काव्यशिल्प Digital Media: मराठा

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu
Showing posts with label मराठा. Show all posts
Showing posts with label मराठा. Show all posts

Saturday, August 04, 2018

चंद्रपुरात मराठा क्रांती मोर्चा धडकला जिल्हाधिकारी कार्यालयावर

चंद्रपुरात मराठा क्रांती मोर्चा धडकला जिल्हाधिकारी कार्यालयावर

चंद्रपूर/प्रतिनिधी:
सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज चंद्रपुरात मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.यात विविध मागण्यांचे निवेदन घेऊन मराठा समाज बांधव जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले.
या मोर्चाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून शहरातील गांधी चौक येथून सुरुवात झाली.आंदोलनातील समाज बांधवांवरील गुन्हे मागे घेण्यात यावे व जे मृत्युमुखी पडले त्यांच्या परिवाराला तातडीने आर्थिक मदत मिळाली पाहिजे तसेच घरातील एका सदस्याला नोकरी देण्यात यावी,मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे,कोपर्डीच्या बलात्काऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अश्या मागण्यां घेऊन हा मोर्चा  शहरातील मुख्य मार्गावरून काढण्यात आला, या मोर्चात चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक तालुक्यातून नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.त्यांनतर मोर्चातील एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले.