काव्यशिल्प Digital Media: वर्धा

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu
Showing posts with label वर्धा. Show all posts
Showing posts with label वर्धा. Show all posts

Friday, February 08, 2019

अंधश्रद्धेचा समाजावर होणार परिणाम

अंधश्रद्धेचा समाजावर होणार परिणाम

अंधश्रद्धेचा समाजावर होणार परिणाम या विषयावर कारंजा येथील महाविद्यालाययात वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

उमेश तिवारी/कारंजा (घाडगे) वर्धा:
अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मुलन समिती व राष्ट्रीय सेवा योजना रा.तू.म.नागपूर विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयीन युवा जागृती अभियान 2018-2019 अंतर्गत अंधश्रद्धाचां समाजावर होणारा परिणाम या विषयावर अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा कारंजा यांच्या आयोजनाखाली तालुका स्तरीय वक्तृत्व स्पर्ध्येचे आयोजन नारायणराव काळे स्मृती मॉडेल कॉलेज कारंजा येथे आयोजित करण्यात आला होता.


यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ पी.जे काळे सर उद्घाटक प्राचार्य अंधारे   हे तर प्रमुख पाहुणे अंनिस चे तालुका संघटक राजकुमार तिर्भाने , डॉ अमित याहूल .डॉ मेंढे ,बार्टी चे समतादूत विनायक भांगे, सिध्दार्थ सोमकुवर  हे उपस्थित होते

यावेळी स्पर्ध्येचे मुल्यांकनाची  जवाबदारी समतादूत सिध्दार्थ सोमकुवर व अंनिस सहसंघटक राणसिंग बावरी यांनी पार पाडली. या स्पर्ध्येत तालुक्यातील  साक्षी सावरकर,प्रज्वल शिरपूरकर,कांचन बसिने,कोमल खवशी,भावना बंनगरे या स्पर्धकांनी सहभाग नोंदविला यात   प्रथम   वैभव ढोबळे, द्वितीय लोकेश सोनोने  व तृतीय कोमल खवसे यांनीं  प्राविण्य प्राप्त केले. या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी अंकित खांडवे,उद्देश वाल गावकार,प्रेरणा सावरकर,पूजा हिंगवे,प्रेमीला भांगे,वैभव ढोबळे अपेक्षा वरकडे, वैभव ठाकूर, रश्मी हिंगवे व निशा नासारे यांनी अथक परिश्रम घेतले.

Wednesday, February 06, 2019

दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू

दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू


उमेश तिवारी/कारंजा(घाडगे):
कारंजा (घा.) तालुक्यातील आजनडोह येथून कन्नमवरग्राम मार्ग धावसा या आपल्या गावाला जात असलेला रणजीत मानमोडे वय ४२वर्ष याची दुचाकी क्र. MH31CX2562 रोडवरील सागाच्या झाडावर धडकली आणि या अपघातात रणजीत मानमोडे यांचा जागीच मृत्यू झाला असून दुचाकीवर जखमी दोघांना कन्नमवरग्राम ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरिता नेले असून मृत रणजीत मानमोडे याचे शव कारंजा रुग्णालयात आणले आहे. दुचाकीवर तिघे जण स्वार होते. अपघात आज संध्याकाळी ६ वाजत्याच्या दरम्यान आजनडोह जवळील शिव नाल्याजवळ झाली. कारंजा पोलीस घटना स्थळी दाखल झाली आहेत.



कृषी प्रदर्शन व चर्चासत्राचा तालुक्यातील बहुसंख्य शेतकऱ्यांनी घेतला लाभ

कृषी प्रदर्शन व चर्चासत्राचा तालुक्यातील बहुसंख्य शेतकऱ्यांनी घेतला लाभ

उमेश तिवारी/कारंजा (घाडगे) वर्धा:

पंचायत समिती कारंजा व कृषिव्यवसायिक संघ कारंजा यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ०२/०२/२०१९ रोज शनिवार ला पंचायत समिती कारंजा घाडगे जिल्हा वर्धा येथे कृषी प्रदर्शन व चर्चासत्र चे आयोजन करण्यात आले होते . या कार्यक्रमाचे उद्घाटन सुरेशजी खवशी यांनी केले तर प्रमुख पाहुणे म्हणून राविभाऊ शेंडे अद्यक्ष कृषी व्यावसायिक संघ वर्धा जिल्हा हे होते यावेळी कार्यकर्माचे स्वागताध्यक्ष मंगेशभाऊ खवशी सभापती,उपसभापती रंजनाताई टिपले पं स कारंजा हे होते.

 तसेच समाजकल्याण सभापती निताताई गजाम जी प वर्धा, उमेशकुमार नंदागवळी गट विकास अधिकारी, जी प सदस्य रेवताई धोटे, सरीताताई गाखरे, अनिल आदेवर कृषी अधिकारी,पं स सदस्य जगदीश डोळे,टिकाराम घागरे,पुष्पा ताई चरडे, आम्रपाली बागडे,रोशनीताई ढोबळे सह आदी मान्यवर उपस्थित होते. सदर चर्चासत्रात संत्रा, मोसंबी व लिंबू फळपीक तसेच कापूस, सोयाबीन, तूर या पीकाचे तज्ज्ञ मार्गदर्शन द्वारे सखोल मार्गदर्शन डॉ श्रीवास्तवव NRCC नागपूर,डॉ अंजिता जार्ज, डॉ आर येस शिरजूशे, डॉ आर के दास, व महाले यांनी केले.

