काव्यशिल्प Digital Media: अटक

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu
Showing posts with label अटक. Show all posts
Showing posts with label अटक. Show all posts

Friday, October 19, 2018

वणी-चंद्रपूर मार्गेने दारू तस्करी;एकाला अटक

वणी-चंद्रपूर मार्गेने दारू तस्करी;एकाला अटक

  गाडीत विशेष खप्पा तयार करून करण्यात येत होती दारू तस्करी 
                                   १० लाखांचा मुद्देमाल जप्त

चंद्रपूर/प्रातिनिधी:
वणी-चंद्रपूर मार्गेने दारू तस्करी करणाऱ्या दारू तस्कराला चंद्रपूर
 स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली अटक


चंद्रपूर येथील रयतवारी कॉलरी परिसरात करण्यात आली कारवाई
 रणजीत खरवार असे दारू तस्कराचे नाव  

 गुप्त माहितीच्या आधारे केली पोलिसांनी कारवाई 
 स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुधाकर अंभोरे  यांच्या नेतृत्वात  सहायक पोलिस निरीक्षक सुधीर बोरकुटे, दौलत चालखुरे, कुंदन सिंग बावरी, प्रांजल झिलपे यांनी छापा टाकण्यात आला. 
  चालक रणजीत खरवार याला ताब्यात घेण्यात आले. तर दोघे पसार झालेत. 

यावेळी पोलिसांनी दारूसाठा, व वाहन असा एकूण दहा लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.  
-------------------------------------------------------------------
शहर पोलीस कारवाई 
1400 नग देशी दारू किं अंदाजे 1, 40,000/- चा माल व एक मोपेड गाडी किं अंदाजे 30, 000/- असा एकूण 1,70,000/-  रु चा माल आरोपी नामे अक्षय देविदास बारस्कर वय 20 वर्ष रा. लालपेठ जुनी वस्ती चंद्रपूर  व इतर एका आरोपीस अटक 
Api देवेंद्र ठाकूर,  अमोल गिरडकर ड्राइवर रामटेके यांची कारवाई 


 नागपुरात शालेय विद्यार्थ्यांचे अपहरण करून खंडणी उखडणारी टोळी अटकेत

नागपुरात शालेय विद्यार्थ्यांचे अपहरण करून खंडणी उखडणारी टोळी अटकेत

नागपूर/प्रतिनिधी:


पैसे कमवायच्या लालसेपोटी शालेय विद्यार्थ्यांचे अपहरण करणाऱ्या टोळीचा नागपूर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. कुटुंबीयांपासून लपून धूम्रपान करणाऱ्या किंवा इतर व्यसन करणारे शाळेतील, महाविद्यालयातील विद्यार्थी या टोळीचे सूत्रधार हे विध्यार्थ्यांवर लपून लक्ष ठेवत होते आणि विध्यार्थी व्यसन करतांना दिसला कि त्याला उचलून टोळीच्या सूत्रधाराच्या घरी नेण्यात येत होते.२६ सप्टेंबरला आरोपींनी खंडणीसाठी अयोध्यानगर येथील रहिवासी हिमांशु सुनील कातरे याचे अपहरण केले.व त्याला दमदाटी करून मारहाण केली.आरोपींनी हिमांशुला अधिक पैशांची मागणी करून त्याला जीवे मारण्याची धमकी दिली. हिमांशुचे फोटो त्याच्या वडिलांना पाठवून खंडणी मागितली. हिमांशुने रक्कम आणून देण्याचे आश्वासन दिले. तेथून तो पळून जाण्यात यशस्वी झाला. 
दोन दिवसांपूर्वी हिंमत करून पीडित कुटुंबीयांनी सक्करदरा पोलिसात तक्रार दाखल केल्यामुळे प्रकरणाचा खुलासा झाला. 
 भीतीपोटी कुणीच या टोळीविरुद्ध तक्रार करण्याची हिंमत दाखविली नसल्याने या टोळीतील सदस्यांचे चांगलेच फोफावत होते.त्यानंतर हिमांशु आणि त्याच्या कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर सक्करदरा पोलिसांनी आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ३९२, ३६३, ३८४, ३४ नुसार गुन्हा दाखल करून टोळीचा सूत्रधार बिट्टु, प्रज्ज्वल आणि फैजानला अटक केली. टोळीतील इतर सदस्य अद्यापही फरार आहेत.











