সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Tuesday, July 17, 2018

मनसेचे शिट्टी बजाव आंदोलन

अवैध्य बांधकाम विरोधात मनपाचे वेधले लक्ष 
चंद्रपूर/प्रतिनिधी:
चंद्रपूर शहरात मुख्य रस्त्यावर हॉस्पीटल, व्यापारी इमारती परवानगी न घेता अवैध्यपने बांधकाम केले आहे. यामुळे पार्किंग,अपघाताचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून जनतेला प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. जनतेच्या प्रश्नांची दखल घेऊन मनसे चंद्रपूर शहर अध्यक्ष मनदीप रोडे यांच्या नेतृत्वात आज दि. १७ जुलैला दुपारी ३.३० वाजता शिट्टी बजाव आंदोलन करुन मनपा आयुक्तांचे अवैध्य बांधकाम विरोधात कारवाई करण्याबाबत लक्ष वेधण्यात आले.
चंद्रपूर शहरात मनपा, नगररचना विभाग अग्निशामक विभाग यांची परवानगी न घेता अनेक इमारती बांधकाम करण्यातआल्या. अनेक हॉस्पीटल, व्यापारी संकुलात वाहन पार्किंग सारखी अत्यावश्यक सुविधा देण्यात येत नाही. यामुळे वाहतुकीची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. हॉस्पीटल, व्यापारी इमारतमध्ये येणारे नागरिक पार्किंग नसल्याने रस्त्यावर वाहने ठेवतात, बाहेर रस्त्यावर उभे राहतात यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असतो तर अनेकदा नागरिकांना अपघाताला बळी पडावे लागते. 
या अवैध्य बांधकामामुडे गंभीर नागरी प्रश्न निर्माण झाले असतांना मनपाकडुन कुठलीही कारवाई केली जात नाही. वर्षानुवर्षे अवैध्य बांधकाम मोठ्या दिमाखात उभ्या आहे. शासकीय नियम पायदळी तुडवीत कायद्याचे सर्रास उल्लंघन करीत असल्याने मनपाला जाग येण्यासाठी मनसेने शिट्टी बजाओ आंदोलन करुन मनपा आयुक्ताचे लक्ष वेधले. मनपाने अवैध्य बांधकामावर कडक कारवाई न केल्यास येत्या काळात आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.आंदोलनात मनसे कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा करून मनपा परिसर दणाणून सोडला. आंदोलनात मनसे कार्यकर्ता, मोठ्या संख्येने उपस्थित होते. मनसेच्या शिट्टी बजाओ या अनोख्या आंदोलनाने मनसे अधिकारी, पदाधिकारी, नागरिकांचे लक्ष वेधले. आंदोलनात मनसे चंद्रपूर शहर अध्यक्ष मनदीप रोडे यांच्या नेतृत्वात मनसे पदाधिकारी शहर उपाध्यक्ष अभिनव देशपांडे, राहुल चव्हाण, बाळा चंदनवार, सुमित करपे सर्कल अध्यक्ष, व्यंकटेश मुक्तलवार, मुकेश मेहता, आशिष उराडे, दिनेश इंगडे, पुनित लोणकर, अजय मुक्तलवार, वाकटोल, सोमेश्वर टेकाम, स्वप्नील, नितीन बावणे, नागाजी गनफाडे, राजा मेहता, सन्नि मंडल, मिथुन महाकुलकर, कुणाल ठेंगणे, कपील डंभारे, आतिश वडते, रितीक बिसेन, अजिंक्य वाबिटकर,शाहरुख शेख, अमन शेख, मुकेश बावणे,तेजस रामेजवार, रोहन अगडे, तेजस कोतपल्लीवार, अनिकेत उईके, यश तुमसरे, देवानंद ठेंगणे, आकाश शुभम पटले, रोहन साव, अनुराग बोंडे, आकाश बरुडे, आदी मनसे पदाधिकारी व मनसैनिक उपस्थित होते.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.