काव्यशिल्प Digital Media: रामटेक

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu
Showing posts with label रामटेक. Show all posts
Showing posts with label रामटेक. Show all posts

Monday, October 08, 2018

लग्नाचे आमिष दाखवून शरीरसंबंध

लग्नाचे आमिष दाखवून शरीरसंबंध

आरोपीस दहा ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी

रामटेक तालुका प्रतिनिधी- मध्य प्रदेशातील सिवनी येथील पीडित तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार रामटेक येथील मूनलाइट हॉटेल मध्ये आणून तिच्याशी शरीर संबंध स्थापन करणाऱ्या आरोपीस रामटेक पोलिसांनी 7 आँक्टोंबर 2018 रोजी अटक केली. आरोपीला रामटेकच्या प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की मौजा कुरई चांदणी चौक येथील रहिवासी श्याम नरेंद्र हिरकणे वय 25 वर्षे याने सिवनी मध्य प्रदेश येथील 24 वर्षे वयाच्या तरुणीस लग्नाचे आमिष दाखवून रामटेक येथील मूनलाइट हॉटेल मध्ये आणून वारंवार शरीरसंबंध स्थापन केले. पीडितेने याबाबत 20/08/2018 रोजी मध्यप्रदेशातील कुरई पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली सदर गुन्हा मध्यप्रदेश पोलिसांनी घटनास्थळ रामटेक असल्याने रामटेक पोलिसांना वर्ग केला पोलिसांनी याबाबत 30/08/2018 रोजी भारतीय दंडविधानाच्या 376 कलमाखाली अपराध क्रमांक 481/2018 नोंदविला. या दरम्यान या प्रकरणाचे तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक किशोर कुमार वैरागडे त्यांचे सहकारी पोलीस शिपाई अतुल बांते, मनीष सुखदेवे यांनी अत्यंत परिश्रमपूर्वक या प्रकरणातील आरोपी यास 07/10/2018 रोजी तिरोडा तालुक्यातील नागझिरा हॉटेल येथे स्वयंपाकी चे काम करीत असलेल्या श्याम नरेंद्र हिरकणे यास अटक केली. न्यायालयाने आरोपीस 10 ऑक्टोबर 2018 पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पुढील तपास पोलीस निरीक्षक दीपक वंजारी यांचे मार्गदर्शन पोलीस उपनिरीक्षक वैरागडे करीत आहे.

Friday, September 07, 2018

गडमंदिर रामटेकच्या आर्थिक व्यवहाराचे आठ वर्षांपासून ऑडिटच नाही

गडमंदिर रामटेकच्या आर्थिक व्यवहाराचे आठ वर्षांपासून ऑडिटच नाही

  धक्कादायक वृत्त 


रामटेक /तालुका प्रतिनिधी:
रामटेकच्या गडावर भोसला देवस्थान हे विदर्भातील अतिप्राचीन देवस्थान असून या ठिकाणी प्रभू श्रीरामचंद्राचे व अन्य मंदिरे आहेत.अतिशय पुरातन असलेल्या या मंदिराच्या मालकी संबंधी माननीय उच्च न्यायालय नागपूर येथे प्रकरण सुरू आहे. त्यानुषंगाने या मंदिराचा कारभार बघण्यासाठी न्यायालयाने रिसिवर म्हणून रामटेकचे उपविभागीय अधिकारी (राजस्व)यांची नियुक्ती केलेली आहे.राम मंदिरात करोडो करोडो रुपयांची संपत्ती आहे.गड मंदिराची शेकडो एकर शेती आहे.शेती व मंदिरात असलेल्या दानपेट्या व देणगी याद्वारे देवस्थानला दरवर्षी लाखो रुपये उत्पन्न मीळते. गेल्या 2010 पासून या मंदिराच्या व्यवहारांचे ऑडिट झाले नसल्याचे धक्कादायक वृत्त आहे.
याबाबत रामटेकच्या रामभक्तांनी नागपूरचे जिल्हाधिकारी यांना दिनांक 2 जुलै 2018 रोजी विशेष अर्ज लिहून ऑडिट करण्याची मागणी केली आहे.जिल्हाधिकारी यांनी याबाबत कारवाई करण्यासाठी हा अर्ज सहायक धर्मादाय आयुक्त नागपूर यांचेकडे दिनांक 19 जुलै रोजी पाठविलेला आहे. धर्मदाय आयुक्त कार्यालयातून याबाबत कुठलेही प्रकारचे कार्यवाही अद्याप झालेली नाही. विशेष बाब अशी की या देवस्थानचा आर्थिक कारभार सांभाळणारे निरीक्षण अधिकारी चंद्रशेखर बावनकर यांनी देवस्थानात बर्याच आर्थिक भानगडी केल्याचे बोलले जाते.रामटेकचे तत्कालीन ऊपविभागिय पोलीस अधिकारी डा.दिपक साळुंके या देवस्थानचे रिसीवर होते.त्यांच्या या चार वर्षांचे कार्यकाळातील रोकड पुस्तक लिहिलेले नाही अशीही माहिती आहे.या सर्व बाबींची चौकशी तत्कालीन रिसिवर राम जोशी यांनी केली. वर्षभराच्या चौकशीनंतर त्यांच्या बडतर्फीचे आदेशही त्यांनी काढले मात्र अद्यापही बावनकर कामावरच असल्याचे दिसून येते. राम मंदिराच्या आर्थिक व्यवहाराचे ऑडिट लवकरात लवकर करण्यात यावे अशी मागणी रामटेकातील राम भक्तांनी केली आहे.
निरीक्षक अधिकारी बावनकर यांना बडतर्फ केल्यानंतर त्या रिक्त जागेवर नियुक्तीसाठी रामटेक चे तत्कालीन उपविभागीय अधिकारी व रिसीवर राम जोशी यांनी तशी जाहिरात काढून अनेकांचे अर्ज मागवले प्रत्यक्ष मुलाखती घेऊन यापैकी अतुल पोटभरे यांची या पदावर नियुक्ती केल्याचे समजते. मात्र त्या पदाचे नियुक्तीपत्र अद्याप देण्यात आलेले नाही.एकूणच रामटेक गड मंदिराचा कारभार भोंगळ पणे सुरु असून याकडे माननीय उच्च न्यायालयाने गंभीरपणे लक्ष देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. दरम्यान राम जोशी यांची बदली झाली आहे व रामटेक येथे नव्याने रुजू झालेले उपविभागीय अधिकारी जोगेंद्र कट्यारे हे आता रामटेकच्या गड मंदिराचे रिसीवर आहेत.या पार्श्वभूमीवर ते काय भूमिका घेतात याकडे रामटेक वासियांचे लक्ष लागले आहे.

Sunday, July 29, 2018

रामटेक अंबाळा तिर्थक्षेञ येथे दहा दुकानात चोरी

रामटेक अंबाळा तिर्थक्षेञ येथे दहा दुकानात चोरी

रामटेक ( तालूका प्रतिनिधी ):


 रामटेक शहरात व परीसरात मागिल चार पाच दिवसापासुन मोठाप्रमाणात चोरीच्यां घटना होत अाहे. गडमंदिर परीसरातील जवळपास पन्नास दुकानाची चोरी या चार दिवसात झाली असुन. शनिवारच्या मध्यराञी पुन्हा अंबाळा तिर्थक्षेञ येथे
दहा दुकानात चोरी एकूण १८,४५० रुपये रोख  रक्कमेची चोरी केली.घटनेची माहीती मिळताच माजी आमदार अाशिष जयस्वाल व नगरसेवक सुमित कोठारी यांनी घटना स्थळी भेट दिली.
१) रमाबाई सुखदेव गलबले - ४,०००
२ ) शालु रामभाउ आगाशे ५,००० 
३ ) राजेश सुखदेव गलबले - ६५०
४ ) अकुंश रामराव कठौते -२५०
५ ) बबन छोटु भारती - १८००
६ ) बबीता विरसिंग पवार - ६००
७ ) प्रमोद प्रभाकर वाघ - ४५००
८ ) विजय राजाराम कोहळे - १५०
९ ) चंदन लक्ष्मण चौव्हान - १००० 
१०) गिता जगतसिंग कछवा यांच्या दुकानातील लाॅक तोडले  या प्रकरणी  ३७९ अन्वेय गुन्हा दाखल केला असुन पोलीस निरिक्षक दिपक वंजारी पी.एस.आय.मुत्येपोड,पी.एस.आय . सरकटे पुढिल तपास करीत अाहे.                                          

