काव्यशिल्प Digital Media: शरद पवार

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu
Showing posts with label शरद पवार. Show all posts
Showing posts with label शरद पवार. Show all posts

Wednesday, November 22, 2017

 पवार व सुप्रिया सुळेंवर अश्‍लील ट्विट

पवार व सुप्रिया सुळेंवर अश्‍लील ट्विट

नागपूरच्या तरुणाला अटक - आ. जितेंद्र आव्हाडांची तक्रार


नागपूर-  राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत अश्‍लील भाषेत ट्‌विट करणाऱ्या नागपूरच्या युवकास पोलिसांनी अटक केली.  आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यातील वर्तकनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.






Sunday, November 19, 2017

पवार - पाटलात बंददार चर्चा

पवार - पाटलात बंददार चर्चा

वर्धा : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्यात वर्धा येथील शासकीय विश्रामगृहात शनिवारी (18 नोव्हेंबर) सकाळी अर्धा तासापेक्षा अधिक वेळ बंद दारा आड चर्चा झाली. या चर्चेचा अधिक तपशील मिळू शकला नसला तरी शरद पवार मागील चार दिवसांपासून विदर्भाच्या दौ-यावर असल्याने या संदर्भात पाटील यांनी पवारांशी चर्चा केल्याची सूत्रांची माहिती आहे. चंद्रकांत पाटील शुक्रवारी (17 नोव्हेंबर) रात्री 11 वाजता विश्रामगृहात पोहोचले. त्यानंतर शनिवारी त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामाची आढावा बैठक घेतली. शिवाय जिल्ह्यातील अनेक नागरिकांची निवेदनेही स्वीकारली.
सकाळी शरद पवार आणि चंद्रकांत पाटील एकाच विश्रामगृहात मुक्कामी असल्याने दोघांचीही भेट झाली. यावेळी पाटील यांनी शरद पवारांशी दीर्घकाळ चर्चा केली. शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यात सत्ताधारी पक्षाचे लोकही चार दिवसांत आपल्याला भेटले. आपण त्यांना शेतक-यांच्या प्रश्नाबाबत बोललो, पण त्यांनी आमच्या लोकांना शेतीचे काही कळत नाही, असे सूचक उत्तर दिल्याचे जाहीर सभेत सांगितले.

Thursday, November 16, 2017

धनगर समाजाला ST आरक्षण मिळवून देण्यास तटस्थ - शरद पवार

धनगर समाजाला ST आरक्षण मिळवून देण्यास तटस्थ - शरद पवार



चंद्रपूर/ प्रतिनिधी:
निवडणुका आल्या की विविध राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यांचे प्रसिध्दीकरण होते आणि विविध राजकीय पक्ष जनतेपर्यंत पोहचुन जनतेला खूष करणारी आश्‍वासने देण्याची स्पर्धा सुरू करतात. अर्थात आपण सत्तेवर आल्यानंतर काय करू हे सांगण्यात गैर करत नाही. शरद पवारांनी देखील धनगर समाजाला प्रश्न पडेल असा प्रश्न  करत आश्वासनही दिले आहे.भाजपला तुम्ही धनगर समाजाने मत दिले मात्र आश्वासनाव्यतीरीक्त तुम्हाला क़ाय मिळाले?अशी प्रतिक्रिया धनगर समाजाचे निवेदन स्वीकारताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली.

शरद पवार हे दोनदिवसीय चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी विविध पक्षांकडून त्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. सोबतच धनगर समाजानेही समाजावरील अन्याय दूर करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना चंद्रपूर येथील शासकीय विश्रामगृहात भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी त्यांनी धनगर समाजाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अनुसूचित जमातीत आरक्षण मिळवून देण्यास पूर्ण तत्पर आहे व आम्ही तुम्हाला आरक्षण मिळवुन देणार आहोत. असे आश्वासनही धनगर समाजाचा पदाधिकाऱ्यांना दिले.

