সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Thursday, July 19, 2018

सौभाग्य योजनेंतर्गत महावितरणची प्रभावी कामगिरी;

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून महावितरणचे कौतुक
नागपूर/प्रतिनिधी:
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या सौभाग्य योजनेंतर्गत महाराष्ट्राने प्रभावी कामगिरी केली असून आतापर्यन्त ४७ हजार लाभार्थ्यांना या योजनेत नवीन वीजजोडणी देण्यात आली आहे. या योजनेचा पंतप्रधानांनी व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये आढावा घेतला यावेळी पंतप्रधानांनी स्वातंत्रानंतर ७० वर्षांनंतर महावितरणने समुद्राच्या तळाशी मरीन केबल टाकून घारापुरी बेटाच्या विद्युतीकरणाच्या कामाचे पुन्हा एकदा कौतूक केले. अशा कामांचा देशाला अभिमान वाटतो असेही ते यावेळी म्हणाले. घारापुरी बेटाच्या विद्युतीकरणासाठी ऊर्जामंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांनी विशेष प्रयत्न केले आहेत.
सौभाग्य योजनेत शहरी व ग्रामीण भागात विद्युतीकरण न झालेल्या घरांना वीजजोडणी देण्यात येत असून यात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लाभार्थ्यांना नि:शुल्क तर इतर लाभार्थ्यांना नाममात्र ५00 रुपये शुल्क भरून वीजजोडणी देण्यात येत आहे. महाराष्ट्रात आतापर्यन्त ४७ हजार लाभार्थ्यांना या योजनेत वीजजोडण्या देण्यात आलेल्या आहेत. उर्वरित सर्व लाभार्थ्यांना दि. ३१ डिसेंबर २०१८ पर्यन्त वीजजोडणी देण्यात येणार आहे. महाराष्ट्रात ग्रामीण व शहरी भागातील वीजजोडणीपासून वंचित असणाऱ्या कुटुंबांना वीजजोडणी देण्यासाठी १९४५ कोटी रुपये खर्च येणार आहे.
सौभाग्य योजनेच्या देशभरातील लाभार्थ्यांशी पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी आज गुरुवारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. यावेळी महाराष्ट्रातील लाभार्थीही उपस्थित होते. मा. पंतप्रधानांनी याप्रसंगी महावितरणने केलेल्या घरापुरी बेटाच्या विद्युतीकरण कामाचे विशेषत्वाने कौतुक केले. यापूर्वीही मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी दि. २५ फेब्रुवारी २०१८ च्या 'मन की बात' या कार्यक्रमात घारापुरी बेटाच्या उल्लेखनीय कामाचे कौतुक केले होते.नागपूर जिल्ह्यातील सुमारे २५ लाभार्थ्यांशी थेट सवांद साधला यावेळी कार्यकारी संचालक (प्रकल्प) प्रसाद रेशमे, अधीक्षक अभियंता उमेश शहारे. मनीष वाठ नारायण आमझरे, हरीश गजबे, कार्यकारी अभियंता राजेश घाटोळे, दिलीप घाटोळ आदी अधिकारी नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित होते.


শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.