Friday, June 22, 2018

देशी कट्टा बाळगणाऱ्या युवकाला चंद्रपूरातून अटक

देशी कट्टा बाळगणाऱ्या युवकाला चंद्रपूरातून अटक

दोन जिवंत काडतुसे जप्त
देशी कट्टा साठी इमेज परिणाम
संग्रहित छायाचित्र.
चंद्रपूर/प्रतिनिधी:
चंद्रपुरात देशीकट्टा जवळ बाळगणाऱ्या एका युवकाला रामनगर आणि शहर पोलिसांच्या पथकाने संयुक्त कारवाई करीत गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास अटक केली. त्याच्याजवळून एक देशीकट्टा आणि दोन जिवंत काडतुसे पोलिसांनी जप्त केले आहेत़, इमरान फय्याज खान रा़.बी.एम.टी चौक रयतवारी कॉलरी असे अटकेतील आरोपीचे नाव आहे़.
उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक मिळालेल्या गोपनीय माहितीवरून रामनगरचे गुन्हे शोध पथक आणि सिटी पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथक यांचे संयुक्त पथक तयार करून गुरुवारी संध्याकाळी ७़३० वाजता आरोपी  घइमरान फय्याज खान रा़.बी.एम.टी चौक रयतवारी कॉलरी  याच्या घरी धाड घालून घराची झडा झडाती घेतली़ यावेळी आरोपीच्या घरून देशीकट्टा आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली़
ही कारवाई पोलीस अधीक्षक नियती ठाकर, अपर पोलीस अधीक्षक हेमराजसिंग राजपूत, उपविभागीय  पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनात रामनगर पोलीस निरीक्षक दिपक गोतमारे. शहर पोलीस निरीक्षक भगत.  उपनिरीक्षक कापडे, वाघमारे, हेड कॉन्स्टेबल प्रमोद कोटनाके, सीटीचे पोलीस उपनिरीक्षक मुंडे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे़.

Friday, June 15, 2018

वर्ध्यात जेसीबी चोरट्याला अटक

वर्ध्यात जेसीबी चोरट्याला अटक

JCB robbery arrested | जेसीबी चोरट्याला अटकपुलगाव/प्रतिनिधी:
 जेसीबी पळविणाऱ्या चोरट्याला पुलगाव पोलिसांनी नागपूर येथून ताब्यात घेतले. त्याच्याकडून जेसीबीसह १२ लाखांचा माल हस्तगत करण्यात आला. ही कारवाई गुरूवारी करण्यात आली.
९ जून रोजी मौजा रोहणा येथून जेसीबी कपंनीचा जेसीबी क्र. एमएच २९ व्ही ३९५७ हा मालक विजय टिकाराम उरकुडे (५४) रा. यवतमाळ यांच्याकडे कामावर असलेल्या हेल्पर मनीष दिलीप उईके (२९) रा. शिवाजी वॉर्ड आर्वी याने लबाडीने चोरून नेला. याबाबत उरकुडे यांनी पुलगाव पोलीस ठाण्यात १२ जून रोजी तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पुलगाव पोलिसांनी भादंविच्या कलम ३८१ अन्वये गुन्हा दाखल करून तपासाची चक्रे फिरविली.
पोलीस निरीक्षक एम.पी. बुराडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार अशोक भोयर, अनिल भोवरे आणि तपास पथकाने तपासचक्र फिरवून आरोपी मनीष दिलीप उईके रा. शिवाजी वॉर्ड आर्वी याला नागपूर येथून ताब्यात घेतले. शिवाय त्याने चोरी केलेला जेसीबी क्र. एमएच २९ व्ही ३९५७ किंमत १२ लाख रुपये बुट्टीबोरी शिवारातून हस्तगत केला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस., उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिनेशकुमार कोल्हे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक मुरलीधर बुराडे, जमादार अशोक भोयर, विवेक बन्सोड, पोलीस शिपाई अनिल भोवरे, विकास मुंडे, मुकेश वांदिले, राहुल साठे आदींनी केली.पुलगाव पोलिसांनी तक्रार प्राप्त झाल्यानंतर अवघ्या दोन दिवसांतच जेसीबी आणि चोरटा शोधून काढल्याने मालकाला दिलासा मिळाला आहे.

