काव्यशिल्प Digital Media: माउंट कार्मेल

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu
Showing posts with label माउंट कार्मेल. Show all posts
Showing posts with label माउंट कार्मेल. Show all posts

Tuesday, January 23, 2018

केजीच्या विद्यार्थिनीला शिक्षिकेची अमानुष मारहाण

केजीच्या विद्यार्थिनीला शिक्षिकेची अमानुष मारहाण

चंद्रपूर/( ललित लांजेवार ):
चंद्रपूर येथील माउंट कार्मेल शाळेच्या केजी II  या वर्गात शिकणाऱ्या एका तीन ते चार वर्षांच्या चिमुकलीला फळ्यावरचे  विद्यार्थिनीने नीट लिहिले नसल्याच्या कारणावरून शिक्षिकेने अमानुषपणे मारहाण केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.  निवेदिता सरकार असे या विद्यार्थिनीचे नाव आहे.निवेदिता हि चंद्रपूर येथील माउंट कार्मेल शाळेच्या केजी २ वर्गात शिकते, निवेदिता हि हुशार विद्यार्थिनी आहे,ती वर्गात समोरच्या बाकावर बसते.मात्र शिक्षिकेने फळ्यावर लिहून दिलेला अभ्यास न केल्याने अमानुषरित्या या विद्यार्थिनीला बेदम मारत तिच्या डोक्यावरील केस उपटले, हा संपूर्ण प्रकार तेव्हा समोर आला जेव्हा संध्याकाळी निवेदिता शाळा संपवून घरी आली.हात-पाय धुतल्यावर आईचे लक्ष तिच्या केसांकडे गेलं तेव्हा नवोदिताच्या आईने तिला विचारपूस केली,तेव्हा चिमुकल्या नवोदिताने जे सांगितलं ते सर्व पालकांना धक्का बसावा असच होत.
हा संपूर्ण प्रकार माहित होताच नवोदितांच्या पालकांनी शाळा गाठली अन या संपूर्ण प्रकाची विचारपूस केली प्रत्यक्षात आईने त्या ठिकाणी जाऊन बघितले व मुख्याध्यापिकेला या संपूर्ण प्रकारची माहिती मागितली. तेव्हा हा संपूर्ण प्रकार घडला असून आम्ही त्या शिक्षिकेला शाळेतून काढून टाकल आहे असे उत्तर मिळाले,सोबतच निवेदिताचे केस उपटण्याच्या प्रकारावर मुख्याध्यापिकेने सारवासारव करत तिचे केस तसेच होते असं उत्तर मिळाले, मात्र संपूर्ण प्रश्नाची उत्तर हि समाधान कारकनव्हती.  विध्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सर्व शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहे हा सीसीटीव्ही कॅमेरा नवोदितांच्या वर्गात देखील लावला होता, त्यामुळे पालकांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची फुटेज बघण्याचा आग्रह धरला, तेव्हा हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात  कैद झाला होता, हे सगड बघत असतांना नवोदितांच्या पालकांना धक्काच बसला. याच सोबत विध्यार्थ्यांना मिळणाऱ्या अनेक शिक्षा देखील या सीसीटीव्हीत कैद झाल्या होत्या. त्यामुळे पडदा टाकल्या जाणाऱ्या या संपूर्ण प्रकरणावरून सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोल खुलली.
  याआधी देखील  शाळेचा दर्जा कायम राखण्यासाठी  याच माउंट कार्मेल शाळेत विध्यार्थ्यांला नापास करण्याचा संतापजनक प्रकार पुढे आला होता तेव्हा देखील हि शाळा चांगलीच चर्चेत आली होती. निवेदिताच्या या प्रकरणामुळे पुन्हा एकदा इंग्रजी शाळेतील शिक्षकांचा चेहरा पालकांसमोर आला आहे. या संपूर्ण प्रकारावरून पालक वर्गात चांगलीच खडबड उडाली आहे.रामनगर पोलिसांनी शिक्षिका मल्लिका सरकार हिच्यावर कलम ३२३ नुसार अदखल पात्र गुन्हा नोंदविला आहे. दरम्यान, विद्यार्थिनीला मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे पालक वर्गाकडून शिक्षिकेविषयी रोष व्यक्त केला जात आहे दिवसेंदिवस शुल्कवाढ करून विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्याच्या नावाखाली त्यांना अमानुषपणे  मारहाण करत संपूर्ण नियम धाब्यावर बसवीत विध्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ खळणाऱ्या अश्या शाळांवर काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले राहणार आहे . 

mount carmel chandrapur साठी इमेज परिणाम