Wednesday, February 06, 2019
Monday, February 04, 2019
अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित ग्राहक सेवांमुळे महावितरण देशात सर्वोत्तम:सीएमडी श्री.संजीव कुमार
बुधवारी नागपूरच्या या भागातील वीज पुरवठा राहणार बंद
कामठीत वीज वाहिनीचे लोकार्पण
ड्रॅगन पॅलेस येथील येथील वीज उप केंद्रात नव्याने उभारण्यात आलेल्या १० एमव्हीए क्षमतेच्या रोहित्राचे लोकार्पण करताना ना. बावनकुळे |
महावितरणच्या शिकाऊ उमेदवार यादीत घोळ;आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप
ललित लांजेवार/नागपूर
चंद्रपूर येथील महावितरण तर्फे काढण्यात आलेल्या शिकाऊ उमेदवार यादीत आर्थिक व्यवहार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.शनिवारी ITI उतीर्ण व शिकाऊ उमेदवारांची यादी जाहिर करण्यात आली या यादीवर अनेकांनी आक्षेप घेत महावितरण कार्यालयाबाहेर आंदोलन केले.
हि संपूर्ण यादी तयार करतांना विद्यार्थ्यांकडून २० हजारा पासून ते ६० हजारापरीयंत एका उमेदवारासाठी आर्थिक व्यवहार झाल्याचे विद्यार्थ्यात कुजबुज सुरु आहे. सोमवारी विद्यार्थ्यांनी अधीक्षक अभियंता अशोक मस्के यांना संपूर्ण टक्केवारी नुसार लावल्या गेलेल्या यादीचा तपशील मागितला,त्यात कमी टक्केवारीच्या विध्यार्थ्यांचे नाव असल्याचे समोर आले .त्यामुळे लवकरच सुधारित यादी लावण्याचे लेखी आश्वासन यावेळी विध्यार्थ्यांना देण्यात आले, महावितरणात सुरु आल्याचे या काळ्या कारभारात कोण कोणत्या अधिकाऱ्यांचे खिसे गरम झाले आहेत,व वरिष्ठ अधिकारी यांचेवर काय कारवाई करतात ह्याकडे सर्वांचे लक्ष लागले राहणार आहे.
Thursday, January 31, 2019
पाच वर्षांत सर्वच शेतकऱ्यांना सौर ऊर्जेतून वीज:ऊर्जामंत्री बावनकुळे
मार्चअखेर संपूर्ण देश होणार भारनियमनमुक्त:आर.के.सिंग
बुटीबोरीसाठी नवीन वीज आराखडा तयार करा- प्रा. देशमुख
बुटीबोरी परिसरात येणारे नवीन उद्योग आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन या परिसरासाठी विजेची वाढत्या मागणीनुसार नवीन विजेचा आराखडा तयार करण्याची सूचना नागपूर जिल्हास्तरीय विदुयत नियंत्रण समितीचे अध्यक्ष प्रा. गिरीश देशमुख यांनी केली आहे.
प्रा. गिरीश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बुटीबोरी येथील महावितरण कार्यालयात हिंगणा तालुका विदुयत नियंत्रण समितीची बैठक झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी आमदार समीर मेघे होते. बुटीबोरी परिसराचा विकास वेगाने होत असून याठिकाणी दर्जेदार आणि शाश्वत वीज पुरवठा करण्यासाठी नवीन आराखडा करणे गरजेचे आहे. असे यावेळी प्रा. देशमुख यांनी सांगितले. यावेळी वीज अपघातात मृत्युमुखी पडलेल्या वारसास नुकसान भरपाई म्हणून श्रीमती नितु भगत यांना ३ लाख ८० हजार रुपये देण्यात आले. यावेळी बुटीबोरी परिसरात मागील ५ वर्षात महावितरण मार्फत करण्यात आलेल्या कामाची माहिती देण्यात आली. यात बुटीबोरी विभागात पायाभूत आराखडा -२ योजनेत ३ नवीन नवीन उपकेंद्राची उभारणी आणि २ उपकेंद्राची क्षमता वाढ यांचा समावेश आहे. सोबतच दीनदयाल ग्राम ज्योती योजनेत ३ उपकेंद्राचे काम पूर्ण झाले असून २ उपकेंद्राचे काम प्रगतीपथावर असल्याची माहिती यावेळी जिल्हास्तरीय विदुयत नियंत्रण समितीचे अध्यक्ष आणि आमदार मेघे यांना देण्यात आली.
