीतलावर मुलांच सुख पाहून खुश होणारे केवळ आई बाबाच असतात.

म्हणून ही सर्व मुलांची नैतिक जबाबदारी आहे की मोठे होवून आपल्या आई बाबांना फार सुखात ठेवायच. जसे तुम्ही लहान असतांना त्यांनी तुमचा अगदी तळहाताच्या जखमे सारखा सांभाळ केला, अगदी तसाच तुम्ही पण त्यांचा सांभाळ करायचा. त्यांच्या डोळ्यात कधी पण तुमच्या वागण्याने, आचरणाने अश्रू येतील, त्यांना दुःख वाटेल असे कोणतेही कार्य करू नका.

मुलं कितीही मोठी झाली तरी ती आईवडिलांसाठी मरत पर्यंत तान्हं बाळच असते. आई बाबांना देवाचा दर्जा द्या. जी मुलं आई बाबांचा मान सन्मान करतात. त्यांच्या खाण्या पिण्याचा, वस्त्र आणि आरोग्यावर विशेष लक्ष पुरवतात. त्यांना जीवनात काहीच कमी पडत नाही. त्यांच्या जीवनात सुख आणि शांती नित्य वास करीत असते. आणि याउलट जी मुलं जीवनात फार यशस्वी होतात पण आपल्या आई बाबांचा म्हातारपाणात सांभाळ करीत नाही. त्यांना अनाथ आश्रम मध्ये राहण्यास भाग पाडतात अशी मुलं आयुष्यात कधीच सुखी राहू शकत नाही.

आई वडील ही प्रत्येक मुलाला देवाघरुन मिळालेली अनमोल भेट आहे. त्यांचा नीट सांभाळ करणे प्रत्येक पाल्याचे परम कर्तव्य आहे. जी मुलं अंत:करणातून आपल्या आई बाबांवर प्रेम करतात त्यांच्या जीवनात नेहमी सुख, शांती,यश, धन, संपदा, आरोग्य, यांचा वास असतो. आणि त्यांचे आशिर्वाद ढाल बनून नित्य प्रत्येक संकटात त्यांची मदत करीत असते. म्हणूनच म्हणतात ना "मातृ देवो भव: पितृ देवो भव:" आईवडिलांची सेवा हीच खरी ईश्वर भक्ती होय.

सुनील पाटोळे,
169, मानेवाड़ा बेसा रोड,
अलंकार नगर,
नागपुर - 440044
दूरध्वनी क्र.
097760 38850
070777 56627
Email mail :-patolesunil009@gmail.com

१३/११/२०१७
-------------- 
जीवघेणा विनाशकारी धूर

काही दिवसांपूर्वीच प्रदूषणाचे जगभरात किती बळी गेले याची आकडेवारी प्रसिद्ध झाली आहे. भारत आणि चीन या देशांनी त्यात अग्रस्थान पटकावले आहे. इतर प्राणघातक आजारांपेक्षाही प्रदूषण जास्त बळी घेते आहे. वर्षाकाठी 25 हजारांच्या घरात लोकांना प्राणाला मुकावे लागते आहे. त्याच्या कैकपटीने जास्त जणांना श्‍वसनाच्या विकारांनी जखडले आहे. त्यावर तातडीने उपाय होण्याची गरज आहे. चंद्रपूर शहरातील प्रदूषण मागील काही वर्षाच्या तुलनेत घटले असले तरी घुघुस येथील जीवघेणा विनाशकारी धूर जीव घेत आहे .

देशाची राजधानी दिल्ली ही सध्या प्रदूषणाची राजधानी झाली आहे. याबाबत राष्ट्रीय हरित लवादानेही चिंता व्यक्‍त केली आहे. दिल्ली आणि केंद्र सरकारची कठोर भाषेत खरडपट्टी काढताना, हे प्रदूषण रोखण्यासाठी नेमकी काय पावले उचलली गेली, अशी विचारणाही हरित लवादाने केली आहे. काही दिवसांपूर्वी म्हणजे दिवाळीच्या सुमारास सर्वोच्च न्यायालयानेच दिल्लीतील प्रदूषणाबाबत चिंता व्यक्‍त करताना, राजधानी आणि परिसरात फटाके उडविण्यास बंदी घातली होती. त्याचा काय परिणाम झाला? हा मुद्दा राजकीय केला गेला. सर्वोच्च न्यायालयाला खरेतर राजकारणात ओढण्याचे काही कारण नव्हते. मात्र तरीही तसे झाले. सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते म्हणविणाऱ्या काही महाभागांनी तर धमालच केली. त्यांनी न्यायालयाच्या निर्णयाचा निषेध नोंदवताना आपल्याच बुद्धीचे किती दिवाळे वाजले आहे, ते सिद्ध करत, न्यायालयाच्या परिसरात आतषबाजीही केली; आणि फटाक्‍यातले रॉकेटसही सोडले. मात्र प्रत्यक्ष सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची टिंगल करण्यासाठी असा आचरटपणा करावा, असले धाडसी प्रयोग आपल्या देशातच होऊ शकतात. गुरुवारी हरित लवादाने जे फटकारले अथवा तत्पूर्वी न्यायालयाने जो निर्णय दिला, तो केवळ त्यांना अधिकार गाजवायचे होते म्हणून नव्हता, तर तर संपूर्ण दिल्लीकरांच्याच हिताचा होता. प्रचंड धूर आणि धुके यातून जे निर्माण होते, तेथे त्याला आता दिल्लीच्या संदर्भात “धुरके’ (धूर आणि धुके) म्हणू लागले आहेत.

दिल्ली प्रमाणेच घुगघूस, बल्लारपूरतील ही समस्या काही आजची नाही. गेल्या 10-12 वर्षांपासून याचा सामना करावा लागतो आहे. पण आता ही समस्या अक्राळविक्राळ होऊ लागली आहे. परिसरातील उद्योग आणि वाहनांची (“प्रचंड” शब्दही कमी पडावा इतकी) वाढलेली संख्या, अधिकृत आणि अनधिकृत अशी बांधकामे व त्यांच्या कामामुळे उडणारा धुरळा, लगतच्या शेतीप्रधान राज्यातील शेतकऱ्यांकडून जाळला जाणारा कचरा, वाढलेल्या झोपड्या आणि तेथे केले जाणारे जळणकाम, प्रसंग असो अथवा नसो, निमित्त मिळाले की केली जाणारी फटाक्‍यांची आतषबाजी, या सगळ्यांत जे काही निर्माण होत होते, ते सगळे साचत गेले आणि आज तेच मानगुटीवर बसले आहे. शेवटी तुम्ही हवा तर बदलून आणू शकत नाही.

ती फार प्रदूषित होणार नाही, याची खबरदारी मात्र घेतली जाऊ शकते. तसे केले नाही, तर हिवाळ्याच्या काळात धुरक्‍याची समस्या गंभीर रूप धारण करते हे पुन्हा सिद्ध झाले आहे.

भविष्यात आपली दिल्ली होऊ नये, याकरता इतर शहरांनीही हरित लवाद अथवा कोणत्या न्यायालयाच्या आदेशाची वाट न पाहता आपले आपणच सुधारण्याची आवश्‍यकता आहे. पाणी नाकापर्यंत आल्यावरच हातपाय मारण्याची वृत्तीही सोडायला हवी. तज्ज्ञ, शास्त्रज्ञ आणि सरकार यांना एकत्र येऊन काम करावेच लागेल. मात्र त्याहूनही मोठे आणि महत्त्वाचे जर काही असेल तर तो जनसहभाग. तो उत्स्फूर्त असायला हवा. त्याचा “योग दिन’ अथवा “स्वच्छ भारत अभियान’ होऊ नये.
- ११/११/२०१७
---------------------
सत्तेची तीन वर्षे
महाराष्ट्रातील फडणवीस सरकारला मंगळवारी सत्तेत येऊन तीन वर्षे पूर्ण झाली. कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडी सरकारच्या पंधरा वर्षांच्या सत्तेच्या कालखंडाच्या पार्श्‍वभूमीवर भाजप आणि शिवसेनेला ही सत्ता मिळाली असल्याने त्यांच्याकडून लोकांच्या खूप अपेक्षा  होत्या. नेत्यांनी दिलेल्या भरमसाठ आश्‍वासनांमुळेही लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. सुरुवातीची एक-दोन वर्षे हे सरकार नवखे असल्याने त्यांना आणखी काम करण्याची संधी दिली पाहिजे अशा भावनेतून लोकांनी या सरकारला वेळ दिला पण आता सरकारच्या कामाचे नेमके विश्‍लेषण करण्याची वेळ आली आहे. सारासार विचार केला तर या सरकारचे काम फक्‍त जाहीरातीतच दिसते पण प्रत्यक्षात मात्र लोकांपर्यंत फारसे काही पोहोचलेच नाही असाच गेल्या तीन वर्षांचा अनुभव आहे. त्याचे मुख्य कारण सरकारकडे असलेला निधीचा अभाव हे आहे. त्यांची धोरणे, घोषणा ठीक आहेत पण त्याच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीत हे सरकार कमी पडले आहे. पैशाच्या कमतरतेमुळे अनेक कल्याणकारी योजनांना कात्री लावली आहे. आता तर थेट बजेटमध्येच सरकारी खर्चाला तीस टक्‍के कात्री लावावी लागणार असल्याचे मंत्र्यांकडूनच सांगितले जाते. त्यातून लोकांचा मोठा रोष या सरकारला पुढील काळात सहन करावा लागेल. रेशनवरच्या साखर आणि धान्य कपातीपासून सरकारने खर्चाचा हात आखडता घेतला आहे. त्यातच 30 हजार कोटींच्या कर्जमाफीचा बोजा सरकारला उचलावा लागणार आहे. मोठ्या आर्थिक चणचणीला तोंड देत सरकारला हा गाडा हाकावा लागत असतानाही मुख्यमंत्री फडणवीस कौशल्याने ही सारी कसरत सांभाळत आहेत, त्याबद्दल त्यांचे कौतुक करावेच लागेल. त्यांना विरोधकांच्या तिखट माऱ्याबरोबरच सरकारचाच घटकपक्ष असलेल्या शिवसेनेकडूनही टीकेचा भडिमार सहन करावा लागत असल्याने त्यांची बऱ्यापैकी धांदल होताना दिसते.
फडणवीस सरकारला तीन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त राज्यात भाजपच्या वतीने जल्लोष करण्यात येत असून, दुसरीकडे मात्र सत्तेत सहभागी असणाऱ्या शिवसेनेने आनंद व्यक्त करण्याऐवजी सरकारविरोधात आवाज उठवायला सुरुवात केली आहे. सरकारच्या तीन वर्षपूर्तीनिमित्त शिवसेनेने ‘घोटाळेबाज भाजप’ नावाची पुस्तिका  छापली असून, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही  ‘घोटाळेबाज भाजप’ पुस्तिका शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख आणि संपर्कप्रमुखांना दिली आहे.या पुस्तिकेत भाजपच्या घोटाळ्यांची सविस्तर माहिती देण्यात आली असून  विशेष म्हणजे, मंत्र्यांच्या फोटोसहित घोटाळ्यांची माहिती यात आहे. .
 राज्यातील ग्रामीण भागात रस्त्यांची दुर्दशा झाली आहे.पावसाळी हंगाम संपल्यानंतर हे चित्र अधिकच भयानकपणे समोर आले आहे. नवीन महामार्गासाठी 7 लाख कोटी रुपये देत असताना हे राज्यरस्ते मात्र निधीअभावी बिकट अवस्थेत आहेत. महामार्गाचा विकास करताना छोट्या रस्त्यांच्या देखभालीकडेही सरकारने लक्ष दिले असते आणि निधी उपलब्ध करून देण्याचे आदेश राज्य सरकारांना दिले असते तर बरे झाले असते.
दिवाळीचे निमित्त साधून राजधानी दिल्लीत भाजपातर्फे पत्रकारांसाठी “दीपावली मिलन’ असा कार्यक्रम आयोजित केला जातो. त्याला मात्र पंतप्रधान न चुकता हजर राहतात. पण या कार्यक्रमात कोणतीही प्रश्‍नोत्तरे नसतात. उलट पंतप्रधान पत्रकारांसमोर छोटेसे मनोगत व्यक्‍त करतात आणि या मनोगताचेही थेट प्रक्षेपण वृत्तवाहिन्यांवरून केले जाते. पत्रकारांसाठीच्या या कार्यक्रमाचे गेल्या शनिवारी आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मोदींनी पक्षांतर्गत लोकशाहीचे गोडवे गायले. देशातील लोकशाहीच्या भविष्यासाठी पक्षांतर्गत लोकशाही गरजेची आहे, पक्षांतर्गत मतदान आवश्‍यक आहे, असे मोदींनी ठासून सांगितले.
पंतप्रधानांचे हे मत योग्यच आहे. त्याबद्दल वाद असायचे काहीच कारण नाही. पंतप्रधानांनी बोलताना कोणत्याही विशिष्ट पक्षाचे नाव घेतले नसले, तरी त्यांचा सारा रोख नेहमीप्रमाणे कॉंग्रेसवर होता, हे उघड आहे. कॉंग्रेसमधील सर्वच निर्णय नेहमी “हायकमांड’ घेतात, हे नव्याने सांगण्याची गरज नाही, वर्षानुवर्षे सारा देश हे पाहात आला आहे,
उत्साहाने भारतीय युवकांनी नरेंद्र मोदी यांना प्रचंड प्रेम आणि मते दिली; त्या युवकांच्या प्रेमाची जागा सध्या राहुल गांधी यांनी घेतल्याचे जाणवते. वाढत जाणारी बेरोजगारी आणि राहुल गांधींचे वाढत जाणारे प्रगल्भपण तरुणाईला आकर्षित करीत असल्याचे दिसते.
1/11/2017
---------------------

अगर तुम न होते...

