काव्यशिल्प Digital Media: पकोडा

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu
Showing posts with label पकोडा. Show all posts
Showing posts with label पकोडा. Show all posts

Saturday, February 17, 2018

युवक काँग्रेसचे 'पकोडा' आंदोलन

युवक काँग्रेसचे 'पकोडा' आंदोलन

चंद्रपूर/प्रतिनिधी:   पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार अमित शहा यांच्या बेरोजगारांना पकोडे विकण्याच्या सल्ल्याचे पडसाद चंद्रपुरात देखील बघायला मिळाले आहे. पोलिस भरतीसाठी हजारो युवक-युवतींनी तयारी केली. मात्र, या जिल्ह्यासाठी अवघ्या ५१ जागांची जाहिरात निघाली. पोलिस भरतीचा आजवरचा हा निच्चांक़ आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या बेरोजगारांनी येथिल गांधी चौक येथ माजी खासदार नरेश पुगलीया व युवा नेता राहूल पूगलीया यांचा मार्गदर्शनात एन एस यु आय ( NSUI ) चा वतीने भाजप चा पकोडे तळून निषेध केला. 

निवडणुकीदरम्यान युवकांना विशेष करून सुशिक्षीत बेरोजगारांसाठी वर्षाकाठी २ कोटी रोजगार निर्मिती करण्याचे आश्वासन भाजपाचे नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपच्याच अन्य नेत्यांनीही युवकांना देत त्यांना प्रभावीत केले. मात्र, साडेतीन वर्षाच्यावर केंद्रात आणी राज्यात भाजप सरकारच्या सत्तेचा कार्यकाळ उलटला आहे. तरीही देशात रोजगार निर्मितीत वाढ होणे दुरच, प्रत्यक्षात रोजगार निर्मिती घटून बेरोजगारांची फौज तयार झाली आहे. मेहनत करून विद्यापीठाच्या उच्च पदव्या मिळविणाऱ्या तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याऐवजी त्यांना पकोडे विकण्याचा सल्ला भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी देऊन बेरोजगाराच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले. यामुळे भाजप सरकारच निषेध करण्यासाठी शनिवारी संतप्त झालेल्या बेरोजगारांनी येथिल गांधी चौक येथ माजी खासदार नरेश पुगलीया व युवा नेता राहूल पूगलीया यांचा मार्गदर्शनात एन.एस.यु आय.( NSUI ) चा वतीने भाजपचा पकोडे तळून विद्यमान सरकारचा प्रतिकात्मक निषेध करण्यात आला. 
 या आंदोलनाला एन.एस.यु आय.( NSUI ) चे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या आंदोलनात उपस्थित  होते. सोबत उच्चशिक्षित असलेल्या बेरोजगार युवक-युवतींची मोठी गर्दी होती. बेरोजगारीची मोठी समस्या आहे. अनेक शिक्षित युवकांच्या हाताला काम नाही. सरकारच्या धोरणामुळे युवकांवर ही वेळ आल्याचा आरोप कुशल पुगलीया यांनी यावेळी केला.

Thursday, February 08, 2018

उच्चशिक्षित युवक-युवतीचे शिवसेनेच्या नेतृत्वात "पकोडा" आंदोलन

उच्चशिक्षित युवक-युवतीचे शिवसेनेच्या नेतृत्वात "पकोडा" आंदोलन

चंद्रपूर/प्रतीनिधी:
भाजपने 2 कोटी युवकांना रोजगार देऊ, असे आश्‍वासन निवडणुकीदरम्यान दिले होते. मात्र, अद्यापही रोजगार उपलब्ध झालाच नाही. त्याचे पडसाद चंद्रपूरमध्ये देखील बघायला मिळाले .भाजप सरकार विरोधात नाराजी व्यक्त करत चंद्रपुरातील तुकूम परिसरात शेकडो उच्चशिक्षित युवक-युवतीनी सरकारच्या विरोधात थेट रस्त्यावरच ठेला उभा करत अनेक उच्च शिक्षित विद्यार्थ्यांनी पकोडे तडून नाराजी व्यक्त केली. 
लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान 2 कोटी युवकांना रोजगार उपलब्ध करुन देण्याची घोषणा भाजपने केली होती. या घोषणेचे काय झाले असा प्रश्न देखील यावेळी उपस्थित करण्यात आला होता.पंतप्रधानांनी पकोडा विकून कुणी 200 रुपये रोज कमावत असेल, तर तो चांगला व्यवसाय असल्याचे मत व्यक्त केले होते. तसेच पकोडे विकणे हा एक मोठा रोजगार असल्याचे म्हटले होते. आमच्या पालकांनी आर्थिक ताण सहन करत आम्हाला पदवीपर्यंतचे शिक्षण दिले आहे. ते यासाठीच का? पंतप्रधानांनी चहा विकून स्वत:चा उदरनिर्वाह केला. तीच स्वप्न ते देशातीले उच्च शिक्षित तरुणांना दाखवित तर नाही ना? असे प्रश्‍न यावेळी आंदोलक तरुणांनी उपस्थित केले. तसेच अद्यापही रोजगार उपलब्ध होत नसल्याने सरकारचा निषेध केला.  
उच्चशिक्षण घेतलेल्या युवक-युवतींना रोजगार नसल्याने सरकारने त्यांच्यावर पकोडे विकण्याची वेळ आल्याची टीका शिवसेनेने केली आहे. यावेळी शिवसेनेचे नगरसेवक सुरेश पचारे यांचे सोबत शेकडो उच्चशिक्षित युवक-युवती  उपस्थित होते.