काव्यशिल्प Digital Media: माकड

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu
Showing posts with label माकड. Show all posts
Showing posts with label माकड. Show all posts

Tuesday, February 06, 2018

कृष्णनगरात "वानरसेनेचा" धुमाकूळ

कृष्णनगरात "वानरसेनेचा" धुमाकूळ

चंद्रपूर/प्रतिनिधी: 
गेल्या महिना भरापासून माकडांनी चंद्रपुरात हदौस घातला आहे. या माकडांनी अनेकांच्या घरावर धुमाकूळ घालून झाडांचे नुकसान केले. तसेच वाहनांची तोडफोड केली. या प्रकारामुळे चंद्रपूरकरांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे.शहतील कृष्ण नगर परिसरात गेल्या काही दिवसांपासून "वानरसेना" मोठ्या संख्येने येत असून सकाळी सकाळी नागरिकात दह्षद निर्माण करत आहेत. मात्र यावरील उपाययोजनेसाठी वनविभाग मात्र सुस्त असल्याने वनविभागाप्रती संताप व्यक्त केला जात आहे.

   पूर्वी माकडे वस्तीत यायची व कालांतराने जंगलात निघुन जायची. त्यामुळे सामान्य नागरिकांना त्यांचा त्रास होत नव्हता. परंतु अलिकडे गेल्या महिनाभरापासून माकडांनी परिसरातील नागरिकांचे घरे, सार्वजनिक वृक्ष, रस्ता, यावर आपले बस्तान मांडले असल्याने सकाळी नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण होत आहे.
विशेष म्हणजे हा परिसराला लागून जंगल असल्याने या परिसरात माकडांचा जास्तच त्रास होत असल्याची तक्रार  वार्ड वासी करत आहे. सकाळी १५ ते २० माकडांचा ताफा हा सकाळी कृष्ण नगर परिसरात दहषद निर्माण करून नागरिकांना घाबरविण्याचा प्रयत्न करत आहे.
रोज सकाळी दिवस उजाडताच माकडांचा उपदव्याप सुरू होतो. त्यामुळे नागरिकांना हातचे काम सोडून त्यांच्या बंदोबस्त करण्यासाठी धावाधाव करावी लागते. त्यातच नागरिकांचा वेळ जात आहे. विशेषत: महिला व बालकांना धोका निर्माण झाला असून कृष्णनगर परिसरात या माकडांना त्यांच्यावर हमला करण्याइतपत मजल माकडांनी कृष्णनगर प्रभागात केली आहे. पुढे माकडांना घाबरून एखादी अनुचीत घटना घडू शकते. त्यामुळे कृष्णनगर प्रभागातील नागरिक सध्या धास्तावले आहे. वनविभागाचे डझनभर कर्मचारी या कामांवर काही दिवस नियुक्ती केल्यास त्यावर तोडगा काढून नागरिकांना दिलासा देऊ शकतात पण मनात अद्यापही कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या हा प्रश्न गांभीर्याने आला नसल्याने सदर बाब वेळोवेळी नागरिकांनी आणून दिली असतानाही दुर्लक्ष केले जात आहे. एखादी अनुचीत घटना घडण्यापूर्वीच वनविभागाने घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा अन्यथा वनविभागा विरोधात नागरिकांचा तिव्र संतापाचा भडका होण्याची शक्यता आहे.