काव्यशिल्प Digital Media: मार्शल

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu
Showing posts with label मार्शल. Show all posts
Showing posts with label मार्शल. Show all posts

Tuesday, February 13, 2018

सिकई मार्शल आर्ट स्पर्धेत चंद्रपूरच्या अवंतीला सुवर्णपदक

सिकई मार्शल आर्ट स्पर्धेत चंद्रपूरच्या अवंतीला सुवर्णपदक


चंद्रपूर/प्रतिनिधी:
 काठमांडु येथे पार पडलेल्या जागतिक सिकई मार्शल आर्ट स्पर्धेत मूल येथील अवंती अनिल गांगरेड्डीवार हिने सुवर्णपदक पटकाविले. मे २०१८ ला इंडोनेशिया येथे होणाऱ्या स्पर्धेत अवंती गांगरेड्डीवार भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहे.
अवंती गांगरेड्डीवार हिने स्थानिक नवभारत कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात १२ वीचे शिक्षण पूर्ण केले. अवंती  सध्या विसापूर येथे बीपीड करीत आहेत.तिने  मुक्त विद्यापीठातून इंग्रजी विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. प्रशिक्षक संदिप पेदापल्लीवार यांच्या मार्गदर्शनात विविध स्पर्धेत अव्वल ठरली आहे. शालेय स्तरापासून मार्शल आर्टची आवड असणाऱ्या अवंतीने नाशिक व गोवा येथील स्पर्धेतही सुवर्णपदक प्राप्त केले. वडिल अनिल गांगरेड्डीवार हे शिक्षक पदावर कार्यरत असून ते योगाचे धडे देतात.