Tuesday, July 17, 2018

 गाडीने धडक दिल्याने बिबट्याचा मूत्यू

गाडीने धडक दिल्याने बिबट्याचा मूत्यू

रामटेक/प्रतिनिधी -
 पेंच व्याघ्र प्रकल्पामधून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र. 7 वर चोरबाहुली जवळ पेंच व्याघ्र प्रकल्प वन कक्ष क्रमांक ५९० मध्ये राष्ट्रीय महामार्ग वरुन रोड ओंलाडुन जात असतांना पहाटे साडे चार वाजता चा सुमारास अज्ञात भरधाव गाडीने धडक दिल्याने बिबट्याचा मूत्यू सदर घटनेची माहीती मिळताच.पेंच व्याघ्र प्रकल्प वन क्षेञ अधिकारी पाडुरंग पाखले पुढील तपास करीत अाहे .


Wednesday, July 04, 2018

ए.टी.एम कार्ड बदलवुन खातेदाराची फसवणूक गुन्हा दाखल

ए.टी.एम कार्ड बदलवुन खातेदाराची फसवणूक गुन्हा दाखल

रामटेक ( तालूका प्रतिनिधी ):
शहरातील गांधी चौक येथिल स्टेट बॅक अाॅफ इंडीया येथे खातेदार लोकेश शरणागंत रा. डोंगरी हा ए.टी.एम.मध्ये दिनांक ०३ /०७/२०१८ दुपारी १२ वाजताच्या सुमारास पैसे काढण्याकरीता गेला असता त्यांला अपरिचित युवकांनी त्यांचा ए.टी.एम कार्ड बदल केला. सदर आरोपी हे ए.टी.एम. सी.सी.टी.व्ही कॅमेरा कैद झाले अाहे . जाभंळा शर्ट घातलेला व त्यांचे मागे निळे पांढरे पट्टे
असलेला शर्ट घातलेल्या मजबूत बांधा असलेली अज्ञात व्यक्तीने फिर्यादीचे ए.टी.एम कार्ड बदलुन त्यास चुकीचे ए.टी.एम.कार्ड देऊन फीर्यादीचा अकाउंट मधुन १५०००/- रू.काढुन फसवणूक केली. फिर्यादी लोकेश शरणागंत यांचा तक्रारी वरुन अज्ञात अारोपी विरोधात पोलीस स्टेशन येथे कलम ४२० भा.द.वी. अन्वेय गुन्हा दाखल करण्यात अाला असुन पुढिल तपास पी. आय. दिपक वंजारी करीत आहे.

Monday, July 02, 2018

देवतारे गुरूजी यांनी संघविचार घराघरांत पोहचविला:चंद्रशेखर देशपांडे

देवतारे गुरूजी यांनी संघविचार घराघरांत पोहचविला:चंद्रशेखर देशपांडे

रामटेक तालुका प्रतिनिधीः
रामटेक येथील श्रीराम विद्यालयाचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक व रा.स्व.संघ,नागपुर जिल्हयाचे माजी संघचालक रामचंद्र मारोतराव देवतारे यांनी या भागात संघविचारांचे सिंचन केले. आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण ते संघकार्यासाठी झिजले.संघाचा विचार त्यांनी घराघरांत पोहचविला या शब्दांत प.पुश्रीगुरूजी  स्मृती प्रकल्प गोळवलीचे व्यवस्थापक चंद्रशेखर देशपांडे यांनी देवतारे मास्तरांचा गौरव केला. दिनांक 1 जुलै 2018 रोजी स्थानीक गंगा भवनम् सभागृहात सकाळी 11 वाजता संपन्न झाालेल्या अमृतमहोत्सव कार्यक्रमात ते अध्यक्ष म्हणून बोलत होते .यावेळी मंचावर रास्वसंघाचे जिल्हा संघचालक प्रकाश ताजने ,विभागाचे
कार्यवाह उल्हास ईटनकर सत्कारमुर्ती रामचंद्र देवतारे, सौ.चंद्रभागा देवतारे,नगर संघचालक अधिवक्ता किशोर नवरे आदी मान्यवर हजर होते. नागपुर जिल्हयातील रास्वसंघाचे अधिेकारी पदाधिकारी व देवतारे मास्तर यांचे चाहते मोठया संख्येत  कार्यक्रमाला हजर होतेअमृतमहोत्सव कार्यक्रमात देवतारे यांचा सपत्निक सत्कार चंद्रशेखर देशपांडे व त्यांच्या पत्नी वनिता देशपांडे यांच्या हस्ते करण्यांत आला.रामटेकच्या सार्वजनिक 
क्षेत्रांतील सामाजीक,सांस्कृतीक व राजकीय संघटना व पदाधिकारी यांचेकडूनही त्यांचा यथोचित सन्मान करण्यांत आला.कार्यक्रमांत जुन्या रामटेक तालुक्यातील व सध्या मौदा तालुक्यात असलेल्या खात या गावात सामान्य कुटूंबात रामचंद्रराव यांचा 1 जुलै 2018 रोजी जन्म झालावडील रेल्वेत सिग्नल फीटर होते.मोठे बंधू शामराव यांनी बोट धरून त्यांना संघाच्या शाखेत आणले.अत्यंत प्रतिकुल परीस्थितीत रामचंद्रराव यांनी डबल एम ए पर्यंतचे शिक्षण पुर्ण केले. व रामटेकच्या श्रीराम विद्यालयांत शिक्षकाची नोकरी धरली.पुढे ते या शाळेचे मुख्याध्यापक झाले.रास्वसंघाचे अतिशय निष्ठेने कार्य करणारा कार्यकर्ता म्हणून त्यांचे नाव संपुर्ण नागपुर विभागात मोठया सन्मानाने घेतले जाते.विविध जबाबदाऱ्या सांभाळत असतांना त्यांनी नागपुर जिल्हा संघचालक या पदावर अनेक वर्षे कार्य केले.रामटेकचे तरूण भारतचे वार्ताहर म्हणूनही त्यांनी सुमारे 25 वर्षे कार्य 
केले आहे.रामटेकच्या संघ कार्यकर्त्यांसह सर्वच सामाजिक क्षेत्रांतील कार्यकर्त्यांचे ते मार्गदर्शक आहेत.रामटेकच्या सार्वजनिक क्षेत्रांतील या आधारवडाचा अमृतमहोत्सव हा या सर्वच कार्यकर्त्यांसाठी अतिशय आनंदाचा विषय होता व त्यामुळेच त्यांच्या अमृतमहोत्सव कार्यक्रमाला नागपुर जिल्हयातुन संघाचे अधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येत उपस्थित होते.रामटेकचे आमदार डी.मल्लिकार्जु न रेड्डी,नागपुर जिल्हा भाजपाचे प्रसिद्धी प्रमुख विकास तोतडे,रामटेकच्या श्रीराम शिक्षण संस्थेचे सचिव डॉप्रशांत पांडे,रामटेक नगरपालीकेच्या माजी उपाध्यक्षा कविता मुलमुले,भाजपाचे संजय  मुलमुले,नगरसेवक संजय बिसमोगरे,सौ रत्नमाला अहिरकर,विवेक तोतडे,माजी उपाध्यक्ष मन्साराम अहिरकर,नागपुर जिल्हा पत्रकार संघाचे सदस्य राहुल
 पेटकर,समर्थ विद्यालयाचे पर्यवेक्षक दिपक गीरधर,वनवासी कल्याण आश्रमाचे मध्यप्रांताचे संघटन मंत्री प्रविण डोळके,बाजार समीतीचे संचालक चरणसिंग यादव,सुघीर धुळे,राजेंद्र पाठक,योगेश मेडसिंगे ,हितेंद्र चोपकर,चेतन चोपकर,डॉ.मिलींद चोपकर,अरविंदराव तोतडे,केशवराव चित्रिव,सुरेश भगत,मनोहर वांढरे,चंद्रशेखर जोशी,श्रीधर धुळे आदी मान्यवरांसह देवतारे मास्तरांचे चाहते शेकडो कार्यकर्ते यावेळी 
उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतमातेच्या प्रतिमेसमोर मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यांत आले.शुभम चोपकर यांच्या बासरीवादनाने व देवतारे या नातवंडाच्या गणेश स्तवनाने कार्यक्रमाचे वातावरण भारून टाकले होते.यावेळी देवतारे मास्तरांच्या कार्यावर प्रकाश टाकणारी व त्यांचा गुणगौरव करणारी कुमारी गौरी देवतारे,रमेशराव कोळमकर, विवेकराव आंबेकर,भारती येवतीकर,प्रविण डोळके ,उद्धव यांची समयोचित भाषणे झालीत.कार्यक्रमाचा शेवट पसायदानाने करण्यांत आलाकार्यक्रमाचे आयोजन भानुप्रताप देवतारे,नागेश देवतारे,भारती देवतारे येवतीकर, मंगेशसिह येवतीकर,योगीता देवतारे कचवे व मनीषसिंह कचवे यांनी केले होते.
वेळी देवतारे यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना आपल्यावर कार्यकर्ते प्रेम करतात ही आपल्या जीवनातील अमूल्य ठेव असून शेवटच्या श्वासा पर्यत संघकार्य  करण्याचा निश्चय व्यक्त केला.यावेळी त्यांनी खात येथील संघकार्यालयासाठी व रामटेकच्या मागास वस्तीत चालणाऱ्या अभ्यासिकेसाठी प्रत्येकी 35 हजार रूपयांची
देणगी नगदी स्वरूपात दिली.गोळवली येथील प्रकल्पासाठी त्यांनी 5 हजार रूपयांचा निधी चंद्रशेखर देशपांडे यांच्या स्वाधीन केला.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन त्रिलोक मेहर यांनी केले तर उपस्थित सर्वांचे भानुप्रताप देवतारे यांनी आभार मानले.


