राजुरा तालुक्यातील विरूर पुलिस स्टेशन हद्दीतील पंचाला गावात सोमवारी बरसलेल्या मुसळधार पावसामुळे
घराची भींत पडून एकाच परिवारातील ३ जण ठार,तर एक जण गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे,सोमवारी परिसरात मुसळधार पाउस आला.त्या पावसाच्या पाण्याने भिंतीत ओलावा साचला.मंगळवारी सकाळी ८ ते ९ वाजताच्या दरम्यान हि भिंत तेथे बसलेल्या चारही लोकांच्या अंगावर पडली, यात बापूजी वडस्कार ६८ , धनराज वडस्कार ४० , चंद्रकांत वडस्कार ३७ यांचा जागीच मृत्यू झाला तर विठ्ठल वडस्कार हे गंभीर जखमी आहेत,हे संपूर्ण लोक एकाच परिवारातील असल्याची प्राथमिक माहिती आहेजिल्ह्यातील अनेक भागात रात्री 12 वाजतापासून पावसाला सुरुवात झाली. काही भागात वादळी पाऊस झाला. यामध्ये पंचाळा येथील बापूजी वडस्कर यांच्या घराचे छप्पर कोसळले. आज सकाळी हे छप्पर काढण्यासाठी चंद्रकांतला बोलाविले होते. बापूजी, धनराज, चंद्रकांत व विठ्ठल हे चौघेही छप्पर बाजूला करीत असताना रात्री झालेल्या पावसात भिजलेली भिंत अचानक कोसळली. भिंतीच्या मलब्याखाली चौघेही दबले. यात तिघांचा मृत्यू झाला. घटनेची वार्ता पसरताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत तिघांचा प्राणज्योत मालवली होती.
Showing posts with label विरूर. Show all posts
Showing posts with label विरूर. Show all posts