Monday, June 11, 2018

चंद्रपुरात व्यापाऱ्याला तीस लाखांचा गंडा

चंद्रपुरात व्यापाऱ्याला तीस लाखांचा गंडा

आरोपी महिलेला बंगळूर येथून केली अटक:४१ लॅपटॉप जप्त
चंद्रपूर/प्रतिनिधी:
नागपुरातील एका फायनान्स कंपनीचे बनावट कागदपत्र तयार करून चंद्रपुरातील एका व्यापाऱ्याला तब्बल तीस लाखाने गंडा घालणाऱ्या एका महिलेला रामनगर पोलिसांनी बंगळूर येथून अटक केली आहे.
लक्ष्मी शंकर कोरवन रा़. पिपरबोडी ता़.भद्रावती असे अटकेतील महिलेचे नाव आहे़. लक्ष्मी ही पतीपासून विभक्त राहत असून, व्यावसायीकांशी ओळख निर्माण करणे आणि ओळखीचा फायदा घेत त्याला गडविणे असा तिचा व्यवसाय होता.अशी माहिती पोलिसांनी दिली.अशाच एका ओळखीतून तिचा संपर्क चंद्रपूर येथील व्यापाऱ्याशी आला आणि तिने टाटा कॅपिटल फायनान्स नागपूर या कंपनीचे बनापट कागदपत्र तयार करून, या फायनान्समधून आपल्याला ५० लाखांचे कर्ज मंजूर झाले असून, मला तातडीच्या कामासाठी ३० लाखांची गरज आहे कर्जाची रक्कम मिळताच आपण तीस लाख परत करू असे सांगत तिने एका व्यापाऱ्याला  २०१६ मध्ये तीस लाख रुपये मागितले. त्या व्यापाऱ्याने  देखील ३० लाख दिले, मात्र बरेच महिने लोटल्यानंतरही तिने पैसे परत केले नाही यानंतर व्यापाऱ्याने दिलेल्या रकमेबाबत तिला विचारणा सुरू केली यावेळी ती उडवाउडवीची उत्तरे देत होती. 
व्यापाऱ्याला संशय आल्याने त्याने टाटा कॅपिटल फायनान्स येथे चौकशी केल्यानंतर लक्ष्मी कोरवन या महिलेला असे कोणतेही कर्ज मंजूर झाले नाही, अशी माहिती मिळाली तर, लक्ष्मी कोरवन हिच्याकडे संबंधित कंपनीचे बनावट कागदपत्र असल्याने कंपनीने रामनगर पोलीस ठाण्यात लक्ष्मीविरुद्ध मार्च महिन्यात तक्रार दिली होती.पंरतु लक्ष्मी कोरवन ही बेंगळूरु येथे फरार झाली होती दरम्यान, लक्ष्मीच्या शोधात असलेल्या पोलिसांनी बंगळूरु येथे सापळा रचून तिला ताब्यात घेत अटक केली . तिच्यासोबतच तिचा एक सहकारी मो़शेख मो़ हुसेन रा़ नागपूर यालाही अटक करण्यात आली आहे. तिच्याजवळून तब्बल ४१ लॅपटॉप पोलिसांनी जप्त केले आहे.सदर कारवाई  पोलीस अधीक्षक  नियती ठाकर, अपर पोलीस अधीक्षक हेमराजसिंग राजपूत  ठाणेदार दीपक गोतमारे यांच्या मार्गदशात पोलीस उपनिरीक्षक कापडे, साहाय्यक फौजदार जाधव, नीलेश मुडे, महिला पोलीस कर्मचारी गीता,बबिता यांच्या पथकाने ही कारवाई केली.