या प्रदर्शनात तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपला शेतमाल विक्रीसाठी आणला व त्याला ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिला,ऍपल बोर, ऊस, पपई, संत्रा, भाजीपाला, डाळ, तांदूळ इ संपूर्ण शेतमाल विकल्या गेला तसेच तालुक्यातील महिलाबचत गटांनी गृहोपयोगी व खाद्यपदार्थ, पापड, लोणचे, मशरूम, गुळपट्टी इ पदार्थांचे स्टॉल लावून विक्री केली.

तालुक्यातील प्रगतिशील शेतकर्यांचा सत्कार करण्यात आला त्यात केशवराव भक्ते हेटीकुंडी, सुनील ढोले बोरगाव ढोले, विनोद नासरे खरसखंडा, प्रशांत पुरी जोगा, वसंता अवथळे ब्राह्मणवाडा, श्रीराम चोपडे कारंजा, ज्ञानेश्वर भांगे कारंजा, श्रीमती सुनीता नेत्राम गाडगे बोनदरठाना , गजानन पेठे बोरगाव, माणिकचंद देशमुख नारा, प्रभाकर खवशी नारा,रमेश लोहकरे नागाझरी,विश्वजित आखरे चिंचोली,किशोर बंनगरे जसापूर, छायाताई गळहट चोपण या शेतकरी शेतकर्यांचा सत्कार करण्यात आला.

या कृषी प्रदर्शनात विशेष आकर्षण म्हणून, ऍग्री केअर फार्मर प्रोड्युसर कंपनीचे सीताफळ ज्युस व शेक, युवा प्रगतशील शेतकरी किशोर बंनगरे यांची विषमुक्त पपई, ऍपल बोर, ऊस,उमेद अभियानाचे विविध स्टॉल, पशुसंवर्धन विभाग आणि पाणी फौंडेशनचे प्रात्यक्षिक हे विशेष आकर्षण ठरले.

Monday, February 04, 2019

रामनाम संकीर्तन व पारिवारिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे आयोजन

रामनाम संकीर्तन व पारिवारिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे आयोजन

कारंजा (घाडगे) वर्धा/उमेश तिवारी:

रामाश्रयी सु श्री रामप्रियाश्रीजी (माई) यांच्या जन्मदिनाचे निमित्ताने रामाश्रयी परिवार कारंजा यांचे कडून गोंधणी गावाजवळ संत दर्शन ,रामनाम संकीर्तन व पारिवारिक स्नेहसंमेलन व विविध आध्यांत्मीक कार्यक्रमाचे आयोजनकरण्यात आले होते.यावेळीस रामप्रियाजीच्या हस्ते गणेश पूजन व गौपुजन करण्यात आले होते.स्वर गुरुकुनजाचे या शीर्षकाखाली भजन सादरीकरणाने उपस्थितांचे मने भारावून गेली.यावेळी माईंचा ग्रामगीतेद्वारे तुला करण्यात आला.

यावेळी प्रमुखपाहुणे म्हणून अवलिया श्री संत नामदेव महाराज मणिकवाडा, सयाजी महाराज शीवधारा, संतोष महाराज ,बोथे गुरूजी,हेमाद्रि दिदी ,नानीजी,महंत यंगेश्वर दास महाराज ,कौशलदास महाराज ,विश्वजागृती मिशऩ अमरावती ,आश्रमला जलसेवाज्यानी दिली असे श्रीकांतजी चांडक वायगाव ,वर्धा,मा ,श्री सुधीरजी दिवे सल्लागार मा केंद्रीय मंत्री जलसंधारण नदीविकास व गंगा पुनर्जीवन,सह आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी रामाश्रयी परिवाराच्या वतीने रामप्रियाजी (माई) च्या हस्ते सर्व भक्ताना ग्राम गिता व वृक्ष वाटप करुन भक्तांचे पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आले.गोंधणी येथे माईंना आश्रमशाळा करिता संत श्री विनायक उर्फ लटारे महाराज संथान कारंजा यांचे कडून भूमी दान करण्यात आली.यावेळी या कार्यक्रमाला लातुक्यातील बहुसंख्य गुरुदेव भक्त,लटारे महाराजांचे भक्त यांनी उपस्थिती दर्शवली.

Sunday, February 03, 2019

विहिरीत पडलेल्या बिबट्याला बाहेर काढण्यात यश

विहिरीत पडलेल्या बिबट्याला बाहेर काढण्यात यश

उमेश तिवारी/ कारंजा (घाडगे) वर्धा

 कारंजा : वन विभागाअंतर्गत असलेल्या मरकसूर येथील शेतातल्या विहिरीत पडलेल्या बिबट्याला बाहेर काढण्यात यश आले. शिकारीसाठी कुत्र्याच्या मागे धावताना विहिरीत बिबट्या पडला असल्याचे सांगितले जात आहे.

 कारंजा वनविभाग आणि जलद बचाव पथकाने बचाव मोहीम राबवत विहिरीत पिंजरा टाकून बिबट्याला सुखरुप बाहेर काढले. वैद्यकीय तपासणीनंतर त्याला त्याच्या अधिवासात सोडले जाईल, अशी माहिती देण्यात आली.

