काव्यशिल्प Digital Media: शामकुळे

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu
Showing posts with label शामकुळे. Show all posts
Showing posts with label शामकुळे. Show all posts

Thursday, July 12, 2018

महाकाली यात्रा परिसरातील वीजवाहिण्या भूमिगत करा

महाकाली यात्रा परिसरातील वीजवाहिण्या भूमिगत करा

आमदार नानाजी शामकुळे यांची मागणी
चंद्रपूर/प्रतिनिधी:
चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील शहरातील तिर्थस्थळ विकास निधीतून चंद्रपूरचे आराध्य दैवत महाकाली देवी यात्रा परिसरातील वीजवाहिण्या या अपघातप्रवण स्थळाच्या श्रेणीत येत असल्याने त्या भूमिगत करण्यासाठी 4 कोटी 63 लक्ष 24 हजाराच्या निधी उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार नानाजी शामकुळे यांनी उर्जा व पर्यटन राज्यमंत्री मदन येरावार यांच्याकडे केली़
चंद्रपूर शहरात महाकाली देवीचे प्राचीन मंदिर आहे़ चैत्र महिन्यात होणाºया यात्रेला लाखो भाविक येतात़ येथील वस्ती जुनी असल्याने पूर्वीचे अरुंद रस्ते आता रुंद झाले़ मात्र, रस्त्यावरील विजेचे खांब तिथेच असल्याने वाहतुकीस गैरसोय होत आहे़ शिवाय उपरी भागातून जाणाºया विजतारांमुळे इमारतींना धोका निर्माण झाला आहे़ अनेकदा घरांवरुन जाणाºया या तारांमुळे अनेकांचा जीव जाण्याची भिती नाकारता येत नाही़ पावसाळ्याच्या दिवसात हे खांब आणि वीज तारा धोकादायक ठरू लागल्याने वीजपुरवठा भूमिगत वाहिनीच्या माध्यमातून होण्याची गरज आहे़ या ठिकाणच्या वीजवाहिण्या सुरक्षितस्थळी स्थानांतरीत करण्यासाठी आवश्यक निधिसाठी आमदार नानाजी शामकुळे पाठपुरावा करीत आहेत़ यात महाकाली यात्रा परिसरातील भिवापूर, अंचलेश्वर गेट, बागला चौक, बाबूपेठ या वर्दळीच्या ठिकाणी उपरी वीजवाहिण्या भूमिगत करणाची मागणी नागपूर येथील पावसाळी अधिवेशनात संबंधित मंत्र्यांकडे केली आहे़