Saturday, June 30, 2018

 रामचंद्र देवतारे यांचा आज अमृतमहोत्सव

रामचंद्र देवतारे यांचा आज अमृतमहोत्सव

रामटेक तालुका प्रतिनिधीः
रामटेक येथिल श्रीराम विद्यालयाचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक व रा.स्व.संघ,नागपुर जिल्हयाचे माजी संघचालक रामचंद्र मारोतराव देवतारे यांचा अमृतमहोत्सव रामटेक येथे आज दिनांक 1 जुलै 2018 रोजी स्थानीक गंगा भवनम सभागृहात सकाळी 11 वाजता संपन्न होणार आहे.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान गोळवलकर गुरूजी स्मृती प्रकल्प गोळवली,जिल्हा-रत्नागीरीचे व्यवस्थापक चंद्रशेखर देशपांडे हे भूषविणार आहेत.नागपुर जिल्हयातील रास्वसंघाचे अधिकारी पदाधिकारी व देवतारे मास्तर यांचे चाहते मोठया संख्येत या कार्यक्रमाला
हजेरी लावणार आहेत.जुन्या रामटेक तालुक्यातील व सध्या मौदा तालुक्यात असलेल्या खात या गावात सामान्य कुटूंबात रामचंद्रराव यांचा 1 जुलै 2018 रोजी जन्म झाला.वडील रेल्वेत सिग्नल फीटर होते.मोठे बंधू त्यांना संघाच्या शाखेत आणले.अत्यंत प्रतिकूल परीस्थितीत रामचंद्रराव यांनी डबल एम ए पर्यंतचे शिक्षण पुर्ण केले. व रामटेकच्या श्रीराम विद्यालयांत शिक्षकाची नोकरी धरली.पुढे ते या शाळेचे मुख्याध्यापक झाले.रास्वसंघाचे अतिशय निष्ठेने कार्य करणारा कार्यकर्ता म्हणून त्यांचे नाव संपुर्ण नागपुर विभागात मोठ्या सन्मानाने घेतले जाते.विविध जबाबदाऱ्या सांभाळत असतांना त्यांनी नागपुर जिल्हा संघचालक या पदावर अनेक वर्षे कार्य केले.रामटेकचे तरूण भारत वार्ताहर म्हणूनही त्यांनी सुमारे 25 वर्ष कार्य केले आहे रामटेकच्या संघ कार्यकर्त्यांसह सर्वच सामाजिक क्षेत्रांतील कार्यकर्त्यांचे ते मार्गदर्शक
आहेत.रामटेकच्या सार्वजनिक क्षेत्रांतील या आधारवडाचा अमृतमहोत्सव हा या सर्वच कार्यकर्त्यांसाठी अतिशय आनंदाचा विषय आहे.या कार्यक्रमाला सर्वांनी आवर्जुन उपस्थित राहावे असे आवाहन भानुप्रताप   देवतारे,भारती देवतारे,नागेश देवतारे,भारती देवतारे येवतीकर,मंगेशसिंह येवतीकर,योगीता देवतारे कचवे व मनीश सिंह कचवे यांनी केले आहे.


Friday, June 29, 2018

अज्ञात वाहनांच्या धडकेत चार चितळांचा  जागीच मृत्यु

अज्ञात वाहनांच्या धडकेत चार चितळांचा जागीच मृत्यु

रामटेक(तालूका प्रतिनिधी):
पवनी वनपरीक्षेत्रांतर्गत पवनी-तुमसर राज्यमार्गावर हिवरा बाजार ते सालई दरम्यान दिनांक28/06/2018 चे रात्री कुठल्यातरी अज्ञात वाहनाने धडक दिल्याने चार चितळांचा जागीच मृत्यू झाला तर पाचवा गंभीर जखमी असल्याने त्याला रेस्क्यू सेंटर नागपुर येथे पाठविण्यात आले आहे.तिथे त्याचेवर उपचार सुरु असल्याचे वनविभागाच्या सुत्रांनी सांगीतले. ऊपरोक्त राज्यमार्गावर बावनथडी नदीवरील देवनारा रेतीघाटावरुन रेती भरलेले दहाचाकी ट्रक्स मोठ्या संख्येत ये जा करतात.यापैकी एखाद्याने या चितळांना धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला असावा असा अंदाज आहे.याप्रकरणी वनविभागाने प्रकरण नोंदविले आहे.याप्रकरणी पवनीचे वनक्षेत्रपाल सुमीत कुमार(आयएफएस) हे अधीक तपास करीत आहेत.  
रामटेक वनपरीक्षेत्रांतील नगरधन शिवारांत काळविटाच्या शिकारीचे प्रकरण ताजे असतांनाच व त्याप्रकरणांत आरोपींना गजाआड करण्यात वनाधिकार्‍यांना यश आले नसतांनाच ऊपरोक्त घटनेत चार चितळ मृत्युमुखी पडल्याने शंका कुशंकांचे पेव फुटले आहे.


