काव्यशिल्प Digital Media: गोंदिया

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu
Showing posts with label गोंदिया. Show all posts
Showing posts with label गोंदिया. Show all posts

Wednesday, January 23, 2019

गोंदिया येथे लवकरच विमान सेवा सुरु होणार

गोंदिया येथे लवकरच विमान सेवा सुरु होणार


- सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले

नवी दिल्ली, २३ : केंद्र शासनाच्या ‘उडान’ योजनेंतर्गत गोंदिया येथे लवकरच विमान सेवा सुरु होणार असल्याची माहिती राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालक मंत्री राजकुमार बडोले यांनी आज येथे दिली.

श्री. बडोले यांनी आज उद्योग भवन येथे नागरी विमान वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या बैठकीत श्री. बडोले यांनी गोंदिया येथे विमानसेवा सुरु करण्याची मागणी केली. उभय मंत्र्यांमध्ये यावेळी झालेल्या सविस्तर चर्चेनंतर केंद्र शासनाच्या उडान योजनेंतर्गत गोंदिया येथे विमान सेवा सुरु करण्याची ग्वाही श्री. प्रभू यांनी दिल्याचे श्री. बडोले यांनी सांगितले. यासंदर्भात लवकरच अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याचेही श्री. बडोले म्हणाले.

गोंदिया येथे विमान सेवा सुरु झाल्यास या भागाच्या विकासाला मोठी चालना मिळेल, असा विश्वासही श्री. बडोले यांनी व्यक्त केला.

Sunday, December 23, 2018

सरकार शिक्षण व्यवस्थाच संपवायला निघाले-नाना पटोले

सरकार शिक्षण व्यवस्थाच संपवायला निघाले-नाना पटोले

आठव्या शिक्षक साहित्य समेलनाचे उदघाटन


गोंदिया – भारतीय लोकशाहीचा ग्रंथ म्हणजे संविधान आणि त्यातील शिक्षण हा महत्त्वाचा घटक आहे. शिक्षणाने माणूस घडतो मात्र केंद्र व राज्यातील सत्तारुढ सरकार नवीन नवीन धोरण तयार करुन सरकारी शाळा बंद पाडण्याचा कट करीत आहे. शिक्षणाची मुळ पायरी काढून घेवून शिक्षण व्यवस्था संपविण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप काँग्रेसच्या अखिल भारतीय किसान संघाचे अध्यक्ष व माजी खा.नाना पटोले यांनी केला आहे.
शिक्षक भारतीतर्फे आठवे राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलन येथील नटवरलाल माणिकलाल दलाल महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आले आहे. शनिवारी (२२ डिसेंबर) संमेलनाच्या पहिल्या दिवसाच्या सत्राच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. या वेळी स्वागताध्यक्ष राजेंद्र झाडे, अशोक बेलसरे, अतुल देशमुख, लोककवी अरुण म्हात्रे, संस्था कार्याध्यक्ष जयवंत पाटील,अमर वराडे,महेंद्र सोनवाने उपस्थित होते.

Friday, December 21, 2018

वन्यजीवप्रेमिच्या घरातच सापडला बिबट शिकारी

वन्यजीवप्रेमिच्या घरातच सापडला बिबट शिकारी

मानद वन्यजीवरक्षकचा मुलगा निघाला बिबट्याचा मुख्य आरोपी



बिबट शिकारप्रकरणी तीन ताब्‍यात
गोंदिया,दि.२१ः : अर्जुनी मोरगाव तालुक्यातील केळवद केशोरी वनक्षेत्रातील कक्ष क्रमांक २३३ मध्ये १५ डिसेंबरला बिबट्याची गोळी झाडून शिकार करण्यात आली. या प्रकरणी वनविभागाने तीन आरोपीना ताब्यात  घेतले असून यातील मुख्य आरोपी माजी मानद वन्यजीवरक्षकांचा मुलगा भीमसेन डोंगरवार हा आहे.तर  हेमराज मेश्राम (रा. सुरबन) व मानसिंग नैताम‘ (रा. गंधारी) यांना ताब्यात घेतले आहे.या तिघांनाही २७ पर्यंत वनकोठडी देण्यात आली आहे
केळवद केशोरीच्या जंगलात १५ डिसेंबरला दोन ते अडीच वर्षांचा बिबट मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली होती. घटनेची माहिती होताच वनविभागाच्या अधिकाèयांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. या वेळी बिबट्याच्या चारही पायाचे पंजे कापून शिकाèयांनी नेल्याचे दिसले.  उत्तरीय तपासणीत बिबट्याची बंदुकीतून गोळी झाडून शिकार केल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे वनविभागापुढे शिकाèयांना शोधून काढण्याचे आव्हान होते.
दरम्यान, या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच वनविभागाने हेमराज मेश्राम याला सुरबन येथून तर, मानसिग नैताम याला गंधारी येथील घरून ताब्यात घेतले. या दोघांचीही कसून चौकशी केली असता त्यांनी भिमसेन डोंगरवार यांचे नाव सांगितले.त्यानंतर वनअधिकारीांनी भिमलेनला धाबेपवनी येथून रात्रीला ताब्यात घेतले.क्याच्याकडून बंदूक व भाला जप्त करण्यात आला.
दरम्यान वनविभागाने आरोपी पकडल्यानंतरही जिल्हा माहिती कार्यालयामार्फत प्रसिध्दीपत्रक देऊन चौकशी सूरू असून आरोपी पकडल्यावर माहिती देऊ असे सांगितल्याने वनविभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.तर वन परिक्षेत्र अधिकारी दर्शना पाटील यांना माहितीकरीता भ्रमणध्वनी केले असता त्यांनी प्रतिसाद न दिल्याने सविस्तर माहिती कळू शकली नाही.

