काव्यशिल्प Digital Media: संविधान

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu
Showing posts with label संविधान. Show all posts
Showing posts with label संविधान. Show all posts

Sunday, January 28, 2018

शहरात सर्वपक्षीय संविधान बचाव रॅली

शहरात सर्वपक्षीय संविधान बचाव रॅली

चंद्रपूर/प्रतिनिधी:
देश आणि राज्यातील सत्ताधाऱ्यांकडून संविधान बदलण्याच्या प्रयत्नात असून याविरोधात चंद्र्पुर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस विधिमंडळ उपगटनेते आ.विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात  २६ जानेवारीला लोकतंत्र बचाव-संविधान बचाव रॅलीचे आयोजन करण्यात आले.

  दुपारी २ वाजता जटपुरा गेट येथून, कस्तुरबा मार्गे गिरनार चौक, गांधी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ आली .यावेळी शहरातील जटपुरा गेट समोरील गांधी पुतळ्याजवळ लोकतंत्र बचाव-संविधान बचाव चे नारे लावण्यात आले.दरम्यान, याप्रसंगी माजी आमदार अविनाश वारजूरकर, राष्ट्रवादी काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष संदीप गड्डमवार, आर.पी.आय.चे व्ही.डी. मेश्राम, शफिक अहमद, चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नंदू नागरकर, चंद्रपूर ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, नगरसेविका सुनिता लोढीया, युवक काँग्रेस अध्यक्ष शिवा राव, सचीन कत्याल, बाजार समिती सभापती दिनेश चोखारे, माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे, माजी जिल्हाध्यक्ष सुभाषसिंह गौर, महिला जिल्हाध्यक्ष सुनंदा जीवतोडे, महेश मेंढे, घनश्याम मुलचंदानी, डॉ. अशोक जीवतोडे, चंद्रपूर अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. मलक शाकीर, अनुसूचित जाती विभाग प्रदेश उपाध्यक्ष संजय रत्नपारखी, असंघटीत कामगार विभाग जिल्हाध्यक्ष विनोद संकत, जिल्हाध्यक्ष समाजवादी पार्टी अन्वर आलम मिर्झा, हिराचंद बोरकुटे, किशोर पोतनवार, डी.के. आरीकर, अंकुश वाघमारे, अय्युब कच्छी, बल्लू गोहकार, संतोष लहामगे, फारूख सिद्धीकी आदी उपस्थित होते.