सोशल मीडियावर फोटो व्हायरल
नागपूर/ललित लांजेवार:
चंद्रपुरात लागोपाठ झालेल्या अपघाताच्या मालिकेनंतर जिल्हा पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांनी जिल्हाभर हेल्मेट सक्ती केली. या हेल्मेट सक्तीची मोहीम जिल्हाभर तीव्र करण्यात आली असून दररोज शेकडो वाहन चालकांना पोलीस महामार्गावर व राज्यमार्गावर विना हेल्मेट प्रवास करण्यासाठी दंड आकारत आहेत.
या हेल्मेट सक्तीचा धसका जरी दुचाकीस्वारांनी घेतला नसला तरी मात्र सायकल स्वरांनी नक्कीच घेतला आहे.कारण चंद्रपूरात सध्या एक सायकलस्वार हेल्मेट लावून सायकल चालवत असतानाचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच गाजत आहे.
सद्या हा फोटो सोशल मीडियातील व्हाट्सअप वरील प्रत्येक ग्रुपवर, फेसबुकवर जलद गतीने युजर्स कडून शेअर होत आहे, या फोटोतील दृश्य हे चंद्रपूर येथील प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृह चौक स्थळापासून बस स्टॅन्ड कडे जात असल्याचे आहे.
हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून या फोटोसोबत 1 कॅप्शन लाईन सुद्धा जोडली गेली आहे. ज्यात लिहिण्यात आलेले आहे.चंद्रपूरमध्ये हेल्मेटसक्तीची एवढी दहशत की सायकलस्वार सुध्दा हेल्मेट वापरायला लागले.ह्या कॅप्शन लाईनसोबत सध्या हा फोटो प्रत्येकाच्या व्हाट्सएपवर झडकू लागला आहे.
हा व्हायरल झालेले फोटो दुचाकीस्वाराणे स्वतःहून हेल्मेट परिधान करून काढला आहे की नुसता पब्लिसिटी स्टंट म्हणून काढण्यात आलेला आहे. याची पुष्टी अजूनही होऊ शकली नाही. मात्र सोशल मीडियाच्या भाषेत म्हणायचं झालं तर इतकच म्हणू शकतो की चंद्ररमध्ये पोलिसांच्या धाकाने सायकलस्वराने देखील घातले हेल्मेट.😂😂😂