कारंजा (घाडगे) तालुक्यातील मरकसूर शिवारात श्याम वरोकर यांच्या शेतातील विहिरीत शुक्रवारच्या रात्री पडला. वरोकर त्यांच्या शेतात पाच कुत्रे आहेत. यातील एक कुत्रा पळताना दिसला. सोबत अन्य कुत्रेही पळू लागले. कुत्र्याला पाहताना विहिरीकडे गेले असता, वरोकर यांना विहिरीत बिबट्या पडलेला आढळला. त्यांनी तत्काळ माहिती वनविभागाला दिली. कारंजा वनपरिक्षेत्र अधिकारी दादा राऊत यांनी पाहणी केली. बचाव मोहीम राबवणे शक्य नसल्याने वन कर्मचाऱ्यांनी विहिरीवर पाळत ठेवली.

सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास वनविभागाच्या जलद बचाव पथकाच्या साह्याने बचाव पथकाने शेत गाठून बचावकार्य सुरु केले. बिबट्याला बाहेर काढण्यासाठी विहिरीत पिंजरा सोडण्यात आला. काही तासांच्या प्रयत्नानंतर बिबट्या पिंजऱ्यात गेला आणि वन विभागाने सुटकेचा श्वास सोडला. अखेर पिंजरा बाहेर काढत त्याला क्रेनच्या साह्याने हलविण्यात आले.

तब्बल तीन तासानंतर बिबट्याला काढले बाहेर - 

विहिरीत पडलेल्या बिबट्या हा साधारण साडेतीन वर्षांचा आहे. रात्री विहिरीत पडल्याने सकाळपासून मोहीम राबवण्यात आली. ही मोहीम वन विभाग आणि नव्याने तयार झालेल्या जलद पथक आणि बचावासाठी लागणाऱ्या साधनांच्या माध्यमातून फत्ते करण्यात आली. तब्बल तीन तासाच्या परिश्रमानंतर बिबट्या पिंजऱ्यात गेला आणि त्याला बाहेर काढण्यात आले, अशी माहिती कारंजा वनपरिक्षेत्र अधिकारी दादा राऊत यांनी दिली

विहिरीत पडलेल्या बिबट्याला बाहेर काढण्यात यश

Friday, January 25, 2019

कारंजा तालुक्यात ठिकठिकाणी जोरदार पावसाने शेती पिकाचे नुकसान

कारंजा तालुक्यात ठिकठिकाणी जोरदार पावसाने शेती पिकाचे नुकसान

कारंजा-घा/उमेश तिवारी:

  कारंजा तालुक्यात रात्री आलेल्या आस्मानी संकटामुळे शेतकऱ्याचे भारी नुकसान झालेले आहे. काजळी,रहाटी,जोगा, नागाझरी,धानोली,मेटंहिरजी येथे वादळी पाऊसासह गारपीट झाली. त्यामुंळे शेतक-याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सदर शेतकरी मोठ्या प्रमाणात रब्बी पिके घेतात त्यामध्ये गहु,चना, सत्रा, भाजीपाला या भागामध्ये मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतले जातात. गारपीट व वादळी पावसामुळे गहु मोठ्या प्रमाणात झोपला आहे. शेतक-याना  सत्रा या पिकाचा खुप आधार असतो पण  गारपीट  चा मार बसल्यामुळे सत्रा पिकाचे नुकसान झाले. 

मागल्या वर्षी सुद्धा गारपीट मुळे शेतक-याना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावा लागला. सतत यावर्षी सुध्दा शेतक-याना गारपीटचा सामना करावा लागला त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत सापडला आहे.  काजळी,रहाटी,जोगा, नागाझरी,धानोली,मेटंहिरजी येथील शेतक-याची मागणी आहे कि, शाषणाने सदर पिकाचे सर्वे करुन तातडीची नुकसान भरपाई शाषणाने द्यावी अशी मागणी या भागातील युवा शेतकरी लीलाधर दिग्रसे आणि शेतकरी करत आहे.

Thursday, January 10, 2019

वर्ध्यात गळफास घेऊन आत्महत्या

वर्ध्यात गळफास घेऊन आत्महत्या

उमेश तिवारी/कारंजा (घाडगे) वर्धा:

  सेलगाव(उमाटे) येथील रहिवासी सुरेश नत्थुजी गाखरे वय (४५वर्षे) यांनी आपल्याच शेताजवळील वनविभागाच्या जागेतील सागवानाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी बकरी चारणाऱ्या गुराखी डोमा कुरमती हा तेथे गेला असता त्याला प्रेत झाडाला लटकले असल्याचे दिसले.त्यांनी लगेचच त्याने गावात जाऊन त्याच्या घरी जाऊन हा घटनेची माहिती दिली.तत्काळत्याच्या नातेवाईक मंडळी व आजूबाजूच्यांनी शेताकडे धाव घेतली. वासुदेव दत्तूजी गाखरे यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली पोलिसांनी पंचनामा करून प्रेत हे ग्रामीण रुग्णालय कारंजा येथे उत्तरीय तपासणी करिता आणले. उत्तरीय तपासणी झालेले प्रेत पोलिसांनी मृतकाच्या नातेवाईकाला दिले. मृतकाच्या मागे पत्नी आणि एक मुलगी आहे. काही दिवसांपूर्वी मृतकाचा मुलगा दुचाकी अपघातात मरण पावला होता. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रामदास केंद्रे व योगेश चाहेर आणि त्यांचा चमू करीत आहे.
 जिल्हाधिकारी शैलेश नवल यांची कारंजा येथे भेट

जिल्हाधिकारी शैलेश नवल यांची कारंजा येथे भेट

उमेश तिवारी/कारंजा (घाडगे) वर्धा:

  कारंजा शहराने स्वच्छ सर्वेक्षण 2019 मध्ये सहभाग घेतला असून कारंजा शहरातील नागरिक या अभियानाला चांगला प्रतिसाद देत असून अधिकारी लोकप्रतिनिधी सुद्धा शहर स्वच्छ करण्यात समोर आले आहे . बुधवार दि. ९/०१/२०१९  ला सकाळी  वर्धा जिल्हाचे जिल्हाधिकारी शैलेश नवल यांनी नगर पंचायत कारंजा यांनी तयार केलेला घनकचरा व्यवस्थापन व कंपोस्ट खत युनिट ला भेट यावेळी जिल्हाधिकारी शैलेश नवल यांना घन कचरा व्यवस्थापन व कम्पोस्ट खत युनिट ची  कारंजा नगरपंचायत च्या मुख्याधिकारी पल्लवी राऊत यांनी माहिती दिली. 