Monday, December 17, 2018

गोंदिया-विविध विकास कामाचे भूमिपूजन

गोंदिया-विविध विकास कामाचे भूमिपूजन



गोंदिया,दि.17 : जिल्ह्यातील सडक/अर्जुनी तालुक्यातील कोसमघाट येथे ३०५४ योजनेंतर्गत कोसमघाट - चिखली रस्त्याचे डांबरीकरण कामाचे भूमिपूजन, २५१५ योजनेंतर्गत सावंगी येथील अंतर्गत सिमेंट काँक्रीट रस्ता तथा ३०५४ योजनेंतर्गत सिमेंट काँक्रीट रस्ता बांधकामाचे भूमिपूजन, आमदार स्थानिक विकास कार्यक्रमाअंतर्गत सौंदड येथील चावडी बांधकाम, रस्ता खडीकरणाच्या कामाचे व संत तुकाराम महाराज समाज सभागृहाजवळ आवारभिंत बांधकामाचे भूमीपूजन तसेच राका येथील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते करण्यात आले.

पालकमंत्री बडोले यावेळी म्हणाले, भूमिपूजन करण्यात आलेल्या कामाची लवकरच सुरुवात करण्यात येऊन दर्जेदार कामे करण्यात येतील. यावेळी पं.स.सभापती गिरीधारी हत्तीमारे, उपसभापती राजेश कठाणे, जि.प.सदस्य माधुरी पाथोडे, माजी पं.स.सभापती कविता रंगारी, जि.प.सदस्य रमेश चुऱ्हे, पं.स.सदस्य मंजू डोंगरवार, तहसिलदार राजेंद्र अरमरकर, सार्वजनिक बांधकाम जि.प.उपअभियंता प्रकाश ताकसांडे, कोसबी ग्रामपंचायत सरपंच अलका रामटेके, चिखली ग्रामपंचायत सरपंच सुधाकर कर्वे, राका ग्रामपंचायत सरपंच रेखा चांदेवार, सावंगी ग्रामपंचायत सरपंच शेरुखाँ पठाण, सौंदड ग्रामपंचायत सरपंच गायत्री इरले व सामाजिक कार्यकर्ते हर्ष मोदी उपस्थित होते.

Wednesday, July 18, 2018

दुधाच्या टँकरसह चालक गेला वाहून

दुधाच्या टँकरसह चालक गेला वाहून

गोंदिया -  संततधार पावसामुळे सोमवारी जनजीवन प्रभावित झाले होते. दरम्यान मंगळवारी काही काळ पावसाने उसंत दिल्यामुळे जनजीवन पूर्वपदावर आले. बाघ नदीच्या पुरात चालकासह दूध टँकर वाहून गेल्याची घटना मंगळवारी संध्याकाळी घडली. नदीला पूर आलेला असताना या टँकरचा चालक पुलावरुन टँकर नेत होता. पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने तो त्यात वाहून गेला.
मध्यप्रदेशच्या बालाघाटहून दुधाचा टँकर गोंदिया जिल्ह्यात येत होता. गोंदिया-आमगाव मार्गावर बाघ नदीला पूर आला होता. या पुरात हा टँकर चालकासह वाहून गेला. टँकर चालकाच्या शोधासाठी नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन पथकासह रावनवाडी पोलीस प्रयत्न करत आहेत. मागील दोन दिवसांपासुन गोंदिया जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे नदी, नाले तुडूंब भरुन वाहत आहे. रस्त्यांवरील नाल्यांना पूर आल्याने काही गावांचा संपर्क तुटलेला आहे.