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेसाठी अर्ज करणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी शाखा कार्यालय आणि उपविभागीय कार्यालयात सुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच जवाबदार अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचे निर्देश यावेळी प्रा. देशमुख यांनी दिले. तसेच शेतकऱ्यांच्या मनातील शंका दूर करण्यासाठी सौर कृषी पम्पाचे प्रात्यक्षिक करून दाखवावे अशी सूचना आमदार समीर मेघे यांनी यावेळी महावितरण अधिकारी वर्गाला केली. बैठकीला हिंगणा तालुका विदुयत नियंत्रण समितीचे सदस्य चंद्रशेखर पिसे, रवींद्र वानखेडे, सूचित चिमोटे,विकास दाभेकर, संजय दोडरे, प्रकाश वानखेडे, अधीक्षक अभियंता मनीष वाठ , कार्यकारी अभियंता दिलीप घाटोळ बुटीबोरी विभागातील सर्व उपविभागीय अधिकारी आणि शाखा अभियंता उपस्थित होते.
Tuesday, January 29, 2019
मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना:वीजजोडणीसाठी ८६८५ शेतकऱ्यांचे अर्ज
बुधवारी नागपूरच्या या भागातील वीज पुरवठा राहणार बंद
Monday, January 28, 2019
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेसाठी विदर्भातील १५७१ शेतकऱ्यांचे अर्ज
वाशीम जिल्ह्यातून सार्वधिक अर्ज
भंडारा जिल्ह्यातून २०० अर्ज
नागपूर/प्रतिनिधी:
मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेत सहभागी होण्यासाठी विदर्भातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात ऑनलाईन अर्ज केले आहेत. आज दिनांक २८ जानेवारीपर्यंत नागपूर जिल्ह्यातील ७९ तर वर्धा जिल्ह्यातील ६७ शेतकऱ्यांसह राज्यातील ७,२०४ शेतकऱ्यांनी मागील दहा दिवसात अर्ज केले आहेत. नागपूर परिक्षेत्रात येणाऱ्या सर्व जिल्ह्यात १,५७१ शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत.
महावितरणकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार वाशीम जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे ६५६ अर्ज महावितरणकडे मागील दहा दिवसात करण्यात आले आहेत. त्यानंतर भंडारा जिल्ह्यातील १९३ शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत. मार्च- २०१९ पर्यन्त आपल्या शेतात सौर कृषी पंप लागावा यासाठी शेतकरी ऑनलाईन अर्ज करतो आहे किंवा महावितरणच्या जवळच्या कार्यालयात माहितीसाठी जातो आहे.
शेतकऱ्यांना सौर कृषिपंपासाठी अर्ज करणे सोयीचे व्हावे व वीजजोडणीच्या प्रक्रियेत पारदर्शकता असावी, या उद्देशाने महावितरणच्या www.mahadiscom.in या वेबसाईटवर स्वतंत्र पोर्टल उपलब्ध करून देण्यात आले आहे. या पोर्टलद्वारे शेतकऱ्यांना सौर कृषिपंपासाठी अर्ज करणे, अर्जासोबत लागणारी आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याशिवाय या वेबपोर्टलवर मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेची संपूर्ण माहिती, ऑनलाईनद्वारे शेतकऱ्यांच्या मागणीनुसार सौर कृषिपंपाची क्षमता ठरविणे, अर्जाची सद्यस्थिती बघणे आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. सोबतच शेतकरी बांधवाना या योजनेमध्ये सौर कृषिपंपासाठी कंत्राटदार निवडण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली असून शेतकरी या पोर्टलद्वारे कंत्राटदाराची निवड करून त्या कंत्राटदाराकडून सौर कृषीपंप बसवून घेऊ शकतात.
