काव्यशिल्प Digital Media: गडचिरोली

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu
Showing posts with label गडचिरोली. Show all posts
Showing posts with label गडचिरोली. Show all posts

Thursday, January 31, 2019

राष्ट्रपती श्री. रामनाथ कोविंद गडचिरोलीत

राष्ट्रपती श्री. रामनाथ कोविंद गडचिरोलीत

चार्मोशी येथे दौरा असल्याची प्रशासकीय माहिती 

चामोर्शी तालुका मुख्यालयापासून जवळच असलेल्या वैनगंगा नदीवर चिचडोह बॅरेजचे बांधकाम पूर्णत्वास आले आहे. या बॅरेजचे काँक्रिट बांधकाम व दरवाज्यांच्या उभारणीचे काम झाले आहे. सदर प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा राष्ट्रपती श्री. रामनाथ कोविंद यांच्या हस्ते होत आहे. त्यासाठी ते 6 फेब्रुवारी 2019 रोजी गडचिरोली जिल्हयातील चार्मोशी दौरावर येत आहेत.

Wednesday, January 30, 2019

न्याय मागण्यासाठी नागेपलीत उपोषण

न्याय मागण्यासाठी नागेपलीत उपोषण

जिल्हाधिक्कारी कार्यालयासमोर आमरण उपोषण

अहेरी/ प्रतिप्रतिनिधी

नागेपल्ली येथील सर्व्ह न.84 मधील रहिवासी यांचे वास्तव्यास असलेले घर उध्वस्त केल्यामुळे न्याय मागण्यांसाठी 40 महिलां मुलाबाळा सह अहेरी येथीलअप्परजिल्हाधिकारी कार्यालया समोर  आज पासून आमरण उपोषनास बसले  आहेत.


निवेदनात त्यांनी म्हटले आहेकी,

अहेरी तालुक्यातील येतअसलेल्या आलापल्ली साजा क्र.5अंतर्गत येत असलेल्या नागेपल्ली येथील सर्व्हे न.84मधील क्षेत्र1.21आर  ह्या शासकीय जमिनीवर आम्ही 70/80 परिवार घरे बांधून राहत असतांना मात्र, सदर जागेवर आलापल्ली येथील एका  धनाढ्य तथा कथित सामाजिक कार्यकर्ता म्हणून समजल्या जाणाऱ्या व्यक्तीची नजर असल्याने त्यांनी अधिकारी व राजकीय लोकांशी संगनमत करून  त्यांना हाताशी धरून आम्हाला त्रास देने सुरू केले आहे.

दि.26 डिसेंबर रोजी तहसीलदार यांनी पोलीस फोउजफाटा सोबत घेऊन अतिक्रमण धारकांना कोणतीही पूर्वसूचना न देता लोकांना धाक दडप करून घरे पाडू लागले त्याचा आम्ही प्रतिकार केला त्यामुळे त्याच दिवशी आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले त्यापैकी काही लोकांना अटक सुद्धा करण्यात आली . 

त्याचप्रमाणे 23 जानेवारी रोजी रात्रौ11:45 च्या दरम्यान काही तहसिलदार यांनी काही लोकांना सोबत घेत झोपेत असललेल्यानं उठवत काही घरांना आग लावली याबाबत ची तक्रार देऊनही कोणतीही कारवाई झाली नाही.

आम्ही सदर ठिकाणी शांततापूर्वक निवास करीत असताना 28 जानेवारी रोजी उपविभागीय अधिक्कारी अहेरी यांनी कलम144 लावून आमचे घरे जबरदस्तीने तोडले आणि या ठिकाणी कोणी पाऊल ठेवले तर गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली आहे.

त्यामुळे अश्या परिस्थितीत आमचे जीवन जगणे कठीण झाले आहे.आमच्यावर झालेल्या अन्याया संदर्भात अप्परजिल्हाधिकारी कार्यालयासमोर 30 जानेवारी पासून आमरण उपोषणाला बसत आहोत या प्रकरणाची योग्य चौकशी करून आम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही न्याय मार्गाने उपोषण साठी बसत आहोत.

गडचिरोलीत नक्षलवाद्यांची वनमजुरांना जबर मारहाण

गडचिरोलीत नक्षलवाद्यांची वनमजुरांना जबर मारहाण

ललित लांजेवार/

गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी वनविकास महामंडळाच्या वनात काम करणाऱ्या पाच वनमजुरांना जबर मारहाण केली आहे,  मार्कंडा प्रकल्प अंतर्गत येत असलेल्या वनपरिक्षेत्रातील कक्ष क्रमांक 89,90,91 मध्ये ही मारहाण करण्यात आली असल्याची माहिती आहे. यातील काही वन मजुरांवर अहेरी उपजिल्हा रुग्णालय येथे उपचार करण्यात असून दोन वनमजुरांवर चंद्रपूर येथे पाठवण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे.नक्षल्यांनी या क्षेत्रातील  बाम्बूचे काम करणाऱ्या इतर 60 ,70 रोजगारना काम न करण्याची दिली धमकी दिली,  नक्षलवाद्यांनी दिलेल्या धमकीमुळे वनमजुरांना व त्यांच्या परीवाराला धोका निर्माण झाला असून या परिसरातील नागरिक तसेच इतर वनमजुर भयभीत झाले आहेत.

Sunday, January 27, 2019

एक दिवसीय गडचिरोली बंद

एक दिवसीय गडचिरोली बंद

गडचिरोली 

 देशात ढोरांची , गुरांची कुत्र्याची गणना होतो परंतु ओबीसी समाजाची नाही आणि गणना नसल्याने ओबीसी समाजाला आरक्षण नाही रोजगार नाही आणि या मुळे सामाजिक , शैक्षणिक स्तिथी कमकुवत होत आहे. मनुनच आता पाळी आली आहे एकत्र होण्याची आपल्या ओबीसी समाजाच्या मागण्या करिता , तुमच्या आमच्या हक्काकरिता , आपल्या अस्तित्वा करिता एक दिवशीय गडचिरोली बंद करण्याचा आवाहन करण्यात आलेले आहे तरीही समस्त शहरवासीयांनी , समाज बांधवानी , बेरोजगार युवकांनी या बंद ला सहभागीं होऊन आपल्या अधिकारासाठी एकजूट व्हावी ही विनंती
🚩कुठल्याही पक्षात असाल पण ओबीसी समाजाचा घटक मनुन आपल्या हक्काकरिता , येणाऱ्या पिढीसाठी तुमच्या आमच्या अस्तित्वासाठी सहभागी होण्याचे आव्हाहन करण्यात आले आहे.


  • दिनांक :- २८ जानेवारीत २०१९
  • सकाळी ठीक ८ वाजता
  • स्थळ :- इंदिरा गांधी चौकातील राजीव गांधी सभागृह
  • अधिक माहिती करिता संपर्क साधावा
  • 8408040344 ,9403676967

Tuesday, January 22, 2019

गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी केली तीन गावकऱ्यांची हत्या

गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी केली तीन गावकऱ्यांची हत्या

  खबरी असल्याचा संशयावरून
 नक्षल्यांनी केली तिघांची हत्या 
गडचिरोली/प्रतिनिधी:


भामरागड तालुक्यातील आलापल्ली मुख्य मार्गावरील कोसफुंडी फाट्याजवळ मंगळवारी सकाळी तीन मृतदेह आढळले. आजूबाजूला बघितले असता नक्षलवाद्यांचे बॅनर सुद्धा आढळून आल्याने खबरी असल्याच्या संशयावरुन नक्षलवाद्यांनी या तिघांची हत्या केल्याचे समजते आहे या घटनेमुळे परिसरात सर्वत्र खळबळ माजली असून गावकरी भयभीत झालेले आहे 

मालू दोघे मडावी,कन्ना रेणू मडावी,लालसू मासा कुळयेटी या हत्या करण्यात आलेल्यांची नावे आहेत
एप्रिल 2018 मध्ये कसनासूर-तुमीरगुंडा येथे पोलिस व नक्षलवादी मोठी चकमक झाली होती यात पोलिसांनी चाळीस नक्षलवाद्यांचा खात्मा केला होता ही सर्वात मोठी कारवाई 2018 मध्ये करण्यात आली होती याच घटनेची खबरी असल्याच्या संशयावरून यांची हत्या करण्यात आल्याचे समजते आहे.
परिसरात लावण्यात आलेल्या बॅनरमध्ये दक्षिण गडचिरोली डिव्हिजन कमिटी असे लिहिले आहे.