राजकीय नेते आणि पत्रकार, म्हणजे एक दुजे के लिये असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. (असून अडचण नसून खोळंबा ही म्हण इथे लागू होत नाही, याची कृपया टीकाकारांनी नोंद घ्यावी.) वृत्तपत्रांना बातम्यांसाठी नेते मंडळी हवी असते. पण त्यांचं कसं आहे की, नेते किेंवा प्रवक्त्यांना कॉल केला, बातमी केली. ती वेब एडिशनला किंवा दुस-या दिवशी वृत्तपत्रात छापून आली विषय संपला.
पण न्यूज चॅनेलचं तसं नाही. न्यूज चॅनेल सकाळी सात वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत अखंड सुरू असतात. (नशीब रात्री १२ नंतर रेकॉर्डेड कार्यक्रम असतात. नाही तर आम्ही नेते आणि प्रवक्त्यांना झोपूही दिलं नसतं.) दिवसभर (काही ना काही) बातम्या दाखवायच्या असतात. आमचा दिवस सकाळी सहा वाजता सुरू होतो. सगळ्यात आधी सामनात काय छापून आलं ते बघायचं. अग्रलेखात सरकारवर टीका. लगेच सात वाजता ब्रेकींग करायची. तिकडे असाईनमेंट डेस्कही कामाला लागतो. आठच्या बुलेटिनला संजय राऊत यांचा फोनो. नेहमीचे प्रश्न, वेगवेगळे प्रश्न. आम्ही काहीही विचारलं तर उत्तरं मात्र राऊत यांना जी हवी आहेत तीच मिळतात. मग लगेच भाजपच्या प्रवक्त्याला फोन. आम्ही सांगतो बघा, बघा तुमच्या सरकारविषयी सामनात काय छापून आलं. लगेच माधव भंडार, मधू चव्हाण गरम आवाजात बोलायला लागतात. आमचा प्रयत्न असतो, राऊत आणि भाजपच्या प्रवक्त्याला भिडवून द्यायचं. पण तोपर्यंत संजय राऊत फोन कट करतात. मग पुढची पाच मिनीटं भाजपचे प्रवक्ते त्यांची खदखद बाहेर काढतात, सरकारला धोका नाही असं ते शेवटी निक्षूण सांगतात. मला तर असं वाटतं, आशिष शेलार, माधव भंडारी सकाळीच सामनावाचून काढत असतील. न्यूज चॅनेलमधून कॉल येण्याच्या आधीच कोणते मुद्दे मांडायचे याची तयारी ते आधीच करत असतील. या विषयावर काँग्रेसच्या नेते मंडळींचा फोनो घ्यायचा असतो. पण काँग्रेसमध्ये या विषयावर बोलणार कोण ? या प्रश्नाचं उत्तर काही मिळत नाही. लगेच राष्ट्रवादीचे नवाब मलिक यांचं नाव समोर येते. चांगले सदगृहस्थ. कधीही फोन करा, फक्त विषय सांगा. धन्यवाद, म्हणेपर्यंत बोलत राहतात. त्यांचं बोलणं होतं, आणि इकडं बुलेटिनही संपतं.
फोनो घेताना काही विषयांमध्ये तज्ज्ञ असे नेते आहेत. दहशतवाद, पाकिस्तान आणि काश्मीर म्हटलं तर संजय राऊत यांच्या शिवाय पर्याय नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे कथित घोटाळे असल्यावर डॉ. नीलम गो-हे (माझं आडनाव गोरे आहे. आमचं आडनाव थोडं सारखं असल्यानं, मी अनेकदा नीलम ताईंच्या फोनोला प्राधान्य देतो. आता म्हणा आडनावात काय आहे ?) दुर्दैवानं महिला अत्याचाराची बातमी आल्यावर डॉ. नीलम गो-हे, चित्रा वाघ, विजया रहाटकर यांची नावं प्राधान्यानं समोर येतात. सनातन, इशरत जहाँ, डेव्हिड हेडलीचा विषय आल्यावर जितेंद्र आव्हाड यांच्याशिवाय बोलणारा हुकुमी एक्का दुसरा कोणीच नसतो. छगन भुजबळांच्या विषयी फोनो घ्यायचा म्हटलं तर किरीट सोमय्यांशिवाय पानही हलत नाही. आता तर अशी परिस्थिती आहे की, आधी सोमय्यांचा फोनो होतो आणि नंतर ईडीची कारवाई होते.
एकनाथ खडसे यांच्याविषयी थोडंही खट्ट झालं की, अंजली दमानिया, प्रिती मेनन-शर्मा, नवाब मलिक दणक्यात फोनो देतात. चिक्की घोटाळ्याच्या वेळी तर किती फोनो घेतले असतील याची गणती नाही. भाजपचेच नेते असाईनमेंटला फोन करून सांगायचे, आमचे फोनो घ्या. त्यांना पंकजा मुंडेंना वाचवायचं होतं की गोत्यात आणायचं होतं, हे त्यांनाच ठाऊक.
पण फोनो देण्यात सर्वात अव्वल दर्जाचे नेते आणि प्रवक्ते भाजपचेच आहेत, यात कोणतीही शंका नाही. सुदैवानं म्हणा किंवा दुर्दैवानं ही मंडळी आता सत्तेत आहे म्हणून. त्यांनी दिलेले फोनो आजही सर्वच चॅनेलमध्ये काम करणा-यांच्या लक्षात आहेत. मला तर असं वाटतं फोनो, लाईव्ह, मुलाखती, 121, बाईट्स देऊन ही मंडळी सत्तेत बसली. देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे, आशिष शेलार, किरीट सोमय्या, माधव भंडारी, मधू चव्हाण, अवधूत वाघ या मंडळींना कधीही फोन केला आणि ते फोनोला नाही म्हटले हे आठवत नाही. आघाडी सरकारच्या विरोधात रान पेटवण्यात या मंडळींनी दिलेले फोनो आणि लाईव्ह महत्त्वाचे होते. लाईव्हसाठी तर ही मंडळी कुठूनही धावतपळत ऑफिसला पळत यायची. आता मात्र ओबीशिवाय ही मंडळी लाईव्हला बसत नाहीत.
हे असं आमचं नातं आहे. अगर तुम न होते, खरंच नेते मंडळी आणि प्रवक्ते मंडळी अगर तुम न होते तो हमारे बुलेटिन न निकलते. आणि हो एक महत्त्वाचं सांगायचं राहिलं, स्टुडिओत ऑनएअर एकमेकांवर जोरजोरात आरोप-प्रत्यारोप करणारे, ओरडणारे हे नेते आणि प्रवक्ते टॉक शो संपल्यावर हसत-हसत एकमेकांच्या गळ्यात हात घालून बाहेर पडतात. कधीकधी तर एकाच गाडीतूनही जातात. त्या दिवसाचा टॉक शो संपतो. रात्रीनंतर पुन्हा सकाळ होते. काही तरी घडतं, आणि पुन्हा सुरू होतात...फोनो...फोनो...फोनो...लाईव्ह...लाईव्ह...लाईव्ह.

संतोष गोरे,
tv9 मराठी,
मुंबई.
9819056040

 ---------------------

"महाविद्यालयीन शैक्षणिक सहल -एक अविस्मरणीय क्षण...!"


लेखक :- श्रीपाद नागनाथ राऊतवाड
                मो.९९७००५२८३७
                मदनूर जि. कामारेड्डी

     महाविद्यालय,प्रत्येकाच्या शैक्षणिक वाटचालीत,मध्यंतरीच्या आयुष्यात मिळणारे हे अध्यापनाचे मंदिर म्हणा किंव्हा भविष्याच्या वाटचालीचा आराखडा निर्माण करणारा मंच,महाविद्यालय जिवन म्हणजे तरंगत्या तारुण्याची तृप्ती,जणू काही शैक्षणिक वाटचाली बरोबर स्वतःच्या अस्तित्वाचाही वाटचाल निर्माण होणारे दिवस,तुम्ही अनुभवलात ना हे दिवस,तर चला माझ्याही आयुष्यातील महाविद्यालयीन जीवन ,त्यात मौजमजा आणि मस्तीत निघालेल्या ट्रिप ची काहाणि...

    मी तंत्रनिकेत महाविद्यालयातील स्थापत्य अभियांत्रिकी या शाखेत शिक्षण घेत आहे, तंत्रज्ञानाचा वसा पेलणाऱ्या वैज्ञानिकतेच्या दूरदृष्टीने मिळणाऱ्या सर्व गोष्टीचा अभ्यास करणे म्हणजे शिक्षणा वैतरिक्त काहीतरी अस म्हणायला काही वावग ठरणार नाही,आणि असच असत खरे शिक्षण, पुस्तकी ज्ञाना पलीकडचे शिक्षण घेणे म्हणजेच मानवी जीवनात वेचत जाणारे आपलं आयुष्य,नवनव्या गोष्टींची नियमित मिळणारे ज्ञान त्याच बरोबर समाजात चालत असलेले सर्व घडामोडी या वर कठोरतेने लक्षकेंद्रित करून आपल्या आयुष्याला आपण सुंदर बनवण्याचा प्रयत्न करत असतोच,महाविद्यालयात शैक्षणिक सत्राच्या मध्यंतरीत विद्यार्थ्यांना पुस्तकी असलेल्या सैद्धांतीक अभ्यासक्रमाच प्रत्यक्षात कसे असेल,या गोष्टीचा अभ्यास करण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना एक सहलच्या स्वरूपात एखाद्या औद्योगिक क्षेत्राला भेट दिले जाते,अगदी या प्रमाणे माझ्याही महाविद्यालयात औद्योगिक क्षेत्राला भेट देण्यासाठी माझ्या स्थापत्य अभियांत्रिकेच्या शाखेची छोटीशी सहल आयोजन करण्यात आले,दैनंदिन चालू असलेल्या महाविद्यालय ते घर हा पारंपारिक दिनचक्र एका दिवसासाठी आमूलाग्र पणे बदल होत असल्याने आम्हा विद्यार्थ्यांच्या मनात एका प्रकारचे उत्सवच निर्माण झालं,सर्व मित्र परिवाराच्या सानिध्यात कुठे तरी फिरायला जावं अस स्वप्नात रेंगाळत बसणारे सर्व मित्र परिवार अत्ता आनंदाने बहरून गेले.

    आमची सहल सकाळी ७ वाजता महाविद्यालयातुन रवाना झाली,सर्व विद्यार्थी महाविद्यालयीन गणवेशात गळ्यात ओळखपत्र परिधान करून झक्कास वातावरणात, गुरुवर्य प्राचार्य शाखा प्रमुख प्रा.व्ही.पी.पवार सर,एम.पी.पवार सर व प्रा.अभिजित माळी सर यांच्या समवेत आम्ही फारसे काही नाही तरी एक २०-२५ विद्यार्थी निघालोत, इथे एक विशेष आवर्जून सांगावेसे वाटते माझे गुरुवर्य म्हणजे आमचे शाखेचे प्राध्यापक वर्ग म्हणजे सरळ राहणीमान उच्च विचारसरणी या सर्वांगाने नटलेली टीम ,आम्हा विद्यार्थ्यांना नेमके कमतरता कुठे भासते,आमच्या प्रत्येक प्रश्नाचे निरसण व्हवी यासाठी सदैव धडपडनारी आमचे प्राध्यापक मंडळीं आम्हाला लाभले हे विशेष,यांच्या मार्गदर्शनाखाली,यांच्या छायेखाली वाढणारी आम्ही विद्यार्थी एक नवा गंध घेऊन उत्साहात व उल्लासात निघालोत लातूर च्या जलशुद्धीकरण व व्यवस्थापनाच्या औद्योगिक क्षेत्राला भेट देण्याकरिता,वाहनात आम्ही विद्यार्थी आणि प्राध्यापक दिलखुलास गप्पा रमल्या,शैक्षणिक विषयांवर अनेक सामाजिक व अन्य माहिती या वर गप्पा टप्पा म्हणजे मनोरंजनातून निघालेली ही मनोरंजनात्मक सहल,लातूर च्या जलशुद्धीकरण व व्यवस्थापनाच्या औद्योगिक क्षेत्राच्या लगत पोहचताच आमचे प्राध्यापक मंडळींनी आम्हाला अगोदर आत असलेल्या गोष्टीची माहिती दिली,शिस्तबद्ध पध्दतीने आम्ही त्या क्षेत्राची विविध अंग पाहत होतो,प्रा. पवार व प्रा. माळी सर प्रत्येक घटकांची माहिती व क्रिया पटवून देत अनेक शंकाचे निरसन केले,तसा औद्योगिक परिसर खूप मोठा असल्याने आम्हाला बराच वेळ तिथे पाहण्यास व समजावून घेण्यास लागले,शैक्षणिक सत्राच्या सुरवातीला आमच्या हातात पुस्तके आलेत,मात्र  ते सैद्धांतीक अभ्यासक्रम असल्याने कल्पनात्मक गोष्टीं असल्याने पालत्या घागरीवरील पाणी अशी आमची गत होती मात्र,तेच प्रत्यक्षात पाहिल्यास त्याचे क्रियाशील प्रकारे अनुभवल्यास नक्कीच आम्हाला सर्वांगीण गोष्टींचा अभ्यास इथे शिकायला मिळाले.

    यानंतर सर्व प्राध्यापक मंडळी व आम्ही जेवणासाठी एका हॉटेलमध्ये बसलोत,रुचकर जेवणाचा आस्वाद घेऊन लातूरच्या परिसरातील निसर्गरम्य परिसरात वसलेली सुप्रसिद्ध असलेल्या संजिवनी बेटावर  निसर्गाच्या सानिध्यात फुले, पक्षी,वनस्पतीने नटलेल हे गडकोट जणू ,"वृक्षवल्ली आम्हा सोयरे,वनचरे" असे म्हणणाऱ्या संत तुकारामाचे अभंग आठवले,उंच टेकडीवर पवनपुत्र हनुमान मंदिर वसले आहे,अनेक भाविकांची गर्दी उसळलेली असते,मृगनक्षत्राच्या या पावसाळी वातावरणात निसर्गाने हिरवीगार शालू पौरावून जणू काही सौन्दऱ्यांचं रूप धारण करून,आम्हाला निसर्गाचे महत्व पठवून देत आहे,आमच्या समवेत भूगोलचे प्रा.पांचाळ सर होते त्यांनीही निसर्गाचे अनेक वनस्पतींचे महत्व पाठवून दिले,अश्या निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या संजीवनी बेटांवर तणाव मुक्त वातावरणात एक वेगळाच अनुभव घेऊन परतलोत,रस्त्यातच आमच्या शाखा प्रमुख श्री.प्रा.व्ही.पी.पवार सर यांच्या गावी गेलोत,चोहीकडे निसर्गरम्य वातावरणात वसलेलं छोटस गाव,मस्त छानस छोट कुटुंब,सरांचे वडील राजकारणी आणि शासकीय कामाचे काँट्रॅक्टर,बराच वेळ त्यांच्याशी राजकीय व अन्य विषयांवर चर्चा करून चहा नाष्ठा चा आस्वाद घेऊन निघालोत परतीच्या मार्गी...
    गाण्यांच्या भेंड्यानी भावरून गेलेल्या आमच्या वाहनात प्राध्यापकांचा एक मंच तर विद्यार्थ्यांचा दुसरा,अश्या आमच्या बेसूर गळ्यातून निघालेल्या गीतांना सरांच्या सुरांनी सावरून,मौज मस्तीत सायंकाळी उशिरा पर्यंत हा प्रवास चालला, बघता बघता कधी वेळ निघून गेला काही समजले नाही, आणि पक्षांची शाळा सुटल्या नंतर एक फांदीवरून दूर होतात तसेच आम्ही सर्व घरी परतलोत  ,मस्ती मजेत शैक्षणिक सहलीचा हा अनुभव मात्र कधी विसरू शकत नाही,नियमित चालणाऱ्या दिनचक्रात काही बदल झाल्यास जणू मानवी जीवनातील तो क्षण अविस्मरणीयच असेल तसाच माझ्याही जिवनातील हा क्षण अविस्मरणीय असेल....!