अवैध मोहफुल दारु भट्टीवर पोलीसांची कारवाई

अवैध मोहफुल दारु भट्टीवर पोलीसांची कारवाई

रामटेक (तालूका प्रतिनिधी):
 रामटेक पोलीस स्टेशन हद्दीतील रामटेक वरुन तिन की .मी. अंतरावर उदापुर शिवारात अवैध   मोहफुल  दारु भट्टी वर रेड करुन 160 लिट मोहफुल दारु व इतर भट्टी सहित्य एकुन 21860 रु चा माला सहीत इतर साहीत्य जप्त करण्यात आले . आरोपी अजय वरखडे रा. नगरधन अटक करण्यात आले असुन  एक अारोपी घटना स्थळावरुन फरार झाला. सदर ची कारवाई  उपविभगिय पोलीस अधिकारी रामटेक लोहित मतानी साहेब याच्या आदेशाने रामटेक पोलीस निरीक्षक दिपक वंजारी यांच्या मार्गदर्शनात स पो नि वर्षा मते  ,  पो.शि. रोशन पाटिल, आशिक कुंभरे ,राजु भोयर,यानी केली.



Wednesday, June 20, 2018

संशयित किडणीचोर म्हणून पकडलेले निघाले शिकारी

संशयित किडणीचोर म्हणून पकडलेले निघाले शिकारी

 रामटेक पोलीसांची अक्षम्य दिरंगाई,प्रकरण दडपण्याचा प्रयत्न
वनविभागाकडून आरोपीविरुद्ध शिकारीचा गुन्हा दाखल . 
रामटेक(तालूका प्रतिनिधी): 
रामटेक तालूक्यातील गावांमध्ये व परीसरांत सध्या किडणीचोर सुटले असल्याची अफवा सर्वदूर पसरलेली असतांनाच रामटेक पासून 8 किमी अंतरावरील नगरधन या गावातल्या लोकांनी दिनांक 18 जुन 2018 ला फाॅरच्युनर क्रमांक एम एच -31 सी एक्स 7000 मध्ये संशयितरीत्या फीरत असलेल्या तीन ईसमांना पकडून राञी साडेअकराच्या सुमारात रामटेक पोलीस ठाण्यांत आणले. असतांना पोलीसांनी याबाबत थातुरमाथुर चौकशी करुन त्यांना सोडून दिले होते . माञ दुसर्‍या दिवशी रामटेकच्या नगरधन भागात हरीण ( काळविट ) चा मृतदेह सापडल्याची बातमी रामटेकचे सहायक वनसंरक्षक विशाल बोर्‍हाडे यांना कळली व त्यानंतर वनविभाग खडबडून जागा झाला .राञी गावकर्‍यांनी पोलीस ठाण्यात पकडून आणलेले शिकारी होते ही बाब उघड झाल्याने रामटेक वनविभागाने आरोपीविरुध्द शिकारीचा गुन्हा दाखल केला आहे . रामटेकचे वनक्षेञपाल श्रावण खोब्रागडे हे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत . याबाबत सविस्तर वृत्त असे की , सध्या या भागात काडणीचोर फीरत असल्याची अफवा सोशल मीडीयावर मोठया प्रमाणावर सुरु असुन त्यामुळे गावातील नागरीक हे राञी उशीरापर्यंत आपल्या गावांमध्ये जागली करीत आहेत या पार्श्वभुमीवर रामटेकजवळच्या नगरधन या गावातील लोकांनी उपरोक्त संशयीतांना पकडले व रामटेकच्या पोलीस ठाण्यांत आणले माञ सदर व्यक्तीची चौकशी केली . असतांना त्यांनी १) रिझवान अहमद अब्दुल वहाब अन्सारी वय 38 रा . लष्करीबाग मस्जिदजवळ नागपुर , २) मोहम्मद आसिफ अंसारी वय 36 रां मोमीनपुरा मोहम्मद अली रोड नागपूर ,व रियाज अहमद मोहम्मद मीयां वय 35 रा. नागपुर  अशी नावे सांगीतली पोलीसांनी याबाबत थातुरमातुर चौकशी करुन या तिघांनाही राञीच सोडून दिले होते . 
माञ दुसरा दिवस  दिनांक 19 जुन 2018 रोजी सकाळी रामटेकचे सहायक वनसंरक्षक विशाल बोर्‍हाडे यांना याबाबत मीळतांच वनविभाग जागा झाला .नगरधन भागात चौकशी करुन काळविटाचा मृतदेह वनविभाग रामटेकचे वनक्षेञपाल खोब्रागडे यांनी ताब्यात घेतला व गुन्हा दाखल केला . बातमी लिहीस्तोवर कुठल्याही आरोपीला अटक करण्यात आली नव्हती . रामटेक पोलीस स्टेशनचे प्रभारी पोनी दिपक वंजारी यांनी याबाबत विचारले असतांना राञी या लोकांनी शिकार केल्याची माहीती न मीळाल्याने आम्ही त्यांचे बयाण घेवून तसेच त्यांची नावे पत्ता व मोबाईल क्रमांक नोंदवून त्यांना सोडले होते.


Friday, June 15, 2018

जि.प नागपुरचे नवनियुक्त मु.का.अ संजय कुमार यादव यांचे नागपुर जिल्हा ग्रामसेवक संघातर्फे स्वागत

जि.प नागपुरचे नवनियुक्त मु.का.अ संजय कुमार यादव यांचे नागपुर जिल्हा ग्रामसेवक संघातर्फे स्वागत

रामटेक(तालूका प्रतिनिधी ):
शुक्रवारी जिल्हा परिषद नागपुर येथील नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री संजय कुमार यादव यांची नागपुर जिल्हा ग्रामसेवक संघाचे वतीने सदिच्छा भेट घेण्यात आली.शिष्टमंडळात विभागीय अध्यक्ष विलास भाऊ मुंडे,भारत मेश्राम जिल्हा अध्यक्ष नागपुर,श्रीकांत भर्रे मानद अध्यक्ष ,पंजाब राव चव्हाण उपाध्यक्ष,पुनम ताई पांडे(काळसर्पे)सरचिटणिस,धैर्यधर शेंडे तालुका अध्यक्ष हिंगणा,महेंद्र लांजेवार कोषाध्यक्ष हिंगणा,भारत चव्हाण अध्यक्ष उमरेड,संघाचे मौदा येथील पदाधिकारी श्री गाडगे साहेब उपस्थित होते.यावेळी श्री यादव  यांना संघाचे शिष्टमंडळ यांचे वतीने पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आली.नागपुर जिल्हा राज्यात नंबर एक वर आनण्यासाठी जिल्ह्यातील सर्व ग्रामसेवक नविन मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे नेतृत्वात प्राणपनाणे सहकार्य  करण्याची हमी उपस्थित मंडळी नी दिली. जिल्ह्यातील ग्रामसेवक संवर्गाचे प्रश्न सोडविण्याबरोबरच ग्रामसेवकांचे पाठीशी खंबीरपणे उभे राहु तसेच निर्भीड वातावरणात सर्वानी कामे करावी तसेच कुणावर ही चुकीची कारवाई एक कुटुंब प्रमुख या नात्याने होणार नाही त्याचप्रमाणे प्रशासनाचे निर्णय प्रक्रियेत संघाचे भूमीका प्राधाण्याने लक्षात घेतली जाईल असे आश्वासन श्री यादव यांनी दिले.

Thursday, June 07, 2018

नगर परिषद कचरा गाडी बंद असल्याच्या विरोधात विरोधी पक्षाचा रास्ता रोको आंदोलन

नगर परिषद कचरा गाडी बंद असल्याच्या विरोधात विरोधी पक्षाचा रास्ता रोको आंदोलन

रामटेक (तालूका प्रतिनिधी): 
ऐन पावसाळ्याचा वेळेवर शहरातील नगर परिषदेच्या कचरा गाडी बंद असल्याने शहरवासीयांना कचर्‍यांची  विल्हेवाट कुठे करावी. यांचा परिणाम नगसेवकांना जनसामान्याचा सामना करावा लागत आहे.नगर परिषदने जुन्या कचरा संकलन करणार्‍यां ठेकेदारांचे बिल दिले नसल्यामुळे व नविन ठेकेदारांला वर्क आॅर्डर न दिल्यामुळे कचरा गाडी बंद असल्याचा आरोप नगर परिषद विरोधी पक्षनेते सुमित कोठारी यांनी केले .अाज सकाळी ८ वाजता नगर परिषद सदस्य दामोधर धोपटे ,सुरेखा माकडे व ठेकेदारी कामगार यांनी गाधी चौक येथे रास्ता रोको आंदोलन सुरू केले.पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. दुपारी १ वाजता मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन सदर कचरा गाडी वरील ठेकेदारी कामगारांचे वेतन करण्याकरीता चार लाख रुपये ठेकेदार यांना आज देणार असुन ठेकेदार कामगाराचे वेतन अाज करणार असल्याने रास्ता रोको आंदोलन समाप्त करण्यात आले.