या सौर कृषीपंप योजनेमुळे शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे शक्य होणार असून अपारंपारिक ऊर्जेमुळे पर्यावरणाचा समतोल राखला जाईल. तसेच शेतकऱ्यांचा वीजबिलांचा खर्च वाचेल. शेतकऱ्यांच्या शेतात दोन एलईडी बल्ब, मोबाईल व बॅटरी चार्जिंगकरिता ईलेक्ट्रीक सॉकेट बसवून देण्यात येणार असल्यामुळे शेतातील वस्तीमध्ये शेतकऱ्यांना राहण्याची सुविधा उपलब्ध होणार असून हिंस्त्र पशू, प्राण्यांपासून स्वत:चे संरक्षण करणे शक्य होईल. अशी माहिती महावितरणकडून देण्यात आली.
Monday, January 21, 2019
मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेला उत्सफूर्त प्रतिसाद
![]() |
संग्रहित |
Saturday, January 19, 2019
उत्कृष्ट अध्यापना बद्दल महावितरणचे PRO योगेश विटणकर यांचा गौरव
राज्यातील २३ हजार युवकांची ग्राम विदुयत व्यवस्थापकपदी नियुक्ती करणार:चंद्रशेखर बावनकुळे
ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते ग्राम विद्युत व्यवस्थापकाचे प्रशिक्षण यशस्वीरित्या पुर्ण केल्याचे प्रमाणपत्र स्विकारतांना प्रशिक्षणार्थी. |
आता मोबाईलवर येणार वीज मीटर रिडींगची माहिती
Wednesday, January 16, 2019

२ वर्षात ३२०० मेगावॅटचे सौरऊर्जा प्रकल्प उभारणार:चंद्रशेखर बावनकुळे
मुंबई/प्रतिनिधी:

महावितरण संचालक (प्रकल्प) पदी भालचंद्र खंडाईत यांची निवड
Thursday, January 10, 2019
महावितरणच्या “गो-ग्रीन” वीजबिलाला ग्राहकांकडून मोठा प्रतिसाद
वीजबील भरण्यासाठी छापील वीजबिलाऐवजी ई-मेल व एसएमएसचा पर्याय स्विकारणाऱ्या ग्राहकांना प्रती वीजबील १० रुपये सवलत महावितरणने १ डिसेंबर २०१८ ला जाहीर केली होती. मागील एका महिन्यात राज्यातील सुमारे २१ हजार ग्राहकांनी या सवलतीचा लाभ घेतला आहे. नागपूर परिमंडलात येणाऱ्या नागपूरात ६३० आणि वर्धा जिल्ह्यात२२० अश्या एकूण ८५० वीज ग्राहकांनी प्रतिसाद देत " गो ग्रीन" अंतर्गत नावाची नोंदणी केली . अन्य ग्राहकांनीही या सवलतीचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.
वीजबील ऑनलाईन पाहण्यासाठी महावितरणने ग्राहकांना मोबाईल ॲप व www.mahadiscom.in या संकेतस्थळावर विविध पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. या सर्व सुविधा उपलब्ध असतानाही महावितरणतर्फे ग्राहकांना छापील वीजबीलही उपलब्ध करून देण्यात येते. परंतू जे ग्राहक गो-ग्रीन सुविधेचा पर्याय निवडतात, अशा ग्राहकांना छापील बिलाऐवजी ईमेल व एसएमएसद्वारे वीजबील उपलब्ध करून दिले जाते. अशा सर्व ग्राहकांना १ डिसेंबर २०१८ पासून प्रतीबील १० रुपये सवलत दिली जात आहे. गो-ग्रीनचा पर्याय निवडण्यासाठी ग्राहकांनी आपल्या वीजबिलावरील गो-ग्रीन क्रमांकाची नोंदणी महावितरणच्या मोबाईल ॲपद्वारे अथवा महावितरणच्या संकेतस्थळावर https://billing.mahadiscom.in/gogreen.php येथे जाऊन करावी, असे आवाहन महावितरणच्यावतीने करण्यात येत आहे.
गो-ग्रीनचा पर्याय निवडणाऱ्या ग्राहकांना तातडीने वीजबील मिळणार असून संदर्भासाठी वीजबिलाचे जतन करणेही त्यांना सोपे ठरणार आहे. गो-ग्रीनचा पर्याय पर्यावरण संवर्धनालाही हातभार लावणारा आहे. त्यामुळे जास्तीत जास्त वीजग्राहकांनी कागद विरहीत गो-ग्रीन सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी केले आहे.