 

----------------------------------------

वास्तुशास्त्र सर्वांचीच गरज 

वास्तुशास्त्राचा जेव्हा ही उल्लेख होतो तेव्हा आपल्याला लोकांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रीया बघावयास मिळतात. काही लोकांना वास्तुशास्त्रावर विश्वास असतो तर काहीजण पूर्णपणे वास्तुशास्त्राच्या विरोधात असतात. असो व्यक्ती स्वातंत्र्यामुळे कोणालाही काय वाटते ते तो व्यक्त करतो. मला दुःख याच गोष्टीच वाटते की बर्‍याच वेळा वास्तुशास्त्राबद्दल काडीमात्र माहिती ज्ञान नसतानाही काहीजण विरोध करत असतात. मी स्वतः एक विज्ञान शाखेतील पदवीधर आहे. मी स्वतःही आधी वास्तुशास्त्राबद्दल पूर्ण ज्ञान, त्यामागील वैज्ञानिक आधार व इतर सर्व गोष्टी बघितल्या व त्यानंतरच वास्तुशास्त्र तज्ञ म्हणून काम सुरू केल. मला मनापासून वाटत की वास्तुशास्त्राची खरी माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत जावी व वास्तुशास्त्राच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांनी सुखी, समाधानी व्हावे म्हणून माझा हा लिखाणप्रपंच आहे.

आपल्याला प्रत्येकालाच रहाण्यासाठी, काम करण्यासाठी (कार्यालय )आदी सर्वच गोष्टींसाठी एखाद्या पक्क्या व बंदिस्त जागेची गरज असते तीलाच आपण घर, ऑफिस इत्यादी विविध नावाने संबोधतो. ह्या सर्वच प्रकारांना आपण वास्तु म्हणु शकतो. आपल्या ऋषी मुनींनी हजारो वर्षांपूर्वी या वास्तुच्या बांधणी, अंतर्गत रचना आदींविषयी सखोल अभ्यास केला आहे. याच शास्त्राला आपण वास्तुशास्त्र असे म्हणतो. वास्तुशास्त्र पूर्णपणे शास्त्रीय आधारांवर आधारित आहे. सुर्याची किरणे, पृथ्वीचे सूर्याभोवतीचे फिरणे, स्वतःभोवती फिरणे, उत्तर ध्रुव, दक्षिण ध्रुव, पृथ्वीचा आस व तसेच पंचतत्व ( जल,अग्नी, पृथ्वी, वायु व अवकाश ) आदींवर वास्तुशास्त्राचे सर्व सिद्धांत आधारीत आहेत. जगातील प्रत्येक सजीव वा निर्जीव गोष्ट ही पंचतत्वांनीच बनलेली आहे. मानवाच्या सुखी जीवनासाठी या पंचतत्वांचा समतोल खुप महत्वाचा आहे . उदा. जर आपल्या शरीरात अग्नीतत्व वाढले तर त्याला आपण अॅसिडीटी म्हणतो .अगदी तसेच. ह्या पंचतत्वांना घरात (वास्तुत) त्यांच्या योग्यस्थानी स्थापून व योग्य अश्या अंतर्गत रचनेने वास्तु बांधली तर ती त्यात राहणाऱ्या लोकांना अधिक सुखी समाधानी व निरोगी ठेवते. नैसर्गिक शक्तींचा योग्य वापर करून मानवी जीवन अधिक सुखकर, निरोगी करणे हाच खरा वास्तुशास्त्राचा मुख्य उद्देश आहे. तुम्हाला माहितीसाठी फक्त एक दोन उदाहरणे देतो.
1) वास्तुशास्त्रानुसार मुख्य दरवाजा पूर्व किंवा उत्तर या दिशांना सांगितला जातो. याचे कारण हेच आहे की जर घराचा मुख्य दरवाजा उत्तर पूर्व दिशेत असेल तर घरात सकाळची कोवळी सुर्यकिरणे घरात येऊ शकतात. सकाळच्या सुर्यकिरणांमध्ये जास्तीत जास्त अतिनील (Ultraviolet ) किरणे असतात .ही किरणे उत्तम आरोग्याच्या दृष्टीने खुप उपयोगी असतात. त्यांच्यामुळे शरीरात Vitamin D ची निर्मिती होते तसेच ही किरणे घराचे निर्जंतुकीकरण ही उत्तमप्रकारे करतात. सध्या वाॅटर प्युरिफायर मध्ये ही हीच UV किरणे वापरली जातात.
2) वास्तुशास्त्रानुसार जलतत्वाचे स्थान उत्तर ते पूर्व आहे. या तत्वामागे ही हेच कारण आहे जेणेकरून स्वच्छ व आरोग्यास उपयोगी पाणी सर्वांना मिळावे हाच मुख्य उद्देश या मागे आहे. तसेच जेव्हा सुर्यांची सकाळची किरणे जेव्हा पाण्यावरून परावर्तित होतात तेव्हा ते मेंदूतील पेशींना अधिक पोषक तत्त्वांची निर्मिती करतात.
वास्तुशास्त्राच्या प्रत्येक नियमामागे असाच शास्त्रीय आधार आहे. वास्तुशास्त्राचे अजून एक महत्त्व असे की वास्तुशास्त्रात संपूर्ण कुटुंबाचा विचार केला गेला आहे. म्हणजे त्या वास्तुत राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला त्याच्या अवश्यकतेनुसार वास्तुशास्त्र मदत करत . जसे कुटुंबप्रमुखास स्थैर्य, गृहिणींना उत्तम शारीरिक व मानसिक आरोग्य, वयस्कर लोकांना उत्तम स्वास्थ्य व मानसिक शांती तसेच मुलांना शैक्षणिक प्रगतीत उत्तम यश इत्यादी. खर सांगायच तर तुम्हीच विचार करून बघा जसजशी बैठ्या घरांच्याऐवजी बहुमजली इमारती वाढु लागल्या तसतश्या समाजात विविधप्रकारच्या समस्याही वाढतच जात आहेत. आजही बहुतेक गावातील माणसे ही शहरी माणसांच्या मानाने अधिक निरोगी व समाधानी असतात. शहरीकरणाच्या नादात आपण खरच खुप वाहत चाललो आहोत. वास्तुशास्त्रानुसार घरात शौचालय नसावे पण आज सर्वांत पहीले घरात शौचालयाचीच चौकशी अधिक असते. म्हणजेच आज आपण स्वतःहूनच .याचेच दुष्परिणाम आपण सारेच बघत आहोत नात्यांमधील दुरावे, घरगुती कलह, मानसिक तक्रारी आदींचे प्रमाण समाजात झपाट्याने वाढतच आहे. म्हणूनच मी म्हणतो की वास्तुशास्त्र ही खरच सध्या सर्वांचीच गरज आहे.


वास्तुशास्त्राचा विरोध करणारे जसे आहेत तसेच त्याच्यावर विश्वास ठेवणारे ही बरेच लोक आहेत. या विश्वास ठेवणाऱ्यांना एकच विनंती आहे वास्तुशास्त्रावर विश्वास ठेवा पण बिल्डरवर नका कारण आज तुमच्या सारख्या लोकांना आकर्षित करण्यासाठी अनेक बिल्डर असे सांगतात की त्यांनी वास्तुशास्त्रानुसार बिल्डिंग किंवा प्रकल्प बांधला आहे. ते त्यांच्या परीने बरोबर असतात पण पुर्णपणे नाही कारण त्यांनी प्रकल्प बांधताना वास्तुशास्त्रानुसार एका ठराविक दिशेतुन बांधकामाची सुरवात केली असते परंतु त्यांनी प्रत्येक फ्लॅट वास्तुशास्त्रानुसार बांधले नसते. खरतर कोणालाच ते शक्य ही नसते व परवडणारे ही नसते. त्यामुळे ते जास्तीत जास्त फ्लॅट्स ( घरं ) बांधण्यावरच भर देतात. त्यामुळे सध्या बरीच वास्तुदोषयुक्त घरांची निर्मिती होत आहे. म्हणून जरी तुमचा वास्तुशास्त्रावर विश्वास असला तरी वास्तु खरेदी करण्यापूर्वी योग्य वास्तुशास्त्रतज्ञाचे जरूर मार्गदर्शन घ्या जेणेकरून तुमची फसवणूक होणार नाही. माझे बरेचशे ग्राहक आजही काही नवीन वास्तु किंवा जमीन घेण्यापूर्वी मला दाखवूनच पुढे निर्णय घेतात. त्यातील काही डॉक्टर्सदेखिल आहेत. पण त्यांना याबद्दल कमीपणा वाटत नाही कारण त्यांनी वास्तुशास्त्राबद्दलचे चांगले अनुभव स्वतः घेतले आहेत. माझ्या परीने मी तुम्हाला वास्तुशास्त्राबद्दल माहिती देण्याचा एक प्रयत्न केला आहे. तुम्हाला आवडला असावा हीच आशा आहे. तरी आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा. तुमच्या प्रतिक्रियांचे नेहमीच स्वागत आहे.

लेखक
श्री. सचिन अं. बागुल (वास्तुशास्त्रतज्ञ )
मोबाईल - 9820115846
Email - sachinbagulkyn@yahoo.co.in

------------------------------------------- हाजीची हजेरी अन पोलिसांची उचलबांगडी
घुग्घूस येथील कुख्यात गुंड हाजी सरवर याच्या अटकेनंतर पोलिसांची उचलबांगडी झाल्याने आजवरच्या चोर - पोलिस खेळातील तथ्य समोर येवू लागले आहे. मात्र या अटकेनंतर पोलीस खात्यातील भ्रष्ट अधिकाऱ्यांचा काळा चेहरा मात्र समोर आला आहे. अटकेनंतर आपल्या यंत्रणेतील काही पोलीस अधिकारी आणि शिपायांबद्दलचा खळबळजनक खुलासा पोलीस अधिक्षकांच्या हाती लागला आहे.

हाजी तीन गुन्ह्यांमध्ये फरार होता. घुग्घुसमध्ये सैयद इस्त्राईलच्या वाहनावर ३ मे २०१४ मध्ये त्याने गोळीबार केला होता. त्यानंतर अक्षय येरूळकर याचे अपहरण करून मारहाण करण्याचा गुन्हाही त्याच्यावर आहे. या सोबतच खंडणीचेही गुन्हे त्याच्यावर आहेत.

कोळसा तस्करीच्या याच शीतयुध्दाची परिणती गॅंगवॉरमध्ये झाली होती. शेख हाजी सरवर याने राष्ट्रवादीचे चंद्रपूर शहर अध्यक्ष तिरुपती पॉल यांची भरदिवसा मुख्य रस्त्यावर तलवारीने हत्या केली. याचे पडसाद कोळसा तस्करीच्या व्यवसायावर पडले.

घुग्घूस येथील कोळसा व्यापारी टुल्लू उर्फ शागीर मुखत्यार अहमद याचा सोमवार (८ डिसेंबर)ला सकाळी ७ वाजताच्या सुमारास नागपूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही वार्ता घुग्घूस येथे पोहचताच ५० ते ६० युवकांनी व्यापाºयांना धमकावून बळजबरीने घुग्घूस बंद करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे परिसरात काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.घुग्घूस येथील कोळसा व्यापारी टुल्लू उर्फ शागीर अहमद मुखत्यार याच्यावर नागपूर येथे गोळीबार करण्यात आला. यात तो गंभीर जखमी झाल्याने त्याच्यावर नागपूर येथे उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्याचा सोमवारी मृत्यू झाला. ही वार्ता घुग्घूस येथे पसरताच ५० ते ६० युवक दुचाकीने बाजार परिसरात पोहचले व त्यांनी व्यापाºयांना धमकावून दुकाने बंद करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबतची माहिती घुग्घूस पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच पोलिस दंगा नियंत्रण पथकासह दाखल झाले. पोलिसांच्या मध्यस्थीमुळे तणाव शांत झाला. या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. टुल्लू मुखत्यार याच्यावर हत्येचा प्रयत्न करणे, धमकाविणे, खंडणी वसूल करणे असे १४ गंभीर स्वरुपाचे गुन्हे घुग्घूस पोलिस ठाण्यात दाखल होते. त्याला तडीपारही करण्यात आले होते. तो काही दिवसांपूर्वी घुग्घूस सोडून नागपूरला वास्तव्यास गेला होता. तिथे त्याच्याच वाहनामध्ये बसलेल्या युवकाने त्याच्यावर गोळी झाडली. कुख्यात गुंड हाजी शेख सरवर याच्यासोबत टुल्लूने घुग्घूस येथे कोळशाचा व्यापार सुरू केला होता. शेख सरवरशी खटकल्यामुळे त्याने स्वत:च हा व्यवसाय सुरू केला व नागपूर येथे राहायला गेला होता. 

विविध गुन्ह्यांचे आरोप शिरावर घेऊन पोलिसांना गुंगारा देत गेल्या अनेक महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणारा कुख्यात हाजी सरवर अखेर पोलिसांच्या तावडीत सापडला. एलसीबीचे पोलीस निरीक्षक प्रभाकर टिक्कस यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. राजीव जैन यांच्या कानावर ही बाब टाकली. त्यांनी या मोहिमेत कुणालाही सहभागी न करता केवळ स्थानिक गुन्हे शाखेवर ही कामगिरी सोपविली. या शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश तुंकलवार यांच्यासह निवडक शिपायांना घेऊन सापळा रचला. हाजीला नकोडा परिसरातून अलगदपणे पकडण्यात यश आले. अटकेनंतर त्याला जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या समोर हजर करण्यात आले. त्याच्याकडून घेतलेल्या कबुलीजबाबात मात्र खबळजनक माहिती पुढे आली. आपल्या विरूद्ध सुरू असलेल्या पोलिसाच्या प्रत्येक हालचालीची माहिती आपणास काही पोलीसच पुरवत असल्याचा खळबळजनक खुलासा त्याने अधीक्षकांसमक्ष केला. यामुळे पोलीस विभागात एकच खळबळ उडाली आहे.
मध्यंतरी नकोड्यात स्थानिक गुन्हे शाखेने त्याच्या अटकेसाठी फिल्डींग लावली होती. मात्र पोलीस खात्यातीलच काही मुखबीरांनी त्याला माहिती दिली. त्यातून तो पळून जाण्यात यशस्वी झाला. हाजीच्या अटकेनंतर त्याने स्वत: जिल्हा पोलीस अधिक्षकांपुढे दिलेल्या बयाणातून हे सत्य उजेडात आले. त्याची दखल घेत त्याच दिवशी पोलीस अधिक्षकांनी संबंधित पोलीस अधिकारी व अन्य पोलीस कर्मचार्‍यांची तातडीने उचलबांगडी केली.
चंद्रपूर जिल्ह्यासह नागपूर परिसरातही गुन्हेगारीचे साम्राज्य उभे करणारा हाजी पोलिसांच्या हाती लागल्याने अनेक गंभीर गुन्ह्यांच्या तपासाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. गुन्हेगारी विश्‍वात अत्यंत सराईत म्हणून ओळख असलेल्या हाजीला परजिल्ह्यातील अन्य गुंडांच्या टोळ्यांशी वैर होते. घुग्घूस परिसरात कोळशाच्या तस्करीत त्याने चांगलाच जम बसविला होता. या व्यावसायिक स्पर्धेतून त्याचे अन्य गुन्हेगारी टोळ्यांशी नेहमीच वाद होत असत. यादरम्यान, हाजीचा अनेक गंभीर गुन्ह्यात सहभाग असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले होते. त्यामुळे पोलिसही हाजीच्या मागावर होते. पोलिसांचा वाढता दबाव आणि गुंडाच्या अन्य टोळ्यांकडून त्याला भीती होती.

