काव्यशिल्प Digital Media: शिवसेना

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu
Showing posts with label शिवसेना. Show all posts
Showing posts with label शिवसेना. Show all posts

Wednesday, June 27, 2018

वर्ध्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी शिवसेनेचे रास्तारोको आंदोलन

वर्ध्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी शिवसेनेचे रास्तारोको आंदोलन

Shivsena's Rastaroko movement for farmers' questions in Wardha | वर्ध्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी शिवसेनेचे रास्तारोको आंदोलनवर्धा/प्रतिनिधी:
 स्थानिक ठाकरे मार्केट भागातील शिवसेना कार्यालयातून काढण्यात आलेला शिवसैनिक व शेतकऱ्यांचा मोर्चा बजाज चौकात पोहोचताच तेथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले. तब्बल तासभर हे आंदोलन सुरू राहिल्याने वाहतूक खोळंबली होती. या आंदोलनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या विविध मागण्या रेटून लावण्यात आल्या. आंदोलनादरम्यान विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. सदर निवेदन नायब तहसीलदार विलास कातोरे यांनी स्वीकारले.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर करून एक वर्षांचा कालावधी होत आहे. परंतु, अजूनही अनेक शेतकऱ्यांना सदर कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात यावा. विविध बँका शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली असून बँकांच्या अधिकाऱ्यांना पीक कर्ज वितरणाबाबतचे स्पष्ट निर्देश देण्यात यावे. गत वर्षी गुलाबी बोंडअळीने कापूस उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. सदर नुकसानीपोटी देण्यात येणारी शासकीय मदत जाहीरही करण्यात आली. मात्र, सध्या अनेक शेतकऱ्यांना ही शासकीय मदत मिळाली नसून ती त्वरित देण्यात यावी. याकालावधीत सुमारे ५५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. परंतु, त्यापैकी केवळ २८ प्रकरणेच शासकीय मदतीसाठी पात्र ठरविण्यात आल्या आहेत. राज्यातील भाजपा सरकारने शेतकरी विरोधी धोरणांचा अवलंब तात्काळ बंद करावा व शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी नियोजन बद्द कार्यक्रम आखून त्यांची अंमलबजावणी करावी, या मागण्या सदर रास्तारोको आंदोलनादरम्यान रेटून लावण्यात आल्या होत्या. तसे निवेदनही जिल्हाधिकाऱ्यांना आंदोलनकर्त्यांनी सादर केले. आंदोलनाचे नेतृत्त्व माजी खासदार तथा शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख अनंत गुढे, माजी आमदार अशोक शिंदे, शेतकरी नेते शैलेश अग्रवाल, जिल्हा प्रमुख राजेश सराफ, महिला आघाडीच्या सुधा शिंदे, गणेश इखार आदींनी केले. मोर्चासह रास्तारोको आंदोलनात महिला व पुरुष शिवसैनिकांसह मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते.
सरकारविरोधी केली घोषणाबाजी
आंदोलनाचे नेतृत्त्व करणाऱ्या शिवसेनेच्या काही पुढाऱ्यांनी मनोगत व्यक्त केले. त्यांनी भाजपा सरकार सध्या कसे शेतकरी विरोधी धोरणांचा अवलंब करीत आहे याची माहिती दिली. आंदोलनकर्त्यांनी सरकारविरोधी घोषणाबाजी करून शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध नोंदविला.

Wednesday, March 14, 2018

शिवसेना-भाजप पुढच्या निवडणुका एकत्रच लढणार:मुनगंटीवार

शिवसेना-भाजप पुढच्या निवडणुका एकत्रच लढणार:मुनगंटीवार

मुंबई/काव्यशिल्प ऑनलाईन:
bjp shivsena साठी इमेज परिणाम
"शिवसेना आणि भाजप पुढच्या निवडणुका एकत्रच लढणार’, असा थेट दावा राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेतच केला आहे.‘शिवसेनेच्या मुखपत्रात काय छापून येतं याकडे लक्ष देऊ नका. पण पुढची निवडणूक सेना - भाजप एकत्र लढणार.’ असा दावा मुनगंटीवार यांनी विरोधकांना उद्देशून केला.‘उत्तरप्रदेश पोटनिवडणुकीच्या निकालानंतर विरोधकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. काहींना तर मंत्री बनण्याची घाई झाली आहे. मात्र पुन्हा सत्ता आमचीच येणार.’ असा टोला त्यांनी विरोधकांना हाणला,आमच्यात किती ही वाद झाले तरी आमचे आमही बघून घेऊ . काँग्रेस-राष्ट्रवादी 1999 मध्ये असेच भांडले आणि नंतर एकत्र झाले होते. आता तुम्हाला एकमेकांची गरज असल्याने एकत्र आलात त्यामुळे आम्हीही वेगळं न लढता एकत्र येऊ.’ असा विश्वास मुनगंटीवार यांनी सभागृहात विरोधकांना प्रत्युत्तर देताना व्यक्त केला.
एकीकडे शिवसेनेनं 2019 लोकसभा आणि विधानसभा स्वबळावर लढवण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वीच जाहीर केला होता. अशावेळी मुनगंटीवार यांनी थेट सभागृहात आपण एकत्र लढणार असल्याचं म्हटल्याने राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला तोंड फुटलं आहे. त्यामुळे शिवसेना आता नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

Monday, March 05, 2018

भगवे झेंडे काढल्याने शिवसेना आक्रमक

भगवे झेंडे काढल्याने शिवसेना आक्रमक

मनपा अधिकाऱ्यांना घेराव घालत केला गदारोळ
चंद्रपूर(रोशन दुर्योधन):चंद्रपुरात पुन्हा एकदा जुना "बॅनरवॉर" सोमवारी चांगलाच उफाळून आलेला आहे.नेहमी नानाविविध कारणावरून चर्चेत राहणाऱ्या शिवसेनेने चंद्रपूर शहरात शिवजयंती निमित्त काही मोजक्या ठिकाणी शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा अश्या आशयाचे होर्डिंग्स व शहरात झेंडे लावले होते. शहरात कोणत्याही ठिकाणी बॅनर लावण्यास मनपा प्रशासन तयार नसून ही लावलेली बॅनर व झेंडे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी काढून टाकली,आणि झेंडे हटविण्याची भनक शिवसेनेच्या नेत्यांना व कार्यकर्त्यांना लागताच त्यांनी आपल्या सैनिकांसोबत मनपा अधिकारी कर्मचाऱ्यांवर चांगलाच हल्लाबोल केला.
                   शिवसेनेने शिवाजी महाराजांचे बॅनर काढण्यावरच आक्षेप घेत मनपा अधिकारी कर्मचारी व शिवसेना नेते व कार्यकर्ते यांच्यात चांगलीच जुंपली शिवाजी महाराजांची शुभेच्छा फलक काढले कसे ? असा प्रश्न करत मनपाच्या अतिक्रमण विभागाच्या अधिकार्‍यांना व कर्मचार्‍यांना शिवसेना नेते किशोर जोरगेवार यांनी चांगलेच धारेवर धरले. चंद्रपुरात काही दिवसा आगोदर योग गुरु रामदेव बाबा हे योगाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी आले असता संपूर्ण शहरभर त्यांचे शुभेच्छुक बॅनर लावण्यात आले होते तेव्हा हे बॅनर कोणत्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काढलेले नाही . मात्र 4 मार्च रोजी शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त लावलेले हे बॅनर अतिक्रमण विभागाने काढताच  मनपा अधिकारी कर्मचारी व शिवसेनेने चांगलीच जुंपली . हा वाद वाढत गेला आणि हमरीतुमरी होत शाब्दिक बाचाबाचीवर देखील आला होता.
                      गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि भाजप यांच्यात जटपुरा गेट सौंदर्यकरनावावरून तू-तू-मैं-मैं आरोप-प्रत्यारोप सुरू असताना शिवाजी महाराजांची झेंडे काढण्याचा वाद समोर येताच जटपुरा गेट येथे सुरू असलेल्या सौंदर्य करण्याचे काम शिवसैनिकांनी बंद पाडले आणि जोवर या जटपुरा गेट च्या वाहतूककोंडीचा प्रश्न मार्गी लागत नाही तोवर जटपुरा गेट चे काम बंद पाडू असा इशारा देत सुरू असलेले जटपुरा गेटच्या सौंदयीकरणाचे काम शिवसैनिकांनी बंद पडले.
यावेळी युवा सेनेचे जिल्हाप्रमुख संदिप गीरे, जिल्हा प्रमुख सतिश भिवगडे उपजिल्हा प्रमुख   किशोर जोरगेवार यांच्या शिक्षक सेना जिल्हा प्रमुख राजेश नायडू, माजी नगरसेवक आकाश साखरकर, माजी जिल्हा प्रमुख दिलीप कपूर यांच्या सह सेनेच्या ईतर पदाधिका-यांची व शिवसैनिकांची मोठया संख्येने उपस्थिती होती. शहरात भाजपचे बॅनर चालतात तर मग शिवाजी महाराजांचे का नाही असा प्रश्न शिसैनिकांनी उपस्थित करत महानगर पालिकेसमोर जोरदार निदर्शने केलीत तसेच यावेळी अतिक्रमण विभागाचे प्रमूख सुभाष थोंबरे आणि उपायुक्त विजय देवळीकर यांचे कार्यालय गाठून शिवसैनिकांनी चांगलाच गोंधळ घातला. त्यामूळे काही काळ महानगर पालिकेत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.