Tuesday, January 08, 2019

43 नक्षलवादी व समर्थकांना अटक, 19 नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

43 नक्षलवादी व समर्थकांना अटक, 19 नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण



नागपूर, ता. 8 - गडचिरोली जिल्ह्यासह चंद्रपूर व गोंदिया जिल्ह्यात पसरलेला नक्षलवाद संपृष्ठात आणण्यासाठी पोलिसांच्या प्रयत्नांना यंदाच्या वर्षात अभुतपुर्व यश प्राप्त झाले. नुकत्याच संपलेल्या 2018 या वर्षात पोलिसांनी केलेल्या उत्तम कामगिरीच्या बळावर वर्षभरात 50 नक्षल्यांना कंठस्नान घालण्यात यश आले. तर 43 नक्षलवादी व समर्थकांना अटक करण्यात आली आहे. तसेच 19 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पणाचा मार्ग स्विकारल्यामुळे नक्षल चळवळीला मोठा हादरा बसला असून यंदाच्या वर्षात पोलीसच नक्षलवाद्यांवर वरचढ ठरले आहेत.

देशाच्या अंतर्गत सुरक्षेला मोठे आव्हान असलेली नक्षल चळवळ महाराष्ट्रात 1980 च्या दशकात सुरू झाली. तत्कालीन आंध्रप्रदेश (सध्याचा तेलंगणा) मधून या चळवळीने तेव्हा चंद्रपूर जिल्ह्याचा भाग असलेल्या सिरोंचा या भागात सर्वप्रथम प्रवेश केला. सुरुवातीला राज्याच्या गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, भंडारा, यवतमाळ आणि नांदेड या सहा जिल्ह्यात कार्यरत असलेला नक्षलवाद हा आता केवळ गडचिरोली जिल्हा तसेच गोंदिया जिल्ह्यातील काही तालुक्यापुरताच मर्यादीत राहिला आहे. नक्षलग्रस्त भागासाठी प्रशासनामार्फत राबविण्यात येणा-या लोककल्याणकारी व विकासाच्या विविध योजनांमुळे तसेच पोलिसांचा दुर्गम भागातील ग्रामस्थांशी वाढलेला जनसंपर्क व संवादामुळे शासनाच्या विकासाला जनतेचा मोठ्या प्रमाणावर पाठींबा मिळू लागला आहे. पोलिसांच्या यशस्वी विशेष रणनितीमुळे 2018 या वर्षात नक्षली चळवळीला मोठ्या प्रमाणावर हादरा बसून नक्षल चळवळीची प्रचंड मोठी हानी झाली आहे. नक्षल्यांबरोबरीच्या लढाईत पोलिसांनी उत्तम कामगिरी राहिली.

2018 या वर्षात एकूण 50 नक्षल्यांना कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश मिळाले. यंदाच्या वर्षात केवळ एका महिण्यात 44 नक्षलवादी, तर एकाच चकमकीमध्ये एकूण 40 नक्षलवादी ठार करण्यात फार मोठे यश प्राप्त झाले. पोलिसांनी 43 नक्षलवादी व त्यांच्या समर्थकांना अटक करण्यातही यश मिळविले असून 19 नक्षल्यांनी आत्मसमर्पणाचा मार्ग स्विकारला. त्यामुळे नक्षल चळवळीला मोठा फटका बसला. 80 गावांनी गावबंदी ठराव करून नक्षल्यांना गावाबाहेरच रोखल्यामुळे नक्षल्यांचा जनाधार ओसरला. या वर्षात मोठ्या प्रमाणावर नक्षली मारले गेल्यामुळे नक्षल्यांचे संख्याबळही कमी झाले आहे. एकीकडे शासनाच्या आत्मसमर्पण योजनेचा लाभ घेऊन अनेक नक्षलवादी समाजाच्या मुख्य प्रवाहात प्रवेश करीत असल्यामुळे नक्षल्यांना त्यांचे उर्वरीत संख्याबळही टिकवून ठेवणे कठीण झाले आहे. नक्षलग्रस्त व दुर्गम भागातील स्थानिक जनतेने नक्षल्यांना गावबंदी करून शासनाच्या विकासाला पाठींबा दिला आहे. त्यामुळे नक्षल भरतीसाठी तरूण मिळत नसल्याने नक्षल्यांची चळवळ कमकुवत झाली आहे. स्वतःचे अस्तित्व संपण्याच्या भितीमुळेच नक्षली सध्या भ्याड हल्ला करून निरापराध सामान्य नागरीकांचे बळी घेऊन दहशत माजविण्याचा प्रयत्न करीत आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये स्थानिक गावक-यांनी नक्षली बॅनर, नक्षल नेत्यांचे पुतळे जाळल्याने, तसेच नक्षल स्मारक तोडल्यामुळे उरलेला जनाधारही नक्षल्यांचा कमी झालेला आहे. त्यातच पोलिसांनी चहुबाजुने केलेल्या नाकेबंदीमुळे नक्षलवादी सध्या बॅकफुटवर येऊन हतबल झालेले आहेत.




गडचिरोली पोलीस दलातील शूर जवानांचे अभुतपुर्व यश -
शरद शेलार, विशेष पोलिस महानिरीक्षक, नविअ, म.रा. नागपूर

हिंसेचे समर्थन करणा-या नक्षलवाद्यांना प्रतिउत्तर देऊन गडचिरोली पोलीस दलातील शूर जवानांनी सरलेल्या वर्षात अभुतपुर्व असे यश प्राप्त केले आहे. या हिंसक प्रवाहात भरकटलेल्या नक्षलवाद्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्व स्तरावरून प्रयत्न सुरू असून नुकतेच शरण आलेले सात जहाल नक्षलवादी, हे त्याचीच परिणिती आहे, अशी प्रतिक्रिया नक्षल विरोधी अभियानाचे प्रमुख तथा विशेष पोलिस महानिरीक्षक शरद शेलार यांनी दिली.

Wednesday, November 21, 2018

कालेश्वर गोदावरी नदीत तिघांना जलसमाधी

कालेश्वर गोदावरी नदीत तिघांना जलसमाधी


सिरोंचा/प्रतिनिधी 
कालेश्वर येथील गोदावरी नदीत तीघांचा बुडून मृत्यू झाला. तिघेही चंद्रपूर जिल्ह्यातील रहीवासी असून, त्यातील एक पोलीस स्टेशनचा कर्मचारी असल्याचे समजते. मृतकामध्ये अनिल कुळमेथे वय २८ वर्षे,महेंद्र पोरते वय २३ वर्षे, रोहित कडते वय २१ वर्षे, तिघेही राह. चिंतलधाबा तह. पोंभुर्णा येथील आहेत. अनिल कुळमेथे हा वरोरा पोलिस ठाण्यात कार्यरत होता. शोध मोहीम सुरू असून अद्यापही पत्ता लागलेला नाही.
आज सकाळी ८ वाजता ढाबा मार्गे एकूण ९ जण कालेश्वर दर्शनांसाठी गेले होते. त्यानंतर दुपारी ३ वाजता नदीत अंघोळ करण्यासाठी गेले त्यावेळेस हे तिघेही पाण्याच्या तेज प्रवाहात आल्याने बुडाले, बाकीचे यातून कसेबसे निघून किनाऱ्यावर आले त्यानंतर घटनेची माहिती झाली.