Wednesday, June 06, 2018

रामटेकच्या शासकीय मागासवर्गीय मुलींचे वसतीगृह येथे प्रवेश प्रक्रिया सुरु

रामटेकच्या शासकीय मागासवर्गीय मुलींचे वसतीगृह येथे प्रवेश प्रक्रिया सुरु

वसतिगृह साठी इमेज परिणाम
संग्रहित 
नागपूर/प्रतिनिधी:
 शासकीय मागासवर्गीय मुलींचे वसतीगृह रामटेक येथे सन 2018-19 करीता विद्यालयीन व महाविद्यालयीन तसेच प्रवर्गनिहाय मोफत प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.शासनाच्या वतीने शासकीय मागासवर्गीय मुलींचे वसतीगृह रामटेक येथे प्रवेशित विद्यार्थिनींना निवास, दूध, नाश्ता, जेवन, बिछाना साहित्य, पुस्तके व स्टेशनरी साहित्य, गणवेश, दरमहा निर्वाह भत्ता रुपये 500 व स्वच्छता प्रसाधन रुपये 100 व इतर सवलत प्रदान करण्यात येणार आहे.इच्छूक विद्यार्थिनींनी शासकीय मागासवर्गीय मुलींचे वसतीगृह, टक्कामोरे कॉम्प्लेक्स टिळक वार्ड, रामटेक येथे प्रत्यक्ष संपर्क साधण्याचे आवाहन वसतीगृहाच्या वतीने करण्यात आले आहे.



Saturday, June 02, 2018

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; एकाचा मृत्यु

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; एकाचा मृत्यु


रामटेक(तालूका प्रतिनिधी):
नागपुर - जबलपुर महामार्गावर खुमारी शिवारात गुरुवारी राञी नऊ वाजताच्यां सुमारास स्कुटी दुचाकी अज्ञात वाहनांने धडक देत. घटना स्थळावरुन पसार झाला. पोलीसांनी दिलेल्या  सविस्तर माहीती नुसार मृत्यक दिनेश शंकर डोले वय ३३ वर्षे वत्यांचा मिञ अजाबराव राजेराम तुरनकर वय ५२ वर्षे हे दोघेही मिञ कामानिमित्त मरारवाडी येथे गेले होते .व काम आटपवुन स्कुटी दुचाकी क्रमांक MH 40AL 8180 ने परत येत असतांनी मागुन येत असलेल्या अज्ञात वाहनाने जबर धडक दिल्याने दुचाकी चालक दिनेश डोले रा. भिलेवाडा हा जागीच मरण पावला तर मिञ अजाबराव तुरनकर रा. भिलेवाडा हा गंभीर जखमी झाला असुन त्याला उपचाराकरीता नागपुर मेयो येथे भरती करण्यात आले .सदर घटनेची माहीती मिळताच रामटेक पोलीसांनी घटना स्थळी दाखल होऊन कारवाई केली . फिर्यादी मृत्यकांचे काका सुरेश डोले यांच्या तक्रारी वरुन अज्ञात वाहन विरोध कलम 279 ,337 ,338, 304 अन्वेय गुन्हा दाखल करुन पोलीस पुढिल तपास करीत अाहे .                                  

जाहिरात...
भारतात पहिल्यांदा जागतिक पातळीवरील एक अग्रगण्य कंपनी घेऊन आली, कुक्कुट पालन ,मत्स्य पालन,शेळी पालन,दुध डेअरी यासारख्या संपूर्ण व्यवसायासाठी लागणारे संपूर्ण प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळणार अगदी निशुल्क, याच सोबत पशुखाद्य,पिल्ले,औषधी, या सारख्या संपूर्ण goods अतिशय अल्प दरात उपलब्ध ...त्यासाठी संपर्क करा:9175937925 या क्रमांकावर (घरपोच सेवा उपलब्ध).
Gas safety device.
आपके एल.पी.जी गॅस सिलेंडर कि सुरक्षा अब आपके हात 
"सुरक्षित नारी सुरक्षित परिवार"
क्या आप अपने हि घर मे सुरक्षित है ?
दुर्घटना होणे से पहिले सावधानी बरते !
समय कभी बताकर नाही आता....तो इंतजार कीस बात का...
तुरंत मिलीये ..कही देर ना हो जाए !
*कल करेसो आज कर ,आज करे सो अब *
पल मे प्रलय हो जायेगा तो करेंगा कब !
जीवन अनमोल है!और आपका परिवार .........?
विशेषताए...
* सूक्ष्म गॅस लिकेज का परीक्षण.  
* गॅस का परिपूर्ण उपयोय एव गॅस के प्रमाण कि जानकारी गॅस कि बचत अर्थात पैसो की बचत
* किसी कारण होणे वाले गॅस लिकेजपर यह डीवाईस सप्लाई बंद कर देता है. 
आपकी सेफ्टी हि पुरे परीवार कि लाईफ सेफ्टी है..
जो अपने परीवारसे करते है प्यारवह गॅस सुरक्षा यंत्र से कैसे करेंगे इन्कार
तो फिर जल्दी ,आये जल्दी  पाये
संपर्क करे:9175937925,9021527117 
कृपया दिये गये लिंक ओपन करे :  https://youtu.be/IaXlvfNtkpo

Friday, June 01, 2018

लाईनवर काम करत असतांना युवकाचा मृत्यू

लाईनवर काम करत असतांना युवकाचा मृत्यू

रामटेक(तालूका प्रतिनिधी):
नगरधन सर्कल अंतर्गत गुरुवारी  ला  रात्री 8 वाजता लाईनमेन  सुशिल धिरजसिंग हैबनशी सोबत काम करीत असताना  विजेचा झटका लागून बीजेवाडा शिवारात विजय डोमा घावडे वय 27, रा .बनपुरी हा मरण पावला. गावात माहीत मिळताच गावात शोककाळ पसरला. आज सकाळी गावकर्‍यांनी पोलीस स्टेशन येथे घेराव केला. पोलीस व  माजी आमदार आमदार आशिष जयस्वाल यांनी पोलीस स्टेशन येथे भेट दिली.
 व वरिष्ठ अधिकार्‍यांशी चर्चा केली.  स्थानिक नेते रमेश कारामोरे , विजय हटवार , योगेश वाडीभस्मे , व महेंद्र भुरे यांनी डी. वाय. एस .पी लोहीत मतांनी , ठाणेदार वंजारी , एम.एस ई.बी .चे अधिक्षक अभियंता आमझरे . व इतर अधिकार्‍यांच्या उपस्थित . मृतकांच्या परिवारास चार लाखाची मदत व परिवारातील एका व्यक्तीला नोकरी देणार असल्याचे लेखी आश्वसना नंतर मृत्यकांचे शवच्छेदन करण्यात आले.व लाईनमेन सुशिल धिरजसिंग हैहैबनशी यांच्या विरोधात पोलीस स्टेशन येथे 304 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
  -----------------------------------------------------------------------             
जाहिरात...
भारतात पहिल्यांदा जागतिक पातळीवरील एक अग्रगण्य कंपनी घेऊन आली, कुक्कुट पालन ,मत्स्य पालन,शेळी पालन,दुध डेअरी यासारख्या संपूर्ण व्यवसायासाठी लागणारे संपूर्ण प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळणार अगदी निशुल्क, याच सोबत पशुखाद्य,पिल्ले,औषधी, या सारख्या संपूर्ण goods अतिशय अल्प दरात उपलब्ध ...त्यासाठी संपर्क करा:9175937925 या क्रमांकावर (घरपोच सेवा उपलब्ध).
Gas safety device.
आपके एल.पी.जी गॅस सिलेंडर कि सुरक्षा अब आपके हात 
"सुरक्षित नारी सुरक्षित परिवार"
क्या आप अपने हि घर मे सुरक्षित है ?
दुर्घटना होणे से पहिले सावधानी बरते !
समय कभी बताकर नाही आता....तो इंतजार कीस बात का...
तुरंत मिलीये ..कही देर ना हो जाए !
*कल करेसो आज कर ,आज करे सो अब *
पल मे प्रलय हो जायेगा तो करेंगा कब !
जीवन अनमोल है!और आपका परिवार .........?
विशेषताए...
* सूक्ष्म गॅस लिकेज का परीक्षण.  
* गॅस का परिपूर्ण उपयोय एव गॅस के प्रमाण कि जानकारी गॅस कि बचत अर्थात पैसो की बचत
* किसी कारण होणे वाले गॅस लिकेजपर यह डीवाईस सप्लाई बंद कर देता है. 
आपकी सेफ्टी हि पुरे परीवार कि लाईफ सेफ्टी है..
जो अपने परीवारसे करते है प्यारवह गॅस सुरक्षा यंत्र से कैसे करेंगे इन्कार
तो फिर जल्दी ,आये जल्दी  पाये
संपर्क करे:9175937925,9021527117 
कृपया दिये गये लिंक ओपन करे :  https://youtu.be/IaXlvfNtkpo

