चंद्रपूर/प्रतिनिधी:
भारतीय जनता पार्टी जिल्हा चंद्रपूरचे ज्येष्ठ नेते खुशाल बोंडे यांची चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचे विस्तारक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश भाजपा संघटनमंत्राी विजयराव पुराणीक, विदर्भ संघटनमंत्राी डाॅ. उपेंद्र कोठेकर यांच्या उपस्थितीत दि. 15 जुलै रोजी भाजपाच्या पूर्व विदर्भ कार्यकर्ता सम्मेलनात या नियुक्तीची घोषणा केल्या गेली.
तब्बल 32 वर्षांपासून खुशाल बोंडे भाजपाच्या संघटनात्मक कार्यात सक्रीयपणे कार्य करीत आहेत. 1986 मध्ये वार्ड अध्यक्षपदापासून त्यांनी राजकीय क्षेत्रात पदार्पण केले. अनुभव, धाडसीवृत्ती, संघटन कौशल्य आणि पक्ष नेतृत्वाच्या आदेशानुसार समर्पित वृत्तीने कार्य करण्याची उर्मी असलेल्या श्री. बोंडे यांना पक्षनेतृत्वाने भाजपा चंद्रपूर शहर महामंत्राी पदाची जबाबदारी सोपविली या जबाबदारीला योग्य न्याय दिल्यामुळे पक्षाने त्यांचेवर 1993 पासून जिल्हा संघटन महामंत्राी म्हणून पूर्णवेळ जबाबदारी सोपविली. या पदावर सतत 4 वर्ष दखलपात्रा असे कार्य करून जिल्हयात पक्षाचे संघटन सक्षमपणे उभे करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे.
केंद्रीय गृह राज्यमंत्राी हंसराजजी अहीर, राज्याचे अर्थ मंत्राी सुधीरभाऊ मुनगंटीवार, भाजपा नेत्या शोभाताई फडणवीस, ज्येष्ठ नेते चंदनसिंह चंदेल, विजय राऊत आदी नेत्यांच्या मार्गदर्शनात अत्यंत मौलिक कार्य करून त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटविला. त्यामुळे पक्ष नेतृत्वाने जिल्हा महामंत्राी पदाची जबाबदारी सोपविली. एक युवा पदाधिकारी म्हणून त्यांनी संपूर्ण जिल्हयात आपल्या कार्यातुन कार्यकत्र्यांचे बळ उभे केल्याने त्यांचेवर राजुरा विधानसभेचे प्रमुख म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली असून या जबाबदारीलाही राजकीय व सामाजिक कार्यातून योग्य न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. जिल्हयात लोकसभा व विधानसभा तसेच जिल्हा परिषद, नगरपालिका, पंचायत समिती, कृऊबास निवडणुकीमध्येही त्यांनी महत्वपूर्ण कार्य पार पाडून पक्षिय उमेदवारांच्या विजयामध्ये भरीव योगदान दिले आहे.
महाराष्ट्र प्रदेश भाजपाच्या कार्यकारीणी सदस्य पदाची जबाबदारीही हे विद्यमान काळात सांभाळत आहेत. चंद्रपूर लोकसभा क्षेत्राच्या विस्तारक पदावर त्यांची नियुक्ती झाली असल्याने ते या पदाला योग्य न्याय देत भाजपाला संघटनात्मकदृष्टया सक्षम बनवतील असा विश्वास भाजपा नेते ना. हंसराजजी अहीर, ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार, आ. नानाभाऊ शामकुळे, वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, आ.अॅड. संजय धोटे, आ. संजीवरेड्डी बोदकुरवार, आ. राजु तोडसाम, भाजपा जिल्हाध्यक्ष हरिश शर्मा, राजेंद्र डांगे, भाजपा नेते विजयभाऊ राऊत, जि.प. अध्यक्ष देवराव भोंगळे, माजी आमदार प्रा. अतुल देशकर, विजय पिदूरकर, दिनकर पावडे, राहूल सराफ, राजू घरोटे, अरूण मस्की यांचेसह जिल्हयातील भाजप पदाधिका-यांनी व्यक्त केला असून या नियुक्तीचे सर्वांनी स्वागत केले आहे.