Wednesday, February 28, 2018

शिवसेना भडकली;पहिले स्वताच्या प्रभागातील परकोटांवरील अतिक्रमण काढा नंतरच बोला

शिवसेना भडकली;पहिले स्वताच्या प्रभागातील परकोटांवरील अतिक्रमण काढा नंतरच बोला

आदिवासी समाज व चंद्रपूरची जनता किशोर जोरगेवारांन सोबत - सुरेश पचारे
चंद्रपूर (ललित  लांजेवार):   
shivsena bhajap साठी इमेज परिणाम
                       राज्याच्या राजकारणात भाजप शिवसेना यांच्यातला वाद काही नवीन नाही,खांद्याला खांदा लाऊन सत्तेत बसेले दोघेही एकमेकांवर आरोप प्रत्यारोप दररोज करतात,तुझ माझ जमेना, तुझ्या वाचुन करमेना अशी स्थिती  राज्यात या पक्षाची आहे.
                   मात्र चंद्रपूरच्या राजकारणात देखील आज परीयंत कधी न झालेला  शिवसेना भाजप वाद आता शहराच्या राजकारणात जोर पकडू लागल्याचे चिन्ह दिसु लागले आहे. सोमवारी चंद्र्पूर येथे शिवसेना नेते किशोर जोरगेवार यांनी जनतेची मूख्य समस्या असलेल्या जटपूरा गेटचा मुद्दा हाती घेत वाहतुकीची कोंडी होत असणाऱ्या जटपूरा गेट येथून वाहतुकीचा मार्ग मोकळा करा व नंतरच सौंदर्यीकरण करा यासाठी आंदोलन केले, तसेच जिल्हाधिकारी यांना माहितेचे निवेदन देत सूचनाही सुचविल्या,हे आंदोलन होत नाही तर लगेच चंद्रपूर महानगर पालिकेच्या भाजप नगरसेविका शितल कुळमेथे यांनी या आंदोलनावर आक्षेप घेत एक प्रेस नोट माध्यमांत प्रकाशित केली. जटपूरा गेटला धक्का जरी लागला तर आदिवासी समाज चूप बसणार नाही.  असा घानाघात करत शिवसेनेच्या आंदोलनाला विरोध दर्शविला.
                     याच भाजप व शिवसेनेच्या तू-तू मै-मै मध्ये आता चंद्रपूरचे शिवसेनेचे नगरसेवक व शहर प्रमुख सुरेश पचारे यांनी एक प्रेस नोट काढत भाजपला थेट प्रतिउत्तर देत धारेवर धरले आहे. पहिले स्वताच्या प्रभागातील परकोटांवरील अतिक्रमण काढा नंतरच बोला असा खोचक उत्तर शिवसेना नेते किशोर जोरगेवार याची बाजू राखत सुरेश पचारे यांनी भाजप नगरसेविका शितल कुळमेथे यांना दिले आहे. 
                   याच सोबत प्रसिद्धी पत्रकात शिवसेने भाजप नगरसेविका शितल कुळमेथे यांच्यावर बराचश्या प्रश्नांची भडीमार केली आहे.  शिवसेना नेते किशोर जोरगेवार यांनी जनतेची मूख्य समस्या असलेल्या जटपूरा गेटचा मुद्दा हाती घेतल्या नंतर भाजपाच्या नगर सेविका शितल कुळमेथे यांना आदिवासी समाजाच्या पुरातन वास्तुंचा साक्षात्कार झाला आहे. जेव्हा महानगर पालीकेने गिरनार चौकातील विर बाबूराव पुल्लेश्वर शेडमाके यांच्या नावाचा फलक काढून तो कच-यात टाकला तेव्हा त्या परदेशात होत्या का? असा टोला हाणत किशोर जारगेवार यांच्या लोकोपयोगी आंदोलनाला आदिवासी समाजाचा पाठींबा असल्याचे शिवसेनेचे शहर प्रमुख तथा नगर सेवक सुरेश पचारे यांनी स्पष्ट केले आहे. 
शिवसेनेचा विकासकामांना कधिच विरोध नव्हता ना तो असेल मात्र नको त्या गोष्टीवर खर्च करुन मुळ समस्या जैसे तेच ठेवली जात असेल तर त्याला मात्र शिवसेना तिव्र विरोध आहे असे देखील या पत्राच्या माध्यमातून म्हटल्या गेले आहे , सौंदर्यीकरनाला आमचा विरोध नाही मात्र पहिले येथील वाहतुक कोंडीचा प्रश्न सोडवा व नंतर हे सौंदर्यीकरण करा अशी भुमीका किशोर जोरगेवार यांनी घेतली आहे.
