काव्यशिल्प Digital Media: हत्ती

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu
Showing posts with label हत्ती. Show all posts
Showing posts with label हत्ती. Show all posts

Friday, February 23, 2018

 ताडोबातील नंदिनीचा मृत्यू

ताडोबातील नंदिनीचा मृत्यू

चंद्रपूर (ललित लांजेवार):
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील २ वर्षीय नंदिनी नामक हत्तीनीचा गुरुवारी रात्री जर्जर आजाराने  मृत्यू झाल्याची घटना घडली.ताडोबातील या बाल हत्तीच्या जाण्याने ताडोबातील नंदिनीच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
ताडोबाचे आकर्षण हे वाघ जरी असले तरी मात्र मोहुर्ली प्रवेशद्वारावर हे हत्ती मात्र पर्यटकाचे मन जीकतात व  स्वागत करतात.गुरवारी रात्रीच्या सुमारास मृत्यू झाल्यानंतर शुक्रवारी सकाळीच वनविभागाचे बडे अधिकारी घटना स्थळावर दाखल झाले, मिळालेल्या माहितीवरून हर्पिस नावाच्या वायरसने नंदिनीचा मृत्यू झाल्याचे कडते आहे. याकरिता तिचे अवयव देखील फोरेन्सिक लेबोट्रीला पाठविण्यात आले आहे. वन्यजीव डॉक्टर्सच्या देखरेखीत मृत हत्तीवर पोस्टमॉर्टम होणार असून मृत्यूचे खरे कारण शनिवारी  पुढे येणार आहे.  याआधी देखील २०१४ मध्ये एका हत्तीचा मृत्यू झाला होता,या हत्तीच्या मृत्युमागे ताडोबाचे वातावरण कारण ठरत असल्याचे बोलले जात आहे.त्यामुळे आता या विषयाला वनविभागाने गांभीर्याने घेण्याची गरज आहे.