यावेळी निवेदन व बैठकीस धनगर समाजाचे देवराव ठमके, प्रा. अमित ठमके, शिरीष उगे, दिनेश चामाटे, पी.जे. टोंगे, प्रामुख्याने उपस्थित होते.

मात्र पवारांनी दिलेले हे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आल्यावर पूर्ण करेल काय की हे ही हवेतच विरेल याकडे सर्वांचे लक्ष लागले राहणार आहे.
सत्ताधाऱ्यांना काँग्रेसची भीती वाटत आहे: शरद पवार

सत्ताधाऱ्यांना काँग्रेसची भीती वाटत आहे: शरद पवार


चंद्रपूर/प्रतिनिधी:
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. 2019 ची काँग्रेसच्या निवडणुकीची तयारी बघता राज्यकर्त्यांना राहुल गांधी यांची भिती वाटू लागली आहे.त्यामुळे राजीव गांधी यांच्या काळात बंद झालेल्या प्रकरणाची फाईली पुन्हा उगदून काढून काँग्रेसची प्रतिमा ऐन निवडणुकीच्या तोंडावर मलिन करण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून सुरू आहे.  ज्या इटालियन माणसावर ठपका होता तोही आता जिवंत नाही.राहुल गांधींवर बोफोर्स प्रकरणाचा ठपका ठेवण्याचा सीबीआयच्या माध्यमातून केंद्र सरकार प्रयत्न करत आहे असा थेट आरोप पवार यांनी मेळाव्यात बोलताना केला.
शेतकऱ्यांची कर्जमाफी लवकर न केल्यास हिवाळी अधिवेशन चालू देणार नाही - शरद पवार

शेतकऱ्यांची कर्जमाफी लवकर न केल्यास हिवाळी अधिवेशन चालू देणार नाही - शरद पवार

चंद्रपूर -राज्य सरकारने फसवी कर्जमाफी केली असून रोज नवनवीन सूचना ते करत आहेत. राज्यातील सर्वसामान्य जनता आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी सत्तेपूर्वी भाजपाने अनेक आश्वासने दिली. मात्र या आश्वासनांची पूर्तता करण्याऐवजी दिशाभूल करण्याचे प्रकार सुरू आहेत. असे माजी केंद्रीय कृषीमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. 
चंद्रपूर हा कामगार व कष्टकऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो.    जिल्ह्यातील एकूण उद्योगांपैकी अनेक उद्योग बंद पडलेले दिसत आहेत. या समस्येकडे राज्यकर्त्यांनी वेळीच लक्ष दिले नाही तर भविष्यात ही परिस्थिती अधिक बिकट होईल असे परखड मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी येथे व्यक्त केले. यावेळी त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला व नंतर न्यू इंग्लिश ग्राऊंडवर त्यांचा कार्यकर्ता मेळावा पार पडला.
दारूबंदी उठवा; लिकर असोशिएशनचे शरद पवारांना निवेदन

दारूबंदी उठवा; लिकर असोशिएशनचे शरद पवारांना निवेदन

चंद्रपूर/प्रतिनिधी:
जिल्ह्यातील दारूबंदीमुळे अनेक लोकांचे परिवार रस्त्यावर आले. अनेक लोकांच्या हातून काम गेले त्यांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला,राज्यशासनाच्या कोट्यवधींचा महसूल बुडाला, त्यामुळे हि फसवी दारूबंदी उठविण्यासाठी चंद्रपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना लिकर असोशिएशनच्या माध्यमातून निवेदन देण्यात आले.शरद पवार हे दोन दिवसीय चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे.त्यावेळी  शासकीय विश्रामगृहात हे निवेदन देण्यात आले.
करोडोचे कर्ज परवाना धारक बार मालकावर आहे,दारूबंदी झाल्यानंतर प्रत्येक महिन्यात पोलीस करोडो रुपयाची दारू जप्त करत आहे.यावर दारूबंदी पूर्णतः फसली आहे,अशी हि फसवी दारूबंदी उठविण्यासाठी व शासनाचा कोट्यावधीचा महसूल भरून काढण्यासाठी चंद्रपूर जिल्यातील दारूबंदी उठविण्यासाठी हे निवेदन देण्यात आले.यावेळी राष्ट्रवादीचे नगरसेवक दीपक जयस्वाल,यांच्यासह लिकर असोशिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.
सरकारने जनतेचे प्रश्न सोडवावे;शरद पवार यांचे चंद्रपुरात वक्तव्य