Friday, May 11, 2018

बाजारात नकली नोट चालविणाऱ्या महिलांना अटक

बाजारात नकली नोट चालविणाऱ्या महिलांना अटक

नकली नोटा १०० साठी इमेज परिणामचंद्रपुर/प्रातिनिधी:
नागभीड च्या आठवडी बाजारात गर्दीचा फायदा घेत शंभर रुपयांच्या नकली नोटा चालवणाऱ्या पाच महिलांना नागभीड पोलिसांनी गुरुवारी अटक केली आहे.नागभिळ येथे गुरुवारी आठवडी बाजार भरला होता या बाजारात चांगलीच गर्दी होती. यावेळी काही महिला 100 रुपयाच्या नकली नोटा बाजारात चालवण्याचा प्रयत्न करत होत्या गर्दीचा फायदा घेत बाजारातील व्यवसायिकांकडून वस्तू विकत घेत असताना शंभर रुपयांच्या चलनी नोटा असल्याचे काही व्यवसायिकांच्या  निदर्शनास येतात याची माहिती पोलिसांना पोलिसांनी कारवाई करत रुपयांच्या नकली नोटा हस्तगत केल्या आरोपी चंद्रकला जाधव, आरती पवार, भारत जाधव,नलिनी जाधव,संगीता जाधव  अश्या पाचही आरोपीन अटक केली, हे पाचही आरोपी  यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील रहिवासी असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे यांच्याजवळ नकली नोटा आल्या कुठून व याबाबत काही माहिती आणखी लागू शकते का यासाठी चौकशी सुरू आहे.
-----------------------------------------------------------------------
जाहिरात...
भारतात पहिल्यांदा जागतिक पातळीवरील एक अग्रगण्य कंपनी घेऊन आली, कुक्कुट पालन ,मत्स्य पालन,शेळी पालन,दुध डेअरी यासारख्या संपूर्ण व्यवसायासाठी लागणारे संपूर्ण प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळणार अगदी निशुल्क, याच सोबत पशुखाद्य,पिल्ले,औषधी, या सारख्या संपूर्ण goods अतिशय अल्प दरात उपलब्ध ...त्यासाठी संपर्क करा:९१७५९३७९२५ या क्रमांकावर (घरपोच सेवा उपलब्ध) 
चंद्रपुरात सोनसाखळी चोरट्यास अटक

चंद्रपुरात सोनसाखळी चोरट्यास अटक

चंद्रपूर/प्रतिनिधी:
घरची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने व स्वताच्या गरजा भागविण्यासाठी चोरी करणाऱ्या एका सोनसाखळी चोरट्यास दुर्गापूर पोलिसांनी अटक केली आहे.विकेश उर्फ विक्की गणवीर वय २३ वर्षे रा. दुर्गापूर असे या अटकेत असलेल्या आरोपीचे नाव आहे. ५ मे २०१८ रोजी दुर्गापूर येथील शक्तीनगर परिसरातील वेकोलीच्या मनोरंजन सभागृहात वेकोलिच्या कर्मचार्यांच्या घरचे लग्न होते,ह्या लग्नासाठी फिर्यादी वर्षा रामदास जाधव वय ५३ वर्षे ह्या लग्न लावून आई व शेजारणी सोबत घरी परत येत असतांना रात्री १० ते ११ वाजताच्या दरम्यान फिर्यादीच्या गळ्यातील ३५ ग्रॅम वजनाची चपलाकंठी व ३० ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र असे एकून ८० हजार रुपयाचे सोने चालत्या गाडीवरून चोरून नेले,या तक्रारीची दखल घेत दुर्गापूर पोलीस स्टेशन येथे अप क्रमांक.१९३/१८ कलम ३९२ भांदवी अनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. 
शुक्रवारी दुर्गापूर पोलिसांना गुप्त माहिती मिळाली कि आरोपी विकेश उर्फ विक्की गणवीर हा एका सराफा दुकानात येणार असून तो त्या व्याप्याराला सोने विकणार आहे.हि बाब माहित होताच तपास अधिकारी पीएसआय विवेक देशमुख यांनी आपल्या चमू सोबत सापळा रचला व आरोपी सराफा दुकानात येताच त्याला मुद्देमालासह अटक करण्यात आली.तसेच या चोरीच्या घटनेतील सोने हे त्याने एका फीरोज खान अन्वर खान इंदिरानगर येथील मित्राला अतिशय अल्प किमतीत विकले व त्याने हे सोने मुटूठ फायनान्स कंपनीत स्वताच्या नावे गहान ठेवले. या तपासात पोलिसांनी उर्वरित दागिने जप्त केले यात एकून १ लाख २० हजार किमतीचे दागिने दोन्ही आरोपींकडून जप्त करण्यात आले .या संपूर्ण प्रकारचा तपास पोलीस करत असून यात आणखी काही चोरीचे गुन्हे उघळकीस  येण्याची शक्यता वर्तविली जात आहे,सदरची कारवाई पो.नि.यादव,पोउनि विवेक देशमुख,पोहवा सुनील गौरकर,र्राज्निकांत पुठावार,नापोशी जगाजन नगरे,उमेश वाघमारे,पुरुषोत्तम रामटेके,यांच्या मार्फत करण्यात आली.
-----------------------------------------------------------------------
जाहिरात...
भारतात पहिल्यांदा जागतिक पातळीवरील एक अग्रगण्य कंपनी घेऊन आली, कुक्कुट पालन ,मत्स्य पालन,शेळी पालन,दुध डेअरी यासारख्या संपूर्ण व्यवसायासाठी लागणारे संपूर्ण प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळणार अगदी निशुल्क, याच सोबत पशुखाद्य,पिल्ले,औषधी, या सारख्या संपूर्ण goods अतिशय अल्प दरात उपलब्ध ...त्यासाठी संपर्क करा:९१७५९३७९२५ या क्रमांकावर (घरपोच सेवा उपलब्ध) 