आजपासून विद्युत सुरक्षा सप्ताहाचे आयोजन
यावेळी ऊर्जा राज्यंत्री मदन येरावार, महापौर नंदा जिचकार, खासदार डॉ. विकास महात्मे, खासदार कृपाल तुमाने, हे प्रामुख्याने उपस्थीत राहणार आहे. याशिवाय आमदार नागो गाणार, आमदार प्रकाश गजभिये, आमदार जोगेंद्र कवाडे, आमदार अनिल सोले, आमदार गिरीष व्यास आमदार सुनील केदार, आमदार कृष्णा खोपडे, आमदार विकास कुंभारे, आमदार सुधाकर देशमुख, आमदार सुधीर पारवे, आमदार मिलींद माने, आमदार सुधाकर कोहळे, आमदार डी. मल्लिकार्जुन रेड्डी, जिल्हा परिषद अध्यक्षा निशा सावरकर आदी मान्यवर उपस्थित राहतील. याप्रसंगी “विदुयत तरंग” या स्मरणिका - 2019 आणि विदुयत कंत्राटदार संघटना, नागपूर यांचे दैनंदिनीचे विमोचन ऊर्जामंत्री यांचे हस्ते करण्यात येईल. या स्मरणिकेत विद्युत सुरक्षा सप्ताह 2016 ते 2018 मधील विविध कार्यक्रमाचा आढावा घेण्यात आला आहे. याप्रसंगी आयोजित प्रदर्शनात विदुयत अपघात कश्या प्रकारे घडतात या संबंधी स्वयंचलीत मॉडेल्स सादर करण्यात येणार आहेत. अपघातविरहीत वीजपुरवठा हे राज्य शासनाचे ध्येय असून यासाठी वीज ग्राहकांची साथ अत्यंत मोलाची आहे. दैंनंदिन आयुष्यात लहान-सहान गोष्टी विचारात घेतल्यास विजेमुळे होणारे अपघात हमखास टाळता येणे शक्य आहे, यादृष्टीने या सप्ताहादरम्यान ग्राहक प्रबोधन करण्यात येणार आहे.
या सप्ताहादरम्यान सर्वत्र विदुयत सुरक्षेबाबत कार्यशाळांसोबतच नागपूर शहरातील प्रत्येक चौकातील एल.सी.डी. स्क्रीनवर विदुयत सुरक्षीततेबाबत सुरक्षा संदेश प्रदर्शित करण्यात येणार आहे. शहरातील एफ.एम.चॅनलवर सुध्दा विदुयत सुरक्षीततेबाबत सुरक्षा संदेश प्रसारीत करण्यात येणार आहे. जयस्तंभ चौक, व्हेरायटी चौक, महानगर पालीका मुख्य इमारत, मेडीकल चौक, रेल्वे स्थानक, मध्यवर्ती बसस्थानक या शहराच्या प्रमुख ठिकाणी विद्युत सुरक्षेबाबतचे पोस्टर्स/बॅनर्स लावण्यात येणार आहे. तसेच रवी भवन, टी पॉईंट मॉरीस कॉलेज चौक, कळमना मार्केट, जिल्हाधिकारी कार्यालय, तहसिल कार्यालय, कामठी, मेडीकल चौक, रेल्वे स्थानक, मध्यवर्ती बसस्थानक येथे विदुयत सुरक्षेबाबतचे होर्डींग्स् लावण्यात येणार आहे. स्थानिक शाळा, शैक्षणिक संस्था, उद्योग, तंत्रनिकेतन, प्रशिक्षण संस्था येथे पोस्टर, स्लोगन स्पर्धा आयोजीत करण्यात येणार आहे. शहराच्या स्लम भागातही विदुयत सुरक्षीततेबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. तसेच विदुयत निरीक्षण विभागातील अभियंते जिल्हयातील ग्रामीण भागातील शाळामध्ये विद्यार्थ्यांना विद्युत सुरक्षेचे महत्व व विजेचा सुरक्षीत वापर या बाबत मार्गदर्शन करणार आहेत. विदुयत सुरक्षा सप्ताहाच्या उपक्रमांव्दारे राज्यात होणारे विदुयत अपघात कमी व्हावे असा प्रयत्न विदुयत निरीक्षण विभाग, नागपूर व राज्यातील सर्व विदुयत निरीक्षणालय, उद्योग, उर्जा व कामगार विभाग करीत आहे.
