সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Tuesday, February 15, 2011

Sunday, February 13, 2011

देहविक्री महिलांची प्रथमच पत्रपरिषद

देहविक्री महिलांची प्रथमच पत्रपरिषद

सकाळ वृत्तसेवा
Sunday, February 13, 2011 AT 12:30 AM (IST)
Tags: police, crime, chandrapur, vidarbha
चंद्रपूर - बेकायदेशीर व्यवसाय करीत असल्याच्या कारणावरून आंध्र पोलिसांनी छापा टाकला. लाथाबुक्‍क्‍या मारून ओढत गाडीत कोंबले. घरादारांची तोडफोड केली. घरात ठेवलेले पैसे आणि दागिनेही जप्त केले. पोलिसांनी छापासत्र राबवताना 12 लाख रुपये आणि 25 तोळे सोनेही लंपास केले, असा खळबळजनक आरोप देहविक्री करणाऱ्या महिलांनी प्रथमच पत्रपरिषद घेऊन केला. 15 सप्टेंबर 2006 रोजी आंध्र पोलिसांनी 55 महिलांना अटक केली होती. ही कारवाई निजामबाद आणि चंद्रपूर पोलिसांनी केली. त्यानंतर 20 फेब्रुवारी 2007 रोजी 15 दलालांसह 35 तरुणींना अटक करण्यात आली. यंदाही नोव्हेंबर-डिझेंबरमध्ये छापा टाकण्यात आला. एका संस्थेच्या तक्रारीवरून ही कारवाई होते. या निराधारगृहात दरवर्षी ठराविक निराधार महिलांची शासकीय अनुदानासाठी उपस्थिती आवश्‍यक असते. त्यामुळे आंध्र पोलिसांना हाताशी धरून ही संस्था येथे आलेल्या मुलांना आपल्या निराधारगृहात घेऊन जाते. त्यांच्या नावावर अनुदान लाटते. तीन वर्षांनंतर त्यांना वाऱ्यावर सोडले जाते. त्यानंतर किंवा त्याआधीच या निराधारगृहातील मुली पळून जाऊन पुन्हा देहविक्री करण्यासाठी येतात, असे त्यांनी सांगितले.

पाषाणहृदयी माणसांचाही थरकाप उडावा, असा प्रसंग दीड-दोन महिन्यांपूर्वी "रेडलाइट झोन'मधील चंद्रपूरच्या गौतमनगर आणि वणी (जि. यवतमाळ) येथे घडला होता. मात्र, या घटनेने धास्तावलेली वस्ती अद्याप सावरलेली नाही. अद्याप पोलिसांकडून त्यांना त्रास सुरू असल्याने आंध्र पोलिसांच्या क्रूरतेचा पाढाच व्यथित महिलांनी पत्रकारांसमोर शनिवारी (ता. 12) मांडला. या वस्तीत देहविक्री व्यवसायात आंध्रप्रदेशातील मुलींचा वावर मोठ्या प्रमाणात असल्याची तक्रार एका स्वयंसेवी संघटनेने केली होती. नलगोंडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक एम. तिरुपती यांच्या नेतृत्वातील पथकाने मागील 29 नोव्हेंबर रोजी चंद्रपुरात; तर 27 डिसेंबर रोजी वणी येथे पोलिसांनी छापा टाकला होता. या छापासत्रात त्यांनी सुमारे 120 जणांना अटक केली. दोन महिन्यांचा कालावधी होऊनही अनेकांची सुटका झालेली नाही. यातून चिमुकलेही सुटले नाहीत. आंध्र पोलिसांच्या क्रूरतेचा पाढा वाचताना गौतमनगरातील फातिमा म्हणाल्या, ""उभ्या आयुष्यात पोलिसांचा असा धिंगाणा आम्ही बघितलेला नाही. अमानुष मारहाण केली. एका 45 वर्षीय महिलेच्या अंगावर पाणी ओतून मारहाण केली. महिन्याभराचे बाळ असलेल्या महिलेस धक्काबुक्की करण्यात आली; शिवाय पोलिसांनी अटकसत्रात अनेकांच्या घरांची कुलपे न उघडताच दरवाजे तोडले.'' सोबतच एका घरातून सोन्याचे दागिने आणि पैसेही पोलिसांनी चोरल्याचा आरोप केला. यावेळी लक्ष्मीबाईंनी सांगितले, ""सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीत वाट चुकून या व्यवसायात आलेल्या अनेक महिला एचआयव्ही एड्‌सने बाधित आहेत. त्यांना नोबल शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आरोग्यविषयक सेवा दिल्या जातात. जीवनमरणाच्या लढाईत संघर्ष करीत असलेल्या या बाधित महिलांना पोलिसांनी अटक केल्याने त्यांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. अशा बाधितांना दररोज आणि नियमित औषध घेणे बंधनकारक असते; मात्र या महिला आता पोलिस कोठडीत असल्याने त्यांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. अटक करण्यात आलेल्या महिलांवर बलात्कार, मारझोड, बेकायदेशीरपणे डांबणे, अनैतिक कृत्याला प्रोत्साहन देणे, जीवे मारण्याची धमकी, ये-जा करणाऱ्या नागरिकांना अश्‍लील हातवारे करणे आदी गुन्हे दाखल करण्यात आले.