व जिल्हाधिकाऱ्यांनी संपूर्ण युनिटची पाहणी केली. यावेळी सनसाईन स्कूल आणि गरुकुल पब्लिक स्कूल च्या विद्यार्थ्यांना स्वच्छतेवर मार्गदर्शन केले. काही ठिकाणी त्यांनी काही उपाययोजना दिल्या कारंजा नगर पंचायतला प्रत्येक प्रभागात स्वच्छतागृही गट तयार करून स्वच्छता चळवळ राबविण्याचे  जिल्हाधिकारी यांनी सुचविले. सोबत त्यांनी या व्यवस्थापन उपक्रमाचे उत्कृष्ठ नियोजन पाहून समाधान व्यक्त केले. 

आणि स्वच्छता मोहिमेत सहभागी सर्व संस्थांच्या उत्सुर्फ प्रतिसादाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले यावेळी तहसील कार्यालय येथे  कारंजा नगर पंचायत च्या वतीने उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी तहसीलदार सचिन कुमावत, मुख्याधिकारी , पल्लवी राऊत , नगराध्यक्षा कल्पना मस्के, नगर उपाध्यक्ष नितीन दर्यापूरकर, सह नगरसेवक  प्रेम महिले , सतीश इंगळे, मंगला जीवरकर, भगवान बुवाडे, विनोद जीवरकर सह नगरपंचायत कर्मचारी हजर होते.सध्या कारंजा नगर पंचायत यांनी स्वच्छतेचा विडा उचलून कारंजा शहर कचरा मुक्त करण्यासाठी सर्व प्रयन्त करत आहे. दररोज स्वच्छत्ता मोहीम राबविण्यात येत आहे.

Tuesday, January 08, 2019

स्वच्छता सर्वेक्षण 2019 साठी सरसावले कारंज्यातील प्रशासकीय अधिकारी वर्ग

स्वच्छता सर्वेक्षण 2019 साठी सरसावले कारंज्यातील प्रशासकीय अधिकारी वर्ग

उमेश तिवारी/कारंजा (घाडगे) वर्धा:

 अवतार मेहरबाबा केंद्र कारंजा यांच्या वतीने सोमवारी दि.  ७/१/२०१९ सकाळी ७.३० वाजता राबविण्यात आला, कारंजा शहराने स्वच्छ सर्वेक्षण २०१९ मध्ये सहभाग घेतला असून कारंजा शहरातील नागरिक या अभियानाला चांगला प्रतिसाद देत आहेत,सोबतच प्रशासनातील अधिकारी लोकप्रतिनिधी सुद्धा शहर स्वच्छ करण्यात समोर आले आहे.

 सकाळी शहरातील मुख्य रस्त्यावर व महामार्गावरील बायपास रोडवर नागरिकांनी व तहसीलदार सचिन कुमावत, मुख्याधिकारी , पल्लवी राऊत , नगराध्यक्षा कल्पना मस्के, नगर उपाध्यक्ष नितीन दर्यापूरकर, सह नगरसेवक  प्रेम महिले , मंगला जीवरकर, विलास वानखेडे भगवान बुवाडे, विनोद जीवरकर सह नगरपंचायत कर्मचारी सहभाग घेतला  आणि अवतार मेहेरबाबा केंद्राचे सेवेकऱ्यांनी स्वच्छ सर्वक्षण २०१९ मोलाचा सहभाग घेतला .
 दरवर्षी कारंजा मध्ये होणाऱ्या लटारे महाराज पुण्यतिथी उत्सवाला अवतार मेहरबाबा केंद्र सहभागी असतो .


Sunday, January 06, 2019

मागण्या मंजूरीनंतरच भरला कारंजाचा आठवडी बाजार

मागण्या मंजूरीनंतरच भरला कारंजाचा आठवडी बाजार

उमेश तिवारी:कारंजा (घाडगे)वर्धा:

स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत आठवडी बाजारात दुकानदारांना बसण्यासाठी पुरेशी जागा मिळवून देणे व बाजार परीसर स्वच्छ सुंदर व सुव्यवस्थीत राखण्यासाठी कारंजा नगरपंचायत प्रशासनाने कामे सुरू केली असता आज आठवडी बाजाराच्या दिवशी दुकानदारांनी अचानकपणे आपल्या मागण्या साठी काही काळ बाजारपेठ बंद करण्याचा प्रयत्न केला.
दुकानदारांच्या मागण्या मंजूर करीत असल्याच्या आश्वासनानंतरच बाजार भरविण्यात आला. भाजीपालामालाचे व दुकानदाराचे कोणतेही नुकसान होऊ नये व परिस्थिती हाता बाहेर जाऊ नये म्हणून सुरवातीलाच सकाळी नगरपंचायतचे पदाधिकारी उपाध्यक्ष नितीन दर्यापूरकर , शिक्षण सभापती प्रेम महिले ,माजी उपसरपंच उमेश चाफले यांचेसह मुख्य कार्यपालन अधिकारी पल्लवी राऊत यांनी दुकानदारासोबत चर्चा करून योग्य तोडगा काढण्यासाठी चर्चा सुरू केली असता दुकानदारांनी फारसा प्रतिसाद दिला नाही.