Tuesday, August 21, 2018

पुराच्या पाण्यात सापडले २५ प्रवासी;अखेर कशीबशी झाली सुटका

पुराच्या पाण्यात सापडले २५ प्रवासी;अखेर कशीबशी झाली सुटका

The bus collided in flood, Fortunately saved the passengers safely | पुराच्या पाण्यात कोसळली बस, प्रवाशांना सुखरुप वाचविण्यात यशगडचिरोली/प्रतिनिधी:
मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात सर्व नदी-नाल्यांनापूर आला असताना एका अरुंद पुलावरून एसटी महामंडळाची एशियाड बस नाल्याच्या पाण्यात कोसळली. गावकऱ्यांच्या तत्परतेने या बसमधील सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. आलापल्ली-जिमलगट्टा मार्गावरील नंदीगावजवळच्या जिमेला नाल्यावर सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

आलापल्लीपासून १५ किलोमीटर अंतरावर असलेला नंदीगावनजीकचा नालाही ओसंडून वाहत होता,सोमवारी गडचिरोली आगारातून गडचिरोली आगाराची एमएच १४- बीटी ५०६५ क्रमांकाची एशियाड हिरकणी ही बस हैदराबादला गेली होती. आज सकाळी हैदराबाद येथून निघालेली ही बस सिरोंचामार्गे गडचिरोलीकडे येण्यास निघाली. दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास नंदीगाव येथील नाल्याच्या काठावर बस पोहचली. त्यावेळी पुलावर पाणी नव्हते. मात्र, नाल्यावरुन बस पार करीत असताना सुरुवातीलाच एका खड्ड्यात बसचे चाक अडकले. चालकाने बस पुढे नेण्याचा प्रयत्न केला. परंतु बस पुढे जात नव्हती एवढ्यात पाण्याचा प्रवाह वेगाने वाढला. त्यामुळे चालक व वाहकाने प्रसंगावधान गावकर्यांच्या मदतीने प्रवाशांना बाहेर काढण्यात आले .नंदीगावच्या लोकांनी धावपळ करुन लांब दोरखंड आणि ट्रॅक्टरची व्यवस्था केली. यावेळी दोन्ही काठांवर नागरिक उभे होते. काही वाहनेही थांबली होती. नागरिकांनी प्रवाशांना सुरक्षितरित्या बाहेर काढले. मात्र, अचानक प्रवाह वाढल्याने बस पुरात वाहून गेली. समोर झाड असल्याने हि बस या झाडाला अडकली. बसमध्ये तब्बल २५ प्रवासी होते, अशी प्राथमिक माहिती आहे.दोन दिवसानंतर या अडकलेल्या बस चा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याने हा प्रकार सर्वांसमोर आला.






Friday, July 27, 2018

वडीलाने मुलाची काढली जिवंतपणी अंतयात्रा

वडीलाने मुलाची काढली जिवंतपणी अंतयात्रा

गडचिरोली/प्रतिनिधी: 
वडीलानेच आपल्या मुलाची जिवंतपणी च अंतयात्रा काढल्याची घटना शुक्रवारी गडचिरोलीतील रेगडीगुट्टा येथे घडली. आपल्या मुलाने नक्षल चळवळीत सहभागी आहे आणि त्याने अनेक निष्पाप लोकांचा बळी घेतला. त्याच्या या कृत्यामुळे तो नक्षल चळवळीत असेपर्यंत आमच्यासाठी मेला आहे, असे सांगत नक्षल कमांडर महेश उर्फ शिवाजी रावजी गोटा या नक्षल कमांडरच्या वडिलांनी शुक्रवारी येथे त्याची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढली. यात शेकडो लोक सहभागी झाले होते.
२८ पासून सुरू होत असलेल्या नक्षलींच्या शहीद सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर एटापल्ली उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या वतीने २५ ते २७ दरम्यान जनमैत्री मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यात सहभागी नागरिकांनी नक्षलवाद्यांमुळे नाहक त्रास होत असल्याची भावना व्यक्त केली. त्यामुळे रेगडीगुट्टा येथील रहिवासी असलेले नक्षल कमांडर महेशचे वडील रावजी गोटा यांनी मुलाच्या कृत्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी त्याचा पुतळा तयार करून प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढली.
ही अंत्ययात्रा महसूल मंडळ कार्यालयापासून मुख्य मार्गाने निघून शिवाजी चौकात पोहोचली. तिथे नक्षल कमांडर महेश आणि नक्षल डिव्हीजन कमांडर जोगन्ना उर्फ घिसू उर्फ चिमला उर्फ नरसय्या लिंगय्या रा. करीमनगर यांच्या प्रतीकात्मक पुतळ्यांचे दहन करण्यात आले. यावेळी उपस्थित नागरिकांनी नक्षलवाद मुर्दाबाद, लोकशाही जिंदाबाद अशा घोषणाही दिल्या. मुलगा महेश याने नक्षल चळवळीतून बाहेर येऊन आत्मसमर्पण करावे आणि सामान्य जीवन जगावे, अशी भावना त्याचे वडील रावजी गोटा यांनी व्यक्त केली. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सचिन जगताप व एटापल्ली ठाण्याच्या पथकाने चोख बंदोबस्त ठेवला होता.




Wednesday, June 27, 2018

तंबाखू दिला नाही म्हणून नातवाने केला आजोबाचा खून

तंबाखू दिला नाही म्हणून नातवाने केला आजोबाचा खून

गडचिरोली/प्रतिनिधी:
  तंबाखू न दिल्यानं नातवानं आजोबाची हत्या केल्याची संतापजनक घटना गडचिरोली जिल्ह्यातल्या सिरोंचा तालुक्यात घडली आहे. सोमनपल्ली गावात नातवानं तंबाखू देण्यास नकार दिल्यानं आजोबाची कुऱ्हाडीनं वार करत निर्घृण हत्या केली.
राजम तलांडी असं आजोबाचं नाव आहे. आरोपी नातू सुभाष तलांडी याला पोलिसांनी अटक केली आहे. गडचिरोलीत तंबाखू सेवनाबाबत वेळोवेळी जनजागृती करण्यात येतीये. डॉ. अभय बंग यांच्या नेतृत्वात व्यसनमुक्तीसाठी अभियानही राबवले जातात. मात्र तहीही व्यसनाचं प्रमाण काही कमी होत नाही आहे.तलांडी कुटुंबातील २७ वर्षीय मुलाने आपल्या ७० वर्षाच्या राजम तलांडी नामक आजोबाची निर्घृण हत्या केली. केवळ तंबाखू सेवनाची सवय असलेल्या नातवाने आजोबांकडे त्याची मागणी केली. आजोबाने ती नाकारली. रागाने पिसळलेल्या आरोपी नातवाने घरातून कुऱ्हाड आणून आजोबावर वार केले. आणि त्यांचा जीव घेतला.
गडचिरोली जिल्हा तंबाखू आणि खर्रा या २ व्यसनांच्या विळख्यात अडकला असल्याची माहिती विविध सर्वेक्षणाच्या माध्यमातून पुढे आली होती. मुखाचा आणि इतर कर्करोगाचे जिल्ह्यातील वाढते प्रमाण नेमके हेच दर्शवीत होते. आपल्या आसपासच्या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी काम करणा-या धानोरा तालुक्यातील डॉ. बंग दाम्पत्याच्या शोधग्राम प्रकल्पात याची सविस्तर नोंद घेण्यात आली. आणि येथेच तंबाखूजन्य पदार्थांच्या व्यसनातून जिल्ह्याला मुक्त करण्यासाठी 'मुक्तिपथ' अभियानाची मुहूर्तमेढ रोवली गेली.मुक्तिपथच्या सामाजिक आणि आरोग्यविषयक सर्वेक्षणात जिल्ह्यातील लाखो नागरिक तंबाखूच्या विळख्यात अडकले असल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले. 'खर्रा' हा या भागात सुपारीत चुना-सुगंधित तंबाखू मिसळून घोटून तयार केला जाणारा लोकप्रिय पदार्थ.
पण अशा या व्यसनातून तर नात्यांचा जीव घेतला जाणार असेल तर अशी व्यसनं काय कामाची हे सर्वसामान्यांना समजणं गरजेचं. दरम्यान या सगळ्या प्रकारामुळे परिसरात खळबळ माजली आहे.