Wednesday, May 09, 2018

लाच घेतांना वनविभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्याला रंगेहात अटक

लाच घेतांना वनविभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्याला रंगेहात अटक

acb police साठी इमेज परिणामचंद्रपूर/प्रतीनिधी:
लाकडे वाहून नेण्यासाठी लागणारा बदली वाहतूक परवाना देण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना वनपरिक्षेत्र अधिकारी व कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ अटक केली आहे रमेश तलांडे वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याचे तर रामदास गोटेफोडे असे वनकर्मचारी चे नाव आहे.
तक्रारदार लाखनी येथील रहिवासी असून 1990पासून शेतातील लाकडे खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात त्यांनी नागभीड तालुक्यातील कांपा  येथील शेतातील सागवानाची ६  झाडे विकत घेऊन कापणी केली सदर झाडे नागपूर येथे वाहून नेण्यासाठी लागणारा बदली वाहतूक परवाना मिळविण्यासाठी ७  मे रोजी वनपरिक्षेत्र अधिकारी रमेश तलांडे यांच्याकडे अर्ज केला येथील लिपिक रामदास गोटेफोडे याने  बदली वाहतूक परवाना देण्यासाठी  स्वतःकरता १ हजार आणि वनपरिक्षेत्र अधिकारी तलांडे यांच्यासाठी १  हजार असे  दोन हजार रुपये लाचेची मागणी केली. याबाबत तक्रार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग चंद्रपूर येथे तक्रार दाखल केली रोजी केलेल्या पडतात आरोपी रमेश तलांडे  आणि रामदास गोटेफोडे यांनी तक्रारदाराकडून लाच स्वीकारली यावेळी त्यांना चंद्रपूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली सदरची कारवाई पोलिस उपायुक्त पोलीस अधीक्षक आर पाटील अप्पर पोलीस अधीक्षक विजय माहुलकर यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपअधीक्षक डी एम घुमे पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे,कर्मचारी मनोहर एकोणकर,महेश मांढरे,अजय बागेसर,संतोष येलपूलवार,चालक दिनेश गरमडे यांनी केली.

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
जाहिरातीसाठी राखीव...
भारतात पहिल्यांदा जागतिक पातळीवरील एक अग्रगण्य कंपनी घेऊन आली, कुक्कुट पालन ,मत्स्य पालन,शेळी पालन,दुध डेअरी यासारख्या संपूर्ण व्यवसायासाठी लागणारे संपूर्ण प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळणार अगदी निशुल्क, याच सोबत पशुखाद्य,पिल्ले,औषधी, या सारख्या संपूर्ण goods अतिशय अल्प दरात उपलब्ध ...त्यासाठी संपर्क करा:९१७५९३७९२५ या क्रमांकावर (घरपोच सेवा उपलब्ध) 

Sunday, April 08, 2018

आंतरराज्यीय घरफोडीचा सुत्रधाराला अटक

आंतरराज्यीय घरफोडीचा सुत्रधाराला अटक

चंद्रपूर/प्रतिनिधी:
 मूल येथे पोलिस अधिकाऱ्यांच्या निवासस्थानी झालेल्या घरफोडीचा तसेच जिल्ह्यातील विविध घरफोडी प्रकरणात सहभागी असलेल्या घरफोडी टोळीचा सूत्रधार याला गजाआड करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे आरोपीकडून घरफोडीतील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे संगमसिंग जगदिशसिंग बावरी असे अटकेतील आरोपी चे नाव हे तर मुकेश गाभा कुमरे व करण सिंग भादा हे दोघे फरार आहे.  या घरफोडी टोळीत संगम सिंग बावरी सर्व गुजरखेडे पांडूरणा यांचा समावेश आहे संगम सिन्हा छिंदवाडा कारागृहात बंदिस्त होता पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी करिता चंद्रपूर जिल्ह्यातील मूल,गोंडपिपरी पोलीस ठाण्याच्या हदीतील ६ गुण्यांची कबुली दिली.  आरोपीने दिलेल्या माहितीनंतर चोरीस गेलेले २ लाख 54 हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त करण्यात आल्या टोळीवर नागपूर गोंदिया भंडारा नागपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत पोलीस अधीक्षक नियती ठाकर अपर पोलिस अधीक्षक हेमराज सिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुधाकर अंभोरे यांच्या  नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक सुनील उईके सहाय्यक फौजदार दौलत चालखुरे, पद्माकर भोयर,नितीन जाधव.महेंद्र भुजाडे कुंदन बावरी,प्रांजल झीलपे आदींच्या पथकाने ही कारवाई केली