 त्यामुळे दुपारी १२ वाजेपर्यंत आठवडी बाजार भरण्यासाठी अडथळे येत गेले. ४ जानेवारी पासून स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत विविध कामे कारंजा शहरात सुरू आहे त्याच दृष्टीने आठवडी बाजारात सुद्धा स्वच्छता व शिस्त राखावी म्हणून प्रशासनाने काही चांगली कामे करण्याचा सपाटा लावला होता त्या अंतर्गत शनिवारी बाजारात सपाटीकरण करण्यात आले. सदर कामे करीत असतांना रविवारी बाजारात अडथळा येणार नाही याची दक्षता घेण्याची माहिती सुध्दा काही नागरीकांनी प्रशासनाला दिली होती.

आज आठवडी बाजाराच्या दिवशी बाजारात आलेल्या दुकानदारांना सपाटीकरणात ओटेच नसल्याचे दिसून आले.दुकाने मांडताना प्रशासनाची भूमिका मान्य नसल्यामुळे दुकानदारांनी बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आणि या बाबीमुळे तात्पुरती तणावसदृश परिस्थिती निर्माण झाली त्यातूनच प्रशासनाने योग्य तोडगा काढण्याच्या दृष्टीने दुकानदारा सह चर्चा केली व त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या. दुकानदार आपल्या पूर्ववत जागेवरच बसतील ,सपाटी करणात तोडण्यात आलेले मातीचे ओटे ८ दिवसात तयार करून देण्यात येईल, या मुख्य मागणी सह इतरही मागण्या मान्य करण्यात येत असल्याचे नगरपंचायतच्या मुख्यकार्यकारी अधीकारी पल्लवी राऊत यांनी उपस्थिता समोर सांगितले.

यावेळी दुकानदाराच्या वतीने माजी सभापती मोरेश्वर भांगे, माजी सरपंच शिरीष भांगे माजी सरपंच शांताराम ढबाले, नगरसेवक संजय कदम, नगरसेवक शेख निसार, किशोर भांगे, काकडे सर व इतरही नागरिक उपस्थित होते. पोलीस प्रशासनाच्या वतीने उपविभागीय पोलिस अधिकारी मैराळे यांच्या सह पोलिसांनी सहकार्य केले.स्वच्छ शहर सुंदर शहर करण्यासाठी प्रशासन चांगले काम करीत असल्याची चर्चा उपस्थित नागरीक करीत होते.परंतु बाजार सुव्यवस्थीत करण्याची शनिवारची वेळ योग्य नव्हती असा सूर उमटत असल्याचे दिसून येत होते.

Friday, January 04, 2019

कडाक्याच्या थंडीच्या लाटेत  शेतपीके करपली

कडाक्याच्या थंडीच्या लाटेत शेतपीके करपली

कारंजा - काटोल तालुक्याचे शेतकरी पुन्हा हवालदिल
उमेश तिवारी/कारंजा वर्धा:
 राज्याच्या उपराजधानी सह उपराजधानीच्या लगतच्या वर्धा जिल्हा व नागपुर जिल्ह्यातील काटोल -तालुक्याच्या  सालई-नांदोरा खुर्सापार,सबकूंड, वाई -चिखली-कचारी सावंगा,बोरगाव,कोंढाळी,तरोडा;  सह लगतच्या वर्धा जिल्ह्याचे काजळी-जोगा हेटी;धानोली,मेट गरमसुर  या परिसरातील शेतीतील पीकांन वर २८,२९,३०डिसेंम्बर  चे रात्रीला पडलेल्या थंडिच्या कडाक्यात   शेतातिल मुख्यत्वे  करून तूर  -यापिकासह-मिरची--चना-कपाशी-व हळद  पीकांन वर करपा गेल्याने उभे पीक  शेतकर्यांचे हातून गेल्यात जमा आहे. खरीप आधीत हातून गेले,ज्या शेतकर्यांकडे थोडे फार पाण्याचे साधन होते या मुळे  काही पीक तूर हळद मिरची  कपाशी  तर  भाजिपाला बागयती   ०५-१%शेतकर्यांकडे होत्या त्या ही २८-व-२९डिसेंम्बर चे रात्रीच्या कडाक्याच्या थंडी च्या लाटेच्या प्रभावाखाली आल्याने या सर्व पीकांन वर करपा गेल्या मुळे संपुर्ण नागपुर व वर्धा जिल्ह्यालाच  पुर्ण दुष्काळग्रस्त जिल्हे घोषीत करन्याची मागणी कोंढाळीचे सरपंच केशव धुर्वे व उप सरपंच स्वप्निल व्यास व त्यांचे  सर्व ग्रा. प. सहकार्यांनी  केली आहे.तसेच काजळी चे शेतकरी साहेबराव घागरे यांनी मागणी केली आहे.