Saturday, June 02, 2018

वडसा-देसाईगंज-गडचिरोली रेल्वे मार्गाचे काम गतिमान करावे

वडसा-देसाईगंज-गडचिरोली रेल्वे मार्गाचे काम गतिमान करावे

मुंबई/प्रतिनिधी:
वडसा – देसाईगंज – गडचिरोली रेल्वे मार्गाच्या निर्मितीसाठी आवश्यक भूसंपादन करणे, वन विभागाचे आवश्यक परवाने मिळविणे, वन्यजीवांच्या संरक्षणासाठी आवश्यक उपाययोजना करणे आदी कामांना गती देऊन प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर करण्यात यावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज संबंधित विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना दिले.
सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे आज या प्रकल्पासंदर्भात उच्चस्तरीय बैठक झाली. बैठकीत या प्रकल्पासंदर्भात येणाऱ्या विविध अडचणींबाबत चर्चा करण्यात आली. बैठकीस केंद्रीय मंत्री श्री.गडकरी यांच्यासह महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवर, आदिवासी विकास राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव अत्राम, खासदार अशोक नेते, दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सोनवीर सिंह, रेल्वेचे मुख्य अभियंता विरेद्र तिवारी, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रविण परदेशी, वन विभागाचे सचिव विकास खारगे, परिवहन विभागाचे प्रभारी सचिव श्रीकांत सिंह, गडचिरोली जिल्हाधिकारी शेखर सिंह आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले की, गडचिरोलीच्या विकासाच्या दृष्टीने वडसा – देसाईगंज – गडचिरोली हा ५२.३६ किमी लांबीचा रेल्वे प्रकल्प फार महत्वाचा आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून तेथे परिवहनाची सोय उपलब्ध होऊन त्यायोगे परिसराच्या विकासाला गती प्राप्त होऊ शकेल. त्यादृष्टीने एक महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणून केंद्र आणि राज्य शासनाने हा प्रकल्प हाती घेतला आहे. त्यास सर्व पातळ्यांवर गती देण्यात यावी, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
प्रकल्पासाठी साधारण ८३ हेक्टर इतकी वन जमीन संपादित करावी लागणार आहे. राज्यात मागील चार वर्षात वृक्षारोपणाला मोठ्या प्रमाणात गती देण्यात आली असून राज्याचे वृक्षाच्छादनाचे क्षेत्रही वाढले आहे. शिवाय केंद्र शासनानेही विकासाच्या बाबतीत गडचिरोली जिल्हा हा विशेष जिल्हा म्हणून हाती घेतला आहे. या बाबी लक्षात घेऊन वनजमिनीच्या संपादनासाठी संमती घेण्यात यावी, अशा सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. इतर जमिनीचे भूसंपादन जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने सुरु करावे, अशी सूचना त्यांनी गडचिरोली जिल्हाधिकाऱ्यांना दिली.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, हा प्रकल्प पूर्व विदर्भाच्या विकासाला गतीमान करणारा महत्वाचा प्रकल्प ठरेल. प्रकल्पाचे महत्व लक्षात घेता राज्य शासनानेही यासाठी भरीव आर्थिक तरतूद उपलब्ध करुन दिली आहे. वन विभागाच्या तसेच संबंधित इतर विभागांच्या परवानग्या जलद गतीने घेऊन प्रकल्पाचे काम कालनिर्धारीत करुन गतिमान करण्यात यावे. यासाठी केंद्र स्तरावर आपण व्यक्तिश: पाठपुरावा करु, असे ते म्हणाले.
वित्त आणि नियोजन तथा वने मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, या प्रकल्पाचे महत्व लक्षात घेऊन राज्य शासनाने मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देऊन प्रकल्पासाठी ५० टक्के इतक्या भरीव निधीची उपलब्धता करुन दिली आहे. राज्यात मागील चार वर्षात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले असून त्याचा परिणाम म्हणून राज्याचे वृक्षाच्छादन क्षेत्र वाढले आहे. गडचिरोली रेल्वे प्रकल्पासाठी वन क्षेत्रासंदर्भातील मान्यता घेताना ही बाब केंद्र शासनाच्या निदर्शनास आणून देण्यात येईल. वन्य जीव रक्षणाच्या दृष्टीने आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येतील. या सर्व बाबींचा अंतर्भाव करुन वन विभागाच्या संमतीसाठी तसा प्रस्ताव तातडीने केंद्रीय वन मंत्र्यांकडे पाठविण्यात येईल, असे ते म्हणाले.
जाहिरात...
भारतात पहिल्यांदा जागतिक पातळीवरील एक अग्रगण्य कंपनी घेऊन आली, कुक्कुट पालन ,मत्स्य पालन,शेळी पालन,दुध डेअरी यासारख्या संपूर्ण व्यवसायासाठी लागणारे संपूर्ण प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळणार अगदी निशुल्क, याच सोबत पशुखाद्य,पिल्ले,औषधी, या सारख्या संपूर्ण goods अतिशय अल्प दरात उपलब्ध ...त्यासाठी संपर्क करा:9175937925 या क्रमांकावर (घरपोच सेवा उपलब्ध).
Gas safety device.
आपके एल.पी.जी गॅस सिलेंडर कि सुरक्षा अब आपके हात 
"सुरक्षित नारी सुरक्षित परिवार"
क्या आप अपने हि घर मे सुरक्षित है ?
दुर्घटना होणे से पहिले सावधानी बरते !
समय कभी बताकर नाही आता....तो इंतजार कीस बात का...
तुरंत मिलीये ..कही देर ना हो जाए !
*कल करेसो आज कर ,आज करे सो अब *
पल मे प्रलय हो जायेगा तो करेंगा कब !
जीवन अनमोल है!और आपका परिवार .........?
विशेषताए...
* सूक्ष्म गॅस लिकेज का परीक्षण.  
* गॅस का परिपूर्ण उपयोय एव गॅस के प्रमाण कि जानकारी गॅस कि बचत अर्थात पैसो की बचत
* किसी कारण होणे वाले गॅस लिकेजपर यह डीवाईस सप्लाई बंद कर देता है. 
आपकी सेफ्टी हि पुरे परीवार कि लाईफ सेफ्टी है..
जो अपने परीवारसे करते है प्यारवह गॅस सुरक्षा यंत्र से कैसे करेंगे इन्कार
तो फिर जल्दी ,आये जल्दी  पाये
संपर्क करे:9175937925,9021527117 
कृपया दिये गये लिंक ओपन करे :  https://youtu.be/IaXlvfNtkpo


Wednesday, May 23, 2018

नक्षलग्रस्‍त भागात मोबाईल टॉवरची क्षमतावाढ करा

नक्षलग्रस्‍त भागात मोबाईल टॉवरची क्षमतावाढ करा

  • विदर्भ-तेलंगणा सीमेवर होणारी पशुधन तस्‍करी रोखण्‍यासाठी 
  • केंद्रीय गृहराज्‍यमंत्री श्री. हंसराज अहीर यांची पोलिस विभागासोबत आढावा बैठक 



नागपूर, दिनांक 23 मे 2018
विदर्भामधील चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली या जिल्‍हयांना लागून असणा-या तेलंगाणा राज्‍याच्‍या सीमेमधून मोठया प्रमाणात गोवंशतस्‍करी होत असून, ती रोखण्‍यासाठी नागपूर व अमरावती विभागाच्‍या पोलिस महानिरिक्षक व संबंधित विभागातील पोलिस अधिक्षकांची बैठक घेऊन त्‍यांना कडक कार्यवाही करण्‍याचे निर्देश आपण दिले असल्‍याचे केंद्रीय गृहराज्यमंत्री श्री. हंसराज अहीर यांनी आज नागपूर येथे सांगितले. स्‍थानिक रवी भवनमध्‍ये महाराष्‍ट्रातील पशुतस्‍करी रोखण्‍यासंदर्भात कार्यवाहीची आढावा बैठक व गडचिरोलीच्‍या नक्षलग्रस्‍त भागात मोबाईल नेटवर्कसंबंधीची आढावा बैठक घेतल्‍यानंतर प्रसारमाध्‍यमांच्‍या प्रतिनिधीशी संवाद साधतांना ते बोलत होते. या आढावा बैठकीदरम्‍यान गडचिरोलीचे खासदार श्री. अशोक नेते, नागपूरचे पोलिस आयुक्‍त डॉ. व्‍यंकटेशम्, नक्षलविरोधी अभियान विभागाचे पोलिस महानिरिक्षक श्री. शरद शेलार, सी.आर.पी.एफ. चे उप महानिरिक्षक श्री. शेखर, बी.एस.एन.एल. च्‍या मोबाईल नेटवर्किंग विभागाच्‍या महाव्‍यवस्‍थापिका श्रीमती नम्रता तिवारी, नागपूर सहपोलीस आयुक्त श्री. शिवाजी बोडखे, नागपूर ग्रामीण विभागाचे पोलिस अधिक्षक श्री. शैलेश बलकवडे तसेच नागपूर परिमंडळातील पोलिस उपआयुक्‍त व सबंधित जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक व आर्णीचे आमदार श्री. राजु तोडसाम उपस्थित होते.