                         यात गोंड कालीन जटपूरा गेटचे अतिस्व मिटण्याचा प्रश्नच येत नाही. आणि शिवसेना असे पर्यंत तरी चंद्रपुरातील ऐतिहासिक वारसा असलेले गोंड कालीन वास्तूंना हात लावण्याची कोणाची हिम्मत नाही. आदिवासी समाज हा चंद्रपूर जिल्ह्याचे वैभव आहे या समाजाचा मोठा वारसा जिल्ह्याला लाभला आहे मात्र त्याच्या वीर पुत्रांचे एकही  स्मारक शहरात नाही. त्यामुळे जटपुरा गेट समोर विर बाबुराव शेडमाके यांचे भव्य स्मारक व्हावे अशी सेनेची अनेक दिवसांपासूनची मागणी आहे. मात्र आता नगरसेविका शितल कुळमेथे यांनी प्रेसनोट प्रकाशित करुन यात जातीय राजकार घोडण्याचा प्रयत्न केला आहे. याला आदिवासी समाज कधीही स्विकारणार नाही. गोंड कालीन वास्तुंची दशा आजघडीला अतिशय बिगट झाली आहे. त्यासाठी कूळमेथे यांनी आजवर किती निवेदण दिलेत? पहिले  हे सांगावे ,त्याच्या स्वताच्या भानापेठ प्रभागात नागरिकांनी गोंड कालीन परकोटांवर अतिक्रम केले आहे. त्यांना ते दिसत नाही का ? ईक्रो प्रो संघटणेच्या वतीने परकोट स्वच्छता मोहीम  राबवली जात असतांना शितल कुळमेथे यांनी कितीदा उपस्थिती लावली पाहिले हे सांगावे केवळ राजीकय हेतुतून समाजाच्या नावाचा गैरवापर करून उघीच  बडबड करु नये, आदिवासी समाज हा जागरुत आहे. आणि भाजपाने या समाजासाठी काय केले हेही या समाजाला चांगल्याने कळते त्यामूळे अश्या नगर सेवीकांच्या मागे हा समाज कधिच उभा राहणार नाही.  हे आदिवासी समाजाचे नेते तसेच आदी जनचेतना जागर या संस्थेचे अध्यक्ष अशोक तुमराम यांनी किशोर जोरगेवार यांच्या धरणे आंदोलनात उपस्थित राहून दाखऊन दिले आहे. त्यामुळे कुळमेथे यांनी पहिले त्यांच्या प्रभागातील परकोटांवर नारिकांनी केलेले अतिक्रमण काढावे त्यात भाजप त्यांना मदत करत नसेल तर तसेही सांगावे आम्ही गोंड कालीन वसा वाचवीण्यासाठी प्रयत्नशील असुन हे अतिक्रमण काढण्यात आम्ही तुम्हाला मदत करु असा सल्लाही पचारे यांनी शितल कुळमेथे यांना दिला आहे. 
                        याअगोदर पाच ठिकाणी गोंड कालीन परकोट तोडल्या गेले ते कुणाला विचारून तोडण्यात आले व त्यावेळेस कोणते अधिकारी होते? तसेच २.५० कोटी रुपये जटपुरा गेटच्या सौदर्याकरीता सरकारकडून दिले आहे जटपुरा गेट येथे वाहतूक कोंडी हि खूप मोठी समस्या आहे आणि इथल्या लोकप्रतीनिधीकडून तिथे सौंदर्यीकरणासाठी २.५० कोटी रुपये खर्च करीत आहेत ते पैसे तिथे खर्च करण्याची काही गरज नाहि तेच २.५० कोटी रुपये परकोटाच्या डागडुजी करीता खर्च करावे. या जटपुरा गेटच्या सौंदर्याकरीता शहरातील मोठे व्यापारी तसेच अनेक कंपन्या करायला तयार आहे पण त्यांना हे शासन करू देत नाही.  आणि तेच काम फुकट होत असताना त्याठिकाणी २.५० कोटी रुपये खर्च करण्याची काही गरज नाही आहे या संपूर्ण विषयाकडे नगरसेविका शितल कुळमेथे यांनी लक्ष द्यावे आणि विनाकारण दोषारोपण करू नये.  असा सवाल देखील पचारे यांनी करत भापला चांगलच सवालाच्या घेऱ्यात उभे केले.  त्यामुळे दररोज होणाऱ्या भाजप शिवसेना वादात नक्कीच चंद्रपूरच्या नागरिकांच्या समस्या मार्गी लागणार का ? कि हे दोन्ही पक्ष दररोज आप-आपल्या कार्यालयातून प्रसिद्धी पत्रक काढून एकमेकांवर टीका करतच राहणार हे मात्र योग्य ती वेळच ठरवेल.त्यामुळे शिवसेनेच्या या खोचक सावलांचे उत्तर भाजप कोणत्या पद्धतीने देते ह्याकडे सर्वांचे लक्ष लागले राहणार आहे. 
shivsena bhajap साठी इमेज परिणाम