Tuesday, January 01, 2019

कारंजाच्या सामीक्षा यावलेचे हस्तलेखन परिक्षेत यश

कारंजाच्या सामीक्षा यावलेचे हस्तलेखन परिक्षेत यश

उमेश तिवारी/कारंजा (घाडगे):

समीक्षा सुरेंद्र यावले ही कारंजा येथील मुलगी धनवेट राष्ट्रीय महाविद्यालय नागपूर येथून हस्तलेखन स्पर्धेतील द्वितीय बक्षीस, उद्दिष्ट परीक्षा उत्तीर्ण होणारा दुसरा पुरस्कार,
सर्वोत्तम लायब्ररी विद्यार्थी पुरस्कार म्हणून प्रथम पुरस्कार आणि सर्वोत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार म्हणून प्रथम पुरस्कार,
एमए (मराठी साहित्य) तृतीय विद्यापीठातील टॉपर्समध्ये 70% गुण मिळवले असून कारंजा शहर आणि शाळा, विद्यालय आणि महाविद्यालयात सामीक्षाचे कौतुक  होत आहे.


Sunday, December 30, 2018

पतीने साडीने आवळला पत्नीचा गळा

पतीने साडीने आवळला पत्नीचा गळा

उमेश तिवारी/कारंजा(घाडगे): 
पतीने पत्नीला साडीने गळा आवळुन मारल्याची घटना आज रविवार दुपारी १ वाजताच्या सुमारास कारंजा येथून जवळच असलेल्या येनगाव रस्त्यावर सोनेगाव (रिठे) या शिवारात घडली. आरोपी गोवर्धन तुळशिराम निकोसे(वय३८वर्ष) राहणार धावडी यांनी आपल्याच पत्नीची अर्चना गोवर्धन निकोसे (वय ३० वर्ष) तिच्याच साडीने गळा आवळुन जीवन यात्रा संपवून टाकली . मृतकाचे लग्नाला १३ वर्ष झाले होते. २ मुली आणि १ मुलगा असा मृतकाचा संसार होता.

पती पत्नी मध्ये नेहमीच वाद व्हायचा म्हणून मृतक ८ दिवसापासून माहेरी मासोद (कामठी) गेली होती. दि. २९/१२ ला आरोपी स्वतः जावून पत्नीची समजूत घालून गावाला आणले. आणि ३०/१२ तारखेला ही घटना घडली. आरोपी स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाला. मृतकाची उत्तरीय तपासणी उदयाला ३१डिसेंबरला होईल.निकोसे हा परिवार धावडी(बु.) गावाचा असून कारंजामध्ये किरयाने राहत आहे. पुढील तपास कारंजा पोलीस करत आहे.

Wednesday, December 26, 2018

कारंजा येथे तहसिल कार्यलयात राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा

कारंजा येथे तहसिल कार्यलयात राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा



उमेश तिवारी/ कारंजा, वर्धा प्रतिनिधी

कारंजा येथिल तहसिल कार्यलयाकडुन राष्ट्रीय ग्राहक दिना निमित्य कार्यक्रमाचे आयोजन करन्यात आले हौते.यात अद्यक्श स्थानी निवाशी नायब तहसिलदार ऐ.पी.साळवे तर प्रमुख मार्गदर्शक अखिल भारतीय ग्राहक पंच्यायतचे जिल्हा उपाध्यक्ष आनिल भांगे हे तर पाहूने म्हणून नगराध्यक्ष कल्पनाताई मस्की ,तालूका संघटक अजयराव भोकरे ,नायब तहसिलदार एम.एम.टिपरे,डि.ऐम.राउत, उपस्थीत होते ,स्वामी विवेकानंद यांच्या प्रतीमेला वंदन करुन उपस्थीत ग्राहकांच्या प्रश्नांची निवारण अनिल भांगे यांनी केले.यावेळी ग्राहकांनी सदैव जागृत राहाण्याचे आवाहन मार्गदर्शकांनी केले.तहसिल कार्यलयातील सर्वांनी यशस्वीतेकरीता सहकार्य केले.

Monday, December 24, 2018

वर्ध्यात शेतकऱ्याची आत्महत्या

वर्ध्यात शेतकऱ्याची आत्महत्या

उमेश तिवारी/कारंजा(घाडगे): 
                       
                                                                                        वर्धा जिल्ह्यातील मौझा बेलगाव तालुका कारंजा(घाडगे) येथे एका शेतकऱ्यांची आत्महत्या हरिदास शामरावजी आमझीरे वय ५० यांनी सोमवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास शेतात जाणाऱ्या रस्त्यांवर असणाऱ्या सागाच्या झाडाला स्वतःच्या पांढऱ्या दुप्पटाने फाशी घेऊन स्वतःची जीवनयात्रा संपविली.
घरच्यांच्या माहितीवरून सततच्या नापिकी व कर्जबाजारी पणामुळे ते नेहमी काळजीत असायचे यंदा पिकी जेमतेम त्यावर बँकेचे कर्ज तसेच कुटुंब कसे चालवायचे हाच विचार त्यांना नेहमी त्रास देत असायचा त्यामुळे त्यांनी आज हा निर्णय घेतला असावा असे सांगण्यात आले.
त्यांच्या मागे पत्नी दोन मुलं एक मुलगी असा बराच मोठा आप्तपरिवार आहे जेमतेम ५ एकर कोरडवाहू शेती असून ती सामायिक आहे. त्यात बरेच नाव समाविष्ट असून त्यांच्या उदरनिर्वाह करण्याकरिता त्यांना २ एकर शेती दिलेली आहे.परंतु यंदा निसर्ग कोपल्याने,(पावसाने) दळी मारल्याने त्यांना शेतीत बराच मोठा फटका बसला त्यामुळे ते नेहमी काळजीत असायचे म्हणून त्यांनी आज आपले जीवन संपवून टाकण्याचा निर्णय घेऊन आज सकाळी घरून जंगलात जाण्यासाठी निघाले आणि गावालगत असलेल्या कालव्याच्या पुलाच्या जवळ असलेल्या सागाचे झाळाला जवळ असलेल्या दुपट्टा झाडाला बांधून गळ्यात लटकविला आणि आपली जीवनयात्रा संपविली.