भाडय़ाचे गुंड पोसून कोळसा तस्करीचा हा व्यापार सुरू झाला. त्याला पोलीस दलाची मदतही मिळाली. त्यामुळेच चंद्रपूर जिल्ह्य़ातील कोळसा खाणींचा परिसर तस्करी आणि गुंडांच्या दहशतीने काळवंडला आहे. त्याला स्थानिक कोळसा व्यापाऱ्यांचीही साथ मिळाली.
-------------------------------------------------------
राजकीय जाहिरातबाजी अन् विडंबन

बोलबच्चन@- देवनाथ गंडाटे
दि.  23 एप्रिल २०१४
लोकसभा निवडणुकीत सरकार स्थापन करण्यासाठी विविध पक्षांनी गेल्या दोन महिन्यांपासून जाहिरातबाजी सुरू केली आहे. सध्या टिव्ही चॅनेलवर या जाहिरातींचा भडीमार सुरू आहे. त्या बारकाईने ऐकल्या तर हसू येतं आणि याच जाहिरातींचे विडंबन करून व्हॉट्सअ‍ॅप आणि फ़ेसबुकच्या माध्यमातून केलेली मस्करी वाचून पोट धरून हसू येते.
जाहिरातबाजीत भाजप आघाडीवर आहे. अब की बार, मोदी सरकार ही जाहिरात अशिक्षित महिलांपासून लहान बालकांच्या तोंडपाठ झाली. कधी कधी गंमत म्हणून घर असो वा ऑफ़िस अब की बार,....ची डॉयलॉग तोंडातून सहज बाहेर पडते. त्याचे कारणही तसेच आहे. वारंवार कानावर पडणा-या या जाहिरातीमुळे हॅमरिंग होत असते आणि सुचले नाही की तेच वा्क्य  डॉयलॉग म्हणून तोंडातून निघत आहे. भाजपने आणखी एक जाहीरात सुरू केलीय. ती म्हण्जे  हम मोदीजीको लाने वाले है……।
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धोरणांविषयक जाहिरातीमुळे चांगलाच कहर केलाय. जसे माझी मुलगी अधिकारी झाली. ती पवार साहेबांच्या महिला धोरणामुळे. म्हणून माझं मत………. राष्ट्रवादीच्या या जाहिरातींचे विडंबन केले जात आहे. आमच्या शेजारी मुलगी झाली....ती पवार साहेबांच्या धोरणामुळे…. नेहमी खरे बोलावे, खोटे बोलू नये....नाहीतर तोंडाचा कँन्सर होतो, अशा प्रकारची पोस्ट महाराष्ट्राभरात व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुकच्या माध्यमातून भटकंती करीत आहे. आता सन्नी लिओनच्या नावाने सुरू झालेल्या पोस्टमुळे तरुणांचा चांगलाच टाईमपास होतोय. मी बॉलिवूडमध्ये आली ती, पवार साहेबांच्या महिला धोरणामुळे….काँग्रेसनेही  विविध प्रकारच्या जाहिराती सुरू केल्या आहेत. त्यात प्रामुख्याने राहूल गांधीना दाखवून मै नही, हम... हर हाथ शक्ती, हर हाथ तरक्की अशी जाहिरात सुरू आहे. त्याचे तुम नही हम.....हर हर शक्ती, काँग्रेससे करो मुक्ती असे विडंबन केले आहे. शिवाय किशोरवयीन मुलांच्या तोंडून काँग्रेसच्या गुणगान गाणा-या जाहिराती सुरू आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राज ठाकरे आणि रेल्वे दाखवून मराठी खासदारांची गरज कशी आहे, हे पटवून देत आहेत. शिवसेनेने चला दिल्ली  जिंकुया , भगवा झेंडा फ डकवूया, अशी जाहिरात सुरू केली आहे.
सोशल मिडियावर प्रारंभी आम आदमी पक्षाचा बोलबाला होता. निकलो बाहर मकानोसे, जंग लढो बेईमानोसे, इस बार चलेगा झाडू अशी जाहिरात करण्यात आली. उत्तरप्रदेशात समाजवादी पक्षाने केलेल्या जाहीरातीत मने के है मुलायम, और इरादे लोहा है...... बहुजन समाज पक्ष, तृणमूल काँग्रेस, द्रमुक या पक्षांनी आपापल्या प्रांतात पोस्टरबाजी केली आहे. गेल्याच आठवड्यात समाजवादी पक्षाचे मुलायमसिंग यादव आणि अबू आझमी यांच्या बेताल वक्तव्याचा सोशल मीडियावरून चांगलाच समाचार घेण्यात आला होता. काही विडंबनकारांनी त्या संधीचा पुरेपूर फायदा घेत यादव आणि आझमींवर काव्यपंक्ती तयार करून व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्त्यांची हौस पुरविली.
एकूणच या जाहिराती मतदारांना प्रभावित करण्यासाठी आहेत. याशिवाय आता लिखित आणि व्यंगचित्रांच्या माध्यामातून फेसबुक, ट्वीटर आणि व्हॉट्सअ‍ॅपवर चांगलाच भडीमार सुरू झालाय. त्याचा प्रभाव मतदारांवर किती पडेल, हे १६ मे रोजी दिसून येईल आणि विडंबनकारांना चविष्ट लिखाणसुद्धा करता येईल.

------------------------
नोट नाही घेणार
पण, नोटा देणार
दि.  १ १ एप्रिल २०१४
उमेदवार पसंत नसेल, तर नोटाचा वापर करा, असा एक संदेश व्हॅट्सवरच्या
ग्रुपमध्ये आला आणि लगेच एका खेड्यातील एका तरुणाने त्यावर आपली कॉमेन्ट्स टाकली. अहो काय सांगता? नोटा घेऊन मतदान करणार नाही आम्ही. ते वाचून त्याच ग्रुपमधील अनेक फेरन्ड्सला हसू आले. इतक्यात एकाने "नया है वह"ची पोस्ट टाकली. नोटा घेऊन मतदान करणार नाही, ही त्याची कॉमेन्ट्स प्रामाणिक आणि जागृत मतदार म्हणून योग्य होती. पण, यातील नोटाचा अर्थ त्याला कळला नव्हता. म्हणून त्याची थोडी गोची झाली. यंदा लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच नोटाचा प्रयोग होणार आहे. यावेळी ईव्हीएममध्ये नन ऑफ द अबाऊ म्हणजेच नोटाचा पर्याय दिला आहे. जर मतदारांना कोणत्याही उमेदवाराला मतदान करायचे नसेल तर नोटाचा पर्याय त्यांच्यासाठी उपलब्ध राहणार आहे. एखाद्या मतदाराला नोटाचा उपयोग करायचा असेल तर एक फॉर्म भरुन द्यावा लागत असे; परंतु आता लोकसभा निवडणुकीत असा फॉर्म भरून देण्याची गरज भासणार नाही. 

लोकसभेचा गाजावाजा मोठा
साराच उमेदवारवर्ग खोटा 
मतदार राजा, तु नाही छोटा
पसंत नसेल, तर दाब नोटा 

या नोटाचा प्रचार काही सामाजिक
संस्था करीत आहेत. विदर्भात
वेगळ्या राज्याच्या मागणीला समर्थन न देणा-या उमेदवारांना पराभूत करा आणि नोटाची बटन दाबा असा प्रचार स्वाभिमानी विदर्भ संघटनेने सुरू
केला आहे. विदर्भ जनता पक्ष यांनी जोरदार मोहिम सुरू केली आहे. ठाणे मुंबई सीमेवरील कोपरी मुलुंड परिसरातले जवळपास २०,००० नागरिकांनी डंपिंग ग्राऊंडच्या मुद्द्यावर या निवडणुकीत नोटाचा पर्याय स्वीकारणार आहेत.
रत्नागिरी लोकसभा क्षेत्रातही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नोटाचा वापर करण्याचा आवाहन केले आहे.
उमेदवार पसंत नाही, असे सांगण्यासाठी पूर्ण फार्म भरून देण्याची पद्धत होती. मात्र, अनेक मतदारांना त्याची माहिती नव्हती. आता व्होटींग मशीनवर नोटाची बटn आल्याने आपला हक्क बजावता येणार आहे. निवडणूक कोणतीही असो. प्रचार, आश्वासने आणि मतदानाच्या दिवशी पैशाचा भडीमार चालतो. अमाप पैसा खर्च करून लोकप्रतिनिधी होण्याचे स्वप्न राजकारणात उतरलेल्या पुढा-यांचे असते. जनतेची सेवा करण्यासाठी अमाप पैसे खर्च करण्याची गरज आहे का?
मग, हे निवडून येणारे लोकप्रतिनिधी खरोखर विकासकामे करतील काय, याची कोणतीही शाश्वती राहिलेली नाही. म्हणूनच उशिरा का होईना, स्वातंत्र्यांच्या इत्नया वर्षानंतर परिवर्तनाची एक लाट देशात येवू पाहत आहे. मात्र, त्या लाटेला मनोटांफचा वापर करून परतवून ावण्याचे काम गर्भश्रीमंत राजकारणी करू पाहत आहेत. देशात सर्वात जास्त सत्ता काँग्रेसने भोगली. मात्र, नागरिकांच्या अपेक्षा आणि देशाची आर्थिक स्थिती सुधारण्यात पाहिजे तसे यश आले नाही. दुसरीकडे काँग्रेसची सत्ता उलथून लावण्यासाठी अनेक पक्ष तयार झाले. देशात राष्ट्रीय, प्रादेशिक आणि स्थानिक असे हजारो पक्ष स्थापन झालेत. एक ना धड भाराभर chiध्या झाल्या. एकाही पक्षाला देश सुधारण्यात यश आले नाही. आता अरvद केजरीवाल देश सुधारण्यासाठी निघालाय. पण, कोणतेही नियोजन नाही. केवळ भ्रष्टाचार...भ्रष्टाचाराविरुद्ध ओरडून देशाचा विकास करण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण, ज्यांना एकावरही विश्वास नाही, अशांना नोटाची बटन दाबण्याची ही संधी आहे. विदर्भ जनता पक्ष आणि विदर्भ राज्य हलबा सेना यांना संपूर्ण नागपूर मध्ये वं इतर जिल्ह्यात चांगला प्रतिसाद आहे

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
आपलं सरकार

बोल बच्चन @ देवनाथ गंडाटे
दि.  १ एप्रिल २०१४
----------------------------

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे. त्यातच मुंबईच्या चित्रनगरीत सध्या एकच चर्चा चाललीय. ती म्हणजे पक्षप्रवेश आणि लोकसभा उमेदवार म्हणून नामांकन भरल्याची. सारेच उठसूठ राजकारणात जाऊ लागलेत. त्यामुळं दिग्दर्शक-निर्मात्यांना चित्रपटांची चिंता वाटू लागली आहे. सारेच राजकारणात गेले तर कसं होईल आपल्या फिल्म इंडस्ट्रीजचे, असा प्रश्न त्यांच्या मनात सतावू लागलाय. त्याचाच हा किस्सा.
एका चित्रपटाच्या अनुषंगाने एक दिग्दर्शक निर्मात्याला काही नायक-नायिका हव्या होत्या. त्यासाठी तो ड्रीमगर्ल हेमामालिनीकडे गेला. मॅडम, आपलं सरकार चित्रपटासाठी आपण भूमिका कराल काय? अशी विचारणा केली. मात्र, हेमाजींनी नकार देत, अभी तो मेरे पास टाईम नही, मोदीजीको पीएम बनाना है. निराश झालेल्या दिग्दर्शकाने मग, दिपाली सय्यद या मराठी अभिनेत्रीची भेट घेतली. चित्रपटाचे कथानक सांगितले. ऐकून ती भारावली. दिग्दर्शकही खूश झाला अन मन मे लड्डू फूटा. पण, झाले ते उलटे. दिपालीने आम आदमी पक्षाच्या तिकिटावर नगरची उमेदवारी मिळविली. निराश झालेल्या दिग्दर्शकाने फोन करून दिपालीला विचारले. का हो मॅडम. तुम्ही तर होकार दिला होता ना. मग, काय झाले?. त्यावर ती म्हणाली, तुम्हीच तर म्हणाले आपलं सरकारमध्ये काम करा. मग, सरकार बनण्यापूर्वी खासदार बनायला नको. हिरमुसल्या मनानं परतलेल्या दिग्दर्शकानं अभिनेत्रींचा नाद सोडला आणि अभिनेत्यांना शोधणे सुरू केले. परेश रावल यांची भेट घेतली. सारं समजावून सांगितलं. दोन दिवसांत कळवितो, असे रावल बोलले. पण, दुस-याच दिवशी वृत्तपत्रात परेश रावल भाजपचे उमेदवार म्हणून बातमी झळकली. दिग्दर्शकाने ओ मॉय गाड म्हणत डो्क्यावर हात ठेवला. पुढे, महेश मांजरेकर यांच्याकडे विनवणी सुरू केली. पण, काही फायदा झाला नाही. त्यांनीही मनसेच्या उमेदवारीत व्यस्त असल्याचे सांगत डॉ. कोल्हेंकडे जाण्याचा सल्ला दिला. बंगल्यातून चहा-पाण्याविना परतलेल्या दिग्दर्शकाने त्यांची जागा डॉ. अमोल कोल्हे भरून काढतील, या आशेनं त्यांच्याकडे गेले. पण, बघतात तर काय त्यांनी हातात शिवधनुष्य घेतला होता. शेवटचा पर्याय नंदू माधव होते. त्यांनी होकार दिला. हरकत नाही, असे सांगत त्यांनीही दिपाली सय्यदचा किस्सा गिरविला. आपलं सरकार आणू. पण आधी लोकसभा जिंकू. मग, या दिग्दर्शकाने राखी सावंतला गाठले. पण, तिची भाषाच निराळी. का, कशासाठी? असे टर्रकविणारे प्रश्न करीत राहील. आपलं सरकार ना. नक्कीच साकार करू. पण, ते राष्ट्रीय आम पक्षाच्या तिकिटावर. तिच्यापुढे काय बोलावे, तिला कसं समजवावं, हे त्या दिग्दर्शकाच्या नाकीनऊ आले होते. पण, ती हट्टी आणि जिद्दी स्वभावाची. या देशात दोनच गोष्टी मोठ्या. एक मीडिया आणि मी (राखी), अशी ती बडबडत होती. एक नंबरची ऑयटमबाज ही राखी एकदिवस दिल्लीतही गेली होती. मै दिल्ली की चाय पिने आयी हू, अशी जोराजोरानं ओरडत कमळाचं फूल मागत होती. काय म्हणावं या पोरीला.
या राजकारणामुळे वैतागलेल्या दिग्दर्शकानेही आपलं सरकार या चित्रपटाचा नाद सोडलाय म्हणे. पण, या अभिनेत्यांच्या डो्नयातील राजकारणाचं भूत उतरल्यावर चित्रपटाचे चित्रिकरण करणार असल्याचे समजते.
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
‘चट पक्षांतर, ‘पट' उमेदवारी 