Tuesday, February 27, 2018

 शिवसेनेचे आंदोलन म्हणजे राजकीय नौटंकी:भाजपचा घणाघाती आरोप

शिवसेनेचे आंदोलन म्हणजे राजकीय नौटंकी:भाजपचा घणाघाती आरोप

विकासाला बगल देत राजकारण
bjp logo साठी इमेज परिणाम चंद्रपूर(ललित लांजेवार)
सोमवारी जटपुरा गेट येथे शिवसेनेने केलेल आंदोलन म्हणजे राजकीय नौटंकी आहे असा अनाघाती आरोप आता चंद्रपूर महानगर पालिकेच्या भाजपच्या  महिला नगरसेविका कु.शीतल कुळमेथे यांनी केला आहे,  चंद्रपूर शहराला ५००  वर्षांचा इतिहास आहे. चंद्रपूर जिल्ह्याला ऐतिहासिक वैभव लाभलेले असल्याची नोंद आहे.  येथील परकोट,किल्ले,मंदिर,  समाधी स्थळे, हे गुंड राज्याचे वैभव दर्शविणारे केंद्र आहे.  त्यांच्या सौंदर्यात लाइटिंगमुळे  भर पडणार आहे.  वाहतुकीची कोंडी आणि लाइटिंग हा सबंध सामान्यांच्या बुद्धीला न पटणारा आहे.त्यामुळे जोरगेवार हे  राजकीय हेतूने पूर्वजांनी 500 वर्षांपासून जतन केलेल्या पुरातत्त्व संपत्तीला संपवण्याचा डाव खेळात आहेत असा आरोप  भाजपच्या  महिला नगरसेविका कु.शीतल कुळमेथे यांनी शिवसेनेवर केला आहे. या जटपुरा गेटला धक्का जरी लागला तर आम्ही आदिवासी समाज रस्त्यावर उतरू असा ईशारा यावेळी नगरसेविका कु.शीतल कुळमेथे यांनी दिला  आहे,
                चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी समाज 500 वर्षांपासून गोंड राजांनी उभारलेल्या वैभवाचे जतन करत आलेला आहे.  या संपत्तीला अधिक वैभव लाभण्यासाठी व पर्यटनाला चालना देण्यासाठी राज्य शासनाच्या पर्यटन विभागाने लावण्यासाठी भरीव निधी देऊन मदत केली आहे.  इतिहासाला आपण जपायला हवे परंतु विकासापोटी असंतुष्ट प्रवृत्तीचे लोकी  ऐतिहासिक वारसा जतन न करता तो नष्ट करण्याच्या मागे लागलेले आहे हे आम्ही आदिवासी समाज कदापी खपवून घेणार नाही, 

 ५००  वर्षांचा पुरातत्त्व गोंड राजाचा इतिहास आम्ही फक्त पुस्तकाद्वारे पुढच्या पिढीला न सांगता तो प्रत्यक्षात जतन करून ठेवू, या सौंदर्यीकरण आला कुठलाही विरोध केल्यास आम्ही रस्त्यावर उतरून याचा जाहीर  निषेध करू असे देखील म्हणाले. 
पर्यटनाला चालना देण्याचा प्रयत्न 
अशा प्रकारचे पुरातन वस्तू यांचे जतन करण्यासाठी दिल्ली,औरंगाबाद येथे अशा प्रकारची लाइटिंग लावण्यात आलेली आहे. याच प्रकारची लाइटिंग चंद्रपूरच्या ऐतिहासिक वैभवात वाढ करण्याकरिता लावण्यात येणार आहे यामुळे चंद्रपूर आकर्षणाचे केंद्र बनेल व  गोंड राज्याच्या ऐतिहासिक पुढची पिढी  माहिती करून घेण्याचा प्रयत्न करेन.  की आमच्या आदिवासी समाजासाठी अभिमानाची बाब आहे त्यामुळे विकासाला साथ देत विकासासोबत राहायला हवे असा सल्ला देखील यववेली देण्यात आला
जटपुरा गेटच्या समस्सेविषयी शिवसेनेचे जिल्हाधिका-यांना सुचविल्या उपाय योजना

जटपुरा गेटच्या समस्सेविषयी शिवसेनेचे जिल्हाधिका-यांना सुचविल्या उपाय योजना

चंद्रपूर/प्रतिनिधी:
पहिले जटपूरा गेटवर होत असलेली वाहतुकीची कोंडी सोडवा नंतर सौंदर्यीकरण करा या मागणी करीता जटपूरा गेट येथे किशोर जोरगेवार यांच्या तर्फे धरणे आंदोलन करण्यात आले. सध्या चंद्रपुरात नको त्या कामावर पैश्याची उधडपट्टी करण्याचे काम सुरु असून जनतेच्या मुळ समस्या जैसे थे आहेत. त्यामूळे चंद्रपूरकरांना नाहक समस्यांना समोर जावे लागत असून जनतेमध्ये सत्ताधा-यांविषयी तिव्र रोष आहे. यातच जटपुरा गेटची वाहतूक कोंडी सोडविण्यापेक्षा या ठिकाणी दोन कोटीहून अधिक खर्च करुन सौंदर्यीकरनाचे वेड लोकप्रतिनीधींना लागले आहे. ही जनतेच्या संयमतेची थट्टा असून हा प्रकार आता आम्ही चालू देणार नाही. जो पर्यंत येथील वाहतूककोंडीचा प्रश्न सोडविल्या जात नाही तोवर या ठिकाणी सौंदर्यीकरणाचे काम करु देणार नाही असा सक्त ईशारा सोमवारी किशोर जोरगेवार  यांनी दिला आहे. 