तेलंगाणामध्‍ये विदर्भ, पश्चिम महाराष्‍ट्र, मध्‍यप्रदेश तसेच खान्देश मधून होणारी पशुधन तस्‍करी रोखण्‍यासाठी पोलिस विभागाला स्‍थानिक वाहतूक विभागाकडून मदत मिळावी, यासाठी आपण सूचना दिल्‍या आहेत. गडचिरोली मधील नक्षलग्रस्‍त भागात मोबाईल नेटवर्कच्‍या क्षमता वाढीसाठी त्‍याचे 4 जी तंत्रज्ञानामध्‍ये अद्यावतीकरण, टॉवर्सची उंची वाढवणे इत्‍यादी संदर्भात आपण बी.एस.एन.एल.च्‍या अधिका-यांना निर्देश दिले आहेत. गडचिरोलीच्या ज्‍या क्षेत्रामध्‍ये टॉवर्स लावण्‍यासाठी अडचणी येत होत्‍या त्‍यादेखील पोलिस यंत्रणेने दूर केल्‍या आहेत. त्यामुळे या परिसरात राहणा-या पोलिस जवान, केंद्रीय राखीव पोलिस दलाचे जवान यांना चांगली मोबाईल नेटवर्कची सुविधा यामुळे उपलब्‍ध होईल, अशी माहिती श्री. अहीर यांनी यावेळी दिली.




आढावा बैठकीमध्‍ये नागपूर- अमरावती विभागातील वरिष्‍ठ पोलिस अधिकारी, बी.एस.एन.एल.चे वरिष्‍ठ अधिकारी उपस्थित होते.

Monday, May 14, 2018

वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली निवडणुकीत एकजूट आणि निष्ठेने काम करा

वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली निवडणुकीत एकजूट आणि निष्ठेने काम करा

नागपूर/प्रतिनिधी:
वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या तीन जिल्ह्यांतील विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाची निवडणूक २१ मे रोजी होणार आहे,या पार्श्वभूमीवर केंद्रीय रस्ते,परिवहनमंत्री नितीन गडकरी,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,अर्थमंत्री सुधीर सुधीर मुनगंटीवार यांनी पक्षाची  संघटनात्मक बैठक घेत पदाधिकार्यांशी चर्चा केली.
वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली या तीन जिल्ह्यांतील विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी भाजपने प्रदेश महासचिव डॉ. रामदास आंबटकर यांना उमेदवारी दिली आहे. २१ मे रोजी निवडणूक होत असून  या  निवडणूकिला आता रंग चढू लागला आहे. सध्या ही जागा भाजपच्याच ताब्यात असल्याने त्यांच्यासाठी ही  निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे.
 या पार्श्‍वभूमीवर रविवारी रामदासपेठेतील हॉटेल सेंटर पॉइंटमध्ये केंद्रीय रस्ते, परिवहनमंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या तिन्ही जिल्ह्यांतील नगरसेवक, जि. प. सदस्यांची बैठक घेतली. या बैठकीत आमदारही उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री गडकरी यांनी यावेळी सर्वच नगरसेवक, जि. प. सदस्यांना कुठल्याही स्थितीत ही निवडणूक जिंकायची असून निष्ठेने कामाला लागण्याचा सल्ला दिला. या निवडणुकीत विजयासाठी मतदारांचे पाहिजे तितके  संख्याबळ भाजपकडे आहे. मात्र, या तिन्ही जिल्ह्यांतील भाजपच्या ताब्यातील नगरपालिका, महानगरपालिकेच्या हद्दीत अनेक विकासकामे थेट सार्वजनिक बांधकाम खात्याकडून होत असल्याने नगरसेवकांत नाराजीचा सूर बघायला मिळाला. या नाराज नगरसेवकांकडून धोका भेटण्याची शक्‍यता लक्षात घेता बैठकीत त्यांना समज देण्यात आल्याचे सूत्राचे म्हणणे आहे . केंद्रीय मंत्री गडकरी यांनी आमदारांना नगरसेवकांकडून निष्ठने काम करून घेण्याच्या तर आपापल्या क्षेत्रातील विकासकामांसाठी विजय आवश्‍यक असल्याने कुठलीही अपेक्षा न ठेवता काम करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिल्या. यावेळी त्यांनी या निवडणुकीचा वेगळा "अर्थ"काढणाऱ्यांच्या मनाचाही कानोसा घेतल्याचे समजते. 
अशा लोकप्रतिनिधींना त्यांनी चांगलेच ठणकावल्याचे समजते,वरिष्ठांच्या या आदेशामुळे निवडणुकीत उत्साहात असलेल्यांचे चेहरे लटकलेले दिसले. या बैठकीत वर्धेचे खासदार रामदास तडस,मंत्री अमरीश राजे,खा.अशोक नेते आमदार नाना श्‍यामकुळे,कीर्तीकुमार भांगडिया,अतुल देशकर,तसेच भाजपचे पदाधिकारी आदींचीही उपस्थिती होती. 
                           -----------------------------------------------------------------------
जाहिरात...
भारतात पहिल्यांदा जागतिक पातळीवरील एक अग्रगण्य कंपनी घेऊन आली, कुक्कुट पालन ,मत्स्य पालन,शेळी पालन,दुध डेअरी यासारख्या संपूर्ण व्यवसायासाठी लागणारे संपूर्ण प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळणार अगदी निशुल्क, याच सोबत पशुखाद्य,पिल्ले,औषधी, या सारख्या संपूर्ण goods अतिशय अल्प दरात उपलब्ध ...त्यासाठी संपर्क करा:9175937925 या क्रमांकावर (घरपोच सेवा उपलब्ध).

-------------------------------------------------------------------------
Gas safety device.
आपके एल.पी.जी गॅस सिलेंडर कि सुरक्षा अब आपके हात 
"सुरक्षित नारी सुरक्षित परिवार"
क्या आप अपने हि घर मे सुरक्षित है ?
दुर्घटना होणे से पहिले सावधानी बरते !
समय कभी बताकर नाही आता....तो इंतजार कीस बात का...
तुरंत मिलीये ..कही देर ना हो जाए !
*कल करेसो आज कर ,आज करे सो अब *
पल मे प्रलय हो जायेगा तो करेंगा कब !
जीवन अनमोल है!और आपका परिवार .........?
विशेषताए...
* सूक्ष्म गॅस लिकेज का परीक्षण.  
* गॅस का परिपूर्ण उपयोय एव गॅस के प्रमाण कि जानकारी गॅस कि बचत अर्थात पैसो की बचत
* किसी कारण होणे वाले गॅस लिकेजपर यह डीवाईस सप्लाई बंद कर देता है. 
आपकी सेफ्टी हि पुरे परीवार कि लाईफ सेफ्टी है..
जो अपने परीवारसे करते है प्यारवह गॅस सुरक्षा यंत्र से कैसे करेंगे इन्कार
तो फिर जल्दी ,आये जल्दी  पाये
संपर्क करे:9175937925,9021527117 

कृपया दिये गये लिंक ओपन करे :  https://youtu.be/IaXlvfNtkpo

Saturday, May 05, 2018

पोलिस खबऱ्या असल्याच्या संशयावरुन नक्षल्यांनी केली रहिवास्याची हत्या

पोलिस खबऱ्या असल्याच्या संशयावरुन नक्षल्यांनी केली रहिवास्याची हत्या

गडचिरोली/प्रतिनिधी: 
माओवाद्यांकडून एकाची हत्या करण्यात आलीये. माओवाद्यांकडून गोळ्या झाडून ही करण्यात आली आहे. धानोरा तालुक्यातील होरेकसा येथील रहिवासी असलेल्या पांडुरंग पदा यांची हत्या करण्यात आल्यानं एकच खळबळ उडालीये. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडल्याचं कळतंय. गेल्या काही दिवसांपासून गडचिरोलीत नक्षलवादविरोधी कारवायांमध्ये मोठ्या प्रमाणात माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं होत्या. दरम्यान आता नक्षलवाद्यांकडून करण्यात आलेल्या या हत्येमुळे पुन्हा एकदा तणावाचं वातावरण गडचिरोलीत निर्माण झालंय.
शुक्रवारी  रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास ३० ते ४० सशस्त्र नक्षलवादी पांडुरंगच्या घरी गेले. त्यांनी पांडुरंगला झोपेतून उठवून दोनशे मीटर अंतरावर असलेल्या त्याच्या शेतात नेले आणि चेहऱ्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार करुन त्याची हत्या केली. या घटनेमुळे परिसरात दहशत पसरली आहे. 
घटनास्थळी नक्षल्यांनी पत्रक टाकल्याचे आढळून आले आहे. ८ मे २०१६ रोजी जहाल नक्षलवादी व चातगाव एरिया कमिटीची सचिव रजिता उर्फ रामको ऋषी उसेंडी पोलिसांशी झालेल्या चकमकीत ठार झाली होती. तिची माहिती पांडुरंग पदा यानेच दिली, असा आरोप पत्रकात करण्यात आला आहे.