देवनाथ गंडाटे
९९२२१२०५९९
दि. 18 मार्च २०१४
-------------------
लोकसभेचे वेळापत्रक जाहीर होताच निवडणुकीच्या रणधुमाळीने चांगलाच रंग घेतला आहे. होळीच्या पर्वावर अनेकांनी एकमेकांना शुभसंदेश आणि रंगपंचमीचा गुलाल पाठवून जवळीकता साधण्याचा प्रयत्न केला. त्यातही  सोशल मिडियाच्या माध्यामा तून चांगलाच प्रचार सुरू केला आहे. मोबाईल एसएमएसपेक्षाही भारी वजन असलेल्या  व्हॅॉट्सअपचा लाभ आम आदमी पक्षाने घेतला आहे. म्हणायला आम आदमी असलेतरी अनेकांजवळ महागडे मोबाईल आणि त्यात  टूजी, थ्री जी  कनेक्शन आहेत. त्यामुळे  व्हॉॅट्सअॅपवर ‘आपचे अकाउंट सुरू झाले आहे. 
चंद्रपूर सारख्या शहरातील अनेक नवतरुण माध्यमातून आपला  उमेदवाराचा प्रचार सुरू केलेला आहे.  शेतकरी संघटनेचे वामनराव चटप यांनी आम आदमी पक्षात ‘चट पक्षांतर, ‘पट उमेदवारी मिळविली. गत पाच वर्षांपासून लोकसभेसाठी  तालीम करीत असलेल्या  चटपसारखा चेहरा आपला मिळाल्याने विजयाची मोठी शाश्वती निर्माण झाली आहे.
तरुण, वयस्क , शेतकरी आणि महिला वर्गात चपटांचे नाव पोहोचविणसाठी गावातील प्रमुुख मोबाईल क्रमांक  आणि अनेक ग्रुपमध्ये  जुळून,  नवीन क्रमांक शोधून एसएमएस पाठविले जात आहे. ‘ नया  है वह टपोरी डॉलॉगला हाणून पाडण्यासाठी आता ही तरुण मंडळी कुछ करके दिखाना है, चटप को चुनके लाना है, अशी म्हण पुढे आणून प्रचाराची धुरा वेगात सुरू केली आहे.
आपल्या हातात असणारा, कान आणि डोळ्यांच्या माध्यमातून संपूर्ण मनोव्यापार आणि भाव विश्वाला व्यापणारा मोबाइल आता जणू शरीराचा एक भागच  बनला आहे. अगदी खेड्याातील रोजंदारीवर काम करणा-या अशिक्षित तरुणांपासून तर फ़ेसबुक, ट्विटर आणि व्हॉट्सअॅपमय जगणा-या  शहरी माणसार्पंत पोहचणसाठी हे आम तरुण राजकारणाचा कोणताही गंध नसताना देखील रात्रंदिवस एक करीत आहेत.
ऑनलाइन कट्टयावर मात्र ‘पॉलिटिकल टिवटिव बहर येऊ लागला आहे. व्हॉट्सअॅॅपच्या एका ग्रुपवर  सर्वपक्षीय मित्रपरिवार असल्याने अनेक वाद विवादसुद्धा वाचाला मिळत आहेत.
सोळाव्या लोकसभेचं  रणशिंग सुरू झाल्या नंतर पोस्टर-बॅनरयुद्धाला सुरुवात झाली आहे.. मतदाराला आपले  करण्यासाठी प्रयत्न  सुरू झालेत. कारण त्यांना ठाऊक आहे की, एक दिवसापुरता का होईना, तो ‘राजा’ असणार आहे म्हणून त्याला तसं भासवणं  तरी भाग आहे.  म्हणून सगळा आटापिटा चालला आहे. आरोप-प्रत्यारोपाची राजकीय धुळवड तर आधीपासून सुरू झाला आहे.
निवडणूक नुसती जाहीर झाली आणि गावागावातलं वातावरण बदलू लागले आहे. यंदा चटप आणि आपच उमेदवारीमुळे अचानक वेगळी हवा वाहू लागली आहे. एरवी निष्किय असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये एकदम चैतन्य दिसून येत आहे. तरुणांना बदल अपेक्षित आहे. विकासाच दृष्टीने नवा शिलेदारदेखील. त्यामुळे निवडणूक हा विषय सगळ्यांनी अतिशय गंभितेने  घेतलेला दिसू लागला आहे. टीव्ही आणि न्यूज चॅनेलचं प्रस्थ असलेला काळात तरुण मंडळी कधी नव्हे यंदा निवडणुकीची चर्चा करू लागले आहे. गली पासून दिली पर्यंतचे विषय चर्चीले जात आहेत. प्रत्येक जण राजकारणातला तज्ज्ञ असल्यासारखा त्यात सह्भागी  होऊ लागला आहे. पूर्वी उमेदवार जाहीर झाल्याचं वर्तमानपत्रांतून कळायचं आणि ख-या अर्थाने लगबग सुरू व्हायची. आता मात्र तसे राहिलेले नाही।फ़ेसबुकआणि  व्हॅट्सअॅपमुळे क्षणात माहिती कळू लागली आहे.

व्हॉट्सअप-टेलिग्रामवरून मेसेजस पाठविण्यास सुरुवात झाली असली तरी या मेसेजेसमुळे काही ङ्गरक पडणार नाही, असा समज करून बसलेल्या विरोधी पक्षांचा निकाल 16 मे रोजी रखरखत्या  उन्हात लागेल.
------------------

परिर्वतनासाठी मतदान टक्केवारी वाढणे गरजेचे

देवनाथ गंडाटे
९९२२१२०५९९
दि. ३ मार्च २०१४

जुने काय झाले, नवीन काय बदल हवेत, याचा देशभरात विचार सुरू असताना मतदानाची टक्केवारीही वाढणे गरजेचे आहे. नाहीतर काय होईल की, मुठभर लोकांनी मतदान करून संपूर्ण लोकसभेचा खासदार बनविणे, उचित ठरत नाही. 
पूर्वीचा आणि आताचा चंद्रपूर लोकसभा मतदार संघ आणि आजवर निवडून गेलेल्या लोकप्रतिनिधींवर एक नजर टाकली, तर असे लक्षात येते की, येथे केवळ पंजा आणि कमळ या बोधचिन्हावरच रबरी फुलीचा शिक्का बसला.. १९७७-८०च्या काळात विश्वेश्वरराव राजे वगळता गेल्या २४ वर्षांच्या कार्यकाळात केवळ तीनच व्यक्ती खासदार होऊ शकले. प्रत्येकाला दोन ते तिनदा खासदार होण्याचा मान मिळाला. याचाच अर्थ असा की येथील मतदारांनी परिवर्तनाची दिशा न अवलंबता केवळ पक्षीय राजकारणातून मतदान केल्याचे दिसून येते. पण, तसेही म्हणणे उचित नाही. आजवर झालेले हे तिन्ही हे लोकप्रतिनिधी त्यांच्या त्यांच्या काळात प्रभावी ठरले होते. शांताराम पोटदुखे यांनी पंतप्रधान पी. व्ही. नरqसहराव यांच्या कार्यकाळात अर्थराज्यमंत्री पद भूषविले. नरेश पुगलियांसारख्या मातब्बर आणि प्रभावी नेत्यामुळे येथील कामगारांना न्याय मिळाला. पुढे हंसराज अहीर यांच्या रुपाने सामान्य माणूस खासदार झालेला दिसतो. लोकप्रतिनिधी प्रभावी होते. पण, पाहिजे तसा विकास झाला नाही, ही बोंब आता मतदारच मारू लागले आहेत. दुसरीकडे जिल्ह्याच्या साक्षरतेकडे बघितले पाहिजे.  साक्षरतेअभावी केवळ मतपत्रिकेवरील चिन्ह बघून मतदान करण्याची पद्धत होती. ग्रामीण भागातील जुन्या महिलांना आजही दुसèयाने सांगितलेल्या चिन्हावरच शिक्का मारण्यावर विश्वास होता. पण, आता काळ बदललाय.  ५५ वयोगटातील शहरी महिला, तर ४० वर्ष वयोगटातील ग्रामीण महिला आता शिक्षित झाल्यात. शिवाय ग्रामपंचायत, नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद या स्थानिक स्वराज्य संस्थेवर लोकप्रतिनिधी म्हणून ५० टक्के आरक्षणातून  सत्तेची  समान संधी मिळाली. परिणामी वरच्या सत्ताकेंद्रात चांगली माणसे निवडून येवू लागली आहेत. २४ वर्षांपूर्वी आणि त्यानंतरच्या काळात म्हणजे २०१४ पर्यंत साक्षरतेचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे रबरी फुलीचा शिक्का मारण्याची पद्धत जावून बटन दाबण्याची वेळ आली. त्यामुळे साक्षर तरुण पिढीने आता बदल घडविणे अपेक्षित आहे.
मात्र, सत्तेची लालसा, निवडणूकीत होणारा अमाप खर्च आणि भ्रष्ट विचारप्रवृत्ती यामुळे सारी साक्षरता पाण्यात गेल्यासारखी वाटते. याच कारणातून सत्ता मिळाल्यानंतर केवळ कमाई हेच सिद्धांत ठेवून लोकप्रतिनिधी वाटचाल करीत आहेत. पण, आता ते बदलले पाहिजे. त्यासाठी सुदृढ मतदार आणि दृढनिश्चियी लोकप्रतिनिधी तयार होणे अपेक्षित आहे. दुसरीकडे हे सारे चित्र बदलण्यासाठी मतदानाची टक्केवारी वाढण्याची गरज आहे. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात आजवर झालेल्या मतदानाच्या टक्केवारीवरून नजर फिरविली तर निवडून जाणाèया लोकप्रतिनिधींना अल्पमतांचा पाqठबा होता हे सिद्ध होते. गत २००९च्या निवडणुकीत  मतदानाची अंतिम टक्केवारी ५८.४५ एवढी आहे. यामध्ये पुरूषांची टक्केवारी ६२.४१ तर महिलांची ५४.१९ इतकी आहे. राजुरा विधानसभा क्षेत्रात सर्वाधिक ६५.२८ तर चंद्रपूर क्षेत्रात केवळ ५१.९७ टक्के मतदान झाले.
राजुरा विधानसभा क्षेत्रात ६५.२८ टक्के मतदान झाले. तेथे १ लाख ६९ हजार २१४ मतदारांनी मतदान केले. यामध्ये ९२ हजार ४२५ पुरूष तर ७६ हजार ७८९ महिला मतदारांचा समावेश आहे. चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात ५१.९७ टक्के मतदान झाले. येथे १ लाख ४५ हजार १०८ मतदारांनी मतदान केले. ७९ हजार ७०२ पुरूष तर ६५ हजार ४०६ महिलांचा समावेश आहे. बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात ५७.९८ टक्के मतदान झाले. तेथील १ लाख ५९ हजार १२८ मतदारांनी त्यांचा हक्क बजावला असून त्यात ८५ हजार ५१० पुरुष तर ७३ हजार ६१८ महिला मतदारांचा समावेश आहे. वरोरा विधानसभा मतदारसंघात ५८.६६ टक्के मतदारांनी मतदान केले. यामध्ये १ लाख ३५ हजार १७ मतदारांचा समावेश आहे. त्यात ७६ हजार १२४ पुरूष तर ५८ हजार ८९३ महिला मतदारांचा समावेश आहे. वणी क्षेत्रात ६०.८० टक्के म्हणजे १ लाख ४५ हजार ५८३ मतदारांनी मतदान केले. यात ८२ हजार ९३६ पुरूष तर ६२ हजार ६४७ महिला मतदारांचा समावेश आहे. आर्णी विधानसभा क्षेत्रात ५६.६९ टक्के झाले. यामध्ये १ लाख ४३ हजार ४२२ मतदारांनी मतदान केले. यामध्ये ७९ हजार ७९३ पुरूष तर ६३ हजार ६२९ महिलांचा समावेश आहे. 
या लोकसभा क्षेत्रातील एकूण १५ लाख ३५ हजार ४८९ मतदारांपैकी ८ लाख ९७ हजार ४७२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात ४ लाख ९६ हजार ४९० पुरूष तर ४ लाख ९८२ महिला मतदारांचा समावेश होता. 
आता पाच वर्षांनी ही परिस्थिती बदलली आहे. सहा विधानसभा मतदारसंघातील जिल्ह्यात एकूण १६ लाख ८७ हजार ३७८ मतदार असून, यात ८ लाख ८१ हजार ५३० पुरुष तर ८ लाख ५ हजार ८४३ महिला मतदार आहेत. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात एकूण १७ लाख १५ हजार २५४ मतदार असून यात ९ लाख २ हजार ८२६ पुरुष तर ८ लाख १२ हजार ४२८ महिला मतदार आहेत. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात यवतमाळ जिल्ह्यातील वणी व आर्णी विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. 
१८ ते २० वर्षे वयोगटात नोंदणी झालेल्या मतदारांची एकूण संख्या २२ हजार २७१ असून या वयोगटातील एकूण मतदार ४३ हजार ९९२ आहेत. अजूनही काही तरुणांनी मतदार यादीत नाव नोंदविले नसून त्यांनी मतदार यादीत नाव नोंदवावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. चंद्रपूर जिल्ह्यात पुरुष मतदारांच्या प्रमाणात स्त्री मतदार ९५९ असून त्यापैकी ९१५ महिलांनी मतदार यादीत नाव नोंदविले आहे.  २०११ च्या जनगणनेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या २२ लाख ४२ हजार ८६४ असून यापैकी १६ लाख ८६ हजार ५०१ असे मतदार आहेत. लोकसंख्येच्या प्रमाणात मतदारांची टक्केवारी ७५.१९ एवढी आहे. मग, केवळ ५० ते ५५ टक्केच मतदान होत असेल आणि १० ते १५ उमेदवार असतील, तर प्रत्येकाला किती टक्के मतदान मिळाले, याचाही विचार होणे गरजेचे आहे.  मागील लोकसभा निवडणुकीत हंसराज अहिर ३३.५५ टक्के, नरेश पुगलिया २९.९४ टक्के, तर वामनराव चटप यांना  १८.८२ टक्के आणि दत्ताभाऊ हजारे यांना केवळ ६.४ टक्के मत मिळाले. उर्वरित उमेदवार एक ते शुन्य टक्क्यावर होते. ही संपूर्ण आकडेवारी परिवर्तनासाठी qचतनीय आहे.