Saturday, May 19, 2018

समोर वाघोबा दिसताच घाबरल्याने दुचाकीवरून पडून बापलेक जखमी

समोर वाघोबा दिसताच घाबरल्याने दुचाकीवरून पडून बापलेक जखमी

रामटेक/हर्ष कनोजे:
समोर एकाएकी चक्क वाघेबांचे दर्शन झाल्याने व अनपेक्षित प्रसंग गुदरल्याने घाबरगंडी उडाली.यात दुचाकीस्वाराचे गाडीवरचे नियंत्रण सुटले व त्यात तो स्वतः व त्याचा पाच वर्षीय  मुलगा दोघेही खाली पडल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला तर त्याचा मुलाला किरकोळ दुखापत झाल्याची झाटना रामटेक तालुक्यातील देवलापार पोलीस ठाणे हद्दीतील मौजा पिंडकापार येथे दिनांक 19 मे 2018 रोजी सकाळी 9.30 च्या सुमारास घडली.        
              याप्रकरणी सविस्तर वृत्त असे की,सध्या जंगल भागातील गावांमध्ये तेंदू पत्ता संकलनाचे काम मोठया प्रमाणावर सुरू आहे.टेंभराच्या झाडाची पाने तोडून आणणे व एकेक पान चवडून त्याचे पुडे बांधने व गावातील पत्ताफडीवर नेवून द्यायचे असा हा व्यवसाय आहे रामटेकच्या देवलापार भागातील गावांमधील मजुरांना या उन्हाळयाच्या दिवसांत तेंदूपत्ता संकलन हा मोठा रोजगार आहे मात्र यासाठी जंगलात जावे लागते.      उपरोक्त घटनेत पुडे बांधण्यासाठी पळसाच्या झाडाची जडी आणून त्याचा वेत तयार केला जातो व त्याने पुडे बांधले जातात.अशाच प्रकारे वेत आणण्यासाठी आपल्या दुचाकीने जंगलात आपल्या मुलाला सोबत घवेून जात असतांना जंगलात पिंडकापार येथील 28 वर्षीय बिरसिंग बिरलाल कोडवते यांना एकाएकी समोर वाघ दिसल्याने त्यांची बोबडीच वळली.त्यांचे दुचाकीवरचे नियंत्रण क्षणात संपले व ते मुलासह खाली पडले.यात त्यांना डोक्याला जबर दुखापत झाली.मुलालाही खरचटले.मात्र देवकृपेने वाघोबानेही दुसरीकडे पळ काढला व बाका प्रसंग निभावला.जखमी अवस्थेत त्यांनी देवलापारचे ग्रामीण रुग्णालय गाठले.घटनेची माहीती कळताच पवनी वनपरीक्षेत्राचे क्षेत्रपाल किशोर कैलुके व वनकर्मचारी यांनी देवलापारचा दवाखाना गाठला व माहीती घेतली.कोडवते यांची प्रकृती जास्त बिघडण्याची शक्यता वाटल्याने त्यांना नागपुरच्या मेयो ईस्पितळात रेफर करण्यात आले व  नंतर मेडीकलमध्ये त्यांची रवानगी करण्यात आली.कैलुके यांनी दिलेल्या माहीतीनुसार बिरसिंग कोडवते यांची प्रकती स्थिर असून त्यांचेवर उपचार सुरू आहेत.रामटेकचे सहायक वनसंरक्षक विशाल बोऱ्ह्याडे  यांनी ही मेडीकलमध्ये जावून जखमीची विचारपूस केल्याचे कळते.
-----------------------------------------------------------------------             
जाहिरात...
भारतात पहिल्यांदा जागतिक पातळीवरील एक अग्रगण्य कंपनी घेऊन आली, कुक्कुट पालन ,मत्स्य पालन,शेळी पालन,दुध डेअरी यासारख्या संपूर्ण व्यवसायासाठी लागणारे संपूर्ण प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळणार अगदी निशुल्क, याच सोबत पशुखाद्य,पिल्ले,औषधी, या सारख्या संपूर्ण goods अतिशय अल्प दरात उपलब्ध ...त्यासाठी संपर्क करा:9175937925 या क्रमांकावर (घरपोच सेवा उपलब्ध).
Gas safety device.
आपके एल.पी.जी गॅस सिलेंडर कि सुरक्षा अब आपके हात 
"सुरक्षित नारी सुरक्षित परिवार"
क्या आप अपने हि घर मे सुरक्षित है ?
दुर्घटना होणे से पहिले सावधानी बरते !
समय कभी बताकर नाही आता....तो इंतजार कीस बात का...
तुरंत मिलीये ..कही देर ना हो जाए !
*कल करेसो आज कर ,आज करे सो अब *
पल मे प्रलय हो जायेगा तो करेंगा कब !
जीवन अनमोल है!और आपका परिवार .........?
विशेषताए...
* सूक्ष्म गॅस लिकेज का परीक्षण.  
* गॅस का परिपूर्ण उपयोय एव गॅस के प्रमाण कि जानकारी गॅस कि बचत अर्थात पैसो की बचत
* किसी कारण होणे वाले गॅस लिकेजपर यह डीवाईस सप्लाई बंद कर देता है. 
आपकी सेफ्टी हि पुरे परीवार कि लाईफ सेफ्टी है..
जो अपने परीवारसे करते है प्यारवह गॅस सुरक्षा यंत्र से कैसे करेंगे इन्कार
तो फिर जल्दी ,आये जल्दी  पाये
संपर्क करे:9175937925,9021527117 
कृपया दिये गये लिंक ओपन करे :  https://youtu.be/IaXlvfNtkpo