Thursday, May 03, 2018

चंद्रपूर-वर्धा-गडचिरोली मतदारसंघातून भाजपचे आंबटकर तर काँग्रेसकडून इंद्रकुमार सराफ

चंद्रपूर-वर्धा-गडचिरोली मतदारसंघातून भाजपचे आंबटकर तर काँग्रेसकडून इंद्रकुमार सराफ

नागपूर/प्रतिनिधी:
विधान परिषदेसाठी चंद्रपूर-वर्धा-गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भाजपने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जवळीक असलेले तसेच पक्षाचे प्रदेश सरचिटणीस रामदास आंबटकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे.तर चंद्रपूर - वर्धा - गडचिरोली याच मतदारसंघासाठी काँग्रेसकडून वर्धेचे माजी नगराध्यक्ष इंद्रकुमार सराफ यांना उमेदवारी देण्यात आली. 
सध्या भाजपचे मितेश भांगडिया या मतदारसंघाचे आमदार आहेत त्यांनी पुन्हा निवडणूक लढण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आंबटकर यांच्यासह अरुण लखानी, सुधीर दिवे यांची नावे चर्चेत आली होती. तोडीसतोड लढत देण्यासाठी भाजप आणि काँग्रेस दोघेही एकामेकांच्या उमेदवाराची प्रतीक्षा करीत होते.एका निष्ठावान कार्यकर्त्याला उमेदवारी दिल्याने भाजपचे उत्साह संचारला आहे. 
रामदास आंबटकर मूळचे वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्‍यातील वडनेर येथील रहिवासी आहेत. त्यांचे वडील अधिकारी होते. मात्र, संघावर बंदी घातल्याने त्याविरोधात आंदोलन उडी घेतली होती. त्यामुळे त्यांना शासकीय नोकरी गमवावी लागली. तेव्हापासून त्यांनी उर्वरित संपूर्ण आयुष्य संघ कार्यासाठी वाहून घेतले. रामदास आंबटकर हेसुद्धा सुमारे ३५ वर्षांपासून भाजपात कार्यरत आहेत. विद्यार्थी परिषदेपासून त्यांनी कामाला सुरुवात केली. अनेक वर्षे पूर्व विदर्भाचे संघटन सचिव होते. त्यानंतर २००४ ते १५ या काळात भाजपचे संघटन सचिव होते. त्यांच्या कार्याची पावती म्हणून त्यांना भाजपने सरचिटणीस केले. आता त्यांना विधान परिषदेत पाठविण्यात येणार आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोघांनीही आंबटकरांच्या नावाला पसंती दिल्याचे कळते.
माहिती द्या अन व्हा लखपती...

माहिती द्या अन व्हा लखपती...

गडचिरोली/प्रतिनिधी:
 गडचिरोलीत ३९ नक्षलवाद्यांचा खात्मा केल्यानंतर नक्षलवाद्यांविरोधात पोलिसांनी जोरदार मोहिम उघडली आहे. निष्पाप आदिवासींची हत्या करणाऱ्या पाच जहाल नक्षलवाद्यांना पकडण्यासाठी गडचिरोली पोलिसांनी १ कोटी ७१ लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे. त्यात एका महिला नक्षलवाद्याचाही समावेश आहे. विशेष म्हणजे इतिहासात पहिल्यांदाच वर्तमानपत्रांना जाहिराती देऊन गडचिरोली पोलिसांनी हे बक्षीस जाहीर केलं आहे. 
पोलीस अधिकारी आणि सी-६० च्या जवानांनी गडचिरोलीत नुकत्याच केलेल्या कारवाईत ३९ नक्षलवाद्यांना ठार केलं होतं. त्यानंतर पोलीस आणि सुरक्षा दलाच्या जवानांचं मनोबल वाढल्याने पोलिसांनी थेट जाहिराती देऊनच नक्षलवाद्यांच्या टॉप पाच कमांडरला पकडण्यासाठी कंबर कसली आहे. त्यासाठी गडचिरोली पोलिसांनी या नक्षलवाद्यांच्या फोटोसह सर्व वर्तमानपत्रात जाहिराती दिल्या आहेत. 'द्या माहिती, व्हा लखपती' अशा मथळ्याखाली या जाहिराती देण्यात आल्या आहेत. 
या जाहिरातीत मल्लोजुल्ला वेणुगोपाल ऊर्फ भुपती ऊर्फ सोनू ऊर्फ लच्छन्ना अभय याच्यावर ६० लाख, दीपक ऊर्फ मिलिंद ऊर्फ सह्याद्री तेलतुंबडे याच्यावर ५० लाख, नर्मदाक्का ऊर्फ उषाराणी किरणकुमार हिच्यावर २५ लाख, जोगन्ना ऊर्फ चिमाला नरसय्या याच्यावर २० लाख तर पहाडसिंग ऊर्फ अशोक ऊर्फ बाबुराव तोफा याच्यावर १६ लाखाचं बक्षीस जाहिर करण्यात आलं आहे. हे सर्वजण महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, छत्तीसगडमधील आहेत. हे पाचही जण जहाल नक्षलवादी आहेत. त्यांनी गडचिरोलीत अनेक आदिवासींची हत्या केली असून त्यांचा घातापाती कारवायांमध्येही सहभाग असल्याचं पोलिसांनी जाहिरातीत म्हटलं आहे. या नक्षलवाद्यांना अटक केल्यास किंवा त्यांना जीवे मारले तरीही बक्षीस दिले जाणार असून संबंधितांचं नाव गुप्त ठेवण्यात येणार असल्याचं पोलिसांनी या जाहिरातीत स्पष्ट केलं आहे. ०७१३२-२२२३४८, ९४२१६९९८०८, ७२१८८७८१७२ या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहनही गडचिरोली पोलिसांनी केलं आहे.

Thursday, March 29, 2018

आश्रमशाळेतील दहावीच्या विद्यार्थिनीने दिला मुलीला जन्म

आश्रमशाळेतील दहावीच्या विद्यार्थिनीने दिला मुलीला जन्म

aadivasi girl pregnant साठी इमेज परिणामगडचिरोली/प्रतिनिधी:
 अहेरी तालुक्यातील वेलगूरच्या राजे धर्मराव आश्रमशाळेत दहावीला शिकत असलेली विद्यार्थिनी चक्क  एका सुदृढ मुलीला जन्म दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी संस्थेने आश्रमशाळेचे मुख्याध्यापक तसेच महिला व पुरूष अधीक्षकांना तडकाफडकी निलंबित केले.
विशेष म्हणजे सदर विद्यार्थिनीने दहावीची परीक्षाही दिली. पण तरीही तिच्याबद्दल कोणत्याही शिक्षकाला, अधीक्षकांना साधा संशयही आला नाही,  आपल्याच वर्गात शिकणाऱ्या गावाकडच्या विद्यार्थ्यासोबत तीन वर्षांपासून प्रेमसंबंध असल्याची कबुली   देऊन आपली कोणाबद्दलही काही तक्रार नसल्याचे बयाणात म्हटले आहे. ती आणि तिचा प्रियकर दोघेही दहावीत असले तरी ते २० वर्ष वयाचे आहेत. यापूर्वी दुसऱ्या गावातील आश्रमशाळेत दोघेही काही वर्ष नापास झालेले आहेत,  
या विद्यार्थिनीला प्रसूतीच्या वेदना होऊ लागल्यानंतर सुरूवातीला अहेरी व नंतर गडचिरोलीला भरती करण्यात आले. गडचिरोलीत तिने एका मुलीला जन्म दिला. विशेष म्हणजे तिची ‘नॉर्मल डिलीव्हरी’ झाली आहे. रक्ताची कमतरता असल्यामुळे नंतर तिला चंद्रपूरला हलविण्यात आले. यासंदर्भातील तक्रार संस्थेकडून आल्यानंतर अहेरी येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाने त्या मुलीचे बयाण घेतले. दरम्यान राजे धर्मराव शिक्षण संस्थेने मुख्याध्यापक एम.एस. कुर्वे, अधीक्षक आर.बी. पोलोजीवार व महिला अधीक्षिका डोंगरे यांना निलंबित केले.