------------------
आजवरचे खासदार
१९७७-८०       विश्वेश्वरराव राजे स्वतंत्र
१९८०-८४   शांताराम पोटदुखे काँग्रेस(आय)
१९८४-८९   शांताराम पोटदुखे काँग्रेस(आय)
१९८९-९१     शांताराम पोटदुखे काँग्रेस(आय)
१९९१-९६ शांताराम पोटदुखे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१९९६-९८ हंसराज अहिर भारतीय जनता पक्ष
१९९८-९९        नरेश पुगलीया भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१९९९-२००४    नरेश पुगलीया भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२००४-२००९    हंसराज अहिर भारतीय जनता पक्ष
२००९- २०१४ हंसराज अहिर भारतीय जनता पक्ष

--------------------------------
दि. ४ फेब्रुवारी २०१४

        
आम आदमी ते उद्योगपती 
समाजसुधारक ते राजकारण 

हिंदीत नितीनचा अर्थ शांत असा होतो. अगदी अशाच स्वभावाचा नितीन आम आदमी ते उद्योगपती असा प्रवास करून समाजकारणातून राजकारणाकडे  वळत आहे. चंद्रपुरातील पठाणपुरा येथे सामान्य परिवारात जन्मलेले नितीनचे वडील किराणा दुकान चालवीत असत. नितीनने शिक्षणानंतर संगणक प्रशिक्षण केंद्र सुरु केले. त्यानन्तर निप्पो कंपनीची स्थापना केली. या कंपनीतून अनेकांना शुद्ध पाणी मिळू लागले. गेली अनेक वर्षे हा उद्योग विस्तारल्यानंतर मिळणा-या  वेळेतुन सामाजिक उपक्रम सुरु केले. आपल्या वाढदिवसानिमित्त स्थानिक चांदा क्बल मैदानावर सर्व क्षेत्रातील समाजसुधारक आदर्श व्यक्तींचा सत्कार केला. मुंबई, दिल्ली, नागपूर, नासिक, नांदेड, हैदराबाद येथेही कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
समाज सुधारक अशी उपाधी लावून संघटण स्थापन केल्यानंतर
 अनेकांनी नितीनला वेडा ठरविले. पण नितीनने टीकेकडे दुर्लक्ष करीत आपले काम सुरूच ठेवले. नितीन पोहाणे यांच्या नेतृत्त्वात इ मीटर विरोधात ऑटोचालकांचा मोर्चा काढत सरकारच्या आदेशाचा विरोध व्यक्त केला. मात्र वृत्त वाहिन्याचा पसारा असतानांही कुणी दखल घेतली नाही. मोर्च्याचा प्रतिसाद बघता अनेक राजकीय पुढारी आणि सामाजिक संघटना अचंबित झाल्या. नितीन ने मध्यंतरी कांजी' ला लघुचित्रपट साकारला होता. प्रत्येक वेळी काहीतरी वेगळे करण्याचा नितीन चा प्रयत्न असतो. मोठी स्वप्ने बघून ती साकारण्याचा प्रयत्न नितीन करीत असतो.  
कुठल्याही पक्षात किंवा संघटनेत कार्यकारी मंडळ वा कार्यकारीणी असा एक मोजक्या महत्वाच्या सदस्यांचा गट असतो. पदाधिकारी वा नेत्यांच्या नावाने वा नेतृत्वाखाली चाललेल्या कारभाराला वेळोवेळी सल्लामसलत करायला किंवा आढावा घेण्यात मदत करायला असा गट सज्ज असतो. झालेल्या कामाचे अवलोकन करून त्यातल्या त्रुटी दाखवणे, त्याची चाचणी वा छाननी करणे, सुधारणा सुचवणे; यासाठी ही समिती मदत करत असते. अशी समिती नितीन ने   स्थापन केली नाही. मात्र जाणकाराचे सल्ले घ्यायला ते विसरत नाहीत. शांत स्वभाव असला तरी प्रसंगी चुकीच्या बाबींना कडाडून विरोध करतो. अनेकदा त्याच्या स्मार्ट राहनीमानावर टीका होते. सूट बुटाचा तरुण समाज सेवा करेल काय, असा प्रश्न उपस्थित करतात. पण, नितीन ला नीट नेटकेपणा आवडतो. वक्तशीरपणा आणि दिलेला शब्द पाळण्याची वृत्ती कायम आहे.  समाजकारणातून राजकारणाक डे वळत असताना अनेकजण वेगळ्या नजरेने बघू लागले आहेत. पण नितीन सारख्या तरुणाने आता राजकारणाकडे वळण्याची गरज आहे. समाजकारणातून राजकारणाकडे वळत असताना अनेकजण वेगळ्या नजरेने बघू लागले आहेत. पण नितीन सारख्या तरुणाने आता राजकारणाकडे वळण्याची गरज आहे.
आंदोलनाच्या निमित्ताने त्यांनी फ़ेसबुक व मोबाईल माध्यमातून लोकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळवला होता. मग त्याचे प्रतिबिंब माध्यमातून पडत गेले. आंदोलनात मिळणारा प्रतिसाद मिळाल्यानंतर राजकीय आखाड्यात उतरण्याचा पवित्रा घेतल्याने जुन्या प्रस्थापित नेत्यांची घाबरगुंडी उडाली आहे.  राजकारण म्हणजे घाण, उकिरडा, भ्रष्टाचार असे म्हटले जाते. पण, तरुण नेते  नितीन आता हि घाण नक्कीच साफ करतील यात शंका नाही.
------------------------------  
दि. १ फेब्रुवारी २०१४

           उमेदवारी संदर्भात संभ्रम 
आम आदमी पार्टीने उमेदवारी घोषित करण्यापूर्वीच शेतकरी संघटनेने तिकीट मिळाल्यागत प्रचारच सुरू केला आहे. त्यामुळे आप च्या सामान्य कार्यकर्त्यात कमालीचा संभ्रम निर्माण झाला आहे. नवरी एक, वर अनेक' अशी इचछुक  उमेदवार संख्या दिसून येत आहे. प्राप्त माहितीनुसार आप कडे ११-१३ जणांनी अर्ज केला आहे. याशिवाय प्रदेश कार्यकारणीच्या नेत्यांनी केलेली विनंती आणि मत परिवर्तन यामुळे उमेदवारीस तयार झालेले बंडू धोतरे आणि चटप यांच्या दावेदारीमुळे तूर्तास उमेदवारी संदर्भात संभ्रम  आहे. मात्र, येत्या काळात लोकसभेच्या तिकीटाची माळ कुणाच्या गळ्यात पडेल, हे आताच सांगणे कठीण आहे। 


वामनराव चटप 
यांनी आपली राजकीय गाडी आता दिल्लीच्या वाटेने वळविली असून, येत्या लोकसभा निवडणुकीत ते दिल्लीचा किल्ला लढविणार असल्याचे स्पष्ट संकेत आहेत. यातच त्यांनी आप सोबत हातमिळवणी केली आहे. त्यामुळे मोठे चित्र बदलण्याची शक्यता आहे. जर चटप यांना आप ची तिकीट मिळाली नाही तर, ते कार्यकर्ता म्हणून आप च्या अन्य उमेदवाराचा  प्रचार करतील असे वाटत नाही. कारण त्यांनी केवळ लोकसभेच्या निवडणुकीसाठीच आजवर मोर्चे बांधणी केली आहे. त्यामुळे ती व्यर्थ जाईल. तिकीट  मिळाली नाही तर, ते शेतकरी संघटना किंवा अपक्ष उमेदवार म्हणून राहू शकतात. कारण ते मुळचे राजकारणी आहेत. राजकारणी हे खुर्ची आणि सत्तेशिवाय जगू शकत नाही.

‘शेतकऱ्यांना घामाचे दाम मिळावे’ पासून ‘त्यांना खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळावे’ यासाठी २५ वर्षापासून शेतकरी संघटनेचे काम करताना स्वतंत्र भारत पक्षाचे राज्याध्यक्ष अ‍ॅड. वामनराव चटप हे खासदार शरद जोशी यांचे खंदे समर्थक आहेत. मात्र  संघटनेची ताकद केवळ राजुरा विधानसभा मतदारसंघापुरती मर्यादित आहे. याची जाणीव असल्याने चटप यांनी आता आप हीच संधी साधून उमेदवारीचा प्रचार सुरू केला आहे. काही वर्षापूर्वी शेतकरी संघटना युतीसोबत होती. तेव्हा संघटनेचे आमदार वामनराव चटप यांनी चंद्रपूर लोकसभेची जागा मागितली. ती न मिळाल्यानेगत निवडनुकीत  स्वतंत्र लोकसभा लढली. यावेळी आप ची तिकीट मिळाल्यागत प्रचारच सुरू केल्याने या नव्या समीकरणाचा फायदा नेमका कुणाला होतो याविषयी कमालीची उत्सुकता आहे. खरे तर शरद जोशी यांच्या शेतकरी संघटनेने २००४ साली भाजपाशी युती केली होती. त्याच भरोशावर खासदार झाले. आता आप ची टोपी घालून गेलेली पत पुन्हा मिळविण्याचा प्रयत्न सुरु आहे.
८ नोव्हें, २०१३  ला  चंद्रपूर येथे  झालेल्या शेतकरी संघटनेचे 12वे संयुक्त अधिवेशनात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार ऍड. वामनराव चटप यांची उमेदवारी घोषित करण्यात आली. कट्टर विदर्भवादी चटप यांनी ६ डिसें, २०१३  रोजी प्रतिविधान सभेच्या  मुख्यमंत्रिपदावर बसविण्यात आले होते.
राजुरा विधानसभा मतदारसंघाचा संतुलित विकास करून एक प्रगतिशील मतदारसंघ म्हणून पुढे आणण्याचे बरेच श्रेय आमदार, शेतकरी संघटना समर्थित स्वतंत्र भारत पक्षाचे प्रश्नंताध्यक्ष अ‍ॅड. वामनराव चटप यांना आहे. १५ वर्षे विधानसभा सदस्य असलेले अ‍ॅड. वामनराव चटप यांची कारकीर्द उल्लेखनीय आहे.
आंध्र सीमेवरील या मतदारसंघाची स्थिती पूर्वी अत्यंत दयनीय होती. रस्ते, पूल, विद्युतीकरण, शासकीय व शैक्षणिक कार्यासाठी इमारती, सिंचन, वैयक्तिक लाभाच्या योजना यांचा मोठा अनुशेष होता. अ‍ॅड. वामनराव चटप १९८९ मध्ये निवडून आले आणि मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलून गेला.
जिवती तालुक्यातील १२ गावे राज्य शासनाने आंध्रप्रदेशला देण्याच्या निर्णयाविरोधात आमदार चटप यांनी विधानसभेत आवाज उठवला व लोकांची चळवळ उभारली.  राजुरा मतदारसंघात मोठय़ा प्रमाणात औद्योगिकरण सुरू आहे. त्यामुळे वाढते प्रदूषण व कंत्राटी कामगारांच्या समस्या याबाबत चटप फारसे गंभीर राहिल्याचे दिसत नाही. राजुरा शहरात वनउद्यान वगळता सुशोभिकरणासाठी मोठा निधी दिला नाही. वर्धा नदीवरून सिंचनाचे छोटे प्रकल्प होण्याच्या शक्यतेबद्दल आमदार चटप यांच्याकडून फारसे प्रयत्न नाहीत. आरोग्याच्या सर्व सुविधा व निधी असतानाही माणिकगड पहाडावर कुपोषण सुरूच आहे.
-----------------------------
बंडू धोतरे 
हे कोणताही राजकीय गंघ नसलेला व्यक्ती आहे. त्यामुळे ते निवडनुकीत तग धरतील काय हा प्रश्नच आहे. पण, केजरीवाल यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवल्यास परिवर्तनासाठी सक्षम मन आणि ध्येयाची गरज आहे. समाज जागृतीत पुढे असलेले धोत्रे  परिवर्तनासाठी पुढे येत आहेत यात दुमत नाही मात्र त्यांना भाषण कौशल्य आणि राजकीय बांधणी करता येणे महत्वाचे आहे.
चंद्रपूर लोकसभा मतदार संघातून आप चा उमेदवार निवडण्यासाठी प्रदेश कार्यकारणीच्या नेत्यांनी चंद्रपुरातील काही समाज सेवि ची भेट घेतलि. त्यात बंडू धोतरे यांचे नाव होते. चंद्रपूरचे ख्यात  नाम व्यंग चित्रकार मनोहर सप्रे यांच्या मार्फतीने हि भेट झाली. प्रारंभी उमेदवारी ला नकार देणाऱ्या धोतरेनि परिवर्तनाची गरज बघून आप  कडे इचछुक  उमेदवार म्हणून अर्ज केला.
गेल्या १०-१२ वर्षात त्यांनी विविध उपक्रम राबविले. भविष्यात उद्भभवणाऱ्या समस्यांची जाणीव ठेवून वाघांच्या संरक्षणासाठी  उपोषण, जंगल वाचविण्यासाठी अदानी प्रकल्पाला विरोध केला. अदानी विरोधी आंदोलनामुळे ते देशपातळीवर पोहचले. त्याला शहरातील अन्य संघटना आणि नागरिकांनी दिलेली साथ महत्वाची होति. २५ जुलै, २००९ ला  बंडू धोतरे यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले. तेव्हा मॅगसेसे पुरस्कार विजेते  राजेंद्रसिंग यांनी भेट दिली. गोंदियामधील १३२० मेगावॉट क्षमतेच्या तिरोडा औष्णिक वीज प्रकल्पासाठी अदानी पॉवरने ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प क्षेत्रात दोन कोळसा खाणींचा प्रस्ताव पुढे आणला होता. प्रस्तावित खाणींतून दरवर्षी ४० लाख टन कोळशाचे उत्पादन केले जाणार होते, तर खाणींमुळे तब्बल १६०० हेक्टरमधील वनक्षेत्र नष्ट होणार होते. परंतु केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाच्या उच्चस्तरीय मूल्यमापन समितीने २४ नोव्हेंबर रोजीच्या बैठकीत सदर कंपन्यांकडून पर्यावरण मंजूरीसाठी सादर झालेला प्रस्ताव खारीज करण्याचा निर्णय घेतला. पर्यावरणीय मंजुरीशिवाय कंपन्यांना या क्षेत्रात खाणकाम करता येणार नाही. खाणींचे हे दोन्ही प्रस्ताव ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या राखीव क्षेत्रात मोडणारे होते. विदर्भातील पर्यावरणवादी संघटनांनी या प्रस्तावित खाणीच्या विरोधात आंदोलन सुरू केल्यानंतर राज्य व केंद्र शासनाला या विरोधाची दखल घेणे भाग पडले. येथील ‘इको-प्रो’ चे प्रमुख बंडू धोतरे यांनी वन्य जीवांच्या प्रश्नावर बेमुदत उपोषण केले होते. रेल्वे मालधक्का, धूळ प्रदूषण, बाबूपेठ उड्डाणपूल, यासारख्या प्रश्नांवर त्यांनी आंदोलन केले आहे. गेल्या वर्षी त्यांना 'संघर्ष सन्मान पुरस्कार' मिळाला. आप च्या विचारसरनीला पुढे नेइल, असा कार्यकर्ता आहे.  
------------------------------
आधुनिक माध्यमांच्या युगात वर्तमानपत्र अग्रगण्य