                  या धरणे आंदोलन आंदोलनाचे संचालन  इरफान शेख यांनी केले, यावेळी माजी जिल्हा प्रमुख दिलीप कपूर, दीपक बेले, शहर प्रमुख सुरेश पचारे, जिल्हाप्रमुख भारती दुधानी, माजी नगरसेवक आकाश साखरकर, राजेश नायडू, वंदना हातगावकर, अमोल शेंडे, नगरसेवक विशाल निंबाळकर, कलाकार मल्लारप, संदीप कष्टी, अब्बासभाई, इरफान शेख, अजय कोंडलेवार, चिराग नथवानी, प्रकाश चंदनखेडे, चंद्रराज बाथो, विलास वनकर, दीपक पद्म्गीरीवार, रुपेश पांडे, विनोद अनंतवार, मुन्ना जोगी, शंकर दंतुलवार, राशीद हुसैन, दिलीप बेन्डले, वैभव माकडे, गौरव जोरगेवार,टिकाराम गावंडे, बबलु पुण्यवर्धन, मंगेश अहिरकर, बादल हजारे, मुकेश डाखोरे, राजेश मांगुळकर, प्रीतम लोणकर, माला तुरारे, सुजाता बल्ली, महादेव अडबाले, राहुल मोहुर्ले, अरुण येणप्रेद्दीवार, अशपाक खान, इरफान शेख, रवी करमरकर आदिंची उपस्थिती होती. 

Wednesday, February 14, 2018

चंद्रपूर शहर शिवसेनेच्या विस्तृत नियुक्त्या जाहीर

चंद्रपूर शहर शिवसेनेच्या विस्तृत नियुक्त्या जाहीर

चंद्रपूर/प्रतिनिधी:
गेल्या कित्तेक दिवसांपासून रखडलेल्या चंद्रपूर शिवसेनेच्या शहर कार्यकारणीच्या नियुक्या अखेर बुधवारी आ.बाळूभाऊ धानोरकर, जिल्हा प्रमुख अनिल धानोरकर,  जिल्हा प्रमुख सतीश भिवगडे, उपजिल्हा प्रमुख किशोर जोरगेवार, युवासेना जिल्हा प्रमुख संदीप गिर्हे, महिला जिल्हा प्रमुख डॉ.भारती दुधानी, शिक्षक सेना जिल्हाध्यक्ष राजेश नायडू, शहर प्रमुख सुरेश पचारे यांच्या मार्गदर्शनात जाहीर करण्यात आल्या. यात शहर प्रसिद्धी प्रमुख पदी श्री अजय कोंडलेवार, उपशहर प्रमुख पदी अब्बास भाई, श्री संदीप कष्टी, विशाल मत्ते आदींची नियुक्ती करत त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.
                                     यावेळी नवनियुक्त पदाधीका-यांचे अभिनंदन करताना शिवसेना उपजिल्हा प्रमुख तथा चंद्रपूर विधानसभा प्रमुख किशोर जोरगेवार म्हणाले, पक्षश्रेष्ठीने दिलेल्या पदांमार्फत तळागळातील जनतेचे प्रश्न सोडविण्याकरिता आपल्यावर टाकलेला विश्वास आहे. पद हा दागिना असून यातून सामान्यांचे प्रश्न सोडविण्याचे बळ आपणांस प्राप्त झाले आहे. गाव तेथे शिवसेना घर तेथे शिवसैनिक हे स्व.बाळासाहेबांच्या स्वप्नपूर्ती करिता प्रत्येक शिवसेना पदाधीकारी तथा शिवसैनिक प्रयत्न करणार असल्याचेही ते यावेळी बोलतांना म्हणाले.त्यामुळे कार्यकर्त्यांच्या झालेल्या नियुक्या हि एक त्यांची जबाबदारी असूनते योग्य रित्या पार पडतील असा विश्वास देखील यावेळी जोरगेवार यांनी व्यक्त केला.       
               दरम्यान नवनियुक्त पदाधिकार्यांना शिवसेना जिल्हा प्रमुख सतीश भिवगडे, उपजिल्हा प्रमुख किशोर जोरगेवार, महिला जिल्हा प्रमुख डॉ. भारती दुधानी, शिक्षक सेना जिल्हा प्रमुख राजेश नायडू, शहर प्रमुख सुरेश पचारे, माजी उपशहर प्रमुख विनोद गरडवा, संतोषी चव्हाण, वंदना हातगावकर यांचे हस्ते नियुक्त पत्र देण्यात आले.