वैद्यकीय तपासणीच होत नाही
घडलेल्या संपूर्ण प्रकरणावरून आता विध्यार्थ्यांच्या शारीरिक तपासणीचा मुद्दा समोर आला. आश्रमशाळेतील विद्यार्थ्याची वर्षातून किमान तीन वेळा वैद्यकीय तपासणी होणे आवश्यक असते. ही तपासणी फिरते वैद्यकीय पथक किंवा प्राथमिक आरोग्य केंद्राचे पथक करते, पण प्रत्यक्षात अशी तपासणी केलीच जात नसल्याचे या प्रकारावरून स्पष्ट होते.

Tuesday, February 27, 2018

अतिदुर्गम भागातील आदिवासींच्या जीवनात"महावितरणने"पेरला प्रकाश

अतिदुर्गम भागातील आदिवासींच्या जीवनात"महावितरणने"पेरला प्रकाश

चंद्रपूर/विशेष प्रतिनिधी:
गडचिरोली जिल्हयातील अतिदुर्गम व प्रगतीपासून दूर असलेल्या, दिवसभर शेतात,रानात उपजिविकेसाठी राबून घरी परतलेल्या थकलेल्या तसेच प्रकाशासाठी तेलाच्या दिव्यांवर अवलंबून असणाऱ्या कोकामेटा टोला या गावाच्या गावकऱ्याच्या जीवनात 29.01.18 हा दिवस केवळ प्रकाशच घेवून नव्हे तर प्रगतीचा सुगंध घेवूनआला.
गडचिरोली सारख्या अतिदुर्गम जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील आतापर्यंत विदयुतिकरण न झालेल्या या गावाचे विद्युतीकरण दि 29.01.18 रोजी महावितरण चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता श्री. दिलीप घुगल यांचे हस्ते झाले व संपूर्ण गाव चेहऱ्यावर एक आनंदाची नवी किरण बघायला मिळाली. शेती व वन रोजगारांवर अवलंबून असलेल्या केवळ 11 घरांची वस्ती असलेल्या सर्व सर्वांना महावितरणने सौभाग्य योजने अंतर्गत मोफत विजजोडण्या करून दिल्या. गडचिरोली जिल्हयातील आलापल्ली व गडचिरोलीमधील एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल 610 गरीब आदिवासी बांधवांच्या घरातील तेलाच्या दिव्यांची जागा आता एलईडी दिव्यांनी घेतली आहे.
सौभाग्य योजनेच्या माध्यमातूनच गडचिरोली व आलापल्ली या दोन विभागातील एकदंरीत 610 कुटुंबांना सौभाग्य योजनेच्या माध्यमातून वीजजोडणी सुविधामहावितरण कडून प्राप्त झाली आहे. यात आलापल्लीतील 509 घरकुलांना तर गडचिरोलीतील 101 गरीब आदिवासी बांधवांच्या कुटूंबांचा समावेश आहे.
प्रकाशमान आदिवासी साठी इमेज परिणामया सर्व गावात जाण्यासाठी रस्ते नाही, त्यामुळे केवळ कच्च्या रस्त्यांचा मार्ग क्रमत, मैलो न मैल रानवाटा चालत महावितरणच्या आलापल्ली व गडचिरोली विभागातील कर्मचारी व अभियंत्यांनी या वीजजोडणींसाठी पायाभूत सुविधा -वीजेची रोहित्रे, वीजेची खांबे व वीजवाहिण्या उभ्या करत आलापल्ली, एटापल्ली, सिरोंचा, भामरागड व धानोरा उपविभागांतर्गत येणाऱ्या 40 गावातील गरीब आदिवासींच्या जीवनात प्रकाशाची वाट उपलब्ध करून दिली. 
आलापल्ली विभागांतर्गत येणाऱ्या 33, भामरागड उपविभागात 110, एटापल्ली उपविभागात 136, सिरोंचा उपविभागात 230 अशा एकूण 509 दारिद्र रेशेखालील कुटूंबे तर गडचिरोली विभागांतर्गत येणाऱ्या धानोरा उपविभागातील 101 घरात महावितरणचा प्रकाश सौभाग्य योजनेच्या माध्यमातून पोहोचला आहे.
वर्षानुवर्षे रानावनात भटकून भाकरीचा चंद्र कमावणे तर चंद्रांच्या चांदण्यात उद्याच्या उदयाची स्वप्ने रंगविणे, कुडाच्या-मातीच्या घरात तेलाच्या दिव्याच्या प्रकाशात जीवन जगतांना घराच्या कौलातून येणारा चंद्रप्रकाश तेलाचा दिवा हिच प्रकाशाची साधने असतांना सौभाग्य योजनेमधून जेव्हा ६१० आदिवासींच्या जीवनात प्रकाशाची किरणे पेाहोचली तेव्हा समाधानाचा सुर्य त्या आदिवासींच्या चेहऱ्यावर उगवला. 

यातच चंद्रपूर गडचिरोली जिल्याच्या सीमेवर असलेल्या चंद्रपूर परिमंडळांतर्गत बल्लारशाह विभागातील जिवती उपविभागातीतील दुर्गम अशा घाटरायगुडा, गावातील 8, पाटागुडा गावातील 11 व आंबेझरी गावातील 12 व सेवादासनगर येथिल 29 अशा एकंदरीत ६० दारीद्रय रेशेखालील गावकऱ्यांच्या जीवनात महावितरणने वीजजोडणी देवून गरीब आदिवासींच्या जीवनात प्रकाशाच्या किरणांना वाट उपलब्ध करून दिली आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेत जाणाऱ्या आता लहानग्या विध्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी तेलाच्या दिव्याच्या प्रकाशाची जागा आता एलईडी बल्बचा प्रकाशाने घेतली आहे. जीवती तालुक्यातील घाटरायगुडा, पाटागुडा सेवादानगर व आंबेझरी हि गावे तालुक्याच्या शेवटच्या टोकावर दूर्गम व डोंगरव्याप्त भागात महाराष्ट्र व तेलंगणाच्या सिमेवर वसलेली आहेत. गावातील लोक आदिवासी कोलाम असून त्यांचा उदरनिर्वाह हा शेती तसेच जंगलातून मध गोळा करणे आदीवर होतो. तालुक्यापासून 15 ते 20 किमी दुर असणारी ही चारही गावे अनुक्रमे 13-14 घरांची वस्ती असलेले आहे.
चंद्रपूर मंडलाचे अधिक्षक अभियंता श्री. हरिश गजबे व जिवती उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता श्री. मांगिलाल राठोड व कनिष्ठ अभियंता श्री. विनोद भलमे, यांनी या घाटरायगुडा गावातील 8, पाटागुडा गावातील 11, सेवादासनगर गावातील 29 व आंबेझरी गावातील 12 अशा 50 कुटूंबांच्या जीवनात प्रकाश किरणे पोहोचवून समाजाचाच भाग असलेल्या परंतु प्रगतीपासून दूर असलेल्या बांधवाना प्रकाशाची भेट देवून त्यांना प्रगतीची वाट दाखवली.
भामरागड तालुक्यातील आतापर्यंत विदयुतिकरण न झालेल्या या गावाचे विद्युतीकरण दि 29.01.18 रोजी महावितरण चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता श्री. दिलीप घुगल यांचे हस्ते झाले व तेव्हा संपूर्ण गाव आनंदमय झाले.कोकामेटा टोला गाव हे जिल्हा मुख्यालयापासून जवलपास 200 कि.मी व तालुका मुख्यालया पासुन जवळपास 15 कि.मी.अंतरावर असुन अतिशय दुर्गम भागात स्थित आहे. गावात जाण्यासाठी रस्ते नाही त्यामुळे केवळ कच्च्या रस्त्यांचा मार्ग क्रमत डोंगर दरीतून वाट काढत, जंगलातून महावितरणच्या आलापल्ली विभागांतर्गत भामरागड उपविभागातील कर्मचाऱ्यांनी तसेच कंत्राटदारांनी वीजेचे एक 63 केव्हीएचे रोहित्र, वीजेची खंबे 2.5 किमी उच्चदाब वाहिनी व 1 किमी लघूदाब वीजवाहिनीचे प्रयोजन करत कोकामेटा टोला वासियांच्या जीवनात प्रकाषाची वाट उपलब्ध करून दिली व मुख्य अभियंता श्री. दिलीप घुगल यांनी वीजेची कळ दाबताच सर्व गावात सुर्य, चंद्राच्या व तेलाच्या दिवाच्या प्रकाशानंतर महावितरणद्वारा प्रकाश पेरला गेला.
शेती व वन अवलंबित वन रोजगारांवर अवलंबित केवळ 11 घरांची वस्ती असलेल्या सर्व 11 घरांना सौभाग्य योजने अंतर्गत मोफत विजजोडण्या देण्यात आल्या. गोंगलू देवू कोसामी, लालसू इरपा वड्डे, चैते मंजूरू वड्डे, राकेश मुरा मडावी, कटीया पेका कुसामी,राजे देबू दुर्वे, चैतू पेका मडावी, सोमा चुक्कू महाका, इरपा कटीया पुंगाटी, केये देउ कुरसामी,सैनू पेका मडावी यांना या वीजजोडण्या देेण्यात आल्या , त्यांच्या व त्यांच्या कुटुंबियांसाठी प्रकाश -प्रगतीची दारे उघडली जाण्यात महावितरणचा हातभार लागला. 
मुख्य अभियंता श्री. दिलीप घुगल व गडचिरेाली मंडलाचे अधिक्षक अभियंता श्री. अषोक म्हस्के यांच्या मार्गदर्षनात गडचिरेाली विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. विजय मेश्राम व आलीपल्ली विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. अमित परांजपे यांनी या वीजजोडण्या देण्याचे नियेाजन करीत गरीब आदिवासी कुटूंबांना प्रकाशाची भेट दिली आहे.
ज्या घरात अजूनही वीज पोहोचली नाही, अशा कुटुंबात मोफत वीज देण्याची घोषणा पंतप्रधानांनी सोमवारी केली असून, त्यानुसार महाराष्ट्रात अजून ३ लाख ६४ हजार कुटुंबांत या 'सौभाग्य' योजनेतून वीजपुरवठा करण्याचे आव्हान 'महावितरण'समोर आहे. 'महावितरण'ने मार्च २०१५ पासून तब्बल १६ लाख कुटुंबांच्या घरांत उजेड पेरण्याचे काम केले आहे.
देशात अजूनही वीज पोहोचली नाही अशी जवळ पास चार कोटी कुटुंबे आहेत. त्यांना मार्च २०१९ पर्यंत वीज देण्याचे पंतप्रधानांनी जाहीर केले आहे. त्यासाठी केंद्र सरकार १६ हजार ३२० कोटी रुपये खर्च करणार आहे. सन २०११ च्या सामाजिक व आणि आर्थिक जनगणनेमध्ये नोंदविण्यात आलेल्या गरिबांना मोफत कनेक्शन देण्याची ही 'सौभाग्य' योजना आणली आहे