सरकारने जनतेचे प्रश्न सोडवावे;शरद पवार यांचे चंद्रपुरात वक्तव्य

चंद्रपूर हा औद्योगिक जिल्हा आणि गडचिरोली हा मागासलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो. गडचिरोलीत नक्षलवाद मोठ्या प्रमाणावर आहे.सरकारने येथील बंद उद्योगधंद्यांकडे लक्ष दिले पाहिजे.  ह्या  जिल्ह्यातील लोकांचे ,रोजगार व आर्थिक प्रश्न सरकारने  सोडवले नाही आणि युवकांच्या हाताला काम दिलं नाही तर या जिल्ह्यातील लोक नक्षलवादाकडे कसे वळतात, हे आजच्या परिस्थितीवरून दिसून येत आहे . त्यामुळं सरकार कोणतीही असो लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी गंभीर असलं पाहिजे.- शरद पवार
sharad pawar साठी इमेज परिणाम

Wednesday, November 15, 2017

 शरद पवार म्हणाले ....

शरद पवार म्हणाले ....


  • गुजरातचे चित्र काँग्रेससाठी अनुकूल दिसत आहे. आमच्या तिथे दोनच जागा आहेत. या निवडणुकीत काँग्रेससोबत एकत्रपणे लढण्यासाठी आमची चर्चा चालू आहे. 

  • 'मी लाभार्थी' म्हणून मोठमोठ्या जाहिराती दिल्या जात आहेत. पण त्यात कर्जमाफीचे किती लाभार्थी आहेत, हे कळलेले नाही.
  •  नागपूरमध्ये अलिकडे हत्यांचे प्रमाण वाढले आहे. आजच्या वर्तमानपत्रातही काही हत्या झाल्याचे निदर्शनास आले. सांगलीची घटनाही धक्कादायक आहे. कायद्याचे राज्य आहे का? असा प्रश्न पडतो. राज्यात ज्या घटना घडत आहेत, त्यावर मुख्यमंत्र्यांची गृहमंत्री म्हणून एकही प्रतिक्रिया मी पाहिली नाही. त्यावेळी आर. आर. पाटील यांनी स्वतःहून गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मागितले होते. या जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा मुख्य प्रश्न असल्याचे मानले गेले असले तरी मी तसे मानत नव्हतो. मूळ प्रश्न आर्थिक कारणांमुळे होते. त्यावर आर. आर. पाटील यांनी काम केले.

  • गडचिरोली हा हैदराबाद व महाराष्ट्राला जोडणारा जिल्हा आहे. हा जिल्हा विकास, दळणवळणापासून लांब आहे. यावर काम केले नाही तर जिल्ह्याचा विकास होणार नाही, या जाणिवेतून फक्त पोलीस दल पुरेसे नाही तर इतर माध्यमातूनही काम केले पाहिजे हे आर. आर. पाटील यांनी जाणले आणि त्यावर काम केले.
राज्यात कायद्याचे राज्य आहे का?; शरद पवारांची सरकारवर टीका

राज्यात कायद्याचे राज्य आहे का?; शरद पवारांची सरकारवर टीका

गडचिरोली – सांगलीतील अनिकेत कोथळे हत्या प्रकरण तर खूपच धक्कादायक आहे, आजच्या वर्तमानपत्रामध्ये नागपूरमध्येही  काही हत्या झाल्याचे वाचले. या सर्व गोष्टी पाहता या राज्यात कायद्याचे राज्य आहे का, असा प्रश्न उपस्थित होत असल्याचे शरद पवार यांनी म्हंटले आहे.