आज अज्ञान किंवा अतिआत्मविश्वास, अतिउत्साहामुळे दरवर्षी वीज अपघातात शेकडो बळी जातात, तर अनेकांना कायमस्वरुपी अपंगत्व येत असते. शे-पावशे रुपयांच्या वीजचोरीसाठी लाखमोलाच्या जीवाची बाजी लावल्या जाते, वीज तारांमधे अडकलेला पतंग काढायला जीव धोक्यात घातला जातो. वीज वाहिनीखाली घरांचे बांधकाम केल्या जाते, वीजपुरवठा खंडीत झाल्यास तो पुर्ववत करण्याचा प्रयत्न केल्या जातो, ओल्या हाताने विद्युत उपकरणे हाताळली जातात, ह्या सा-या गोष्टी म्हणजे साक्षात मृत्यूलाच आमंत्रण असल्याने ह्या गोष्टी टाळून अपघातविरहीत वीजपुरवठ्याच्या ध्येयात सर्वांनी सोबत करण्याचे आवाहन आयोजकांतर्फ़े करण्यात आले आहे.
• विद्युत उपकरणे ओल्या हाताने हाताळू नका.
• विज वाहिनीच्या खाली किंवा जवळ कोणत्याही प्रकारचे बांधकाम करू नका.
• अर्थीगची व्यवस्था असलेल्या थ्री-पीन असलेलीच उपकरणे वापरा.
• परवाना धारक कंत्राटदाराकडूनच घरातील वीज वायरींग करून घ्या.
• आयएसआय प्रमाणित वीज वायर्स, केबल्सचा वापर करा.
• अतिभार किंवा शॉर्टसर्कीटमुळे हानी होऊ नये याकरीता योग्य क्षमतेची एमसीईबी/ एमसीसीबी वापरा.
• विद्युत खांब किंवा तणाव तारांना गुरेढोरे बांधू नका.
• विद्युत प्रवाह शेतातील कुंपणात सोडू नका.
• न्यूट्रल करीता उघड्या तारांचा वापर टाळून इन्सुलेटेड तारांचा वापर करा
• तात्पुरते, लोंबकाळणारे वायर्स वापरू नका.
• विजेचा अनधिकृत वापर टाळा.
• विद्युत उपकरणे दुरुस्तीच्या वेळी, त्याचा वीजपुरवठा बंद करून प्लग काढला असल्याची खात्री करा.
• कुलरमधे पाणी भरतांना स्लीपर्स घालाव्यात सोबतच कुलरचा प्लग काढला असल्याची खात्री करा.
• वीज तारांखाली गुरे-ढोरे अथवा कापणी झालेले पीक ठेऊ नका.
• कपडे वाळविण्यासाठी वीज तारांचा वापर करू नका.
• विनाकारण वीज खांबावर चढू नका.
• वीजेच्या तुटलेल्या तारा आढळल्यास महावितरण नजिकच्या कार्यालयाला किंवा 1912, 18002333435, 18001023435 या निशुल्क दुरध्वनी क्रमांकावर त्वरीत कळवा.