Monday, February 26, 2018

बस नाल्यात कोसळून २२ प्रवासी जखमी

बस नाल्यात कोसळून २२ प्रवासी जखमी

गडचिरोली - चामोर्शी मार्गावरील दर्शनीजवळील घटना
गडचिरोली - अहेरीवरून गडचिरोलीकडे येणाºया राज्य परिवहन महामंडळाच्या बसचालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस नाल्यात कोसळून झालेल्या अपघातात चालक-वाहकासह २२ प्रवासी जखमी झाल्याची घटना काल रात्री ७.३० वाजताच्या सुमारास गडचिरोली-चामोर्शी मार्गावरील दर्शनी गावाजवळ घडली.
प्राप्त माहितीनुसार राज्य परिवहन महामंडळाची अहेरी आगाराची एमएच-४० एक्यू- ६१११ या क्रमांकाची बस अहेरीवरून गडचिरोलीकडे येत होती. दरम्यान सायंकाळच्या सुमारास दर्शनी गावालगत असलेल्या वळणाजवळील नाल्यावर येताच बसचालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. यामुळे बस नाल्यात जाऊन कोसळली. या अपघातात सुदैवाने २२ प्रवासी बचावले असले तरी ते किरकोळ जखमी झाले आहेत.
जखमींना उपचारासाठी जिल्हा सामान्य रूग्णालयात भरती करण्यात आले. बस नाल्यात कोसळल्याची माहिती मिळताच दर्शनी व परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. या मार्गावरून ये-जा करणाºया नागरिकांनी मिळेल त्या वाहनाने बसमधील जखमी प्रवाशांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रूग्णालयात भरती केले.

Thursday, February 22, 2018

गडचिरोलीत शिक्षिकेच्या प्रसंगावधानाने टळले बालिकेचे अपहरण

गडचिरोलीत शिक्षिकेच्या प्रसंगावधानाने टळले बालिकेचे अपहरण

Plan of kidnapping a girl child is failure due to teacher's presence of mind in Gadchiroli | गडचिरोलीत शिक्षिकेच्या प्रसंगावधानाने टळले बालिकेचे अपहरण
गडचिरोली/प्रतिनिधी: 

शहरातील ब्रह्मपुरी मार्गावरील एका कॉन्व्हेंट स्कूलमधून तीन वर्षीय बालिकेचे अपहरण करण्याचा प्रयत्न झाला. शाळेच्या शिक्षिकेने समयसूचकता दाखवत बालिकेच्या वडिलांना फोन करून माहिती दिल्याने अपहरणकर्त्यांचा डाव फसला.
प्राप्त माहितीनुसार, देसाईगंज शहरातील उद्योजक आकाश अग्रवाल यांच्या एकुलत्या एक तीन वर्षीय कन्येला पालकांनी नेहमीप्रमाणे गुरूवारी (दि.१५) ब्रम्हपुरी रोडवरील लिटील फ्लॉवर स्कूलमध्ये सोडून दिले. सकाळी ११.५० च्या दरम्यान चेहरा दुपट्ट्याने बांधलेले दोन इसम दुचाकीवरून शाळेत आले. नायरा अग्रवालला नेण्यासाठी आलो आहोत अशी बतावणी त्यांनी केली. मात्र शिक्षिका अनिसा लालानी यांनी नायराचे वडील आकाश अग्रवाल यांना विचारुन सांगते, असे म्हणून त्या आत गेल्या आणि मोबाईलवरून अग्रवाल यांना नायराला घेण्यासाठी कोणाला पाठविले का, असे विचारले. मात्र आपण कोणालाही पाठविले नसून रोज तिची आजी तिला घेण्यासाठी येते. आम्ही कुणालाही पाठवले नाही, असे उत्तर मिळाल्याने शिक्षिका लालानी त्या इसमांना पाहण्यासाठी बाहेर आल्या. मात्र त्या बाहेर येण्यापूर्वीत दुचाकीवरून आलेले ते दोघेही पसार झाले होते. त्यामुळे नायराचे अपहरण करण्याचा त्यांचा डाव होता, हे स्पष्ट झाले.
६ फेब्रुवारीला आंबेडकर वॉर्डातील नगर परिषद शाळेतील पाच विद्यार्थ्यांचे अपहरण करुन सहा बुरखाधारी अपहरणकर्त्यांनी अनिकेत शाळेच्या मागील भाटीया पटेल यांच्या शेतातील ओसाड घरात त्यांना तब्बल पाच तास डांबून ठेवले होते, मात्र अपहरणकर्त्यांची गाडी वेळेवर न आल्याने अपहरण करण्यासाठीचा डाव उधळल्या गेला होता. त्या प्रकरणाला १० दिवस लोटत नाही तोच पुन्हा अपहरणाचा प्रयत्न करण्याची घटना घडल्यामुळे देसाईगंज शहरात अपहरण करणारी टोळी सक्रिय असण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. पोलीस त्यांना केव्हा शोधून काढतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अपहरकर्ते ओळखीचेच?
अग्रवाल यांच्या मुलीला जवळचे नातेवाईक व मित्रपरिवारात परी या नावानेच ओळखतात. नायरा हे तिचे शाळेतील नाव आहे. हे नाव फक्त घरातील मंडळी व शाळेच्या शिक्षिकांनाच माहित आहे. मात्र नायराला नेण्यासाठी आलेल्या त्या दोन इसमांनी थेट ‘नायरा’ हिला घेण्यासाठी आम्हाला पाठविले असे सांगितल्याने ते कुणीतरी ओळखीतलेच असावे, अथवा संपूर्ण माहिती काढलेल्या व्यक्तीने हे कटकारस्थान रचले असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.