""पोलिसांनी छापासत्र राबविताना 12 लाख रुपये आणि 25 तोळे सोने लंपास केले. मात्र, नलगोंडा येथील न्यायालयात केवळ 10 हजार रुपयेच जप्त केल्याचे दाखविण्यात आले.''
शिट्टीबाई महमद अकबर
 अध्यक्ष, जीवनधारा महिला संजीवनी संस्थ
वणी

Thursday, February 10, 2011

कौंटुंबिक कलहातून स्वत:ला पेटविले

कौंटुंबिक कलहातून स्वत:ला पेटविले

सकाळ वृत्तसेवा
Thursday, February 10, 2011 AT 01:00 AM (IST)
Tags: suicide, crime, gundpimpri, chandrapur, vidarbha
गोंडपिंपरी (जि. चंद्रपूर) - घरगुती वादातून बाचाबाची झाल्याने रागाच्या भरात अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (ता. आठ) मध्यरात्रीच्या सुमारास शहरात घडली. 100 टक्के जळालेल्या वनमाला रामदास सोनटक्के (वय 45) या महिलेचा बुधवारी सकाळी मृत्यू झाला. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी मुलगा राजेश सोनटक्के याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
येथील राजेश रामदास सोनटक्के (वय 30) याचा विवाह नुकताच जुळला होता. त्यातच त्याने भावी पत्नीला मोबाईल खरेदी करून दिल्याची बाब त्याची आई वनमाला यांना कळली. त्यामुळे त्यांनी अकारण खर्चाविषयी विचारणा केली. आठ फेब्रुवारी रात्री साडेदहाच्या सुमारास दोघांत घरगुती खर्चावरून भांडण झाले. रागाच्या भरात वनमाला सोनटक्के यांनी अंगावर रॉकेल ओतून स्वत:ला पेटवून घेतले. यावेळी त्यांचा वाचविण्यासाठी पती रामदास सोनटक्के धावून गेले; मात्र त्यात त्यांचेही हात जळले गेले. शंभर टक्के जळालेल्या अवस्थेत वनमाला यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले; मात्र सकाळी साडेसातच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. या घटनेसंदर्भात मृताच्या पती रामदास सोनटक्के यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यावरून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी मुलगा राजेश सोनटक्के याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. दरम्यान, हात जळालेल्या रामदास सोनटक्के यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले. मृतआईवरील अंत्यसंस्कार मुलगा राजेश याने केले.

संबंधित बातम्या
रावीच्या विद्यार्थ्यांची आत्महत्या
चंद्रपूरमध्ये बारावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या
'जान बचानेवाले हो, क्‍यों जान देते हो?'
सांगवी बाजार येथे प्रेमियुगलाची आत्महत्या
नागपुरात महिला पोलिसाची आत्महत्या




प्रतिक्रिया
-----------------------------
On 10/02/2011 11:24 AM dilip chitwar said:
हा काही समजूतदारपणा नाही! पालकांनी आणि मुलांनी दोघांनी समजूतदार पणा दाखवायला हवा. डोक्यात राख गेली तर असे हे प्रकार घडतात.
-------------------------------

On 10/02/2011 02:46 AM Shubhangi said:

I read all the comments and I think that people here are not thinking of the other side. The mother should not have wasted her life for the cause that is mentioned above. People need to control the anger and think through before taking such drastic action. Even if the son may not be guilty, he has lost a mother and unfortunately he will spend his life in jail, just because of the anger.
--------------------------

On 09/02/2011 07:26 PM surendra said:

त्या राजूला धडा शिकवला पाहिजे. मुलाच्या नावावर कलंक आहे.


On 09/02/2011 05:00 PM prashant ghorude said:
भयकर

On 09/02/2011 04:21 PM Abhijit G said:
नका छापू अशा बातम्या. सकाळ या बातम्या न उगाच प्रसिद्धी देऊ नका. काळिमा फासणाऱ्या बातम्या समाजासाठी घातक ठरतील. बरेच लहान मुले ई-सकाळ वाचतात.


On 09/02/2011 04:09 PM prashant said:

त्याला जिवंत जाळा.

On 09/02/2011 03:49 PM amit said:
किती भयानक ..आता कल्पनाच करवत नाही कुठे जगतो आहे आपण ..हेच का ते कलियुग ज्याच्या भयंकर पानाच्या गोष्टी फार पूर्वीपासून ऐकत आलो आहे ..नक्कीच ते हेच आहे.. संस्कृतीच्या गप्पा मारताना अजून आपण थकत नाही आहोत.असे झालेले जगात कुठेही अजून ऐकले नव्हते ते भारतात घडले ..


On 09/02/2011 03:21 PM sasonkar yardena israel said:
------------------
वा पुत्र व्हावा अयसाअसल्या पुत्राला गाढवावर बसवून धिंड काढली पाहिजे गावात ते पण तोंडाला काळे फासून मरठीत म्हण आहे ती खरी आहे मुल नसेल तर एकच दुख पण बेढंगे मुल असेल तर हजार दुख हे माझे मत आहे मिसेस सासोन्कर यार्देना इस्राईल
----------------------------------
On 09.02.2011 02:49 sudhir kshirsagar said:

माणुसकीला काळिमा आहे..नराधमाला जिवंत जाळा ते हि भर चौकात...
On 09/02/2011 02:34 suhas said:
just horrible
On 09/02/2011 01:25 PM priya said
खूप वाईट बातमी आहे ही...... कडक शिशा झाली पाहिजे त्याला
On 09/02/2011 01:15 PM Ranjeet Bhosale said:
kay suru ahe jagat?? mauli la marun kashe lok sukhi rahu shaktil.......deva sadbuddhi dya sarvana....


On 09/02/2011 12:55 PM snehal said:
वा......छान फेडलेस हं आई चे ऋण..........असा करंटा जन्माला नसता आला तरी चाललं असतं त्या मातेच्या पोटी..........फार वाईट घटना आहे हि............