Friday, February 09, 2018

  लाखोंचे बक्षीस असणारे नक्षलवाद्यांना चंद्रपूरातून अटक

लाखोंचे बक्षीस असणारे नक्षलवाद्यांना चंद्रपूरातून अटक


नक्षलवादी कार्यवाहीस जबरदस्त हादरा 

चंद्रपूर पोलिसांची मोठी कारवाई 

चंद्रपूर/प्रतिनिधी:

गडचिरोली जिल्ह्यातील लाहेरी पोलिसांना वॉन्टेड असलेल्या दोन जहाल नक्सवाद्यांना चंद्रपुर नक्सल सेलच्या पथकाने बल्लारपुर रेल्वे स्थानक परिसरातुन आज सकाळच्या सुमारास अटक केली आहे.
         रमैया आणि पदमा अशी अटक कण्यात आलेल्या दोन नक्षलवाद्यांची नावे आहे. रामन्ना हा दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीचा मेम्बर असून त्याच्यावर २५ लाखाचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. पदमा ही एरिया कमिटी मेंबर आहे व तिच्यावर सहा लाखांचे बक्षीस होते .
               रामन्ना हा मुळचा हैद्राबाद येथील असून त्याच्यावर तो छत्तीसगढ़, मध्यप्रदेश व महाराष्ट्र राज्यातील नक्सली चडवलित सक्रिय होता. हे दोन्ही नक्सली बल्लारपुर रेल्वे स्थानक परिसरात असल्याची गुप्त माहिती आज पोउपनि धर्मेद्र मडावी नक्षल सेल, व चंद्रपुर सि-60 पथक यांना मिळाली व ते खात्रीसाठी व कार्यवाहीसाठी बल्लारशाह येथे रावण झाले .त्या आधारे सर्च मोहिम राबवत या दोन्ही नक्सलवाद्यांना अटक केली आहे.


              या दोघांवरही गडचिरोली जिल्ह्यातील लाहेरी पोलिस स्थान्यात विविध गुन्हे दाखल आहे. सदरची कारवाई नियती ठाकर पोलीस अधिक्षक चंद्रपूर, हेमराजसिंग राजपुत यांचे मार्गदर्शनात करण्यात आली.

