काव्यशिल्प Digital Media: वादळी

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu
Showing posts with label वादळी. Show all posts
Showing posts with label वादळी. Show all posts

Sunday, February 11, 2018

विज पडून तनिस खाक

विज पडून तनिस खाक

सराखा बोर्डा शिवारात विज 
पडून 19 एकरातील तनिस जळून खाक

रामटेक ( ललित कनोजे ):  
आज दुपारी मनसर व परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावली, विजेच्या कळकळाटासह झालेल्या वादळी पावसामुळे अनेकांचे नुकसान झाले, कान्द्रि परिसरात विज पडून चार कामगार जखमी झाले, मनसर येथील रहिवासी सुनील सार्वे यांच्या ट्रेक्टर वर काम करणारे कामगार व चालक हे विट भट्टीवरुण वीटा घेऊन येत असता अचानक वातावरण खराब झाल्याने चालका गज्जु गजभिये यांनी ट्रेक्टर रस्त्याच्या कड़ेला उभे करुण सर्व कामगार ट्रेक्टर च्या खाली जाउन लपले त्यादरम्यान थोड्या अंतरावर विज पडल्याने त्या विजेचा झटका ट्रेक्टर खाली लपलेल्या कामगारांवर बसला त्यात ट्रेक्टर चालक गज्जू गजभिये 45 रा माहुली, कामगार कन्हय्या कोसरिया 37,  शेषराव सोनवाने 35, आणि शालिक कोसरिया 35 सर्व रा. डोलामाईन हे जखमी झाले, त्यांना ताबोडतोब प्राथमिक आरोग्य केंद्र मनसर येथे आणन्यात आले त्याठिकानी त्यांच्यावर प्राथमिक उपचार करुण त्यांना रुग्नवाहिकेने नागपुर येथील मेडिकल मध्ये पाठविन्यात आले. सर्वच विजेच्या धक्क्याने काही प्रमाणात भाजले असल्याने सांगण्यात आले.       

मनसर पासून 6 की मि अन्तरावरिल सराखा बोर्डा शिवारात विजेचा कळकळाटासह झालेल्या वादळी पावसामुळे सराखा येथील रहिवासी चंद्रभान धोटे यांच्या शेतात विज पडल्याने त्यांच्या शेतातिल 19 एकरातील तनसाची गंजी जळून खाक झाली तसेच काही संत्र्याची झाडे सुद्धा जळाल्याची माहिती देण्यात आली यात त्यांचे जवळपास 40 ते 50 हजाराचे नुकसान झाले असल्याचे सांगण्यात आले. सुदैवाने दोन्ही घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही.