ललित लांजेवार:
गेल्या दोन वर्षा अगोदर गणेश स्थापना व विसर्जनाच्या दिवशी सर्व गणेश भक्त गणपतीबाप्पा मोरया म्हणत डीजेच्या तालावर स्थापना व मिरवणूक काढत होते. अगोदर चंद्रपुरात डीजेला परवानगी असतांना शहरात गणपती बापाच्च्या स्वागतासाठी शेकडो डीजे गणपतीच्या स्वागतासाठी व मिरवणुकीसाठी शहरात आणले जात होते. यंदा मात्र तसे चित्र काही आपल्याला पाहायला मिळणार नाही आहे.
गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजे बंद म्हणजे बंदच राहील. असा आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक नियती ठाकर यांनी काढला आहे.सध्या चंद्रपुरात सोशल मीडियावर डीजे सुरू झाले आहेत, आता फुल टू डीजेच्या तालावर धमाल करता येणार आहे असे मॅसेज व्हायरल होत असून डीजे चालकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते, त्यामुळे डीजेच्या तालावर पुन्हा थिरकता येणार असेच काहीसे चित्र चंद्रपुरात युवक वर्गात बघायला मिळाले होते . मात्र आता पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांनी डीजे डॉल्बीवर यावर्षीही बंदी कायम असल्याचे स्पष्ट करत, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे, तसेच ध्वनी प्रदूषण बघता सुप्रीम कोर्टाने ही बंदी केली असून बंदी उठविण्याबाबत कोणतेही सूचना दिली नाही, त्यामुळे डीजेवर खर्च करू नये,व इतर पारंपारिक वाद्यांना प्राधान्य देत गणेश उत्सव साजरा करा असा संदेशही दिला आहे.मिरवणुकीत डीजे वाजल्यास ध्वनिप्रदूषण नियंत्रण कायद्यानुसार कारवाई केली जाईल, व डीजे जप्त केला जाईल असे देखील यावेळी सांगण्यात आले.