Wednesday, February 07, 2018

तहसिल कार्यालयाच्या वरिष्ठ लिपिकास लाच घेतांना रंगेहात अटक

तहसिल कार्यालयाच्या वरिष्ठ लिपिकास लाच घेतांना रंगेहात अटक

चंद्रपूर/प्रतिनिधी:
कागदपत्रांच्या त्रुटी पूर्ततेसाठी 1000 रुपयाची लाचेची मागणी करणाऱ्या चंद्रपूर येथील तहसिल कार्यालयातील एका वरिष्ठ लिपिक बुधवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग चंद्रपूर यांनी रंगेहात अटक केली हे.
 बंगाली कॅम्प येथील तक्रारदार याचे घर नगर परिषद चंद्रपूर येथे 2005 मध्ये नजूल जागेत होते रस्त्याच्या कामाकरिता नगरपरिषद चंद्रपूर यांनी सन 2008  मध्ये पडून टाकल्याने तक्रारदाराने राहण्याकरिता सिविल लाइन्स चंद्रपूर परिसरातील एक जागा स्थायी पट्ट्यावर मिळण्याकरिता सन 2010 मध्ये तहसिल कार्यालय चंद्रपूर येथे अर्ज केला होता .सदर प्रकरण तहसीलदार यांनी सही घेऊन मंजुरी करिता उपविभागीय कार्यालयास पाठविलें  आरोपी धनंजय वासुदेव येरणे 50 वर्षे वरिष्ठ लिपिक  कार्यालय चंद्रपूर यांनी तक्रार दाराकडे  फेरफाराची कामाकरिता दोन हजार रुपये लाचेची मागणी केल्याने तक्रारदाराने त्यांची विरुद्ध २४ जानेवारी २०१८  रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती या तक्रारीवरून ७ फरवरी २०१८  रोजी तहसिल कार्यालय चंद्रपूर येथे केलेल्या पडताळणी व सापळा कारवाई दरम्यान आरोपी धनंजय वसुदेव येरणे ५० वर्ष वरिष्ठ लिपिक याला तडजोडीचे १००० रुपये लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग चंद्रपूर यांनी  रंगेहात अटक केली. येरणे लाचेच्या सापड्यात सापडण्याची माहिती तहसील कार्यालयात पसरताच संपूर्ण तहसिल कार्यालय हादरून गेले होते. सर्वत्र चर्चेला उधाण आले होते. 
सदर कारवाई पोलीस उपायुक्त /पोलीस अधीक्षक श्री.पी.आर.पाटील ला.प्र.वि. नागपूर तसेच पोलीस उप अधीक्षक डी.एम. घुगे,  ला.प्र.वि.चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे व पुरुषोत्तम चौबे, अजय बागेसर, महेश मांढरे,भास्कर चिंचवलकर, मनोज पिदूरकर, ,राहुल ठाकरे  यांनी पार पडली. 





Sunday, January 07, 2018

गर्द पावडरसह १ आरोपी अटकेत

गर्द पावडरसह १ आरोपी अटकेत

नागपूर/प्रतिनिधी:
सीताबर्डी पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे व पोलिसांनी ५१३ ग्राम गर्द पावडर सह एकूण ५ लाख १३ हजाराचा मुद्देमाल शहर बस्थानाक नागपूर येथून जप्त केला  मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे या परिसरात एक इसम अमली पदार्थ विकत असल्याची माहिती मिळाली होती त्या आधारे सीताबर्डी पोलिसांनी एक संशयित ईसमाला  दोन पंचासमक्ष ताब्यात घेतले व आरोपीकडून  कडून ५ लाख १४ हजार ३४० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. पोलसांनी कारवाई करत एन.डी.पी.एस कायद्यानुसार गुन्हा दाखल केला.  सदरची कारवाई पोलीस आयुक्त के व्यंकटेशम यांच्या मार्गदर्शनाखाली सीताबर्डी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शाखेने पूर्ण केली.

Thursday, November 16, 2017

मनपा उपायुक्तांसह पीएने घेतले २० हजार

मनपा उपायुक्तांसह पीएने घेतले २० हजार


अकोला/प्रतिनिधी: बिअरशॉपीच्या परवाण्यासाठी २० हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या मनपा उपायुक्तांना स्वीयसहायकासह अटक करण्यात आली.

३० वर्षीय फिर्यादी यांचे हॉटेल आहे. त्यांनी बिअरशॉपीच्या शॉपॲक्टसाठी मनपाकडे अर्ज केला. या अर्जाच्या परवानगीसाठी मनपा उपायुक्त (प्रशासन व विकास) समाधान चांगो सोळंके यांच्याकडे आला. अर्जदाराला बुधवारी दुपारी समाधान सोळंके यांनी त्याच्या कक्षात बोलावून स्वीयसहायक राजेश रामदास जाधव (४३) यांच्यातर्फे २५ हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीनंतर २० हजार रुपये देण्याचे फिर्यादींनी ठरविले. स्वीयसहायक राजेश जाधव व त्याचे दोन साथीदार हे रात्री साडेआठ वाजता फिर्यादीच्या हॉटेलमध्ये जेवण करण्याकरिता व पैसे घेण्याकरिता गेले. फिर्यादीने त्यांना २० हजार रुपये दिल्याबरोबर दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने राजेश जाधव यास पैसे स्वीकारताना रंगेहाथ अटक केली. या अटकेनंतर त्याची चौकशी केल्यानंतर त्याने मनपा उपायुक्त समाधान सोळंके यांच्या सांगण्यावरून पैसे घेतल्याचे सांगितल्यानंतर एसीबीने सोळंके यांना रामनगरमधील म्हाडा कॉलनीतील बंगला नं. दहा मधून अटक केली. ही कारवाई अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक संजय गोरले यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. एसीबीकडून या दोघांनाही गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात येईल.