Sunday, December 23, 2018

एसटी बस मधून ८३ हजाराची दागिन्यांची चोरी

एसटी बस मधून ८३ हजाराची दागिन्यांची चोरी



उमेश तिवारी/ कारंजा (घाडगे) वर्धा
नागपूर कडून आर्वी कडे जाणाऱ्या भंडारा आर्वी एसटी बस क्र. MH40Y5559 या बसमधून ८३ हजार रुपयांचे दागिने बसमधून चोरी गेल्याची घटना काल २२ डिसेंबर सायंकाळी ५.३० ला टोल नाक्यावर बस थांबली असतांना घडल्याचे लक्षात आले. ही बस टोलनाक्यावरून कारंजा बसस्थानकावर परत आणल्यानंतर बसस्थानक प्रमुख नंदू मडावी यांनी तुरंत पोलीस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आली. आर्वीला जाण्यासाठी वैशाली जीवन चौधरी वय २५ वर्ष या महिला बसमध्ये प्रवास करत असतांना. अज्ञात चोरट्यांने संधी साधली.

तक्रारीनुसार-१सोन्याचे नेकलेस (१०ग्राम), १सोन्याची पोत (३०ग्राम), १सोन्याची नथ(१ग्राम), लहान मुलीच्या तोरड्या (१०ग्राम) एकूण ८३ हजाराचे ऐवज चोरीला गेले. सध्या बसमधून दागिने चोरी जाण्याचा प्रकार वाढत आहे. त्यामध्ये महिलांचाही समावेश असल्याचे वृत्त आहे. पुढील तपास कारंजा पोलीस करीत आहे.

Thursday, December 13, 2018

 वाहनाच्या धडकेत अस्वल गंभीर जखमी

 वाहनाच्या धडकेत अस्वल गंभीर जखमी


उमेश तिवारी/करंजा (घाडगे)
        अज्ञात वाहनाच्या घटनेत एक अस्वल जखमी झाल्याची घटना आज सकाळी राजनी शिवारात पहाटेच्या सुमारास घडली या संदर्भात ओरिएंटल टोल नाका कर्मचारी रितेश चव्हाण आणि रामभाऊ डाखोळे यांनी वन विभागाला माहिती देताच वन विभागाचे  वन परिषद अधिकारी दा.वि. राऊत,क्षेत्र सहायक लोणकर,कांबळे,डोबल,कडसाईत, सोनवणे अधिकारी आणि कर्मचारी इत्यादी तात्काळ घटना  स्थळ गाठले आणि वन विभागाच्या गाडी मध्ये  अस्वलीला गाडीत टाकून आमझिरी रोपवाटिका गारपीट येथे नेऊन अस्वलीवर उपचार करण्यात आला.
      अस्वलीला हाताला आणि डोक्याला जबर मार असून पुढील उपचाराकरिता अस्वलीला नागपूरला नेण्यात आले.
       माहितीनुसार अस्वलीचा आपघात हा राष्ट्रीय महामार्ग ओलांडताना   घडली असावी. ही घटना कारंजा वनपरीक्षेत्र येथील आहे.

Sunday, December 02, 2018

सत्यपालची सत्यवाणी" हा प्रबोधनात्मक कार्यक्रम ठाणेगांव येथे संपन्न

सत्यपालची सत्यवाणी" हा प्रबोधनात्मक कार्यक्रम ठाणेगांव येथे संपन्न

उमेश तिवारी/कारंजा(घाडगे):
ठाणेगाव येथे काकडा आरती उत्सव मंडळाच्या वतिने कार्तिक मास निमित्य ता.कारंजा घा. जि.वर्धा येथे रेकॉर्ड गर्दी मध्ये २८ नोहें २०१८ ला रात्री ८.०० वा.जनजागृती साठी जाहीर कीर्तनाचा कार्यकम गेली ५२ वर्षांपासून आजपर्यंत महाराष्ट्रातील लोकप्रियतेचे असलेले सर्व उच्चांक मोडलेले सप्तखंजेरी चे निर्माते राष्ट्रीय समाजप्रबोधनकार सत्यपाल महाराज यांचा मनोरंजनातून प्रबोधनात्मक सत्यपालची सत्यवाणी हा कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी गणेश शिंदे नावाच्या एका व्यसनाधीन युवकाने दारू सोडण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला.त्यामुळे महाराजांनी त्याचा सपत्नीक साडी व शाल तसेच पुस्तके सप्रेम भेट देवुन सत्कार केला. कीर्तनातून सत्यपाल महाराजांनी संत तुकाराम,फुले,शाहू,आंबेडकर,गाडगे बाबा,तुकडोजी महाराज यांच्या विचाराची समाजाला आज खऱ्या अर्थाने गरज आहे हे सांगितले.तसेच त्यांनी कीर्तनातून देशातील शेतकरी बांधव कसा सुखीहोईल,व्यसनमुक्ती,अंधश्रद्धा जुन्या रूढी परंपरा,संघटन,स्त्री भ्रूण हत्या,शैक्षणिक विकास,स्वच्छ भारत अभियान,हागणदारी मुक्त ग्राम,पॉलिथीन बंदी,घनकचरा वर्गीकरण(ओला सुका),तरून तरुणीं चे निर्णय या विषयांवर जनजागृती केली.यावेळी लहान मुलामुलींना चालु घडामोडीवरील प्रश्न विचारले व उत्तर दिल्यावर त्यांना बक्षीस म्हणून गाडगे बाबा चे अखेरचे कीर्तन,सत्यानाश,

