काव्यशिल्प Digital Media: अधिवेशन

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu
Showing posts with label अधिवेशन. Show all posts
Showing posts with label अधिवेशन. Show all posts

Wednesday, February 14, 2018

१८ फेब्रुवारीला महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्यस्तरीय अधिवेशन

१८ फेब्रुवारीला महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्यस्तरीय अधिवेशन

नागपूर/प्रतिनिधी:
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघांतर्फे १८ फेब्रुवारी रोजी रामस्मृती लाॅन्स, भोसरी - आळंदी रोड, भोसरी पुणे येथे १२ वे राज्यस्तरीय अधिवेशन २०१८ चे आयोजन करण्यात आले आहे. सदर अधिवेशन दोन सत्रात घेण्यात येणार असून या सत्रादरम्यान विविध कार्यक्रम व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. 
  राज्यस्तरीय अधिवेशनाचे उद्घाटन सकाळी १० वाजता जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांचे हस्ते होईल. स्वागताध्यक्ष म्हणून भोसरी विधानसभा क्षेत्राचे आ. महेश लांडगे राहतील. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी म. रा. मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष राजा माने राहतील. तर प्रमुख अतिथी म्हणून दुग्ध व पशुसंवर्धन मंत्री महादेव जाणकर, कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाउु खोत, म. रा. मराठी पत्रकार संघाचे संघटक संजयजी भोकरे, प्रदेश कार्याध्यक्ष वसंतराव मुंढे, प्रिंट व इल्ेक्आॅ्रनिक प्रमुख मुंबईचे रणवीर कांबळे, वृत्तवाहिनी विभाग प्रमुख मनिष केत यांची उपस्थिती राहणार आहे. १८ फेब्रुवारी रोजी पहिल्या सत्रात सकाळी ११. ३० वाजता ‘माध्यमांचे बदलते स्वरुप’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. यामध्ये जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे संपाद तुळशिदास भोईटे, मिर नाउु चे वरिष्ठ वृत्त संपादक मंदार फणसे, दैनिक जनशक्ती पुणेचे कार्यकारी संपादक पुरुषोत्तम सांगळे, दैनिक लोकमत पुणेचे संपादक विजय बाविस्कर यांची उपस्थिती राहतील. 
दुसरे सत्र दुपारी ३ ते ६ या कालावधीत पार पडेल. यावेळी स्वातंत्र सैनिक स्व. जवाहरलाल दर्डा जीवनगौरव राज्यस्तरीय पत्रकारित पुरस्काराचे आयोजन करण्यात आले असून दै. पुण्यनगरीचे समुह संस्थापक मुर्लीधर बाबा शिंगाटे यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यावेळी माजी खासदार लोकमत माध्यम समुह चेअरमन विजबाबू दर्डा यांच्या हस्ते पुरस्कार वितरीत करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एबीपी माझा चे मुख्य संपादक राजीवजी खांडेकर राहतील. यावेळी दिंडोरीचे चंद्रकांतदादा मोरे, कृ.उ.बास पुणे प्रशासक बी. जे. देशमुख यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यावेळी परिवहन राज्यमंत्री दिवाकर राते, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. या सोहळ्याचे प्रमुख पाहूणे म्हणून जलसंपदा व जलसंधारण राज्यमंत्री विजय शितारे, विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषद उउपसभापती माणिकराव ठाकरे, चिंचवड विधानसभा आ. लक्ष्मण जगताप, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, खा शिवाजीराव पाटील, खा. अमर साबळे, खा. श्रीरंग बारणे, आ. गौतम चाबुकस्वार, दै. जनशक्तीचे संपादक कुंदन ढाके आदी उपस्थित राहणार आहेत. 
सदर १२ व्या राज्यस्तरीय अधिवेशनाला तसेच आयोजित चर्चासत्र व कार्यक्रमाला बहूसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन म. रा. मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष राजा माने, संघटक संजय भोकरे, प्रदेश सरचिटणीस विश्वासराव आरोटे, प्रदेश उपाध्यक्ष सोमनाथ देशकर, प्रदेश प्रसिद्धी प्रमुख नवनाथ जाधव, प्रदेश संपर्क प्रमुख अॅड. हर्षल कुमार चिपळूणकर, नितीन शिंदे, परभणी जिल्हाध्यक्ष प्रकाश साळवे, वृत्त वाहिनी जिल्हाध्यक्ष विजयकुमार कुलदिपके यांनी केले आहे