Thursday, February 08, 2018

उच्चशिक्षित युवक-युवतीचे शिवसेनेच्या नेतृत्वात "पकोडा" आंदोलन

उच्चशिक्षित युवक-युवतीचे शिवसेनेच्या नेतृत्वात "पकोडा" आंदोलन

चंद्रपूर/प्रतीनिधी:
भाजपने 2 कोटी युवकांना रोजगार देऊ, असे आश्‍वासन निवडणुकीदरम्यान दिले होते. मात्र, अद्यापही रोजगार उपलब्ध झालाच नाही. त्याचे पडसाद चंद्रपूरमध्ये देखील बघायला मिळाले .भाजप सरकार विरोधात नाराजी व्यक्त करत चंद्रपुरातील तुकूम परिसरात शेकडो उच्चशिक्षित युवक-युवतीनी सरकारच्या विरोधात थेट रस्त्यावरच ठेला उभा करत अनेक उच्च शिक्षित विद्यार्थ्यांनी पकोडे तडून नाराजी व्यक्त केली. 
लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान 2 कोटी युवकांना रोजगार उपलब्ध करुन देण्याची घोषणा भाजपने केली होती. या घोषणेचे काय झाले असा प्रश्न देखील यावेळी उपस्थित करण्यात आला होता.पंतप्रधानांनी पकोडा विकून कुणी 200 रुपये रोज कमावत असेल, तर तो चांगला व्यवसाय असल्याचे मत व्यक्त केले होते. तसेच पकोडे विकणे हा एक मोठा रोजगार असल्याचे म्हटले होते. आमच्या पालकांनी आर्थिक ताण सहन करत आम्हाला पदवीपर्यंतचे शिक्षण दिले आहे. ते यासाठीच का? पंतप्रधानांनी चहा विकून स्वत:चा उदरनिर्वाह केला. तीच स्वप्न ते देशातीले उच्च शिक्षित तरुणांना दाखवित तर नाही ना? असे प्रश्‍न यावेळी आंदोलक तरुणांनी उपस्थित केले. तसेच अद्यापही रोजगार उपलब्ध होत नसल्याने सरकारचा निषेध केला.  
उच्चशिक्षण घेतलेल्या युवक-युवतींना रोजगार नसल्याने सरकारने त्यांच्यावर पकोडे विकण्याची वेळ आल्याची टीका शिवसेनेने केली आहे. यावेळी शिवसेनेचे नगरसेवक सुरेश पचारे यांचे सोबत शेकडो उच्चशिक्षित युवक-युवती  उपस्थित होते. 

Wednesday, November 15, 2017

नैसर्गिक आपत्तीचा निधी मिळाला शेतकऱ्याला

नैसर्गिक आपत्तीचा निधी मिळाला शेतकऱ्याला

 वरोरा/ प्रतिनिधी:
जामनी येथील शेतकरी श्री नथ्थु चतुर यांच्या शेतात अचानक वीज कोसळल्याने यांच्या मालकीचे शेतउपयोगी दोन बैल मृत पावले होते.त्या करिता शासनाची मदत निधी म्हणून आज आमदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या हस्ते नैसर्गिक आपत्ती निधीचा ५००००/- रुपयांचा चेक देण्यात आला. त्यामुळे त्या शेतकऱ्याला आणखी शेतीपयोगी वस्तू घेण्यास मदत होणार आहे मिळालेल्या  निधीने शेतकऱ्याने आमदार धारकऱ्यांची धन्यवाद व्यक्त केले
मदत निधी देतांना तहसीलदार गोसावी साहेब,प्रमोदभाऊ मगरे वाहतूक सेना जिल्हा प्रमुख ,मनीष जेठानी युवा सेना उपजिल्हा प्रमुख श्री कुमरे तलाठी मांगली साझा, मंडळ अधिकार भांदक्कर,सरपंच विजय दातारकर,तारानाथ पावडे,बबन चतुर शिक्षक व अनेक गावकरी उपस्तीत होते.

Thursday, November 09, 2017

रब्बी पिकाला पाणी नाही तर पेंच चे  पाणी कुणाला?

रब्बी पिकाला पाणी नाही तर पेंच चे  पाणी कुणाला?