Friday, May 18, 2018

रामटेक येथें एक दिवसीय सहविचार बैठक संपन्न

रामटेक येथें एक दिवसीय सहविचार बैठक संपन्न

नागपूर जिल्हा ग्रामीण तालुका प्रभारींचे यशस्वी आयोजन
रामटेक(हर्ष कनोजे):
राज्य प्रभारी आ.विष्णुजी भुतडा व मुख्य संरक्षक आ.राव यशपाल आर्य यांनी  आयोजकांना भ्रमनध्वनी वर शुभेच्छा दील्या.राज्य विधी प्रकोष्ठ प्रभारी अँड् नामदेवराव फटींग,मंडल प्रभारी आ.शशिकांत जीशी,जिल्हाध्यक्ष आ.प्रदीपजी काटेकर,जिल्हा प्रभारी आ.छाजुरामजी शर्मा,जिल्हा महामंत्री आ.उर्मीला जुवारकर,जी.संघटनमंत्री दत्तु चौधरी,जी.योग प्रचारीका माधुरी ठाकरे,जी.कार्यालय प्रभारी भावना टेम्भरे,जिल्हा पदाधिकारी प्रा.राम आगासे,सुभाष कुलश्रेष्ठ,निखील भुते,राजेन्द्र जुवारकर,प्रीती केवलरमानी ईत्यादी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
दी.17 मे 2018 रोज गुरुवार ला टक्कामोरे सिलीब्रेशन हाँल रामटेक येथे नागपुर जिल्हा समितीच्या मार्गदर्शनाखाली "नागपुर जिल्हा ग्रामीण"च्या एकुण 13 तहसील प्रभारी व पदाधिकारी व स्वामीनिष्ठ कर्मष्ठ कार्यकत्यांची "सह विचार बैठक संपन्न झाली.
 त्यात ग्रामीणक्षेत्रात योग कार्यास गती देने,ग्रामीण क्षेत्रतील गावात प्रखंडात समीती स्थापित करुण पतंजलि चे बँनर लावने,गावो गावी मे नियमीत योगवर्ग स्थापित करणे योगवर्गोची संख्या वाढवीने,युवक युवतींना मुख्यधारेत जोडने,स्थानीक दानदात्या कडून निधी संग्रह करणे ,प्रत्येक प्रखंड प्रत्येक तालुक्यात "सहयोग शिक्षक प्रशिक्षण शिबीर लावने व सर्व संम्मतीनी प्रस्तावित"नागपुर जिल्हा ग्रामीण  कार्यकारणीचे  चयन करुण मंजुरी करीता "आ.मुख्य केन्द्रीय प्रभारी आ. डाँ.जयदिपजी आर्य व आ.राज्य प्रभारी श्री  विष्णुजी भुतडा" यांना प्रेषीत करुण मान्यता प्राप्त करणे ईत्यादी महत्वपूर्ण विषयांवर  सह विचार, विचार विमर्ष आणी मंथन आ.मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.
जिल्हा स्तरीय एक दीवसीय सह विचार बैठकीचा  शुभारंभ रामटेक क्षेत्राचे माजी आमदार मा. आशिषजी जैस्वाल यांच्या अध्यक्षतेत उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुण तर समापन रामटेक क्षेत्राचे खासदार आ. कृपालजी तुमाने यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. या प्रसंगी माजी आमदार मा.  आशिष जैस्वालजी यांनी जिल्ह्यातील सर्व तालुक्यात स्वामीजी महाराज यांचे अनुयायी निष्टावान कार्यकर्ता निस्वार्थ रुपानी व संघटीत होऊण चांगले व प्रसंनीय कार्य करत आहेत.मी स्वताः स्वामिजी महाराजांच्या मंबई व नागपुर शिबीरात सहभागी होऊण योग प्राणायाम शीकुन आशीर्वाद प्राप्त केला आहेपतंजलि योग समीतीच्या आयोजनात  हर संभव मदत करण्यास कटीबध्द आहे व आशा करतो की  जिला समीती मला सेवेची संधी देईल.
रामटेक क्षेत्राचे खासदार कृपाल तुमानेजी यांनी संपुर्ण जिला टीम व प्रस्तावित नवकार्यकारणी टीमच्या कार्योची स्तुती करत आ.मुख्य केन्द्रीय प्रभारीजी या उर्जावान टीमला  मान्यता देऊण सेवाची संधी देतील असा विश्वास व्यक्त करत आपला आशिर्वाद देत स्वामीजी महाराज यांच्याशी झालेल्या भेटीची चर्चा करत संपुर्ण नागपुर जिल्ह्याच्या योगकार्यात केव्हाही मदत लागल्यास मला ती संधी मीळावी अशी विनंती केली.सदर एक दिवसीय सह विचार बैठकीचे समापन सामुहीक "वंदेमातरम्"गाण एंव गाव गाव जायेगे सबको योग सीखायेंगे का संकल्प घेऊण करण्यात आले.
नागपूर जिला ,ग्रामीण टिम व  रामटेक पतंजलि  योग समीती व्दाराआयोजीत या एक दिवसीय बैठकीत जिल्हा व  तालुकातुन 150 च्या वर योगयोध्दा सहभागी होऊण आयोजनास यशस्वी केले सहभागी मान्यवरांन करीता अल्पोहार,दिव्यपेय,शरबत व भोजन व्यवस्था आयोजकांनी केली होती ज्याचा  आस्वाद आ.भु.पु.विधायक आशिषजी नी सुध्दा घेतला याप्रसंगी पतंजलि परीवारा तर्फे उपस्थित मान्यवर व पत्रकार बंधुना  पुष्पगुच्छ व पतंजलि उत्पाद भेट स्वरुप देऊण सन्मानीत केले.
कार्यक्रमाचे संचालन राजकुमार गायकवाड रामटेक तालुका प्रभारी ने किया।  प्रास्ताविक मा. श्री प्रदीपजी काटेकर ने तर आभार  किशोर ढुंढेले तालुका प्रभारी सावनेर नी मानले.
या आयोजनाच्य सफलतार्थ राजकुमार गायकवाड(रामटेक), किशोर ढुंढेले (सावनेर), सुरेश पंधे (हिंगणा), दीनेश ढोबळे(मौदा), चारु लता पाटील (ना.ग्रामीण), प्रदीप घुमडवार(कुही), लता ढवळे(सावनेर), अशोक कडु(काटोल),पुरषोत्तम थोटे(नरखेड), प्रकाश साकोरे(पारशिवनी) ने पुर्ण पुरुषार्थ केले, तर सर्वश्री देवेन्द्र सोनटक्के,सुनील बोरकर,नंदकिशोर कनौजे,तुकाराम लुटे,इश्वर पात्रे,वसंत पात्रे,सुनील ठाकरे,विनोद मोहोड,(सभी मौदा तालुका),अमित हिंगे,सुनील हींगे,प्रफुल चव्हाण,अभय वाडनकर,विनोद कोहळे(पारशिवनी)अमरचंद जैन,मोरेश्वर मेश्राम,रंगराव ठाकरे, विनोद काळे,वनीता इंगळे,विशाखा मेश्राम,कु्ष्णाजी पटमासे,भगवान नाईक,शुभम ढवळे,गोपाल बर्वे,निर्मल निनावे,डिगांबर भड,नानकचंद सोनी,रामविशाल पाल,(सावनेर तालुका),रमेश लांजेवार,काशिनाथ सातपुते,प्रभा सातपुते,(कुही ता.),मोरेश्वर चौधरी,योगीलाल भेलावे,कु्ष्णा डाफ,महेन्द्र बेलखोडे(हिंगणा ता.),हीतेश घोरसे,सुर्यकांत बालपांडे,निलेश मनकवडे(नरखेड ता.),दीलीप वैध,वासुदेव बोडाखे(काटोल),मनोज सायरे ,वंदना गायकवाड, दीपक टुले,बलदेव धमगाये, सिमा पाटने, योगेश राहटे,राजेश दुपारे,हिरालाल बावनकुळे(रामटेक ता.),शालीनी दुर्गे,अरुण गुनकर,मधुकर नान्हे,बाळकुष्ण बागडे,ईत्यादी योगयोध्दा आपल्य टीम सोबत उपस्थीत होते.
                                -----------------------------------------------------------------------         
    जाहिरात...
भारतात पहिल्यांदा जागतिक पातळीवरील एक अग्रगण्य कंपनी घेऊन आली, कुक्कुट पालन ,मत्स्य पालन,शेळी पालन,दुध डेअरी यासारख्या संपूर्ण व्यवसायासाठी लागणारे संपूर्ण प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळणार अगदी निशुल्क, याच सोबत पशुखाद्य,पिल्ले,औषधी, या सारख्या संपूर्ण goods अतिशय अल्प दरात उपलब्ध ...त्यासाठी संपर्क करा:9175937925 या क्रमांकावर (घरपोच सेवा उपलब्ध).