उपमुख्य जनसंपर्क अधिकारी,
प्रादेशिक कार्यालय, महावितरण, नागपूर
Wednesday, December 12, 2018
नागपूरच्या 11000 ग्राहकांचा पुरवठा केला महावितरणने खंडित
महावितरणच्या नागपूर परिक्षेत्रात तीनशे रुपये व त्यावरील अधिक थकबाकी असलेले घरगुती, वाणिज्यिक आणि औद्योगिक वर्गवारीतील तब्बल 1 लाख 62 हजार 133 वीज ग्राहकांकडे सुमारे 81 कोटी 14 लाख रुपयांची थकबाकी असून यापेकी बहुतांश ग्राहकांनी दोन महिन्यांपासून त्यांच्या वीजबिलांचा भरणा केलेला नाही, महावितरणने सप्टेबर महिन्यापासून संपुर्ण राज्यभर सुरु केलेल्या केंद्रीकृत बिलींग प्रणालीमुळे बिलींग़ची संपुर्ण प्रक्रीया महावितरणच्या सांघिक कार्यालयामार्फ़त राबविण्यात येत असून थकबाकीदार ग्राहकांवरही सांघिक कार्यालयाकडून विशेष लक्ष देण्यात येत आहे. थकबाकीचा वाढता बोझा लक्षात घेता महावितरणला आपला आर्थिक गाढा खेचणे तारेवरची कसरत ठरत आहे, वीज खरेदी, कर्मचा-यांचे वेतन, विविध विकास कामांसाठी घेतलेल्या कर्जावरील व्याज देण्यात महावितरणची बहुतांश रक्क्म खर्च होत असल्याने देखभाल व दुरुस्ती यासाठी महावितरणकडे पुरेसा निधी उपलब्ध नसल्याने शंभर टक्के थकबाकी वसुलीसाठी महावितरण आग्रही आहे. ही वसूली करण्यासाठी नागपूर परिक्षेत्रांतर्गत असलेल्या संपुर्ण विदर्भात थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची व्यापक मोहीम हाती घेण्यात आली असून या मोहीमेत आतापर्यंत 7865 ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. शुन्य थकबाकीचे लक्ष्य निर्धारीत करीत ही मोहीम दिवसेंदिवस अधिक आक्रमक करण्याच्या स्पष्ट सुचना प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांनी सर्व क्षेत्रिय अधिका-यांना दिल्या आहेत.
महावितरणच्या या विशेष मोहिमेत आत्तापर्यंत एकूण 1 लाख 62 हजार 133 थकबाकीदार वीज ग्राहकांपैकी 46 हजार 162 ग्राहकांकडून 15 कोटी 5 लाख रुपयांची वसुली करण्यात आली आहे तर 7865 थकबाकीदारांचा वीजपुरवठा तात्पुरत्या स्वरूपात आणि 3153 थकबाकीदारांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित करण्यात आला असून उर्वरीत थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याचे काम सर्वत्र मोठ्या प्रमाणात सुरु आहे. पाच हजारावरील आणि एक हजारावरील थकबाकी असलेल्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यास प्राधान्य देत महावितरणने ही मोहीमेची अंमलबजावणी अधिक आक्रमकपणे राबविणे सुरु केले असून ग्राहकांनी नियमितपणे वीजबिलांचा भरणा करीत सहकार्य करावे आणि वीजपुरवठा खंडित होण्याची कटू कारवाई टाळण्याचे आवाहन महावितरणतर्फ़े करण्यात आले आहे.
वीजबिल भरण्याचे अनेक पर्याय आणि भरघोस सवलत
विदर्भातील बहुतांश ग्राहकांनी आपल्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी महावितरणकडे केली असल्याने वीजबिलांची अद्ययावत माहिती ग्राहकांना एसएमएसच्या माध्यमातून नियमितपणे उपलब्ध करून दिल्या जात आहे. हा एसएमएस वीज भरणा केंद्रावर दाखवून ग्राहकाला त्याच्या बिलाचा भरणा करणे शक्य असून एसएमएसच्या आधारे बील स्विकृतीस नकार देणा-या बील भरणा केंद्राची तक्रार नजीकच्या महावितरण कार्यालयाकडे करण्याची मुभाही ग्राहकाला देण्यात आली असून, त्यांच्या तक्रारीची शहानिशा करून संबंधित बील भरणा केंद्रांवर कारवाई करण्यात येत असल्याने आता वीजबिल घरी येण्याची वाट न बघता बिल भरणा केंद्रावर एसएमएस दाखवून किंवा ऑनलाईन पद्धतीनेही वीजबिल भरणा करण्याची सुविधा ग्राहकांना उपलब्ध आहे, याशिवाय ‘गो ग्रीन’ च्या माध्यमातून कागदी बिलाएवजी ईमेल च्या माध्यमातून वीज बिल स्वीकारण्याच्या पर्याय स्विकारल्यास ग्राहकाला दहा रुपयांची सवलतही देण्यात येत आहे, याशिवाय एसएमएस मिळताच वीजबिलाचा भरणा केल्यास ग्राहकाला प्रॉम्प्ट पेमेंट्च्या माध्यमातूनही सवलत देण्यात येत असल्याने ग्राहकांनी उपलब्ध पर्यायांचा लाभ घेत वीजबिलाचा भरणा करण्याचे आवाहनही महावितरणतर्फ़े करण्यात आले आहे.