
चंद्रपुर/प्रतिनिधी:
शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत राज्यातील शंभरहुन अधिक भारतीय पोलीस सेवा (आय.पी.एस.) सेवेतील अधिकार्यांच्या बदल्या फडणवीस सरकार यांनी केल्या.गेल्या कित्येक दिवसांपासून ह्या बदल्या विविध कारणांमुळे रखडल्या होत्या.
अश्यातच चंद्रपूरचे नवे पोलिस अधीक्षक म्हणून डॉ.महेश्वर रेड्डी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ.महेश्वर रेड्डी हे गडचिरोलीचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक म्हणून काम बघत होते. त्यांची चंद्रपुर येथे पोलिस अधीक्षक म्हणून बदली करण्यात आली. चंद्रपुर येथे कार्यरत असलेल्या पोलिस अधीक्षक नियती ठाकर यांची मुंबई पोलिस उपायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.सोमवारी पदभार स्वीकारणार आहेत.