(6 जानेवारी मराठी पत्रकार दिनानिमित्त)

वर्तमानपत्र हे आज अत्यंत आवश्यक व गरजेचे बनलेले आहे. आजही लोकांना सकाळचा पहिला चहा हा वर्तमानपत्राबरोबरच घ्यायला आवडतो. भारतीय पत्रकारितेचा उदय ब्रिटीश राजवटीच्या काळात झाला. व्यावसायिकतेच्या उद्दिष्टाने ही पत्रकारिता सुरु झाली नव्हती. तर पाश्चात्य शिक्षणातून आधुनिकतेची झालेली ओळख आपल्या समाजाला करुन देण्याचा  ध्येय  त्यामागे होता.
मराठी वृत्तपत्रामध्ये पाहिले वर्तमानपत्र दर्पण या वृत्तपत्राची सुरुवात बाळशास्त्री जांभेकरांनी 6 जानेवारी 1832 रोजी केली.हे वृत्तपत्र इंग्रजी व मराठीमध्ये होते. त्याचे इंग्रजी नाव दि बॉम्बे दर्पण  होते. या वृत्तपत्राची पाक्षिक म्हणून सुरुवात होऊन मे 1832 रोजी ते साप्ताहिकात रुपांतरित झाले. मात्र आर्थिक समस्येमुळे 1840 साली ते बंद पडले. 4 जुलै, 1840 रोजी मुंबई अखबार या वृत्तपत्राची सुरुवात  झाली . संपूर्णपणे मराठीतील पहिले वृत्तपत्र म्हणून या वृत्तपत्राचा उल्लेख होतो. दर शनिवारी हे पत्र प्रकाशित केले जात असे. मात्र वर्षभरातच हे वर्तमानपत्र बंद पडले. प्रभाकर या वृत्तपत्राची 24 ऑक्टोबर 1841 रोजी भाऊ महाजन यांनी सुरुवात केली. या वृत्तपत्रातून प्रकाशित केलेली लोकहितवादीची शतपत्रे  मोठ्या प्रमाणात गाजली. याशिवाय भाऊ महाजनांनी 1853 साली धुमकेतू  नावाचे साप्ताहिक 1854 साली ज्ञानदर्शन नावाचे त्रैमासिक सुरु केले. 
यावृत्तपत्रांप्रमाणे कृष्णशास्त्री चिपळूणकर यांनी ज्ञानप्रकाश हे वृत्तपत्र काढले. ते 100 वर्षांपेक्षा अधिक काळ चालले. 1862 साली सुरु झालेल्या इंदुप्रकाश या वृत्तपत्राचे मराठी विभागाचे संपादक जनार्दन सखाराम गाडगीळ हे हेाते. सुबोध पत्रिका  हे प्रार्थना समाजाचे मुखपत्र होते. 1873 मध्ये या पत्राची सुरुवात झाली. समाज व धर्मासंबंधी सुधारणाविषयक चर्चा या पत्रातून झाली. प्रार्थना समाजाचे धर्मासंबंधीचे विचार प्रसृत करणे आणि त्यावरील आक्षेपांना उत्तर देणे हा यामागील हेतू होतो. 
विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी 1874 साली निबंधमालेची सुरुवात केली. यातून त्यांनी हिंदू धर्मातील प्रथा, परंपरा, रुढी यांचे पुनरुज्जीवन करणारे लेखन केले. महात्मा फुले यांच्या प्रेरणेने कृष्णराव भालेकर यांनी 1877 साली पुण्यात दीनबंधू पत्राची सुरुवात केली. विचार जागृतीची, समतेची प्रेरणा मिळावी या उद्देशाने त्यांनी स्वत:च्या खर्चाने हे पत्र सुरु केले.बहुजनवादी वृत्तपत्रांमध्ये दीनमित्र विटाळ-विध्वंसक सत्यप्रकाश मूकनायक बहिष्कृत भारत जनता इतयादी वृत्तपत्रे प्रसिद्ध झाली. 
लोकमान्य टिळकांनी जनतेला स्वातंत्र्य चळवळीस उद्युक्त करण्याच्या व समाज परिवर्तनासाठी -जनजागृतीचा एक महत्वाचा भाग या विचारांनी 4 जानेवारी 1881 मध्ये केसरी  हे वृत्तपत्र सुरु केले. केसरीचे प्रथम  संपादक गोपाळ गणेश आगरकर यांनी 1887 पर्यंत काम केले. त्यांनी प्रारंभीच्या काळात जनतेच्या विचार परिवर्तनविषयक लिखाणावर भर दिला. समाजसुधारणांच्या मूलगामी विचारातून सामाजिक सुधारणा वेग धरु शकतील याबाबत त्यांनी जागरुकतेने सामाजिक सुधारणावर आग्रही राहून केसरी त लिखाण केले. आगरकरांचा सडेतोडपणा, वैविध्य यामुळे केसरीची लोकप्रियता वाढली खरी परंतु पुढे टिळक व आगरकर यांच्यात वैचारिक मतभेद वाढत गेल्यामुळे 1888 पासून केसरीचे काम लोकमान्य टिळक पाहू लागले. केसरीने राज्यातील जनतेच्या विविध प्रश्न व समस्यांना वाचा फोडण्याचे कामही  केले. 
आज मराठी पत्रकारितेमध्ये खूप बदल झाले आहेत. एकेकाळी ज्या प्रक्रियेने वृत्तपत्र छापले जात होते. त्या प्रक्रियेत विद्युत यांत्रिकीकरणामुळे प्रचंड बदल  झालेला आहे. वर्तमानपत्रांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे. लोकशाही समाज व्यवस्थेतील चार स्तंभापैकी पत्रकारिता हा एक स्तंभ आहे. समाज प्रबोधनाचे काम करणारे वर्तमानपत्र हे आगामी शतकानो शतक आपले स्थान टिकवून ठेवणार आहे. यात काही शंका नाही.
शैलजा देशमुखविभागीय माहिती कार्यालय, कोंकण विभाग, नवी मुंबई 
-------------------------------------------------------------------
व्हा गजानना, अखेर गणेशाला हाकललात

४ जानेवारी २०१४


आम्ही तिथे असतो तर अलोउड ( येउ दिले नसते ) केले नसते, असे पोलिस अधिकारी गावडे म्हणाले. त्यावर प्रमोद मोहड यांनी, साहेब हे तुम्हाला समजायला पाहिजे होते, असे रागात उत्तर दिल्यानंतर गणेश गावडे यांनी "आम्हाला काय समजायचे ते समजू, तुम्हाला सांगायची गरज नाही, असे बजावले. मग प्रमोद मोहड यांचाही पारा गरम झाला. सांगायची गरज नाही ना, "काही सांगायची गरज नाही? असे मोहड उच्चारत असताना गणेश गावडे यांनी, सांगायची गरज नाही असे बजावत मोहोड यांच्या कानशिलात फड फड दिली. सर्वसाधारण बांधा, ताठमानेनं राहणा-या गावडेचा हात इतका जोरात पडला कि, राष्ट्रवादीच्या पायाखालची माती सरकली. मोहड यांना रुग्णालयात भरती करावे लागले. पोलिस अधिका-याने एका कामगार नेत्याला केलीली मारहाण अशोभनीय होति. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने ही कारवाही केली. कोणती चौकशी करायची करून घ्या, असे गावडे शेवटपर्यंत म्हणत राहिले. गेल्या महिन्यापासून भद्रावती येथील कर्नाटक-एम्टा कोळसा खाणीत स्थानिक आणि परप्रांतीय कामगारांच्या मुद्यावर वाद सुरु आहे. यासाठी आंदोलन सुरु होते. मात्र, पोलिसांनी या आंदोलकांना अटक करून भद्रावती पोलीस स्टेशनमध्ये आणले. प्रत्येक आंदोलनात होते तशी मजुरांनी इथेही नारेबाजी सुरु केली. अटक झाली म्हणून आंदोलनाचे नेतृत्व करणारे राष्ट्रवादीचे नेते प्रमोद मोहोड पोलिसांसोबत तावातावाणे बोलत होते. मात्र बोलता-बोलता वरोरा विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश गावडे यांचा अचानक पारा चढला आणि त्यांनी मोहोड कशी बेदम मारहाण केली. पोलीस एवढ्यावरच थांबले नाहीत. साहेबांनीच दबंगगिरी दाखविली म्हटल्यावर कर्मचा-यांनीही हात धुवून घेतले. हात इतके धुतले कि कामगार नेते मोहोड सामान्य रुग्णालयात हात मोडल्याने दाखल आहेत. प्रमोद मोहोड यांना झालेल्या या मारहाणीमुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये मोठी खळबळ उडाली. त्यांनी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याकडे याची तक्रार केली. तरीही पोलिस अधिक्षकानी मोहाड यांचीच बाजू घेत जे केले ते बरोबर होते असे सांगत गावडेचे समर्थन केले.

एम्टा आंदोलनात सहभागी झालेले कामगार नेते प्रमोद मोहोड यांना मारहाण करणार्‍या उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश गावडे यांना निलंबित करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने बंद पुकारण्यात आला होता. त्याला चंद्रपुरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. प्रमोद मोहोड यांना झालेली मारहाण म्हणजे पोलिसाची गुंडगिरी म्हणावी. मोहोड यांनी कामात व्यत्यय आणला, म्हणून मारहाणच करणे हे चुकीचे आणि निषेधार्य आहे.

कर्नाटका एम्टा कोळसा खाणीत सुरू असलेल्या आंदोलनात सहभाग घेतल्याने अन्य कामगारांसोबत आपणासही संपविण्याची धमकी कर्नाटक एम्टा कंपनीचे बिरूसिंग यांनी दिली असून आपल्या जीवाला त्यांच्यापासून धोका असल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांनी दिली आणि या प्रकरणाला पुन्हा जोर चढला. गृहमंत्री आर.आर. पाटील यांना एक पत्र पाठविले . हा लढा पोलिसांविरूद्ध नव्हता तर कंपनीने सुरू केलेल्या अन्यायाविरोधात होता. मात्र पोलीसच यात उतरले. त्यामुळे पोलिसची भूमिका कंपनीची पाठराखण करणारी स्पष्ट पणे दिसून आली. त्यामुळे गजानन पाल यांनी उपोषणाचे शस्त्र उगारले. अनेक दिवस उपोषण केल्यानंतर गजानन पाल यांना रुग्णालयात भरती करावे लागले. मात्र, पाल यांनी माघार घेतली नाही. गेल्या काही दिवसापूर्वी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार गोंदिया जिल्ह्यात आले होते. तिथे मोरेश्वर टेमुर्द्रे आणि राजेंद्र वैद्य यांनी गावडेच्या गुंडगिरीची माहिती पवारांच्या कानात सांगितली. त्यांनी गावडेचा बंदोबस्त करण्याचे आश्वासन दिले. दरम्यान गणेश गावडे हे माजी वनमंत्री बबनराव पाचपुते यांच्या जवळचे आहेत, अशी माहिती होती. त्यामुळेच कारवाईला विलंब झाला, असेही बोलले जात होते. दोन महिन्यापूर्वी भद्रावती पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक आव्हाड यांच्या मुजोरीविरुद्ध अनेक तक्रारी झाल्या. मात्र, त्यांची पाठराखण वरीष्ट अधिका-यानी केली. त्यामुळे पोलिस गुंडगिरी वाढली आहे.
बरीच दिवस उपोषण चालल्यानंतर गणेश गावडेच्या बदलीचा ऑर्डर आला आणि गजानन पाल यांच्या उपोषणाची सांगता झाली. एकूणच कोणाविरुद्ध लढायला गेले आणि कोणाचा बळी गेला, हि विचार करणारी बाब आहे. आता राष्ट्रवादीने गावडेच्या बदलीचे डोक्यावर न घेता कर्नाटक-एम्टा कोळसा खाणीच्या मूळ प्रश्नाकडे लक्ष देण्याची गरज आहे.


गावडे प्रकरणापूर्वी
स्थानिक प्रकल्पग्रस्त व मराठी कामगारांना डावलून बिहार व उत्तर प्रदेशातून ३५० कामगारांची आयात करून कर्नाटक एम्टा खुल्या खाणीत कोळसा काढण्याचे काम सुरू आहे. २० सप्टेंबरला प्रलंबित मागण्यांसाठी राष्ट्रीय कोयला कामगार संघर्ष समितीने आंदोलन करण्याचा इशारा एम्प्टा प्रशासनाला दिला होता. यामुळे सहाय्यक श्रमआयुक्तांमार्फत कंपनीसोबत समझोता करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, कंपनीने भूमिका बदलविली नाही. कंपनीने तीन कामगारांचे स्थानांतरण पश्चिम बंगालात केले. त्यानंतर तब्बल ४७ कामगारांना निलंबित केले. या कंपनीत एकूण ४०० कामगार आहेत. हे सर्व खुल्या खाणीत कोळसा उचलण्याचे काम करतात. दरम्यानच्या काळात कर्नाटक एम्टाच्या वतीने स्थानिक मराठी कामगार व प्रकल्पग्रस्तांना कमी करून बिहार व उत्तर प्रदेशातून ३५० कामगार येथे आणले. त्यांना खाणीत कोळसा वेचण्याचे काम दिले, तर मराठी कामगारांना हळूहळू कामावरून कमी केले. त्यानंतर ८४ कामगार कामावर जात असतांनाही नोंदवहीवर त्यांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या जात नव्हत्या. त्यानंतर या सर्व कामगारांना कामावरून काढून टाकल्याचे या कंपनीच्या वतीने सांगण्यात आले. बिहार व उत्तर प्रदेशातून आलेल्या कामगारांना अधिक पगार देऊन नोकरी देणाऱ्या एम्टा व्यवस्थापनाने मराठी कामगारांची एकप्रकारे गळचेपी सुरू केली. त्यातूनच हे आंदोलन उभे राहिले आहे.
त्याचा परिणाम स्थानिक कामगारांनी एकत्र येऊन एम्टा खाण बंद पाडली आहे. कामगारांच्या कुटुंबीयांनी एकत्र येऊन राष्ट्रवादीच्या झेंडय़ाखाली थेट खाणीत आंदोलन सुरू केले. या खाणीतील कोळशाचा एक दगडही बाहेर गेला तर आंदोलन तीव्र करू, असा इशारा राष्ट्रवादीचे नेते व विधानसभेचे माजी उपाध्यक्ष अ‍ॅड.मोरेश्वर टेमुर्डे व राष्ट्रवादी कामगार सेलचे अध्यक्ष प्रमोद मोहोड यांनी दिला.