शरद पवार यांच्या चार दिवसांच्या विदर्भ दौऱ्याला आजपासून गडचिरोली येथून सुरुवात झाली. त्यावेळी ते  पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. राज्यात अशा घटना घडत असतांना त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री म्हणून नैतिक जबाबदारी घेऊन प्रतिक्रिया देणे गरजेचे होते. पण त्यांच्याकडून एकही प्रतिक्रिया पाहिली नाही, असे म्हणत पवारांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.
शरद पवार धावले अपघातग्रस्तांच्या मदतीला

शरद पवार धावले अपघातग्रस्तांच्या मदतीला

  नागपूर /प्रतिनिधी:
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार स्वतःहून अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी धावले.शरद पवार सध्या गडचिरोलीच्या दौऱ्यावर आहेत ,शरद पवार नागपूरहून गडचिरोलीला जात असताना कार आणि टिप्परचा अपघात झाला त्यात चारजण अडकली होती . हा अपघात बघून पवारांनी त्यांची गाडी थांबवली आणि ते स्वत: अपघातग्रस्तांच्या मदतीला धावून गेले.

अपघातग्रस्त कारचा दरवाजा उघडला जात नसल्यामुळे जखमींना बाहेर काढायला त्रास होत होता. यावेळी स्वतः पवारांनी जखमींना बाहेर काढण्यास मदत केली. जखमींना जवळील हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, अपघातग्रस्तांना मदत केल्यानंतर पवार आपल्या दौऱ्यावर रवाना झाले

Tuesday, November 07, 2017

राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलच्यावतीने राज्यभर जनजागृती रथयात्रा काढणार -  ईश्वर बाळबुधे

राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलच्यावतीने राज्यभर जनजागृती रथयात्रा काढणार - ईश्वर बाळबुधे

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसापासून सुरु होणार जनजागृती रथयात्रा...

नागपूर/प्रतिनिधी
ओबीसी समाजाला भाजप सरकारनं फक्त आश्वासनांची गाजरंच दाखवली आहेत. भाजप सरकारला त्यांची जागा दाखवण्यासाठी आणि समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलच्यावतीने राज्यभर जनजागृती रथयात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष Ishwar Balbudhe यांनी दिली. आज राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलच्या प्रमुख पदाधिकारी आणि जिल्हाध्यक्षांची बैठक राष्ट्रवादी काँग्रेस भवनमध्ये पार पडली.

ही जनजागृती रथयात्रा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसापासून सुरु करण्यात येणार आहे. या जनजागृती रथयात्रेमध्ये ओबीसी समाजाच्या प्रमुख मागण्या ठेवल्या आहेत. ही रथयात्रा नागपूरहून सुरु करण्यात येणार आहे.

त्यामध्ये ओबीसींची जातनिहाय जनगणना जाहीर करा, राज्यमागासवर्ग आयोगावर ओबीसी समाजाचा अध्यक्ष असावा, ओबीसी विदयार्थ्यांसाठी जिल्हास्तरावर वसतीगृह, ओबीसी आर्थिक विकास महामंडळाला ४ हजार कोटी भागभांडवल दया, ओबीसी दाखले सुलभरित्या मिळावेत, क्रिमीलेअरची अट रद्द करा, शेतमालाला खर्चावर आधारीत भाव दया, स्वामीनाथन समितीच्या शिफारशी अमलात आणा, मंडल कमिशनची शंभर टक्के अंमलबजावणी करा, विधानपरिषद,विधानसभा,लोकसभेमध्ये ओबीसी आरक्षण दया, शेतकऱ्यांची फसवी कर्जमाफी, महिलांना सबलीकरण अशा मागण्यांचा समावेश असणार आहे.

या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील नागराळकर, ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष भगवान कोळेकर, दत्तात्रय घाडगे, नानासाहेब राऊत, राज राजापूरकर, सचिन आवटे उपस्थित होते.

#NCP #OBCCell #RathYatra