Gas safety device.
आपके एल.पी.जी गॅस सिलेंडर कि सुरक्षा अब आपके हात 
"सुरक्षित नारी सुरक्षित परिवार"
क्या आप अपने हि घर मे सुरक्षित है ?
दुर्घटना होणे से पहिले सावधानी बरते !
समय कभी बताकर नाही आता....तो इंतजार कीस बात का...
तुरंत मिलीये ..कही देर ना हो जाए !
*कल करेसो आज कर ,आज करे सो अब *
पल मे प्रलय हो जायेगा तो करेंगा कब !
जीवन अनमोल है!और आपका परिवार .........?
विशेषताए...
* सूक्ष्म गॅस लिकेज का परीक्षण.  
* गॅस का परिपूर्ण उपयोय एव गॅस के प्रमाण कि जानकारी गॅस कि बचत अर्थात पैसो की बचत
* किसी कारण होणे वाले गॅस लिकेजपर यह डीवाईस सप्लाई बंद कर देता है. 
आपकी सेफ्टी हि पुरे परीवार कि लाईफ सेफ्टी है..
जो अपने परीवारसे करते है प्यारवह गॅस सुरक्षा यंत्र से कैसे करेंगे इन्कार
तो फिर जल्दी ,आये जल्दी  पाये
संपर्क करे:9175937925,9021527117 

कृपया दिये गये लिंक ओपन करे :  https://youtu.be/IaXlvfNtkpo



Sunday, April 15, 2018

निःशुल्क चालते- फिरते प्याऊ

निःशुल्क चालते- फिरते प्याऊ

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचीत्य साधत स्व. गोपाळराव डोनेकर जनसेवा प्रतिष्ठान कन्हान तर्फे शुक्रवार-आठवडी बाजार कन्हान,रविवार-रामटेक,सोमवार-पारशिवनी व गुरुवार-मनसर "निःशुल्क चालते- फिरते प्याऊ" टेंकर सेवा सुरु करण्यात आली.



Saturday, April 14, 2018

 ट्रक कॅनलमध्ये पलटी;चालक जखमी

ट्रक कॅनलमध्ये पलटी;चालक जखमी

रामटेक(तालूका प्रतिनिधी): 
 रामटेक ,मौदा महामार्गावर रामटेक वरुन चार कि.मी अंतरावर भोजापुर शिवारात ट्रक क्रमांक MH 40 NG 7639 रामटेक वरुन मौदा कडे जात असलेला भरधाव ट्रक चालकाचे ट्रक वरुन नियंञण सुटल्याने शुक्रवारला राञी ९ वाजताचा सुमारास पेंच जलाशयाचा पेंच वरुन भंडाराकडे जाणारा कॅनलमध्ये पलटल्याने ट्रक चालक गंभीर जखमी झाला असुन चालकाला कामठी येथे उपचाराकरीता भरती करण्यात अाले असल्याची माहीती पोलीसांनी दिली असुन पुढिल तपास करीत अाहे .

Wednesday, April 11, 2018

पत्रकार प्रविण टाकळे यांच्या परीवाराला 1लाख रूपयांची शासन मदत.

पत्रकार प्रविण टाकळे यांच्या परीवाराला 1लाख रूपयांची शासन मदत.

रामटेकच्या राजस्व अभियानात शेकडो लाभार्थी लाभान्वित
 रामटेक पं.स चे गटविकास अधिकाऱ्यांचे  काम असमाधानकारक
                                                    रामटेक तालुका प्रतिनिधी:                                               
रामटेकच्या देशमुख सेलीब्रेशन सभागृहात तालुका स्तरीय महाराजस्व अभियान दिनांक 10 एप्रिल 2018 रोजी अतिशय उत्साहात संपन्न झाले.या कार्यक्रमात मागील वर्षी  23 जुलै 2017 ला अपघाती निधन झालेले पत्रकार प्रविण टाकळे यांच्या परीवाराला मुख्यमंत्री सहायता निधीतून एक लक्ष रूपयांची मदत मंजूर करण्यात आली व या रकमेचा धनादेश यावेळी रामटेकचे आमदार डी.मल्लिकार्जुन रेड्डी यांच्या हस्ते व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत प्रिती टाकळे यांना देण्यात आला.या कार्यक्रमांत विविध विभागातर्फे राबविण्यांत  येणाऱ्या शासन योजनांचा लाभ शेकडो लाभार्थिंना देण्यात आला.संबधित लाभार्थिंना यावेळी धनादेश व साहीत्याचे वाटप करण्यात आले. 
रामटेकला संपन्न झालल्ेया या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार डी.मल्लिकार्जुन रेड्डी यांचे हस्ते संपन्न झाले.अध्यक्षस्थानी रामटेकचे उपविभागीय अधिकारी राम जोषी होते.यावेळी तहसिलदार धर्मेश फुसाटे,जि.प.सदस्या शांता कुमरे,सरपंच योगीता गायकवाड,मीनाक्षी वाघधरे,तालुका संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष ज्ञानेष्वर ढोक,ज्येष्ठ  पत्रकार विजय पांडे,तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष त्रिलोक मेहर,वसंतराव डामरे,दिपक गीरधर,अनिल वाघमारे,ललित कनोजे,एचपी गॅसचे वितरक जयप्रकाष तिवारी यांचेसह सर्वच विभागांचे तालुका प्रमुख उपस्थित होते.कार्यक्रमाची नियोजित वेळ 11 वाजताची होती मात्र आमदार साहेब तब्बल तीन तास उशीरा आल्याने या कार्यक्रमाला संपुर्ण रामटेक तालुक्यातुन आलेल्या सर्वसामान्य नागरीकांना ताटकळत राहावे लागले व दुपारी 1 वाजता हा कार्यक्रम सुरू झाला. 
या कार्यक्रमांत कृशि विभागातर्फे अनुदानावर आठ ट्रक्टरचे वाटप करण्यात आलेसुमारे 80 लाभार्थींना कृशि औजारांचे वाटप करण्यांत आले.उज्वला योजने अंतर्गत मनसर येथील19 लाभार्थींना गॅस कनेक्षन भारत गॅस तर्फे यासह मुद्रा कर्ज,विज वितरण कंपनी,आरोग्य सेवा,आदिवासी विकास विभाग,पंचायत समीती,जलसंपदा विभाग,सामाजिक वनीकरण विभाग, वनविभाग,सहायक निबंधक रामटेक,दुयम निबंधक,अन्नपुरवठा,पषुसंवर्धन, आधार कार्ड अपडेषन, विविध महसुल प्रमाणपत्रे व जमीनीचे पट्टेवाटप असे लाभ लाभार्थिना देण्यात आले. 

यावेळी आमदारांनी आपल्या भाशणांत ईतर सर्व विभागाच्या कामकाजा विशयी समाधान व्यक्त करतांना रामटेकचे तहसिलदार फुसाटे यांच्या लोकाभीमुख कार्याची प्रषंसा केली.पं.स.रामटेकच्या कामकाजात मोठाच सावळागोंधळ असून अनेक ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक हे मुख्यालयात राहात नाहीत.रोजगारसेवकांचा मोठा भ्रश्टाचार आहे मात्र गटविकास अधिकारी हे याकडे दुर्लक्ष करतात.त्यांचे काम अजिबात समाधानकारक नसल्याचे यावेळी अधोरेखित केले.षिबीरांत तालुक्यातुन मोठया संख्येत नागरीकांची उपस्थिती होतीकार्यक्रमाचे प्रास्तावीक तहलिदार फुसाटे यांनी केले तर राम जोषी यांनी अघ्यक्षीय भाशणातून सरकारच्या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.