परप्रांतीय कामगार आयात करून मराठी कामगारांवर अन्याय सुरू असतांना शिवसेना व मनसेने चुप्पी साधली होती. मराठी लोकांसाठी पेटून उठणारे हे दोन्ही पक्ष मराठी कामगारांसाठी धावून येत नसल्याचे बघून सर्वानाच आश्चर्याचा धक्का बसला. तेव्हा मात्र समाज सुधारक न्यासचे नितीन पोहणे अपवाद ठरले. त्यांनी कामगारांना एकत्रित करून प्रश्न मार्गी लावत असताना राष्ट्रवादी चे आंदोलन पेटले. आता कर्नाटक एम्प्ता कंपनी समझोता करून प्रकरण शांत केले आहे।
-------------------------------------------------------

पोलिस v/s राष्ट्वादी
कर्नाटका एम्टाविरुद्धचे आंदोलन
राजेंद्र वैद्य यांना जिवे मारण्याची धमकी

२४ डिसेंबर २०१३
गेल्या काही दिवसांपासून या कर्नाटक-एम्टा कोळसा खाणीत स्थानिक आणि परप्रांतीय कामगारांच्या मुद्यावर वाद सुरु आहे. गेल्या पाच दिवसांपासून यासाठी आंदोलन सुरु होते. मात्र गुरुवारी पोलिसांनी या आंदोलकांना अटक करून भद्रावती पोलीस स्टेशनमध्ये आणले. प्रत्येक आंदोलनात होते तशी मजुरांनी इथेही नारेबाजी सुरु केली. अटक झाली म्हणून आंदोलनाचे नेतृत्व करणारे राष्ट्रवादीचे नेते प्रमोद मोहोड पोलिसांसोबत तावातावाणे बोलत होते. मात्र बोलता-बोलता वरोरा विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश गावडे यांचा अचानक पारा चढला आणि त्यांनी मोहोड कशी बेदम मारहाण केली

स्थळ- भद्रावती पोलिस ठाणे- आवारात कामगारांची गर्दी.
(मारहाणीपूर्वी काय घडलय )
गणेश गावडे - आम्ही तिथे असतो तर अलोउड ( येउ दिले नसते ) केले नसते.
प्रमोद मोहड - साहेब हे तुम्हाला समजायला पाहिजे होते
गणेश गावडे - आम्हाला काय समजायचे ते समजू, तुम्हाला सांगायची गरज नाही।
प्रमोद मोहड - सांगायची गरज नाही। ना, "काही सांगायची गरज नाही?
गणेश गावडे- सांगायची गरज नाही।
फड फड ( क्षणाचाहि विलंभ न करता गावडेचा हात मोहोड यांच्या गालावर गेला. ) फड फड फड फड फड फड
माघून कामगार "ओ साहेब ओ साहेब, (मग प्रमोद मोहोड यांना आत नेले) पोलीस एवढ्यावरच थांबले नाहीत. साहेबांनीच दबंगगिरी दाखविली म्हटल्यावर कर्मचा-यांनीही हात धुवून घेतले. हात इतके धुतले कि कामगार नेते मोहोड सामान्य रुग्णालयात हात मोडल्याने दाखल आहेत. प्रमोद मोहोड यांना झालेल्या या मारहाणीमुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. त्यांनी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याकडे याची तक्रार केली. मात्र पोलिसांनी प्रमोद मोहोड पोलिसांच्या कामात अडथळा आणत असल्यामुळे बळाचा वापर करण्यात आल्याचे सांगताहेत.
एम्टा आंदोलनात सहभागी झालेले कामगार नेते प्रमोद मोहोड यांना मारहाण करणार्‍या उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश गावडे यांना निलंबित करण्याच्या मागणीसाठी आज सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने बंद पुकारण्यात आला होता. याला चंद्रपुरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. प्रमोद मोहोड यांना झालेली मारहाण म्हणजे पोलिसाची गुंडगिरी म्हणावी. मोहोड यांनी कामात व्यत्यय आणला, म्हणून मारहाणच करणे हे चुकीचे आणि निषेधार्य आहे.
कर्नाटका एम्टा कोळसा खाणीत सुरू असलेल्या आंदोलनात सहभाग घेतल्याने अन्य कामगारांसोबत आपणासही संपविण्याची धमकी कर्नाटक एम्टा कंपनीचे बिरूसिंग यांनी दिली असून आपल्या जीवाला त्यांच्यापासून धोका असल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. या प्रकरणाची माहिती देणारे एक पत्र आपण गृहमंत्री आर.आर. पाटील यांना पाठविले असून जिल्हा पोलीस अधीक्षकांनाही निवेदन देणार असल्याचे ते यावेळी म्हणाले. बिरूसींग हे कर्नाटक एम्टा कंपनीचे हस्तक असून या परिसरात कंत्राटदार, अधिकारी म्हणून वावरत आहेत. कामगारांचे आंदोलन दडपण्यासाठी त्यांनी कामगारांनाही धमकावण्याचे प्रकार केल्याने कामगार वर्ग दहशतीत असल्याचे त्यानी यावेळी सांगितले. आपला लढा पोलिसांविरूद्ध नव्हता तर कंपनीने सुरू केलेल्या अन्यायाविरोधात होता. मात्र पोलीसच यात उतरले. त्यांची भूमिका कंपनीची पाठराखण करणारी असून कामगारांवर अन्याय करणारी आहे.

-------------------------------------
परिवर्तनासाठी घेणार आपचा झाडू
२२ डिसेंबर २०१३ 
दिल्लीच्या राजपटावर पहिल्यांदाच सत्तेची मास्टर चाबी आपल्या टोपीत पाडणा-या आम आदमी पक्षाची भुरळ चंद्रपुरातही दिसून येत आहे. अनेक इच्छुक तरुण कार्यकर्ते येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आपचा झाडू हाती घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
जिल्ह्यात काँग्रेस आणि भाजप वगळता इतर पक्षाला लोकसभा आणि विधानसभेत जाता आले नाही. केवळ शेतकरी संघटनेला दोनदा आमदार मिळविता आला. गत लोकसभा निवडणुकीत तिसरा पर्याय म्हणून बसप आणि शेतकरी संघटना उभ्या होत्या. मात्रमतदारांनी जुन्याच पक्षाच्या नेत्यांना पसंती दिली. मात्रविकासाच्या दृष्टीने कोणतेही पावले उचलली गेली नाहीत. गेल्या अनेक वर्षांपसून न सुटलेल्या समस्या आतातरी सुटाव्यातयासाठी मतदारदेखील नवा पर्याय शोधत आहे. जिल्ह्यात तरुण नेते तयार होऊ लागले आहेत. वेगवेगळ्या स्वयंसेवी संघटनेमार्फत विकासाच्या मुद्द्यावर मोर्चेआंदोलने करून समस्या मार्गी लावण्याचा प्रयत्न हे तरुण करू लागले आहेत. त्यामुळे मतदारांना नव्या तरुणांवरील विश्वास वाढू लागला आहे. नुकत्याच झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत नवख्या आप पक्षाने प्रस्थापित पक्षांचा झाडूने सङ्काया करीत सत्तेची मास्टर चाबी आपल्या हाती घेतली. त्यामुळे मआपङ्कची हवा चंद्रपुरातही पोहोचली आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत मआपङ्कच्या माध्यमातून उमेदवारी मिळविण्यासाठी दिल्लीमुंबई आणि नागपुरात बैठका सुरू झाल्या आहेत. भ्रष्टाचारमुक्त भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी डॉक्टरवकीलविद्यार्थीसामाजिक कार्यकर्तेविविध पक्षांतील कार्यकर्ते व पदाधिकारी मआम आदमी पार्टीङ्ककडे आशेने बघू लागले आहेत. औरंगाबाद येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीची व्यूहरचना आखण्यात आली. राज्य ते ग्रामपातळीपर्यत कार्यकारिणीची निवड करण्यात येणार आहे. या पक्षात उमेदवाराची शैक्षणिकराजकीयसामाजिकगुन्हेगारीचारित्र्यसंपत्ती आदींविषयी माहिती असेल. सर्व माहिती वेबसाइटवर उपलब्ध राहणार असूनएखाद्या सदस्याच्या गुन्हेगारी पाश्र्वभूमीविषयी कुणाला माहिती असल्यास ते ऑनलाइन तक्रार करू शकतात.

चाचपणी सुरू
शहरातील विविध संघटना आणि काही प्रादेशिक पक्षाच्या नेत्यांना आप पक्षाविषयी विचारणा केली असता सकारात्मक प्रतिसाद दिसून आला. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आम आदमी पक्षाचे वरिष्ठ नेते संपर्कात असूनचाचपणी सुरू असल्याचे एका पदाधिकाèयाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

सोशल नेटवर्किंगचा फायदा
शहरी भागापासून ग्रामीण भागापर्यंत प्रत्येक तरुणाच्या हातात मोबाईल आला आहे. त्यामुळे एसएमएसच्या माध्यमातून तरुणांना जोडण्याचे काम सुरू होते. आता ङ्केसबुकने ही जागा घेऊन परिवर्तनाची दिशा तरुणांना पटवून देत आहे.

पक्ष.....  .मनपा.........नपा.......जिप.......पंस....एकूण
काँग्रेस...  २६..........५०........२१........४५.....१४२
भाजप.... १८.........२५.......१८........३१.... ९२
राष्ट्रवादी.....४.......१७.........७........१३......४१
शिवसेना....५........१८.........२.........२......२७
बसप.........१........५.........१..........१.......८
मनसे.......१.......१..........१..........१.......४
अपक्ष.......११....८..........७.........२१.....४७
भाकप......०......२..........०............०.....२
शेतकरी संघटना...०..५..........०............०.....५
रिपाइं...........०......१..........०............०.....१
भारिप..........०.........३..........०............०.....३
                ६६.....१३५......५७.....११४.........३७२

स्थानिक स्वराज्य संस्थेत काँग्रेस बलाढ्य पक्षजिल्ह्यातील महानगरपालिकाजिल्हा परिषदपंचायत समिती आणि नगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काँग्रेस बलाढ्य पक्ष आहे. एकूण ३७२ जागांपैकी एकट्या काँग्रेसकडे १४२ जागा आहेत. 
  • काँग्रेस ३८%
  • भाजप २४%
  • राष्ट्रवादी काँग्रेस ११%
  • शिवसेना ७%
  • बसप २%
  • मनसे १%,
  • अपक्ष १२%
  •  शेतकरी संघटना १.३ %,
  • भाकप ०.५ %,
  • भारिप ०.८%,
  • रिपाइं ०.२ %,
^^^^^^^^^^^^ ^^^^^^^^^^^^ ^^^^^^^^^^^^ ^^^^^^^^^^^^ ^^^^^^^^^^^^ ^^^^^^^^^^^^ 

मनस्वी आभार
१४ डिसेंबर २०१३ 
-----------------
१४ - १२- १३ = ३०
१४ डिसेंबर १९८३ रोजी माझा जन्म सावली तालुक्यातील (तत्कालीन सिंदेवाही ) मेहा येथे झाला.  गत १२ वर्षापासून चंद्रपुरात वात्सव्यात आहे. २०१३ रोजी वयाची ३० वर्ष झालीत. या काळात अनेक मित्र भेटले. या मित्रांच्या सहकार्य आणि मार्गदर्शनातून पत्रकारिता क्षेत्रात खडतर प्रवास सुलभ करता आले.  वाढदिवसाच्या या शुभदिनी अनेकांनी शुभेच्या देऊन भावी आयुष्यासाठी प्रेरणा दिलि. वाढदिवसाच्या शुभेच्या देणा-याचे मनस्वी आभार


डा. विकास बाबा आमटे,  बंडू धोतरे, आशिष देव, आनंद आंबेकर, आशिष आंबाडे, पंकज शर्मा,  पप्पू देशमुख, प्रमोद काकडे, योगेश दुधपचारे, सचिन वझलवार, सचिन निंबाळकर, मनदीप रोडे, संदीप सिडाम, नरेश निकुरे,  धर्मेद्र लुणावत, अनिल ठाकरे, पुरषोत्तम चौधरी, शिरीष तपासे, किशोर वैद्य, वैभव देवतळे,  गोविल मेहरकुरे, विकास टिपले, योगेश देवतळे, क्रिष्णा निकुरे, बालकदास मोटघरे, देवानंद साखरकर, प्रकाश हांडे, हितेश गोहकर, दीपक फुलबांदे, नितीन बुरडकर, कृष्णकांत खानझोडे, घनशाम घरोटे, शशिकांत आक्केवार, धम्मशील शेंडे, विकास कुंभारे, आशिक महिलावार,


Moin SayedVishal MantriwarSunny Sonawale PatilVyenkatesh DudamwarUday DhakateArun WasalwarVivek Ghate , Ashwin SawalakheChetan Janaki , MalisamajYuvamanch Chandrapur, Parag AlavaniNarendra PalandurkarJitendra UpadhyeAkshay Lonare , Sandip RaipureAmol TekaleGhansham GedekarRajesh Prabhu SalgaonkarManish DongareJayant JenekarAanchal MuleGopal HagePranit TawadeAkash JagtapShyam LanjewarBhausaheb YeginwarYouths Way's Sunny Sonawale PatilChaitanya Chalakh1Shivkumar WaghmareNilesh DahatRajendra VarmaMalak ShakirRajesh SolapanVikrant Patil, Shrikant Pankantiwar


या शिवाय अनेकांनी माझ्या मोबाईलवर फोन करून शुभेच्या दिल्या. मात्र, मी अनेक जणांना नावाने प्रत्यक्ष ओऴखत नाही, त्याचेही आभार मानतो. कुणाची नावे सुटली असतील, तर त्यांनी राग मानू नये,  क्षमा असावी, 
मैत्री, प्रेम, सहकार्य असेच कायम ठेवावे… हीच अपेक्षा 
-
देवनाथ गंडाटे