मराठामार्ग,ग्रामगीता ही पुस्तके भेट म्हणून दिली व "वाचालतरवाचाल" हा संदेश दिला.तसेच यावेळी गरजू मुलामुलींना खाऊ म्हणून काही रक्कम भेट दिली.महाराजांनी आपल्या पत्नी निसर्गवासी सुनंदाताई सत्यपाल चिंचोळकर यांच्या स्मरणार्थ -- दारू पिऊन ज्या महिलेचा पती मरण पावला अशा २ ते ३ महिलांचा व रक्तदान केलेल्या महिलांचा कीर्तनामध्ये साडी देऊन सत्कार घेतला जेणेकरून उपस्थित श्रोत्यांना दारू चे वाईट परिणाम कळतील व रक्तदान देहदान अवयवदानाचे महत्व कळावे.त्या महिलांना दारू मुळे होणारे दुष्परिणाम सांगायला लावले.तसेच म्हाताऱ्या वृद्ध व्यक्तीचा आई वडील म्हणून शाल देऊन सत्कार केला.कार्यक्रमाला परिसरातील हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता.राष्ट्रवंदनेने कार्यक्रमाचा समारोप झाला त्यांच्या किर्तनाला संगीताची 
पेटीवादक गजानन चिंचोळकर ,तबला वादक रामभाऊ तांबटकर,सहकारी सुनील चिंचोळकर व चालक राजू काइंगे यांना साथ दिली.

Tuesday, November 27, 2018

26/11 हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली अर्पण

26/11 हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली अर्पण



उमेश तिवारी/कारंजा(घाडगे)
 कारंजा (घा ) -महाराष्ट्राची राजधानी मुंबई  शहरावर आज पासून 10 वर्षांपूर्वी घडलेल्या भ्याड आतंकवादी हल्ल्यातील वीर शाहिद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली  . स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नागरिकांच्या सुरक्षेप्रति आपले कर्तव्य बजावत जवानांनी आपले प्राण गमावले होते. संपूर्ण देश 26/11 चा हल्ला विसरू शकणार नाही व येणाऱ्या दशकात विसर पडणार नाही ,असा घाव संपूर्ण देशातील नागरिकांच्या हृदयात पडला आहे, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
 कारंजा शहरातील मित्र परिवाराच्या वतीने नगरपंचायत कॉम्प्लेक्स परिसरात शहिदांना श्रद्धांजली सभेच आयोजन करण्यात आले होते. सुरुवातीला 26/11 च्या हल्ल्यातील घडलेल्या घटनांची रीतसर माहिती देत जवानांच्या स्मृती उजाळा देण्यात आला. त्यानंतर उपस्तीत मान्यवर , व्यापारी , नागरिक व विद्याथ्यानच्या वतीने कँडल लावून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली . मौन श्रद्धांजली अर्पण करून मा .सुभाष अंधारे सर ,पोलीस उप-निरीक्षक मा. केंद्रे साहेब ,मा. विलास वानखडे सर व मा .प्रेम महिल्ले सर यांनी हल्ल्यातील घटनेची माहिती देत शाब्दिक श्रद्धांजली अर्पण केली. श्रद्धांजली कार्येक्रमाला कारंजा शहरातील मान्यवर नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्तीत होते कार्येक्रमाचे सूत्रसंचालन मा पवन ठाकरे सर यांनी केले तर कार्येक्रमच्या यशस्वीते करिता  स्थानिक मित्रपरिवारने सहकार्य केले .

Sunday, November 25, 2018

कार वाचविण्याच्या प्रयत्नात टँकर उलटली

कार वाचविण्याच्या प्रयत्नात टँकर उलटली



करंजा (घाडगे)/ उमेश तिवारी, खबरबात

येथील चक्रीघाट जवळील राष्टीय महामार्गलगतच्या पांडे पट्रोलपंपावरून पेट्रोल भरून चारचाकी (कार) विरुद्ध दिशेने नागपूरला जात असताना चारचाकी (कार) वाचविण्याचा प्रयत्नात नागपूर वरून मुबाईकडे जाणाऱ्या HP गॅसचा टँकर क्र. MH12 QG 1460 हा पलटी झाला दोन ते तिनदा पलटी झाला ही घटना आज सकाळी ८.३० ते ९.०० च्या सुमारास घडली.

२ जण गंभीर जखमी
 या घटनेने टँकरचे तोंड नागपूरकडे उलटले त्यातील क्लिनर शनी चोबे वय १८ वर्ष रा. फतेपुर (उप्र) गँभिर जखमी असून चालक आशिष प्रजापती वय २८ वर्ष रा. चेंबूर (मुबंई) हा किरकोळ जखमी आहे त्यांना कारंजा येथील ग्रामीण रुग्णालयातील उपचारांनंतर नागपूरला पूढील उपचारासाठी पाठविण्यात आले. या घटनेत जर कारला टँकरची धडक बसली असती तर प्राणहानी झाली असती असे प्रत्यक्षदर्शी सांगतात. PSI केंद्रे पुढील तपास करीत आहे.