Saturday, June 30, 2018

ओबीसी समाजावरील अन्याय दूर करा

ओबीसी समाजावरील अन्याय दूर करा

Remove injustice from OBC community | ओबीसी समाजावरील अन्याय दूर करागोंदिया/प्रतिनिधी:
 वैद्यकीय शिक्षणात नियमानुसार ओबीसी प्रवर्गाला २७ टक्के आरक्षणाची तरतूद आहे. मात्र प्रत्यक्ष वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत केवळ २ टक्के आरक्षण देऊन ओबीसी समाजावर अन्याय करण्यात आला आहे. ओबीसींना २७ टक्के आरक्षण देऊन ओबीसी समाजावरील अन्याय दूर करावा, अन्यथा ओबीसी समाजाच्या वतीने देशव्यापी आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यामार्फत प्रधानमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे.यावेळी दिलेल्या निवेदनातून मागील काही वर्षापासून ओबीसी समाज आपल्या न्याय हक्कासाठी शासनाशी संघर्ष करीत आहे. नियमानुसार वैद्यकीय शिक्षणात २७ टक्के आरक्षणाची तरतूद असताना यावर्षी राबविलेल्या प्रवेश प्रक्रियेत केवळ २ टक्के प्रवेश देण्यात आला. हा देशभरातील ओबीसी समाजावर मोठा अन्याय आहे. ही बाब आरोग्य मंत्र्याच्या निदर्शनास आणून देण्याची विनंती निवेदनातून पंतप्रधानांना करण्यात आली आहे.
यापूर्वी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने १७ फेब्रुवारी २०१८ रोजी ओबीसी बांधवाच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले होते. त्या निवेदनावर आजपर्यंत कुठलीही कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळे हे सरकार ओबीसी समाज बांधवाच्या विकासाच्या बाबतीत उदासीन असल्याचा आरोप करण्यात आला आहे. ओबीसी समाज बांधवांच्या मागण्या तत्काळ मार्गी लावाव्या, अन्यथा ओबीसी समाज बांधव आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत ओबीसीला २७ टक्के आरक्षण देण्यात यावे.
ओबीसी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती पूर्ववत देण्यात यावी. मागासवर्गीय आयोगांवर ओबीसी समाजबांधवांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती करावी. ओबीसी विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह सुरु करावे. ओबीसीची जातीनिहाय जनगणना जाहीर करुन नितीआयोगाकडून निधीची वेगळी तरतूद करावी. ओबीसी आर्थिक विकास महामंडळाला ५ हजार कोटी भांडवल द्यावे. उद्योग व्यवसायासाठी १० लाखांपर्यंत कर्ज मर्यादा वाढवावी. क्रिमिलेयरची अट रद्द करावी. स्वामीनाथन समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी. मंडल कमिशनची १०० टक्के अमंलबजावणी करावी. शेतकºयांच्या मुलीच्या लग्नासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करुन द्यावे. शेतकºयांच्या तरुण मुलांना उद्योगासाठी शून्य व्याज दरावर कर्ज उपलब्ध करुन द्यावे. ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, नगर पालिका व महानगर पालिकाप्रमाणे ओबीसींना विधानसभा व लोकसभेत २७ टक्के आरक्षण द्यावे.
तीन वर्षापासून प्रलंबित शिष्यवृत्ती व फ्रीशिप तत्काळ अदा करण्यात यावी व बंद केलेले शैक्षणिक कर्ज पूर्ववत करण्यात यावे, स्पर्धा परीक्षेत महिलांसाठी असलेली क्रिमिलेअरची जाचक अट रद्द करण्यात यावी. क्रिमिलेअरच्या अटीमुळे आयएएसच्या प्रक्रियेतून बाद ठरविलेल्या १६०० ओबीसी विद्यार्थ्यांना पुन्हा संधी देण्यात यावी, आदी मागण्या निवेदनातून केल्या आहेत.
शिष्टमंडळात जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पंचम बिसेन, विनोद हरिणखेडे, प्रभाकर दोनोडे, अशोक शहारे, राजलक्ष्मी तुरकर, देवचंद तरोणे, जितेश टेंभरे, बालकृष्ण पटले, नानू मुदलियार, सचिन गोविंद शेंडे, सुनील पटले, डॉ. किशोर पारधी, अजय हलमारे, प्रमोद लांजेवार, एकनाथ वहिले, चंद्रकुमार चुटे, जयंत कच्छवाह, राजेशकुमार तुरकर, किरण बंसोड, नंदकिशोर शरणागत, डॉ. विनोद पटले, रौनक ठाकूर, सुखदास धकाते, राजकुमार ठाकरे, लिलाधर डोमळे आदींचा समावेश होता.