पाणी न सोडल्यास पुन्हा मोठे जनआंदोलन : आशिष जयस्वाल 
पेंच प्रकल्पाचे पाणी रब्बी पिकाला नाही असा निर्णय प्रशासनाने घेतला असून तसे पत्र पाणी वाटप संस्थेला दिले जात आहे. हा निर्णय दुर्देवी, शेतकऱ्यावर जाणीवपूर्वक अन्याय करणारा व शासनाच्या वेगवेगळ्या धोरणाच्या विरोधात आहे. जिल्हाधिकारी यांनी शेतकऱ्यांना १५० द.ल.घ.मी. पाणी खरीप पिकाला देऊ असे जाहीर केले. मात्र आता धरणात असलेले ४०० द.ल.घ.मी. पाणी कोणत्या घटकाला किती दिल्या जाणार आहे हे सांगण्याचे जाणीवपूर्वक टाळले जात आहे, असा माझा आरोप आहे. जलसंपत्ती प्राधिकरणाच्या आदेशानंतर नागपूर शहराच्या १९७ द.ल.घ.मी. पाण्याच्या मागणीवर निकषानुसार १०६.७२ द.ल.घ.मी. पाणी देण्याबाबत जलसंपदा विभागाने सहमती दर्शविली मात्र एवढे पाणी सुद्धा निकषापेक्षा जास्त असल्याने त्यावर मी हरकत घेतली आहे. परंतु जरी जलसंपदा विभागाच्या शपथपत्राप्रमाणे १०६.७२ द.ल.घ.मी.पाणी नागपूर शहराला दिले तरी उर्वरित पाण्यापैकी बाष्पीभवन चे पाणी वगळून उर्वरित पाणी रब्बी पिकासाठी सोडणे अनिवार्य असतांना हे पाणी न सोडता पालकमंत्री यांची दिशाभूल करून काही अधिकाऱ्यांनी प्राधिकरणाच्या आदेशाच्या विरोधात नागपूरला पाणी देण्याचा कट रचलेला आहे.
जलसंपत्ती प्राधिकरणाच्या याचिकेत शपथपत्रावर जलसंपदा विभागाने ११० द.ल.घ.मी. पाणी बाष्पीभवन दाखवून १०० द.ल.घ.मी. पाणी धरणात शिल्लक आहे असे सांगितले आहे. १० ऑगस्ट २००४ च्या शासन निर्णयात अतिशय स्पष्ट निर्देश आहे कि, १५ जुळली पर्यंत पिण्याकरिता पाणी राखून ठेऊन उर्वरित पाणी रब्बी पिकाला द्यावे. धरणात मे नंतर अनावश्यक पाणीसाठा शिल्लक ठेऊन पाणी या मौल्यवान संपत्तीचा बाष्पीभवन व वापर न करता नॅश करू नये असे स्पष्टपणे नमूद आहे. मग हे १०० द.ल.घ.मी. पाणी रब्बी पिकासाठी सोडल्यास करोडो रुपयांची पिके होईल मात्र हे पाणी न दिल्यास शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान, उत्पन्नात घाट होईल व मजूर व इतर अवलंबित घटक यांचा रोजगाराचा प्रश्न निर्माण होईल. खरीप मध्ये पाणी मिळणार नाही म्हणून ज्यांनी शेती पडीत ठेवली त्यांना कोणतीच नुकसान भरपाई दिली नाही. आता रब्बी मध्ये धरणात पाणी असतांना पाणी न देता शेती पडीत ठेवावी असा सल्ला देणाऱ्या अधिकाऱ्यांना किती नुकसान भरपाई द्यायची  हा सल्ला देखील द्यावा. धरणातील पाण्याचे मालक अधिकारी व लोकप्रतिनिधी नसून शेतकरी आहेत. 

जर रब्बी पिकाला पाणी न देण्याचा निर्णय बदलून पाण्याचे वाटप व नियोजन जाहीर केले नाही तर आपण पुन्हा हजारो शेतकरी जमा करून आक्रोश आंदोलन करूंन पाणी सोडण्यास भाग पाडू. रब्बी पिकासाठी पाणी घेतल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही हे मी ठामपणे सांगू इच्छितो. 
- आशिष जयस्वाल 
सेना उतरणार गुजरातच्या आखाड्यात

सेना उतरणार गुजरातच्या आखाड्यात


मुंबई /प्रतिनिधी– मोदींना कोणताही अपशकून करायचा नाही असं घोषित करत गुजरात निवडणुकीपासून लांब राहिलेल्या शिवसेनेनं अचानक विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेना खासदार अनिल देसाई, राजुल पटेल आणि हेमराज शहा हे आज गुजरातला रवाना होता आहेत. गुजरातमध्ये आज ते संध्याकाळी उशीरा पत्रकार परिषदही घेण्याची शक्यता आहे.
सुरत आणि बडोदा या मराठीबहुल भागात उमेदवार उभे करण्याचे संकेत शिवसेनेनं दिलेत. साधारणपणे 40 जागांवर शिवसेना उमेदवार देईल अशी शक्यता आहे. शिवसेनेच्या या खेळीमुळे हिंदुत्ववादी मतांमध्ये फाटाफूट होण्याची शक्यता आहे. त्याचा फटका भाजपला बसू शकतो. तसंच हार्दिक पटेल यांनी काँगेससोबत हातमिळणी करण्याची तयारी दाखवली आहे. मात्र ज्या पाटीदारांना काँग्रेसचा पर्याय मान्य नाही. ते शिवसेनाला जवळ करु शकतात.
यंदाच्या निवडणुकीत पहिल्यांदाच भाजपसमोर कडवं आव्हान निर्माण झालं आहे. तेही मोदी पंतप्रधान झाल्यानंतर. त्यामुळे भाजपसाठी ही अत्यंत प्रतिष्ठेची निवडणूक आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीची सेमीफायनल म्हणून या निवडणूकीकडं पाहिलं जातंय. यंदा पहिल्यांदाच हिंदुत्ववादाच्या ऐवजी जातीपातीच्या पातळीवर ही निवडणूक लढवली जात आहे. त्यामुळे भाजपची आधीच अडचण झाली आहे. त्यात आता शिवसेनेनं भाजपाल डिवचण्यासाठी अचानक निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.